नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट बाबत

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
25 Apr 2013 - 5:01 pm
गाभा: 

नमस्कार,
आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत.

आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्‍याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.

आपण आपल्यासाठी / आपल्या नात्यातल्या कुणासाठी तरी कधीना कधी ह्या साईटवर गेला असाल. आपणास आढळलेले / आवडलेले चांगले / वाईट मुद्दे येथे चर्चेकरीता आल्यास आम्हाला मदत मिळू शकेल.

धन्यावाद !

प्रतिक्रिया

तर्री's picture

25 Apr 2013 - 5:16 pm | तर्री

एकदा वाविप्र वाचावे ही वि.

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 5:28 pm | धर्मराजमुटके

अजुन तरी नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2013 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

ही समाजसेवा असणार आहे की माजसेवा (पेड) ?

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2013 - 6:07 pm | टवाळ कार्टा

=)) =)) =)) =))

लिमिटेड माजसेवा (पेड).
म्हणजे याच गोष्टीसाठी "अ" जर रु. ५०००.०० आकारत असेल तर आमचा रु. १०००.०० आकारण्याचा विचार आहे.
अवांतर : मग तुम्हाला ते कसे परवडणार ? असा उपप्रश्न कृपया विचारु नका.

मन१'s picture

25 Apr 2013 - 6:04 pm | मन१

धाग्यात बरच पोटेंशियल आहे.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2013 - 6:33 pm | पिलीयन रायडर

एवढी एकच जागा मिळाली का तुम्हाला हे विचारायला?
तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सोडुन सर्व काही मिळेल..!!! ;)

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 7:11 pm | धर्मराजमुटके

शंभर अवांतर, खवचट, खेचणारी उत्तरे मिळाली तरी एखादा महत्वाचा विचार नक्कीच मिळेल असा विश्वास आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2013 - 7:02 pm | संजय क्षीरसागर

आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्‍याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.

प्रत्येकाच्या घरी जायचं. पॅन कार्ड, सॅलरी स्लीप, पास बुक वगैरे ओरिजिनल बरोबर वेरिफाय करून तुमच्यासमोर तुमच्या फोनवर कॉल करायला लावायचा. मग एक स्वतंत्र आणि एक घरच्यांबरोबर असे दोन फोटो स्वतःच्या कॅमेर्‍यानं घ्यायचे. उंची, वजन आणि मापं मोजून घ्यायची झालं काम!

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 7:13 pm | धर्मराजमुटके

नक्कीच असे करणार आहे. मात्र हे व्हेरीफिकेशन उमेदवाराच्या घरी, ऑफीसात, आमच्या ऑफीसात कोठेही होऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था करायचा मानस आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2013 - 7:16 pm | परिकथेतील राजकुमार

पण उद्या एखादी 'मोरुची' मावशी आली तर काय करणार ?

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2013 - 10:04 pm | संजय क्षीरसागर

साला, धर्मराजसे बेईमानी?

म्हणजे उमेदवाराला वेळप्रसंगी प्रत्यक्ष गाठता येतं.

याच्या बरोबर दोन रेफरन्सेस घ्यायचे (त्यातला एक शक्यतो शेजारी असावा). रेफरन्स कन्फर्मेशन शिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही (फी आधी घेतली असली तरी) याची कल्पना द्यावी.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे `निष्कलंक चारित्र्याचं अ‍ॅफिडेविट' (स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्र) भरून घ्यायचं. त्यावर दोन साक्षिदारांच्या सह्या (यातला एक शेजारी राहणारा असेल तर उत्तम). प्रतिज्ञापत्राचा मायना मात्र वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्यानं इथे देता येत नाही.

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 8:46 pm | धर्मराजमुटके

पॉईंट नोटेड. मात्र रेफरन्सबाबतबाबत मध्यम मार्ग काढावा लागेल असे दिसतेय. शेजार्‍याला तरी नीट माहिती असेल की नाही ते सांगता येत नाही. वर्षानुवर्षे एकमेकांच्या बाजूला राहून नावदेखील माहित नसलेले महाभाग पहाण्यात आहेत.

चारित्र्य पडताळणी तुलनेत सोपी वाटते. पोलिस मुख्यालयाकडे १०० रु. भरुन अशी पडताळणी करता येते. अर्थात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदला गेला असेल तरच. ऑफीसच्या कामासाठी हा अनुभव घेतला आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2013 - 8:57 pm | संजय क्षीरसागर

इतकी कसून तपासणी झाल्यावर `धर्मराज वधु-वर सूचक मंडळ' नांव द्यायला काही हरकत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2013 - 11:12 pm | परिकथेतील राजकुमार

इतकी कसून तपासणी झाल्यावर `धर्मराज वधु-वर सूचक मंडळ' नांव द्यायला काही हरकत नाही.

अगदी.
द्युत खेळायला आम्ही आम्ही येऊच.

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2013 - 11:28 am | संजय क्षीरसागर

धर्मराज विवाहाचा बार ऊडवतील. तुला काय हा बालांचा बार वाटला का?

अनुप कुलकर्णी's picture

25 Apr 2013 - 7:20 pm | अनुप कुलकर्णी

पण तुम्ही केलेलं व्हेरिफिकेशन बरोबर आहे याचं व्हेरिफिकेशन कसे करणार ? :P

कोमल's picture

25 Apr 2013 - 7:27 pm | कोमल

धाग्यावर खळबळजनक आणि मजेदार प्रतिक्रियांचा ओघ सुरु होणार आहे..
भडंग (देशी पॉपकॉर्न)घेउन बसायला पाहिजे.. :))

अविनाशकुलकर्णी's picture

25 Apr 2013 - 7:27 pm | अविनाशकुलकर्णी

जात सांगावि लागणार का?
बरेच लोक एस सी..एस टी क्षमस्व असे म्हणतात

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 7:37 pm | धर्मराजमुटके

मात्र एस सी..एस टी क्षमस्व चा बोर्ड नसेल.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2013 - 10:17 pm | संजय क्षीरसागर

`धर्मराज निधर्मी वधू-वर मंडळ' अशी संस्था हवी. विवाहात स्त्री आणि पुरूष याच दोन जाती. एकमेकांच पटलं की लग्न.

अरे म्हणजे तुम्ही समलिंगी विवाहाच्या विरुद्ध आहात तर!
(टाकली काडी)

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2013 - 12:22 pm | संजय क्षीरसागर

सदरहू सदस्य वर-वरचे विवाह मंडळ काढत नसून वधू-वर विवाह मंडळ काढत आहेत हे आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे.

नीलकांत's picture

25 Apr 2013 - 11:57 pm | नीलकांत

या करीता तुमच्या लक्ष क्षेत्रात लोकांकडून सशुल्क शाखा द्या. म्हणजे लोकांना कमिशन मिळेल व पडताळणी करण्याचे काम होईल. आजकाल अश्या विवाहविषयक संकेतस्थळाच्या शाखांचा प्रसार चांगला झाला आहे. नागपुरची रेशीमबंध हे अश्यातीलच एक संकेतस्थळ आहे. जास्त पेपरबाजी न करतासुध्दा त्यांचा चांगला जम बसला आहे. त्यांनी सरळ अश्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी उत्पन्नाचा काही करार केला आहे कदाचित. लोक नेट कॅफे सोडून या कामाकडे वळल्याचे मी पाहिले आहे.

तसेच अन्य मार्गांपैकी कागदोपत्री पुरावे घेणे, बँकेच्या खात्यातुन पैसे वळते करून घेणे, चेक किंव तत्सम मार्गांचा वापर करता येईल. हे झालं त्या नावाची व्यक्ती अस्तीताव आहे की नाही याची पडताळणी.

यापुढची पडताळणी मात्र सहज नसते. व्यक्ती कसा आहे ते कसं ओळखायचं ? पोलीसांकडून होणारी पडताळणी ही त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची असेल. मात्र लग्न करताना ज्या विविध पातळींवर चौकशी करतात ती तुम्ही कशी करणार ? ते शक्य दिसत नाही आणि माझ्या मते तो तुमचा विषय सुध्दा नाही.
वधुवरसुचक संकेतस्थळाने अश्या प्रकारचे स्थळ येथे उपलब्ध आहे आणि त्याची प्राथमिक माहिती अशी आहे एवढंच देणे खरंतर अपेक्षीत आहे. कारण तुम्ही काहीही माहिती दिली तरी लोक आपल्या पातळीवर ही चौकशी करतात आणि ती केलीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही काही महत्वाच्या तांत्रीक बाबींवर लक्ष द्यावे. फार तर शिक्षण आणि अन्य बाबतीत कागदोपत्री पुरावा.

संकेतस्थळ एखाद्या विशिष्ट जाती पुरतं मर्यादीत असेल तर अन्य चौकशी करायला समुदायाची संघटना कामी येते. सर्व समाजाच्या संकेतस्थळांना ही सोय नाही.

बाकी अन्य संकेतस्थळांप्रमाणे चांगला शोध असलेले संकेतस्थळ असावे. फोटो उच्च रिझोल्युशनचे नसावेत. फोटोंवर वाटरमार्क असावा. आदी सुचवण्या आहेत.

- नीलकांत

फोटो उच्च रिझोल्युशनचे नसावेत. फोटोंवर वाटरमार्क असावा.
नीलकांतशी सहमत ! मुलींचे फोटो शक्य तितक्या कमी रिझोल्युशनचे असावेत्,म्हणजे त्याचा गैर वापर टाळता येईल.
वधु-वर सुचक वेबसाईट काय इतर ठिकाणी सुद्धा उदा. फेसबुकवर देखील स्त्रीयांनी स्वतःचे फोटो टाकण्याचा प्रयत्न टाळावा.याचे कारण सुज्ञ व्यक्तीस नक्की कळेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Apr 2013 - 12:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

खालील कागदपत्रे तपासून घेता येतील
१) शैक्षणिक अर्हता
२) उत्पन्नाचा पुरावा
३) HIV टेस्ट चा निकाल

या साधारण अशा गोष्टी आहेत ज्या समोरच्याला बघायच्या असू शकतात पण विचारणे प्रशस्त वाटत नाही.

शुचि's picture

26 Apr 2013 - 12:38 am | शुचि

चांगली सूचवण आहे. HIV चे अद्ययावत रिझल्ट्स लागतील म्हणजे मुला/मुलीचे २ वर्षे लग्न रखडले तर २ वर्षापूर्वीचा रिपोर्ट महत्त्वाचा नाही तर आता परत काढलेला लागेल. अर्थात तेच उत्पन्नाबाबतही आहे म्हणा.

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2013 - 12:03 pm | पिलीयन रायडर

उत्तम मुद्दा...!!
मानिसिक स्वास्थ्य पण चेक करता येते का? कारण माझ्या पाहण्यात २ लग्नं अशी आहेत जिथे मुलगी मनोरुग्ण होती. तिला गोळ्या पण चालु होत्या. घरच्यांनी हे लपवुन लग्न केले. पैकी १ लग्न सामोपचाराने घटस्फोट घेऊन मोडले. आणि दुसरीकडे सगळे दागिने आणि वर ३-४ लाख देऊन (कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्यासाठी.. मुलीचे घरचे घटस्फोटाला तयार नव्हते.. आणि वर मुलीचा छळ केला असे सांगुन दावा करु म्हणत होते.. मुलाला दुसरे लग्नही करता येईना..) मुलाने सुटका करुन घेतली..

रितुश्री's picture

26 Apr 2013 - 3:25 pm | रितुश्री

वेबसाईट सुरु झाली कि पहीली नोन्दणी आम्हीच करु..:-P

अमोल केळकर's picture

26 Apr 2013 - 4:16 pm | अमोल केळकर

छान छान . शुभेच्छा

(शुभेच्छूक ) अमोल केळकर