लागणारे जिन्नस: १) कोव़ळी गावठी काटेरी वांगी, २) तीन गाजरे ४) अर्धी वाटी हिरव्या मटाराचे दाणे. ५) पाऊण वाटी किसलेले किंवा डेसीकेटेड सुके खोबरे ६)पाउण वाटी शेंगदाणा कुट ७) १ लिंबाचा रस. ८) मिसळ मसाला २ चमचे ९) गरम मसाला १ चमचा. १०) तेल.
वांगी स्वच्छ धुवुन त्याचे डेखाकड्चे टोक कापून टाकावे व संपूर्ण देठ न तोडता वांग्यांना उभी व आडवी चिर द्यावी (+अशी).
चिरताच वांगी पाण्यात बुडवून ठेवावी.
कांदे शक्यतो कांदेपातीला येतात तसे हळवे कांदे घ्यावेत, त्याने चव छान येते. कांदे मंद गॅसवर आख्खे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर पाकळ्या सुट्या कराव्या
गाजरे धुवून पुलावात घालताना जशी चिरतो तशी चिरावी. जून असल्यास मधला दाठर भाग काढून टाकावा.
खोबरे जरासे भाजून घ्यावे. आता कांद्याच्या पाकळ्या+भाजलेले खोबरे+दाण्याचे कुट हे बारीक वाटून घ्यावे.
मॅरेनेशन साठी मिसळीचा मसाला आणि लिंबाचा रस यांची पेस्ट बनवावी घट्ट वाटल्यास अगदी थोडे पाणी घालावे.
आता ही पेस्ट चिरलेल्या वांग्यांच्या चिरांमधे व्यवस्थीत भरावा. वरूनही लावावा. अर्धा तास ठेवावे.
आता कढईत तेल घेऊन जिरे,हळदीची फोडणी करावी. त्यात कढिपत्या ऐवजी ताज्या पुदीन्याची पाने घालावीत. त्यावर वाटलेला मसाला घालून चांगला परतावा तेल सुटू लागले की गाजरे व मटार घालावे. (चावण्याचा प्रॉबलेम असल्याने मी मटार व गाजरे जरा वाफवून घेते) खमंग परतावे परतल्यावर आता त्यात वांग्याचे मॅरिनेटेड केलेले टप्पे खोचायचे आहेत
वरून एक वाटी पाणी घालावे व जाड झाकण ठेऊन झाकणावर गार पाणी घालावे. चांगल्या २,३ वाफा येऊ द्यावा. आता गरन मसाला घालून ढवळावे. मीठ घालावे. पुन्हा बारीक गॅसवर वाफेवर शिजवावे. ग्रेवी पातळ हवी असल्यास त्या प्रमाणे पाणी घालावे. नेहमीच्या वांग्यांपेक्षा शिजायला जरा वेळ लागतो. हे ओव्हनमधे फारच चांगले होऊ शकते पण मी गॅसवरच करते. शिजल्यावर बैगन टप्पा तयार.
ही डिश खाँसाहेबांची आवडती होती. त्यांचे एक शेत होते त्या शेतावर फैजल म्हणून एक नोकर होता. तो शेतातच पिकणार आयटम वापरून हे टप्पे करायचा. मी कधी तिथे गेले नाही पण घरच्या स्वैपाकघरात सुद्धा हे व्हायचे. त्यांच्या मुलीकडून मी हे शिकले. ते शेंगदाण्याच्या कुटाऐवजी काजू पेस्ट वापरतात. अतिशय छान लागते. खांसाहेब शेतावर गेले की फैजलला ट्प्याची फर्माईश व्हायची. आताच खांसाहेबांची बरसी झाली. त्या वेळेस मी केले होते माझ्या घरी.
प्रतिक्रिया
15 Apr 2013 - 8:51 pm | गौरीबाई गोवेकर
ही घ्या लिंक. शिकतेय हळू हळू. :)
https://plus.google.com/photos/113291661719853313847/albums/586708551508...
15 Apr 2013 - 8:57 pm | पैसा
अतिशय छान आहे. मी तुमच्या लिंकवरचे फोटो पाहिले. चांगले आहेत. पण त्यांची सेटिंग्ज बदलावी लागतील. सध्या फक्त गुगलवर लॉगिन केले तरचे ते फोटो दिसत आहेत. जर पब्लिकला दिसतील असे सेटिंग केले तर इथेही दिसतील.
15 Apr 2013 - 8:57 pm | प्यारे१
बैंगन अजून 'टप्प्यात' आलेलं दिसत नाहीये. ;)
पाकृ वाचून तोंपासु. :)
15 Apr 2013 - 8:58 pm | गौरीबाई गोवेकर
म्हणजे रे काय प्यारे?
15 Apr 2013 - 9:02 pm | प्यारे१
फटू दिसत नाहीत.
माझा 'गणेशा' झालाय. :)
15 Apr 2013 - 9:03 pm | गौरीबाई गोवेकर
https://plus.google.com/photos/113291661719853313847/albums/586708551508...
ईथे बघ. 'गणेशा' म्हणके?
15 Apr 2013 - 9:11 pm | गणपा
आता बहुतेक दिसावेत फोटू.
टप्या टप्यांनी दिलेली पाकृ आवडली. :)
15 Apr 2013 - 9:13 pm | रेवती
छान. तोंपासू फोटू आहेत. आता लवकरच भरली वांगी तरी करायला हवीत. ;)
15 Apr 2013 - 9:17 pm | Mrunalini
वा.. काय मस्त दिसतायत वांगी.. पण इथे अशी छोटी वांगी मिळतच नाहीत. :(
15 Apr 2013 - 9:34 pm | सानिकास्वप्निल
छोटी वांगी सहज मिळत नाही, मिळाले की लगेच अश्या पद्धतीची बैंगन टप्पा नक्की बनवून बघेन
पाकृ व फोटो आवडले :)
15 Apr 2013 - 9:43 pm | आदूबाळ
ये ब्बात! आता फटू पाहून खरंच भारी वाटलं.
"हळवे" कांदे हा शब्दप्रयोग विशेष आवडला!
अवांतरः खांसाहेब म्हणजे कोण?
17 Apr 2013 - 1:13 pm | गौरीबाई गोवेकर
बाळ,
'खांसाहेब म्हणजे भेंडिबाजार घराण्याचे महम्म्द तालिब खान. माझे गुरू. "माझी खांसाहेबांची खिचडी" ही रेसिपी चाळ. (वाच).
17 Apr 2013 - 12:03 pm | गौरीबाई गोवेकर
पैसाताई, अपर्णा अक्षय,आणि ईतर सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्या प्रतिसाद देणार्यांचे आभार.
17 Apr 2013 - 3:26 pm | स्पंदना
फारच चविष्ट दिसते आहे. अगदी एखादा राग आळवुन आळवुन म्हणावा तसा हा मसाला शिजवुन शिजवुन भाजी केली आहे.
17 Apr 2013 - 3:41 pm | कवितानागेश
+१
छान दिसतेय भाजी.
17 Apr 2013 - 4:07 pm | शिद
मस्त दिसते आहे पाकृ. आई/बायकोला सांगुन नक्किच बनवून चाखावी लागणार.
17 Apr 2013 - 7:36 pm | अनन्न्या
बाकी मसाला चवदार वाट्तोय. वांग्याला पर्याय काय? घरी मला सोडून सगळ्याना आवड्तात. मी वांग्याच्या रेसिपी करत नाही, म्हणजे खायलाच नको.
18 Apr 2013 - 12:13 am | चिंतामणी
तुने .........................
18 Apr 2013 - 1:04 pm | गौरीबाई गोवेकर
अनन्या वांगी न आवडणार्यांनी एकदा तरी करून खावाच. मते बदलतील वांग्याला इथे पर्याय काही नाही ग. वांगीच. :(
17 Apr 2013 - 7:42 pm | शुचि
अफाट चटकदार दिसतो आहे फोटो.
17 Apr 2013 - 10:58 pm | बॅटमॅन
काय जबरी चटकदार दिसताहेत वांगी!!! तोंडाला पाणी सुटले एकदम!
18 Apr 2013 - 12:12 am | चिंतामणी
तों.पा.सु.
नक्कीच करुन खायली जाईल.
18 Apr 2013 - 12:15 am | सोत्रि
वांग्यांचा पहिलाच फोटो बघून खपल्या गेले आहे!
- (वांगी भयंकर आवडणारा) सोकाजी
18 Apr 2013 - 8:38 am | रमेश आठवले
प्रवासात टप्पा , गायनात टप्पा आणि आता व्यंजनात ही टप्पा.
18 Apr 2013 - 10:50 am | सुमीत भातखंडे
आणि एकदम तोंपासु फोटो