शिवस्वरोदय शास्त्र, मुद्राशास्त्र आणि कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे वगैरे

lakhu risbud's picture
lakhu risbud in काथ्याकूट
3 May 2013 - 12:39 am
गाभा: 

मिपा वर सध्या 'कर्मविपाक' आणि 'पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न' या धाग्यांवर चर्चा चालू आहे.त्याच अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न

१. शिवस्वरोदय शास्त्र
शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे (आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) या पाच तत्वांचा प्रवाह श्वासामार्गे होतो,श्वास म्हणजे प्राण,जर प्राणाकडे लक्ष देऊन मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनाचे कर्म जर मला समर्पित केले तर त्याचे कर्म निर्विकार होण्यास माझी मदत होते. प्राणरूपी होऊन मनुष्याला श्वासामार्फत त्याचे योग्य कर्म दाखवून आणि त्याचे भौतिक कर्म पूर्ण करून त्याला परमार्थाकडे आणून पोहोचवतो.असे शिवस्वरोदय शास्त्र मध्ये शंकर पार्वती चे संभाषण आहे.

आपल्या शरीरात तीन मुख्य नाड्या आहेत.(ओंक फेम ताम्रपट्टी ची नाडी नाही). इडा(चंद्र)नाडी(डावी नाकपुडी), पिंगळा(सुर्य)नाडी(उजवी नाकपुडी)आणि सुषुम्ना(दोन्ही नाकपुड्या)मधून श्वासोच्छवास चालू असतो.दिवसभरात कोणत्याही वेळी एकच(इडा,पिंगळा किवा क्वचित सुषुम्ना) नाडी चालू असते.चंद्रनाडी हि घेण्याची,मिळण्याची,प्राप्त करण्याची नाडी आहे .सुर्यनाडी हि देण्याची,दान करण्याची नाडी आहे.सुषुम्ना हि विरक्ती ची नाडी आहे.दिवसाच्या त्या त्या वेळेला कोणती नाडी चालू आहे (कोणत्या नाकपुडीतून श्वासोच्छवास चालू आहे ते जाणून घेऊन त्या प्रमाणे कर्म करायचे असते)
चिकित्सक लोकांना हे प्रथमदर्शनी थोतांड वाटेल,हास्यास्पद सुद्धा वाटेल.प्रत्यक्ष अनुभव घेउन् मगच या शाश्त्राबद्दल (मी याला शास्त्र मानतो ) किवा हे जे काही आहे ते त्याबद्दल मिपाकरांनी निर्णय घ्यावा.जेव्हा सुषुम्ना नाडी चालू असते तेव्हा कितीही जोर लावला तरी कामे होत नाहीत.नोकरीच्या सुरवातीच्या काळात मुलाखत देण्याची वेळ आल्यावर जेव्हा जेव्हा सुषुम्ना नाडी सुरु झाली तेव्हा तेव्हा काम झाले नाही हा माझा निश्चित अनुभव आहे. त्यामुळेच एखादे काम जेव्हा आपण हाती घेतले आहे तेव्हा ते होणार कि नाही हे आपला श्वासच आपल्याला सांगत असतो.साधारणतः चार ते पाच तासांनी नाडी बदलते (उजवी ची डावी किवा डावी ची उजवी)
बदलत असतांना सुषुम्ना नाडी चालू होते. या नाड्या (देण्याची किवा घेण्याची )हे आपल्या कर्मावर ठरत असते.आणि आपल्या विचारांनुसार आपली नाडी बदलते म्हणजे एखाद्याला प्रामाणिकपणे मदत करायची इच्छा असेल तर मदत देण्या आधी चंद्र नाडी सुरु असेल तर लगेच सुर्य नाडी सुरु होते.

२. मुद्राशास्त्र
या शास्त्रानुसार आपल्या शरीराचे कार्य संतुलितपणे पार पडण्यासाठी पंचप्राण (प्राण,अपान,व्यान,उदान ,समान),पंचतत्वे(आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) आणि त्रिदोष (वात,कफ,पित्त)यांमध्ये संतुलन आवश्यक आहे. संतुलन साधण्याची आपल्या शरीरातच योजना असून आपल्या हाताच्या निरनिराळ्या ठिकाणी दाब देऊन आपल्या शरीराचे कार्य संतुलित करता येते. मुद्राशास्त्र हा योगाचाच एक प्रकार आहे या शास्त्रानुसार आपल्या हाताच्या पाच बोटात पाच तत्वे आहेत व हि पाचही तत्वे आपण आपल्या हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे रचना(मुद्रा) करून तत्व संतुलित करता येते.(या संबंधी पण माझा एक अनुभव आहे.एका स्नेह्यांना छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता,त्यासाठी ते डॉक्टरांना भेटून आले, E.C.G. काढला पण normal आला. दोन दिवस वाट पाहूनही दुखण्यात काही फरक पडला नाही डॉक्टरांनी पुन्हा angiography व गरज पडल्यास angeoplasti करण्याचा सल्ला दिला. हृदयाच्या दुखण्यावर अपान-वायू मुद्रा गुणकारी असते हे वाचून माहित होते,मी त्यांना अपान-वायू मुद्रा करण्यासाठी सांगितले आणि दहाव्या मिनिटाला त्यांचे छातीत दुखणे कमी झाले,पुढचे ५-६ दिवस रोज कमीत कमी चाळीस मिनिटे व जास्तीत जास्त २ तास हि मुद्रा केल्याने त्यांचा छातीत दुखण्याचा त्रास एकदम बंद झाला )
भगवान बुद्ध,भगवान महावीर यांच्या ज्या ज्या प्रतिमा सापडल्या आहेत त्या मध्ये सुद्धा ते ज्ञान मुद्रा करताना दर्शविले आहेत

शरीर हे आत्म्याचे परम तत्वाकडे जाण्याचे साधन आहे त्याच्या healing आणि well-functioning
साठी योगाभ्यास,आयुर्वेद आणि मुद्राशास्त्र, शिवस्वरोदयशास्त्र आदि शास्त्रे आहेत असे मानायचे का?
या शास्त्रांचे अस्तित्व दिसत आहे आणि ते मान्य केले तर कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे या गोष्टी ज्यांचे अस्तित्व हि शास्त्रे मान्य करतात त्या सत्य आहेत असे आपण मानायचे का?

नसेल तर या शास्त्रांमध्ये ज्या बारकाई ने मनुष्य शरीराचा विचार,अभ्यास केलेला आहे तो खोटा मानायचा का?

आपले संत हे योगाचा आणि मुद्रा शास्त्राचा अभ्यास करून मनाची सॊहम अवस्था प्राप्त केली का?

कबीर म्हणतो"अडसठ तीरथ घटके भीतर,यूँही मैं मलमल नहाऊ,
गंगा न जाओ जमना न जाओ न कोई तीरथ नहाओ जी "

हे अडसठ तीरथ कोणते ?

(अर्थात कबीर-कुमारगंधर्व-निर्गुण भजन हे एका स्वंतंत्र लेखाचा विषय आहे हे नक्की )

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

3 May 2013 - 12:43 am | प्यारे१

"अडसठ तीरथ घटके भीतर,यूँही मैं मलमल नहाऊ,
गंगा न जाओ जमना न जाओ न कोई तीरथ नहाओ जी "

अप्रतिम भजन आहे.
बाकी लाह्या, फुटाणे घेऊन बसलोय.

भारतिय अध्यात्माच्या (योग्शास्त्र वगैरे) अधारे दिलेल्या अनेक भौतिक कृति/हलचाली खरोखर अप्रतिम शारीरीक व मानसिक लाभ पोचवतात. पण तो लाभ तितपर्यंतच (भैतिकतेपर्यंतच, शरीर असे पर्यंतच) सिमीत आहे हे नाक्कि. उदा. प्राणायाम, आता तुम्ही एकाजागी बसुन, न धावता, न पळता वा शारीरीक श्रम खर्च न करता भसाभस ऑक्सिअन शरीरात ओढलात तर फ्रेश वाटणारच ना ?

पण या छान वाटण्याचा अध्यात्माशी कसलाही संबध नाही. हे साधे शरीशास्त्र आहे ,उर्जा मिळालीय खर्च होत नाहीये पुन्हा रक्ताभिसरण वाढलं रक्तप्रवाह मेंदुकडे वहायच्या ऐवजी हृदयाकडे वाढला, पण शारीमात्र बसुन आहे त्यामुळे हृदयावर ताण निर्माण होत नाही.. यामुळे मेंदुचे काम मंदावले अन एकदम कस्सं रिकामं अन स्पिरिचुअली हाय वाटलं सांगा .. जणू वजनच संपल??? आता रक्तच मेंदु सोडुन दुसरीकडे खेचलं जातय तर मेंदुचे काम थंडावले/मंदावले व मानवाच्या जागेपणी अविरत काम करणार्‍या मेंदूकेंद्रांना काहीशी विश्रांती (लोड शेडींग्/बॅलन्सिंग) मिळाली, जी झोपेतच खरी मिळते, तर मग कस्सं एकदम फ्रेशच वाट्णार. यामुळे मेंदु(केंद्रे) अजुन जोमाने कामही देणार हे नक्किच. म्हणून प्राणायामाच सर्वांगीण फायदाच फायदा आहे.

(हीच गोश्ट हलके जेवण केले तर (पचनासाठी रक्तप्रवाह पोटाकडे वाढतो म्हणून) वा अंघोळ केलीत तर (रक्तप्रवाह त्वचेकडे वाढ्तो) वा हलकसा व्यायाम घेतला की (रक्तप्रवाह शरीराकडे वाढतो) व मेंदुकडे कमी होतो म्हणून आपल्याला छान/फ्रेश वाटते हे यासंदर्भात (अर्थातच प्राणायामापेक्षा अतिशय छोट्या प्रमाणात)अनुभवास येते.

पण आता गंमत अशी आहे की या योग प्राणायाम वगैरे तत्सम मस्त क्रिया ज्यांनी शोधल्या ते लैच प्रॅक्टिकल व हुशार लोक. त्यांना माहित आहे केवळ छान वाटतय, शारीरीक फायदा होतोतय म्हणून आळशी मानव जात या क्रिया कधीही नित्यनेमाने करणार नाही.... मग त्यांनी दाखवलं एक मस्त गाजर... कूंडलिनी.... करत रहा भसाभस प्राणायाम तो पर्यंत (थोडक्यात आयुष्यभर)... जो पर्यंत तुमची कूंडलिनी जागृत होत नाही. लेको एकदा कर्मयोगाने मोक्ष मिळतोय म्हटल्यावर पुन्हा (काल्पनिक) कुंडलिनी अंगात घुसडायची तर खर आस्तिकांच्या परमेश्वराला गरजच नाही हा साधा कॉमनसेन्स आहे .. म्हणे ज्याला जो मार्ग पसंत तो त्याने निवडावा, पण मग स्वतः श्रीकृष्णच का म्हणतात की अर्जुना बाबा हा अष्टांग योग साधणे, कूंडलीनी जागी होणे वगैरे अक्षरशः अशक्य. त्यापेक्षा कर्मयोगानेच माझि सहज प्राप्ति आहे. असो नरनारायणांचा संवाद व त्यामागील प्रेरणा वगैरे वेगळा विषय आहे. याक्षणी भौतिक (पण अध्यात्मिक वा स्पिरिचुअल असे लेबल लावलेल्या) योगीक क्रियांबाबत कूंडलिनी/मोक्ष वगैरे गाजरं का दाखवली आहेत सुनियोजीतपणे लक्षात घेतले तरी पुरे....

थोदक्यात या सगळ्या शारिरीक यौगीक क्रियांचे सुक्ष्म निरीक्षण केले की लक्षात येइल त्यामुळे मेंदुला होणार्‍या रक्तप्रवाहावर प्रमुख परिणाम होतो व ज्यातुन त्यांच्या केद्रांना जागेपणीच विश्रांतीची संधी मिळते. हेच तत्व अगदी संभोगातुन समाधीकडे ला लागु होतं किम्बहुना समाधी नको असतानाही संभोगातील (सॉलीड) ओर्गॅझम नंतर मनाला मिळणारी प्रचंड शांतता ही रक्ताचा पुरवठा जसजसा मेंदुकडे पुर्ववत होत जातो तशी नाहीशी होत जाते हा तर.. नेहमीचाच अनुभव असेल :)

अथवा अजुन एक प्रकार म्हणजे रक्तपुरवठा न्हवे तर डायरेक्ट मेंदुच्या केद्रांवर/ मज्जासंस्थेवर प्रभाव पाडणे जसे की दारु पिणे, भांग पिणे/खाणे, गांजाओढणे, ड्रग्सचा वापर करणे वगैरे वगैरे वगैरे.. यातुनही फार छान वाटते सहजावस्था प्राप्त होते असे अनुभव तर साधक म्हणवणारेही सांगत असतात वा या क्रियांना ते ध्यान वगैरे वगैरेसाठी पुरक मानतात पण हे सगळेच शरीरशास्त्र आहे. यात अध्यात्म काहिच नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2013 - 8:00 am | अत्रुप्त आत्मा

फार सुंदर प्रतिसाद...पण मजा अशी आहे,की शरिरशास्त्राच्या आधारावरच आध्यात्माचा बाजार चालत असतो . ;-)

भारतिय अध्यात्माच्या (योग्शास्त्र वगैरे) अधारे दिलेल्या अनेक भौतिक कृति/हलचाली खरोखर अप्रतिम शारीरीक व मानसिक लाभ पोचवतात. पण तो लाभ तितपर्यंतच (भैतिकतेपर्यंतच, शरीर असे पर्यंतच) सिमीत आहे हे नाक्कि.

हे नक्की कशा वरून ठरवले गेले?
जगातील इतर संस्कृतीमध्ये,धर्मामध्ये या किवा अशाच प्रकारच्या पद्धतींचा उल्लेख का नाही?

धाग्यामध्ये कुठेही कुंडलिनी चा उल्लेख केलेला नाही

कोणत्याही बाबा किवा पंथाचा प्रचार/प्रसार करण्याचा हेतू नाही,पण अंतर्जालावर या विषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे

या तंत्रा मध्ये ज्या पद्धत्ती सांगितल्या गेलेल्या आहेत त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्या बरोबर किवा चूक किवा फक्त placibo effect आहे काय याची तज्ञ लोकांकडून माहिती मिळावी अशी इच्छा आहे

लक्षात घ्या येथे वादासाठी वाद घालण्याचा किं धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा म्हणून नाही
तर हे प्रश्न मला या तंत्राच्या अनुषंगाने पडलेले आहेत. त्यांची उत्तरे मिळण्याची,Hint मिळण्याची मी अपेक्षा करतो

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 1:26 pm | अनिरुद्ध प

असे वाच्ण्यात आले होते की झोपेत शरिराला विश्रान्ति मिळ्ते पण मेन्दुचे कार्य चालुच असते,आपल्या उत्तरामधुन आपला व्यासन्ग उत्तम आहे असे जाणवते म्हणुन हा प्रश्णप्रपन्च.

जास्त माहिती हवीच असेल तर एखाद्या जाणकार मेंदुविकार तज्ञाकडेच मिळेल.

रुद्रकर्ना's picture

16 May 2013 - 12:27 pm | रुद्रकर्ना

माणसाचा मेंदू हा असा बनला आहे कि त्याला देव वगेरे शक्तीवर विश्वास ठेवणे हे त्याच्या मेंदूचे सहज स्वोभाव आहे त्यामुळे लोक विश्वास ठेवतात पण आपण लोक एक साधा विचार करत नाही भारत हि संतांची भूमी म्हणून ओळखला जातो हिते आधी दर ५ - १ ० वर्षाने एक संत जन्म घेत होता पण जसे जसे technologhy advance होत चाली आहे तसे हे संत लोक कुठे गेले आता आपण छाती ठोक पाने सांगू शकतो का हा माणूस संत आहे आणि तो सर्व्वान समोर चमत्कार करू शकतो मला तर वाटते असा एक हि माणूस नसावा . फसवे भरपूर मिळतील

विसोबा खेचर's picture

3 May 2013 - 8:28 am | विसोबा खेचर

लै भारी...

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 1:31 pm | अनिरुद्ध प

माझा वरिल प्रश्णप्रतिसाद सिवाजि द बोस याना होता उत्तराचि अपेक्शा आहे.

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 5:47 pm | अनिरुद्ध प

प्रतिसादाबद्द्ल आत्यन्तिक धन्यवाद्,राग मानु नका पण, "जास्त माहिती हवीच असेल तर एखाद्या जाणकार मेंदुविकार तज्ञाकडेच मिळेल." या 'सल्ल्या' वरुन तरि आपण 'पुण्याचे ' पुणेरि पुणेकर वाट्ता कसे.

प्रसाद गोडबोले's picture

16 May 2013 - 1:50 pm | प्रसाद गोडबोले

येवढं सगळं कशाला पाहिजे हो ?

"गीतासुगीता कर्तव्या , किमन्यै: शास्त्रविस्तरै: |
या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता ||"

एक फक्त गीतेचे आचरण करा , नेमुन दिलेले (जन्मगत) कर्म फलाकांक्षा न धरता करा अन खुश रहा की राव !!

------------------------------------
यावानर्थ उदपाने सर्वतःसंप्लुतोदके |
तावन्सर्वेषु वेदेशु ब्राह्मणस्य विजानतः ||

रमेश आठवले's picture

16 May 2013 - 11:44 pm | रमेश आठवले

http://ww.smashits.com/pt-kumar-gandharva-a-life-in-music/duje-ke-sang-n...
हे कुमार गंधर्व यांनी गायलेले भजन येथे ऐका. त्यातील शब्दांवरून ते नाथ पंथातील गोरखनाथ यांनी त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांना उद्देशून रचले आहे असे वाटते. त्यामुळे ते कबीर यांचे नसावे.
तसेच मलमल शब्दा ऐवजी मन मल असे मला ऐकू आले.

रमेश आठवले's picture

16 May 2013 - 11:50 pm | रमेश आठवले

हा वरील प्रतिसाद रिसबूड यांचा लेख आणि त्यावरील प्यारे १ यांचा प्रतिसाद यांच्या नंतर यावयास हवा होता.