विनम्र आवाहन..

मिसळपाव पंचायत समिती's picture
मिसळपाव पंचायत समिती in काथ्याकूट
15 Sep 2007 - 8:07 am
गाभा: 

राम राम मंडळी,

येथील सभासदत्व घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही आपणा सर्वांचे मिसळपाव या आपल्या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत करत आहोत.

या संकेतस्थ़ळाच्या मांडणीबद्दल, येथील सोयींबद्दल, त्रुटींबदल आपण इथे अवश्य लिहावे ही विनंती!

हे संकेतस्थळ नव्यानेच स्थापन झालेले असून इथे काही तांत्रिक त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तरी कृपया त्या त्रुटी आपण या काथ्याकुटात दाखवून द्याव्यात व शक्य असल्यास काही उपायही सुचवावेत ही नम्र विनंती. आपण दाखवून दिलेल्या त्रुटींवर आमच्या परिने लवकरात लवकर उपाय शोधण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू!

कळावे,
आपले नम्र,

मिसळपाव पंचायत समिती,
मिसळपाव ग्रामपंचायत.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2007 - 7:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३) ज्या लेखाला प्रतिसाद दिला आहे तो लेख वरवर सरकत जातो,त्याचीजागा बदलू नये असे वाटते.
४) चर्चेतील प्रतिसादांना अक्ष्रराला रंग देता यावा तो टूल बार दिसत नाही ?
५)सदस्याच्या नावापासून पुढे (खरडवही ते गमन) आणि हजर सभासदांची नावे निळा रंग प्रयोग म्हणून करुन पाहिला तर जमेल का ?

सरपंच's picture

15 Sep 2007 - 10:08 am | सरपंच

लक्षात आलेल्या चुका बरोबर केल्यावर दिलेला प्रतिसाद अप्रकाशित केला जाईल. गैरसमज नको. ;)

चित्रा's picture

18 Sep 2007 - 8:22 am | चित्रा

मी जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये मिसळपाव बघते, तेव्हा प्रतिसाद बघताना कधीकधी आडवे स्क्रोल करावे लागते, वाक्ये दर्शनी भागाच्या पुढे जातात. हे न होता त्याची रूंदी (width ) निश्चित केल्यास ते चांगले दिसेल आणि सोयीचे जाईल.

३) ज्या लेखाला प्रतिसाद दिला आहे तो लेख वरवर सरकत जातो,त्याची जागा बदलू नये असे वाटते.
हे बिरूटेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणेच.

सहज's picture

18 Sep 2007 - 8:43 am | सहज

>>आडवे स्क्रोल करावे लागते

अगदी क्वचीत असे होते व ते कसे ते पण सांगतो. उदा. विकास आराखडा जर का मूळ लेखात कोणी मोठे चित्र टाकले तर मूळातच ते मॉठे होते म्हणजे आडवे स्क्रोल करावे लागते मग त्या अनुषंगाने खालील. सगळ्याच इतर मधे असे नाही करावे लागत, बरोबर? सगळ्यात तसे होत असेल तर आपल्या इंटरनेट एक्सप्लोरर जरा काही तरी सेटींग बघावे. कदाचीत नीलकांत जास्त सोपा उपाय सांगेल

>>तो लेख वरवर सरकत जातो

मला हा प्रकार आवडतो, म्हणजे स्क्रोल न करता लेटेस्ट चर्चा कूठे आलि ते कळते. सॉर्ट बाय "अंतीम (बरेचदा प्रतीसाद)लेखन" हे सेटींग आहे. बघ बूवा नीलकांत इतर लोकांनापण वाटले तर कर बदल म्हणजे सॉर्ट बाय लेटेस्ट "अंतीम मूळ लेखन"

बाकी गूड जॉब नीलकांत टेक इट इझी.

सरपंच's picture

18 Sep 2007 - 8:24 pm | सरपंच

१)संकेतस्थळाची आडवी स्थानमर्यादा अंकात बांधलेली नाहिये. त्याला तांत्रीक भाषेत लिक्वीड सीएसएस असे म्हणतात. ही स्टाईलशीट संगणकाच्या रिझोल्युशन प्रमाणे स्वतःला तडजोड करते.
त्याचा फायदा हा की कमी रिजोल्युशनच्या संगणकावर सुध्दा संकेतस्थळ सरासरीने छान दिसतं. जास्त रिझोल्युशन मधे तर उत्तम दिसतंच. सध्या हे संकेतस्थळ 1024x768 या मधे उत्तम दिसतं.

२) लेखाला प्रतिसाद दिल्या गेला की तो लेख वर यावा म्हणजे नव्या प्रतिसादांसाठी वेगळी कळ द्यावी लागणार नाही आणि जे लेखन जुनं असूनही जिवंत आहे ते तात्काळ लोकांसमोर येईल . ही या लेखांच्या सरकत्या जागे मागची प्रेरणा.

- मिसळपावच्या कार्यशैली प्रमाणे , जर लोकांनी ही नवी पध्दत नको असं नोंदवल्यास तसे बदल केल्या जातील. पण लोकांना हे का आवडत नाहिये ते तर कळू द्या !

चित्रा's picture

22 Sep 2007 - 12:42 am | चित्रा

लिक्वीड सीएसएस बद्दल कळले.

पण लोकांना हे का आवडत नाहिये ते तर कळू द्या !

तुमचा मुद्दा पटला. पण आत्ताच असे झाले की सगळ्या नव्या लेखनाच्या यादीतून हाच लेख शोधायला वेळ लागला (तो खाली गेल्याने). अर्थात याला workaround आहे की जुन्या लेखाचा keyword देऊन "शोध" कदाचित घेता येईल, पण त्यासाठी शोध येथे पाहिजे.

असो. तुमचे काम वाढवण्याचा हेतू नाही - झालंच तर मदत होईल ही दृष्टी.

नीलकांत's picture

22 Sep 2007 - 11:16 am | नीलकांत

वरच्या समासात उजव्या बाजूला एक मेन्यु दिलेला आहे. त्यात लेख, चर्चा , काव्य अशी विभागणी आहे आणि त्यात लेख 'नवीन वर - जूना खाली' या पध्दतीने आहेत. तेथे प्रतिक्रिया दिली तरीही लेखाची जागा बदलत नाही. एखादा लेख तेथे शोधता येईल.

थोड्याच दिवसात शोध सुविधा देता येईल.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:15 am | सर्किट (not verified)

तात्या,

आपण आधी कबूल केल्याप्रमाणे सध्याच्या चालक नियुक्त पंचायत समितीची नावे जाहीर करावी.
एकदा लोकनियुक्त पंचायत झाली, की मग ती नावे जाहीर असतीलच.

- सर्किट

कोलबेर's picture

18 Sep 2007 - 9:40 am | कोलबेर

तात्या नावे जाहीर करतीलच.. पण तात्यांच्या आज दुपारीच आलेल्या व्यं. नि. ला मान देउन आम्ही पंचायत समितीचे सदस्यत्व "तात्पुरते" स्विकारले आहे. रसिक सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी आणि तात्यांनी हे स्थळ स्थिर स्थावर झाले आहे असे वाटल्यास लवकरात लवकर निवडणुका घ्यावात.
-वरूण वैद्य (सभासद नाम -कोलबेर)
----------------------------------------------------------------------------
मिसळ पाव हाटेलाला पडदा नाही प्रत्येक सभासदाला मुदपाकखान्यात डोकावून बघता येते.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:43 am | सर्किट (not verified)

जियो, वरुण, जियो !!!!

- सर्किट

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 9:42 am | आजानुकर्ण

तात्पुरते उपसंपादक आहोत.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:46 am | सर्किट (not verified)

ह्या पूर्वी एका संचालकाला आम्ही "संपादकांची नावे जाहीर करावीत" अशा केलेल्या जाहीर विनंतीला संपादकांची जाहीर उत्तरे आली नाहीतच, पण संचालकांचे "संपादक मंडळाला आपली नावे जाहीर न करता अधीक चांगले काम करता येईल असे वाटते" असे खाजगी उत्तर आले होते. त्या पार्श्वभूमीवर येथील दोन पंचायत सदस्याम्ची जाहीर उत्तरे आलेली पाहून आम्हाला संतोष झाला.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 6:15 pm | विसोबा खेचर

एकदा आपल्या दैनंदिन कामांतून थोडी सवड काढून सदर प्रस्तावात मंडळींनी केलेल्या तक्रारींचेही निराकरण करा अशी आपल्या नम्र विनंती... :)

आपलाच,
तात्या.

नीलकांत's picture

18 Sep 2007 - 8:08 pm | नीलकांत

तात्यांच्या व्यं. नि. ला मान देउन आम्ही पंचायत समितीचे सदस्यत्व "तात्पुरते" स्विकारले आहे. रसिक सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी आणि तात्यांनी हे स्थळ स्थिर स्थावर झाले आहे असे वाटल्यास लवकरात लवकर निवडणुका घ्यावात.

नीलकांत.

कोलबेर's picture

19 Sep 2007 - 12:00 am | कोलबेर

मिसळपावर येणार्‍या लेखनाचा ओघ बघता गद्य आणि पद्य असे स्वतंत्र विभाग सुरू करणे नजिकच्या काळात शक्य आहे का?

नीलकांत's picture

21 Sep 2007 - 10:40 am | नीलकांत

वरच्या समासात उजव्या बाजूला लेख, चर्चा , काव्य आदींची वेगळी सारणी आहे. त्याचा लाभ घ्यावा.

आवडाबाई's picture

19 Sep 2007 - 1:25 pm | आवडाबाई

4 मिनीटे 33 सेकंद "वेळ" आधी
असे दिसत आहे. ह्यातील "वेळ" हा शब्द out of place वाटतो.

अंक शक्यतो मराठीमध्येच असावेत. सध्या केवळ १ हा अंक मराठीमध्ये दिसतोय. त्याचप्रमाणे नवीन प्रतिसादासाठी "4 new" हे ही मराठीच हवे.

तसेच, येथे फक्त स्वगृह हा पर्याय उपलब्ध आहे, मुख्यप्रॄष्ठ ला कसे जायचे?

आवडाबाई's picture

19 Sep 2007 - 2:30 pm | आवडाबाई

मुख्यप्रॄष्ठ ला कसे जायचे?
ह्याचे उत्तर मिळाले !!

अरे वा, आता ईथे ठळक आणि तिरपे देखिल करता येऊ लागले !

प्रवासी's picture

19 Sep 2007 - 12:57 pm | प्रवासी

आदरणीय तात्यासाहेब, नीलकांतराव, कवी नीलहंस आणि मिसळपाव चमू,

नवीन संकेतस्थळाच्या शुभारंभाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! ह्या संकेतस्थळास हार्दिक शुभेच्छा.

आपला
(हर्षभरित) प्रवासी

जुना अभिजित's picture

19 Sep 2007 - 2:35 pm | जुना अभिजित

खरडवही मध्ये काढून टाका हा पर्याय शक्यतो उजव्या बाजूस असावा.

काही खेळांचे सॉप्टवेअर सोडले तर नकारात्मक गोष्टी उजवीकडे असतात. नो, डिलिट वगैरे.

भारतात मात्र 'डाव्यां'नी ती (नकारात्मक)आघाडी सांभाळली आहे.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ध्रुव's picture

21 Sep 2007 - 12:32 pm | ध्रुव

प्रवेश प्रतिबंधीत
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.

काही ठिकाणी असे का आहे?? अनेक गोष्टी अनेक ठिकाणी वाचता येतात. पण काही गोष्टी इतक्या अवाचनीय आहेत का??

ध्रुव

नीलकांत's picture

22 Sep 2007 - 11:25 am | नीलकांत

पाहूणे आणि सदस्य अशी ढोबळ विभागणी आहे. सदस्य नसलेल्या लोकांना मर्यादीत प्रवेश आहे. तुम्ही सदस्य म्हणून येण्याची नोंद केलेली असेल आणि एखाद्या दुसर्‍या खिडकीत जाण्याची नोंद केल्यास तुम्हाला सदस्याची मुभा नाहीशी होते. मात्र आधिक उघडलेल्या खिडकीत काही सदस्यांसाठी असलेले दूवे सक्रिय असू शकतात. आता सदस्य नसतांना तुम्ही जर त्यावर टिचकी मारलीत तर तुम्हाला वरचा संदेश दिसेल.
या उप्पर तुम्ही हा संदेश कुठे दिसला आणि त्यावेळी तुमचे वर्तमान (स्टेटस) काय होते? म्हणजे येण्याची नोंद केलेली होती? नव्हती , या बद्दल माहिती द्या. म्हणजे नेमके सांगता येईल.

ध्रुव's picture

27 Sep 2007 - 5:24 pm | ध्रुव

मी येण्याची नोंद केलेली होती हे नक्की, पण ते पान आता आठवत/सापडत नाही.
तसदीबद्दल माफी!
ध्रुव

उग्रसेन's picture

21 Sep 2007 - 2:02 pm | उग्रसेन

कॉप मेंबर म्हून मही नीवड करण्यात यावी ही इनंती.
२५ शब्दाचा चर्चा प्रस्तावासाठी पंचायती समीतीत ठराव घ्यावा.

चित्रा's picture

22 Sep 2007 - 12:30 am | चित्रा

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन्ही संख्या मुख्य पानावर दिसत आहेत. त्यातील मला वाटते एकाचीच गरज आहे.

उग्रसेन's picture

22 Sep 2007 - 2:28 pm | उग्रसेन

एडिटर मधील सुविधा फक्त खरडवहीतच दिसत आहेत. प्रतिसाद देताना हा 'टूलबार' दिसत नाही

मनिष's picture

27 Sep 2007 - 12:42 am | मनिष

ईंग्रजीमधे काही लिहायचे असल्यास कसे लिहायचे?

झकासराव's picture

27 Sep 2007 - 11:32 am | झकासराव

१) मी पाहिलेल्या आतापर्यंत साठवण्याची पद्धत ही मायबोलीवरची सर्वात चांगली आहे.
अशी पद्धत असेल तर खुप सोप जात जुणे लेख वाचणे किंवा ४-५ दिवसापुर्वीचे वाचणे ह्यासाठी. अशी पद्धत वापरता आली तर बरच आहे.
ह्याच त्रासामुळे (अर्थात हा फक्त मला वाटत असेल) मी मनोगतावर फक्त वाचक आहे. आणि फक्त नवीनच वाचु शकतो. जुणे शोधण त्रासदायक आहे तिकडे. म्हणुन मी तिकडे पडिक नसतो. मायबोलीवर मात्र मी पडीक असतो. मिसळ पाव वर पण पडिक व्हायला आवडेल :)
२) इन्ग्रजी लिहिण्यासाठी एखादा शॉर्ट कट हवा. प्रत्येक वेळी त्या ड्रॉप डाउन बॉक्स मधे जाण त्रासदायक होतय. त्यापेक्षा दोन किंवा तीन कि वापरुन शॉर्ट कट कधीही बरा.
३) इकडे काही लोक येवुन तमाशा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याना वॅटेज देवु नये आणि पर्सनली हल्ला तर अजिबात करु नये. याने नवीन लोकाना साइट विषयी गैरसमज होउ शकतात. :)
४) वेगवेगळे विभाग असावेत जसे की गद्य,पद्य्,ललित्,अनुभव असे. आणि ते मेन पेज वर दिसावेत.

असो सध्या तरी एवढच.. अजुन काही असेल तर सांगेनच. :)

मिसळ पाव आवडणारा झकासराव पाटिल :)

देवदत्त's picture

30 Oct 2007 - 11:38 pm | देवदत्त

मी जवळपास २ आठवड्यांनी मिसळपावचा सदस्य झालो. त्यात भरपूर लेख वाचायचे बाकी होते. इथे मला मागून सुरूवात करावी लागली.
काही लेख मी मधुनच निवडले. त्यात आता प्रत्येक प्रतिसादानंतर त्यांचा क्रम बदलतो.

असे काही करता येईल का जेणेकरून मी न वाचलेले किंवा एखादा प्रतिसाद न वाचलेले लेख वेगळ्या प्रकारे शोधून तेच मी एका मागोमाग वाचू शकेन?

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

नंदन's picture

31 Oct 2007 - 2:21 am | नंदन

असे जे टॅब्ज वरच्या उजव्या कोपर्‍यात आहेत, तेथील लेख/कवितांचा क्रम प्रतिसादांप्रमाणे वर-खाली होत नाही. हव्या त्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला कालानुक्रमे वाचन करता येईल.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त's picture

31 Oct 2007 - 8:01 am | देवदत्त

माझे म्हणणे होते की फक्त नवीन्/अद्ययावत लेख (जे मी वाचले नाहीत) शोधता येईल का?
जे टॅब्ज/दुवे वरच्या उजव्या कोपर्‍यात आहेत, त्यात फक्त लेखांची नावे दिसतात. परंतु कोणते नवीन आहेत किंवा कशात किती नवीन प्रतिसाद आहेत ते कळत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2007 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार,
आपले एक नवीन मिसळपाव सदस्य दोनदिवसापासून भयंकर वाचन करुन प्रतिसादही देत आहेत. त्यांच्या वाचनाबद्दल, प्रतिसादाबद्दल आक्षेप नाही. पण त्यांच्या प्रतिसादांनी जूने लेख मुख्यपानावर आले आणि एखादा नवीन लेख हा फार मागे जातो आहे.असे एकाच वेळी नवीन चारपाच सदस्य आले आणि प्रतिसाद देत गेले तर जरा गोंधळ होईल असे वाटते, त्यात काही तरी बदल केले पाहिजे असे वाटते ! (लेखांची जागा बदलू नये असे वाटते आणि नवीन प्रतिसाद कोणाचा आहे,हेही पाहता आले पाहिजे )

स्वगृहाच्या पानावरही अंतिम प्रतिसाद कोणाचा आहे,ही पाहण्याची सोय झाली पाहिजे आणि प्रतिसाद देणा-याच्या ठिकाणी लेखक ऐवजी अंतिम प्रतिसाद (किंवा दुसरा कोणताही)असा शब्द करता येईल का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

1 Nov 2007 - 5:02 am | बेसनलाडू

थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचे झाले तर मनोगतावर काव्य, गद्य इ. लेखनप्रकारानुसार केलेल्या गटांमध्ये कालानुक्रमे लेखन आणि दैनंदिन लेख सदरात अंतिम प्रतिसाद, त्या दिवसातले प्रतिसाद, त्या दिवसातले लेखन अशी सोय हवी.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

1 Nov 2007 - 7:28 am | विसोबा खेचर

तर मनोगतावर काव्य, गद्य इ. लेखनप्रकारानुसार केलेल्या गटांमध्ये कालानुक्रमे लेखन आणि दैनंदिन लेख सदरात अंतिम प्रतिसाद, त्या दिवसातले प्रतिसाद, त्या दिवसातले लेखन अशी सोय हवी.

कृपया मनोगताशी किंवा इतर कुणा संकेतस्थळाशी तुलना नको असे वाटते! मनोगत हे एक थोर संकेतस्थळ आहे यात काहीच वाद नाही.

उद्या आम्ही जर असं म्हटलं की मिसळपावप्रमाणेच मनोगतानेही त्याचा कारभार कुणाच्या हाती आहे, त्यात कोण कोण मंडळी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत, हे जाहीर करावे तर मनोगत तसे करणार आहे काय? लाडूसाहेब, मिसळपावचा दाखला देऊन आपण हाच प्रश्न मारे सुस्पष्टपणे वगैरे मनोगतावर विचारणार आहात काय? किंबहुना, प्रशासकीय धोरणांबाबत मिसळपावचा दाखला देऊन विचारलेला प्रश्न मनोगतावर छापला जाईल किंवा नाही याचीच शंका आहे!:) असो..

तेव्हा कृपया तुलना नको असे पुन्हा एकदा वाटते!

असो, बाबारे नीलकांता जरा वेळ काढून या सदरात विचारलेल्या/उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांकडे तू लक्ष द्यावेस आणि ग्रामस्थ मंडळींना योग्य तो खुलासा करावास अशी तुला नम्र विनंती!

तात्या.

साती's picture

1 Nov 2007 - 9:35 am | साती

तात्या, तरीही मुखपृष्ठावरील अनुक्रमणिकेची मांडणी लेख / कविता प्रसिद्ध झाल्याच्या अनुक्रमाने असावी आणि प्रतिसादांप्रमाणे असू नये असे वाटते. ते सर्वांसाठीच सोयीचे आहे.
कृपया याचा विचार व्हावा.
साती

बेसनलाडू's picture

1 Nov 2007 - 11:08 am | बेसनलाडू

लाडूसाहेब, मिसळपावचा दाखला देऊन आपण हाच प्रश्न मारे सुस्पष्टपणे वगैरे मनोगतावर विचारणार आहात काय? किंबहुना, प्रशासकीय धोरणांबाबत मिसळपावचा दाखला देऊन विचारलेला प्रश्न मनोगतावर छापला जाईल किंवा नाही याचीच शंका आहे!:) असो..
--- हाहाहा! हा प्रश्न मला तुमच्याकडून अपेक्षितच होता! नाही, मुळीच विचारणार नाही. प्रशासकीय कात्री कुठे कशी लागेल याची खात्री आहे, तिकडे कुठली मते मांडायची आणि कुठली नाही, हे समजण्याइतकाही अनुभव माझ्याकडे नाही, असे मला वाटत नाही. दुसरे असे, की मनोगताचा दाखला येथे देऊन मी फक्त येथील तांत्रिक बाबतीत सुधारणेसाठी असलेला वाव लक्षात घेतला आहे. तोही सदस्यांच्या वाचनाबाबतच्या गरजा भागवण्यासाठी. प्रश्नबिश्न विचारायचा मुद्दा येथे मध्ये येतोच कुठे आणि कसा? की मनोगताचा दाखला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठीही देणे लोकशाहीप्रिय मिसळपाववर वर्ज्य आहे? जेथे जो प्रश्न विचारायचा तेथे तो मी विचारलाच आहे :) कुठे उत्तराची अपेक्षा करायची तिकडे ती केलीही आहे. आणि इर्रेस्पेक्टिव ऑफ दि ऍन्सर, माझ्या मतांची सुस्पष्टता आणि प्रामाणिकपणा माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे.
दुसरे असे, की मिसळपावची मनोगतशी तुलना करायचा मुळीच उद्देश नाही. पण मनोगतावा जर काही चांगले असेल, तर त्याचा दाखला येथे देणे मला गैर वाटत नाही. किंबहुना मिसळपावची तांत्रिक बाजू सदस्यांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने अधिक बळकट होण्यासाठी तसे करणे प्रसंगी क्रमप्राप्तही ठरते. मात्र मनोगतावर मिसळपावसंबंधी काही लिहावयाचे झाल्यास आणि प्रशासकीय कात्री लागेल, असे वाटल्यास मी ते तिकडे लिहूच कशाला?
(स्पष्टवक्ता)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

1 Nov 2007 - 12:12 pm | विसोबा खेचर

प्रश्नबिश्न विचारायचा मुद्दा येथे मध्ये येतोच कुठे आणि कसा? की मनोगताचा दाखला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठीही देणे लोकशाहीप्रिय मिसळपाववर वर्ज्य आहे?

अहो वर्ज्य असतं तर तुमचा प्रतिसाद इथे राहिलाच नसता! Right?:))

इतर कोणत्याही थोर थोर संकेतस्थळांचे दाखले इथे देऊ नयेत हे माझं वैयक्तिक मत आहे! बाकी आपलं चालू द्या! इतर संकेतस्थळांचे आपल्याला अगदी हव्वे तितके गोडवे गा! मिसळपावला ते वर्ज्य नाही!! तात्याची आणि मिसळपावची मतं वेगवेगळी आहेत! कृपया माझं मत हे मिसळपावचं अधिकृत मत धरू नये!

मात्र मनोगतावर मिसळपावसंबंधी काही लिहावयाचे झाल्यास आणि प्रशासकीय कात्री लागेल, असे वाटल्यास मी ते तिकडे लिहूच कशाला?

हा हा हा! हे खरं आहे! आमचा शक्तिवेलू फोकलिचा अगदीच कोत्या मनाचा आहे!:)

तात्या.

बेसनलाडू's picture

1 Nov 2007 - 1:27 pm | बेसनलाडू

बाकी आपलं चालू द्या! इतर संकेतस्थळांचे आपल्याला अगदी हव्वे तितके गोडवे गा! मिसळपावला ते वर्ज्य नाही!!
गोडवे गाणे आणि सुधारणेदाखल दाखला देणे या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत काय? गोडवे गायचे असते, तर पानभर लेख, कविता लिहिल्या नसत्या काय? कृपया पूर्वग्रहांच्या भरात साध्या गोष्टींचा विपर्यास न करता नीट विचार करूनच मग टोलेबाजी करायला हवी.
(टोलेबाज)बेसनलाडू

पुष्कर's picture

1 Nov 2007 - 9:17 am | पुष्कर

येथे नवीन सदस्यांना आमंत्रित करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून या संकेतस्थळाविषयी अनभिज्ञ मित्रांना आमंत्रण-पत्र पाठवण्याची सोय होईल आणि संकेतस्थळाचा लौकिकही वाढेल.

- आपला,
नवा गडी नवं राज्य

यशोदेचा घनश्याम's picture

2 Nov 2007 - 6:21 pm | यशोदेचा घनश्याम

काहि आवडिचे लेख, चर्चात्मक लेख यांना बूकमार्क करण्याची सोय द्यावी,
जेणेकरुन मुखप्रुष्ठावरुन तो लेख हुडकण्यात वेळ जाणार नाही.

अर्थात सदस्याच्या 'वाटचाल' मधे त्याचे लेख दिसतातच!
पण जसजशी वाटचाल पूढे सरकेल, तशी तिथेही गर्दी दाटेल!

यशोदेचा घनश्याम

सरपंच's picture

8 Nov 2007 - 12:39 pm | सरपंच

नमस्कार,
आज काही नवीन सोई येथे देत आहोत.
तुम्हाला हवा तो लेख मित्रांना पाठवण्याची सोय आता आहे.
मुद्रणसुलभ आवृत्ती दिलेली आहे.
दोन नवे ट्रॅकर लावले आहेत. मुख्य पानावर खाली वर न जाणारा आणि डाव्या बाजूच्या समासात नवे लेखन म्हणून पहिल्या सारखा प्रतिक्रिया आल्यावर वर-खाली जाणारा आहे.

ह्या सुविधांत काही तृटी आढळल्यास कळवावे ही विनंती.

मतपत्र आणि संपादक लवकरच देण्याचा प्रयत्न आहे.

आवडाबाई's picture

8 Nov 2007 - 2:13 pm | आवडाबाई

हे सही झालं

अभिनंदन आणि धन्यवाद !!

बेसनलाडू's picture

8 Nov 2007 - 2:20 pm | बेसनलाडू

छान सोई आहेत. शिफारस करा आणि प्रस्तावित मतपत्र तर मस्तच!
(समाधानी)बेसनलाडू

शैलेश's picture

25 Nov 2007 - 2:26 pm | शैलेश

तात्या आणि मिसळपाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! आत्ताच या संकेतस्थळाचा सदस्य झालो आहे.

न लगे मुक्ती आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
घोषवाक्य मिसळपावाच्या तर्रीसारखे झणझणीत आहे, :)

मिसळपावच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शुभेच्छुक,

शैलेश

विसोबा खेचर's picture

25 Nov 2007 - 3:12 pm | विसोबा खेचर

भाईकाका एकदा म्हणाले होते की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो, असं जर मला कुणी विचारलं तर मी पटकन 'जयंत नारळीकर' असं उत्तर देईन!"

त्याच चालीवर असं म्हणावंसं वाटतं की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो?" असं तात्याला जर कुणी विचारलं तर तात्या पटकन 'शैलेश खांडेकर' हे उत्तर देईल! :)

असो, शैलेशरावांसारख्या प्रतिभावंताचे, शब्दप्रभूचे, आणि खंद्या 'मराठी'प्रेमीचे मिसळपाववर मन:पूर्वक स्वागत! त्यांनीही येथे उत्तमोत्तम लेखन करावे आणि मिसळपावची शोभा वाढवावी अशी त्यांना नम्र विनंती!

--तात्या अभ्यंकर.

प्रियाली's picture

25 Nov 2007 - 6:31 pm | प्रियाली

त्याच चालीवर असं म्हणावंसं वाटतं की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो?" असं तात्याला जर कुणी विचारलं तर तात्या पटकन 'शैलेश खांडेकर' हे उत्तर देईल! :)

अगदी सहमत! खरंतर नारळीकरांच्या आणि खांडेकरांच्या चेहर्‍यात साम्य आहे असंही वाटून गेलं मला आताच. ;-)

सर्किट's picture

26 Nov 2007 - 8:25 am | सर्किट (not verified)

मी शैलेशरावांना प्रत्यक्ष भेटलोय !

आणि प्रियालीताईंनी सांगितलंय हे मला आत्ताच चमकलं..

सज्जन दिसतो कसा, सज्जन वागतो कसा, वगैरे कुण्या भ्रमित अर्जुन्याने मला विचारले, तर मी शैलेशरावांकडे पाठवीन त्या बेण्याला.

- (सारथी) सर्किट

देवदत्त's picture

1 Dec 2007 - 11:35 am | देवदत्त

एखाद्या लेखास नवीन प्रतिक्रिया मिळाली की अनुक्रमणिकेत त्या लेखाच्या प्रतिसाद स्तंभात (column) किती नवीन प्रतिक्रिया आहेत ते दिसते. त्या दुव्यावर टिचकी मारली असता त्या लेखातील पहिल्या नवीन प्रतिसादावर आपण पोहोचविले जातो. हे छान आहे.

किंतु सध्या काही लेखांत मी नवीन प्रतिक्रियेच्या दुव्यावर टिचकी मारली असता, त्या प्रतिक्रियेवर जाणे होत नाही आहे. आपण लेखावर पोहोचविले जातो. :(
आणि मी पाहिल्याप्रमाणे ज्यात १ पानाच्या वर प्रतिसाद आले आहेत त्यात हे घडत आहे. बाकीचे नीट तपासले नाही.

यशोदेचा घनश्याम's picture

7 Dec 2007 - 6:40 pm | यशोदेचा घनश्याम

वरचा प्रतिसाद २ र्या पानावर आहे.
१ नवीन वर टिचकी मारल्यावर, पहिल्या पानावरच्या लेखावरच आलो.
२ र्या पानावर आल्यावरही, प्रतिसादासमोर नवीन असे दिसत नव्हते.

देवदत्त's picture

7 Dec 2007 - 7:54 pm | देवदत्त

सहजरावांनी सांगितल्याप्रमाणे हा डॄपल चा दोष आहे...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Dec 2007 - 5:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नमस्कार,

मी अशोक गोडबोले यांच्याशी बोलल्यावर या वेबसाईटवर डोकावले. आणि ही पहिली वेबसाईट आहे जी linux मधेही अतिशय उत्तम चालते, त्याचे मला खूप कौतुक वाटले. आपले आभार आणि अभिनंदनही!
एकच विनंती .... मराठी आणि English मधे बदल करण्याची कळ जर "प्रतिक्रिया" या खिडकीच्या शेजारी असेल तर फार उत्तम होईल.
मी अशी सुंदर, सहज, सोपी, साधी आणि आकर्षक वेबसाईट पाहून बेहद्द खूष झाले आहे.

संहिता

टिउ's picture

15 Dec 2007 - 5:41 am | टिउ

गमन म्हणजे logout का? गमन न करता खिडकी बंद केली तर आपोआप गमन व्हायला हवं...तसं होत नाहिये!

मिसळपावी तंत्रज्ञांना एक विनंती,

एखाद्याला लेखन करायचे असेल तर ई-मेल सर्विसेस मधे ड्राफ्ट फोल्डरमध्ये ते साठवून ठेवता येते
तशी सोय करता येईल का?

म्हणजे ज्याला जसा वेळ मिळत जाईन तसा तो लेखन करत जाईन. आणि जेव्हा वाटेल तेव्हाच त्याला प्रकाशित करता येईल...
यामुळे माझ्यासारख्यांची चांगलीच सोय होईल व लेखनासाठी मिळणारी २ मिनिटे - ५ मिनिटे - १० मिनिटे सत्कारणी लावता येतील
व लेखकांना जास्तीत जास्त लेखन मिसळपाव वर देता येईन :)

धन्यवाद
सागर

विसोबा खेचर's picture

13 Feb 2008 - 1:12 am | विसोबा खेचर

सागरशेठ काय म्हणतात त्याची नोंद घे रे प्लीज..

तात्या.

सागर's picture

13 Feb 2008 - 11:22 am | सागर

तात्या, नीलकांत,

माझ्या सूचनेची दखल घेत आहात त्याबद्दल मनापासून आभार...
माझी खात्री आहे की जर आपण ही सुविधा देऊ शकलो तर मिसळपाववर अधिक प्रमाणात लेखन पहावयास मिळेल. यात शंका नाही...

धन्यवाद
सागर

चतुरंग's picture

13 Feb 2008 - 1:17 am | चतुरंग

बोललास सागरा. मी सुध्दा काही लेखन करतोय पण ते सध्या दुसर्‍या मार्गाने साठवावे लागते.
मिपा वरच सोय झाली तर झकासच.

चतुरंग

चतुरंगराव,

नीलकांत हे नक्की करतील यावर माझा विश्वास आहे.
खरे तर प्रत्येकाची ही गरज असेल..
त्यामुळे तुमचे चतुरस्त्र लेखन आता अधिक प्रमाणात वाचावयास मिळेल अशी अपेक्षा आहे.

दुसरे असे की ... मी वेळेअभावी प्रत्येक लेखाला वा मताला प्रतिसाद देऊ शकत नाही... पण वाचत मात्र नक्की असतो...
तेव्हा तुम्हाला (आणि समस्त सदस्यांना) आत्तापर्यंत माझा प्रतिसाद मिळाला नाही तर मनात काही ठेवू नये एवढीच विनंती...

धन्यवाद
सागर

धमाल मुलगा's picture

15 Feb 2008 - 5:58 pm | धमाल मुलगा

सरप॑च,

याहू कि॑वा इतर स॑स्थळा॑वर जशी निरनिराळे हावभाव दाखवणारी "स्माईलीज" आहेत तसे मिपावर करता येइल का?

बर्‍याच इ॑ग्रजी बोर्डवर ही सुविधा उपलब्ध असल्याचे स्मरत॑.

तात्या, नीलकांत...

आज मेंटेनन्स करणारच आहात तर अजून थोड्या सूचना सुचवू इच्छितो...

- येथे इमेजेस जशी जोडता येतात तशा फाईल्स साठवता येतील का? (पीडीएफ, वर्ड, एक्सेल...) म्हणजे एखाद्या चर्चेमध्ये कोणाला संदर्भ द्यायचा असेल तर डायरेक्ट ती फाईल जोडता येईल.... म्हणजे दुसर्‍या ठिकाणी अवलंबून राहणार नाही कोणी (लिंक्स वगैरे)
- खरडवहीतील नोंदीतील प्रतिसाद कोठेही क्लिक न करता का नाही बघता येत? आणि प्रतिसाद दिल्यावर आपल्याला हे कळतही नाही की प्रश्नकर्त्याच्या खरडवहीत आपली नोंद जाते की नाही... खरडवहीत जर मी एखाद्याला प्रतिसाद दिला तर तो प्रतिसाद त्या सदस्याच्या खरडवहीत दिसायला हवा.... कारण तांत्रिकदृष्ट्या माझा प्रतिसाद हा दुसर्‍या सदस्याच्या खरडवहीतील नोंद होते..... याबाबतीत काही करता येईल का?

- टंकलेखन रंगीत करता आले तर खूप छान.."मिसळपाव"वरील वातावरण रंगीत होईल...कसे?

ह्या सूचना कोणत्याही संकेतस्थळाशी तुलना करुन सांगितलेल्या नाहीत. तर "मिसळपाव"वर ह्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर मिसळपावचे वजन अधिक वाढेल असे वाटल्याने सुचविल्या आहेत....

सध्यातरी एवढेच....
सागर

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 1:35 am | विसोबा खेचर

अरे सागरच्या सूचनांचा अवश्य विचार कर अशी तुला विनंती..

तात्या.