गाभा:
[विजूभाऊंच्या पुस्तक चर्चे वरुन प्रेरणा घेऊन] आपल्याला आवडलेले वेगळे/ फारसे प्रसिद्ध नसलेले चित्रपटांबद्दल बोलण्यासाठीचा हा धागा
विग्रजी चित्रपटांची फारशी जाणकारी नसल्याने त्याभाषेतील चांगल्या चित्रांची तोंडओळख झाली तर आनंद वाटेल ..
हिंदीमध्ये सध्या बरेच भिकारपट येत असल्यामुळे त्याचा त्रागा काढण्यासाठी कृपया या धाग्याचा वापर करु नये ही विनंती :-)
प्रतिक्रिया
1 Sep 2008 - 8:21 pm | मेघना भुस्कुटे
इंग्रजी नाही, काही विदेशी चित्रपटः
टू ऍण्ड हाफ टाइम्स इन हेल
हा एक हंगेरियन सिनेमा आहे. काळा-पांढरा. आपला 'लगान' याची देशी आणि काहीशी सौम्य आवृत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही.
इथला सामना आहे तो - दुसर्या महायुद्धाच्या काळातले काही ज्यू कैदी आणि फॅसिस्ट सैनिक यांच्यात. तसा निवडीला वाव नाहीच. फक्त थोडं बरं खायला-प्यायला मिळेल इतकाच टीममधे असल्याचा फायदा. टीमचा कप्तान आहे देशाच्या फुटबॉल टीमचा माजी कप्तान. फक्त त्याच्या टीमचं लक्ष आता जिंकण्याहरण्यासारख्या क्षुद्र गोष्टींवरून सकस खाणं- थंडीकरता धडके बूट असल्या मोलामहागाच्या चिजांवर एकवटलेलं. पण सामन्यातला एक क्षण असा येतो - की कप्तानासमोर एकच निवड. हरायचं किंवा जिंकून कुत्र्याच्या मौतीनं मरायचं.
कैदी जिद्दीनं जिंकतात. रोज मेल्या नजरेनं अपमान सोसणारे कैदी एकदाच - एकदाच - सैनिकांना धूळ चारतात. माणूस असल्यासारखं वाटायला लावणारा विजयाचा एक क्षण आणि नंतर मैदानात अपमानास्पद पद्धतीनं पडलेली त्यांची प्रेतं.
अंगावर येणारा आशय असूनही काही विलक्षण उपरोधिक हसरे क्षण सिनेमात मिळतातच. त्यांनी या सिनेमाचं गांभीर्य कितीतरी उंचावलं आहे.
दी कप
हा भूतानचा एक सिनेमा. बौद्ध भिक्षूंचा मठ. तिबेटियन लोकांचा. भारताच्या आश्रयानं चालणारा. तिथे शिकायला असलेली - आध्यात्मिक नि वैज्ञानिक असं दोन्ही शिक्षण घेणारी कोवळी पोरं. सध्या चालू आहे फुटबॉलचा विश्वचषक. कसंही करून पोरांना फायनल पाहायचीच आहे. रात्री चोरून टीव्ही पाहायला जायचीपण सोय नाही, मास्तरांनी परवाच तर पकडलं होतं. आता? १० वर्षांचं ते अतिउत्साही पोरगं शक्कल लढवतं. जाऊन थेट मास्तरालाच गाठतं. मुख्य भिक्षू विचारतात - काय असतं फुटबॉलमधे? सेक्स असतो? -'नाही'. बरं, व्हायलन्स? -'नाही'. मग आणा खुशाल टीव्ही! आता टीव्ही भाड्यानं आणायची तयारी. पैसे? पोरगं हिकमती. स्वतःजवळचे असतील नसतील ते सगळे पैसे तर तो गोळा करतोच. तरी पुरेसे पैसे नाहीत म्हटल्यावर आश्रमात नवीन आलेल्या एका लहान रडक्या पोराचं घड्याळ उसनं घेतो. टीव्ही येतो. मॅच सुरू होते. मुख्य भिक्षूंपासून सगळे येतात. नुसता हल्लकल्लोळ. मॅचचा गदारोळ. पण आपल्या कारट्याचं मन मात्र मॅचमधे नाही. त्याची नजर राहून राहून त्या रडणार्या पोराकडे जाते आहे. त्याचं घड्याळ परत नाही मिळालं तर? त्याची समजूत कशी घालणार?
आपल्याच आनंदी मागण्यांना ओलांडून दुसर्याच्या दु:खाकडे सहज ओढलं जाणारं - काही तासांत मोठं होणारं ते पोरगं. तू खरा भिक्षू होशील, पोरा, ही त्याच्या मास्तरांची भविष्यवाणी. अर्थहीन ठरलेला विश्वचषक.
दी सिरियन ब्राइड
हा एक इस्राएली सिनेमा. खरं सांगायचं तर आंतरराष्ट्रीय राजकारण जरा कच्चं असल्यामुळे मला त्यातले राजकीय तपशील धड कळले नाहीत, काही कळवून घेतले - तरी आता लक्षात राहिले नाहीत. लक्षात राहिली ती त्यातल्या वधूची घालमेल. तिचं (बहुतेक हां) कुटुंब सिरियातलं. वडील, भाऊ राजकारणात सक्रिय. वातावरण सतत तापलेलंच. आणि तिचं लग्न ठरलंय इस्राएलमधल्या एका सुखवस्तू तरुणाशी. लग्नाकरता घरात जमलेले पाहुणे. आपल्या लग्नात सुखी नसलेली नि त्यामुळे हळवी झालेली बहीण. खूप वर्षांनी मायदेशी आलेला भाऊ. पेटलेली दंगल. वर्हाडकरी दोन्ही बाजूंच्या सीमेवर ताटकळलेले. कारण तिचं व्हिसाचं काम काही झालेलं नाही. एका शिक्क्यानं अडलंय खरं तर. पण दोन्ही बाजूंची अडेलतट्टू नोकरशाही तटलेली. घालताहेत खेटे.
चढत्या उन्हासोबत सिनेमातला ताण चढत गेलेला. वाट पाहण्याच्या दरेक क्षणासोबत, आपल्या दुखर्या नसेशी ओळख करून देणार्या प्रत्येक व्यक्तीसोबत, अधिकार्यांच्या दरेक मुजोरीसोबत - आपला धीर सुटत चाललेला.
अखेर एका निर्वाण-क्षणी वधू आपला वधूवेष सावरत चक्क सीमारेषेकडे पळत सुटते. जिवाची पर्वा न करता. आणि तिच्या त्या निर्णयाकडे सगळे जण अवाक होऊन पाहत राहतात. पाहणार्या कुणाच्या नजरेत सार्थक, कुणाच्या नजरेत असूया. कुणाच्या नजरेत अविश्वास, कुणाच्या चक्क भीती. ती मात्र बेदरकारपणे जोडीदाराकडे - नव्या आयुष्याकडे.
बाकी दिग्दर्शक वगैरे तपशील जालावर शोधले तर नक्की मिळतील. ही आपली नुसतीच ओळख, आठवणीवर विसंबून. :)
30 Nov 2009 - 4:41 pm | कानडाऊ योगेशु
मेघनाताई,
टू ऍण्ड हाफ टाइम्स इन हेल चे कथानक व एस्केप टू व्हिक्टरी ह्या इंग्रजी चित्रपटाचे कथानक सारखेच आहेत.
एस्केप टू व्हिक्टरी मध्ये ग्रेट फुटबॉलपटू पेले ने पण काम केलेले आहे.
----------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
1 Sep 2008 - 8:05 pm | सुचेल तसं
मी आपला मला आवडलेला हिंदी चित्रपट सांगतो:
जॉनी गद्दार: हा एक जबरदस्त थ्रिलर आहे. ही कथा आहे पाच जणांची (झाकिर हुसेन, विनय पाठक, धर्मेंद्र, निल मुकेश आणि दया शेट्टी) ज्यांना अडीच कोटी रुपये उभे केले तर त्याच्या दुप्पट पैसे मिळणार असतात. पण ह्यांच्यातला एक जण बाकी सगळ्यांना धोका देऊन सगळे पैसे स्वतः हडप करण्याचा प्लॅन आखतो. चित्रपट अतिशय वेगवान गतिने पुढे सरकत राहतो. आपल्याला वाटत असलेले सगळे अंदाज चुकतात आणि रहस्याचा उलगडा चित्रपटाच्या अगदी शेवटी होतो. सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. झाकिर हुसेन ('सरकार' मधला रशिद) तर अफलातुन. विनय पाठकचा पण एकदम वेगळा रोल पहायला मिळतो. नितीन मुकेश (गायक मुकेश ह्यांचा नातू) चा हा पहिलाच चित्रपट. पण त्याने एकदम स्टाईलिश रोल केला आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक आहे श्रीराम राघवन. ज्याने अगोदर 'एक हसीना था' सारखा एक वेगळा चित्रपट दिला होता.
हा चित्रपट तिकिट खिडकीवर विशेष चालला नाही. पण ज्यांनी अद्याप पाहिला नसेल त्यांनी जरूर पहावा.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
1 Sep 2008 - 8:08 pm | छोटा डॉन
साहेब, त्याचे नाव "नितीन मुकेश "नसुन "नील नितीन मुकेश " आहे ...
"नितीन" हा "मुकेश" चा मुलगा व त्याचा मुलगा "नील".
बाकी पिक्चर +++१.
असो. बाकी विषयांतर नको.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
1 Sep 2008 - 8:11 pm | सुचेल तसं
अरे धन्यवाद,
टायपिंग मिस्टेक. कारण पहिल्याच ओळीत मी "नील मुकेश" असं लिहीलं आहे.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
1 Sep 2008 - 8:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इस रात की सुबह नही या नावाचा एक चित्रपट मागच्या शतकाच्या नव्वदीत येऊन गेला. निर्मल पांडे, तारा देशपांडे, स्मृती मिश्रा, आशिष विद्यार्थी आणि सौरभ शुक्ला हे मुख्य कलाकार. निर्मल पांडेचं लग्नाबाहेरचं स्मृतीबरोबर असलेलं, प्रकरण त्याच्या बायकोला, ताराला समजतं. त्यांचं भांडण होतं आणि चुकून निर्मलचा बारमधे गुंड आशीषशी पंगा होतो. इकडे आशीष आणि सौरभचाही पंगा सुरू असतो. आशीष निर्मलच्या मागे लागतो, आणि सौरभला आशीषचा बदला घ्यायचा असतो. एका संध्याकाळी ही गोष्ट सुरू होते आणि दुसय्राच दिवशी सूर्य उजाडताना "द एंड" येतो.
या पिक्चरला वेग आहे, सतत काही ना काही "घडत" रहातं.
आणि एम.एम.क्रीमचं मस्त संगीत आहे. "चुप तुम रहो" हे प्रेमगीत आणि "जीवन क्या है, कोई न जाने" ही दोन गाणी छान आहेत, त्यातलं दुसरं मला अर्थासाठीही आवडतं.
गोष्ट खूप वेगळी नाही, पण ज्या वेगानी गोष्टी घडत जातात, आदळत रहातात ते खूप मस्त आहे.
1 Sep 2008 - 8:39 pm | लिखाळ
थोडासा रुमानी हो जाये !
साध्या सरळ मांडणीचा, कथेमध्ये गुंता नसलेला, सर्व कलाकार आणि संवाद सुंदर असलेला चित्रपट. दिसायला बर्या असणार्या स्त्रीला ती सुंदरर आहे हे पटल्यावर कल्पना आणि वास्तव यांतला गुंता सुटू लागतो किंवा तो अजून ठळक होउ लागतो. कल्पना आणि वास्तव यांत विभागलेले लोक आणि त्यांची सुंदर कथा पाहण्या योग्य. कथेला अजूनही काही आयाम असू शकतात पण ते प्रेक्षकाने स्वतःच तपासावेत आणी आनंद घ्यावा.
(यु.ट्युब वर हा चित्रपट आहे पण ८मिनिटांचे भाग पाहण्यात मजा निघून जाते आणि काही भाग सलग नाहित.)
-- (दृष्टद्युम्न पद्मनाभ बारिषकर) लिखाळ.
2 Sep 2008 - 12:38 am | भडकमकर मास्तर
दृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापति नीळकंठ धुमकेतु बारिषकर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Sep 2008 - 8:13 pm | संदीप चित्रे
लिखाळ -- जियो बेटा !
मी हा धागा पाहून 'थोडासा...' बद्दल लिहायला आलो आणि तुझी पोस्ट दिसली.
--------
मी हा सिनेमा पहिल्यांदा व्हीसीआर वर पाहिला तेव्हा लगेच पूर्ण रिवाईंड करून पुन्हा एकदा पाहिला आणि मग रिवाईंड करून मोजके सीन पाहिले. थोडक्यात म्हणजे एका रात्रीत सलग अडीच वेळा 'थोडासा....' पाहिलाय :)
1 Sep 2008 - 11:40 pm | अभि
एका तरुणावर खुनाचा आरोप असतो,त्याला शि़क्षा देण्यासाठी १२ माणसांची नेमणुक केली जाते.
सुरुवातीला सर्वजण त्याच्याविरुद्ध असतात,परंतु हळुहळु त्याच्याविरुद्धचे सर्व आरोप एक वकील खोटे पाडतो.
चित्रपट सुरुवातीपासुन पाहिला नसल्याने एवढेच लिहिता आले.
चित्रपटाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे काही सीन्स वगळ्ता सर्व कथानक एका बंद खोलीत घडते.
हा एक कोर्टरुम ड्रामा सुद्धा आहे.
2 Sep 2008 - 12:04 am | भडकमकर मास्तर
नो मॅन्'स लँड ( २००१)
लगान त्या वर्षी ज्या सिनेमाकडून हरला तो हा पिक्चर... एका मित्राकडून डीव्हीडी मिळाली.
आवडलाच.बोस्निया आणि सर्बिया युद्धभूमीवरच्या खंदकात दोन विरुद्ध बाजूचे सैनिक अडकतात.अणि एक सैनिक सुरुंगावरती पड्ला आहे, हलला की उडणार अशा स्थितीत....तिथून जीवंत बाहेर पडण्याचे त्यांचे प्रयत्न,त्यांची वादावादी आणि यू एनच्या पीसकीपिंग ऑपरेशनची थोडीशी टिंगल , युद्धपत्रकारांची धांदल अशा वळणावळणांनी सिनेमा पुढे सरकतो.... शेवट सुरुंग निकामी करणारे पथक पोचते आणि शेवट चटका लावून जातो.... आणि हाँटिंग संगीत अविस्मरणीय.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Sep 2008 - 12:13 am | मनीषा
ही माझी अतीशय आवडती आभिनेत्री.. (ती अतिशय सुंदर होती .. तीला तीचे सौंदर्य टिकून राहण्याचे गुपीत विचारले असता ती म्हणाली होती .. "तुमचे मन जर सुंदर असेल तर ते सौंदर्य तुमच्या चेह-यावर ... व्यक्तीमत्वामधे दिसते )
तीचे (पठडीबाह्य म्हणता येणार नाही पण .. ) आवर्जुन पहावे असे चित्रपट म्हणजे..
१) Wait Untill DarK - (या चित्रपटा वर आधारित -- अंधार माझा सोबती--- नावाचे एक मराठी नाटक सुद्धा आहे) यात ऑड्री ने एका अंध स्त्री ची भूमिका केली आहे. ती एकटी रहात असते. तीच्या घरी एक चोर शिरतो पण तीचा वावर इतक सहज असतो कि कितीतरी वेळ ती अंध आहे हेच त्याला कळत नाही. आणि अंधार हीच तिची ताकद असते. ती युक्तीने घरातील फ्युज निकामी करते आणि अंधाराचा फायदा घेउन त्या चोराला पकडून देते ... यात शेजारी रहाणारी एक मुलगी तीची मदत करते. एका लहानशा खोलीत घडणारी कथा आणि मो़जकीच पात्रे ... पण अतिशय सुंदर चित्रपट .
२) Roman Holiday - यात तीने एका प्रिन्सेस ची भूमिका केली आहे आणि तीचा सहकलाकार आहे ग्रेगरी पेक जो एक पत्रकार असतो.
2 Sep 2008 - 12:41 am | पिवळा डांबिस
खूप, खूप, खूप, खूप आहेत.....
सांगणार तरी किती!
तूर्त नमुन्यादाखल पाच चित्रपट देत आहे...
१. हंट फॉर रेड ऑक्टोबर - सोवियेत युनियनची सगळ्यात शक्तिशाली आण्विक पाणबुडी घेऊन अमेरिकेला फितुर होणार्या नाविक अधिकार्यांची कथा. आरमारी विषयावर असूनही अत्यंत कमी प्रत्यक्ष हिंसाचार अस्लेला चित्रपट. जणू काही बुद्धिबळाचा डाव पहातो आहे असे वाटते...
२. द लीग ऑफ देअर ओनः दुसर्या महायुद्धात सगळे पुरुष युरोप्-पॅसिफिक मध्ये लढायला गेल्यावर महिलांची बेसबॉल लीग स्थापन झाली. परंतू युद्ध संपताच पुरुष परत आल्यामुळे ती गुंडाळून ठेवण्याच्या मॅनेजमेंटच्या प्लान्सना त्या खेळाडू महिलांनी आपल्या खेळाद्वारे दिलेली लढत...
३. अ फ्यू गुड मेनः सैन्यात असतांना फक्त वरून दिलेले हुकूम तंतोतंत पाळायचे की स्वतःची सदसदविवेकबुद्धीही वापरायची या द्वंद्वावर आधारित चित्रपट....
४. बर्ड केजः दोन गे माणसांनी आपल्या (त्यांच्यापैकी एकाच्या) मुलाच्या स्ट्रेट प्रेमाला यशस्विता मिळावी यासाठी केलेली विनोदी धडपड...
५. माय फेअर लेडी: ऑल टाईम हिट. ओळख करून द्यायची गरज नाही....
अजून पुन्हा कधीतरी.....
2 Sep 2008 - 1:04 am | मानव
BLACK HAWK DOWN,LIIFE IS BEAUTIFUL,GODFATHER,SHOOTER,BOURNE IDENTITY,BOURNE SUPRAMACY,BOURNE ULTIMATOM,HITMAN,BONE COLLECTOR,HURRICANE HUNTER,BENHUR,CARRY ON SERIES,AMERICAN PIE,MINDHUNTER,THE KID,GREAT DICTATOR,MODERN TIMES,MR INCREDIBAL,BACK TO THE FUTURE,PITCH BLACK,RIDDICK,.rain maker...........................................................................................................................................
phone booth हा आवर्जुन बघ ,सगळा चित्रपट फोन बुथ मधे आहे
बघता येतिल तितके कमिच ! प्रत्येक चित्रपट हा दुसर्या पेक्शा वेगळाच असतो
काहि चुकल्यास माफि असावि !
2 Sep 2008 - 1:11 am | भडकमकर मास्तर
phone booth फोन बूथ कॉलीन फॅरेलचे अप्रतिम काम आहे...
हा संपूर्ण चित्रपट फोन बूथ मध्ये घडतो.... याचा स्क्रीनप्ले सुद्धा वाचनीय आहे. script-o-rama.com वर उपलब्ध आहे.
वाचतानाच याची एकांकिका करणे शक्य आहे असे जाणवले होते, पण राहून गेले... यथावकाश या सिनेमावरच गेल्या स्पर्धेत दुसर्या कोणी तरी केलेले नाटक पाहिले. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Sep 2008 - 8:56 pm | संदीप चित्रे
फोन बूथ मस्त आहे एकदम
4 Sep 2008 - 6:19 pm | भडकमकर मास्तर
२००७ च्या पुण्यातल्या पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेत एम आय टी कॉलेजने केले होते.... नाव आठवत नाही
मिलिंद शिंत्रेने लिहिले होते बहुतेक
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Sep 2008 - 2:06 am | टारझन
आपणास खरेच अफलातुन पिक्चर पहावयाचे असतिल तर मिथून्,सन्नी/बॉबी,रजनिकांत्,आणि या सगळ्या पकाव लोकांचा बाप कभिकेश बचपनचे शिनूमे पहा..
असो .. विनोद वगळला तर काही चित्रपट असे...
१. १२ अँग्री मेन :एका मुलावर बापाच्या खुणाचा खटला चाललेला आहे, १२ लोकांच्या हातात निर्णय आहे.११ लोक सुरूवातीला पोराला फाशी द्या म्हणत असतात पण एकटा एक एकाला कसे समजवतो आणि मुलगा निर्दोष कसा सुटतो याची कथा
२. इटालियन जॉब : वेगळे सांगने न लगे.. अफलातुन चोरी पट
३. मॅलेना : माय स्वीट हार्ट मोनिका बेलूची ची अप्रतिम अदाकारी , युद्ध विधवेचा समाजात कसा छळ होतो याचं मार्मिक उदाहरण
४. रॉकी बॅल्बोआ : एका बॉक्सरची आणि त्याच्या संघर्षाची उत्तम पेशकश करणारी चित्रपट मालिका
५. द ग्रेट एस्केप, सेव्हिंग प्रायव्हेट रायान : जबरा चित्रपट .. युद्धावर आधारित.
६. ब्रुकबॅक माउंटन : आपण जर "तसले" असाल तर उत्तम .. एक चित्रपट म्हणूनही उत्तम आहेच
७. राँग टर्न, द हॉस्टेल : जर बिभत्सपणाचा आणि नरभक्षी लोकांचा कळस पहायचा असेल तर उत्तम
८. अमेरिकन पाय : १ ते ६ ... फुल धांगडधिंगा (सुचना : घरच्यांसमोर पाहू नये)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
3 Sep 2008 - 6:42 pm | विजुभाऊ
अमेरिकन पाय : १ ते ६ ... फुल धांगडधिंगा (सुचना : घरच्यांसमोर पाहू नये)
शीर्षकातच् १ ते ६ ... इतक्या तंगड्या आहेत तर पिक्चर मध्ये किती असतील
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
2 Sep 2008 - 2:32 am | भाग्यश्री
मला खूप आवडलेला पिक्चर.. चिल्ड्रेन ऑफ हेवन.. अतिशय साधा, सरळ सुंदर पिक्चर आहे ! माझ्या ब्लॉगवर मी त्या पिक्चर बद्द्ल लिहीले होते..
2 Sep 2008 - 5:09 am | आजानुकर्ण
ह्या चित्रपटाला पठडीबाह्य म्हणता येणार नाही. मात्र वर अनेकांनी मेनस्ट्रीम सिनेमेच दिलेले आहेत. नुकताच पाहिलेला आणि अतिशय आवडलेला सिनेमा. kickass म्हणता येतील अशी जबरदस्त दृश्ये. वेगवान हाताळणी आणि सिनेमाच्या शेवटी परिचित असला तरी बटबटीत न वाटणारा धक्का.
सुंदर चित्रपट.
आपला,
(पोक्किरी) आजानुकर्ण
2 Sep 2008 - 8:01 pm | बिपिन कार्यकर्ते
पोक्किरी हा मलाही आवडलेला आहे... पण वर जे चित्र दिले आहे ते पोक्किरी चे आहे का नक्की? मी पाहिलेला पोक्किरी हा आहे... http://en.wikipedia.org/wiki/Pokkiri
बरा आहे पिक्चर... असिन ही नटी पण छान आहे. विजय हिरो आहे.
बिपिन.
2 Sep 2008 - 8:02 pm | बिपिन कार्यकर्ते
ओ.के.... बहुतेक तू दिलेलं पोस्टर तेलुगू चित्रपटाचे आहे.. कारण 'पोक्किरी' तेलुगू भाषेत लिहिलेले आहे...
बिपिन.
2 Sep 2008 - 9:31 am | ऋचा
१) "गॉन विथ द विंड" अप्रत्तिम
२) "कुंकु" खुप जुना व्ही.शांताराम यांचा त्याकाळच्या स्त्रीवर बेतलेला.
३) "लिजंड ऑफ भगतसिंग" अजय देवगण चा भयानक आवडलेला चित्रपट
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
2 Sep 2008 - 11:47 am | मन
आहे की नाही, तुम्हीच ठरवा; पण अमिताभच्या तत्कालीन पिक्चरपेक्षा खूपच वगळा आणि चांगला पिक्चरः-
मै आझाद हूं
शिवाय ....
जाने भी दो यारों आहेच.
मराठित म्हणाल तर
"तें "ची पटकथा लाभ्लेला
"सिंहासन" मस्तच.
"चौकट राजा" ही भारीच.
आपलाच,
मनोबा
2 Sep 2008 - 8:18 pm | संदीप चित्रे
मैं आझाद हूं हा अमिताभच्या ऑल टाइम क्लासिक्समधला एक अगदी वेगळा चित्रपट आहे. सेन्सिबल सिनेमा आवडत असेल तर नक्की पहावा :)
2 Sep 2008 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉक्टर स्ट्रेंजलवः शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रश्या यांच्यात गैरसमजामुळे अणुयुद्धाची वेळ येते ... जरा जुना आहे पण बघाच. एकूणच स्टॅन्ले कुब्रित्च चे सगळेच पिक्चर्स मला आवडतात.
शॉशँक रीडेंप्शन न केलेल्या दोन खुनांसाटठी दोन जन्मठेपा भोगणारा टीम रॉबिन्स तुरुंगात रडून मरण्यापेक्षा हसून जगतो. अतिशय सुंदर चित्रपट, फक्त तुरुंगातलं जग दाखवल्यामुळे खूप शिव्या आहेत. (म्हणूनच मला आवडला असं काही नाही).
2 Sep 2008 - 12:19 pm | आनंदयात्री
मेल गिब्सनने दिग्दर्शित केलेले माया भाषेतला ऍपोकॅलोप्टो .
माया संस्कृतीचा पगडा असलेल्या काळात घनदाट जंगलात एक पिसफुल ट्राईब रहात असते. माया संस्कृतीच्या रिवाजानुसार बळी देण्यासाठी गुलाम पकडणार्या क्रुर सैनिकांचा त्या ट्राईब वर हल्ला होतो. सिनेमाचा हिरो जग्वार पॉ आपल्या गर्भार बायकोला अन लहान मुलाला एका विहिरीत लपवुन ठेवतो. पुढे खुप लढुनही पकडला जातो, अन मग सुरु होतो एक जिवघेणा प्रवास. माया संस्कृतीचे, जंगलात जगायच्या आव्हानांचे, मानवी हितसंबंधांचे, एतिहासिक तपशिलांचे अत्यंत सुंदर चित्रपट. चुकवु नये असा.
स्पॉइलर अलर्टः चित्रपट लवकरच पहाण्याचा मानस असेल तर खालच्या ओळी रसभंग करतील.
अंगावर काटा उभा करणारा सीनः जग्वार पॉ ने गर्भार बायकोला अन लहान मुलाला विहिरीत लपवलेले असते, तिकडे जग्वार पॉ चा जगण्यासाठी संगर्ष चालु असतो इकडे मुसळधार पाउस सुरु होतो. त्या विहरीत पाणी भरायला लागते. पॉ ची बायको अन मुलगा मिळुन वर चढायची धडपड सुरु करतात, ती २-३ वेळा पडते त्या प्रयत्नात. विहरीत एव्हाना बरेच पाणी भरलेले असते. कमरेपेक्षा वर पाणी चढते, ती पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करते अन तिला असह्य प्रसुतिवेदना सुरु होतात, थोड्यावेळात तिथेच ती बाळाला जन्म देते अन पाण्यातुन वर काढते . पॉ च्या पहिल्या मुलाच्या चेहर्या अवर्णनिय आश्चर्य मिश्रित आनंद असतो.
2 Sep 2008 - 12:22 pm | मेघना भुस्कुटे
कितीतरी दिवस घरात पडून आहे, पण पाहायला मुहूर्त नाही मिळालाय. आता या वीकान्ताला नक्की. इतका भारी आहे, मला माहितीच नव्हतं!
3 Sep 2008 - 12:53 am | भाग्यश्री
अप्रतिम चित्रपट !! मला इतकं खीळवून ठेवलं ना या पिक्चरने !! खरच अप्रतिम..
फक्त सुरवातीला भयंकर दृश्य आहेत.. छाती फाडून काढलेलं धक्धकणारं हृदय वगैरे.. :|
पण तरीही चित्रपट आवडला.. जग्वारचा प्रवास अप्रतिम!! :)
2 Sep 2008 - 12:50 pm | अमिगो
The bicycle thives - एका गरिब इटालीयन माणसाची गोष्ट, केवळ अप्रतिम
The God Father - ऑल टाईम हिट
The Motorcycle Diaries - चे गव्हेरा च्या प्रवासाची कहाणी,
One Flew Over the Cuckoo's Nest (film) - Jack Nicholson फॅन नी आवर्जुन पाहण्या सारखा चित्रपट
The Sting - मी पाहिलेला ठगगीरी वरचा एक छान चित्रपट
Saving Private Ryan -दुसरया महायुद्धातील कथा, स्टीवन स्पिलबर्ग + टॉम हॅन्क्स - ऑल टाईम हिट जोडी
The Sound of Music - नावातच सगळ काही आल.
A Streetcar Named Desire - मार्लन ब्रांन्डोचा एक अप्रतिम चित्रपट
On the Waterfront - पुन्हा एकदा मार्लन ब्रांन्डो...
Cast Away - टॉम हॅन्क्स चा जबरदस्त अभिनय
The Green Mile - मरणाची शिक्षा झालेल्या निगर ची कथा..
लिश्ट संपतच नाहीये.. . हिंदी/ मराठी अजुन बाकि आहेत... पण वेळे आभावी लिहु शकत नहिये.
सगळेच पठडीबाह्य चित्रपट नसतील ही पण आवर्जून बघण्यासारखे नक्की आहेत.
ह्या चित्रपटांबरोबर, मिथुन/ रजनी चे चित्रपट पण तितक्याच अवडीने पहणारा,
अमिगो
2 Sep 2008 - 12:51 pm | बबलु
ए ब्यूटीफूल मईंड : जॉन नॅश या नोबेल विजेत्या गणितज्ञावर. अप्रतिम चित्रपट.
ब्लड डायमंड : अफ्रिकेतील हिरे तस्करीचा धागा पकडून बनवलेला जबरी चित्रपट. तूफान वेग.
द ट्रूमन शो : जीम कॅरी चा अतिशय वेगळ्या विषयावरील चित्रपट. विषय सांगत नाही. पहा मात्र जरूर.
फॉरेस्ट गंप : अधिक काय बोलू ?
सुपर सईझ मी : महिनाभर रोज मॅकडोनाल्ड चे बर्गर खाल्ले तर ??
एट बीलो (Eight Below) : अंटार्क्टीका वर अडकलेल्या ८ कुत्र्यांवरील अप्रतिम चित्रपट. (सत्यघटनेवर...).
लिटल मिस सनशाईन : अधिक काय सांगणार ?
ओल्ड बॉय (कोरीयन) : जबराट धक्का आहे. मेंदूला झिणझिण्या.
.........अजून बरेच आहेत. पुन्हा केव्हातरी..सविस्तर.
....बबलु-अमेरिकन
2 Sep 2008 - 3:51 pm | डोमकावळा
१. पर्स्यूट ऑफ हॅपीनेस
२. मेन ऑफ ऑनर
३. लाईफ इज ब्युटीफूल
४. मिलीयन डॉलर बेबी
५. द टर्मिनल
६. द शोशँक्स रिडम्पशन
७ .द इल्यूजनीस्ट
८. सायलेंस ऑफ लँब्स
९. सेव्हन
१०. एल. ए. कॉन्फिडेंशियल
११. अ ब्युटीफूल माईंड
2 Sep 2008 - 8:54 pm | संदीप चित्रे
शॉ शॅन्क रिडम्प्शन
टिम रॉबिन्सन आणि मॉर्गन फ्रीमनचा नितांत सुरेख चित्रपट. खुनाचा आरोप असलेला टिम रॉबिन्स ! अभेद्य सुरक्षा असलेल्या तुरूंगातून (मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन) पळून जायचे प्रयत्न करतो ती सगळी धडपड.
---------------
अपोलो १३
फसलेली चांद्रमोहीम. The mission was thus called a "Successful Failure".
चित्रपटातलं एक अजरामर वाक्य -- 'ह्यूस्टन ! वुई हॅव ए प्रॉब्लेम !!'
---------------
'दि निगोशिएटर'
सॅम्युएल एल. जॅकसन आणि केविन स्पेसीचा अल्टिमेट सिनेमा. पोलिस खात्यात नोकरी करणारा जॅकसन. पोलिसांच्या प्रॉव्हिडंट फंडच्या पैशांची अफरातफर आणि एका पोलिसाचा खून अशा आरोपात अडकतो. संतापाने पेटून तो एका इमारतीतील ३-४ जणांना ओलिस ठेवतो. मागणी एकच -- मी फक्त केव्हिन स्पेसीबरोबर बोलेन. केव्हिन स्पेसी कोण? तर एक प्रोफेशनल निगोशिएटर !! तणावपूर्ण परिस्थितीखाली त्या दोघांच्या संवादांतून उलगडत जाणारा चित्रपट आणि रहस्य !
अजरामर वाक्य 'जेव्हा ओळखीचे लोक दगा देतात तेव्हा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवावा लागतो'
(जर खिशात पैसे असतील तर आमीर खान आणि अमिताभ बच्चनला घेऊन (अनुक्रमे जॅकसन आणि स्पेसीच्या रोलमधे) हा सिनेमा हिंदीत काढेन म्हणतो !)
--------------
'हजारों ख्वाईशें ऐसी'
के. के. मेनन, शायनी आहुजा (पहिला सिनेमा) आणि चित्रंगदा सिंग (पहिला सिनेमा).
जरूर जरूर बघा ... जर शांतपणे बसून सेन्सिबल सिनेमा पाहू शकत असाल तर !
-------------------
'कौन'
रामूचा एक खरंच चांगला सिनेमा आणि उर्मिलाचा एक खरंच चांगला अभिनय असलेला सिनेमा.
-------------------
'खाकी, 'देव', 'अक्स', 'ब्लॅक' आणि 'आँखें' (अमिताभचे)
बच्चन फॅन्ससाठी ट्रीट !
-------------------
लिस्ट अजून मोठी आहे यार... एकदा निवांत बसूया :)
3 Sep 2008 - 2:07 am | अभिज्ञ
तेहरान मधील ७ वर्षाची एक लहान मुलगी.
आई कडे हट्ट करून मिळालेल्या पैशातून नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला "गोल्डफिश" घेण्यासाठी बाजारात जाते.
बाजारात तिचे पैशे हरवणे,परत मिळुन ते पुन्हा एका गटारात पडणे,
पैशे हरवल्याने झालेली त्या मुलीची घालमेल,ते काढण्यासाठी त्या मुलीने व तिच्या भावाने केलेली धडपड,
ते करत असताना त्यांना रस्त्यावर भेटणारे लोक,एक सैनिक व शेवटी त्या पैशाचे काय होते? ह्या सर्वांकरिता हा
चित्रपट आवर्जुन पहावा.
अतिशय साधी वाटणारी हि कथा ७ वर्षाच्या चिमुरडीच्या अफलातुन अभिनयाने त्याच बरोबर पदार्पणातच जाफर पनाहि ह्याचे अप्रतिम दिग्दर्शन ह्याने जबरदस्त झालीय.
विविध चित्रपट महोत्सवात गाजलेला हा चित्रपट.
चित्रपटाला मिळालेले विविध सन्मान.
Prix de la Camera d'Or, Cannes Film Festival, 1995
Gold Award, Tokyo International Film Festival, 1995
Best International Film, Sudbury Cinéfest, 1995
International Jury Award, São Paulo International Film Festival, 1995
(सौजन्य : http://en.wikipedia.org/wiki/White_Balloon#Awards_and_Honours)
टीप: मुळ चित्रपट हा इराणी भाषेत असून इंग्रजी सबटायटल्स सह बघता येतो.
सध्या युटिव्हि मुव्हीज ह्या वाहिनी द्वारे भारतात दाखवला जातोय. चित्रपट चुकवु नये असाच.
अभिज्ञ.
3 Sep 2008 - 3:30 am | एक
नावाचा एक सी ग्रेड हॉरर पिक्चर आम्ही चूकून बघितला.
चित्रपटाचा विषय जरा विचीत्र आहे. युरोपमधल्या कुठल्यातरी खेड्यात एक इंडस्ट्री आहे. त्या ईंडस्ट्रीचे अनेक श्रीमंत लोक सभासद आहेत. ही संस्था अश्या सभासदांना एक अंधारी खोली, एक माणूस आणि त्या सभासदाला हवी ती सामुग्री, उदा. चिमटा, चाकू, ड्रील मशीन वगैरे या गोष्टी पुरवते. उद्देश- तो सभासद त्या माणसाशी तो माणूस मरे पर्यंत हवं ते करू शकतो. अगदी हवं ते. नो लिमिट्स.
अर्थात हा सिनेमा मी परत बघणार नाही. पण याच्या दिग्दर्शकाचं, कॅमेरामन च कौतूक वाटल्याशिवाय रहात नाही. चित्रपटात वापरलेली रंगसंगती (उदास छटा असलेली काळी-पांढरी, राखाडी हिरव्यारंगाची), कॅमेरा अँगल्स आणि कलाकारांचा अभिनय, प्रेक्षणीय.
हे सगळं सिनेमातलं आहे, खोटं आहे असं माहित असूनसुद्धा मन सुन्न होतं. त्यादिवशी पहिल्यांदा मी एका सिनेमामुळे टरकलो आणि झोपायच्या आधी देवासमोर बसलो होतो.
यातलं एक वाक्य आवडलं..तिकडे एक नियमीत जाणारा सभासद म्हणत असतो.
" माणसाच्या मनात पाशवी-शिकारी प्रवृत्ती पुर्वी पासूनच आहेत. सिव्हीलायझेशन मुळे म्हणा किंवा संधी मिळत नाही म्हणून म्हणा त्या प्रवृत्ती डोकं वर काढत नाहीत. पण त्या कायमच्या गेल्या नाही आहेत. समजा तुम्हाला अशी संधी मिळाली तर तुम्हाला गॅरेंटी आहे कि तुमच्या पाशवी वृत्ती डोकं वर काढणार नाहीत?.."
3 Sep 2008 - 9:30 am | अमेयहसमनीस
"सेविंग दी प्रायवेट रायन"
3 Sep 2008 - 9:53 am | जैनाचं कार्ट (not verified)
१. सुरज का सातवा घोडा
२. गोलमाल
३. जुमांजी
४. अर्मागादन
५. मास्क - अफलातून कॉमेडी
६. ब्रुस अलमेटी
७. होस्टेज
९. स्पीड १-२
१०. बोन कलेटर - नितांत सुंदर पोलिसपट... खास करुन जोलीची भुमीका जबरदस्त
११. इंटर द ड्रागन - ब्रुसली पट
१२. पुष्पक - कमल हसन ...
१४. सदमा - चित्रपट अनेक वेळा पाहीला व नेहमी शेवटाला रडलो आहे.. कमल हसन चा सर्वोच्च अभिनय शेवट्या काही मिनिटामध्येच
१५. किल बील - भाग १ व दोन. जबरदस्त चित्रपट .. उमा साठीतर पहावाच असा !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
3 Sep 2008 - 11:23 am | अभिरत भिरभि-या
सगळ्यांनी इतके भरभरुन लिहिलेय..सध्या आम्ही याची http://www.bigflix.com/ मेंबरशिप घेतली आहे.
महिनाभर मनसोक्त चित्रपट बघता येतिल म्हणून. पण काय बघावे हा प्रश्न पडला होता ..
उत्तरासाठी आधी गुगलूनही बघितले..मिसळपाव इतकी चांगली उत्तरे नव्हती मिळाली ..
सगळ्यांना धन्यु :)
4 Sep 2008 - 1:39 pm | झकासराव
सायको (१९६०)
दिग्दर्शक-अल्फ्रेड हिचकॉक.
खुप दिवस पहायचा आहे अस मनात ठरवलेला चित्रपट. मागच्या आठवड्यात पहायला मिळाला. मस्तच आहे.
कॅमेरा असा जबरदस्त फिरलाय की बास.
पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगात कॅमेर्याने उभा केलेला ताण वाढवत नेतं.
चित्रपटाचे प्रत्येक फ्रेम अगदी मस्त आहे. गुढपणा वाढवणारी.
लॉन्ग शॉट आणि क्लोज शॉट यांचा वापर खुपच छान केला आहे.
फक्त हा चित्रपट पाहताना आजुबाजुला नीरव शांतता हवी. कसलाही डिस्टर्बन्स नको. मग जास्त मजा येते.
ह्या फिल्मच्या प्रेमात अनेक लोक पडले आहेत अस दिसत.
कारण ह्याच नावाची आणि प्रत्येक फ्रेम अन फ्रेम तीच असलेली एक फिल्म येवुन गेली आहे. ती कलर मध्ये.
मी दोन्ही पाहिल्या आहेत. मला ब्लॅक ऍन्ड व्हाइटच जास्त आवडला.
ह्याच फिल्म मध्ये "नॉर्मन बॅट्स" ची व्यक्तीरेखा केलेल्या ऍन्थनी पार्किनसन्स ने ह्याच फिल्मचे पुढचे दोन भाग बनवले ते ही तब्बल २२ वर्षानी.
बहुतेक दोन्ही फिल्म च्या डायरेक्टर तोच असावा.
नक्की पहा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
4 Sep 2008 - 1:55 pm | झकासराव
अरे हो..
अजुन फिल्म आठवली.
द डिपार्टेड.
बहुतेक २००६ चीच असेल.
लिओ नार्दो (टायटेनिक) वाला आहे त्यात.
जबरदस्त वेगवान कथा, उत्कृष्ठ पटकथा.
आपल्या समोर एक जबरदस्त गेम उलगडत जातो.
चित्रपटाचा वेग जबरदस्तच आहे.
हा ही अगदि नक्की बघाच अशा कॅटेगरीतला चित्रपट आहे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
4 Sep 2008 - 5:36 pm | श्रीमंत दामोदर पंत
कास्ट अवे- टॉम हॅन्क्स चा अतिशय सुंदर अभिनय........
ए ब्यूटीफूल मईंड : जॉन नॅश या नोबेल विजेत्या गणितज्ञावर. अप्रतिम चित्रपट
गॉड फादर - ऑल टाईम फेवरीट मुव्ही..........
मराठी मधे : -
सिंहासन.......
सामना..........
सरकारनामा............
हिंदी मधे : -
तारे जमीन पर...
खूप मोठी आहे लिस्ट...........
4 Sep 2008 - 6:14 pm | अभिरत भिरभि-या
enemy at the gates:
दुस-या महायुद्धातील एक महत्वाचे प्रकरण म्हणजे स्तालीन्ग्रडची लढाई.हिटलरच्या जर्मनीने जेव्हा रशियावर हल्ला पुकारला; तेव्हा रशियाची सुरवातीला पिछएहाट झाली.होता होता लढाई स्तालीन्ग्रडला भिडली. हुकुमशाहा स्तालीनचे नाव सांगणारे हे शहर रशिया व जर्मनी दोन्हिसाठी महत्वाचे होते. कारण या शहरातील उद्योगधंदे , स्थान व नाव.
रशियन सैनिकांकडे हत्यारे तुटपुंजी होती. मिळाला तर दारुगोळा, बंदुका नाहितर तशीच लढाई अशी अवस्था.
अशाच एका वास्सिलि जेत्सेव नावाची सैनिकाची ही कहाणी. वासिलीची बहादुरी, फुलणारे प्रेम, जागोजागचा मृत्यु, त्याला मिळालेली प्रसिद्धी , कम्युनिस्टी क्रुर राज-कारण, रशियनॉही गुप्तहेरीतील सजगता अशा अनेक गोष्टी हा चित्रपट टिपत जातो.
The terminal:
अप्रतिम सिनेमा. परदेशात प्रवेश करताना मनुष्याला सोबत लागतो तो त्याच्या देशाचा पासपोर्ट.
जर यादवीमुळे देशा कोसळला तर? पासपोर्टला मग काहीही अर्थ उरत नाही. अमेरिकेतल्या एका विमानतळवर उतरलेल्या एका माणूस असाच "निर्देश" होतो. म्हणुन विसा असुनही त्याला अमेरिकेत जाण्यात मज्जाव केला जातो. यादवीमुळे परतीचे दरवाजे बंद. मग विमानतळच याचे घर बनते.
ही ब्याद नको असलेला विमानतळावरचा प्रमुख आधिकारी त्याला अटक करवण्याचे जे नाना यत्न करतो आणि हा या सा-याला कसा पुरुन उरतो हि मध्यवर्ती कथा.
4 Sep 2008 - 7:44 pm | ऋषिकेश
मला वाटलेले पठडीबाह्य तरीही आवर्जून बघण्यासारखे चित्रपट इथे वाचता येतील.
त्यानंतरही बरेच पाहिले पण त्याची यादी नंतर देतो.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
5 Sep 2008 - 4:16 am | अंतु बर्वा
Vantage Point... सहा जणाचा अनुभव एकाच घटनेबद्दाल............
5 Sep 2008 - 8:04 pm | केशवराव
१९७० च्या सुमारास हा चित्रपट पाहिला होता. युध्द पटात मानवी भावना अप्रतीम दाखविल्या होत्या. माणूस माणसाला मारत असताना त्याच्यातील माणूसकिही दिसत असते. शत्रूपक्षाचे दोन सैनीक जबर जखमी होऊन पडलेले असताना एकाला सिगारेटची तलफ येते. त्याच्याकडे सिगारेट असते, पण माचीस नसते. तो सिगारेट तोंडात धरतो. तेवढ्यात समोरचा जखमी सैनिक त्याच्यासमोर मचिस शिलगावून धरतो.
कास्टिंग, डायरेक्टर वगैरे काहिच आठवत नाही. पिक्चर मात्र मनात घर करून राहीला होता.
6 Sep 2008 - 4:06 pm | सचीन जी
>> मैं आझाद हूं हा अमिताभच्या ऑल टाइम क्लासिक्समधला एक अगदी वेगळा चित्रपट आहे.
कोणीतरी "मैं आझाद हूं " बद्दल लिहलं आहे!
मैं आझाद हूं हा हॉलिवुडच्या "मीट जॉन डो" ची सही सही नक्कल आहे. नाहीतर "शहेनशहा" आणि "कालिया" सारखे टुकार चित्रपटवाल्या टीनु आनंदने कधी इतका चांगला चित्रपट बनवावा.
7 Sep 2008 - 12:46 pm | मन
ची कॉपी काय? बरयं बरयं.
आता ओरिजनल येकदा बघावाच लागणार.
आणि माझ्या आठवणीप्रमाणं "मै आझाद हूं" हा टिनु आनंद चा नसुन केतन मेहता चा आहे.
आपलाच,
मनोबा
6 Sep 2008 - 4:12 pm | सचीन जी
खुप वर्षांपुर्वी दुरदर्शन वर मराठि "अपराध" नावाचा सिनेमा पाहिला होता.
मला वाटतं सचीन पिळगावकरांच्या वडीलांचा असावा.
काळाच्या कितितरी पुढचा चित्रपट! "सुर तेची छेडिता" सारखे अप्रतिम गाणे आजही लक्षात आहे.
कोणाला अजुन काही माहीति आहे का हो या चित्रपटाबद्दल?
6 Sep 2008 - 4:21 pm | मिंटी
अलाईव........
मी पाहिलेला एक खुप सुंदर चित्रपट.......
अँडीज पर्वतावर विमान कोसळल्यानंतर त्यातले जे लोक वाचले त्यांनी तिथे ७० दिवस कसे घालवले यावर आहे हा चित्रपट.....
सेवेंटी डेज या पुस्तकावरुन काढलेला चित्रपट......
मला वाटतं ही सत्य घटना पण आहे.
या व्यतिरीक्त
कास्ट अवे.....
ब्युटीफुल माईंड्......
गॉड फादर्.......
तारे जमीन पर्......
सदमा......
सरकारनामा....
वजीर....
सामना.....
सिंहासन......
7 Sep 2008 - 1:22 pm | देवदत्त
मिरॅकल ऑन ३४थ स्ट्रीटः
एका मोठ्या दुकानात सांताक्लॉज म्हणून काम करत असलेल्या माणसाला, तो स्वतः सांताक्लॉज असल्याचे सांगितल्या कारणाने मनोरूग्णालयात दाखल करतात. पण पुढे तोच सांताक्लॉज असल्याचे ज्या प्रमाणे न्यायालयात ठरविले जाते, त्यावरील हा चित्रपट.
खूप आधी स्टार मूवीज वर हा कृष्ण-धवल सिनेमा पाहिला होता. तेव्हा खूप आवडला. २००६ मध्ये त्याची व्हीसीडी शोधण्याचा प्रयत्न केला. पण जुना सिनेमा नाही मिळाला. पण त्याच्या रिमेक चित्रपटाची सी.डी. मागविली. पण दोन्ही चित्रपटात सांताक्लॉज असल्याचे ज्या प्रकारे साबित( हा मराठी शब्दच आहे का?) केले जाते, त्यात फार तफावत आहे. जुना सिनेमा जास्त आवडला मला.
द फॅन्टॅस्टिक व्हॉयेजः
एका माणसाच्या मेंदूतील रक्ताची गुठळी काढण्याकरीता ४/५ डॉक्टरांच्या एका गटाला पाणबूडीत बसवून तिला सुक्ष्म करतात व त्या रुग्णाच्या शरीरात घुसवतात. त्या लोकांचा मेंदूपर्यंतचा प्रवास ह्या सिनेमात दाखवला आहे.
10 Sep 2008 - 1:48 am | धनंजय
या चित्रपटाची नायिका ही स्त्री एका मोठ्या दुकानात व्यवस्थापक असते, जरा अतीच रोखठोक असते. आपल्या लहान मुलीला कुठल्याही चमत्कारावर विश्वास ठेवायला मनाई करते. त्यामुळे लहान मुलीत बालसुलभ गोडपणा कमी होऊन एका प्रकारचा कडवटपणा येऊ लागलेला असतो. या सांता-क्लॉजच्या खटल्याच्या अनुषंगाने नायक या करियर-वुमनला हळवी, गृहवत्सल बनवतो, आणि लहान मुलीमध्ये पुन्हा चमत्कारांबद्दल विश्वास जागवतो.
सडेतोड करियर स्त्रिया शुष्क असतात, वास्तववादी विचार करणार्यांना स्वप्नरंजन करण्याइतपत कल्पनाशक्ती नसते, ते नीरस असतात, आणि लहान मुलांचे सुख घालवतात. चांगला पुरुष सापडला तर अशा शुष्क स्त्रीचीही देवी होऊ शकते, असे या चित्रपटाच्या कथेतून निष्पन्न होते.
हा चित्रपट १९४७ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला. दुसर्या महायुद्धाच्या काळात तरुण पुरुष परदेशी युद्धासाठी गेले, आणि स्त्रियांना रोजीरोटीसाठी घरातून बाहेर पडावे लागले. दुसरे महायुद्ध संपले, तरुण पुरुष यू.एस.मध्ये परत आलेत. नोकरी करणार्या आर्थिक-मुक्त स्त्रियांनी भरलेला समाज बघून त्यांचा मोठा गोंधळ झाला. हे मुक्त-करियर-स्त्रीचे भूत पुन्हा गृहदेवतेत कसे बदलायचे? या विचारधारेतून हा चित्रपट तयार झालेला दिसतो. अगदी आजपर्यंतही अशी मनोवृत्ती दिसते. उद्योगधंद्याच्या जगात महत्त्वाकांक्षा असलेल्या स्त्रिया कित्येकदा शुष्क-मातृत्व आणि सत्तेसाठी वखवखलेल्या दाखवतात.
स्त्रीमुक्तीची आणि वास्तववादी विचारसरणीची बालवत्सल आव आणून इतकी गोंडस, लोभस, चीरफाड करणारा "मिरॅकल ऑन ३४थ स्ट्रीट" हा माझ्या नावडत्या चित्रपटांपैकी एक आहे.
सांता-क्लॉज-सिद्धीतून वास्तववादाच्या नालस्तीचा वारसा (वास्तववाद=कल्पनाशून्यता+भावनाशुष्कपणा हा विचार), हल्लीच्या 'पोलर एक्स्प्रेस' या चित्रपटाने पुढे चालवला आहे. मात्र 'पोलर एक्स्प्रेस' स्त्रीमुक्तीबाबत 'पोलिटिकली करेक्ट' राहातो.
(फँटॅस्टिक व्हॉयेज मोठा गमतीदार चित्रपट आहे - आवडला! वास्तववाद मानूनसुद्धा कल्पनारम्य चित्रपटातून आनंद मिळवता येतो!)
7 Sep 2008 - 3:41 pm | मैत्र
अनेक उत्तम चित्रपटांचा वर उल्लेख झाला आहे त्यामुळे पुनरावॄत्ती टाळतो आहे.
नुकताच एट बिलो (Eight Below) हा चित्रपट पाहिला. अगदी वेगळा विषय, उत्तम मांडणी, जबरदस्त छायाचित्रण यासाठी जरूर पहावा.
अंटार्टिकाशी संबंधित आहे... विषय सांगितला तर मजा जाईल पण जरुर एक वेगळा चित्रपट म्हणून पहा.
बरंच काही न सांगता शिकवून जाणारा .. त्यामानाने कमी संवाद आहेत.
9 Sep 2008 - 5:26 pm | सचीन जी
>> आणि माझ्या आठवणीप्रमाणं "मै आझाद हूं" हा टिनु आनंद चा नसुन केतन मेहता चा आहे.
नाही! "मै आजाद हु" हा टिनु आनंदचाच चित्रपट आहे. १०० % खात्रीने!
बाकी श्रेय नामावली -
कलाकार - अमिताभ, शबाना, अन्नु कपुर
संगीत - अमर - उत्पल (तेच ते अनील - विश्वासचे चिरंजिव)
10 Sep 2008 - 4:47 am | स्वप्निल..
हा मागच्या आठवड्यात आलेला चित्रपट..मला आवडला..एक वेगळा आणि बोअर न करणारा वाटला..नाहीतर मी हींदी चित्रपट बघने सोडले होते..
स्वप्निल..
30 Nov 2009 - 11:18 am | दिपक
पोस्टमन इन द माऊंटन हा चित्रपट काल पाहिला. आवर्जून बघण्यासारखा आहेच. विलोभनीय निसर्ग आणि बॅकग्राउंड मध्ये वाजणारे हळूवार संगीत. एक अप्रतीम चित्रपट पाहण्याचा आनंद जरूर घ्या.
30 Nov 2009 - 4:19 pm | गणपा
१९९५ साली आलेला अ लिट्टील प्रिंसेस (A Little princes ) कुठे मिळाला तर जरुर पहा....
परिकथे सारखी गोष्ट आहे.. लिसेल मॅथ्युस ने साकारलेली साराची भुमीका खुप आवडली होती.
30 Nov 2009 - 8:07 pm | JAGOMOHANPYARE
आस्तित्व
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
30 Nov 2009 - 8:45 pm | संग्राम
मला आवडलेले काही .....
- द ब्रिज ऑन रिवर क्वाइ
- independence day - ऑल टाइम फेवरेट ... स्पेशली Mr President cha bhashan[मोटिवेशनल स्पीच]
- The Pursuit of Happyness
- Troy
- cast away
- the terminal
- twist of fate - हा मी हिस्ट्री चॅनेलवर पाहिला होता ...
एक जर्मन ऑफिसर, ज्यू लोकांना मारल्याची शिक्षा होउ नये म्हनुन प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतो आणि इस्त्रायल स्वतंत्र झाल्यावर तिथे जातो ... तिथला आर्मी चा हेड बनतो वगैरे ... छान होता सिनेमा
- एक लहान मुलांचा सिनेमा पाहीला होता एच बी ओ वर ....
त्यांची गँग असते ...क्लुब हाउस असते .. कार रेस ... अल्फा अल्फा अस काही तरी नाव असत हीरोच ... फार सुंदर आहे ...
बाकी बरेच आहेत ... आठवेल तस टंकतो ....
30 Nov 2009 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी
carry on series...कॅरी ऑन डॉक्टर पासुन हि सेरीज सुरु झाले..खुप धमाल विनोदि अश्या १३ सेरियल्स पहिल्या..निखळ खळखळुन हसवणारा विनोद...२ घटका करमणुक..मला यातले सारे सिनेमे आवडले..मजा आली पहायला...
From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" />
==============================
From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" />
30 Nov 2009 - 9:18 pm | उपास
वरील चित्रपटांच्या यादीत हे दोन दिसले नाहीत, आश्चर्य वाटले :)
१. कासाब्लँका - ह्यातले डायलॉग काय आहेत महाराजा..
२. फेस ऑफ - ज ह ब ह री ही..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
30 Nov 2009 - 9:31 pm | jaypal
७ ईयर्स इन तिबेट
school of life
bad company
spirit(animation film)
spy game
lion king (part 1&2)
iceage (animation film)
अजुन खुप आहेत
30 Nov 2009 - 9:53 pm | गणपा
निखळ मनोरंजना साठी गॉड मस्ट बी क्रेझी भाग १ (1980) आणि २ (1989) नक्की पहा..
केवळ अफलातुन चित्रपट आहे.. भाग ३ मात्र एकदम वाया घालवलाय..
3 Mar 2010 - 5:43 am | शुचि
मला मनस्वी अवडलेला चित्रपट = CHOCOLAT (शकोला)
एका फ्रेंच खेड्यामध्ये एक जिप्सी स्त्री तिच्या लहान मुलीसोबत येते. आणि चॉकलेट्चं दुकान टाकते. या खेड्यातील लोकं अतिशय संकुचित विचारसरणीचे आणि suppressed असे दाखविलेले आहेत. या चॉकलेट्मुळे हळूहळू तेथील लोकांची inhibitions कशी दूर होतात आणि ते लोक कसे त्या स्त्रीला आणि मुलीला आपलसं करतात ते उलगडणारा हा सिनेमा.
या चित्रपटात व्यक्तीरेखा इतक्या सुरेख आणि बारकाव्यांनी फुलविल्या आहेत. प्रेम आणि उत्कटता तसच मानसशास्त्रीय बारकावे हे या चित्रपटचे माझ्या तरी मते वैशिष्ट्य.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)