फोडणे-वाढवणे

अन्या दातार's picture
अन्या दातार in काथ्याकूट
22 May 2008 - 5:00 pm
गाभा: 

आपण जेंव्हा देवाला वगैरे जातो व नारळ फोडतो. पण नारळ फोडण्याच्या कृतीस नारळ वाढवणे असे म्हणतात.
जेंव्हा बांगडी फुटते तेंव्हा सुद्धा बांगडी फुटली असे न म्हणता बांगडी वाढली असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण अक्षरशः फोडतो, त्याला वाढवणे हे गोंडस नाव का द्यावे याचा बोध काही केल्या झालेला नाही.
देवाच्या ठिकाणी फोडलेल्या नारळाला 'नारळ वाढवणे' असं म्हणायचं; तेच निवडणुका लागल्या की वर्तमानपत्रात बातमी येते की 'अमूक अमूक यांच्या हस्ते भागातल्या प्रचाराचा नारळ फुटला.' त्याला मात्र नारळ वाढवला असे म्हणायचं नाही. हे काय गौडबंगाल आहे बरे?????????
कोणी हा गोंधळ निस्तरेल का?
~X(

प्रतिक्रिया

ऋचा's picture

22 May 2008 - 5:13 pm | ऋचा

बांगडी वाढली असे म्हणतात कारण पुर्वी च्या काळी बांगडी फुटणे अशुभ मानले जात असे.
मग अश्यावेळी बांगडी वाढते म्हणजे नविन बांगड्या घेतल्या जातात कारण बांगड्या हे सौभाग्याचे लक्षण आहे.
असे मला वाटते.

:B

वरदा's picture

22 May 2008 - 5:55 pm | वरदा

नारळ वाढवतात हे मला माहित नव्हतं मी तरी नारळ फोडायचा असंच ऐकलंय...

हर्षद बर्वे's picture

22 May 2008 - 6:03 pm | हर्षद बर्वे

पूर्वी स्त्री विधवा झाली की ती बांगड्या फ़ोडत असे.त्यानंतर बांगड्या वापरत नसे.
बांगड्या(हिरव्या काचेच्या) सऊभाग्य-अलंकारामध्ये मोडतात.
म्ह्णून चुकीने जरी बांगडी फ़ुटली तरी अशुभ...म्हणून वाढवली असे म्हणण्याचा प्रघात पडला.

आपला
हर्षद

मनिष's picture

22 May 2008 - 6:15 pm | मनिष

बांगडी वाढवली म्हणजे "नवरे वाढवले" असे तर नव्हते ना? ह. घ्या. ;)
मला हे वाक्प्रचार माहित नव्हते. नारळ फुटला, बांगडी फुटली असेच आजीसकट सगळे लहानपणापासून म्हणायचे. 'बळी चढवला' हे मात्र ऐकले आहे.

धमाल मुलगा's picture

22 May 2008 - 6:21 pm | धमाल मुलगा

अरे पण अजुन नारळाचा मुद्दा तसाच राहिला की.

मी एकदाच म्हणालो होतो घरी, "मी फोडतो नारळ" आजीनं इतकं सुनावलं..."आजकालची कार्टी तुम्ही जळ्ळी अक्कल म्हणून नाही..आपण काय बोलतो, काय शब्द वापरतो जरा नीट विचार करुन बोलावं"

अजुनपर्यंत मला माझं काय चुकलं हेच कळलं नाहीय्ये!

का बुवा "नारळ वाढवणे" म्हणत असावेत?

मन's picture

22 May 2008 - 6:25 pm | मन

छान माहिती मिळतिये.
चालु द्या.

आपलाच,
(शाळेतील भांडणात कित्येकांचे डोके,कित्येकांच्या पाट्या,कित्येक खिडक्या "वाढवलेला")
मनोबा

विजुभाऊ's picture

22 May 2008 - 6:31 pm | विजुभाऊ

शेंडी डोळे असतात म्हणुन नारळ हे नरमुंडाचे प्रतीक म्हणुन वापरले जाते.
नारळ फोडतो म्हणजे आपण लौकिक अर्थाने नरबळी देत असतो.
उद्घाटन करताना / शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2013 - 9:59 am | अत्रन्गि पाउस

हे खरय???? बापरे..

ऋचा's picture

22 May 2008 - 6:31 pm | ऋचा

माणुस मेल्यावर जेंव्हा त्याला जाळतात तेंव्हा चितेवर त्याच्याबरोबर सोबत म्हणुन नारळ पाठवतात.
त्याला नारळ फुटणे असे म्हणतात.

म्हणुन आजी ने तुमची तासंपट्टी केलि असवी.

अभिता's picture

23 May 2008 - 12:53 am | अभिता

असेच कुंकू पुसले असे म्हणत नाहित कुंकू वाढवले असे म्हणतात ऋचा शी सहमत आहे.

धमाल मुलगा's picture

23 May 2008 - 11:44 am | धमाल मुलगा

आईशप्पथ!
हे असं आहे होय?

बरं झालं सांगितलंत :)

पद्मश्री चित्रे's picture

23 May 2008 - 12:10 pm | पद्मश्री चित्रे

मंगळ्सुत्र पण वाढवले असेच म्हणतात.. सौभाग्याचे लक्षण म्हणुन अशुभ शब्द टाळत असावेत.
>>शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात
- बरोबर

शैलेन्द्र's picture

24 May 2008 - 12:25 pm | शैलेन्द्र

पिढिजात व्यापारी, दुकान बंद केले(रात्री) अस न म्हणता दुकान वाढवले अस म्हणतात..

हेरंब's picture

25 May 2008 - 10:14 pm | हेरंब

भारतीय समाजात 'ढोंगीपणा' हा राजमान्यच आहे. म्हणूनच नागडे सत्य कोणी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारांना गोंडस रुप दिले जाते. निरोप घेताना 'मी जातो' न म्हणता 'मी येतो' असं म्हणतात तोही यातलाच प्रकार! जातो म्हटले की परत येणारच नाही हे कशावरुन ? त्या भीतिने उलट का बोलायचं ?

आपल्याकडे कसं धागा/ प्रतिसाद उडाले असं न म्हणता त्याला 'पंख लागले' म्हणतात तसं काहीसं असावं.

तर्री's picture

1 Sep 2012 - 8:57 pm | तर्री

हया प्रकाराला इंग्रजी मध्ये युफेमिझम म्हणतात. तो भाषेचा / बोली भाषेचा अलंकार आहे . ( हयाला ढोगीपणा म्हणार्याना सा. न )
अशुभ बोलणे टाळावे हा त्या मागचा भाव ! मला हया मध्ये खूप "स"कार दिसतो. आज कदाचित हे असे बोलणे (शहरात ) कालबाह्य वाटत असेलही पण हाच प्रकार इग्रंजी असता तर आपण ग्रामर चे २/५ मार्क मिळवण्यात धन्यता मानली असती.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2013 - 10:04 am | अत्रन्गि पाउस

अहो इंग्लंड मध्ये सुद्द्धा नॉट bad म्हणजे चांगला
अमेरिकेत फिझीकाली / मेंटली chalenged असे अनुक्रमे अपंग / मतीमंद साठी वापरतात...
कुठलीही नकारात्मकता टाळणे हा भंपक /ढोंगी पणा नाहीच!!!

चौकटराजा's picture

1 Sep 2012 - 9:28 pm | चौकटराजा

आपल्याकडे काही सांस्कृतिक आचरणपणाचे नमुने आहेत त्यातीलच हे काही प्रकार आहेत. उदा. मी जातो
असो म्हणायचे नाही तर बरं येतो असे म्हणायचे. किंवा नुकत्याच कोंब फुटलेल्या रोपाला सरळ तर्जनीने
निर्देश न करता तर्जनीच्या मधल्या पेराच्या टोकाने निर्देशित करणे का तर ? डायरेक्ट तर्जनी दाखविली तर रोप खुजे निपजते म्हणे.

अप्पा जोगळेकर's picture

2 Sep 2012 - 12:05 pm | अप्पा जोगळेकर

जर एखाद्याने नारळ/बांगडी फुटला/फुटली ऐवजी नारळ वाढवला/वाढली असे म्हटले किंवा जातो ऐवजी येतो असे म्हटले तर लगेचच त्याला ढोंगीपणा, सांस्कॄतिक आचरटपणा असे म्हणून हिणवण्याची काय गरज आहे ?
अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनितालला गेलेत असेच वाक्प्रयोग वापरतात.
यालासुद्धा सांस्कॄतिक आचरटपणा किंवा ढोंगीपणा म्हणायचे का ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Sep 2012 - 12:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ख...प...लो...

चौकटराजा's picture

2 Sep 2012 - 3:58 pm | चौकटराजा

आमचे 'वाढवला' या क्रियापदाशी वाकडे नाहीये. ते तसे कुणीही वापरावे .आम्ही नारळ फोडला असे म्हणालो की " याला संस्कृति कळत नाही" असा पवित्रा घेउ नये . अशा पवित्र्याला आम्ही आचरटपणा म्हणतो. दुसरे असे की बायकोला ***** यात ***** हे मूळ क्रियापद नाही. तसे फोडणे या क्रियापदाचे नाही.
नारळ फोडणे यात वाढविणे यापेक्षा फोडणे हे जास्त वापरले जाणारे आहे. तसे **** या क्रियापदाचे नाही.

लय जोरात हाणला तेजायला, जिक तू अप्पा!

सूड's picture

3 Sep 2012 - 6:41 pm | सूड

हाण्ण !! :D
कं लिवलंय, कं लिवलंय !!
खपलो, मेलो, गचकलो....:D

कवितानागेश's picture

3 Sep 2012 - 6:42 pm | कवितानागेश

:D

नाना चेंगट's picture

3 Sep 2012 - 6:43 pm | नाना चेंगट

बेस्ट ! बेस्ट ! बेस्ट !!!

sagarpdy's picture

3 Sep 2012 - 6:50 pm | sagarpdy

बापू आडवे !

कपिलमुनी's picture

3 Sep 2012 - 7:39 pm | कपिलमुनी

बिनतोड युक्तीवाद ...

घुमवून हाणला ..

अप्पाना सा.न.

मूकवाचक's picture

6 May 2013 - 10:13 am | मूकवाचक

+१

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 4:15 am | ढालगज भवानी

हसून मेले-खपले-वारले व परत पुनर्जन्म घेऊन पुन्हा हसत हसत खपले

बाळ सप्रे's picture

6 May 2013 - 10:45 am | बाळ सप्रे

एखादा मनुष्य ज्याच्याविषयी काही आपुलकी असते तो/ती गेल्यावर 'वारला/ली' वगैरे शब्दप्रयोग वापरला जातो. पण तोच रस्त्यावरील भिकारी/ दारुडा खपला/गचकला असेच म्हटले जाते.
तसेच बांगडी हा नुसता अलंकार न मानता सौभाग्याचा अलंकार मानणे, नारळ हे साधे फळ न नसून पवित्र फळ असणे हा विचार सर्वसामान्यपणे फार कमी झाला असल्याने नारळ फुटणे, बांगडी फुटणे हाच शब्द्प्रयोग सामान्य जीवनात जास्त योग्य वाटतो. त्याची तुलना "बायकोला ठोकण्यासाठी " वगैरे शब्दप्रयोगाशी करणे विनोदी/ लोकप्रिय वगैरे असली फारच अतिरंजित आहे. बिनतोड युक्तिवाद नक्कीच नाही!!

चिगो's picture

2 Sep 2012 - 5:09 pm | चिगो

अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनततालला गेलेत

अयाया... खपलो, मेलो, गचकलो.. :-) हाण्णा तिच्यायला.. :-D