रायआवळ्याचा चटका

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
9 Apr 2013 - 1:28 pm

या उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते. हे रायआवळ्याचे झाड पहा कसे बहरलेय!!
aavla
या रायआवळ्याचा चट्का फार रुचकर होतो.
साहित्यः चाळीस आवळे, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार, फोड्णीचे साहित्य.
sahitya
कृती: रायआवळे धुऊन बीच्या बाजूचा भाग चिरून घ्यावा. मिरच्या धुऊन मिरच्या व चिरलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरवर फिरवून घ्यावे. आवळ्यांच्या प्रमाणात तुम्हाला पाच सहा मिरच्या कमी वाट्तील पण मी गावठी मिरच्या वापरल्या आहेत त्या खूप तिखट असतात. नेहमीच्या लांबड्या मिरच्या कदाचित जास्त लागतील. वाटलेल्या मिश्रणात साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. वाट्ताना साखर किंवा मीठ घालू नये. आवळ्याला पाणी सुटून चट्का पातळ होतो. एक चमचा तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार झाल्यावर चटक्याला द्यावी. आंबट, गोड, तिखट असा जिभेला चव आणणारा चट्का तयार!!
हा चटका फ्रिजमध्ये दोन तीन दिवस टिकतो. याशिवाय या आवळ्याचे सरबत छान होते. नेहमीच्या खोबय्राच्या चटणीत आंबटपणासाठी हा आवळा वापरला तर ती चवही वेगळी लागते.
याशिवाय रायआवळ्याचे आणखी काही प्रकार होत असतील तर जरूर शेअर करा. आमच्या बागेत खूप आवळे लागलेत. वर फोटो पाहिलात ना!
chatka

प्रतिक्रिया

भारीच! मिठाऐवजी शेंदेलोणाने जास्त चांगली चव येईल असं वाटतं...

मी_आहे_ना's picture

9 Apr 2013 - 2:29 pm | मी_आहे_ना

तोंपासु...झकास!

दिपक.कुवेत's picture

9 Apr 2013 - 2:32 pm | दिपक.कुवेत

चटका.....चटका लावुन गेला. ब्येस्ट तोंडिलावणे

का आठवण काढलीत? आता इथे आवळे कुठे शोधू?
भले मोठ्ठाले कोहळे मिळते पण ते देऊनही औषधालाही आवळा मिळायचा नाही. :(

प्रचेतस's picture

9 Apr 2013 - 2:37 pm | प्रचेतस

चटकदार एकदम. तोंपासू.

अक्षया's picture

9 Apr 2013 - 2:41 pm | अक्षया

मस्तच.
फोटो आणि रेसिपी दोन्ही छान. :)

पियुशा's picture

9 Apr 2013 - 3:08 pm | पियुशा

तो.पा.सु.

पैसा's picture

9 Apr 2013 - 3:14 pm | पैसा

चटका राहू देत, राय आवळे खायला येतेच २ दिवसांत!

नक्की ये.

सानिकास्वप्निल's picture

9 Apr 2013 - 5:52 pm | सानिकास्वप्निल

चटकदार पाकृ :)

रेवती's picture

9 Apr 2013 - 6:00 pm | रेवती

मस्त.

Mrunalini's picture

9 Apr 2013 - 6:55 pm | Mrunalini

आईग्ग्ग्ग्ग.... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स... ते आवळे बघुनच तोंडाला पाणी सुटले.. लहान असताना खुप खाल्ले होते हे आवळे. मस्त लागेल चटका. यम्म यम्म...

कोंकणाची पुन्हा एकदा तीव्र आठवण करुन दिलीत.

हे आवळे पिकून आंबटगोड झाले की काय टेसदार बनतात.. वा.. त्या तुरट अन्य आवळ्यांना ती चव नाही.

पण अजूनही डोंगरी आणि राय या आवळ्यांच्या नावांविषयी माझा गोंधळ होतो. उपरिनिर्दिष्ट आवळे हे मी आपले रत्नांग्रीचे आवळे म्हणून ओळखतो. शिवाय याच्च आवळ्यांची "शिंपटी" आठवते का कुणाला ? अय्याई ग...!!

बॅटमॅन's picture

9 Apr 2013 - 7:19 pm | बॅटमॅन

च्यायला!!!! आता हे आवळे हुडकणे आले. तोंडात उचंबळणार्‍या कारंज्यांनो, जरा शांत रहा!! :)

प्यारे१'s picture

9 Apr 2013 - 7:22 pm | प्यारे१

हम्म्म!
आवडला 'चटका'
-आडनाव आवले असताना आवळे झालेला प्यारे१

जेनी...'s picture

9 Apr 2013 - 8:16 pm | जेनी...

आईशप्पथ ! :(
अ‍ॅड्रेस्स दीयु का ?? आवळे पाठव्तिस का ???
लै खाऊ वाटताइत :(
काल मला कच्ची कैरीपण खौ वाटत होती :-/
मिपावरची नै बर्का :D

प्यारे१'s picture

9 Apr 2013 - 8:51 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन पूजातै!

जेनी...'s picture

9 Apr 2013 - 8:58 pm | जेनी...

ओ प्यारे काकु ... कै पण कै :-/

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2013 - 10:05 pm | पिवळा डांबिस

आयला, तो पहिला फोटोच इतका चटका लावून गेला की पुढलं वाचणं/पहाणं अशक्यच झालं!!!

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2013 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी

मी लहान असतांना या आवळ्यांचे झाड माझ्या मित्राच्या घरी होते. फारच खास वाटायचे हे आवळे पाडून खायला.
त्यांना रायआवळे असे म्हणतात हे प्रथमच कळले. त्यानंतर कधीही हे आवळे पुन्हा दिसले नव्हते.

पाककृतीही रोचक वाटत आहे.

सूड's picture

10 Apr 2013 - 12:01 am | सूड

मस्तच !!

nishant's picture

10 Apr 2013 - 2:29 pm | nishant

मस्त चट्कदार ...!!

जयवी's picture

10 Apr 2013 - 2:34 pm | जयवी

आई गं........कस्लं पाणी सुटलंय तोंडाला .... !!
माझ्या आईकडे मोठं झाड होतं रायआवळ्याचं :)
ए रायआवळे जर मिळाले नाही तर साधे आवळे घेऊन पण चव तशीच लागेल का गं ?

कच्ची कैरी's picture

10 Apr 2013 - 3:16 pm | कच्ची कैरी

आवडला चटका :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2013 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हं. आवडल्या गेलं आहे. झाडाला लगडलेल्या रायआवळ्याच्या पहिल्याच चित्रास पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.

-दिलीप बिरुटे

नाहीतर फोटु पाहून समाधान!! हा फोटो सानिकामुळे पोहोचला तुमच्यापर्यंत्, कारण एकापेक्षा जास्त फोटो लोडवता येत नव्ह्ते मला!!
सर्व तोंपासुंचे आभार!!

शुचि's picture

11 Apr 2013 - 12:10 pm | शुचि

मार डाला!!!

गौरीबाई गोवेकर's picture

11 Apr 2013 - 1:57 pm | गौरीबाई गोवेकर

मस्तच ग अनन्या..

स्मिता.'s picture

11 Apr 2013 - 2:23 pm | स्मिता.

पहिला आणि दुसरा फोटो पाहूनच तोंडाला इतकं पाणी सुटलं ना... आता हे आवळे कसे मिळवायचे ते सांगा!

स्पंदना's picture

11 Apr 2013 - 4:48 pm | स्पंदना

किती खायचो लहाणपणी! आता नावालाच काय पण पहाय्लाही मिळत नाही.
चटका वाचताना चटका लागला बघ मनाला.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2013 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

हा...य!!!

http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent072.gif

अनन्न्या's picture

11 Apr 2013 - 6:46 pm | अनन्न्या

आवळ्यांसाठी लटकू नका!! कोण काढून टाकिल ही पोस्ट? उगाच पाडव्याच्या दिवशी लट्कवल्याचे पाप!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2013 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

@कोण काढून टाकिल ही पोस्ट? उगाच पाडव्याच्या दिवशी लट्कवल्याचे पाप!>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :D :D :D ...शॉलीईईईईईईईईईईईईई.......... =)) हम्कू भावना व्यक्त करने कू ऐसाइच होता है, क्या करें??? =))

सुमीत भातखंडे's picture

12 Apr 2013 - 1:53 pm | सुमीत भातखंडे

खरोखरचा चटका बसला राव...तोंपासु

जागु's picture

15 Apr 2013 - 12:40 am | जागु

आहाहा मस्तच.

धनुअमिता's picture

15 Apr 2013 - 2:12 pm | धनुअमिता

आवडला चटका