भानोळी

साबुदाणा खिचडी's picture
साबुदाणा खिचडी in पाककृती
4 Apr 2013 - 5:44 am

a
बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या
डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या
नारळाचे दूध - १ वाटी
मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे
२ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी)
सोडा चिमूटभर
तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
धणे-जीरे पूड - १ चमचा
मीठ व साखर चवीनुसार
तेल - ४ चमचे

भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात. रात्रीच्या जेवणात अथवा जेवणाऐवजी हा पदार्थ खाऊ शकतो.

कृती - चिरलेला कोबी, वाटण, अंडी, तिखट, मीठ, हळद, धणे-जीरे पूड, २ चमचे तेल व साखर एकत्र करुन घेऊन त्यात डाळीचे पीठ व चिमूटभर सोडा घालावा. वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पीठासारखे भिजवावे.पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम.

गरमागरम भानोळी सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

पदार्थ छान दिसतोय. अंडे न घालता पदार्थ करायचा असेल तर सोड्याचे प्रमाण वाढवावे लागेल ना? (ही चेष्टा नाही). हे एक छान तोंडीलावणे वाटते आहे. हांडवो नावाच्या पदार्थाची आठवण आली.

साबुदाणा खिचडी's picture

4 Apr 2013 - 6:08 am | साबुदाणा खिचडी

अगदी बरोब्बर. सोडा वाढव फक्त.

यशोधरा's picture

4 Apr 2013 - 6:52 am | यशोधरा

फोटो एकदम मस्त!

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2013 - 9:39 am | पिलीयन रायडर

किती तो गोंधळ... मला वाटलं की "भानोळी" ने " साबुदाणा खिचडी" बनवली आहे..
डोक्यात घोळ झालाय सगळा...

अवांतर...
पाककृती छान आहे!! एक्दम वेगळंच काहीतरी..!!

सूड's picture

4 Apr 2013 - 1:33 pm | सूड

सहमत !!

मस्तच पाकृ! वाचनखुणेत टाकला आहे.

भानोळी हे नाव पण भारी आहे. काहीतरी जादूटोणा केल्यासारखं वाटतं...

दिपक.कुवेत's picture

4 Apr 2013 - 11:32 am | दिपक.कुवेत

नाव वाचुन वाटल कि घावन वगैरे सारखा तत्सम पदार्थ असेल.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2013 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

जबर्‍यादस्त एकदम !

कवितानागेश's picture

4 Apr 2013 - 11:52 am | कवितानागेश

काय मस्त फुललीये केकसारखी. मी हा पदार्थ भानोले म्हणून पाहिलाय.
पण इतका फुललेला कधी पाहिला नाही. कदाचित अंड्यामुळे असेल.

यशोधरा's picture

4 Apr 2013 - 11:59 am | यशोधरा

अंड न घालता करता येते का? :D

सानिकास्वप्निल's picture

4 Apr 2013 - 12:40 pm | सानिकास्वप्निल

कोबीचे भानोले मस्तंच
हे अंडे ही घालून बनवु शकतो माहित नव्हते, आता ट्राय करुन बघीतले पाहीजे.
भानोले एकदम टम्म फुगले आहे :)

अवांतरः फ्रिटाटासारखे वाटत आहे ;)

गणपा's picture

4 Apr 2013 - 12:54 pm | गणपा

आवडता पदार्थ.
आजीच्या हातच्या गरमा गरम भानोळ्यांची आठवण करुन दिलीत.

भानोळी अजून खाल्ली नाहीत. पण पाककृती आवडली, करून बघेन.

स्मिता चौगुले's picture

4 Apr 2013 - 3:30 pm | स्मिता चौगुले

पाकॄची कॄती संपवायची खूपच घाई केलीत, थोडे सविस्तर लिहायला हवे होते

पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम

बाकी पाकॄ छानच आहे

तर्री's picture

4 Apr 2013 - 3:36 pm | तर्री

पाकृ आवडली . नुसतीच खायची की सॉस ,चटणी कश्याला लावून खायची ? की भानोळी ला लावून पोळी - चपाती - भाकरी खायची ?
<कशाला तरी काही तरी लावून खायला हवेच का ? >

कच्ची कैरी's picture

4 Apr 2013 - 4:24 pm | कच्ची कैरी

मस्त आणि नविन ! चवीला चांगले असेल असे वाटते :)

सर्वांचे प्रतिसादांकरता आभार. आईंनी (सासूबाई= सा.खि.) काल बनवली. मी सॉसबरोबर खल्ली. अतिशय चविष्ट झाली होती. पण नुसतीही मस्त लागते.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2013 - 3:19 am | पिवळा डांबिस

"कोलंबी किंवा करंदीचीही" करता येते, "आलं+लसूण+मिरची+कोथिंबीर वाटण" वगैरे प्रकार वाचून संशय आलाच होता!!!!
आयला, गेल्या पंचवीस वर्षांत आमचा अभ्यास काय सुसाट वाढलाय!!!!!!!
:)

ओह, आत्ता लक्षात आले की तू का आभार मानते आहेस! मज्जा आहे तुझी :)
साखिकाकू, इधर भी आना देव भानोली आणि काय काय पदार्थ! ;)

खूप छान दिसते आहे.

मस्त दिसते आहे भानोळी... थोडेसे हांडवो सारखेच वाटते.. पण मी अंडे न घालता करुन बघेल.

अभ्या..'s picture

5 Apr 2013 - 12:45 am | अभ्या..

काय काय नवीन नवीन रेशिप्या यायलागल्यात मिपावर. एकसे बढकर एक.
काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे की काय?
शुचिमामीच्या मामींना धन्यवाद.

काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे की काय?

काय रे कळ लावणार्‍या नारदा?

शुचिमामीच्या मामींना धन्यवाद

=)) =))

अभ्या..'s picture

5 Apr 2013 - 1:23 am | अभ्या..

कळ लावणार्‍या नारदा

कशाला उगीच दुसर्‍याच्या पदव्या मला? :(
मी तुमच्या घरातल्या स्पर्धेविषयी थोडेच म्हणले ;) मिपावरच्या सगळ्या मास्टरशेफांना उद्देशून म्हणले.

प्यारे१'s picture

5 Apr 2013 - 1:28 am | प्यारे१

>>> मास्टरशेफांना

नि शेफा''लिनापण!('र' टाकावा काय मध्ये? )
ऊत ऊत आणलाय रे नुसता! ;)

पण मामीच्या मामींना सूट देऊ.
रच्याकने साबुदाणा खिचडी उद्या बोंबिल फ्राय नायतर खेकड्याचं सूप करणार नाहीत ना? ;)

प्यारे तुम्ही नाही नाही त्या पदर्थांची नावं घेऊन छळू नका. इथे ना बोंबील मिळतात न खेकडे. :(

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2013 - 10:00 pm | पिवळा डांबिस

बोंबलाचं माहिती नाही कारण ते फक्त भाग्यवंतांनाच मिळतात,
पण खेकडे इथे नक्की मिळतात आणि तेसुद्धा विविध प्रकारचे!!!
शोधा म्हणजे सापडतील!! (या वीकेंडचा शुचिचा गृहपाठ!!!)
:)

पिडां, डेलावेअरला असताना खूप म्हणजे चिक्कार चिक्कार खेकडे (चिंबोर्‍या) खाल्ले हो. पण इथे विस्कॉन्सिन ला नाही ना दिसले (सुपिरीअर मध्ये तरी) इथे तो वालाय मासा मिळतो. तो खायचाय.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2013 - 10:14 pm | पिवळा डांबिस

अरेरे!! :(
(आणखी काय बोलणार? एक मिनिट शांत उभा राहिलो आहे!!!)

इन्दुसुता's picture

5 Apr 2013 - 9:13 am | इन्दुसुता

पाकृ आवडली. नक्कीच करून बघणार.

मला त्या ताटली खाली जे काय क्रोशाचं टाकलय .. तेही खूप आवडलं रंगीबिरंगी!!

शुचि's picture

5 Apr 2013 - 5:52 pm | शुचि

ते विकतचं आहे :)

स्पंदना's picture

5 Apr 2013 - 5:38 pm | स्पंदना

मस्त दिसतेय भानोळी.
खरच आणखी असे वन डिश मील पदार्थ येउ देत.

पैसा's picture

5 Apr 2013 - 8:59 pm | पैसा

माझ्याकडे "सी के पी खासीयत" असे एक पुस्तक आहे. त्यात ही पाकृ वाचली होती. पण आज फोटो पाहिल्यामुळे करू शकेन असे वाटत आहे. शुचे, तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप पारंपरिक पाकृ असतील. सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे. अधून मधून अशा पाकृ देत जा.

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2013 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी

सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे.

आजवर कधीच खायची संधी मिळाली नाही, जरा आश्चर्यच वाटले...

पैसा's picture

5 Apr 2013 - 10:44 pm | पैसा

माझे नातेवाईक, मैत्रिणी कोणीच सी के पी नाही! :(

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2013 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी

यापुढे मिळावेत यासाठी शुभेच्छा!!

तुमच्या या प्रतिसादामुळे फार पूर्वी खालेल्या पदार्थांच्या चवी आठवल्या :-). आजकाल घरोघरी टिपिकल चवी असतीलच असे काही राहिले नाही.

तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप पारंपरिक पाकृ असतील
त्यातल्या शाकाहारी पाकृही येऊद्या!

अगं आमची खिचडी आहे. आई कोब्रा, बाबा सी के पी अन सासूबाई दैवज्ञ (सोनार). :)

पैसा's picture

5 Apr 2013 - 9:46 pm | पैसा

मग तर तुला असे काही काही बघायचा आणि करायचा अगदी भरपूर चान्स आहे!!

आई खूप चविष्ट कोशींबीरी अन चटण्या , मसालेभात आदि करते. सासूबाई पाया, मटण, मासे, चिकन फार सुरेख बनवतात. हे सगळं शिकायचय :(

गौरीबाई गोवेकर's picture

11 Apr 2013 - 2:02 pm | गौरीबाई गोवेकर

खाल्ले होते आगोदर. पाहून आठवण झाली.

सूड's picture

11 Apr 2013 - 8:49 pm | सूड

कोसळवडीची रेसिपी माहितीये का हो शुचिमामीच्या मामी? (तूरडाळीची करतात ती? इफ आयाम नॉट राँग)

शुचि's picture

11 Apr 2013 - 9:14 pm | शुचि

विचारते आईंना.