जेम्स बाँडच्या ललना..

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
25 Mar 2013 - 9:09 am
गाभा: 

जेम्स बाँड आणि त्याच्या चित्रपटांचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. थंड डोक्याचे गुंड, "क्यू" ची भन्नाट उपकरणे, वेगवान गाड्या आणि मदमस्त बाँडबद्दल सगळीकडेच चर्चा होते. पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्‍या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. किंबहुना चित्रपटांमध्येसुद्धा त्या दिसतात काही ठराविक कारणांसाठीच. या धाग्यात आपल्याला आवडलेल्या बाँडललनांबद्दल काथ्या कुटूया. अगदी पहिला बाँडपट डॉ. नो मधल्या उर्सुला अ‍ॅनड्रेस पासून नुकत्याच आलेल्या स्कायफॉल मधल्या निओमी हॅरिस पर्यंत सगळ्यांबद्दल. त्या बहाण्याने या अभिनेत्रींबद्द्ल रंजक माहिती कळेलच, सोबत चाहत्यांच्या त्या त्या चित्रपटांच्या आठवणीसुद्धा जाग्या होतील.

ही सगळ्यात पहिली बाँड ललना - उर्सुला अ‍ॅनड्रेस (डॉ. नो मधली)
u

प्रतिक्रिया

हे इथे टाकण्याएेवजी तूच लेख लिही की.

नानबा's picture

25 Mar 2013 - 11:32 am | नानबा

सगळं मी लिहिण्यापेक्षा वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या तर अजून मजा येईल.. प्रत्येकाच्या आवडीची ललना वेगळी, तिच्याबद्द्लच्या भावभावना वेगळ्या... म्हणून म्हटलं येऊद्यात प्रतिक्रिया...

प्रत्येकाच्या आवडीची ललना वेगळी, तिच्याबद्द्लच्या भावभावना वेगळ्या..

नक्की का? ;) =))

कपिलमुनी's picture

25 Mar 2013 - 12:14 pm | कपिलमुनी

सर्व ललनांचे फोटू टाका ..मग धाग्यावर मजा येइल

बाँडच्या ललनांची छायाचित्रे इथे पहा.....

मालोजीराव's picture

25 Mar 2013 - 3:44 pm | मालोजीराव

Solange Dimitrios सगळ्यात फेव्हरेट…

bond girl

हिसुद्धा अप्रतिम.. विशेषतः तिची समुद्रकिनार्‍यावरून घोड्यावरून जाताना टिपलेली अदा खासच.. पण ही अख्ख्या चित्रपटात नव्ह्ती ना, म्हणून हिला संपूर्ण बाँड ललना म्हणणं थोडं जिवावर येतं..

नानबा's picture

25 Mar 2013 - 2:06 pm | नानबा

मला आवडलेल्या बाँड ललना
Barbara Bach - (The Spy who Loved me)
a
.
.
.
Isabella Scorupco - (Goldeneye)
s
.
.
.
Sophie Marceau - (The world is not Enough)
s
.
.
.
Denise Richards - (The world is not Enough)
d
.
.
.
आता पर्यंतची सर्वांत हुशार आणि स्मार्ट दाखवलेली बाँड ललना, Halle Berry - (Die another day)
a

Halley Barry नंतरची स्मार्ट ललना, Eva Green - (Casino Royale)
s

धमाल मुलगा's picture

26 Mar 2013 - 6:09 am | धमाल मुलगा

काय तिची अदा, काय ते दिसणं, काय तो 'अ‍ॅटिट्युड' ....ओहोहो....खंप्लीट फिदा झालो होतो आपण. :) 'अ पर्फेक्ट अपटाऊन गर्ल' असं विंग्रजीत जे काय म्हणतात ते बहुतेक इव्हा ग्रीननं साकारलेल्या व्हेस्परला पाहूनच म्हणत असावेत असा आपला माझा समज झाला होता. :)

बाकी, इझाबेलाही अप्रतिम! तिच्या डाव्या गालावरचा तीळ तिला काय शोभून दिसायचा राव!

आणखी एक म्हणजे डॅनिएला बिअ‍ॅन्की! लय भारी दिसली होती.

आबा's picture

25 Mar 2013 - 3:27 pm | आबा

Andress ऐवजी Undress म्हणून वास्तवाच्या जवळ नेलंत तिला :)

नानबा's picture

25 Mar 2013 - 3:32 pm | नानबा

:)) :))

मदनबाण's picture

25 Mar 2013 - 4:23 pm | मदनबाण

पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्‍या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही.
छ्या... जे बॉन्डपट बघुन सुद्धा ललनां बद्धल बोलत नसतील ते तर अरसिकच ठरावेत ! ;)

बंगळूरातला मराठी's picture

2 Apr 2013 - 12:29 pm | बंगळूरातला मराठी

मला तर बुवा 'इवा ग्रीन' फार आवडली ....

परवचनकार बुवा सप्त्यामधी हरी कथा (बाथ सिन) रंगवुन रंगवुन सांगल्त अन एकण्यारच हाल हाल झाल्त तेची सय आली. ;-)