मिपाच्या सर्व दालनांपैकी एक अतिशय समृद्ध दालन म्हणजे मिपाचं रसोईघर, अर्थातच मिपाचा पाककृती विभाग.. कुणाही शब्दप्रभुचे शब्द केवळ तोकडे पडावेत इतकं सुरेख, इतकं प्रेक्षणीय असं हे मिपाचं रसोईघर..नानाविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची अक्षरशः रेलचेल..सोबत त्या त्या पाकृंची दृष्ट लागावीत अशी एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं..!
हा विभाग चाळत असताना एक कल्पना सुचली ती येथे मांडतो..
गणपासारख्या अधिकारी व्यक्तिने अथवा अन्य कुणीतरी वेळात वेळ काढून मिपाच्या या सर्व पाककृतींचा एखादा सुरेख ब्लॉग बनवावा. मिपाव्यवस्थापनाची परवानगी, त्या त्या लेखकांच्या परवानग्या या तांत्रिक गोष्टी अर्थातच आहेत..परंतु मिपा व्यवस्थापनाने मनावर घेतल्यास त्याची पूर्तता करणे अवघड नाही..ब्लॉगमध्ये त्या त्या पाकृच्या शेवटी मिपाच्या त्या त्या लेखकाचे नाव अर्थातच देण्यात यावे..या ब्लॉगचे सर्व मालकी/व्यवस्थापन अर्थातच नीलकांत किंवा अन्य कुणा जबाबदार मिपा संपादकाकडे किंवा संयुक्तरित्या असावे..
हा सगळा खटाटोप केवळ एवढ्याचकरता की भविष्यात मराठी अनुदिनीक्षेत्रात अक्षरशः दृष्ट लागावा असा एक अतिशय म्हणजे अतिशय देखणा पाककृतींचा ब्लॉग आत्तापासूनच माझ्या नजरेला दिसतो आहे..!
हल्ली ब्लॉगक्षेत्रात खूप नवीन नवीन गॅजेट्स का काय म्हणातात ती आली आहेत, त्याचा कल्पकतेने वापर करून मिपाचा हा अत्यंत पेश्शल असा पाककृती-ब्लॉग तयार करता येईल.. त्यात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयं.. अशी सुरेख वर्गवारीही करता येईल आणि मला खात्री आहे, की marathiblogs.net वर मिपाच्या पाककृतींचा एक अतिशय देखणा ब्लॉग मिपाच्याच नावावे झळकेल..!
अर्थात, हे अत्यंत वेळखाऊ आणि कष्टाचं काम आहे..परंतु ते व्हॉलंटरीली कुणीतरी केलं पाहिजे असं मात्र मनापासून वाटतं..
असो..
जे मानात आलं ते मोकळेपणाने आपल्यासमोर मांडलं..
बहुतांशी मिपाकर माझी ही कल्पना उचलून धरतील असा अंदाज आहे..
कळावे..
तात्या,
एक सामान्य मिपाकर.
kind attn: नीलकांत, गणपा..
प्रतिक्रिया
27 Apr 2013 - 7:05 pm | नीलकांत
एवढ्यात मिपाचे जूने लेख व लेखमाला आपण एकासुत्रात बांधून सर्वांसाठी हजर करतो आहोतच त्यामुळे मिपाकरांना हवे असल्यास पाककृतींचा सुध्दा असा एकसुत्री धागा किंवा शोध पान देता येईल.
मात्र मिपाचा तांत्रीक पाया पक्का असताना बाहेरची रचना सुचवण्यामागे काय विचार आहे ते सांगाल का? एखादा ब्लॉग तयार करायला मिपाला जास्त वेळ लागणार नाहीच. उलट आपण त्यापेक्षा सोईस्कर अशी ठेवण तयार करतोय. जी लोकांना वापरायला सोपी असेल.
तुमचे आणी मिपाकरांच्या विचारांचे स्वागतच आहे. मात्र बाहेर ब्लॉग नेण्याची कल्पना तेवढीशी पटली नाही.
- नीलकांत
27 Apr 2013 - 7:11 pm | विसोबा खेचर
>>एवढ्यात मिपाचे जूने लेख व लेखमाला आपण एकासुत्रात बांधून सर्वांसाठी हजर करतो आहोतच..
ते उत्तमच आहे..
>>त्यामुळे मिपाकरांना हवे असल्यास पाककृतींचा सुध्दा असा एकसुत्री धागा किंवा शोध पान देता येईल.
नक्कीच देता येईल परंतु त्यात पदार्थांची वर्गवारी देता येईल का..?
>>मात्र मिपाचा तांत्रीक पाया पक्का असताना बाहेरची रचना सुचवण्यामागे काय विचार आहे ते सांगाल का?
मराठी अनुदिनीक्षेत्रात मिपाच्या पाककृतींचं नाव व्हावं, असं मनापासून वाटतं..
>>उलट आपण त्यापेक्षा सोईस्कर अशी ठेवण तयार करतोय. जी लोकांना वापरायला सोपी असेल.
उत्तमच..त्याबद्दल जरा माहिती दे प्लीज..
>>मात्र बाहेर ब्लॉग नेण्याची कल्पना तेवढीशी पटली नाही.
जे वाटलं ते लिहिलं..तुझ्या मताचा आदर आहेच..
असो..
तात्या.
27 Apr 2013 - 7:37 pm | अभ्या..
श्री. नीलकांतदादांना १०० टक्के सहमत.
बाहेरच्या ब्लॉगपेक्षा इथेच त्या पाकृंची जास्त प्रसिध्दी होईल हे निश्चित.
28 Apr 2013 - 7:12 am | जयंत कुलकर्णी
मिपाला सध्या सगळ्यात गरज असेल तर -
१ खरड आल्याची नोटिफिकेशन
२ एक गुगल सर्च एंजिन
३ एक कादंबरी विभाग......
28 Apr 2013 - 10:02 am | लाल टोपी
खरचं या तिन्हीची गरज आहे.
29 Apr 2013 - 4:26 pm | पंतश्री
खरच ह्या तीन्हीची अत्यंत गरज जाणवते. काही विशिष्ट लेख शोधायचे असतील तर पंचायत होते.
30 Apr 2013 - 8:45 am | अर्धवटराव
आयला, आम्हि एक वाक्य लिहावं आणि त्यात दहा चुका होतात...
अर्धवटराव
14 Sep 2013 - 1:23 pm | रॉजरमूर
पण मला समजा फक्त गणपा किंवा सानिकाच्या सर्व पाककृती बघायच्या असतील तर काय करायचे?
किंवा एखाद्या विशिष्ट लेखकाचे सर्व लेख बघायचे असल्यास काय करायचे ?
मला वाटते मिपाच्या आधीच्या आवृत्तीत हि सुविधा होती पण आता सुधारीत आवृत्तीत ती काढून घेण्यात आलेली दिसते
कृपया ही सुविधा पुनश्च सुरु करावी हि विनंती
14 Sep 2013 - 6:55 pm | पैसा
पण गणपाचे धागे तुम्ही http://www.misalpav.com/user/707/authored इथे एकत्र पाहू शकता. गणपाचा सदस्य क्रमांक ७०७ आहे. असाच हव्या त्या सदस्याचा नंबर ७०७ च्या जागी घातला की त्या सदस्याचे लेखन एकत्र मिळेल. एखाद्या आयडीवर कर्सर नेला असता त्याचा सदस्य क्रमांक खालच्या डाव्या कोपर्यात दिसतो. उदा. माझा सदस्य क्रमांक १०९५२ आहे. तर तुमचा २२७६८.
15 Sep 2013 - 1:53 am | रॉजरमूर
तेच मी म्हणतो आधीच्या आवृत्तीत लेखाच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात या लेखकाचे सर्व लेखन अशी लिंक असयाची ती आता काढुन टाकण्यात आलेली आहे आणि ते सोपेही होते आता हे आय डी नं . वगैरे टाकून बघणे हे जरा किचकट वाटते.
म्हणून लिंक ची सुविधा दिल्यास उत्तम होईल .
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पैसाताई .
27 Apr 2013 - 7:16 pm | जेनी...
तात्या ... रोशनी आत्ता कुठे असते ...
ते सांगत नैत :-/ दुसरच घेवुन बसतात :-/
शी बै :-/ :-/
27 Apr 2013 - 7:19 pm | विसोबा खेचर
मिपाची क्षमता किंवा अन्य गोष्टींबद्दल शंका नाहीच हे पुन्हा एकदा नमूद करतो..
प्रश्न आहे तो पदार्थांच्या वर्गवारीचा आणि मराठी अनुदिनीक्षेत्रात मिपाच्या पाकृंची अनुदिनी झळकण्याचा..
कल्पना सुचली ती मोकळेपणी मांडली..नजरेला ते दिसलं ते मांडलं..
कुठलाही आग्रह अथवा दुराग्रह नाही.. :)
तात्या.
27 Apr 2013 - 7:21 pm | वेताळ
नक्कीच देता येईल परंतु त्यात पदार्थांची वर्गवारी देता येईल का..?
सर्व पाककृतीचा एक वेगळा विभाग सुरु करुन त्यात वर्गिकरण करणे गरजेचे आहे. वेङला ब्लॉग सुरु करण्यापेक्षा इथेच एक वेगळा विभाग सुरु करणे सोयिस्कर आहे.
27 Apr 2013 - 7:28 pm | विसोबा खेचर
>>सर्व पाककृतीचा एक वेगळा विभाग सुरु करुन त्यात वर्गिकरण करणे गरजेचे आहे.
खरं तर वर्गवारीची गरज हेच या धाग्यामागचं एक महत्वाचं कारण..इतक्या सुंदर रसोईघरात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयजल इत्यादी वर्ग हवेतच हवेत असं मनापासून वाटतं..
27 Apr 2013 - 7:41 pm | jaypal
>>खरं तर वर्गवारीची गरज हेच या धाग्यामागचं एक महत्वाचं कारण..इतक्या सुंदर रसोईघरात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयजल इत्यादी वर्ग हवेतच हवेत असं मनापासून वाटतं..
मग ईथे मिपावरच तशी सोय उपलब्ध करुन देण्याविषयी सुचना,हट्ट अथवा धागा काढायचातना?
वेगळी चुल कश्याकरता मांडयची?
27 Apr 2013 - 7:25 pm | jaypal
१०००००००००.......................................% सहमत.
"पाककृती" किंवा "अन्न हे पूर्णब्रह्म" या वर क्लिकवल की काम होतय ब्वा आपल.
अवांतर= नव-नविन कल्पनांना कोंब फुटतायत.सध्या बराच वेळ उपल्ब्ध झालेला दिसतोय.
27 Apr 2013 - 7:32 pm | जेनी...
हिहिहि :D
27 Apr 2013 - 10:23 pm | नीलकांत
या धाग्यावर पाककृतींसंबंधी आपले विचार देऊ शकता. नवीन कल्पनांचे कायम स्वागत आहे.
27 Apr 2013 - 11:24 pm | सुहास झेले
नीलकांतशी सहमत.... पाककृती मिपावरच जास्त शोभून दिसतील. मिपावर त्याची वर्गवारी करता आली का बघावे आणि नसेल जमत तरी हरकत नाही. "पाककृती" किंवा "अन्न हे पूर्णब्रह्म" हे विभाग अतिशय सुटसुटीत आहेत.
27 Apr 2013 - 11:32 pm | मुक्त विहारि
वेगळा ब्लॉग नको..
27 Apr 2013 - 11:37 pm | जेनी...
इथल्या पाक्रु म्हणजे मिपाचा माणाचा तुर्रा ..
इकण्णं तिकं नक्को बाबा :-/
28 Apr 2013 - 3:30 am | प्रभाकर पेठकर
पाककृती विभागात, शाकाहारी, मांसाहारी, न्याहारी, पेयं, कॉन्टीनेंटल पदार्थ, सूप्स, उपवासाचे पदार्थ, लोणची+मुरंबे+जॅम, इत्यादी उपविभाग आणि प्रत्येक उपविभाचे भाज्या, आमट्या, उसळी, भात, पोळी+भाकरी+धीरडी, मटण, चिकन, अंडी, मासे, शाकाहारी सूप्स, मांसाहारी सूप्स इ.इ.इ. उप-उप विभाग करता येतील.
हे सर्व मिपावरच झाले तर उत्तम.
28 Apr 2013 - 5:31 am | वाचक
करताना काही (बर्याच?) मर्यादा पडतात. कारण सगळ्याच गोष्टी 'एकाच' वर्गात बसवता येत नाहीत.
उदा: बिर्याणी - व्हेज, नॉन-व्हेज, कोंबडी, मटण भात हैदराबादी असे विविध वर्ग प्रकार असतात,
त्यापेक्षा टॅग ठेवावेत - (जिथे नसतील तिथे अॅड करावेत) आणि त्या टॅग्स नुसार शोधाची सोय ठेवावी (मिपा तंत्रज्ञान वापरुन किंवा गुगल कस्टम (विशिष्ट) शोध प्रणाली वापरुन) - त्याच प्रमाणे टॅग्स मराठी आणि ईंग्रजी दोन्ही मधे ठेवले तर ह्याने केवळ अनुदिनी क्षेत्रात नाही तर सर्वच शोधात हे पान सापडू शकेल.
28 Apr 2013 - 7:47 am | नीलकांत
अगदी हेच करणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. टॅग दिल्यास उत्तम राहील आणि शोधण्याससुध्दा सोपे असेल.
28 Apr 2013 - 10:30 am | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादिंचे आभार. मिपाच्या पाकृंची योग्य ती वर्गवारी असलेला एक स्वतंत्र, सुरेख, देखणा असा ब्लॉग असावा हे माझं व्यक्तिगत मत. अर्थात, कुठलाही आग्रह वा दुराग्रह नाही. पुन्हा एकदा आभार - तात्या. सही - आम्हाला येथे भेटा -शिळोप्याची ओसरी - http://m.facebook.com/groups/180616612077291?refid=27
28 Apr 2013 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
खरं तर वर्गवारीची गरज हेच या धाग्यामागचं एक महत्वाचं कारण..इतक्या सुंदर रसोईघरात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयजल इत्यादी वर्ग हवेतच हवेत असं मनापासून वाटतं...
ही कल्पना खरेच उपयोगी आहे. परंतू यासाठी वेगळा ब्लॉग सुरू करणे जरूर नाही.
जसे बुवांनी सुचवलेले पाककृतीचे अनेक उपप्रकार आहेत तसेच गद्य साहित्य, पद्य साहित्य (कविता), चर्चा, कलादालन, इत्यादीतही अनेक उपप्रकार आहेत. ह्या उपप्रकारांमध्ये मोडणार्या साहित्याचा संच सहजपणे उपलब्ध झाला तर ही फार चांगली सोय होईल. त्यासाठी एक सुचना खालीलप्रमाणे:
'मेन मेन्यु' ऑप्शन्सना जर 'ड्रॉप डाऊन सबमेन्यु' ची व्यवस्था करता आली तर हे काम जास्त सुटसुटीत होऊन हव्या त्या उपप्रकाराचा लेखनसंग्रह सहज उघडण्याची सोय मुख्य पानावरूनच होईल.
29 Apr 2013 - 10:51 am | अमोल केळकर
छान कल्पना :)
अमोल केळकर
29 Apr 2013 - 5:05 pm | सूड
जे काय करायचं ते इथंच होऊ दे, वेगळ्या ब्लॉगवर वैगरे नको !!
16 Sep 2013 - 9:32 am | सुमीत भातखंडे
वेगळा ब्लॉग नको.
ज्या काही सुधारणा करायच्या त्या इथेच करुया
16 Sep 2013 - 10:56 am | bhaktipargaonkar
निलाकांतशी १००% टक्के सहमत...पाककृती शोधतांना फार त्रास होतो जर वर्गीकरण किवा विषयवार मांडणी केलं तर फार सोप्पा होईल...