गृहखात्याची खराब इमेज

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
30 Mar 2013 - 12:38 am
गाभा: 

महाराष्ट्रातील राजकारणी लोक नवनव्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या घडवत आहेत. नुकतेच विधानसभेच्या पवित्र स्थळी राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन एका पोलिस अधिकार्‍याला बुकलून काढले. दुर्दैवाने तिथे सीसीटीव्ही क्यामेरे असल्यामुळे ह्या प्रकरणाचा हा सूर्य आणि हा जयद्रथ असा निकाल लागेल असे वाटले.
पण आपले लाज कोळून प्यालेले राजकारणी तिथेही पळवाट काढणार असे दिसते.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4765732383434857906&Se...ताज्या%20बातम्या&NewsDate=20130329&NewsTitle=सीसीटीव्हीतील%20दृश्%E2%80%8Dय%20निरुपयोगी-%20आर.%20आर.

निर्लज्जपणाचा हा एक नवा नमुना म्हटला पाहिजे. सीसीटीव्ही करता मोठ्या रकमेची कंत्राटे मंजूर करणारे सरकार हेच आणि आता ते वापरायची वेळ आल्यावर ते निरुपयोगी असल्याची ग्वाही देणारेही हेच!

पण सरकारबरोबर विरोधकही ह्या मारहाणीत गुंतलेले असल्यामुळे कुणी आरडाओरड करण्याची शक्यता वाटत नाही.
धन्य आपली लोकशाही आणि धन्य आपले सरकार!

प्रतिक्रिया

गृहखात्याचाच नाहीच नाही पण कदाचीत तो सीसीटीव्हीचा पण दोष नसावा. कारण प्रत्यक्षात दिसताना पण गोंधळ झालेला आहे... म.टा. मधील बातमीप्रमाणे विधानसभेत आमदारांकडे हातवारे करणारे पोलीस अधिकारी घावडे होते. पण "कथीत" आमदारांनी "कथीत" बुकलले ते "प्रत्यक्ष" सूर्यवंशी यांना. ;)

काळा पहाड's picture

30 Mar 2013 - 1:04 am | काळा पहाड

महाराष्ट्राला गृह खाते आहे?

दादा कोंडके's picture

30 Mar 2013 - 1:07 am | दादा कोंडके

बातमी वाचून असंच वाटलं. भर विधानभवनाच्या गॅलरीत हाणामारी झाली तरी फुटेजमध्ये काही दिसत म्हणणे म्हणजे खरच निर्लज्जपणा आहे. राजकारणं थोडं बाजूला ठेवलं तरी तांत्रिकदृष्ट्या ही हे पटत नाही. चित्रण अस्पष्ट आहे म्हणजे नक्की कसं आहे? कॅमेरे योग्य जागी नाही आहेत का? त्यांचं कवरेज कमी पडलं का? प्रकाश नव्हता का? किती क्यॅमेरात चित्रण झालं? सगळ्यांचं चित्रण अस्पष्टं होतं का? कॅमेराचं रिजॉल्युशन कमी पडलं का? फ्रेम्स 'डिजिटली करेक्ट' करता येतात का? इ.इ. अनेक प्रश्न पडतात. विधाभवनात अशी परिस्थिती असेल तर बाकिच्या ठिकाणीची सुरक्षाव्यवस्था रामभरोसेच.

विकास's picture

30 Mar 2013 - 1:14 am | विकास

"काऊनी नेलं!" - अर्थात पब्लीकला (पब्लीकच्या डोक्याला) लहान समजण्याचा प्रकार आहे....

त्याहूनही अधिक सरळ उत्तर असे आहे, "बडे बडे विधानसभाओमे छोटे छोटे हादसे तो होते रहते है"

दादा कोंडके's picture

30 Mar 2013 - 3:13 pm | दादा कोंडके

:)

खरय. हे क्यामेरे असले असतील.

५० फक्त's picture

30 Mar 2013 - 12:27 pm | ५० फक्त

राज्याचं गृहखातं होय,मला वाटलं एवढा वैयक्तिक बाबीवर उघड धागा कसा काय आला?

स्पा's picture

30 Mar 2013 - 12:28 pm | स्पा

हूप्या रोक्स

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2013 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या हुप्प्याजींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

आपल्याच मस्तीत आणि माजात जगणार्‍या, डोळ्यावरती ऐषो-आरामाची आणि संपत्तीची धुंदी चढलेल्या मिपाकरांना आज जगाच्या वेगवेगळ्या काळ्या बाजू, खराब इमेज जर दाखवून कोणी त्यांचे डोळे उघडायचे पवित्र कार्य करत असेल, तर ते म्हणजे मा. हुप्प्याजी होय.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2013 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या हुप्प्याजींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

आपल्याच मस्तीत आणि माजात जगणार्‍या, डोळ्यावरती ऐषो-आरामाची आणि संपत्तीची धुंदी चढलेल्या मिपाकरांना आज जगाच्या वेगवेगळ्या काळ्या बाजू, खराब इमेज जर दाखवून कोणी त्यांचे डोळे उघडायचे पवित्र कार्य करत असेल, तर ते म्हणजे मा. हुप्प्याजी होय.

स्पा's picture

30 Mar 2013 - 12:46 pm | स्पा

हुप्प्याजी नसते तर अशा जळजळीत वास्तववादी चर्चा मिपावर कशा झडल्या असत्या ?
मिपावरचे विचार्जंत हे आपलं विचारवंत , त्यांच्या चारोळी धाग्यांवरून प्रेरणा घेऊन कसे काय भांडले असते?

हुप्प्याजी महान आहेत , ते मिपाचे निखील वागळे आहेत

हुप्प्या's picture

31 Mar 2013 - 2:44 am | हुप्प्या

विषयाशी संबंध नसताना केवळ कौतुक करण्यासाठी लोक इतके आवर्जून लिहित आहेत ह्याबद्दल आभारी आहे.
काय आहे, एखाद्या जंगलात जसे वेगवेगळे प्राणी पक्षी रहात असतात आणि आपापल्या परीने खात, पीत जगत असतात तसेच मिसळपावचेही आहे. जंगलात कुणी सिंह शिकार करुन खातो, हत्ती गवत, झाडे पाने खातात. माकडे फळे, पाने, फुले जे मिळेल ते खातात. किडे, अळ्या त्या माकडाचेच सांडलेले उष्टे माष्टे खरकटे खातात. काहीतर चक्क माकडासारख्या प्राण्याच्या विष्ठेवर जगत असतात! तसेच इथेही चालते.
चालायचेच. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार आवडीनुसार मिसळपावमधे भर घालतो. तेवढे स्वातंत्र्य असावेच नाही का?
जसे टीव्हीवर निखिल वागळे आहेत तसेच पूनम पांडेजीही आहेत. नागव्याने धावण्याची पैज लावणे, कंबरेचे सोडून डोक्याला बांधणे असले चाळे करुन प्रसिद्धी मिळवणारेही आहेत. मिसळपाववरही अशा पूनम पांडे दिसतात.
आपल्याला जे रुचेल, पचेल त्यात सहभागी व्हावे. नाही का?

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2013 - 10:38 am | परिकथेतील राजकुमार

__/\__

स्वतःला किडा-आळ्या, माकड वैग्रे म्हणणे ठिक आहे. पण स्वतःला पूनम पांडे म्हणून घ्यायला धाडस लागते बॉस.

तुमच्या सच्चेपणा पुढे हॅटस ऑफ !!!!
.

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2013 - 11:25 am | टवाळ कार्टा

=)) =)) =))

हुप्प्या's picture

6 Apr 2013 - 11:41 pm | हुप्प्या

आमचा वाग्बाण योग्य स्थळी स्थिरावल्याची पोचपावती मिळाली.
आभार!

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2013 - 12:59 pm | श्रीगुरुजी

"बातमी वाचून असंच वाटलं. भर विधानभवनाच्या गॅलरीत हाणामारी झाली तरी फुटेजमध्ये काही दिसत म्हणणे म्हणजे खरच निर्लज्जपणा आहे. "

फुटेजमध्ये काही दिसत नाही असे आर आर पाटील म्हणतात. ते फुटेज अजून इतरांनी पाहिलेले नाही. पाटील म्हणजे काय सत्यवचनी हरिश्चंद्र आहेत का? ते म्हणतात ते खरे कशावरून? राजकारणी कधीपासून खरे बोलायला लागले? ते चित्रीकरण त्यांच्याव्यतिरिक्त अजून कोणी पाहिले आहे? ते वाहिन्यांवरून दाखविले आहे का? फुटेजमधून काय दिसते आहे ते ठरविण्याचे न्यायालयाचे काम आहे. न्यायाधीशच ते फुटेज बघून निर्णय घेतील. फुटेजमध्ये काय आहे व नाही हे सांगून निर्णय घेण्याचा यांना काय अधिकार? पद्मसिंह पाटलाला क्लीन चिट देणार्‍या, "सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढीन", "सावकारांना आसूडाने फोडून काढीन" अशा फुसक्या डरकाळ्या फोडून प्रत्यक्षात सावकारांना पाठीशी घालणार्‍या, यॅंव करीन आणि त्यँव करीन अशी तोंडाची नुसतीच वाफ दवडणार्‍या व प्रत्यक्षात निष्क्रीय असणार्‍या आर आर पाटलांकडून या प्रकरणात सुद्धा काही वेगळी अपेक्षाच नव्हती.

तिमा's picture

30 Mar 2013 - 2:20 pm | तिमा

गृहखातेप्रमुखालाच जर अस्पष्ट दिसले असेल तर त्या खात्याचे नांव आता 'गुह्य' खाते असे ठेवावे.

केशवराव's picture

30 Mar 2013 - 2:52 pm | केशवराव

आर. आर. आबांनी जाहीर केलेले हे विधान म्हणजे राजकारण्याच्या बथ्थडगिरिचा उत्क्रुष्ट नमुना!जाहीर सभांतुन आणि मुलाखतिं मधुन हेच पुढारी काय तावातावाने बोलत असतात? आणि हि अशी विधाने करताना मतदारांना हे काय खुळ्चट समजतात ?

मराठी_माणूस's picture

31 Mar 2013 - 10:12 am | मराठी_माणूस

त्या वर कडी म्हणजे , ह्या मारहाणीच्या चौकशी समीती मधे एका अशा आमदाराचा सामावेश आहे ज्याने असे कृत्य केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे(संदर्भ : खालिल वृत्तपत्राची लिंक)
http://www.loksatta.com/maharashtra-news/beating-enqury-committee-member...

देशपांडे विनायक's picture

31 Mar 2013 - 11:18 am | देशपांडे विनायक

हे R R पाटील 2 ६ / १ १ च्या वेळी राजीनामा द्यायला लागलेले.
त्यांना गृहखाते सांभाळता येत नाही म्हणून राजीनामा मागण्यात आला.
पाटलांनी त्या नंतर कोणता COURSE केला ज्यामुळे ते गृहखाते संभाळण्या योग्य झाले ते कळाले नाही
अर्थात पाटीलसाहेब ALL ARE EQUAL SOME ARE MORE EQUAL मधील MORE EQUAL वर्गातले
त्या वर्गाचे नियम निराळे,आपल्याला न रुचणारे
त्या लोकांना दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतील असे नाही.
आपल्याला दिसते,वाटते ते त्यांना दिसेल किंव्हा वाटेल असे नाही
आपला त्यांचा भेटण्याचा योग ५ वर्षातून एकदा
आता ती वेळ जवळ आली आहे. बघू या काही ऐकवता येते का ?

नितिन थत्ते's picture

31 Mar 2013 - 1:16 pm | नितिन थत्ते

>>पाटलांनी त्या नंतर कोणता COURSE केला ज्यामुळे ते गृहखाते संभाळण्या योग्य झाले ते कळाले नाही
अर्थात पाटीलसाहेब ALL ARE EQUAL SOME ARE MORE EQUAL मधील MORE EQUAL वर्गातले
त्या वर्गाचे नियम निराळे,आपल्याला न रुचणारे
त्या लोकांना दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतील असे नाही.
आपल्याला दिसते,वाटते ते त्यांना दिसेल किंव्हा वाटेल असे नाही

अहो हे तर लालबहादूर शास्त्रींपासून सुरू आहे.

देशपांडे विनायक's picture

31 Mar 2013 - 7:39 pm | देशपांडे विनायक

शास्त्रात रूढी बलीयसी !!!पाटीलसाहेब रूढी परंपरा पाळणारे म्हणजे थोर ! बर झाल एकदाचे कळले

श्री गावसेना प्रमुख's picture

31 Mar 2013 - 11:28 am | श्री गावसेना प्रमुख

केंद्रीय गृह राज्यमत्र्यांच्याच गावात / मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातुन हत्या होतात्,तिथे ही क्षुल्लक गोष्ट आहे

विकास's picture

31 Mar 2013 - 8:07 pm | विकास

कुठल्याही घटनेकडे सकारात्मक नजरेने पहाणे हे महत्वाचे असते. त्यामुळे या एकूण घटनेचा परत विचार करत असताना बारकाईने पाहीले आणि लक्षात आले, की जरी निवडणूका आणि नेहमीच्या राजकारणात आपले राजकारणी पक्षानुसार एकमेकांच्या विरोधात असले तरी, जेंव्हा गरज असते तेंव्हा एकजूटीने रहातात. मला वाटते, अशी एकी ही लोकांच्या/राज्याच्या/देशाच्या हिताचे प्रश्न सोडवताना जी एकजूट लागेल, त्या एकजूटीची नांदी आहे असे समजूयात. ;)

लोकांच्या/राज्याच्या/देशाच्या हिताचे प्रश्न सोडवताना जी एकजूट लागेल, त्या एकजूटीची नांदी आहे असे समजूयात
हॅहॅहॅ, हे अगदी खरे हो ! मध्यंतरी कोणत्या तरी पक्षाच्या एका नेत्याने दुसर्‍या पक्षाला ही तर गुंडांची पार्टी असे जाहिर विधान केले होते, मग दुसर्‍या पक्षाने आमच्या बरोबर कशाला राहता ? असा प्रश्न देखील विचारला होता.हे दोन्ही पक्ष अजुन गुण्यागोविंद्याने राहत आहेत. ;) कोणी यावर हक्कभंग वगरे असे साधे पुटपुटले देखील नाही हो, याला खरी "युती" म्हणायची ! ;)

विकास's picture

2 Apr 2013 - 11:11 pm | विकास

आपल्याकडे "युती" हा शब्द वापरायच्या ऐवजी "युक्ती" असाच शब्दप्रयोग करायला हवा! ;)

केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे धन्य आहे ......गृह खाते