शूटआऊट @ वडाला

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
8 May 2013 - 7:26 am
गाभा: 

काल काल शूटआऊट @ वडाला पाहिला

अतिरिक्त भडक सीन आणि मध्यंतरपूर्वीचा संथ वेग वगळता बरा वाटला

पण मन्या सुर्वे ची कहाणी अधिक परिणामकारक रित्या सांगता आली असती असे वाटले

बॉलीवूड गुंडांचे ग्लोरीफिकेशन करतेय असा आरोप होत असला तरी दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस म्हणून मन्या बद्दल कुठेतरी हळवा कोपरा निर्माण होतो! मन्या सुर्वे मूळचा रत्नागिरी पावस जवळच्या रनपार गावचा ,म्हणजे आमच्या गावपासुन अगदी जवळ !तोही एक भावनिक मुद्दा होताच!!!!

चित्रपट संपताना एक विचार मनात येतो-

मुंबई पोलिसांनी मन्याचे एंकाऊंटर केले नसते तर ........................?

किंवा

मन्या ने दावूद च्या भावाला मारले ,त्यानंतर दावूद लाही मारले असते तर ...................?

कदाचित मुंबई आणि भारताचे आजचे चित्र बरेच वेगळे दिसले असते!!!

बाय द वे ,आता अरुण गवळी वरही फिल्म बनवणार का?

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

8 May 2013 - 7:28 am | मंदार कात्रे

सॉरी काही भाग डबल टाइप झालाय... संपादित करता येणार नाही का?

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 7:33 am | श्रीरंग_जोशी

छोटा राजन (दिपक निकाळजे), अरूण गवळी यांनीही दाऊदला आव्हान दिले होते, मग मन्या सुर्वे असे करणारा एकमात्र मराठी माणूस का बरे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 10:17 am | विश्वनाथ मेहेंदळे

दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस...

मुद्दलातला दाउद मराठी आहे हेच कित्येकांच्या लक्षात येत नाही.
मातृभाषा आणि धर्म याच्यात महाराष्ट्रात प्रचंड गल्लत केली जाते.

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2013 - 10:31 am | परिकथेतील राजकुमार

अशाच आशयाची पोस्ट फेसबुकावर पण हिंडते आहे. त्यात मन्याचा उल्लेख 'पहिला हिंदू डॉन' म्हणून आहे येवढेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 11:42 am | विश्वनाथ मेहेंदळे

ती पोस्ट तर डोक्यात गेली. "बघा कसा छाती दाखवत उभा आहे" छापाची वाक्ये होती.
हल्ली लोकांचा कशाचा अभिमान वाटेल सांगता येत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी

मुद्दलातला दाउद मराठी आहे हेच कित्येकांच्या लक्षात येत नाही.

प्रतिसाद लिहिताना मी पण ही बाब विसरलो होतो. कासकर आडनाव असलेला हा मराठी माणूस आंतरराष्ट्रीय तस्करी करणारी बहुराष्ट्रीय टोळी चालवतो.

या चर्चेतले इतर लोक तस्कर व गुंडच राहीले. तर दाऊद आंतरराष्ट्रिय दहशतवादी बनला अन देशाचा मोठा शत्रु झाला.

त्याची मराठीपणाची ओळख बर्‍यापैकी पुसली गेली आहे असे वाटते.

छोटा राजन (दिपक निकाळजे)

दिपक निकाळजे हे छोट्या राजनच्या भावाचे नाव. छोटा राजनचे खरे नाव ’राजेंद्र सदाशिव निकाळजे’.

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 8:25 pm | श्रीरंग_जोशी

जरा गोंधळ झाला प्रथम नाव लिहिण्यात.

सातार्‍या जिल्ह्यातल्या लोणंदचे आहे निकाळजे कुटूंब.

अभ्या..'s picture

9 May 2013 - 1:41 am | अभ्या..

सातार्‍या जिल्ह्यातल्या लोणंदचे आहे निकाळजे कुटूंब.

पक्के का? सोलापुरात त्याचा भाऊ नगरसेवक आहे.
सख्खा का कसला माहीत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2013 - 1:46 am | श्रीरंग_जोशी

माझा एक जवळचा मित्र आहे लोणंदचा. त्याच्याकडूनच कळले आहे हे.
पण गेल्या बरेच वर्षांपासून निकाळजे कुटूंब लोणंदला राहत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2013 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जालावर हाय का हा पिच्चर मला बघायचा आहे.

चित्रपट परिक्षणात मूख्य कथानक सोडून इतर मसाला भरल्यामुळे चित्रपट मध्यंतरानंतर रटाळ होतो असे वाचले आहे. अ‍ॅटम साँग आणि अन्य भडक (उघडी-नागडी) दुश्यांमुळे (आता असे प्रसंग कोणत्या चित्रपटात नाही, हा भागही आहेच) चित्रपटानं मार खाल्लाय असंही वाचनात आलं. एक चांगला शिकला सवरेला एक सरळ मुलगा आणि पुढे काय वाढून ठेवतो ते बघायला हवेच. जॉन आब्राहमची भूमिका बघायला आवडेलच.

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

8 May 2013 - 1:09 pm | भडकमकर मास्तर

सर, तुम्ही आमचं आशास्थान... काहीतरी संस्कारक्षम लिहाल , इथल्यांना मार्गदर्शन कराल असं वाटलं होतं...
तर असे हे गुंडांच्या उदात्तीकरणाचे सिनेमे तुम्ही पाहू नयेत असं वाटतं...

मनापासून लिहिलं सर... राग मानू नका... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2013 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट पाहिल्याशिवाय कसं कळणार चित्रपटात काय संदेश आहे ते ?
तेव्हा एकदा चित्रपट पाहतो आणि मग उदात्तीकरणाबद्दल ठरवतो.

आत्ताच चकती (सीडी)आणली आता पाहणं आलं. उद्या दुपारी हाणून देतो.

>>>मनापासून लिहिलं सर... राग मानू नका..
राग आला आहे. ;)

-दिलीप बिरुटे

मन्या सुर्वे खुप जुना गुंड का? आम्ही त्याचं नाव ऐकलं नाही कधीच म्हणुन विचारतेय.

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2013 - 10:11 am | परिकथेतील राजकुमार

त्यानी मात्र तुमचे नाव ऐकले होते, असे तो हाजी मस्तानला सांगत असताना वरदराजनने ऐकल्याचे करीमलालाच्या आत्मचरित्रात कुठेसे लिहिलेले आहे म्हणे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2013 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

@त्यानी मात्र तुमचे नाव ऐकले होते, >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

त्यात विशेष ते काय? आता आम्ही असल्या बारीक सारीक लोकांना लक्षात ठेवत नै म्हणुन विचारलं जुना का नवा म्हणुन.

मन१'s picture

9 May 2013 - 2:15 pm | मन१

ठ्ठो....

विसोबा खेचर's picture

8 May 2013 - 11:11 am | विसोबा खेचर

आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?

घराची किल्ली तीन तास मिळायची शक्यता नसल्याने तेवढ्यात हा चित्रपट बघितला. तेवढाच जरा गारव्यात वेळ घालवता आला.

'जॉनी मेरा नाम'(बहुतेक) सदृष्य ब्याकग्राउंड मुजिक सुरुवातीला बरे वाटले, पण त्याचा सतत भडिमार नंतर असह्य वाटू लागला.

सनी लिओनी चे आयटम सोंग बरे वाटले, तिला नाचता येत नाही, त्याची भरपाई तिच्या पूर्वायुष्यातील अनुभवातून आलेल्या अविर्भावातून भरून काढण्याचा प्रयत्न दिसून आला. ना अरत्र ना परत्र.

s

कंगना अधून मधून सुरेख दिसली.
k m

जान अब्राम्हण 'मनिया' म्हणून (या पिच्चर मधील 'मन्या' चा उच्चार) फारसा शोभत नाही असे मत झाले.

अनिल कपूर 'झकास' पण मनोज वाजपेयी सारख्याला किरकोळ रोल हे जरा खटकले.

दोनशे रुपये घालवून शेवटी घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले.

विसोबा खेचर's picture

8 May 2013 - 11:26 am | विसोबा खेचर

>>कंगना अधून मधून सुरेख दिसली.

खरंच! कंगना विलक्षण जीव लावते...!

तात्यांच्या वाक्यातला एक शब्द वाचायचाच राहिला. असो.
बाकी जॉनरावांकडून अभिनयाची मागणी करणे म्हणजे फारच.
अधिक माहिती कदाचित अदिती देऊ शकेल म्हणा. :)

सुहास झेले's picture

8 May 2013 - 1:18 pm | सुहास झेले

थेटरात बघायची इच्छा नाही. डाउनलोड करून बघेन :) :)

जॉनरावांकडून अभिनयाची मागणी करणे म्हणजे फारच.... +१ ;-)

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2013 - 1:21 pm | प्रभाकर पेठकर

मुंबई पोलिसांनी मन्याचे एंकाऊंटर केले नसते तर ........................?

काही काही एन्काउंटर्स, पोलीसांकरवी, दाऊदच करवून घेतो असेही ऐकले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2013 - 3:50 pm | निनाद मुक्काम प...

ह्या विषयात रामदास काका जास्त सांगू शकतील.
मात्र मान्य सुर्वे हा फाटक रोबर होता , तो दरोडे टाकायचा मात्र हिंदू डॉन म्हणून त्याने डॉन तीन वर्षात स्वतःची संघटित टोळी ज्यात १०० ज्यावर माणसे पगारावर असणे असे कंपनी पद्धतीचे कार्य अजिबात नव्हते.
डी , मंचरेकर , नाईक , गवळी , छोटा राजन ह्यांच्या कंपन्या होत्या.
सवंग प्रसिद्धी साठी एकता ने दाउद व मन्या ह्यांच्यातल्या राडा झाल्याचे दाखवले.
सुरवातीच्या प्रसंगात दाउद ला शिव्या देणारा , त्याला आव्हान देणारा मन्या चे
प्रोमोज दाखवले.
ह्यामुळे डी कंपनी खवळली व त्यांनी बालाजी च्या कार्यालयात फोन करून त्यांना तंबी दिली. व त्यामुळे एका दिवसात दाउद चा नाम उल्लेख टाळून तेच प्रोमोज दूर केले.
मुळात दाउद महाराष्ट्रीय त्याने मुंबईत अनेक वर्ष पठाण समूहाचा गुन्हेगारी जगता वरील प्रभाव नष्ट केला.
ह्यात सुरवातीला छोटा राजन , गवळी , रमा नाईक असे त्याला स्थानिक मराठी साथीदार लाभले हे सर्व मराठी तरुण गिरण्या बंद पडलेल्या मराठी कुटुंबातील बेरोजगार , असंतुष्ट ,होते. ह्याचेच प्रभावी चित्रण एन चंद्रा ह्यांनी
अंकुश व पुढे तेजाब मधून केले.

आदूबाळ's picture

8 May 2013 - 6:36 pm | आदूबाळ

या इतिहासकथनाचा टोन बिगरी ते मॅट्रिकमधल्या दामलेमास्तरांच्या

"शहाजीचा मुलगा संभाजी याने मुसलमानांचा काटा काढला आणि स्वराज्य स्थापन केले" (यात अफजुलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत सगळं आलं)

सारखा वाटला!

(ह. घ्या बर्का!)

आदूबाळ's picture

8 May 2013 - 8:32 pm | आदूबाळ

शहाजीचा मुलगा शिवाजी

असे वाचावे

चिगो's picture

8 May 2013 - 8:18 pm | चिगो

ह्या पुस्तकात 'मुंबईज हॅडली चेस' नावाचे प्रकरण आहे.. मन्या सुर्वेच्या प्रकरणात पाणी घालून हा चित्रपट बनवला आहे..

सवंग प्रसिद्धी साठी एकता ने दाउद व मन्या ह्यांच्यातल्या राडा झाल्याचे दाखवले

मन्याने आलमजादा आणि औरंगजेब ह्यांच्या मदतीने दाऊदचा मोठा भाऊ साबिरला मारले.. फुलांनी सजवलेल्या गाडीने पाठलाग करुन त्याला ठोकण्यात आले. लेखकाच्या मते हा प्लान मन्याने चेसच्या एका कादंबरीतल्या वर्णनावरुन रचला.. त्यामुळे दाऊद आणि मन्यात वैर होते, हे खरंय..
बाकी पुस्तक बरंय..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 May 2013 - 1:42 am | निनाद मुक्काम प...

चिगो साहेब
मन्याला यमसदनास पाठविणाऱ्या इशाक बागवान ह्यांच्या कडून सत्य वाचा.

अभ्या..'s picture

9 May 2013 - 1:46 am | अभ्या..

औरंगजेब नाही. आलमजेब.
.
.
औरंगजेब आता येईल अर्जुन कपूरचा ;)

संदीप चित्रे's picture

8 May 2013 - 7:50 pm | संदीप चित्रे

>>> "शहाजीचा मुलगा संभाजी याने मुसलमानांचा काटा काढला आणि स्वराज्य स्थापन केले" (यात अफजुलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत सगळं आलं)>>>>
आज ज्ञानात भर पडली :)
बाकी चालू द्या !!!

आदूबाळ's picture

8 May 2013 - 8:32 pm | आदूबाळ

नई नई - गल्तीसे मिष्टेक!

अर्धवटराव's picture

9 May 2013 - 2:07 am | अर्धवटराव

शहाजीला संभाजी नावाचा मुलगा होताच. शिवाजीचा मोठा भाऊ तो. त्याने अ‍ॅक्च्युअल स्वराज्य नसेल स्थापले, पण स्वराज्य स्थापनेचे बापाचे अ‍ॅम्बीशन पोरात नक्की उतरले असणार. स्वराज्यच्या अगदी प्राथमीक तयारीत असताना अफजलखानाने त्याचा काटा काढला.

अर्धवटराव

बाबा पाटील's picture

9 May 2013 - 1:33 pm | बाबा पाटील

१/२ रावसाहेब पहिले छत्रपतींचे एकेरी उल्लेख टाळावेत ही विंनती.....

अर्धवटराव's picture

9 May 2013 - 7:32 pm | अर्धवटराव

पण काय करणार पाटील साहेब... श्रद्धास्थानांचा एकेरी उल्लेख नकळत होऊन जातो.
तुमच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगीरी व्यक्त करतो.

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 2:26 pm | बॅटमॅन

बाबा पाटील, आदर ठेवून जर छत्रपतींचा एकेरी उल्लेख केला तर अडचण असू नये. तसे तर आपल्या आईचा किंवा रामकृष्णादि देवांचा उल्लेखही एकेरीच केला जातो. शेवटी आदर महत्वाचा आहे. आदर ठेवून तो शिवाजी म्हटले काय किंवा शिवाजीमहाराज म्हटले काय, फरक पडू नये.

मला वाटलं परिक्षण लिहिलय की काय? एकंदरीतच असे शिनेमे पाहून थेट्राच्या बाहेर पडल्यावर घरी नीट पोहोचेपर्यंत भीती वाटत राहते म्हणून या सगळ्या प्रकरणात पडावेसे वाटत नाही. शिवाय नकोशी दुनिया इतकी भडक पद्धतीने दाखवलेली असते की विचारता सोय नाही. जाउ दे मेलं!