दोन प्रष्न

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
11 Sep 2008 - 3:37 pm
गाभा: 

असुरक्षितेच्या भाव्ननेनी कायम पछाड्लेली जगभर आढळ्णारी जमात म्हणजे पुढारी. आपल्या कडे दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा मुहुर्त धरुन आपले चेहेरे जनतेसमोर सादर करण्याची जी चढाओढ लागते ती बघण्यासारखी असते. अशाच एक पोस्टर वरच्या मजुकराचा अर्थ काही कळ्ला नाही. मि.पा.वरचे डोकेबाज ह्यावर प्रकाश टाकतील काय?
मा.खा.आ. अबक जी बकड साहेब म्हण्जे काय?
सक्रिय कार्यकर्ते - अबक बकड म्हण्जे काय?

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 3:42 pm | आनंदयात्री

आमच्या नडगीफोड कॉर्पोरेटरला विचारा !

(कॉर्पोरेटच्या आदेशावर नडग्या फोडणारा अंमळ असंस्कृत)

आंद्या सोनवणे

धमाल मुलगा's picture

11 Sep 2008 - 5:36 pm | धमाल मुलगा

_/\_
नमस्कार नमस्कार...हॅ हॅ हॅ..

अहो आम्ही काय सांगणार?
बोलुन चालुन आम्ही पडलो गुंडगिरी करुन नडग्या फोडणारे अशिक्षित...
ना आम्हाला बाळासाहेब होता आलं, ना राज, ना अटलजी व्हायला जमलं ना सुदर्शनजी...
आम्ही फक्त त्यांची नावं घेऊन जाळपोळ करणारे गुंड...आम्हाला काय कळतंय त्यातलं?

हे सांगु शकतील फक्त उच्चविचारसरणीचे सुसंस्कृत लोक, ज्यांचा राजकारन, समाजकारन, अर्थकारन...अजुन कसली कस्ली कारनं ह्यांचा अभ्यास आहे असे...

पण आमच्या आप्पानं एकदा सांगितलेलं आठवतंय की:
मा. = माननिय
खा.= खासदार
आ.= आमदार (आयला, ह्या बोर्डावरचं फुडारी एकाच वेळी आमदार पन है आन् खासदार पन???)

सक्रिय कार्यकर्ते = आमच्यासारखे...नडगीफोडे!

-(सुसंस्कृतांच्या वार्‍याने अंमळ सुधारलेला नडगीफोड [भावी] कॉर्पोरेटर) ध मा ल रघुनाथ शिवरकर (रघुभाई का बेटा.)

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 5:40 pm | आनंदयात्री

एयssssssssss गनपत ... चल चहा आण पट्टकन ! दिसत नाही व्हय शिंच्या साहेब आलेत ते.

बाकी साहेब ते आ म्हणजे आदरणीय असावे.

धमाल मुलगा's picture

11 Sep 2008 - 5:44 pm | धमाल मुलगा

बाकी साहेब ते आ म्हणजे आदरणीय असावे.
हां हां...बरुबर तेच आसंल...
ऍहॅहॅ...वाईच घोटाळा झाला माजा.

मायला, पंत तुमी हाय आमच्याबरोबर म्हनुन बरं हां. आसं यकांदं सुशिक्षित डोकं असावं संगती..आडीआडचनीला आशेच मदतीला येत्यात.

थ्यांक्यु हां.

विजुभाऊ's picture

11 Sep 2008 - 5:43 pm | विजुभाऊ

आ म्हणजे आदरणीय असावे.
आम्ही त्याला
भा म्हणजे भादरणीय म्हन्तो

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विनायक प्रभू's picture

11 Sep 2008 - 6:12 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मा=माल
खा=खाणार
आ=आचमन
वि.प्र.

धमाल मुलगा's picture

12 Sep 2008 - 10:46 am | धमाल मुलगा

हा हा...
लै भारी!

पन येक सांगु का विनायकराव,
आचमनं करनारी ह्या क्षेत्रात फारशी पुढं येऊच शकत नाहीत हो...अपवाद आहेत म्हना तशे, पन इथं लागनारा बेरकीपना, हलकटपना, संधीसाधू वृत्ती ज्या प्रमानात हवी त्या प्रमानात आचमनिय लोकांकडं शक्यतो नस्ते ना...

भास्कर केन्डे's picture

11 Sep 2008 - 10:08 pm | भास्कर केन्डे

मा. = माजी
खा.= खासदार
आ. = (पण आता) आमदार

आपला,
(मिपा चा स.का.) भास्कर
आम्ही येथे वसतो.

केशवराव's picture

11 Sep 2008 - 11:29 pm | केशवराव

हेच बरोबर वाटते.

यशोधरा's picture

11 Sep 2008 - 11:03 pm | यशोधरा

मा.खा.आ. = माजखोर खाबू आप्पलपोटी