अ‍ॅलर्जी कशी टाळावी?

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
28 Apr 2013 - 9:32 pm
गाभा: 

सध्या सहा महिन्यापासून मुख्यत्वे डाळ, पनीर, पालक, शेंगदाणे, काजू, असे पदार्थ खाल्ले की किंवा इतर वेळी देखील नि/अथवा नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे. अर्धा तास राहते नि जाते.
हाताची बोटे सुजतात. एक दोन वेळा खांद्याजवळ साधारण छोट्या वाटी एवढं वर्तुळ सूज आली होती.
आठ दिवस गोळ्या खाऊन २ वेळा कमी झालं. गोळ्या संपल्या की पुन्हा सुरु. (जास्त गोळ्या खाऊन भविष्यात हाडं ठिसूळ होण्याचा संभव आहे असं ऐकिव आहे)
काय क्रावं ब्रं? मिपाकर काही उपाय सुचवतील का?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Apr 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि

वरील पदार्थ खावु नयेत आणि सतरंजीवर झोपावे..

अग्निकोल्हा's picture

28 Apr 2013 - 9:59 pm | अग्निकोल्हा

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जास्त उपयोगी. (विषेशतः जर तुम्ही कामानिमीत्त वगैरे बाहेर रहात असाल तर तेथील डॉक्टरकडुनच औषधे घ्यावीत कारण ते तिथल्या वातावरणाशी अनुरुप असलेली औषधे रेफर करत असतात.)

इन्दुसुता's picture

28 Apr 2013 - 11:59 pm | इन्दुसुता

अ‍ॅलर्जीची कारणे अनेक असू शकतात व त्यावरचे पर्याय देखिल. अ‍ॅलर्जीवर अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद व होमियोपॅथी ( आणखी ईतरही औषध शास्त्रात असतिल, मला माहिती नाही म्हणून येथे लिहीले नाही ) उपाय आहेत व ते बहुतांशी परिणामकारक आहेत. तेव्हा वैद्यकीय सल्लाच घ्यावा ( घरगुती उपायांनी अ‍ॅलर्जीवर तात्पुरता सुद्धा फरक पडलेला बघितला नाही आजवर).

जाता जाता, तुमची सूज किती वेळ राहते?
( तुम्ही प्रश्न सिरियसली विचारला आहे हे गृहीत धरून उत्तर दिले आहे, तसे नसल्यास या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे :) )

ट्यार्पीसाठी धागा काढला आहेस काय?
नसल्यास सर्वप्रथम चांगल्या डॉक्टरकडुन तपासण्या करुन घे.
परदेशात रहात असताना, घरचं कुणी काळजी घेण्यासाठी जवळपास नसताना, तज्ञांचा सल्ला (मिपावरच्या नव्हे) घेतलेला बरा.

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 10:06 pm | श्रावण मोडक

तज्ञांचा सल्ला (मिपावरच्या नव्हे) घेतलेला बरा.

धन्यवाद देवा. संपादकांचंच मत अंतिम असतं, हे आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. त्यामुळं... ;-)

सर्व प्रथम ब्लड टेस्ट करुन घ्या .... त्यात शक्यतो कळते कशामुळे होतय ते ... डॉक्टराना बरका ...
मला नाहि ...

पण मला अमेरिकेला आल्यावर सुरुवातिच्या दिवसात असं व्हायचं ... थंडीमुळे होतय असं डॉक्टर काका म्हण्ले हुते .

चित्रगुप्त's picture

29 Apr 2013 - 4:45 am | चित्रगुप्त

१. गादी, चादरी, कपडे, टॉवेल, मोजे इ. सर्व सुती (कॉटन) वापरा
२. आंघोळीचे साबण व शांपू वगैरे काही दिवस वापरणे बंद करून बघा.
३. साबणादिकांच्या रोजच्या वापरामुळे शरीर शुष्क होते, म्हणून (आंघोळीपूर्वी वा झोपण्यापूर्वी) ऑलिव्ह ऑइल, तिळाचे तेल किंवा बेबी ऑइलने अंग मर्दन करा.
४. परदेशात असल्यास, आणि अपार्ट्मेंट मधील कॉमन कपडे धुण्याच्या मशीन्सचा उपयोग करत असल्यास त्यातूनही अश्या समस्या निर्माण होऊ होऊ शकतात. यावर काय उपाय करता येइल, ते बघा.
.....(५.याने काही फायदा झाल्यास कळवा)

चित्रगुप्त's picture

29 Apr 2013 - 4:49 am | चित्रगुप्त

..या निमित्ताने आयुर्वेदाच्या जाणकार मिपाकरांनी (स्पा?) कफ-वात-पित्त वगैरेंबद्दल माहिती द्यावी, अशी विनंती करतो.
हा त्रास पित्ताचा असू शकतो, त्यावर काय उपाय आहेत?

सुहास's picture

29 Apr 2013 - 5:15 am | सुहास

सर्वप्रथम डॉक्टरकडे जा. उगाच कुणालाही विचारून गोळ्या घेऊ नको. हा प्रकार allergy असू शकतो, पण इतर काही (पित्त वगैरे)कारण आहे का हे डॉक्टरला विचार आणि त्याने सांगितलेले उपाय कर.

१) खाद्यपदार्थांमुळे येणारी अ‍ॅलर्जी
२) डस्ट माइट अ‍ॅलर्जी -
३) पाळीव प्राणी अ‍ॅलर्जी

त्याप्रमाणे मग
१) ते अन्न पदार्थ टाळणे आणी औषधोपचार
२) यात गादी, उशी, अभ्रे, चादरी, पलंग यावर उपाय करावे लागतील () व दर सात दिवसानी कडकडीत गरम पाण्यातुन हे धुवून काढणे, ६० डिग्री सेल्सीयस च्या पुढे डस्ट माईट मरतील.

रेवती's picture

29 Apr 2013 - 5:57 am | रेवती

हम्म...
नायलॉनची गादी वापरल्याने असे होत असावे पण हे पित्ताचे प्रकरण दिसते आहे.
सहा महिने म्हणजे बराच वेळ झाला, आता डागदरांकडे जावे लागेल.
कधीकधी काही अ‍ॅलर्ज्या तात्पुरत्या असतात वाटतं. मलाही काकडी किसल्यावर, चोचवल्यावर हातांवर सूज येत असे. फार आश्चर्य वाटले होते. पण हा प्रकार दोनेक महिन्यात बंद झाला असावा. नंतर लक्षातही आले नाही.

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 12:14 pm | प्यारे१

@ ऑल,

प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद.

अल्जिरियामध्ये मी आहे तिथे रात्रीचे तापमान बरेच कमी असल्याने गादीशिवाय पर्याय नाही. सतरंजी गादीवर टाकून नायलॉनचा थेट स्पर्श टाळतोय. नायलॉनचे कपडे विशेष नाहीतच.

खाण्यामध्ये शाकाहारी असल्याने इतर काही खाणं शक्य नाही. पालेभाज्यांमध्ये पालक, कधी भूक लागली तर शेंगदाणे नि जेवणात डाळ (मसूर डाळच मिळते पण कुणीतरी तूरडाळ आणतं) मागच्या वेळी ब्लड टेस्ट केली तेव्हा डॉक्टर म्हणे प्रोटीन्स वाढलेत. थोडे दिवस जमवले पण डाळी आमटीशिवाय जेवण करणं अवघड आहे.
प्रोटीन्स कशामध्ये जास्त असतात? दूध भात खायचा म्हटलं तरी दूधात देखील प्रोटीन्स असणार बहुधा.

मधेच कधीतरी सूज येते मात्र जास्त प्रमाण रात्रीचे जेवण झाल्यावर झोपण्याच्या वेळी आहे. सूज साधारण अर्धा तास टिकते.

टीआरपी साठी 'हक्काचे' बरेच विषय असताना अशा विषयावर धागे काढण्याची गरज नाहीये.
डॉक्टरकडे २ वेळा गेलो होतो. औषधे घेतली. त्या कालावधीपुरतं बरं वाटतंय. नंतर पुन्हा त्रास सुरु होतोय.
असो.

सूड's picture

29 Apr 2013 - 1:49 pm | सूड

>>डाळी आमटीशिवाय जेवण करणं अवघड आहे.
टॉमेटो मिळत असतीलच तिकडे!! आमसुलं, कैरी याची सोय होत असेल तर त्यांच्या सारांचा आमटीऐवजी जेवणात वापर करता येईल. टॉमेटोचं सार, मोहरवणी यांची रेसिपी मिपावर येऊन गेलीय. एकदा चेकव, डाळींशिवाय अडायचं कारण नाही.

स्वच्छतेने बहुतांश प्रश्न संपतात. झोपण्यापुर्वी पुजा, दारु, मेडिटेशन वगैरे वगैरे कर्मकांड न करताही झोप अतिशय व्यवस्थित लागते काय ? नसेल तर नक्किच जिथे झोपता अथवा कामकरता त्या साइटवरल्या जागेतिल कशाचीतरी अ‍ॅलर्जी आहे. मास्क वापरा. प्रोटिन वाढलेत हे कारण होउच शकत नाही असा अंधविश्वास आहे तरीही हेच कारण असेल तर एक वेळ लिक्विड डायटने पोट भरा (ज्युस, नारळपाणी वगैर वगैरे) व एक वेळ हादडुन जेवा. जिभेवर अन्याव शक्यतो नको. यानेही फरक पडत नसेल तर मानसोपचार तज्ञ गाठा.

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 8:28 pm | प्यारे१

नाही , मान्य आहे की स्क्रू थोडा ढिला आहे पण म्हणून डायरेक्ट मानसोपचार तज्ञ?
-अ‍ॅलर्जी नि टेन्शन चं नातं ठाऊक असलेला पण तरी सध्या तसं काहीही नसलेला प्यारे

jaypal's picture

29 Apr 2013 - 2:57 pm | jaypal

प्रोटिन वाढलेत हे कारण लक्षात घेता मला "गाऊट" या आजारा विषयिची शंका वाटते.
कालिंग डॉ. खरे, कालिंग डॉ. खरे

पुष्करिणी's picture

29 Apr 2013 - 6:29 pm | पुष्करिणी

मला शेंग्दाणे, साबुदाणा खाल्लं की असं होत असे, सुरूवात डोळे खाजण्यापासून होते. आताही त्रास होतो पण अंगावर पित्त उठत नाही, डोकं भयानक दुखायला लागतं. मी ते खाणं टाळते.

मला सगळ्या 'हर्बल' गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे, शिककाइ, उटण्यापासून नारळाच्या पाण्यापर्यंत :(. अंगावर खाज सुटून २-३ तास इंसेक्ट बाइट झाल्यासारखं होत..सुरूवात डोळे खाजण्यापासून...

फार त्रास झाला किंवा टाळता येण्यासारखं नसेल मी 'हे फिवर' / पोलन अ‍ॅलर्जी साठीच्या ज्या गोळ्या मिळतात त्यातली एखादी घेते. तुम्ही ट्राय करून बघा. पण हा कायमचा उपाय नाही. अँटी अ‍ॅलर्जी मॅट्रेस कव्हर्स / पिलो कव्हर्स मिळतात त्या वापरा. अमसूलाचं आगळ आणून रोज घेत जा. अशीच कधीकधी सूज येतेय म्हण्जे वॉटर रिटेन्शन होतय का? मीठ जास्त खाण्यात येतय का?

तुरीची डाळ अशीही खूप पित्तकारक असते आणि जड असते पचायला, मसूर माहित नाही. मूग डाळ मिळाली तर उत्तम.
टोमॅटो / अम्सूलाच सार, ताकाची कढी, लेमन राइस, टॅमरिंड राइस, टोमॅटो राइस, रसम राइस इ. आमटीभाताला पर्याय होउ शतील.
पालकाच्या भाजी व्यतिरिक्त इतर ग्रीन्स मिळतात का तिकडे?

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:32 pm | ढालगज भवानी

सोयाबीनच्या शेंगा (एडमाम) ज्यात अतोनात प्रथीने असतात, खाल्ल्या की मला पोटात कळा (क्रँप्स)येतात. तेव्हा अतिरीक्त प्रथीने वाईट या मतास दुजोरा.

डाळी आमटीशिवाय जेवण करणं अवघड आहे
पालकाची पातळ भाजी (ताकातली अर्थातच बीनाअमसुलाची व बीनताकातली पण आमसूल घालून) त्यात थोडे कच्चे शेंगदाणे व उगीच मूठभर ह. डाळ. कढी, मेथीची पातळ भाजी, अनेक प्रकारची सारे, कढणे पुस्तकात बघून करू शकता किंवा भारतातल्या नातेवाईकांकडून फोनवर विचारू शकता. मूग डाळ ही सगळ्या डाळींमध्ये चांगली, पचनास हलकी म्हणतात. जरा लांबच्या गावातून आणावी लागली तरी एकदम जास्त आणून, पोष्टाने मागवून साठवून ठेवता येईल. मुगाच्या डाळीची ताकातली आमटी, लसणीची फोडणी घालून वगैरे माहित असलेले प्रकार आहेत. बघा, काय सोयीचं आहे ते!

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 7:17 pm | विसोबा खेचर

काळजी घ्या..चांगल्या डॉक्टरांना दाखवा...तुमचा हा त्रास लवकरच पूर्ण बरा व्हावा अशी मनोमन शुभेच्छा..

तुरडाळीऐवजी मी त्याला मूगडाळ्+मसूरडाळ असे वरण देते. होमियोपॅथीने बराच फरक पड्लाय. आता शेंगदाणे खाल्यावर पित्त उठत नाही त्याला! तुरडाळप्रेमी मंडळी घरी असतील तर डाळ शिजवताना सगळ्या डाळी मिक्स करून वापरा. आमटी पण छान मिळून येते, तुरडाळ जास्त जात नाही पोटात!

अ‍ॅलर्जी टाळण्याचा मुख्य उपाय ज्याची अ‍ॅलर्जी आहे ते टाळणे! तुमच्या डॉक्टरनी काही रक्त तपासण्या केल्या का? त्यात रक्तात ईओसीनोफील, मोनोसाइट जास्त असे काही सांगीतले का? या पेशी अ‍ॅलर्जी असताना वाढतात.त्यावर अ‍ॅलर्जीविरोधक गोळ्या जास्त कालावधीस,काही वेळा steroids दिल्या जातात. अचानक उद्भवलेली अ‍ॅलर्जी याने कमी होते. त्याने कमी न झाल्यास जास्तीच्या रक्त तपासण्या केल्या जातात. बर्याचदा हा त्रास जसा आपोआप चालु झाला तसा बन्द होतो. काही दिवस गोळ्या घ्याव्या लागतात.

पित्तासारखी लक्षणं दिसताहेत. आमसूल वगैरे मिळत असेल तर छान नाहीतर सकाळी अंशपोटी कोमटपाणी लिंबू थोडं मध टाकून प्यावं. नायलॉन च्या कपड्यांमुळे त्वचा कोरडी होते तेव्हा आंघोळ झाल्यावर विंटर क्रीम वगैरे लावावं. आणि दिवसातून वरचेवर पाणी पित राहावं.

श्रिया's picture

29 Apr 2013 - 10:52 pm | श्रिया

पुरेशी झोप आणि डी व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळेहि काही अ‍ॅलर्जी उद्‌भवतात असे ऐकले आहे. ह्या त्रासातून तुम्हाला लवकर आराम मिळण्यासाठी शुभेच्छा.

"एखाद्या नियमीत परिस्थितीशी शरीर खूप लवकर जुळवून घेते" या तत्वानुसार आणि अ‍ॅलर्जी संदर्भात घडलेले हे दोन प्रसंग.

वडीलांना एकदा अचानक वांग्याची अ‍ॅलर्जी सुरू झाली. वांगे खाल्ले की पुरळ येणे, त्वचेचा दाह आणि चट्टे उठणे वगैरे प्रकार सुरू झाले. वांगे खाणे टाळणे हा उपाय होताच, अचानक हा त्रास का सुरू झाले याचा शोध घेवूनही हाती फारसे काही लागले नाही. एकदा वांगे खाल्ल्यानंतर होणार्‍या त्रासाचा अंदाज घेतला आणि औषधांचा पुरेसा साठा जवळ बाळगून रोज सकाळ - दुपार - संध्याकाळ वांग्याचे वेगवेगळे प्रकार अव्याहतपणे खाणे सुरू केले. सुरूवातीला थोडा त्रास झाला परंतु औषधे न घेता तो सहन केला. अ‍ॅलर्जीचे प्रमाण सुरूवातील खूप प्रमाणात होते ते नंतर कमी कमी होत गेले व साधारणपणे १५ व्या दिवसानंतर पूर्णपणे थांबले.

आता वांगे खाल्ल्यानंतर कोणताही त्रास होत नाही!

दुसरे उदाहरण माझे.

ऑफिसला जाण्यासाठी रोज कमीतकमी दीड तास व येण्यासाठी एक तास वेळ लागतो. (जाण्यायेण्यासाठी कॅब असते) रोज इतका वेळ करायचे काय हा प्रश्न. गाणी ऐकणे, ऑडीओ बूक ऐकणे वगैरे प्रयोग झाले परंतु गाणी ऐकता ऐकता डोळे मिटले की लगेचच झोप लागू लागली. कॅबमध्ये बसल्या बसल्या लॅपटॉप उघडून मिपामिपा खेळणे, इ बूक वाचणे वगैरे प्रकार सुरू केले तर पाच दहा मिनीटांनंतर मोशन सिकनेसची लक्षणे; चक्कर येणे, गरगरणे वगैरे प्रकार सुरू झाले. नंतर नंतर तर मोबाईलमधले मॅसेजेस वाचतानाही त्रास होवू लागला. पुन्हा वरील उपाय अवलंबला. रोज त्रास सहन करतच पण नियमीतपणे लॅपटॉप उघडून बसणे. हा प्रकार सुरू केल्यानंतर एक दोन महिन्यात चक्कर येणे वगैरे प्रकार थांबले.
मागच्याच आठवड्यात ट्रॅफीकमुळे दीड तासांचे दोन तास झाले तरी त्रास झाला नव्हता.

ढिस्क्लेमर्स -
१) वरील उपाय वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे असू शकतात याची कल्पना आहे
२) "आत्ता नाही परंतु नंतर त्रास होईल का?" असाही विचार डोक्यात आहे पण यावर सध्या विचार केलेला नाही
३) हे मार्ग अवलंबायचे असल्यास आपापल्या जबाबदारीवर अवलंबावेत.
४) एक्सेलमध्ये अत्यंत लहान फाँटमध्ये काम करण्याची सवय असल्याने आणि "ब्लिंक रेट" कमी असल्याने डोळ्यांची नेहमी काळजी घ्या असा सल्ला एका डॉक्टरांनी दिला आहे त्यानुसार मी नियमीतपणे डोळ्यांची तपासणी करून घेतो - सुदैवाने अजूनही चष्मा लागलेला नाही!

प्यारे - तू दूरदेशी रहात असल्याने हे उद्योग करू नयेस असा अनाहूत सल्ला - मात्र तिथे कोणी काळजी घेणारे असल्यास (मित्र, रूममेट्स वगैरे ;-)) शक्य झाले तरच प्रयोग कर अन्यथा काही वर्षे सहन करावे लागेल ही तयारी ठेव. (पण शक्यतो टाळच!!)

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 10:22 pm | श्रावण मोडक

वडीलांना एकदा अचानक वांग्याची अ‍ॅलर्जी सुरू झाली. वांगे खाल्ले की पुरळ येणे, त्वचेचा दाह आणि चट्टे उठणे वगैरे प्रकार सुरू झाले. वांगे खाणे टाळणे हा उपाय होताच, अचानक हा त्रास का सुरू झाले याचा शोध घेवूनही हाती फारसे काही लागले नाही. एकदा वांगे खाल्ल्यानंतर होणार्‍या त्रासाचा अंदाज घेतला आणि औषधांचा पुरेसा साठा जवळ बाळगून रोज सकाळ - दुपार - संध्याकाळ वांग्याचे वेगवेगळे प्रकार अव्याहतपणे खाणे सुरू केले. सुरूवातीला थोडा त्रास झाला परंतु औषधे न घेता तो सहन केला. अ‍ॅलर्जीचे प्रमाण सुरूवातील खूप प्रमाणात होते ते नंतर कमी कमी होत गेले व साधारणपणे १५ व्या दिवसानंतर पूर्णपणे थांबले.

वांगं बदललं की शरीर बदललं? याचं कारण असं की या उदाहरणात असं दिसतंय की पूर्वीही वडील वांगं खायचे, पण काही होत नव्हतं. आता झालं. पूर्वीचं वांगं, हा परिणाम झाला तेव्हाचं वांगं आणि नंतरचं वांगं यात फरक आहे का? की शरीर बदललं?
कृपया, यावर टवाळकी नकोय.

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2013 - 4:07 pm | प्रभाकर पेठकर

शाकाहारातील प्रथिने जी मुख्यतः डाळींमधून मिळतात त्यांना अपूर्ण प्रथिने म्हणतात. म्हणजे ही प्रथिने कार्बोहायड्रेट शिवाय शरिरात शोषली जात नाहीत. म्हणून आपल्याकडे आमटी भात, खिचडी असे पदार्थ खातात, दक्षिणेत इडल्या, डोसे वगैरे प्रकार खातात. सोयाबिन, मश्रूम्, दूध (मांसाहारात) अंडी आणि बाकी मांसाहार हे पूर्ण प्रोटीन वर्गात मोडते. म्हणजेच, कार्बोहायड्रेट्स शिवाय शरीरात शोषले जातात. ह्या सर्वाचा विचार करून पथ्य ठरवावे. आयुर्वेदात अ‍ॅलर्जीवर चांगला प्रभावी उपाय आहे. होमिओपॅथीतही आहे. फक्त त्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो.

शुभेच्छा...!

पैसा's picture

8 May 2013 - 5:51 pm | पैसा

अ‍ॅलर्जीचा त्रास महाभयानक होतो. मी बरीच वर्षे बर्‍याच प्रकारांच्या अ‍ॅलर्जीने त्रस्त होते. मुख्यतः टेन्शन्स कमी झाली आणि झोप व्यवस्थित, दिवसातून ७ तास मिळायला लागली त्यानंतर लक्षणीय प्रमाणात अ‍ॅलर्जीचा त्रास कमी झाला आहे. आमसुलाचे आगळ पाण्यातून घेणे. संत्री लिंबू अशा आंबट फळांचा वापर, पाणी भरपूर पिणे, सुती कपडे पांघरुण वापरणे इत्यादि आपण सहज करू शकतो आणि अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होतो.

थंड हवेमुळे अनेकांना अ‍ॅलर्जीचा त्रास सुरू होतो. मसुराच्या डाळीत लाखी डाळ मिसळली जाते तिच्यामुळे अनेक प्रकारची अ‍ॅलर्जी येते असे ऐकले आहे. अ‍ॅलर्जीवर होमिओपाथी आयुर्वेद इ मधे उपचार आहेत असे म्हणतात. मी बर्‍याच पाथी वापरल्या. नेमके कशामुळे बरे वाटले सांगणे कठीण आहे. पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर खाण्याच्या बाबत अवलंबून असताना तू डॉक्टर गाठावास हे उत्तम. वर अजयाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. त्वचारोग तज्ञाकडे लवकरात लवकर जाऊन ये.

सगळ्यांनी आपुलकीने दिलेल्या सल्ल्याबद्दल खरंच आभारी आहे. डॉ. खरेंनी स्वतःहून व्यनिद्वारे फोन नंबर देऊन विचारपूस केली आहे. सध्या कमी आहे पण कधी उचल खाईल अ‍ॅलर्जी ते सांगू शकत नाही.

सगळे कलिग एकत्र जेवण (आचार्‍याने बनवलेले) करत असल्यानं जास्त आवडी निवडी ठेवत नाही मात्र आता पथ्य पाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
कोकमाचं आगळ आणलंय पण पॅकच आहे. फोडलं नाही. सुरु करतो.
बाकी त्वचारोगाहून हे वेगळं आहे नि ते त्वचेद्वारे बाहेर पडत आहे असं 'आतला आवाज' (सोनिया फेम) सांगतोय.

पुनश्च आभार.

चौकटराजा's picture

8 May 2013 - 6:13 pm | चौकटराजा

मी गेली २५ वर्षे चिंचवडला रहातो. १९९४ चे सुमारास माझ्या मुलीस काही असात्म्यता आहे असे निदान करून प्राधिकरण वा तळेगाव येथे रहाण्याचा सल्ला दिला गेला. आमच्या घराजवळून एक ओढा वाहातो त्यात केमिकल्स सोडत असतील असे डॉ चा अंदाज. मी तिला रोज थाडावेळ फिरायला ओढ्याच्या काठावर घेऊन उभा रहायचो. आज त्याचाच उपयोग होऊन त्या केमिकलची संवय तिला झाली असेल काय याला पुरावा नाही. पण आज असात्म्यता नाही हे खरे.
आपण धीर धरावा. सगळे ठाक होईल.

पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर खाण्याच्या बाबत अवलंबून असताना तू डॉक्टर गाठावास हे उत्तम. वर अजयाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. त्वचारोग तज्ञाकडे लवकरात लवकर जाऊन ये.

सहमत.

नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे

यावरती "कॅरीमॅट" हा एक उत्तम उपाय आहे. "कॅरीमॅट" अंथरूण म्हणून वापर. :-D

माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!! ;-)

ह्याला म्हणतात जीवश्च कंठश्च मित्र. ;)
काय ती तल्लख स्मरणशक्ती! रायगडाला २ वर्षे झाली आता.
कॅरीमॅट चा नेमका 'किस्सा' काय होता रे? ;)

"कॅरीमॅट अंथरणे" हा शिवथर घळीदरम्यान उद्भवलेला वाक्प्रचार आहे, रायगड दरम्यान नव्हे! (अधिक माहितीसाठी संपर्क - सूड)

"आज माझी दाताची ट्रीटमेंट आहे" हा ही असाच एक. :-))

पळतो आता - लै अवांतर झाले.

सूड's picture

8 May 2013 - 11:39 pm | सूड

"कॅरीमॅट अंथरणे" हा रायगडला उद्भवलेला वाक्प्रचार आहे मोदका. दाताच्या ट्रीटमेंट शिवाय पण आणखी वाक्प्रचार होते, नेमके आताच आठवत नाहीयेत.

मी सहसा श्रावण घेवडा खाणे टाळतो .