गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
प्रतिक्रिया
17 Apr 2013 - 6:22 pm | श्रीरंग_जोशी
निवडणूकांच्या निकालांवरून नेमक्या कारणांचे (दीर्घकालिन व तत्कालिन) विश्लेषण करणे फार अवघड आहे.
गुजरातमधील २००२ ते २००४ मधला हिंसाचार व तत्कालिन राज्य सरकारची भूमिका हे भारतात घडलेल्या याप्रकारच्या इतर घटनांपेक्षा का वेगळे आहेत याचे विश्लेषण मी वर केले आहे.
या प्रकारच्या प्रवृत्तींना एका राज्यात थारा मिळणे अन केंद्रात सत्ता मिळवण्याइतपत अनेक राज्यांत थारा मिळणे यात खूप मोठे अंतर आहे.
देशाच्या दुर्दैवाने दुसरी गोष्ट घडलीच तर भविष्यात हाच मार्ग राजमार्ग बनण्याचा धोका आहे.
17 Apr 2013 - 8:29 pm | श्रीगुरुजी
एखाद्या राज्यात दंगली झाल्या म्हणून सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला असे भारतात क्वचितच घडले असेल. असे घडले असेल तर माहिती द्यावी. असे झाले असते तर भारतात काँग्रेस केंद्रात वा कोणत्याही राज्यात कधीच सत्तेवर आली नसती. १९६९ ची बिहारची दंगल, आसामातील नेल्लीमधील १९८३ मधील ३००० लोकांचे हत्याकांड, १९८४ मधील शिखांचे शिरकाण, २००२ मधील गुजरातमधील दंगल ही याची ठळक उदाहरणे. दंगली, परराष्ट्र संबंध इ. मुद्द्यांवर जनता कधीही मतदान करत नाही. जात, निवडणुकपुर्व नजीकच्या भविष्यात जाहीर केलेल्या सवंग योजना, मतदानाच्या दिवशी वाटलेले पैसे इ. गोष्टींवर बहुतेकवेळा मतदान होते. निवडणुकपूर्व काळात जर एखादे युद्ध जिंकले किंवा भ्रष्टाचाराची जोरदार प्रकरणे उघडकीस आली तर नक्कीच मतदानावर परीणाम होतो, पण दंगलीच्या कारणावरून मते दिली जात नाहीत.
17 Apr 2013 - 8:35 pm | पिंपातला उंदीर
१९९३ चे दंगे कॉंग्रेस ला महाराष्ट्रात बर्यापैकी फटका देऊन गेले होते.
18 Apr 2013 - 7:34 pm | नितिन थत्ते
>>जात, निवडणुकपुर्व नजीकच्या भविष्यात जाहीर केलेल्या सवंग योजना, मतदानाच्या दिवशी वाटलेले पैसे इ. गोष्टींवर बहुतेकवेळा मतदान होते.
नाही हो.... मोदी निवडून येतात ते या कारणांनी नाहीच्च मुळी.
19 Apr 2013 - 10:27 am | गणामास्तर
कशावरुन ओ चच्चा? या गोष्टींचे हक्क काय फक्त काँग्रेस अन राष्ट्रवादी कडे राखीव आहेत का? ;)
19 Apr 2013 - 11:45 am | नितिन थत्ते
हक्क राखीव आहेत की नाही हे ठाऊक नाही.... पण त्यांनी गुजरातमध्ये विकास केला असल्याने जन्ता त्यांना मते देते असे आम्हाला सांगण्यात आले आहे. (इतर लोक मात्र पैसे वाटल्यानेच निवडून येतात असे वरच्याच प्रतिसादात कळले. नाही का ?)
15 Apr 2013 - 4:54 pm | पुष्कर जोशी
17 Apr 2013 - 5:50 pm | नितिन थत्ते
ऐला, हा धागा विलेक्शन होईपर्यंत चालू राहणार का?
17 Apr 2013 - 7:19 pm | विकास
मोदींचे माहीत नाही, पण धागा मात्र आपत्तीच आहे. ;)
( ऋषिकेश ह. घे. ) :)
19 Apr 2013 - 1:44 pm | ऋषिकेश
हे बरंय! कधीतरी चुकुन माकून आमच्या धाग्याने तीन आकडी संख्या गाठली तर आले लगेच!
म्हंटात ना मराठी माणूस खेकड्यासारखा आहे.. वैग्रे वैग्रे ;)
19 Apr 2013 - 8:34 pm | विकास
म्हणून म्हणतो की खेकड्यासारखी वृत्ती सोडूयात आणि कृषिमंत्र्यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठींबा देऊयात. आपत्ती अथवा इष्टापत्ती काहीच रहाणार नाही ;)
19 Apr 2013 - 10:18 pm | श्रीगुरुजी
>>> म्हणून म्हणतो की खेकड्यासारखी वृत्ती सोडूयात आणि कृषिमंत्र्यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठींबा देऊयात. आपत्ती अथवा इष्टापत्ती काहीच रहाणार नाही
पण आपण आता यापुढे निवडणुक लढविणार नाही असे कृषिमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. गेली अनेक वर्षे ते असे सांगत आहेत. २००९ च्या निवडणुकीआधी पण ते हेच सांगत होते. त्यांच्या या विधानात व भूमिकेत कमालीचे सातत्य आहे. त्यांना निवडणुकीला उभे राहण्याची अजिबात इच्छा नाही, पण कार्यकर्ते त्यांना जबरदस्तीने उभे करतात.
19 Apr 2013 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी
सार्वजनिक निवडणूक लढवणार नाहीये असे म्हणाले आहेत ते.
राज्यसभेच्या सदस्यत्वाचा पर्याय आहेच की.
18 Apr 2013 - 9:04 am | सुधीर
आजच्या इटी मधली पवारांची मुलाखत वाचण्यासारखी आहे. राजकारणातलं फारसं काही कळत नसलं तरी त्यांनी उपस्थित केलेला "मोंदींनी निर्माण केलेल्या इतर नेतृत्वाचा" मुद्दा योग्य वाटला. उत्तर प्रदेशातल्या निवडणूकीतली "पाडायची स्ट्रॅटेजी" हा मुद्दा येत्या निवडणूकीत महत्त्वाचा असेल काय?
18 Apr 2013 - 6:26 pm | श्रीरंग_जोशी
या मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
अगदी मनमोकळेपणाने पवारांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीत मांडलेले विचार स्पष्ट व वास्तविकतेच्या जवळ जाणारे आहेत. राष्ट्रवादीतील राज्यातले नेते पाहता खरंच खूप वाईट वाटते कारण इतरांना हेवा वाटेल असा नेता सर्वोच्च स्थानी असताना हे लोक अगदीच किरकोळ वाटतांत.
बाकी मुलाखतीमधल्या या प्रश्नाचे उत्तर वाचून पवार स्वानुभावाचे बोल तर बोलत नाहीयेत ना अशी शंका वाटली.
19 Apr 2013 - 2:16 pm | ऋषिकेश
दुव्याबद्दल आभार.
पवारांना धुर्त नेता असे काही वेळा का संबोधले जाते याची चुणूक दाखवणारी (अजून) एक मुलाखत.
त्यांच्या मुलाखतीत न पटण्यासारखं बर्याचदा काहि नसतंच. पण विचारलेल्या प्रश्नांच्या गर्दीतून ते त्यांना हवं तेच सांगून जातात आनि योग्य ठिकाणि योग्य तो मेसेज पोचवतात ;) - याही वेळी तसंच आहे :)
5 May 2013 - 8:31 pm | श्रीगुरुजी
कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज
सीव्होटर एक्झिट पोल (कंसात मतांची टक्केवारी)
काँग्रेस : ११०-११८ (३७ टक्के), भाजप : ५१-५९ (२५ टक्के), निजद (देवेगौडा) : २६ (२० टक्के), कजप (येडप्पा) : ९-१३ (७ टक्के), इतर : ७-११ (११ टक्के)
चाणक्य एक्झिट पोल
काँग्रेस : १३२, भाजप : ३८, निजद (देवेगौडा) : ३८, इतर : १५
सीएसडीएस एक्झिट पोल
काँग्रेस : १०८, भाजप : ४८, निजद (देवेगौडा) : ४८, इतर : २०
येडाप्पाच्या ७ टक्के मतांमुळे प्रचंड फरक पडलेला आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे भाजप्-सेना युतीसाठी विनाशक ठरले होते, तसेच कर्नाटकातही होताना दिसत आहे.
http://exitopinionpollsindia.blogspot.in/
5 May 2013 - 10:08 pm | विकास
या संदर्भात नवीन धागा काढावात ही विनंती. एकदा का धागा दुसर्या पानावर गेला की ट्रॅक करणे अवघड जाते आणि तसे देखील मोदी विषयासाठी हे विषयांतर आहे.
बाकी कर्नाटकात भाजपा हरणार हे समजायला एक्झिट पोलची गरज आहे असे वाटत नाही.
20 May 2013 - 7:53 pm | श्रीगुरुजी
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा हा एक अंदाज
http://leadtech.in/infoelection/index.php/lok-sabha-elections-2013-/1116...
अजून एक चाचणी
http://www.newsbullet.in/india/34-more/42023-%20UPA%20set%20for%20a%20cr...
20 May 2013 - 8:10 pm | श्रीगुरुजी
हाच सविस्तर वृत्तांत मराठीतून . . .
http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/29021-2013-05-20-14-17-57
21 May 2013 - 9:25 am | ऋषिकेश
रोचक आहे
@श्रीगुरूजी : आभार!
22 May 2013 - 8:33 pm | श्रीगुरुजी
इंडिया टुडे ने केलेले सर्वेक्षण
http://indiatoday.intoday.in/story/assembly-elections-2014-upa-congress-...
http://indiatoday.intoday.in/story/general-elections-2014-upa-government...
http://indiatoday.intoday.in/story/headlines-today-c-voter-survey-2014-l...
अजून एक वृत्तांत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20207909.cms