गाभा:
तर....
मागील सोमवारी मी नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी दुचाकीवर जायचो. या नविन ठिकाणी मला कंपनीतर्फे बसची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'बस लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ बसपुरता मर्यादित नाही. चारचाकी गाडी (मारुती-८०० पासून ते फोर्ड एण्डेव्हर पर्यंत), एसी चालू ठेवून वा बंद ठेवून, खिडकी उघडी वा बंद ठेवून, उपाशी पोटी वा भरल्यापोटी कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्याचदा १-२ किमी अंतरातही त्रास होतो, तर क्वचित २०० किमी सुद्धा मला त्रासरहित प्रवास करता येतो.
तर असा त्रास का होतो?
त्यावर काय उपाय करता येतात? (बस लागण्यावरची गोळी/आवाळासुपारी/लेमनगोळी असे उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
प्रतिक्रिया
9 Jul 2012 - 9:29 am | जेनी...
प्रोब्लेम तुमचा नैये ..
बस चा आहे .
10 Jul 2012 - 8:12 am | पक पक पक
स्केटींगचा पर्याय कसा वाट्तो ;)
10 Jul 2012 - 9:03 am | संजय क्षीरसागर
हे नशिब! तरी बरं अजून भुयारी मार्ग नाही सुचवला कुणी !
10 Jul 2012 - 11:15 am | शिल्पा ब
काय करणार भुयारी मार्गाचं? प्रॉब्लेम गाडीनं जाण्याचा आहे..
10 Jul 2012 - 1:35 pm | संजय क्षीरसागर
भुयारी मार्गानं!
12 Jul 2012 - 10:19 am | पक पक पक
घसरगुंड्या बनवा दोन ,घरापासुन ऑफिसपर्यंत एक अन ऑफिस पासुन घरापर्यंत एक .. :bigsmile:
12 Jul 2012 - 11:27 am | बॅटमॅन
पेशव्यांना घसरगुंड्यांचा मान नाहीये ;)
12 Jul 2012 - 11:32 am | पक पक पक
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव मग ,नाय तर घोड्यावरुन जावा कामाला... :bigsmile:
12 Jul 2012 - 2:26 pm | कवटी
नाय तर घोड्यावरुन जावा कामाला...
बस लागतीय तेवढे पुरे नाही का?
12 Jul 2012 - 3:13 pm | पक पक पक
बस लागतीय तेवढे पुरे नाही का?
:bigsmile:
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
12 Jul 2012 - 5:18 pm | बॅटमॅन
आह्हा हा हा हा हा हा हा हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
12 Jul 2012 - 10:11 pm | अर्धवटराव
हो ना. कल्पना करा, जर घोडा "लागला" तर परत कधी बसने जाणे तर दूर, कुठेच बसायच्या लायकीचे राहणार नाहि व्हिक्टीम.
अर्धवटराव
12 Jul 2012 - 10:26 pm | मराठे
अरे आवरा !!! :bigsmile: :bigsmile: ;)
12 Jul 2012 - 4:31 pm | मितभाषी
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव मग ,नाय तर घोड्यावरुन जावा कामाला...
पक पक पक पैलवानाला घोडा लागला तर.......
:D :D :D
12 Jul 2012 - 10:21 pm | अन्नू
आत्ता कशा डीकटो मिपाकर वाटतात. ;)
9 Jul 2012 - 9:42 am | किसन शिंदे
साधा सरळ उपाय - कंपनीची बस सेवा वापरणं बंद करा. :)
9 Jul 2012 - 9:45 am | जेनी...
आणि एक झक्कास फोर्-व्हीलर घेऊन टाका यंदाच्या दसर्याला ;)
9 Jul 2012 - 10:05 am | तुषार काळभोर
आहे. दुचाकीलाच महिन्याला २२००-२३०० रु लागतील. (महिन्याला १७००-१८०० किमी पळून पाठ मोडेल ते वेगळेच!!)
9 Jul 2012 - 10:10 am | किसन शिंदे
अहो, पण ते म्हणताहेत ना त्यांना फोर व्हिलर सुध्दा लागते मग त्याचाही काही फायदा होणार नाही. आणखी जास्त सोपा उपाय म्हणजे नविन सायकल घेऊन हापिसला जाणे. :)
9 Jul 2012 - 11:25 am | पांथस्थ
साधा उपाय. रिक्षा घ्या की राव! येता जाता भाडं घेतलं तर पेट्रोलचे पैसे पण सुटतील!!
9 Jul 2012 - 9:57 am | शिल्पा ब
चालत्या गाडीत - कोणत्याही - असा प्रॉब्लेम असेल तर मोशन सिकनेस किंवा vestibular system मधे काही गडबड होत असावी. चांगल्या डॉक्टरला दाखवणे हे उत्तम.
9 Jul 2012 - 10:07 am | तुषार काळभोर
दुचाकी/रिक्षा/रेल्वे मध्ये हा त्रास नाही होत. एकदा जंजिर्याला जाताना होडीत व एकदा चेन्नईहून येताना विमानात त्रास नव्हता झाला.
9 Jul 2012 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll
विमानात होत नाही म्हणता? पण हॅलिकॉप्टरमधे होतो का?
हॅलीकॉप्टरमधे होत नसेल तर एखादे हॅलिकॉप्टर घ्या. कसे?
:)
9 Jul 2012 - 1:25 pm | गवि
होडी लागत नाहीये हे बरं आहे. पण होडीने हपीसला जाण्याची संधी पुण्यात लाभेलसे वाटत नाही. मुंबईत पावसाळ्यात शक्य आहे..
9 Jul 2012 - 10:00 am | श्रीरंग_जोशी
आपण हा प्रश्न इथे उपस्थित केला आहे तर मी पण मला लहानपणापासून भेडसावणारा प्रश्न विचारून घेतो कारण म्हणजे विषयातील साम्य. यात कुठल्याही प्रकारचा उपहास नाहीये.
लहानपणापासून बघत आलोय की बऱ्याच लोकांना राज्य परिवहन मंडळाची बस लागते. त्यांचे पाहून न लागणाऱ्यांनाही बस लागते. अन उरले सुरले दुर्दैवी जीव असतात ज्यांना बस अजिबात लागत नाही त्या बिचाऱ्यांचे फारच हाल होतात.
आता माझा अनुभव सांगतो. लहानपणापासून मी राज्य परिवहन मंडळाच्या बसने भरपूर प्रवास केला आहे. २४ तासांतल्या सर्व वेळी अन वर्षातल्या सर्व ऋतूंमध्ये. कधी कधी अपघातप्रवण अश्या घाटांतून सुद्धा. पण बसमधल्या प्रत्येकाला (चालक वाहक धरून) जरी बस लागली तरी मला अजिबात लागायची नाही. मग मी भरपेठ जेवलेलो असलो किंवा उपाशीपोटी असलो तरी. त्यासाठी मला आवळासुपारी वगैरे कधीच चघळावी लागली नाही.
आता मला पडलेले प्रश्न
१) मला आजवर एकदाही बस लागली नाही हे काळजीची बाब असावी असे मला वाटते.
२) बसच काय काही लोकांना विमानसुद्धा लागताना पाहिले आहे, मी त्या बाबतीतही दुर्दैवी.
३) राज्य परिवहन मंडळाच्याच बस अधिक का लागतात कारण हे प्रमाण खाजगी बसांमध्ये फारच कमी असते.
४) माझ्या निरीक्षणानुसार परदेशात बस लागण्याचे प्रमाण नगण्य आहे, मग भारतातच असे का घडते?
9 Jul 2012 - 10:46 am | चिरोटा
माझ्या बाबतीतही अगदी असेच आहे. मी बसच्या टपावर बसून प्रवास करायचो. आपण ?
कारण त्या खाजगी बसेसच्या तुलनेत गलिच्छ असायच्या.
मी ब्राझील,इस्रायल,रशिया,स्पेन,जपान,चिलीमध्ये लोकांना बस लागताना पाहिले आहे.
मिसळपाव्,कांदाभजी आणि चहा घेवून लाल डब्यातून भरदुपारी कशेडी घाटातून प्रवास केलाय का?
13 Apr 2013 - 8:57 am | मी_देव
:)
9 Jul 2012 - 10:17 am | आनंद
बस लागते ? त्याच्या तोट्या बरोबर फायदे ही लक्षात घ्या.
बस चालु झाल्या थोडे व्याक व्याक !करावे शेजार चा उठुन दुसरी जागा पकडेल.
तुम्ही एका तिकाटाच्या पैश्यात दोन शिटांचा आनंद लुटा.
किंवा मोकळी झालेली सिट एखाद्या सुबक ठेंगणीला द्या. प्रवास संपेपर्यंत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.
(तेवढी होल्ड करण्याची क्षमता असते शरीराची)
10 Jul 2012 - 2:04 pm | सस्नेह
भारी आयडिया !
मला रोज प्रवास करावा लागतो अन बसायला जागा मिळत नाही. त्यावरही काही उपाय सुचवाल का ?
12 Jul 2012 - 3:22 pm | पक पक पक
मला रोज प्रवास करावा लागतो अन बसायला जागा मिळत नाही.
बसलेल्याच्या डोक्याजवळ व्याक व्याक करावे... ;)
9 Jul 2012 - 10:21 am | वैशाली१
मला आणि माझ्या मुलाला सुद्धा हा त्रास आहे. मी शक्यतो प्रवासात खायचे टाळते . त्याने त्रास कमी होतो.
मी मुलासाठी होमिओपथिक गोळ्या सुरु केल्या आहेत. त्याचा त्याला उपयोग होतो . तुम्ही सुद्धा होमिओपथिक डॉक्टर ला विचारून घेऊ शकता .
9 Jul 2012 - 11:25 am | गवि
बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल उपाय.. कारण बस लागण्यावर प्लासेबो उपयोगी ठरतं असं एक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरही म्हणाले होते खरे..
मूळ धागाकर्त्यास :
अँटिहिस्टामाईन्स वापरुनही तुमचा त्रास अजिबात कमी होत नाही हे आश्चर्य आहे. तरीही रोजच बस लागत असताना रोज या झोप आणणार्या गोळ्या घेणं शक्यही नाही. दोन गोष्टी करा, त्रास नक्की कमी होईल याची खात्री बाळगा.
कानातल्या बॅलन्सिंग सिस्टीमकडून आलेला शरीराच्या ३ डी पोझिशनचा सिग्नल आणि डोळ्यांनी दिलेला त्याच पोझिशनचा सिग्नल हे जेव्हा मॅच होत नाहीत तेव्हा हा त्रास होतो. कानातील बॅलन्स सिस्टीम किंवा डोळे यांपैकी कोणत्याही एकामधे प्रॉब्लेम असला की असं होतं.
तस्मात..
१. कोणत्याही परिस्थितीत जवळच्या वस्तू किंवा बसच्या आतील गोष्टींकडे नजर ठेवून राहू नका. पूर्णवेळ डोळे मिटून बसा किंवा मग खिडकीतून खूप दूरच्या वस्तूकडे नजर लावा. दूरच्या वस्तूंची रिलेटिव्ह मोशन नगण्य असते. डोकंही स्थिर टेकून ठेवता येईल अशी व्यवस्था करा. (अगदी लहान उशी वगैरे)
२. मोशन सिकनेसमुळे मेंदूतलं व्हॉमिटिंग सेंटर ट्रिगर होतं. त्यावेळी प्रचंड अन्न / पाणी वगैरे पोटात असेल तर ते बाहेर टाकण्याची क्रिया अधिक जोरात होते. अशा वेळी शक्यतो फार खाऊन प्रवास सुरु करु नका. हपीसात पोचल्यावर खा/प्या.
9 Jul 2012 - 7:54 pm | चौकटराजा
नैनितालला ला गेलो असताना बस लागली . हिमाचल मधे पहिल्या दिवशी लागली नंतर नाही. तेथील लोकांचे म्हणजे " गवि" प्रमाणेच पण जरासे वेगळे. त्यांचे मते मान व छाती प्रवासात एकीकडेच असली की
ओकारी होत नाही. त्यामुळे ड्रायव्हरला कधी बस लागत नाही. तसेच झोपल्यामुळे बस लागण्याचे टळते.
11 Jul 2012 - 1:38 pm | तिमा
मान व छाती प्रवासात एकीकडेच
याचा अर्थ कळला नाही. आपली मान आपल्याच छातीवर असते ना ?
11 Jul 2012 - 7:14 pm | चौकटराजा
मानेचा पुढचा भाग म्हणजे गळा व छाती यात पीळ निर्माण होता कामा नये. ( twist) .
9 Jul 2012 - 8:10 pm | तुषार काळभोर
मात्रा लागू पडली असावी. आता येताना बसमध्ये बसल्याक्षणी जे डोळे मिटले ते सहकर्याने हडपसरचा थांबा आल्याचे सांगितल्यावरच उघडले. थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं पण निम्म्याहून कमी. मुख्य म्हणजे आतलं बाहेर नाही आलं.
बाकी उपाशीपोटी ते भरपेट या दरम्यानच्या सार्या लेव्हल्स वर प्रवास करून त्रास होतोच, त्यामूळे माफक खाऊन वगैरे काही फरक पडेलसे वाटत नाही. उद्या जाताना डोळे मिटण्याचा प्रयोग पुन्हा करतो.
बादवे: कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते. बहुतेक सगळ्यांना असे होत नसावे. याचं काय कारण?
9 Jul 2012 - 8:45 pm | गवि
बेताचे खाऊन निघाल्याने बस लागणं कमी होत नाही. फक्त ननंतर होणारी उलटीची तीव्रता कमी होते..
9 Jul 2012 - 10:13 pm | जेनी...
थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं
_______________________
खरच एखाद्याडॉक्टरला दाखवा ...कुणी सांगाव ..काही वेगळच असलं तर? :-o
कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते.
__________________
नेमका कसला वास ..म्हणजे नक्की कशाचा आणि कसा वास येतो ..ते लिहाकिओ पैल वान .... \(
10 Jul 2012 - 5:52 am | तुषार काळभोर
पण अत्यंत घाणेरडा वास येतो, हे नक्की!
9 Jul 2012 - 8:11 pm | तुषार काळभोर
मात्रा लागू पडली असावी. आता येताना बसमध्ये बसल्याक्षणी जे डोळे मिटले ते सहकर्याने हडपसरचा थांबा आल्याचे सांगितल्यावरच उघडले. थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं पण निम्म्याहून कमी. मुख्य म्हणजे आतलं बाहेर नाही आलं.
बाकी उपाशीपोटी ते भरपेट या दरम्यानच्या सार्या लेव्हल्स वर प्रवास करून त्रास होतोच, त्यामूळे माफक खाऊन वगैरे काही फरक पडेलसे वाटत नाही. उद्या जाताना डोळे मिटण्याचा प्रयोग पुन्हा करतो.
बादवे: कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते. बहुतेक सगळ्यांना असे होत नसावे. याचं काय कारण?
15 Apr 2013 - 12:38 pm | बाळ सप्रे
एस. टी. बसला एक विचित्र वास असतो हे मान्य.. त्याने लगेच ढवळायला लागु शकतं.. कारण तो वास तम्बाखूच्या वासासारखाच असतो जवळपास.. पण सर्व चारचाकींच्या वासाने शिसारी येते हे बाकी नवलच.. तुम्ही कदाचित चारचाकी म्हणजे फक्त भाड्याच्या सुमो/ट्रॅक्स वगैरे म्हणताय का? .. कारव आजकालच्या नव्या कार्सचा वास काही दिवस खूप चान वाटतो (परफ्यूमशिवायचा) अगदी नव्या पुस्तकांचा वास जसा छान वाटतो तसाच..
15 Apr 2013 - 2:01 pm | तुषार काळभोर
मला शिसारी आणणार्या गोष्टी:
१. तोच....तंबाखूसारखा वास
२. कारमध्ये वापरले जाणारे उग्र सुगंध (त्यातपण लेमन-सिट्रस लई बेक्क्कार!!)
३. एसी वापरताना दिवसेंदिवस खिडक्या बंद राहतात, त्यामुळे अत्यंत कुबट वास येतो. विशेषतः जे नवकारमालक आहेत, ते गाडीला एसी आहे म्हणून उन्हाळा-पावसाळा-हिवाळा-सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र-मध्यरात्र सदासर्वकाळ खिडकी बंद ठेवून एसी वापरत राहतात. त्यातही एसीच्या कंट्रोल पॅनेल वरचे बाहेरची हवा आत घेणारे बटन कायम बंद असते.
15 Apr 2013 - 2:13 pm | पैसा
१) धूळ, धुके गाडीत येत नाही.
२) खिडक्या उघड्या टाकल्यामुळे पावसात पाणी सूक्ष्म प्रमाणात गाडीत येऊन काचेवर जे बाष्प धरते त्यापासून एसी लावल्याने संरक्षण होते. नाहीतर सीट कव्हर्स ओली होऊन आणखीच विचित्र वास यायला लागतो.
३) खिडक्या उघड्या असतील तर वार्यामुळे गाडीच्या गतीला काहीसा अवरोध येतो.
४) एसी लावल्यास गाडीबाहेरच्या आवाजांचा त्रास होत नाही.
५) एसी लावल्यामुळे लांबच्या प्रवासात फार दमणूक वाटत नाही.
कृत्रिम सुगंधांबाबत सहमत. पण बाहेरून हवा आत घेणारे बटन सतत चालू न ठेवता थोड्या थोड्या वेळाने तसे करणे फायदेशीर ठरते.
गाडीतला कुबट वास बाहेर घालवण्यासाठी गाडी सुरू केल्यावर काही वेळ खिडक्या उघड्या टाकणे आणि गाडी नियमित स्वच्छ करणे हे दोन उपाय आहेत.
12 Jul 2012 - 10:35 am | ऋषिकेश
+१ योग्य सल्ला.
एकदा डायविंग करायच्या आधी आयुष्यात पहिल्यांदा मला होडी लागली होती (भरपूर भरतीमुळे नुसती डुचमळत होती). तेव्हा इन्सट्रक्टरने पाण्यात उडी मारायला आनि होडीत असला तर क्षितीजाकडे लक्ष द्यायला सांगितले होते. दूरवर लक्ष देबणे व कानात गाणी वाजवणे उपयुक्त ठरावे.
शिवाय प्लासिबो देखील काम करेलसे वाटते.
9 Jul 2012 - 11:06 am | सूड
माताय आम्हाला बस, विमान , होडगं काहीच लागलं नाही आजतागायत. या गोष्टी लागणार्या लोकांचा आपल्याला जाम हेवा वाटतो ब्वॉ!!
9 Jul 2012 - 11:19 am | Dhananjay Borgaonkar
आरे चाल्लय काय?? हे असले कसले वांझोटे धागे निघायला लागले?
मला हे लागतय नि ते लागतय....
9 Jul 2012 - 12:08 pm | तुषार काळभोर
तुम्हाला कदाचित कल्पना नाहिए हे प्रकरण किती त्रासदायक आहे ते.
मी हडपसर(पुण्याचं पुर्वेकडील उपनगर)मध्ये राहतो. आठवीला असताना शुक्रवार पेठेतील एका नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला. रोज पीएमटीने जाताना आमचा कार्यक्रम व्हायचा. वर अजून शाळेत जाऊन मी झोपून राहयचो. शेवटी वैतागून २ महिन्यांनी घराजवळील शाळेत प्रवेश घेतला. शाळा चालू होऊन २ महिने झाले होते, त्यामुळे हडपसरलाही चांगली शाळा मिळाली नाही. शेवटी १०वी पर्यंत एका कमी बर्या शाळेत शिक्षण घेतले.
तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला बस लागत नाही!
9 Jul 2012 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
शुक्रवार पेठेत नावाजलेली शाळा ?
आली आली तुमची मर्यादा लक्षात आली. तुम्हाला बस लागते ह्यात आश्चर्य काही नाही.
तुम्ही सरळ नोकरी सोडा आणि घरी एक शिवणयंत्र घेउन टाका. म्हणजे उगा इकडे तिकडे बोंबलत हिंडायला नको, आणि बसल्या जागी फॉल -पिको, अस्तर लावणे इ. धंदे करून चार पैसे पण सुटतील.
9 Jul 2012 - 5:02 pm | तुषार काळभोर
नावाजलेल्या शाळा फक्त पुणे-३० मध्ये असतात?
9 Jul 2012 - 11:42 am | सुहास..
तुम्ही यावर काही " वैदिक " उपाय का करीत नाही ;)
9 Jul 2012 - 6:09 pm | बॅटमॅन
सारली का काडी..जरा वेगळी तरी सारा हो, मग चुळबूळ तरी होईल.
9 Jul 2012 - 12:14 pm | सातबारा
प्रथमतः धागा कर्त्यास यांत्रिक पद्धतींच्या वाहनांचा होणारा त्रास टाळावा म्हणून जैविक पर्याय सुचविला आहे याची मंडळाने कृपया नोंद घ्यावी.
- वाहन म्हणून उपयोग करताना बस जशी लागते त्याप्रमाणे वाहन म्हणून उपयोगात आणताना घोडा तरी लागत असल्याचे कोणतेही निरीक्षण / विदा / इतिहास नाही.
- त्यातूनही ( वाहन म्हणून उपयोग करताना ) घोड्याने लागायचे ठरवलेच तर होमिओपॅथी, प्लॅसीबो, अॅन्टीहिस्टेमाईन इ. गोळ्या घोड्याला खाऊ घालण्याचा प्रयोग करुन पहाता येईल. (गवि वगैरे दिग्गजांनी जरा मदत करावी).
- आम्ही शेतकरी थोड्या अंतरासाठी अजूनही घोडा, बैल इ. वाहतुकीसाठी वापरतो.
- अंडे घालून अथवा घालण्यापूर्वी अथवा वैदिक उपायांनी घोड्याचा वापर करण्याबद्दल काहीही माहीती नाही.
- कुत्राही वापरता येईल. पण त्याच्याबरोबर चालत जावे लागेल. हाही एक आनंददायी अनुभव आहे. (स्वानुभव व अनेक श्वानप्रेमीचा अनुभव. पुन्हा कॉलींग गवि. )
- उपरोल्लीखीत प्राणीविशेष हे वाहनेतर उपयोगासाठीही वापरता येवू शकतात.
9 Jul 2012 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर
श्री. गवि साहेबांनी केलेले आपल्या समस्येचे विश्लेषण अतिशय योग्य आहे.
चांगल्या डॉक्टरला प्रकृती दाखवा. अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि/किंवा आयुर्वेद तज्ज्ञ कोणीतरी नक्कीच औषध देऊ शकेल.
असला धागा मिसळपावर टाकण्याआधी डॉक्टरला तब्येत दाखविणे सयुक्तिक नाही का?
आणि तज्ज्ञ डॉक्टरला तब्येत दाखवूनही उपयोग झाला नसेल तर मिसळपाव सदस्य काय उपाय सुचविणार?
9 Jul 2012 - 12:48 pm | नगरीनिरंजन
(लेख लागणे)
असे याचे एक विडंबन (भडभडून) व्हायला हरकत नाही. आम्हाला आजकाल मिपावरचे अनेक लेख(?!) लागतात.
9 Jul 2012 - 2:03 pm | अरुण मनोहर
मग येऊ द्या की जोरकस विडंबन.
बर्याच लोकांना मिपावरचे लेख "लागतात", म्हणूनच काहींना ते "लागले" तरी मिपावर असे अनेक लेख सतत "लागत" असतात!
9 Jul 2012 - 2:08 pm | नितिन थत्ते
सिरिअस प्रतिसाद देणार होतो पण धागा उधळला जातोय (आणि धागाकर्त्यांनी संमंकडे तक्रारदेखील केलेली नाही) असं लक्षात आल्याने आता प्रतिसाद देत नाही.
9 Jul 2012 - 2:11 pm | कवटी
पैलवान,
'जाहिरातींची विनोदी "वाट"' धागा प्रवास करताना सतत वाचत रहा....
बघा काय काट्याने काटा निघतोय का ते?
9 Jul 2012 - 3:35 pm | चिगो
"पैलवाना"ला हा त्रास होतोय, हे बाचून कसेसेच झाले.. बाकी वर दिलेल्या सल्ल्यांनी काही फरक पडल्यास सांगा ब्वॉ..
9 Jul 2012 - 5:55 pm | अस्वस्थामा
+१
9 Jul 2012 - 3:48 pm | कवितानागेश
Work From Home.
9 Jul 2012 - 6:02 pm | वपाडाव
9 Jul 2012 - 6:06 pm | अस्वस्थामा
जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल तर आमचा हा अनुभव सांगतो..
गावी असताना मला पण बस लागायची, वडाप सुद्धा. अगदी बस स्थानकाच्या परिसरात गेलो की मळमळ व्हायची. पण मुंबईला गेल्यावर विकांताला घरी जाताना दुसरा उपाय नसायचा, मग आधी जेवण न करता ६ ते ७ तास प्रवास करायचो. प्रवासात डोळे मिटून अक्षरशः ध्यान सुरु.. आणि स्वताला सांगत राहायचे की उलटी होणार नाही, मळमळ होणार नाही. दोन महिन्यात जेवण करून देखील त्रास झाला नाही.. आणि सहा महिन्यात डोळे देखील बंद करून बसायची गरज राहिली नाही ( अर्थात प्रवास दर आठवड्याला होत होता)
आता बसच काय पण वडाप देखील लागत नाही..
9 Jul 2012 - 6:29 pm | ५० फक्त
+१,
एक तरी धड उपाय मिळाला म्हणायचा.
15 Apr 2013 - 4:04 pm | नितिन थत्ते
आता शिरिअस प्रतिसाद...... वर दिसावा म्हणून इथे टाकलाय. :)
बस लागणार्या माणसाला खूपच त्रास होतो. बरीच रिस्ट्रिक्शन पाळावी लागतात. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागला तर फार वाट लागते.
मला सुमारे १ किमी अंतरात सुद्धा बस लागते (उलटी झाली नाही तरी मळमळू लागते). अर्थातच झोपाळा, विमान आणि होडीसुद्धा लागते. (रिक्षा व मोटरसायकल सुद्धा जराशी लागण्याचा अनुभव आहे). रेलवे मात्र लागत नाही. (रोलर कोस्टर, एस्सेलवर्ल्ड? हॅ हॅ हॅ)
म्हणून माझ्यासारख्या दुर्दैवी जीवांसाठी .......
काही निरीक्षणे:
१. वारंवार अॅक्सिलरेशन आणि रिटार्डेशन झाल्याने वाहन लागते. त्यामुळे ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरून वाहन जाते तेव्हा अधिक लागते. त्यातही ड्रायव्हर गाडी भसकन सोडणारा आणि कचकन ब्रेक मारणारा असेल तर तेरावा महिना.
२. त्याच कारणाने घाटात गाडी जास्त लागते. वळणावळणांचा रस्ता ही त्यात भर. बहुतेक ड्रायव्हर वळण गेल्यावर बस भरधाव सोडतात (विशेषतः घाट उतरताना) आणि पुढचे वळण आले की एकदम ब्रेक मारतात. उतार + वळण + ब्रेक = उलटी
३. स्वतः गाडी चालवत असल्यास लागत नाही. ड्रायव्हरच्या शेजारी बसला असाल आणि मेंटली तुम्ही सुद्धा गाडी चालवत असाल तर गाडी लागत नाही. (म्हणजे ड्रायव्हर ब्रेक मारणार याचा अंदाज तुम्हालाही आधीच असेल तर).
४. कोकणातल्या लाल डबा एष्ट्या लागण्याचे अजून एक कारण म्हणजे बर्याच एष्ट्यांमधून मासळीची वाहतूक केली जाते आणि मासळीचा वास बस स्थानकात आणि बसमध्ये बर्याचदा भरून राहिलेला असतो. अर्थात कोकणातले वळणांचे रस्ते हा नॉर्मल फॅक्टर असतोच. त्यामुळे मासळी वाहतुक न करणार्या एशियाड सुद्धा लागतातच.
५. आडवे किंवा उलट बसल्याने बस जास्त लागते हे खरे आहे. पण हल्ली बसमध्ये आडव्या सीट नसतात. इतकी वर्षे सिटी बस मध्ये उलट्यासीटही नसत पण हल्लीच्या रिअर इंजिन लेटेस्ट सिटीबसेसमध्ये यडचापसारख्या उलट-सुलट सीट असतात.
आता थोडे उपायांविषयी....
६. घरगुती नुस्के फारसे चालत नाहीत. पोट रिकामे असावे हा उपाय मात्र योग्य आहे. बाकी आवळा सुपारी वगैरेचा काही उपयोग होत नाही. उलट ती खारट असल्याने उलटीला आणखीच ट्रिगर मिळतो. आले (जिंजर रूट) काम करते असे विकिपीडिया सांगतो पण प्रयोग करून पाहिलेला नाही.
७. डोक्याला छान वारा मिळत असेल तर गाडी लागत नाही. पण घाट आला की गाडीचा वेग कमी होतो आणि पुरेसा वारा लागत नाही. मग याचा काही उपयोग नाही.
८. नाक मोकळे नसेल-चोंदलेले असेल तर त्रास जास्त होतो. म्हणून नाक मोकळे राहील असे पहावे.
९. रामबाण उपाय म्हणजे अॅव्होमीनची गोळी. मात्र याने झोप येते. गोळी घेण्याविषयी बरेच प्रयोग करून पाहिले.
९अ. गोळी प्रवासाच्या बरीच आधी घ्यावी. किमान २-३ तास आधी. ती घेतल्यावर शक्य असेल तर डुलकी काढावी. म्हणजे प्रवासाला सुरुवात होतानाच गोळीचा अंमल सुरू झालेला असेल. अगदी बसमध्ये बसताना गोळी घेतली तर काही उपयोग होत नाही. मी सुरुवातीस अशीच आयत्यावेळी गोळी घेत असे.
९ब. गोळी अशी आधी घेतलेली असल्यास बस लागण्याचा त्रास होत नाही असे आढळल्यावर गोळीची मात्रा कमी करत न्यावी. आपल्याला किती/कोणत्या प्रवासाला किती गोळी पुरते याचा अंदाज हळूहळू येतो. याचा फायदा म्हणजे झोपेचे प्रमाण कमी होते आणि तीनेक तासाचा प्रवास करून (गोळी घेऊनही) आपण कार्यालयीन काम करण्याइतपत हुशार राहू शकतो. मी आता मुंबई-पुणे प्रवासाला फक्त पाव गोळी (२५ मिग्रॅमच्या पावपट) घेतो. (विमान प्रवासाला एक अष्टमांश).
९क. गोळीचा इफेक्ट बराच काळ राहतो. आज सकाळी पुण्याला जाऊन उद्या संध्याकाळी परतायचे असेल तर (मला) परतीच्या प्रवासाला (पावच गोळी घेतली असूनसुद्धा) पुन्हा गोळी घ्यावी लागत नाही.
९ड. अॅव्होमीनला पर्याय म्हणून (झोप टाळण्यासाठी) स्टेमेटिल वापरून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अॅव्होमीनला (प्रोमेथाझाईन) पर्याय सापडला नाही.
९इ. वाहन लागणे हा आम्लपित्ताचा विकार नाही. त्यामुळे त्यावरचे उपाय इथे चालत नाहीत.
९फ. होमेपदीचा उपाय करून पाहिलेला नाही.
डिस्क्लेमर: हे प्रयोग मी माझ्यावर केलेले आहेत. ते इतरांना जसेच्यातसे सूट होतील असे नाही. पण करून पाहण्यात काही धोका नाही असे वाटते.
15 Apr 2013 - 5:47 pm | तुषार काळभोर
धागा नविन असताना का नाही हे सांगितलं???
जेन्युईन गाडी लागणारे आहात तुम्ही!
र. च्या. क. ने.
गाडीमध्ये बसताना शक्य तितके मध्यभागी बसणे आणि नजर व ध्यान समोर ठेवणे (मी समोर जाणार्या गाडीकडे बघत राहतो), याने त्रास पुर्णतः बंद झाला आहे. कधी ट्रॅफिक जाम असेल तर मलमळतं पण १० महिन्यात उलटी नाही झाली.
15 Apr 2013 - 6:46 pm | प्यारे१
>>>>नविन असताना का नाही हे सांगितलं???
कारण काँग्रेसचे समर्थकसुद्धा 'सबुरी'चेच नि हेच धोरण वापरतात!
15 Apr 2013 - 9:32 pm | नितिन थत्ते
धागा नवीन असताना सगळे टीपी करत होते म्हणून तेव्हा नाही दिला.
आता जरा सिरिअस चर्चा चाललेली दिसली म्हणून आता प्रतिसाद दिला.
ता. क. - रोज ऑफीसला जाणार्या बससाठी अॅव्होमीन कामाची नाही. पण सवयीने ती बस लागेनाशी होते.
15 Apr 2013 - 8:09 pm | दादा कोंडके
मला क्वालेज पर्यंत बस लागायची. बसमध्ये उलटी होइल म्हणून काहिही खायचो नाही. पण त्यामुळे अधिकच डोकं दुखून मळमळाय लागायचं. उलट एके दिवशी जेवण केल्यावर अचानक प्रवास घडला आणि त्रास झाला नाही. तेंव्हा पासून कधिही त्रास झाला नाही. त्यामुळे प्रवासाआधी अगदी तडस लागे पर्यंत खात नाही पण थोडं खाउनच प्रवास करतो. खरंतर आता पोट रिकामं असं कधी नसतंच. ;)
9 Jul 2012 - 6:59 pm | संजय क्षीरसागर
डोळे आणि कान यांच कोऑर्डिनेशन शरीराच्या सतत हालण्यामुळे मिसमॅच होतं त्यामुळे चक्कर आल्याचा फिल येतो आणि प्रार्थमिक संरक्षक योजना म्हणून शरीर पोटातलं अन्न बाहेर फेकतं.
एक सिंपल उपाय करा, प्रवासापूर्वी कमीतकमी खा आणि प्रवासात इयरप्लग्ज वापरा एकादिवसात तुमचा त्रास थांबेल.
रोज संध्याकाळी आणि सकाळी उठल्यावर, बसून पिंगा* घाला (उजवीकडून डावीकडे) त्यानं हे कोऑर्डिनेशन सुधारतं
काय फरक पडला ते इथे जरुर कळवा
* शरीराचा वरचा भाग चक्राकार फिरवणं (तुम्ही बसलेले असल्यानं चक्कर येणार नाही)
9 Jul 2012 - 7:13 pm | गवि
ईअर प्लग्जनी या यंत्रणेला काही फरक पडेलसे वाटत नाही.
कानांनी ऐकणं आणि बॅलन्ससिस्टीम ववेगवेगळ्या आहेत.
बाकी उपाय योग्य...
9 Jul 2012 - 9:07 pm | संजय क्षीरसागर
एक, डोळे मिटून किंवा दोन, कान बंद करुन. डोळे फार वेळ बंद ठेवण्यापेक्षा कान प्लग करणं सोपयं.
बॉडी बॅलन्सींगच्या आपल्या क्षमतेला सिक्स्थसेन्स म्हटलय ती यंत्रणा कानाच्या अस्थी साखळीशी रिलेटेड आहे त्यामुळे इयरप्लग्ज काम करतील.
नुसतं समोर स्थिर बघून देखील बॅलन्स साधतो पण ते दीर्घकाळ शक्य होत नाही, जरा इकडची तिकडची चाहूल घेण्याचा प्रयत्न झाला की पुन्हा इंबॅलन्स होतो तस्मात इयरप्लग्ज बेस्ट, ट्राय!
10 Jul 2012 - 11:17 am | गवि
विनम्र असहमती..
कानाची "ऐकण्याची" सिस्टीम आणि बॅलन्स सिस्टीम या आपापतः एकाच जागी असल्या तरी कानावर आवाज पडण्याचा आणि बॅलन्स सिस्टीमचा संबंध नाही. ईअरप्लग्जनी कान बंद होतील ते आवाजासाठी/हवेसाठी. कानाच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच त्यातल्या द्रवाच्या हालचाली आणि केसांसारखे बारीक सेन्सर्स यांच्या मदतीने शरीराची पोझिशन समजून त्याचे सिग्नल मेंदूकडे पाठवतो. बाह्यकर्ण बुचाने बंद करुन अर्थात आवाजाची किंवा हवेची कानात एंट्री थांबवून या अंतर्गत यंत्रणेला काही फरक पडणार नाही.
डोळा मात्र थेट दृश्यसंकेत टिपून मेंदूला पाठवतो.. अशा वेळी डोळा बंद करण्याने तो सिग्नलच ब्लॉक होतो आणि गोंधळ टळतो.. तेव्हा कान ईअरप्लगने बंद करणं हे या प्रक्रियेसंदर्भात डोळे बंद करण्यासारखं (इक्विव्हॅलंट) नाहीये..
तुम्ही सांगितलेली हालचाल मात्र यासाठी जरुर उपयोगी पडत असेल कारण कानातील त्या हाडनलिकांमधल्या द्रवात तयार होणारे गाळसदृश कण सेन्सर्सना बिघडवतात आणि संदेशात गडबड होऊन चक्करल्यासारखं होतं. डोक्याच्या काही ठराविक हालचाली सुरक्षितपणे / सुपरव्हिजनखाली करुन हे गाळाप्रमाणे खाली सेटल झालेले कण वेगवेगळे (डिस्पर्स) करता येतात आणि त्यांचा एकत्रित तीव्र परिणाम कमी करता येतो असं वाचलं आहे. काहीजण तर अशा हालचालींनी हे कण / सूक्ष्म खडे त्या कॅनाल्सच्या बाहेर ढकलू शकत असल्याचाही दावा करतात..
10 Jul 2012 - 11:41 am | संजय क्षीरसागर
अरे, असा संबंध आहे. ती सिस्टम ध्वनीनं उद्दिपित होते त्यामुळे जितका गोंगाट कमी तितकी सिस्टम रिसेट व्हायला मदत होते (कारण तेवढं इरिटेशन कमी). डोळे बंद होऊ शकतात पण कान सदैव ओपन असल्यामुळे कानावर आपल्या नकळत ध्वनींचे अविरत आघात होत असतात.
कधीही इयरप्लग्ज वापरुन पाहा तुम्हाला शांत वाटेल, या शांततेतनं ते कोऑर्डिनेशन सुधारतं असा ज्यांना तो उपाय सुचवलाय त्यांचा अनुभव आहे. त्यांना प्रयोग तर करुन पाहू दे, नंतर त्यांचा अनुभव बघूया.
9 Jul 2012 - 8:59 pm | सुनील
तर....
मागील सोमवारी मी नवीन संस्थळावर रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी एका आयडीने जायचो. या नविन ठिकाणी मला नव्या आयडीची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'लेख लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ लेखापुरता मर्यादित नाही. काथ्याकूट, कविता, पाकृ पर्यंत काहीही लागते, जिलब्या खाऊन वा न खाता, वैदिक उपचार करून वा न करता कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्याचदा १-२ वाक्यातच त्रास होतो, तर क्वचित कित्येक क्रमशः सुद्धा मला त्रासरहित लेख वाचता येतो.
तर असा त्रास का होतो?
त्यावर काय उपाय करता येतात? (लेख लागण्यावरचे इनो घेणे इ. उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
10 Jul 2012 - 12:55 am | कुंदन
एखाद्या चांगल्या संपादकाला दाखवा.
10 Jul 2012 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार
मा. सुनील शेठ, तुम्हाला हा त्रास प्रत्येक वेळी लॉग-इन केल्यावरती जाणवतो, का फक्त बुधवारी रात्री वैग्रे ?
10 Jul 2012 - 8:22 pm | तुषार काळभोर
आज जाताना अन येतानापण डोळे गच्च मिटून घेतले आणि कमी त्रास झाला. प्रवासादरम्यान थोडं पोटात ढवळत होतं, पण आज सहनशक्तीच्या मर्यादेत होतं. आता उद्या क्षीरसागरसाहेबांनी सांगितले तसे करतो (पण डोळे मिटून!). इयरप्लग्ज ऐवजी एयरफोन वर गाणी ऐकत बसतो. बघू दोन्हीचा काही एकत्रित फायदा होतो काय!!
तर....
१ तासाच्या असह्य प्रवासातून बर्यापैकी सुटका करण्यासाठी मदत करणार्या सर्वांचे (विशेषतः गवि) आभार!
जे सुदैवी या त्रासापासून अनभिज्ञ आहेत, त्यांचे अभिनंदन!!
10 Jul 2012 - 9:27 pm | अर्धवटराव
तुम्हाला हा त्रास फार पुर्वीपासुन होतोय, आणि वर सांगितलेले उपाय कुठलिही स्पेशल ट्रीटमेण्ट न देणारे सहज साधे असे आहेत. तुम्हाला पुर्वी हे कुणिच सुचवलं नाहि? बस लागण्याचा इतका त्रास होणारा व्यक्ती प्रवासात आपसुक डोळे बंद करुन गप पडुन राहिल, अगदी सहज प्रतिक्रिया आहे ति. आणि त्यामुळे त्याला बरं वाटलं तर आणखी नेटाने प्रयत्न करेल... तुमची लिंक कुठे तुटली असावी?
अर्धवटराव
11 Jul 2012 - 6:52 am | चौकटराजा
पैलवान, तुम्ही हा काहींच्या मते टुकार धागा काढला व काहींच्या " ज्वलंत" प्रश्नाची दखलही तुमच्या धाग्याने घेतलीय. आता यातून अफगाण डायरी, अॅन फ्रॅंकची डायरी, या धर्तीवर आपण " पैलवानाच्या ओकारीची डायरी" असे पुस्तक काढा. प्रकाशनाचा व्यवसाय करणारा आय डी इथे असेल तर त्याला पकडा. दोघानाही अनुक्रमे लेखक व प्रकाशकाचे एखादे मेडल मिळून जाईलही ! कुणी सांगावे ?
11 Jul 2012 - 1:11 am | रेवती
मळमळायला लागलं की तोंडात बर्फाचा खडा ठेवावा असे म्हणतात पण रोज बर्फ कसे मिळणार म्हणून हा उपाय सुचवत नाहीये. ;) बाकी मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचून गेलात तरी मळमळ थांबेल.
11 Jul 2012 - 2:03 am | मराठे
बसमधे पेट्रोल किंवा डिझेलच्या वासाने काही जणांना मळमळतं! असं होत असेल तर नाक मुठीत धरून बसण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे वर म्हटल्यांप्रमाणे, डोळे, कान आणि आता नाकही बंद करून बस मधे बसावं !
पंचेंद्रियांपैकी तीन बाद झाली. आता राहिले स्पर्ष आणि स्वाद. बसमधे काही खाण्यासाठीतरी तुम्ही तोंड उघडण्याची काही शक्यता नाही. त्यातून लिमलेटच्या गोळ्यांची गुळणी तोंडात घेऊन बसलातच तर खाली उतरल्यानंतरच तोंड उघडा, नाही तर बसमधे पुन्हा रंगपंचमी व्हायची.
राहता राहिला स्पर्ष! बरं, पैलवान तुम्ही , त्यामुळे तुमच्या अंगाला हात लावायची कोणाची टाप असणार! (तुम्ही कोणाला हात लावायला गेलात आणि त्यातून काही राडा झालाच तर मंडळ जबाबदार नाही)
थोडक्यात बसमधे बसल्यानंतर कोणताही अवयव खिडकीतून बाहेर काढू नये म्हणतात ना! तसंच तुम्ही तुमच्या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा !! म्हणजे थोडक्यात आदिभौतिक बशीतून प्रवास करता करता तुम्हाला डायरेक आध्यात्मिक पियच्डीचा अभ्यास करता येईल की हो! अधिक माहिती साठी मिपावर चिक्कार जितेंद्रिय आहेतच!
11 Jul 2012 - 11:16 am | संजय क्षीरसागर
आज पहिल्यांदा फिडबॅक पाहिला नाही तर संकेतस्थळावर सल्ला मागितला जातो पण उपयोग झाला किंवा नाही ते कळवलं जात नाही. तुमच्या अनुभवाचा अनेकांना फायदा होईल. तुमच्या प्रश्नावर मी देखील विचार करत होतो पण क्लू मिळत नव्हता, गविनं एकदम जिनीअस आणि अचूक कारणमिमांसा केली त्याचं कौतुक आहे.
इयरफोन वापरणार असाल तर चाललेलं गाणं लक्षपूर्वक ऐका त्यानं एकाच वेळी डायवर्शनही होतं आणि तोल रहायला मदत होते.
बॅलन्स रिस्टोअर होण्यासाठी घरात उलटं चालणं (बॅक वॉक) सकाळ- संध्याकाळ रोज दहा मिनीटं आणि वर सांगितलेलं रोटेशन करा तुमचा त्रास संपेल
11 Jul 2012 - 2:07 pm | कवितानागेश
एकदा पालखी करुन बघा.
11 Jul 2012 - 2:09 pm | शिल्पा ब
खांदा तुम्ही देणार का? नै म्हणजे पालखी उचलायला पालखे लागतात ना म्हणुन आपलं विचारलं.
11 Jul 2012 - 2:18 pm | कवितानागेश
नाही. मी इतकी कनवाळू नाही.
मी फक्त माझे मौलिक विचार फुकट वाटते.
बाकी कुणासाठी काहीही करत नाही.
त्यांचे ते बघतील अजून ४ पैलवान.
11 Jul 2012 - 2:38 pm | सूड
पालखीसाठी चार कशाला, दोन भोई पुरतील की माऊ. फक्त पालखी चांगल्या मजबूत लाकडाची बघा म्हणावं.
11 Jul 2012 - 3:23 pm | कवितानागेश
अस्से क्काय? मला माहित नव्हते.
आमच्याकडे नै ना पालखी. :(
त्य पालखीला खाली २ चाके बसवून घेतली तरी बरे पडेल. ( ४ नकोत. लागतील)
१ भोई सुट्टीवर गेला कि दुसरा हातगाडीत कन्व्हर्ट करेल पालखी.
त्या थ्रीडी वाल्याला बोलवा रे कुणीतरी पालखी कम हातगाडीच्या डिझाईनसाठी.
11 Jul 2012 - 2:28 pm | कवटी
आयला कधीही आले तरी कोणी ना कोणी ओकून हा धागा पयल्या नंबरात आणलेला असतोच....
सारखा हा धागा बघुन अम्हाला हापिसात बसल्या बसल्या डुचमळायला लागतय आणि अता खुर्ची लागेल का काय असे वाटतय....
संपादकांनी हा धागा लवकरात लवकर वाचनमात्र करावा.
12 Jul 2012 - 11:46 am | प्यारे१
अग...अप्प्प्प्प् ..दी ग्ळूकक्क्क... ख -ग्ळू.. रं -बो ललात...
ब्ळॉक्क्क्क्क्क्क्क्क! वॉSSSSSSक.
- <अतृप्त आत्मा.> ;)
12 Jul 2012 - 4:08 pm | आर्य
माझ्या काही मित्रांना / मैत्रीणींना हा त्रास होता किंवा कहींना कमी जास्त प्रमाणात अजुनही आहे.
रिक्षा / दुचाकी / विमान यांना लागत नाही पण सर्व प्रकारच्या (खासगी / सरकारी - अगदी शिवनेरी किंवा ऐरावत दर्जाच्या मल्टी-एक्सेल देखील) बस लागायच्या. विमान उतरताना / बंपी असेल तर ऐक दोनदा त्रास झालेला बघीतलाय, तिरुपतीचा घाट उतरताना हमखास......काय तेदृष्य बस थांबवून बाया ओकतायत नुस्त्या. माझ्या सहकार्याला प्रवासात वाचले की गरगरते.
या वर उपाय म्हणजे प्रवासाची सवय ..............
३ वर्षापुर्वी बेंगलोरला असताना (आता मुंबईत) रोज / शनिवार-रविवारी जवळपास फिरायला न्यायचो, अर्थातच जबरदस्ती 'कर्नाटक एस्टीने'. वाटेत गप्पा गोष्टी करायच्या, गाणी एकाची पण उलटीचा विचार येऊ द्यायचा नाही, अवोमीन ची गोळी किंवा चुरमुरे खाणे उपयुक्त आहे. वाचन, चित्रपट पहाणे / गेम्स टाळा. ' प्रेशर ' (लधवी / संडासचे) असल्यास प्रवास करुन नका नाहितर तुमची पालखी वर जाणार हे नक्की. बस जरा बर्या दर्जाची पाहुन बसणे.
हलका आहार " तेलकट नाही "तसेच प्रवासा पुर्वी आणि नंतर आइसक्रीम उपयुक्त आहे.
थोडी गंमत - शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या खुर्चीला / बाकाला / बस मधल्या सिटला पाय लाऊन हालवा .....मग बघा असे उलटी वाले लोक बाहेर जाऊन येतात ......नाहीतर तुम्हाला बाहेर काढतात कि नाही ते.
12 Apr 2013 - 3:53 pm | आशु जोग
एस टी बसला नावे ठेवण्यामागे एक कावा आहे
यामुळेच इतर खासगी बसवाल्यांचे फावते.
गर्दीच्या काळात तर दीड दोन पट महाग करतात तिकिट.
आम्हा विदर्भवाल्यांना xता वोल्वो, xराणा ट्रॅवल्स लुटतात.
आणि गरीबरथमधे गरीबांची गर्दी. त्यातही जागा मिळत नाही
12 Apr 2013 - 5:59 pm | नितिन थत्ते
खाजगी बस लागत नाही?
13 Apr 2013 - 8:47 am | श्री गावसेना प्रमुख
यस टी ला नवे ठेवण्यामागे आवळ्याचे पाकीटे विकनार्यांचा कावा आहे,यस टी ज्याला लागते तो हमखास आवळा घेतो.
13 Apr 2013 - 11:42 am | आदूबाळ
आवळा....सॉरी सॉरी....आवरा!
15 Apr 2013 - 12:08 pm | कंजूस
बस ,लेख ,आणि आयडिपण लागतात .मूळ मुद्यावर येतो . हैंड सैनिटाझर ,विमचे पाणी ,अथवा कोका कोला यामध्ये रुमाल भिजवून नाकाशी धरून पाहा . बसच्या सीट कवरर्समध्ये एक प्रकारची बुरशी असते तिचा संपर्क आपल्याच हाताने नाकातोंडाशी होतो आणखी बसचे विचित्र हलणे भर घालते .या बुरशीची काहींना फार अॅलर्जी असते . कोका कोलातील फास्फोरिक अॅसिड अथवा विम पाउडरमधले ट्रायसोडिअम फॉस्फेट काम करेल .
28 Nov 2014 - 4:00 pm | टवाळ कार्टा
=))