वासुदेव बळवंत फडके - चित्रपट

विकास's picture
विकास in काथ्याकूट
20 Nov 2007 - 10:14 pm
गाभा: 

आत्ताच एका विपत्रातून या चित्रपटाविषयी माहीती समजली. त्याला "पहीला भव्यमराठी चित्रपट म्हणले आहे." पोस्टर्स चांगली दिसताहेत तसेच कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक इत्यादि...

प्रतिक्रिया

सर्किट's picture

20 Nov 2007 - 10:33 pm | सर्किट (not verified)

रमेश देव ह्यांनी ह्या चित्रपटाच्या पूर्तीसाठी पैसे कमी पडत असल्याची बातमी दिली होती, त्यामुळे हा चित्रपट तयार होतो आहे, हे कळले होते. आता रिलीझच्या मार्गावर दिसतो आहे. शुभेच्छा.

- सर्किट

विकास's picture

20 Nov 2007 - 11:15 pm | विकास

>>>आता रिलीझच्या मार्गावर दिसतो आहे.

डिसेंबर मधे रिलीज होत आहे.

सहज's picture

21 Nov 2007 - 7:16 am | सहज

स्वातंत्र्यलढ्याच्या काळावरचा मला आवडलेला एकमेव मराठी चित्रपट म्हणजे तो चाफेकरबंधुवरचा (काय नाव बर?२२ जुन १८९७??) वा.ब.फ. देखील तसाच उत्तम असावा ही इच्छा!

"सर्जा" देखील चांगला(ठीक) होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.

शुभेच्छा.

बेसनलाडू's picture

21 Nov 2007 - 7:31 am | बेसनलाडू

चाफेकरबंधूंवरील चित्रपटाचे नाव 'गोंद्या आला रे' होते, असे वाटते.
(स्मरणशील)बेसनलाडू

सर्किट's picture

21 Nov 2007 - 7:34 am | सर्किट (not verified)

२२ जून १८९७ असेच नाव होते.
"गोंद्या आला रे" हे त्या चित्रपटातील महत्वाचे वाक्य होते फक्त.

- सर्किट

सर्किट's picture

21 Nov 2007 - 7:36 am | सर्किट (not verified)

रमेस देवांनी आपल्या अभिनयशून्य मुलाला, म्हणजे अजिंक्यदेवाला वर आणण्यासाठी सर्जा काढला होता. तसाच हा चित्रपट ठरू नये, म्हणजे मिळवली.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 7:43 am | विसोबा खेचर

म्हणतो!

एनीवेज, चित्रपट पाहिला पाहिजे!

तात्या.

आजानुकर्ण's picture

21 Nov 2007 - 10:12 am | आजानुकर्ण

आजकाल शर्ट काढून कृत्रिम धबधब्याखाली उघड्या अंगाने नाचणे ही अश्लील कृती करून अभिनयगुण सिद्ध करण्याची पद्धत आली आहे. नायकाने उघड्या अंगाने वावरणे या अभिनयगुणाचा पाया सर्जामध्ये अजिंक्यनेच घातला होता हे विसरलात का?

या पार्श्वभूमीवर मात्र सध्या शर्ट घालून अभिनय करणारा अजिंक्य देव अभिनयशून्य वाटणे शक्य आहे पण अजिंक्य देव इतका काही अभिनयशून्य वाटत नाही बॉ. शून्य नक्कीच नाही. पोट सुटलेले अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत यांना तरूण मुलींसोबत झाडाभोवती पळापळ करत पिंगा घालताना बघण्याऐवजी अजिंक्य देव ला बघायला आवडले होते.

सर्किट's picture

21 Nov 2007 - 10:16 am | सर्किट (not verified)

पोट सुटलेले अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत यांना तरूण मुलींसोबत झाडाभोवती पळापळ करत पिंगा घालताना बघण्याऐवजी अजिंक्य देव ला बघायला आवडले होते

असेही असू शकेल. शेवटी ब्याकग्राऊंड महत्वाचे !

- सर्किट

जुना अभिजित's picture

21 Nov 2007 - 9:11 am | जुना अभिजित

डिजिटल इंटरमिडिएट प्रिंट काढली आहे वगैरे रमेश देव यांनी सह्याद्री वाहिनीवर साडेनऊच्या बातम्यात सांगितले होते.

भव्य आहेच पण आपण सर्व मराठी बांधवांने थिएटरमध्ये जाऊन पाहिला तर खरोखर भव्य होईल.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

देवदत्त's picture

25 Nov 2007 - 10:25 am | देवदत्त

कधी येतोय हो हा चित्रपट?

स्वाती राजेश's picture

26 Nov 2007 - 3:52 pm | स्वाती राजेश

ह्या चित्रपटाची तारीख निश्चित नाही. पण डिसेंबर अखेर पर्यन्त येईल.

प्रियाली's picture

26 Nov 2007 - 7:00 pm | प्रियाली

वरील चित्रांवरून चित्रपट पाहण्याची इच्छा झाली. मराठी चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांना अशी इच्छा होणे यातच चित्रपटाचे अर्धे यश सामावले आहे असे वाटते.

देवदत्त's picture

26 Nov 2007 - 9:27 pm | देवदत्त

रमेश देव आणि स्मिता तळवलकर ह्यांची ही प्रतिक्रिया ह्या चित्रपटास तारक ठरेल की मारक?
ते चित्रपट आल्यावरच कळेल आता. (अर्थात चित्रपटावरही ते अवलंबून आहे. पण हा एक भाग ठरू शकतो त्याच्या चालण्यावर असे मला वाटते.)

विसोबा खेचर's picture

27 Nov 2007 - 9:31 am | विसोबा खेचर

रमेशने म्हटले आहे,

मराठी प्रेक्षकांना आज आपल्याच भाषेतील सिनेमे बघावेसे वाटत नाही. आम्ही इतकी वषेर् सिनेमे काढले आणि त्यात अभिनय केला ही चूक झाली की काय, असे वाटते आहे, अशा पोटतिडकीने ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रमेश देव यांनी आपली वेदना व्यक्त केली.

माझ्या मते रमेश देव आणि मराठी चित्रपटातील संबंधित मंडळींनी स्वत:च आत्मपरिक्षण करून पाहावं! जाहीर व नाटकीपणाने भाषणातून मारे कळवळा वगैरे व्यक्त करण्यात काय अर्थ आहे?

स्मिता म्हणते,

म्हणूनच प्रेक्षकांकडून यापुढे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वत:च्या समाधानासाठी आणि मराठीवरील प्रेमापोटी आपण सिनेमांची निमिर्ती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अगं गधडे, मग आत्तापर्यंत काय मराठीवर प्रेम नव्हतं म्हणून सिनेमांची निर्मिती करीत होतीस? माझ्या मते मराठीवर प्रेमबिम सगळं ढोंग आहे! पैशांशी मतलब! साले आपले मराठी पिक्चर चालत नाहीत, गल्ला जमत नाही, त्यामुळे आता यांचं मराठीबद्दलचं प्रेम वगैरे जागं झालं! आणि कुठल्याही कलाकाराकडून जेव्हा कलेची निर्मिती होत असते तेव्हा सर्वप्रथम ती स्वत:च्या समाधानासाठीच होत असते, व्हावी असं माझं मत आहे! त्यामुळे स्मिताने आत्तापर्यंत केलेली निर्मिती ही तिच्या स्वत:च्या समाधानासाठी नव्हती की काय? आणि जर होती तर मग आत्ताच मारे स्वत:च्या समाधानाचे वगैरे जाहीर गळे काढण्यात काय अर्थ आहे?

असो,

आपला,
(राजाभाऊ परांजप्यांचा फ्यॅन!) तात्या.

सर्किट's picture

27 Nov 2007 - 10:08 am | सर्किट (not verified)

तात्यांशी पूर्ण सहमत !

माहेरची साडी सारखा चित्रपट सुपरहिट होतो, तेव्हा मराठी प्रेक्षकांची मराठीची आवड अचानक वाढली, असे कुणी म्हणत नाही. मग एखादा टुकार मराठी चित्रपट फ्लॉप गेला, की मराठी प्रेक्षकांच्या मराठीविषयी प्रेमावर का घसरतात हे लोक ?

- ('सासरचे धोतर' ह्या आगामी चित्रपटाचा निर्माता) सर्किट

आनंदयात्री's picture

27 Nov 2007 - 11:03 am | आनंदयात्री

'सासरचे धोतर' हा चित्रपट आधीच येउन गेला आहे, नक्की आठवत नाही पण दादांनी काढला होता बहुतेक.

ध्रुव's picture

27 Nov 2007 - 11:22 am | ध्रुव

पार्ट टू असेल. नाडीवालेपण असेल काही सांगता येत नाही. (हं घ्या)
--
ध्रुव

शब्दवेडा's picture

30 Nov 2007 - 4:57 pm | शब्दवेडा

चित्रपट या पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणि पैसा कमविण्यासाठी निर्माण केलेल्या कलाकृतीचा मराठीच्या प्रेमाशी सम्बन्ध लावणे म्हणजे शुद्ध ढोन्गीपणा आहे....