तळलेले फणसाचे गरे

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in पाककृती
12 May 2013 - 1:04 am

....बरेच दिवस मनात होतं या प्रकारा बद्दल माहिती देण्याचं. अता तसं पहायला गेलं तर या पाककृतीला फारशी मोठ्ठी कृती नाह्हीच आहे.पण तरिही मी माझ्या भावाच्या सासुरवाडीला (पावसला) त्यांच्याकडे गरे विकतात हे कळल्यावर, एकदा गेल्यावर पाहिनच कसे करतात ते... असं ठरवल होतं. गेल्यावर्षी अशीच एक उडती ट्रीप तिकडे घडली होती.तेंव्हा मी माझ्या सवयी प्रमाणे याचं व्होडिओ चित्रण (खास माझ्या पद्धतिने) करुन ठेवलं होतं. त्यात काल ख.फ.वरती गर्‍यांचा विषय हीटवर आलावता..मग म्हटलं, ही पाककृती प्रोफेशनली तयार करणारे श्री.मुरलीधर पंडीत यांना आपण ती इथे टाकुन त्यांनाच-प्रेझेंट करू.

(अर्थातच मी गेल्या महिन्यात कोकणात गेलोवतो,तेंव्हा अर्धा फणस आणला आणी मोजुन दोन तास हा खाली पाककृती नावानी जो लिहिलाय तो उद्योग करुन पाहिला,तेंव्हा हा मि.पा.वर टाकेन असं वाटलं सुद्धा नव्ह्तं... म्हणुन फोटु नाहित. नायतर आंम्हाला काय हौस कमी आहे? ;) .... तरिही श्री.पंडित यांच्या इथे तयार होणार्‍या ''तळलेल्या गर्‍यांची'' माझ्या-तोंडि माहिति सह व्हिडिओ क्लिप खाली देत आहेच... म्हणजे मारुती आमचा वाचा,आणी गणपति त्यांचा पहा! ;) )

थोडक्यात ही पाककृती अशी आहे---
साहित्यः-
१)कच्चा फणस
२)तो कापुन सोलण्यासाठी-वाटित तेल आणी हतात रग
३)मिठ-पाणी
४)खोबरे तेल

कृती:-
अता प्रथम अर्धा कच्चा फणस कोकणात रहात असाल तर झाडावरुन, कोकण सोडून-इतरत्र रहात असाल तर मार्केट मधुन...आणी तिथे तो मिळायची जी शाश्वती असते,त्या अनुषंगानी कोकणातनं कुणाबरोबर तरी येश्टीत्न पार्सल... असा घरी आणावा.
नंतर घरी आपल्या विळिवर कोबि कापायचा डब्बल येक्स्पिरियन्स मनात ठेऊन अडवा घेऊन मधोमध कापावा...आणी नंतर सुरिने(खरं म्हणजे सुर्‍यानेच...! ;) ) प्रत्येक अडव्या भागाचे उभे चार भाग करावे...

हं.... अता कंबर कसायची हं आता!

नंतर एखादं पोत्या सारखं दणकट आसन मांडीला घेऊन त्यावर बसावं.मग फणसाचा एक भाग हतात घेऊन तेल लावलेल्या हतानी गरे फणसातनं बोटानी ओढुन वेगळे करावेत. अता वेगळ्या झालेल्या गर्‍यांना फणसाच्या र्‍हायलेल्या दशा असातात त्याही नीट साफ करुन घ्याव्यात.यानंतर हतानीच गर्‍यातली अठळ(बी) वेगळी करुन गर्‍याचे दोन भाग करावेत... ( हुश्श्श... आमच्या सारख्या हौशी मंडळींचा निम्मा दम यातच निघतो. ;-) ) इथे २५ ओव्हर झाल्या ;) नंतर त्या गर्‍यांना फिंगरचिप्स प्रमाणे सुरुनी किंवा प्रोसेसरमधे उभे कापुन काढावे... मी पंडित काकांच्या प्रोसेसिंग युनिट मधे पाहिलं तेंव्हा त्यांनी तर १ खास गरे कापायचं यंत्रच करुन घेतलय. ते का? ते सुरिनी गरा पाटावर धरुन उभे छेद देताना मला कळलं.(इथेही गर्‍यांचा त्यांचा जन्मभुमितला-चिकटपणा हा गुण कापताना हताला चिकटुन मानसिक छळ वाढवत असतोच,पण काय करणार हौस आहे ना...मग भोगा! ;) )

नंतर कढैत अर्धाकिलो खोबरेल तेल मंद आचेवर तापत ठेवावं. दुसर्‍या बाजुला एका पातेल्यात अर्धा लि.पाण्याला अर्धा चमचा मिठ घालून ढवळुन मिठ-पाणी तयार करुन ठेवावं. तोपर्यंत तेल कढईवर बरच तापल्याचं आपल्याला लक्षात येइल! मग हतानी हळुहळु गरे कढईत सोडावे. मधे मधे झारा मारुन वर खाली करावे.आणी २/३ मिनिटानी,ओंजळभर गर्‍यांना २/३ चमचे मिठ-पाणी या प्रमाणात डाररेक कढैत गर्‍यांमधे मिठ-पाणी सोडावं...(तेल तडतडुन-अंगावर वगैरे येत नाही...काळजी नसावी...स्वाभाविक आहे हो,,,मिठ कोकणातलच ना..., फणसावर बरं तडतडेल ते ! ''पाण्यातुन पाजल्या मिठाला फणस जागतो'' असं म्हणतात,ते खोटं नै! ;) ) अता अजुन दोन मिनिटं झार्‍यानी गरे खाली वर करत रहावे. आणी एका बाजुला कागद पसरून तळलेले गरे त्यावर काढावे. गार झाले की हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. उसके बाद क्या...??? जब चाहो... खोलो- निकालो- और खा लो!!! :)

टीपा-
१)अर्धा कच्चा फणस म्हणजे पूर्ण वाढलेला अर्धा कच्चा फणस... बारिक साइजचं फळ नव्हे!
२)वितभर लांबिच्या विळिवर फणस कापायला जाऊ नये... ती आपली कोबिलाच बरी!!! बाजारातनं सुरा आणावा.
३)गरे पहिल्यापासुन ते शेवट पर्यंत मंद आचेवरच तळावे... नायतर, ''कोकणातला फणस-सुद्धा आपल्यावर जळतो '' अशी आत्मविदारक प्रतिक्रीया आपल्या मनात उमटेल.
४)गरे केल्यापासुन दोन दिवस चविला अतिशय फ्रेश लागतात. तिन दिवसानी ही चव अगदी थो....डी - उतरते.
==========================================================================
आता आपण खाली पाहाणार आहोत,श्री.पंडित यांचे इथे तयार केल्या जाणार्‍या ''तळलेल्या गर्‍यांची'' व्हिडिओ क्लिप.

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 May 2013 - 1:13 am | पैसा

एकदम कुरकुरीत पाकृ! वल्लीबुवांना टॅग करायची सोय हवी होती!

मोदक's picture

12 May 2013 - 4:09 am | मोदक

कशासाठी..?

(निरागस) मोदक

******************
माहितीपूर्ण धाग्याबद्दल धन्यवाद हो बुवा!

पैसा's picture

12 May 2013 - 7:44 am | पैसा

तू खफवर आला होतास का?

प्रचेतस's picture

12 May 2013 - 8:32 am | प्रचेतस

:D :D :D

मोदक's picture

12 May 2013 - 4:18 pm | मोदक

काय झाले होते रे..?

प्रचेतस's picture

12 May 2013 - 4:21 pm | प्रचेतस

कै नै. फणसगप्पा चालल्या होत्या फक्त.

अच्छा.. म्हणून आज बुवांच्या लेखाचा फणस केलास.

आणखी एक वाक्प्रचार - "लेखाचा फणस करणे" :D

चिंतामणी's picture

12 May 2013 - 1:37 am | चिंतामणी

पाकृ आणि लेखन चान चान आहे.

पण हे खाताना सोबत काय हवे??

एेला! नशीब घरात कालच दीड किलो आणलेत.
खाऊन येते, मग बाकीचं वाचते.. :-D .

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2013 - 2:15 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म! फणसाचे गरे नुसतेच, अनसा-फनसाच्या भाजीत किंवा फणसपोळी रुपात आवडतात पण हे तळलेले गरे विशेष आवडत नाहित. हं...चखना म्हणून चांगले लागतात.

सोपी आणि साधी पाककृती आहे. कधी करून पाहायला हरकत नाही.

सौंदाळा's picture

14 May 2013 - 10:59 am | सौंदाळा

पेठकरकाका,
कालच विचरणार होतो पण राहुन गेले.
अनसा-फणसाच्या भाजीची पाकक्रुती शेअर करा ना प्लिज. ऑलरेडी केली असेल तर लिन्क द्या.
नेटवर शोध घेतल्यावर गॅरेन्टेड रेसिपी सापडली नाही.
काही ठीकाणी त्यात आंबा घालवा, काही ठीकाणी कच्चा फणस, काही ठीकाणी पिकलेला फणस, भाजीचा फणस असे व्हेरीएशन्स होते. नक्की कशी करायची ही भाजी?
करायची अणि खायची खुप उत्सुकता आहे.
धन्यवाद!

प्यारे१'s picture

12 May 2013 - 2:51 am | प्यारे१

लई भारी गुर्जी.
चिप्सवाल्या केरळ्यांच्या दुकानाची आठवण आली एकदम!
ताजे ताजे मस्त लागतात एकदम.

यशोधरा's picture

12 May 2013 - 7:49 am | यशोधरा

आले का?

प्रचेतस's picture

12 May 2013 - 8:34 am | प्रचेतस

वा!!!!!!!!!!!!!!!!!.

फणसाचे तळलेले गरे अत्यंत आवडता पदार्थ. पाककृतीमध्ये फारसे स्वारस्य नाही. खायला मिळाल्याशी कारण.
आत्मुदांच्या नेहमीच्या शैलीतील वृतांत आवडला.
एकदाचा धागा टाकल्यामुळे आता ते काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर पडून ते त्रुप्तीच्या आनंदात विहरत बसतील.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2013 - 1:01 pm | अत्रुप्त आत्मा

@काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर पडून ते त्रुप्तीच्या आनंदात विहरत बसतील.>>> =)) नाsssही !
अत्रुप्ती हा(सुखी)जीवनाचा मूलाधार आहे,
म्हणुनच "मी" मरेपर्यंत अत्रुप्त रहाणार आहे. :-b

पण त्रुप्ती ही मोक्षाची पहिली पायरी आहे त्याचे काय?

मोदक's picture

12 May 2013 - 1:55 pm | मोदक

नो नाय नेव्हर..

बुवांच्या धाग्याचे काश्मीर होण्याची ताकद आहे या वाक्यामध्ये!! :-D

पैसा's picture

12 May 2013 - 1:58 pm | पैसा

कोण त्रुप्ती?

यशोधरा's picture

12 May 2013 - 8:05 pm | यशोधरा

मोक्षाची पहिली पायरी :D

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2013 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

@पण त्रुप्ती ही मोक्षाची पहिली पायरी आहे त्याचे काय?>>> मला मोक्ष नको.....च आहे. :p

@बघ कसे बेरकी भाव आहेत त्यांच्या चेहर्‍यावर...खाटीक बुवा. >>>आंsss.. दु..दु.. अगोबा. :p
तोफबत्ती आत्मा--तोफगोळा अगोबा
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/cannonball.gif

@मांसं यद्यपि तत्त्याज्यं हिंसा त्याज्या तु नैव सा |
पुरोहितोऽपि यत्रैषः भवति "व्हेज खाटिक:" ||

अजाशिरमिव फलं स शस्त्रेण छिनत्ति वै |
स आत्मा खलु अत्रुप्तः हिंस्रोऽपि "जोकरो" इव || >>> =))
...........................>>>
वृतांची ब्याट हतात घेतलेला मॅन
तुमच्या कवितेचे आंम्ही एकमेव शिलिंग फॅन =))

अता १ काव्य अगोबा वरही रचा
तुमची सगळी वृत्त त्यांनाही टोचा. :p

नायतर तुमच्या मागे येइन घेउन कवितेचं कोलित
ऐक माझं...बॅट्या,नायतर घालिन तुला चुलित http://www.easyfreesmileys.com/smileys/free-mad-smileys-165.gif

@अरे तेच तर दोन वायफळ शब्द आहेत माझे.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-1036.gif

मोदू मोदू तुला कुठुन खोदू
का मारु अंडी बुदु बुदु
लपुन छपुन तू मारतोस दगड
पळणार्‍या मोद्याला.......पकड....पकड...पकड...! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-542.gif

अता १ काव्य अगोबा वरही रचा
तुमची सगळी वृत्त त्यांनाही टोचा.

नायतर तुमच्या मागे येइन घेउन कवितेचं कोलित
ऐक माझं...बॅट्या,नायतर घालिन तुला चुलित

=)) =)) =)) =))

नष्टा थट्टा स्मृतिर्लब्धा त्वद्भयाच्च मया बुवा |
स्थितोऽस्मि हतबुद्धोऽहं करिष्ये वचनं तव || ;) ;)

एकदाचा धागा टाकल्यामुळे आता ते काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर पडून ते त्रुप्तीच्या आनंदात विहरत बसतील.

वल्ल्या.. आज एक मिपाकर म्हणून मला ही प्रतिक्रिया आवडली नाही. ;-)

प्यारे१'s picture

12 May 2013 - 1:45 pm | प्यारे१

आज नाही आवडली? हरकत नाही. उद्या आवडेल. ;)

प्रचेतस's picture

12 May 2013 - 2:01 pm | प्रचेतस

बरं मग?

तुम्ही बुवांच्या हळव्या आणि निरागस मनाचा थोडातरी विचार करावा अशी नम्र सूचना करतो.

(आणि माझे दोन वायफळ शब्द संपवतो.)

प्रचेतस's picture

12 May 2013 - 3:33 pm | प्रचेतस

बुवा..आणि ते पण हळवे आणि निरागस???

बघ कसे बेरकी भाव आहेत त्यांच्या चेहर्‍यावर

खाटीक बुवा. =)) =)) =))

a

मांसं यद्यपि तत्त्याज्यं हिंसा त्याज्या तु नैव सा |
पुरोहितोऽपि यत्रैषः भवति "व्हेज खाटिक:" ||

अजाशिरमिव फलं स शस्त्रेण छिनत्ति वै |
स आत्मा खलु अत्रुप्तः हिंस्रोऽपि "जोकरो" इव || ;) =)) =))

अभ्या..'s picture

12 May 2013 - 4:01 pm | अभ्या..

अगा माय माय
बॅट्या हे रे काय? व्हेज खाटीक? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
साष्टांग डंडवत तुला. :)

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च।
पनसपुत्रं बलिं दद्यात आत्मा शाकघातकः॥

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 6:09 pm | बॅटमॅन

दृष्ट्वैतच्च मुदितोऽहम् श्लोकस्यास्य विडंबनं |
आत्मनो आपणो शीघ्रं खलु निष्कासितोऽभवत् || =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2013 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता संस्कृत मधून येवढं तोडताय म्हणजे तुम्हीसुद्धा "शब्द खाटीकः" झालाच की नाय !? +D

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 6:45 pm | बॅटमॅन

हीहीही :D

पैसा's picture

12 May 2013 - 6:46 pm | पैसा

बॅटमॅनचं दुसरं नाव "भाषाभक्षक" असं आहे.

बुवा..आणि ते पण हळवे आणि निरागस???

अरे तेच तर दोन वायफळ शब्द आहेत माझे. :-D

खाटीक बुवा.. :-))

प्यारे१'s picture

12 May 2013 - 10:02 pm | प्यारे१

आगागागागागा... आगोबा!
मस्तच.

क्रिएटीव्हीटी अ‍ॅट बेस्ट का आणखी काही?

मस्त रे!

अभ्या..'s picture

12 May 2013 - 10:51 pm | अभ्या..

वल्ली लेका मला कॉम्पीटिशन करुन राह्यलास की. ;)
पण गुर्जीच्या चित्रातल्या जानव्याचा खांदा बदलला काय? ;)
व्यवसाय बदलताना एवढे सव्य अपसव्य करावे लागतात माहीती नव्हते ब्वा. ;)

सूड's picture

13 May 2013 - 1:56 pm | सूड

वल्ली फणसासारखा अघळपघळ, पसरट दिसतो असं मानलं तर डकवलेलं चित्रं अतिशय समर्पक आहे.

चौकटराजा's picture

12 May 2013 - 6:57 pm | चौकटराजा

फणसाचे तळलेले गरे अत्यंत आवडता पदार्थ.
हेच बोल्तो. इथला हुकमी एक्का यामाहावरून रत्नांग्रीस गेल्ता. त्याने आणले आहेत म्हणे ! .
मी १९७८ मधे मध्यम आकाराचा एक फणस ऑन ड्युडी टेबलावर खाल्ला होता फाडून ! आंबा, फणस व काजू याची आवड रत्ग्नांग्रीत जलम झाला म्हून असावी काय ???

विसोबा खेचर's picture

12 May 2013 - 8:39 am | विसोबा खेचर

पाकृ आणि शब्दांकन, दोन्हीही मस्त रे... :-)

मुक्त विहारि's picture

12 May 2013 - 9:31 am | मुक्त विहारि

झक्कास..

सौंदाळा's picture

12 May 2013 - 10:14 am | सौंदाळा

मस्त.
कधी कधी कटकटित लागतात. पण मंद आचेवर तळल्यावर खुसखुशीत होतात.
बाकी फणस कापा / बरका ने काही फरक पडतो का?

जबरदस्त... खुप आवडीचा प्रकार :)

दिपक.कुवेत's picture

12 May 2013 - 12:20 pm | दिपक.कुवेत

खुशखुशीत वर्णन. हापिसात तर वीडिओ दिसत नाहिये त्यामुळे घरी जाउन बघीन.

पिशी अबोली's picture

12 May 2013 - 12:38 pm | पिशी अबोली

मस्त..
खोबरेलापेक्षा अन्य तेलांमधे तळले तर चांगले टिकतात. अर्थात अर्ध्या फणसाचेच असतील तर टिकवायची फार गरज नाही म्हणा.. लगेच संपतील. :))
कच्चे गरे साफ करताना,चिरताना खाण्यात अजून मजा आहे. कच्च्या गर्‍यांची चव कशालाच नाही... :)

तर्री's picture

12 May 2013 - 12:49 pm | तर्री

मे ( वैशाख ) महिन्याची सुट्टी संपत आली आहे. पावसाचे आगमन कधी होणार याच्या चर्चा मोठी माणसे करत आहेत. भात पेरणी कधी करायची याची आखणी होते आहे. आते मामे भावंडानी १ महिनाभर "हैदोस " घातल्यावर त्यांच्या परतीचे रिझर्वेशन तयार आहे. उरलेले हे थोडेच दिवस भावंडे अखंड खेळत आहेत.....आणि तळलेल्या गर्यांचे बकणे भरले जात आहेत

असे काहीसे चित्र उभे राहिले. पाकृ आवडली.

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:26 pm | वेल्लाभट

आहाहाहाहा ! मेवा !

सुहास झेले's picture

12 May 2013 - 2:21 pm | सुहास झेले

जबरदस्त.... मस्त पाककृती :) :)

एकूणच फणस कापणे सोलणे म्हणजे लैच उपद्व्यापाचे काम दिसते गुरुजी.
तुम्ही झालात काय एक्स्पर्ट म्हणे त्यात? ;)

सानिकास्वप्निल's picture

12 May 2013 - 3:33 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ आणी चित्रफीत पण झक्कास :)

सस्नेह's picture

12 May 2013 - 9:10 pm | सस्नेह

हे घ्या...
a
अन द्या बरं गरे तळून...

श्रिया's picture

12 May 2013 - 9:43 pm | श्रिया

फणसाचे तळलेले गरे आवडतात. लेखन आणि व्हिडिओ क्लिपहि खासच!

धनुअमिता's picture

13 May 2013 - 1:43 pm | धनुअमिता

फणसाचे तळलेले गरे खुपच आवडतात.

सूड's picture

13 May 2013 - 1:54 pm | सूड

मस्तच पाकृ !!

ऋषिकेश's picture

13 May 2013 - 2:10 pm | ऋषिकेश

हे असे असते होय!
आभार!

च्यायला नशीबच फुटके म्हणायचे. तळलेले गरे आता काही खाता पण येत नाहीत आणि पाककृतीमधला विडीयु पण दिसत नाय.. :(