दुबईची काळी बाजू!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 Mar 2013 - 7:15 am
गाभा: 

काही दिवसापूर्वी मध्यपूर्वेतील कुठल्या तरी देशात वेठबिगार करायला भाग पडलेल्या कामगारावर लेख होता. आज तसाच एक लेख दुबईवर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारा हा देश खरे तर गरीब कामगारांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेला आहे. ह्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का दुबईत उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपला देश आणि तिथली गरीबी परवडली अशी त्यांची परवड होते.
अगदी उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक अरब लोक ऐषारामात जगत असतात. मंदी, बेकारी वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. दुबईत प्रचंड उधारी, कर्जे घेऊन मोठमोठ्या इमारती, अन्य चमकदार प्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडले आहेत. जागतिक मंदीची झळ ह्या सगळ्या प्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या मजूरांना चुकवावी लागत आहे.

http://www.independent.co.uk/voices/commentators/johann-hari/the-dark-si...

लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे.

निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्याविरुद्ध खटले भरले पाहिजेत.

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

27 Mar 2013 - 7:55 am | राजेश घासकडवी

या लेखाखाली 'मजानुकर्न' अशी सही सापडेल अशी आशा वाटली होती. :)

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 11:26 am | नाना चेंगट

सहमत आहे.

- पटेश ढोलबडवी

यशोधरा's picture

27 Mar 2013 - 9:15 am | यशोधरा

वाचले. भयानक आहे.

नगरीनिरंजन's picture

27 Mar 2013 - 9:41 am | नगरीनिरंजन

लेख अतिरंजित आहे हे मान्य करूनही काही सत्यांश उरतोच, कारण कोणत्याही शहराची निर्मिती अशीच होते. ही फक्त दुबईची नसून मानवी नागरसंस्कृतीची काळी बाजू आहे.
नुकतेच, मलेशिया सिंगापुरात मोलकरणींचा छळ होतो म्हणून, इंडोनेशियाने आपल्या नागरिकांना अशा ठिकाणी घरगुती नोकर म्हणून जाण्यावर निर्बंध आणलेत; त्यामुळे सध्या या देशांना मोलकरणींची चणचण भासते आहे. सिंगापुरात अर्थात परिस्थिती बरीच बरी आहे. मोलकरणीला आठवड्याची एक सुटी दिलीच पाहिजे असा सरकारी नियम आला आहे.
मुंबई-दिल्लीतही घरात काम करायला मागास भागातून लहान मुलींपासून म्हातार्‍या स्त्रियांपर्यंत कोणालाही आणले जाते. कधीतरी त्यांच्या छळाची बातमी आपण ऐकतो आणि ऐकून न ऐकल्यासारखी करून आपापल्या कामाला लागतो. आपल्यालाही समोर पसरलेली झोपडपट्टी दिसतेच असे नाही.
त्यामुळे यात नवे असे काही नाही.

शिल्पा ब's picture

27 Mar 2013 - 10:50 am | शिल्पा ब

लेख तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही.
आपल्याकडे मागास भागातुन लोकं आणली जातात पण त्यांना वेठबिगारासारखं राबवलं जात नाही...सर्रास तर नाहीच.

तिथे लोकं परदेशात, पासपोर्ट हातात नाही, मिडीओकर - मुर्ख मालक लोकं ज्यांचं माणुसकीशी फारसं नात नाही, हातात पैसे नाही अन स्वदेशात इथे येण्यासाठी असलेलं भरमसाठ कर्ज अन तक्रार करायला कोणीही नाही.

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 11:27 am | नाना चेंगट

>>>लेख तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही.
आपल्याकडे मागास भागातुन लोकं आणली जातात पण त्यांना वेठबिगारासारखं राबवलं जात नाही...सर्रास तर नाहीच.

'भारता'तील 'इंडीया'च्या बांडगुळाबद्दल तुम्हाला नीट माहिती दिसत नाही.

चिरोटा's picture

27 Mar 2013 - 11:14 am | चिरोटा

स्साला आपल्याला वाटले-संगमेश्वरचा कोकणी भाई तिकडे सेटल झालाय म्हणजे मजा असणार.

आपल्यालाही समोर पसरलेली झोपडपट्टी दिसतेच असे नाही.

+१. Maximum City(मुंबई)त अशा लोकांचे जीवन दाखवले आहे. मुंबईकर म्हणून मान खाली जाईल असे अनेक प्रसंग त्यात आहेत.

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 11:25 am | नाना चेंगट

बिच्चारा कुंदन ! कित्ती कित्ती प्रसंगाला तोंड देत आहे... देव त्याला ध्रीर आणि बळ देवो

अवांतर - ननिशी सहमत.

नितिन थत्ते's picture

27 Mar 2013 - 12:58 pm | नितिन थत्ते

+१

सहमत आहे.

चुचुतै परत आली का?

नितिन थत्ते's picture

27 Mar 2013 - 1:00 pm | नितिन थत्ते

बाकी बरेच आयटी मजूर असेच काहीतरी वेठबिगारी पिळवणूक वगैरे म्हणत असतात. :)

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 2:26 pm | नाना चेंगट

आयटी मजूरच काय प्राध्यापक मंडळी सुद्धा असेच म्हणत असतात.
त्यातल्या त्यात इंग्लिश वगैरे प्रा असतील तर बरे असते म्हणे त्यांचे
मराठीचा प्रा असेल तर लै बिकट म्हणे हाल... कुंदन सांगत होता परवा :)

कुंदन's picture

28 Mar 2013 - 10:05 am | कुंदन

एक सं स्थळ काढुन FDI ला वाव द्यावा असे म्हणतोस की काय?

सुबोध खरे's picture

27 Mar 2013 - 11:55 am | सुबोध खरे

गरिबीमुळे अगतिक होऊन काम करणे आणी पासपोर्ट जप्त करून वेठबिगारी कर वणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.भारतात गरीब माणूस पळून जाऊ शकतो. बिहार मध्ये शेत मजुराला दोन वेळचे जेवून १८०० रुपये पगार होता.(एक वर्षाचा महिन्याचा नव्हे)असे बरेच मजूर आर्मी मध्ये भरतीहोण्यासाठी (२००० साली) आलेले मी पहिले होते. पण ते दुसरे काही नाही म्हणून निदान दोनवेळच्या जेवणासाठी ते तेथे जमीनदारांकडे काम करीत होते.पण अशी वेठ बिगारी नव्हती. अर्थात एक मजूर गेला तर दुसरा येत असे त्यामुळे अशी जबरदस्ती नव्हती.इतर ठिकाणी य़ाहून वाईट परिस्थिती असेलही पण त्याला शासकीय मान्यता आणी संरक्षण भारतात नाही. दुबई किंवा आखाती देशात तुम्हाला कोणतेही स्वातंत्र्य कागदोपत्री सुद्धा नाही मग वास्तवात कोठून असणार.
पण दुबईत अडकलेला माणूस त्याला भारतीय वकीलात सुद्धा फारशी मदत करीत नाही. कारण शासकीय अनागोंदी. त्यामुळे तो नरकात अडकलेलाच राहतो आणी शेवटी पिचून मारतो किंवा आत्महत्या करतो

आशु जोग's picture

27 Mar 2013 - 12:06 pm | आशु जोग

माणूस माणसाला गुलाम बनवतो.
याला त्यांच्या धर्माचे पाठबळ आहे का ?

नाही म्हणजे पुस्तकात काय म्हटलेय !

चिरोटा's picture

27 Mar 2013 - 2:03 pm | चिरोटा

http://www.leader.ir/langs/en/ येथे विचारून पहा.

ayatullah

प्रसाद प्रसाद's picture

27 Mar 2013 - 3:09 pm | प्रसाद प्रसाद

दि डार्क साईड ऑफ दुबई – मूळ लेख वाचला. काहीसा पुर्वग्रहदुषित वाटू शकतो पण तथ्यांश महत्वाचा आणि खरा आहे असे वाटते. दुबईत कामासाठी (एम्. एन. सी. कंपनीतील उच्च पदावरील कामे करणाऱ्यांचा यात समावेश नाही) गेलेल्या बऱ्याच लोकांचा हाच अनुभव थोड्या फार फरकाने परत आलेल्या लोकांकडून मी ऐकलेला आहे, अगदी हॉटेलमध्ये गिटार वाजवायला गेलेल्या व्यक्तीपासून ते हॉटेल मॅनेजमेंट करून तेथे नोकरी करण्यासाठी गेलेल्या लोकांकडून. आपल्यापेक्षा बांग्लादेशी आणि इतर आपल्यापेक्षा गरीब /अप्रगत देशातून तिकडे गेलेल्या लोकांचे जास्त हाल होतात असे ही लोकं म्हणतात.

मिसळपाववर बरेच सदस्य दुबईत असतील किंवा नोकरी निमित्त जाऊन आले असतील त्यांचे अनुभव काय आहेत?

अवांतर - मूळ लेखात, भारतीयांपेक्षा फिलिपिनो जास्त हुशार असतात या ब्रिटीश महिलेच्या मताची अंमळ मजा वाटली.

बंडा मामा's picture

27 Mar 2013 - 8:03 pm | बंडा मामा

लेख मला बरच अतिरंजीत आणि एकतर्फी वाटला. ह्या लांबलचक लेखातला पहिला किस्सा वाचला तो न रुचल्याने पुढचा भाग वाचला नाही. पहिल्या किस्स्यात एका कॅनडाच्या जोडप्याची कथा दिली आहे. दुबईत असल्यचा फायदा घेउन भरपुर पैसा उधळल्यावर कर्जबाजारी झाल्यावर नवर्याला तुरुंगात टाकण्यात आले असे त्यात दिले आहे. कर्ज फेडले नाही म्हणून तुरुंगात टाकणे ही शिक्षा थोडी जाचक वाटते पण तो त्यांचा कायदा आहे. तिथे लोकशाही नाही. तिथले कायदे वेगळे आहेत. हे सगळे माहित न करता पैसा उधळणे आणि मग तुरुंगाची हवा खायला लागल्यावर त्याचे खापर दुबईवर फोडणे हे काही पटले नाही. दुबईत राहणारे मिपाकरांनी ह्यावर अधिक माहिती द्यावी.

बंडा मामा's picture

27 Mar 2013 - 8:04 pm | बंडा मामा

लेख मला बरच अतिरंजीत आणि एकतर्फी वाटला. ह्या लांबलचक लेखातला पहिला किस्सा वाचला तो न रुचल्याने पुढचा भाग वाचला नाही. पहिल्या किस्स्यात एका कॅनडाच्या जोडप्याची कथा दिली आहे. दुबईत असल्यचा फायदा घेउन भरपुर पैसा उधळल्यावर कर्जबाजारी झाल्यावर नवर्याला तुरुंगात टाकण्यात आले असे त्यात दिले आहे. कर्ज फेडले नाही म्हणून तुरुंगात टाकणे ही शिक्षा थोडी जाचक वाटते पण तो त्यांचा कायदा आहे. तिथे लोकशाही नाही. तिथले कायदे वेगळे आहेत. हे सगळे माहित न करता पैसा उधळणे आणि मग तुरुंगाची हवा खायला लागल्यावर त्याचे खापर दुबईवर फोडणे हे काही पटले नाही. दुबईत राहणारे मिपाकरांनी ह्यावर अधिक माहिती द्यावी.

स्पंदना's picture

28 Mar 2013 - 4:11 am | स्पंदना

खरतर मला आश्चर्य वाटतय की ती बाई कॅनेडीयन अ‍ॅम्बेसीत जाउन परत मागे का नाही गेली?
ते ही जाउ दे पण त्या त्या देशाचे कायदे धाब्यावर बसवण्याची "गोरी" पद्धत मलाही नाही आवडत. मध्यंतरी सिंगापुर मध्ये ग्राफीटीला बंदी असताना एका अमेरिकन टीनएजरला पकडल गेल, तर अगदी अमेरिकन प्रेसिडेंट पण अपिल करु लागला त्याला सोडा म्हणुन. मलेशियात ड्रग्जसाठी कैदेत असलेल्या ऑस्सी तरुणीला सोडा म्हणुन ऑस्ट्रेलिया अपिल करते आहे. १४ लक्षात घ्या १४ वर्षाचा मुलगा कोकेन बाळगल्याच्या अपराधाखाली बालीत अडकला तर इथे तो बिचारा त्याची स्कूल टर्म सुरु होताना नसणार म्हणुन मीडिया आसव गाळत होती.
तुम्ही कुठे जाताहात? तिथले कायदे काय? याचा विचार करुन जावे ना? वर आणि त्या १४ वर्षे मुलाची आई म्हणते हि हॅज बिन स्कार्ड बिकॉज ऑफ धीस इन्सिडंट. " बये कोकेन बाळगणार पोरग अनस्कार्ड वाटत्य का ग तूला?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Mar 2013 - 4:23 am | निनाद मुक्काम प...

Rainbow

पाषाणभेद's picture

30 Mar 2013 - 9:49 pm | पाषाणभेद

मागे एक अशीच बातमी सोशल फोरमवर होती.
कुणा एका जोडप्याचे लग्न झाले अन ते दुबईला नोकरीला गेले. तेथे गेले असतांना एका अरबाने त्यांना घरी बोलावले. ती बाई त्या अरबाच्या बायकोबरोबर घरात गेली. हा नवरोबा बराच वेळ बाहेर वाट पाहतोय. नंतर अरब पालटला व तुझी बायको येथे आलीच नाही असे सांगितले. पुढे पोलीस वैगेरे झाले. पुढचे माहीत नाही.

(वरील प्रकारची माहीती मी असल्याच कुठल्यातरी सोशल फोरमवर वाचली होती. त्यामुळे किती विश्वासार्ह आहे ते माहीत नाही. पण असले प्रकार असण्याची शक्यता अधिक आहे.)

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2013 - 5:11 pm | टवाळ कार्टा

हे मी मिपावरच वाचल्यासरखे वाटते आहे

प्रदीप's picture

28 Mar 2013 - 9:49 am | प्रदीप

वर आणि त्या १४ वर्षे मुलाची आई म्हणते हि हॅज बिन स्कार्ड बिकॉज ऑफ धीस इन्सिडंट. "

हॅ, हॅ... आपल्याकडे, भारतात एका पन्नाशीकडे आलेल्या सुप्रसिद्ध आईबाबांच्या, त्याहीपेक्षा सु- व - कु- प्रसिद्ध व्यक्तिच्या बाबतीत, त्याचे नातेवाईक, धंद्यातील इतरेजण, संबंधित व असंबंधित राजकारणी हे तर सोडा, अनेक तथाकथित विच्रारवंतही असेच म्हणत आहेत!

*******
स्वाक्षरी: काय, तुम्ही 'त्या' बाबाची शिक्षा माफ व्हावी म्हणून सरकारकडे जाहीर मागणी केली नाहीत अजून? मग तुम्ही कसले पुढारलेले विचारवंत?

आपले महाप्रतापी, दॄढनिश्चयी वादळातही दीपस्तंभाप्रमाणे भासणारे असे पंतप्रधान ज्यांनी दोन इटलीकर गुन्हेगारांना परत आणले

आणि अजमल कसाब, अफजल गुरु यांना फाशी देऊन सचिन तेंडुलकरपेक्षाही लोकप्रिय झालेले
सुशीलकुमार शिंदे याबाबत काय करु शकतात.

त्या दोघांनी मनावर घेतले तर ते काहीही करु शकतात.

आपल्या पंतप्रधाना॓नी कडक निषेध खलिता पाठवला पाहीजे. डुबैचा शेख पहा कसा लोका॓ना चा॓गले वागवतो त्यान॑तर!
:)

हुप्प्या's picture

28 Mar 2013 - 7:32 am | हुप्प्या

हे सगळीकडेच होते आपण नेहमीच दुर्लक्ष करतो वगैरे मला पटत नाही.
१. खोटारडेपणा करणारे दलाल वाट्टेल ती आश्वासने देऊन, भुरळ घालून अडाणी तरूणांना ह्यात अडकवले जाते. मुंबईत आणले जाणारे किती लोक अशा प्रकारे आलेले असतात?

२. खर्चाकरता मोठी रक्कम आगाऊ घेणे. म्हणजे उमेदवार कर्जाच्या पाशात अडकेल. मुंबईत येणारे किती लोक अशा प्रकारे आगाऊ रक्कम घेऊन येतात?

३. दुबईत पोचल्यावर पासपोर्ट जप्त केला जातो आणि पर्यायाने त्या माणसाचे त्या देशातील कायदेशीर दर्जा हा त्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून रहातो.
मुंबईत किती लोकांचे पासपोर्ट मालक जप्त करतात आणि त्यायोगे किती लोकांवर निर्बंध येतात?

४. त्या देशातील कायदेकानून, सरकारी कोर्टकचेर्या बहुतेक अरबीत चालते असे दिसते आहे. शरियावर आधारित प्रेमळ कायदे असल्यामुळे जर कायद्याच्या कचाट्यात सापडला एखादा तर काय होईल सांगता येत नाही. अगदी सुशिक्षित परदेशीही ह्याला घाबरून असतील. अडाणी लोकांचे तर विचारायलाच नको.
मुंबईत कायदेकानून वेगळे आहेत काय? मुंबईतील भाषा अरबी इतकी अपरिचित आहे का?

५. स्थानिक अरब लोकांच्या चैनीची सोय होईल असे बघूनच हे सगळे कष्टकरी आयात केले जातात. मुंबईतील स्थानिक असा ऐषाराम करत आहेत आणि फक्त परराज्याचे लोक कष्ट करत आहेत असे दिसते का?

६. मुंबईत कायदे धाब्यावर बसवून वाट्टेल तिथे झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. रेल्वे मार्गाला खेटून, विमानतळाला खेटून, नदी, नाले आक्रमून, पाईपलाईन, विजेच्या तारा कसलीही पर्वा न करता. दुबईतील गरीब कामगार अशा प्रकारे वागू शकतात का?

७. मुंबईत येणारे भारतीय तर कायदेशीर आहेतच पण घुसखोर बांगलादेशीही रेशनकार्ड, लायसन वगैरे सरकारी सुविधा मिळवू शकतात. उलट दुबईत कितीही दिवस काम केले तरी तिथले नागरिकत्व मिळत नाही (चूभूद्याघ्या).

भारत सरकारला बर्‍यापैकी परकीय चलन मिळत असणार. मग त्यांनी आपल्या नागरिकांचे हित बघितलेच पाहिजे. असल्या खोटारड्या एजंटच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत. त्यांनी दिलेली आश्वासने लेखी दिली जातील आणि मग त्याप्रमाणे वागले नाही तर त्या एजंटला दंड, तुरुंगवास होईल असे पाहिले पाहिजे.
पासपोर्ट बळकावून ब्लॅकमेल करणे बंद केले पाहिजे. त्याकरता त्या देशाच्या राजकीय नेत्यांवर दबाव आणला पाहिजे.

हे असेच चालणार असे म्हणून चालवून का घ्यायचे बरे?

ऋषिकेश's picture

28 Mar 2013 - 10:43 am | ऋषिकेश

खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे

मी अनेकदा भारत सरकारतर्फे अश्या फसवणूकीसंबंधीच्या जाहिराती टिव्ही, वृत्तपत्रे वगैरे मध्ये अनेकदा वाचतो. लोकांना फसवणे गैरच, तशा शिक्षेच्या तरतुदीही आहेत. त्या व्यतिरिक्त, एकदा माणसाने परिस्थितीपोटी म्हणा कशीही म्हणा रिस्क घ्यायची ठरवलीच तर सरकारने काय करायला हवे असे वाटते?

खोट्या आश्वासनाला भुलणार्‍यांचे काय? जर दिलेल्या आश्वासनांची लेखी प्रत द्यायला भाग पाडले तर एजंट इतका मुक्तपणे खोटे बोलू शकेल का?
जर पासपोर्ट बळकावण्याचे प्रकार सर्रास होत असतील तर डुप्लिकेट पासपोर्ट काढण्याचे पेपरवर्क करुन घेतले तर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्यास भारतीय वकिलातीला डुप्लिकेट पासपोर्ट मिळवून देणे सोपे जाईल असे मला वाटते.
ज्या एजंटविरुद्ध तक्रारी असतील त्याला जाहिराती द्यायला बंदी घालणे, जबर दंड करणे, तुरुंगवास घडवणे असे काही शासन केले तर असे प्रकार निदान कमी होतील.
सगळेच कामगार काही सर पे कफन बांध कर जात असतील असे वाटत नाही.

इरसाल's picture

28 Mar 2013 - 12:24 pm | इरसाल

असरानी दुबै म्हणुन लोकांना मढ आयलंड वर नेवुन सोडतो हे आठवले. (बाप नंबरी बेटा दस नंबरी)

स्वप्नांची राणी's picture

28 Mar 2013 - 3:52 pm | स्वप्नांची राणी

*** खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्याविरुद्ध खटले भरले पाहिजे***किंवा मग त्यांनी आपल्या नागरिकांचे हित बघितलेच पाहिजे. असल्या खोटारड्या एजंटच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत.****

हि खुप भाबडि वाक्य वाटली.

गेला खुप काळ मी आखाती देशामधे आहे. आणि भारतिय व्यवस्थापन आणि पाश्चिमात्य व्यवस्थापन या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनचा पुरेपुर अनुभव घेतला आहे. त्यमुळेच ह्या विशयावर हे माझे २ डिरॅम्स....

आखातातिल भारतिय कामगारान्च्या दुर्व्यवस्थेला तेथिल भारतिय व्यवस्थापन उद्योग आणि त्या उद्योगान्ना मनुश्यबळ पुरवणारे परत भारतिय 'उद्योग' च कारणीभुत आहेत हे माझे निरिक्शणान्ती झालेले मत आहे.

मस्कत मधे असताना माझा नवरा एका भारतिय कम्पनित होता. आम्हि तिथे कुठलेहि अतिरिक्त पैसे ना भरता आलो होतो. पण तिथे आणल्या गेलेल्या कामगरान्च्या कहाण्या ऐकुन मन सुन्न झाले. ह्या कम्पनिच्या मालकाच्या मुलीचे मुम्बै मधे मनुश्यबळ पुरविण्यचे कार्यालय आहे आणि तिथुनच मस्कत मधे कामगार भरती केलि जाते. या नोकरिचे आणि एकुणच तिथले आमिश दाख्वुन , मस्कत मधे पोचविण्यासाठी सुमारे ७०००० ते १,००,००० ईतकि रक्कम आगाऊ घेतलि जाते. पगार मिलणार असतो सुमारे ३२ ओमानी रीयाल (५००० रु). तिकडे गेल्यावर दर महिना १० ओरी जेवण्या चे आणि राहाण्याचे म्हणुन कापुन घेतात. जे कामगार हि आगाउ रक्कम ना देता येतात त्यान्ना सुमारे एक वर्श काहिहि पगार दिला जात नाहि. कामगारान्चि राहण्याचि व्यवस्था म्हणजे एका १०*१० च्या खोलित ४ ते ५ जण आणि ते पण एसी शिवाय. पासपोर्ट तर आल्याबरोबरच काढुन घेतल्या जातो. (आमचाहि घेतला होता, उच्चशिक्शित असुन सुध्हा). सुमारे १००० जणासाठी १ डॉक्टर होता. तो आठवड्यातुन २ दिवस असायचा. कामगारन्ना फक्त १/२ दिवस आठवडी सुट्टी मिळायचि. एथे आम्हि जेमतेम १ वर्शच टीकु शकलो.

नन्तर कतार मधे एका पाश्चिमात्य व्यवस्थापन असलेल्या उद्योगात आहोत आणी भारतिय व्यवस्थापन जगात सगळ्यात वाईट का समजले जाते ते कळतेय.

सगळ्या आखाति प्रदेशात कामे कन्त्राटि-सब कन्त्राटि-सब सब कन्त्राटि अष्या पद्धतिने चालतात. मुख्य कन्त्राट अरबी कम्पनिला मिळते अनि मग सब कन्त्राटि-सब सब कन्त्राटि मिळवण्यात भारतिय कम्पन्या असतात. कन्त्राटाचे सगळे लाभ त्यान्ना मिळतात पण त्यान्च्याच कामगार वर्गापर्यन्त मात्र ते झिरपत नाहित. कागदोपत्री सगळे मॅनॅज केले जातेच (त्यात भारतियान्चा हात कोनिहि धरु शकणार नाहिच!!). अगदि पाश्चिमात्य व्यवस्थापन आणि भारतिय व्यवस्थापन यान्च्या लेबर कॅम्प्स मधेहि जमिन-अस्मानाचे अंतर असते. पासपोर्ट ठेवुन घेणे ईत्यादि प्रकार पण जास्तकरुन भारतिय व्यवस्थापन मधेच चालतात, कामगारान्चे आणि उच्चशिक्शितान्चे सुद्धा.

काहि देशान्चे अगदि ईन्डोनेषिया आणि फिलिपाईन्स चे पण काम्गार पाठविण्याचे काहि नियम आहेत, उदा. मिनिमम वॅजेस ईत्यादि. पण आपल्या सरकारचे असे काहीही नियम नाहित आणि त्याचाच फायदा आपलेच लोक आपल्याच लोकान्ना नाडण्यासाठी करतात.

अश्या लेबर कॅम्प्स वर कधिमधि धाडी पडतात आणि सापडलेले कामगार डेटेन्शन सेन्टर मधे पाठवले जातात. तिथे ते वर्शानुवर्शे पण राहतात, त्यान्च्या पेरेन्ट कम्पन्या त्यान्चि कुठलिहि जबाबदारि घेत नहित.

ईथे गमतिने असे म्हणले जाते कि एखादा गुन्हा घडला कि त्याच्या स्वरुपावरुन तो कुठल्या नॅशनॅलिटीनी केला ते ओळखता येते........मेड्स, नोकरान्ना मारहाण-----बहुतकरुन ईजिप्शिअन, सुदानि
भुरट्या चोर्या--------------------बान्ग्लादेशि
illicit रीलॅशन्स------------------फिलिपिनो
ड्रन्क ड्रयविन्ग,illicit रीलॅशन्स------पाश्चिमात्य
भयन्कर रोड अ‍ॅक्सिडेन्त्स------कतारि , अरबि

आणि लाचखोरि, कगदपत्त्रान्चा गडबडझोला, स्कॅम्स-------भारतिय आणि भारतिय उपमहाद्विपीय

खूप खूप आहे लिहिण्यासारखे. हि सगळि कारस्थाने अर्थातच सगळ्या चेन ल मॅनॅज करुन चाल्तात त्यामुळे भारतिय वकिलातिचे सिद्धा काहि चालत नाहि.

हुप्प्या's picture

29 Mar 2013 - 12:17 pm | हुप्प्या

मला प्रत्यक्ष अनुभव नाही त्यामुळे माझी मते भाबडी वाटत असतील. पण सरकारने गरीब नडल्या जाणार्‍या लोकांना मदत केली पाहिजे असे मला वाटते. कदाचित हा भाबडेपणा असेलही. सरकारी यंत्रणा एजंंट मंडळींनी खिशात घातलेल्याही असतील एव्हाना.
पण तुमचा अनुभव वाचण्याजोगा आहे. एकंदर आपला सूर हा ह्या लेखाशी सुसंगत वाटतो आहे. त्यामुळे लेख एकतर्फी आहे म्हणणार्‍यांचे मत बदलेल अशी आशा.
आपण आपले अनुभव लिहिलेत त्याबद्दल आभार. अजून काही माहिती असेल तर जरूर लिहा असे सांगेन.

सगळीकडे पासपोर्ट काढुन घेतात म्हंटलंय लोकांनी...पासपोर्ट का काढुन घेतात? फक्त भारतीय कंपन्याच की पाश्चिमात्य कंपन्या पण असं करतात? ते कायदेशीर आहे का? नसलं तर शेखसाहेबांचा याला सपोर्ट आहे का? झालंच तर बेकायदेशीर असेल तर इतर देशांच्या जसे की फिलिपीन्स, इथिओपीया इ. देशांच्या वकीलाती काहीच का करत नाहीत?

तुम्ही इथे बरीच वर्ष आहात असं लिहिलंय म्हणुन विचारतेय.

स्वप्नांची राणी's picture

30 Mar 2013 - 2:30 am | स्वप्नांची राणी

प्लीज, भाबडेपणा म्हणल्यामुळे रागाउ नका. आपलीच माणसे आपल्यातल्याच दुर्बल घटकान्ना जि वागणुक देतात ना ते पाहुन खरच खूप फ्रस्ट्रेशन येत. 'दुबईची काळी बाजू' नव्हे, मला म्ह्णायचीय ती 'दुबईतील आणी एकन्दरीतच आखातातील भारतिय कम्पन्यान्ची काळी बाजू!

सगळ्याच कम्पन्या पासपोर्ट काढुन घेत नाहित. वेस्टर्न मॅनेजमेन्ट वाल्या कम्पन्या पासपोर्ट काढुन घेत नाहित. आता आमचाही पासपोर्ट आमच्याच कडे आहे. पासपोर्ट काढुन घेणे हे पुर्णपणे बेकायदेशीर आहे. पण भारत आणि भारतासारखेच ईतर विकसनशील देश, तसेच मागास देश (ऊदा. इथिओपीया वगईरे) यान्ची मॅनेजमेन्ट असलेल्या बर्याच कम्पन्या मधे पासपोर्ट काढुन घेतला जातो. कामगारान्ना आपल्या गरजेनुसार सुत्तीवर जाता येऊ नये याची अशी खबरदारी घेतली जाते. ही अप्रत्यक्श वेठबिगारी च आहे.

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2013 - 3:54 am | प्रभाकर पेठकर

गेली ३२ वर्षे मी मस्कतमध्ये नोकरी/व्यवसाय करीत आहे. वरती 'स्वप्नांची राणी' ह्या सदस्यांनी म्हंटल्याप्रमाणे मला स्वतःला किंवा माझ्या ओळखितल्या कोणालाही असा अनुभव आल्याचे ऐकिवात नाही.
भारतिय व्यवस्थापनाच्या काही कंपन्या, उदा. शापुरजी पालनजी, खिमजी रामदास, अल तुर्की इ.इ., मलाही माहित आहेत. ह्या सर्व कंपन्यांमध्ये पगार कमी असतो. (नोकरीवर रुजू होताना उमेदवाराला पगार आणि इतर भत्ते ह्यांची पूर्वकल्पना दिलेली असते.) पण इतर सुविधा उत्तम असतात. राहायच्या जागा, जेवण्याच्या मेस, वैद्यकिय सेवा आणि त्यांच्या दुकानांमध्ये सवलतीच्या दरात वस्तू उपलब्ध असणे इ.इ.सोयी सुविधा असतात. ह्या मोठ्या कंपन्या झाल्या. त्या खाली लहान कंपन्या, जास्त करून कन्स्ट्रक्शन कंपन्या, इथे परिस्थिती जरा वाईट असते. पण फसवणूक नसते. इथेही जास्त काम असते आणि कंपनीला मिळालेल्या काँन्ट्रॅक्टनुसार ओव्हरटाईम वगैरे असतो. शहरात असणार्‍या कंपन्यातील कामगार त्यांच्या भारतातील राहणीमानापेक्षा सुखात असतात. (त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीवरून जा॑णवते). खुपशा कंपन्यांचे,त्यांची कॉन्ट्रॅक्ट्स शहरापासून दूर असल्याने, शहराबाहेर कँप्स असतात. तिथेही राहण्याची, जेवण्याची बर्‍यापैकी व्यवस्था असते. कँटीन मध्ये कॉमन टिव्ही असतो जो रात्री उशीरापर्यंत चालू असतो. आठवड्यातून एक दिवस, शुक्रवारी, सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी शहरात जाण्या-येण्यासाठी कंपनीची ५० सिटर बसची मोफत सेवा असते. ह्यांचेही पगार आणि ओव्हरटाईम धरून बर्‍यापैकी उत्पन्न असते. आठवड्याच्या सुट्टीला शहरात आले की सामानाची भरभरून खरेदी करतात. ह्यात साबण, साड्या, मुलांची खेळणी, परफ्यूम्स, ऑडिओ-व्हिडिओ सिडीज, सिगरेट्स इ.इ.चा भरणा असतो. काळ्या बाजारातून रम, व्हिस्की दुप्पट ते तिप्पट दराने खरेदी केली जाते (कधी कधी चौपट दर सुद्धा दिला जातो), मोठ्या हॉटेल्सच्या, जसे की ओमान शेरेटन, हौझीच्या खेळात सहभागी होतात. तिथेही बिअर वगैरे पित असतात.
ह्या खाली अगदी छोट्या कंपन्या असतात ज्या जास्त करून अरबांच्या प्रोप्राईटरी कंपन्या असतात. इथे कामगारांचे जीवनमान वाईट असते. पगार कमी असतो तोही नियमित मिळत नाही. राहण्याची व्यवस्था कोंडवाडा बरा अशी असते. पण ह्या भारतिय कंपन्या नाहीत. ह्या अरबी कंपन्या. त्याही सर्व वाईट नसतात. पण काही नक्कीच वाईट असतात.
आता पासपोर्ट ठेऊन घेण्याबद्दल. मी १९८१ साली शरिकत फॅनिया ओमानिया (ओमानची टेक्नीकल कंपनी)नांवाच्या गोर्‍यांच्या व्यवस्थानात आलो. त्यांनीही माझा पासपोर्ट त्यांच्या कस्टडीत ठेवून घेतला होता. ह्यात वेठबिगारी काही नाही. कंपनीतल्या भारतिय कर्मचार्‍यापासून ते गोर्‍या मॅनेजर्स पर्यंत सर्वांचेच पासपोर्ट कंपनीच्या ताब्यात असायचे. ह्यात आपलाही फायदा असतो. व्हिसा, पासपोर्ट नुतनी करणाच्या तारखा/वेळा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागत नाही. कंपनीच सर्व करत असते.
पूर्वीच्या काळी पासपोर्ट आपल्याकडेच असायचे परंतु कित्येक घटना अशा घडल्या की कर्मचार्‍यांनी कंपनीला आर्थिक गंडा घालून रातोरात भारतात/युरोपात पलायन केले. अशा घटना वारंवार घडू लागल्यावर सावधगिरी म्हणून काही कंपन्यांनी (फक्त भारतिय व्यवस्थापनांच्या नाही, युरोप, युके आणि अमेरिकन व्यवस्थापनांच्याही कंपन्यांनीही) पासपोर्ट स्वतःकडे ठेवण्यास सुरुवात केली. फक्त रजेवर जाताना कर्मचार्‍याच्या हाती पासपोर्ट सुपूर्त केला जाई.
गुन्हे करणं, अरबांना फसवणं, कंपन्यांना लुबाडणं ह्यातही कर्मचारी मागे नसतात. अग्रभागी पाकिस्तानी आहेत, क्रमांक दोनवर बांगलादेशी आहेत आणि अत्यल्प प्रमाणात भारतिय आहेत. परंतु एकदा फटका बसला (आर्थिक) की त्यांच्या (अरबांच्या) समाजातही त्यावर चर्चा होते आणि तोडगे काढले जातात. त्यात वाईटांबरोबर चांगलेही भरडले जातात.
सर्व भारतिय दलाल फसवेगिरी करणारे नाहीत. नोकरी देणार्‍या मोठ्या कंपन्या चांगल्या आहेत. मी स्वतः मॅक्निनॉन मॅकेन्झी कंपनीच्या मार्फत मस्कत मध्ये आलो. कुठेही कसलीही फसवेगीरी नाही. व्यक्तिगत पातळीवर दलाली करणारे काही जणं फसवेगिरी करतात. परंतु, त्यालाही इच्छुक उमेदवाराचा अशिक्षितपणा, आखाती प्रदेशा जाऊन रातोरात श्रीमंत होण्याची लालसा आणि ऐकीव माहितीवरुन आखाताबद्दल मनात चितारलेलं स्वप्ननगरीचे चित्र ह्या गोष्टी कारणीभूत असतात. तुमचा अशिक्षितपणा, उतावळेपणा जोखून तुम्हाला 'सावज' बनविलं जातं.
मस्कतमध्ये यायच्या ३-४ वर्षे आधी (१९७७) एका दलालाने मला सौदी अरेबियाच्या पोर्ट्मध्ये नोकरी देतो असे सांगितले. माझ्यागाठी पोर्टमधील कामाचा (टॅली क्लार्क) काही अनुभव नसल्याचे मी सांगताच त्याने सांगितले त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि त्याने बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे माझ्या नांवाचे ५ वर्षाच्या अनुभवाचे लेटर आणून माझ्या हाती दिले. त्यावर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट्च्या अधिकार्‍याची रितसर सही आणि शिक्का होता. पण तिथेच माझ्या मनांत पाल चुकचुकली. पुढे त्याने ५०००/- कमिशन,जे आधीच आम्हा दोघांत ठरले होते, ते कुणा दिल्लीच्या मेन दलालाच्या वाढिव मागणीची सबब पुढे करून ७०००/- केले. तिथेच मी नकार दिला. मी माझा पासपोर्ट त्याच्या हातून परत घेतला आणि त्याच्या ऑफिसला रामराम ठोकला. त्याच्या अगदी पुढच्याच आठवड्यात त्याच्या ऑफिसवर धाड पडली आणि तो पळून गेला.असो. वाईट प्रवृत्तीची माणसं आणि त्यांना भुलणारी माणसं, जगात सर्वत्र असतात. भारतात आहेत, आखाती प्रदेशातही आहेत. आपण सावध राहून जीवन जगायचं असतं.
ह्या लेखनप्रपंचाचा उद्देश फक्त भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या वाईट असतात असा गैरसमज पसरू नये हा आहे.
खुपशा कामगारांच्या हाती भारतात त्यांना मिळायचा त्यापेक्षा जास्त पैसा हाती खुळखुळतो. इथे भारतापेक्षा जास्त प्रलोभनं आजूबाजूला असतात. कामगार पैसा उधळतो आणि भारतात बायको-मुलं वंचित राहतात. मी एक भारतिय कंपनी अशी बघितली आहे जी आपल्या कर्मचार्‍याला जेवणखाण, राहायची व्यवस्था पुरविते, ठराविक 'पॉकेट मनी ' देते आणि पगार त्याच्या आणि पत्नीच्या जॉईंट खात्यात पाठवते.

आपण दुसर्‍या देशात आलो आहोत. त्यांचे कायदे, संस्कृती, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे ह्याचे भान ठेवल्यास ह्या वेगळ्या वातावरणात राहायलाही आपण सरावतो. अगदी १ टक्का लोकांना परत जाण्यात समस्या येतात बाकी ९९ टक्के लोकांना काही त्रास असल्यास हा देश सोडून केव्हाही भारतात परतता येतं. तुम्ही कुठला गुन्हा केला नसेल तर इथे लेबर कोर्ट नांवाची संस्था आहे. जिथे तुम्ही तुमचे गार्‍हाणे मांडून परत जाऊ शकता. कोणीही तुमचा पासपोर्ट किंवा तुम्हाला अडवून ठेवू शकत नाही. तुमचे वागणे स्वच्छ असावे. एखाद्या केस मध्ये एखाद्याला अडकविण्यासाठी त्याचा स्पॉन्सर खोटे बोलत असेल तर तेही उघड होऊ शकते/होते आणि तुम्हाला न्याय मिळतो.
म्हणजे इथे अन्यायकारक घटना घडतच नाही का? तर तसे नाही. अन्यायकारक घटनाही घडतात पण अगदी १ टक्क्यापेक्षाही कमी.

दादा कोंडके's picture

30 Mar 2013 - 4:48 am | दादा कोंडके

आवडला.

शिल्पा ब's picture

30 Mar 2013 - 5:01 am | शिल्पा ब

माहीती चांगली आहे.
काही बारीक प्रश्नः वरच्या लेखातल्या लिंकेतला लेख वाचला. त्यात अन खरंतर बर्‍याच ठीकाणी वेठबिगारीबद्दल वाचलंय. जर एखाद्या कामगाराला परत घरी जायचं असेल तर पासपोर्ट देत नसतील, उरलेला पगार देत नसतील तर स्थानिक कायदा मदत करु शकतोच ना. पण मग तरीही लोकं मदत का घेत नसावेत?

घरच्या नोकरांना मारहाण करणे अती झाले तर त्यांना मालक बदलता येत नसेल तर तेही घरी जाउ शकतात अन जी काही बाकी आहे ती वसुल करु शकतात का नाही? कायदा त्यांना मदत करीत नाही का? आम्हाला आखाती देशांबद्दल अजिबात माहीती नाही अन तुम्ही लिहिलंय ते पहील्यांदाच काही पॉसिटीव वाचलंय म्हणुन विचारतेय.

अनेक लोक आखातातील देशांमध्ये जातात हे आपल्याला माहीत आहे. वाळवंटातले हवामान कसे असते याची कल्पना असते. तरीसुद्धा ते सहन करून लोक तिकडे जातात यात नक्कीच कसले तरी आकर्षण असणार याची कल्पना असते. आपल्या प्रतिसादावरून त्याबद्दल थोडे समजले.
आखातातील किंवा इतर कोठल्याही परदेशामधील काळी बाजूच जास्त भडक असली तर आपोआपच तिकडे जाणार्‍यांचा ओघ कमी होईल. आखातामध्ये सुद्धा दुबई, सौदी, शारजा, मस्कत, कुवेत हे सगळे देश एकासारखे एक नाहीत. तिथे रहाणार्‍या भारतीय आणि युरोपियन वंशाच्या लोकांना मिळणारी वागणूक निरनिराळी असते असे ऐकले आहे.

इरसाल's picture

30 Mar 2013 - 10:46 am | इरसाल

जबरदस्त प्रतिसाद काका.

अवांतरः काका खर्र खर्र सांगा २००० च्या फरकासाठी धाड पाडवलीत ना त्याच्यावर :)) (कृ.ह.घे.)

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2013 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

काका खर्र खर्र सांगा २००० च्या फरकासाठी धाड पाडवलीत ना त्याच्यावर (कृ.ह.घे.)

हा: हा: हा: एवढी 'ताकद' माझ्यात असती तर २००० रुपये किस झाडकी पत्ती? गल्फमध्ये गेलोच नसतो. कारण तशी 'ताकद' असती तर पैसा भारतातच भरमसाठ कमवला असता.

बॅटमॅन's picture

31 Mar 2013 - 2:56 am | बॅटमॅन

सोनाराने कान टोचले!!!!! लैच भारी पेठकरकाका.

मराठी_माणूस's picture

31 Mar 2013 - 9:48 am | मराठी_माणूस

कंपनीतल्या भारतिय कर्मचार्‍यापासून ते गोर्‍या मॅनेजर्स पर्यंत सर्वांचेच पासपोर्ट कंपनीच्या ताब्यात असायचे.
मूळात, एव्हढी महत्वाची कागदपत्रे काढुनच का घेतली जातात . फसवा फसवी सगळीकडेच चालते , पण युरोप अथवा अमेरिकेत असले काही केले जात नाही.

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

युरोप-अमेरिकेपेक्षा आखाती प्रदेशातील कायदेकानू, मानसिकता वेगवेगळी आहेत. ते पुढारलेले देश आहेत. आखाती प्रदेशात पैसा असला तरी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन शिकाऊ पातळीवर आहे. दुसरे असे की, ह्या देशात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी, काम करण्यासाठी एक स्थानिक स्पॉन्सर असावा लागतो. साधारणतः जी कंपनी आपल्याला कामावर नेमते तिच स्पॉन्सर असते. आपल्या प्रत्येक कृतीसाठी, वर्तुणूकिसाठी स्पॉन्सर जबाबदार असतो. साध्या साध्या गुन्ह्यातही जर ती व्यक्ती पोलीसात हजर होत नसेल तर त्याला हजर करण्याची जबाबदारी स्पॉन्सरची असते. इथे येऊन एखादा गुन्हा करून कोणी पळून गेल्यास स्पॉन्सरला सरकारी खात्यात उत्तरे/स्पष्टीकरण द्यावे लागते. हे मूळ कारण आहे.

दूसरे, कमी महत्त्वाचे किंवा स्वार्थी कारण असे की, कर्मचार्‍यांची पळवापळवी. विक्री खात्यातील कर्मचार्‍यांचे गिर्‍हाईकांशी व्यक्तिगत संबंध निर्माण झालेले असतात. एखादा कर्मचारी आपली कंपनी सोडून प्रतिस्पर्ध्याच्या कंपनीत जॉईन झाला तर तो आपल्यासोबत घाऊक दरात गिर्‍हाईके घेऊन जातो. आपला धंदा धोक्यात येऊ शकतो.
पूर्वीच्या काळी (म्हणजे अगदी ७-८ वर्षांपूर्वी पर्यंत) नो़करी बदलताना आधीच्या स्पॉन्सरची NOC लागायची. हल्ली लागत नाही कायदा शिथिल केला आहे.

असे अनेक कायदे आहेत जे आपल्याला जाचक वाटू शकतात परंतू स्थानिकांसाठी ते सुरक्षिततेचे आहेत. तसेच, जगात सर्वत्र चालते त्या प्रमाणे कायद्यांचे मिस इंटरप्रिटेशन किंवा स्वार्थासाठी भीती दाखविणे असले प्रकारही चालतात. पण त्याचा बजबजाट नाहीए.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2013 - 4:07 am | निनाद मुक्काम प...

Awesome

रेवती's picture

30 Mar 2013 - 6:41 am | रेवती

स्वप्नांची राणी यांचा प्रतिसाद वाचून थोडे बरे वाटले तर पेठकरकाकांचा प्रतिसाद वाचून बरेच बरे वाटले, नाहीतर माझ्या डोळ्यासमोर जे (काल्पनिक्)चित्र होते ते फारच भिषण होते. मन काहीवेळ अस्वस्थ झाले होते.

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2013 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

पिडीत कामगारांना मदतीसाठी लेबरकोर्ट आहे. भारतिय वकिलात आहे. स्वयंसेवी संस्थाही आहेत. अगदी, खाण्यापिण्याच्या मदतीपासून भारतात सुरक्षित पोहोचण्यासाठीची सर्व मदत अशांकडून मिळते. परंतु, असे बाधित कामगार हे कमालिचे अशिक्षित असतात. त्यांना भाषेचीही समस्या असते. संकोची असतात. त्यांच्या त्यांच्या वर्तुळाबाहेर कोणाजवळ आपल्या समस्या मांडत नाहीत त्यामुळे त्यांना मदत मिळणे दुरापास्त होते. एकट्या दुकट्या कामगारापेक्षा ५-१० किंवा जास्त कामगार पिडीत असतील तर कोणाच्या आणि कोणाच्या सल्ल्यावरून वकिलातीत संपर्क करतात किंवा पोलीस स्टेशनला जातात आणि त्यांच्या बाबतीत हालचाल सुरु होते. स्थानिक वर्तमान पत्रातही अशा केसची माहिती येते आणि मदतीचा ओघ सुरु होतो.
मध्यंतरी बेकायदेशीर आप्रवासी आणि ज्यांच्या पासपोर्ट किंवा स्पॉन्सरचा पत्ता नाही अशा अनेकांना भारतिय वकिलातीने 'आउट पास' नामक परवाना पत्र देऊन त्यांच्या भारतात परतण्याची सोय करुन दिली होती. त्याचा फायदा अनेक कामगारांनी (कायदेशीर आणि बेकायदेशीर) घेतला होता. संकोच, अज्ञान, अशिक्षितपणा, भिती अशा अनेक कारणांमुळे हे बाधित कामगार आहे तिथेच मुकाट राहतात. पुढे येत नाहीत. त्यांच्या ह्या असहाय्यतेचा फायदा अरब घेतात (सर्वच नाही, कांही जणंच) आणि पिळवणूक होते. सुशिक्षितांमध्ये हे प्रमाण शून्य आहे.

आखातामध्ये सुद्धा दुबई, सौदी, शारजा, मस्कत, कुवेत हे सगळे देश एकासारखे एक नाहीत. तिथे रहाणार्‍या भारतीय आणि युरोपियन वंशाच्या लोकांना मिळणारी वागणूक निरनिराळी असते असे ऐकले आहे.

प्रत्येक आखाती देशाचा स्वभाव, राहणीमान, हवामान, कायदेकानू इ.इ. वेगवेगळे आहेत. दुबईचे व्यावसायिकरण झाल्यामुळे बरेच स्वातंत्र्य आहे तर सौदी अरेबिया जास्त मुलतत्ववादी असल्याकारणाने कायदे जास्त कडक आहेत. बाकी सर्व देश ह्या दोन टोकाच्या वातावरणांच्या अधे-मधे कमी अधिक प्रंमाणांत आहेत. भारतिय आणि युरोपियन लोकांना वेगवेगळी वागणूक मिळण्याची अनेक कारणे आहेत. गोर्‍या कातडीचे आकर्षण, त्यांच्या पुढे आपण कमी असल्याची अनाठायी भावना त्यामुळे त्यांच्या तथाकथित वर्चस्वापुढे झुकण्याची आपली (अरबांसकट सर्वांचीच) सवय,त्यांच्या वकिलातींची खंबीर भूमिका आणि आपल्या वकिलातीची बोटचेपी धोरणं, भारतिय कुशल-अकुशल कामगारांची भरमसाठ उपलब्धता ह्या सर्व बाबींमुळे गोर्‍यांचा वरचष्मा ह्या देशांमध्ये आहे. त्याची तीव्रता पूर्वी फार होती. आता अरबही शहाणे झाले आहेत. गोर्‍या कातडीव्यतिरिक्त जास्त काही वेगळेपणा त्यांच्यात नाही ह्याची जाणीव झाल्याने आणि त्याहून चांगले कर्मचारी भारतातून स्वस्तात मिळत असल्याने गोर्‍यांचे इथले वास्तव्य हळू हळू कमी झाले आहे.

स्थानिकांचा वरचढपणा हळूहळू वाढतो आहे. पण तो साहजिक आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2013 - 2:45 pm | निनाद मुक्काम प...

भारतिय आणि युरोपियन लोकांना वेगवेगळी वागणूक मिळण्याची अनेक कारणे आहेत. गोर्‍या कातडीचे
काका योग्य शब्दात विश्लेषण केले आहे ,
फक्त गोर्‍यांच्या वर्चस्वाच्या दृष्टीने म्हणाल तर हा कातडीचा प्रश्न नाही आहे ,
बहुतांशी अरब दुबई व अबुधाबी मधील आपल्या मुलांना अमेरिकन किंवा इंग्लिश शाळेत शिकायला पाठवतात व पुढे त्यांच्या शाळा युरोपातील व अमेरिकेतील युनिवर्सिटीच्या सोबत बांधील असतात , व त्यांची शाखा गल्फ मध्ये असते,
लहानपणापासून ह्यांना शिकवणारे गोरे शिक्षक असल्याने व आपल्याकडील पैसा कसा व कुठे खर्च करायचा हे चंगळवादी आयुष्य जगण्यास शिकवणारे शेवटी गोरे आहेत ,
अरबांना गाड्या व ब्रॅड असलेल्या वस्तूंची चटक लावणारे गोरे आहेत ,
व माझ्या पाहण्यात अनेक युरोपियन कंपन्या त्यात जर्मन सुद्धा आल्या , आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून काम मिळवतात.
आपले परराष्ट्र धोरण इतके वर्ष गल्फ बाबत मुळमुळीत होते , आता ते कडक होत आहे ,
गुन्हेगार हस्तांतर असो किंवा इतर मुद्दे भारत एमिरात वर दबाव टाकतो , व कामे करून घेतो.
अबुधाबीच्या इतिहाद ने दुबई ची एमिरत एअर वेज गिळंकृत केली व आता त्यांना जेट एअर वेज मध्ये गुंतवणूक करायची आहे ,
मात्र आजही हा व्यवहार झाला नाही ,
जेट आपल्या मागण्या वर अडून आहे. भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय झाल्या व ब्रिटन मधील तोट्यातील कंपन्या विकत घेऊन त्या नफ्यात चालवत आहेत हे ब्रिटन मध्ये शिकलेले आजचे आघाडीचे अरब उद्योजक पाहत आहेत ,
मागे मी उदाहरण दिले होते की ब्लेक बेरी वरून भारताने केनेडा सरकार च्या विरोधात कडक भूमीला घेतली तेव्हा सौदी ने मग आपली री ओढली
पुढे केनेडा सरकार नमले ,

ओबामा नाचे आता युरोप नाही तर भारत चीन कडे प्राधान्य असणार हे सांगणे
भारताचे रक्षा बजेट सौदी पेक्षा मोठे असणे व अरब जगताचे दोन शत्रू इराण व ज्यू राष्ट्रांशी भारताचे एकाचवेळी चांगले संबंध असणे ह्या सगळ्या घटना व ह्या सर्व जागतिक स्तरावरील घडामोडी अरब जगत पाहत आहे.
म्हणूनच आता गोर्‍यांच्या सोबत आपले सुद्धा महत्त्व तेथे वाढत आहे.
म्हणूनच भारतीयांच्या विषयी त्यांचे मत बदलत आहेत.

आमच्या दोन वर्षांच्या अबू धाबी येथील वास्तव्यात हा अनुभव आला.
येथील प्रमुख वृत्तपत्रात रोज भारताच्या अर्थव्यवस्थेचे गुणगान गात असतात.
त्यावेळी मंदी होती , युरोप , अमेरिकेच्या मानाने भारताची परिस्थिती मजबूत होती,
भारताचा एक वर्ग झपाट्याने प्रगती करतोय व भारतीय कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत , गल्फ मधील कंपन्या विकत घेत आहेत ,
दोन पाकिस्तानी मारल्या बद्दल १८ पंजाबी तरुणांना झालेला मृत्यू दंड भारतीय सरकारच्या दबावामुळे बदलला , मग सरत शेवटी ब्लड मनी चा मार्ग दाखवून त्यांना भारतात आणले गेले ,
ह्या साठी लागणारा पैसा भारतीय लोकांनी जमा केला ,
भारताबाहेर मी २००३ साली आलो व २००७ ते ९ दरम्यान अबुधाबी येथे होतो ,
तेव्हा तेथेच नव्हे तर युरोपात सुद्धा भारताविषयी इमेज , मत सकारात्मक दृष्ट्या बदलली आहेत ,
आणि मुंबई येथील बिल्डींग साईट वर काम करणारे लोक व त्यांची जीवन शैली , पाहता दुबई , अबुधाबी येथील कामगार बरेच सुखात आहे
येथे असणारी प्रचंड स्वस्ताई व करमुक्त पगार , गोर्यांना ह्यांच्या देशात स्वतःचा देश सोडून येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करते ,
युके , व जर्मन लोक आपापले देश सोडून येथे प्रचंड प्रमाणात स्थायिक झाले आहेत.
मंदीच्या काळात सुद्धा दिलेल्या वाचनाला जागण्या साठी दुबई मेट्रो
रात्रीचा दिवस करून नियोजित वेळात पूर्ण केली जाते ,
ह्या धडाडीची नोंद समस्त जगाने घेतली ,

अप्रतिम's picture

30 Mar 2013 - 4:45 pm | अप्रतिम

प्रतिसाद आवडला.तुमचे सर्वच प्रतिसाद वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात.

प्यारे१'s picture

30 Mar 2013 - 5:39 pm | प्यारे१

अप्रतिम हा माझा ड्यु आयडी नाही.
खुलासा संपला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2013 - 9:28 pm | निनाद मुक्काम प...

म्हणजे प्यारे १ हा वरिजनल आहे होय
बर बर
खुलासा करण्याची गरज नाही ,
Have A Gr8 Weekend

मैत्र's picture

30 Mar 2013 - 6:41 pm | मैत्र

अबुधाबीच्या इतिहाद ने दुबई ची एमिरत एअर वेज गिळंकृत केली व आता त्यांना जेट एअर वेज मध्ये गुंतवणूक करायची आहे , मात्र आजही हा व्यवहार झाला नाही , जेट आपल्या मागण्या वर अडून आहे.

पहिली गोष्ट एमिरेट्स अजूनही दुबई सरकारच्या मालकीची आहे. एतिहादने "गिळंकृत" वगैरे केलेली नाही. मर्जरची बोलणी आणि अफवा बराच काळ झाल्या.
जेटमधली गुंतवणूक ही जेटची गरज आहे आणि एतिहादचा फायदा. जेटला हवा तितका भाव आणि नियंत्रणाची कलमे मान्य झाली नाहीत तर व्यवहार झाला नाही. हा सर्वसाधारण व्यावसायिक अनुभव आहे आणि हे अनेकदा घडते.

या दोन्ही गोष्टींमधून तुम्हाला दुबईची काळी किंवा काळी नसलेली कुठली बाजू मांडायची आहे?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2013 - 9:17 pm | निनाद मुक्काम प...

@ मर्जरची बोलणी आणि अफवा बराच काळ झाल्या.
हे मान्य मात्र असे म्हटले जाते की दुबई च्या राजाने आपले कर्ज फेडण्यासाठी
अबुधाबी ला एमिरात विकली मात्र नाव दुबई चे राहू दे अशी गळ घातली ,
पण आपल्या म्हणण्यात तथ्य असू शकते , रोज बातम्या कम अफवा येत होत्या ,
,
व जेट ला अर्थात त्यांचा पैसा हवा आहे ,मात्र कंपनी वरचे नियंत्रण गमवायचा नाही आहे
माझा मुद्दा एवढाच आहे की पैशाच्या ताकदीवर भारतीय कंपन्या सहजासहजी विकत घेतल्या जाऊ शकत नाही ,ह्याची त्यांना जाणीव आहे.
व्यवहार झाला नाही पण अजूनही बोलणी सुरु आहेत ,
आणि ह्या प्रकारांचा दुबई ची काळी बाजू नव्हे
तर भारतीयांचे तेथे महत्त्व वाढत आहे ह्या मुद्द्याला अनुसरून दिले होते लिहिले

स्वप्नाची राणी
मला इकॉनॉमिक times ह्या आर्थिक बाबींवर वृत्त देणाऱ्या वृत्त पत्रात भारताच्या अर्थ व्यवस्थेचे गुणगान होतांना दिसते ,असे म्हणायचे होते ,
अल झझिरा ही एकेकाळची अरब जगतातील अलकायदा ची बातमी देणारी वाहिनी म्हणून परिचित होती
पण ह्या वाहिनी वर जेव्हा इंटरनेट हिंदू ह्या संकल्पनेवर चर्चा ऐकली तेव्हा सुब्रमन्यम स्वामी त्या वाहिनीचे एक पत्रकार ह्यांनी सागरिका घोष ह्यांची जी खरडपट्टी काढली ती पाहून डोळे पांढरे झाले ,
अरबांचे भारतीयांच्या विषयी पारंपारिक मत बदलत आहे ,
एवढे मात्र नक्की
अमेरिकेने भारताला इराण सोबत तेल घेऊ नये असे सांगणे
भारतीय सरकार तर्फे तो सल्ला न मानणे
पुढे अमेरिकेला भारताच्या ह्या निर्णयाचा मान राखणे भाग पडणे
थोडक्यात महासत्तेची मैत्री होतांना युके सारखा भारत त्यांचे बांडगुळ होत नाही आहे ह्याची अरबांना खात्री पटली आहे

स्वप्नांची राणी's picture

30 Mar 2013 - 5:17 pm | स्वप्नांची राणी

खूप छान प्रतिसाद पेठकर काका! "आपण दुसर्‍या देशात आलो आहोत. त्यांचे कायदे, संस्कृती, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे ह्याचे भान ठेवल्यास ह्या वेगळ्या वातावरणात राहायलाही आपण सरावतो. अगदी १ टक्का लोकांना परत जाण्यात समस्या येतात बाकी ९९ टक्के लोकांना काही त्रास असल्यास हा देश सोडून केव्हाही भारतात परतता येतं. तुम्ही कुठला गुन्हा केला नसेल तर इथे लेबर कोर्ट नांवाची संस्था आहे. जिथे तुम्ही तुमचे गार्‍हाणे मांडून परत जाऊ शकता. कोणीही तुमचा पासपोर्ट किंवा तुम्हाला अडवून ठेवू शकत नाही. तुमचे वागणे स्वच्छ असावे. एखाद्या केस मध्ये एखाद्याला अडकविण्यासाठी त्याचा स्पॉन्सर खोटे बोलत असेल तर तेही उघड होऊ शकते/होते आणि तुम्हाला न्याय मिळतो.
म्हणजे इथे अन्यायकारक घटना घडतच नाही का? तर तसे नाही. अन्यायकारक घटनाही घडतात पण अगदी १ टक्क्यापेक्षाही कमी. " याला तर विशेश अनूमोदन!

पण तुम्हि ज्या मोठ्या कम्पन्यान्चि नावे घेतली आहेत ना, त्यातल्याच एका मधला हा पुर्ण जेन्युईन ह्याचि देही याची डोळा घेतलेला अनुभव आहे. अहो वोल्टास आणि एल एण्ड टि सारख्या कम्पन्यान्ची हिच कथा आहे तर वर वर्णन केलेल्या तर कछी कम्पन्या आहेत. मला कुठल्याही समुदायाबद्दल कसलेही जनरलाय्झशन करायच नाहिये. पण काठावर उभे राहुन पाण्याच्या खोलिचा अन्दाज येत नाहि, वरून सगळेच शान्त शान्त वाटते. पण आम्हि पाण्यात उतरलो होतो. हा अनुभव ही ऐकिव माहिति नाहिये.

अर्थात परत तेच म्हणते " 'दुबईची काळी बाजू' नव्हे, मला म्ह्णायचीय ती 'दुबईतील आणी एकन्दरीतच आखातातील भारतिय कम्पन्यान्ची काळी बाजू!"

भारतिय कम्पन्यान्बद्दल मि खरच फार गोड बोलु शकणार नाहि. पण प्लीज यावरून सगळे आखातच काळे असा गैरसमज करून घेऊ नये. आम्हि लोकानी एथे आल्यापसुन ऊलट कित्येकाना गल्फ मधे येण्यसाठी प्रोत्साहनच दिले आहे. ज्या स्टेट ओन कम्पन्या आहेत (ऊदा. कुवैत ऑईल, कतार पेट्रोलीयम ई.) त्यान्च्यामधे डायरेक्ट कॉन्ट्रक्ट मधे नोकरीला असणे म्हणजे 'पान्चो उन्गलीया घी मे और सर कढाई मे" अशी परिस्थिती आहे. ह्या कम्पन्या आपल्या कर्मच्यार्यान्चे जसे लाड करतात, भारतिय कम्प्न्या त्यान्च्या जवळपास ही पोचणार नाहित.

लोकहो, आखातात यायचे तर ह्या आणी ईतर मोठ्या वेस्टर्न , युरोपियन कम्पन्यान्मधेच. जवळपास ८ आकडी वार्शिक करमुक्त वेतन, ४ अपत्यान्पर्यन्त शाळेचा खर्च, वार्षीक ३६ वर्किन्ग डेज ईतकी भरपगारि सुट्टी, याशिवाय दर वर्शि जवळपास २० दीवस ईदची सुट्टी, मोफत पन्चतारान्कित वैद्यकिय सेवा (हो, हो डेन्टल पण!!) , वर्षातुन एकदा समुर्ण परिवारासाठि आपल्या देशात जाण्यासाठी राऊन्ड ट्रीप विमान भाडे, याशिवाय बोनस ई. पण!

आखातातील वातावरण अतीशय सेफ आहे. क्राईम रेट खूप कमी आहे. सौदि सोडल्यास कुठेहि कपड्यान्चे ई. कसलेही बन्धन नहिये. शिवाय भारतापासुन जेमतेम ३ तासान्चा प्रवास. त्यामुळे कुठल्याही आणीबाणि च्या प्रसन्गि ८-१० तासात घरी पोचता येते.

खूपदा ऐकिव माहीती वरुन आपण विशेशता मराठी लोक गल्फ मधे यायचे टाळतो आणि खूप मोठ्या सन्धिला मुकतो. अगदि पाश्चिममात्य सुद्धा भरपुर सन्ख्येने गल्फ मधे येतात. (अर्थात भारतिय कम्पन्यन्मधे येत नाहित)

भारतिय कम्पन्यान्मधे यायचे असल्यास सम्पुर्ण चौकशि करुन आणि सगळ्या गोश्टीन्ची लेखि हमी घेउन यावे. या लोकान्चे कोन्ट्रॅक्ट लेटेर्स कित्येकदा कुठल्याही सही शिक्क्यान्शिवाय च असतात. त्यामुळे एकदा का तुम्ही त्यान्च्या जाळ्यात अडकलात कि त्या सो कॉल्ड कोन्ट्रॅक्ट लेटेर्स प्रमाणे वागण्याचे बन्धन त्यान्च्यावर नसते.

चला, लवकर या मोठ्या कम्पन्यान्च्या दायरेक्ट वेबसईट्स जाऊन अप्लाय करा आणि एका खूप मोठ्या सन्धिचा फायदा घ्या. (अगदि पेठकर काका पण भारतिय कम्पनित आलेले नाहित, बरोबर ना..)

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2013 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

काठावर उभे राहुन पाण्याच्या खोलिचा अन्दाज येत नाहि, वरून सगळेच शान्त शान्त वाटते. पण आम्हि पाण्यात उतरलो होतो.

पाण्यात उतरलो नसलो तरी गेली ३२ वर्षे मस्कतमध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीत विविध कंपन्यातील विविध पातळीवरच्या लोकांशी मैत्री, ओळखी आणि संवाद साधलेला आहे. ते सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे 'पाण्यातले' होते/आहेत. त्यांच्या अनुभवविश्वावर आधारीत माझी मते आहेत. २०-२० वर्षे माणसे एकाच (भारतिय व्यवस्थापनाच्या) कंपनीत विनातक्रार नोकरी करीत आहेत. त्यावरून आहे त्या 'पाण्याच्या खोलीत' ते सुखात आहेत असाच निष्कर्ष निघतो.
तुमचा अनुभव चुकीचा असेल असे मी म्हणत नाही. पण त्यात कुठल्या कंपनीचे नांव, त्या कंपनीत असलेला त्रास थेट शब्दात मांडलेला नाही. असो. तुमची मर्जी. पण तुमच्या व्यतिरिक्त इतरांचे अनुभव म्हणजे 'पाण्याच्या बाहेर राहून पाण्याच्या खोलीचा घेतलेला अपरिपक्व अंदाज' हा सुर काही रुचला नाही.
मी जरी भारतिय व्यवस्थापन कंपनीत आलो नसलो तरी अशा कंपनीत मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आणि शोधून इंग्रजी व्यवस्थापनाच्या कंपनीत आलो असा अंदाज कसा बांधला? इथे यायच्या आधी पुण्याच्या बी.जी. शिर्के कंपनीच्या दुबई शाखेत अर्ज केला होता. भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांचे मला वावडे नाही. खरोखर भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या वाईट्ट असतिल तर त्यांचे कामगार इथे टिकणार नाहित आणि अशा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत. शापुरजी पालन्जी कंपनीने इथल्या राजाचा पॅलेस बांधला आहे आणि अनेक वर्षे त्यांच्याकडेच पॅलेस मेन्टेनन्सचे काँट्रॅक्ट होते. खिमजी रामदास एक प्रचंड मोठे आणि विस्तारलेले बिझिनेस हाऊस आहे. सरकारची कित्येक कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्याकडे आहेत. नारनजी हिरजीने मस्कतच्या पडत्या काळात धान्य सप्लाय करून नाव लौकीक मिळवलेला आहे. धरमसी नॅनसी, हरिदास नॅनसी, शाह नागरदास अनेक नांवे घेता येतील की ज्यांनी व्यापार उदीम करून नांव कमविले आहे. ज्यांच्याकडे वर्षोनवर्षे टिकून असलेला स्टाफ आहे.
भारतिय कंपन्यात इतर युरोपिय कंपन्यांच्या तुलनेत पगार कमी असतो पण सोयी सुविधा जास्त असतात आणि नोकरी टिकण्याची शाश्वती जास्त असते. युरोपिय कंपन्या जास्त पगार देतात पण कामेही तशीच पिळून करून घेतात.
पेट्रोलियम कंपन्यांमध्ये पगार, सोयी सुविधा भरपूर असतात पण देशातील एकूण रोजगाराच्या किती टक्के रोजगार पेट्रोलियम कंपन्यात उपलब्ध असतो?

आखातात यायचे तर ह्या आणी ईतर मोठ्या वेस्टर्न , युरोपियन कम्पन्यान्मधेच. जवळपास ८ आकडी वार्शिक करमुक्त वेतन, ४ अपत्यान्पर्यन्त शाळेचा खर्च, वार्षीक ३६ वर्किन्ग डेज ईतकी भरपगारि सुट्टी, याशिवाय दर वर्शि जवळपास २० दीवस ईदची सुट्टी, मोफत पन्चतारान्कित वैद्यकिय सेवा (हो, हो डेन्टल पण!!) , वर्षातुन एकदा समुर्ण परिवारासाठि आपल्या देशात जाण्यासाठी राऊन्ड ट्रीप विमान भाडे, याशिवाय बोनस ई. पण!

हे सर्व फायदे कामगारांना मिळतात? मला नाही वाटत. मॅनेजर्सना मिळत असतील. पण भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यातही मॅनेजर्सना, सर्व नसले तरी ह्यातील बरेच फायदे मिळतात. जसे, दोन अपत्यांचा शाळेचा खर्च, शाळेत जाण्यायेण्यासाठी कंपनीची बस, आठआकडी नसले तरी पुरेसे वेतन, भरपगारी वार्षिक सुट्टी, जाण्यायेण्याचा कुटुंबाचा विमानखर्च, वैद्यकिय सेवा,सरकारने घोषित केलेली ईदची सुट्टी इ.इ.इ.असो.

तुम्हाला चांगले (चांगले का, उत्तमच) पॅकेज मिळाले आहे. अभिनंदन. पण भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांमध्ये सर्वच जणं भरडले जातात हा दावा अमान्य.

असो.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2013 - 4:57 pm | स्वप्नांची राणी

कामगार आणि कर्मचारी यात काही घोळ होतो आहे का? मी ज्या कंपनी मधला अनुभव दिला आहे, त्या कंपनी मधल्या ऊत्तर आणि दक्शिण ऑईल फिल्ड्स तसेच खुद्द मस्कत मधे काम करणार्‍या कामगारान्शी आपला काही सम्बन्ध आला आहे का? आपला सम्बन्ध त्यातिल अकौन्ट्स, पर्चेस , निम्न आणि उच्च मेनेजमेन्ट अश्या लोकान्शीच जास्त असेल ना? (अर्थात त्यन्चीही परिस्थिती पासपोर्ट ई. बाबतित काहि वेगळी नाहिये). आणि एक सिक्रेट सान्गु?... ह्या तथाकथीत मोठ्या कम्पन्या मधुन काम करणारे बहुतेक कामगार आणि ईतर कर्मचारी वर्ग बहुतान्श त्यान्च्या कछ मधल्या मुळ गावातुनच आणलेला आहे. बहुतेक अशिक्शित आणि ऑफिस मधले बहुतेक अल्पशिक्शीत आहेत. त्यामुळे एथे कुठल्याही परिस्थितित टिकुन रहण्याशिवाय त्याना दुसरा पर्याय तरी काय आहे? उच्च मॅनेजमेन्ट मधले लोक तुमच्यशी या विशयावर बोलणार नाहीत कारण त्यान्च्या आजुबाजुला पेरुन ठेवलेले प्रोप्रय्टर चे खासमखास लोक!! अरबी सुरस कथेपे़क्शाही चमत्करिक वाटतेय ना?....पण हे आहे भारतिय कम्पन्यान्मधे खेळले जाणारे घाणेरडे राजकारण. असो..कोळसा उगाळावा तितका काळाच आहे त्यान्चा.

काका, तुम्हाला असे काहि सान्गणारे लोक भेटणारही नाहित कदाचित कारण म्हणतात ना 'आपलेच दात आणि आपलेच ओठ'. पण काका आमचाही अनुभव १००% खरा आहे, ईतका कि मी स्वताहुन कधीही कोणालाही ह्या कम्पन्यामधे जायची शिफारस करणार नाही.

बाकि मि ज्या कम्पन्यान्ची शिफारस करतेय त्या खास मिपा वाचणार्‍या लोकान्साठि च. म्हणजे ऊच्चशिक्शीत ईन्जीनियर आणि तत्सम. अर्थात त्याही कम्पन्यान्च्या कामगार वर्गाची स्थिती भारतिय कम्पन्यान्पेक्शा खूपच चान्गली आहे.

काका तुम्ही भारतिय कम्पनी मधे फक्त अर्ज केला होतात, जर खरच तुम्हि तिथे गेला असतात तर मला खात्री आहे तुमचा प्रतिसाद या पेक्शा खुप खूप वेगळा असता.

युरोपियन कम्पन्या पिळून घेतात?...आता हे मी नाहि पहिले किन्वा ऐकले पन. माझ्या नवर्‍याच्या कम्पनित आणि आमचे बरेच दोस्त लोक जिथे जिथे काम करतात तिथे फक्त ८ तासान्चा नियम आहे. ठरलेल्या वेळेआधि यायचेही नाही, आणि वेळ सम्पल्यावर थाम्बायचेही नाहि. घरी ऑफिस च्या कामाचे कसलेही फोनस येत नाहीत.

"भारतिय कंपन्यात इतर युरोपिय कंपन्यांच्या तुलनेत पगार कमी असतो पण सोयी सुविधा जास्त असतात आणि नोकरी टिकण्याची शाश्वती जास्त असते." ...

पगार कमी याच्याशी पुर्ण सहमत. सोयी सुविधा बाबतित तिव्र असहमत. नोकरि टिकण्याबाबतित सहमत, कारण तुम्हाला कुठे जाउच दिले जात नाहि. कधिही पास्पोर्ट मागुन पहा, प्रचण्ड कटकट करावी लागते. त्यपेक्शा मग टिकुन जाणे जास्त सोपे असते. काका तुम्हाला महितेय, ह्या कम्पन्यातुन बाहेर जाणारे लोक नेहेमी कोणीतरि आजारि असल्याचे सान्गुन आणि एण्ड ऑफ सर्विस बेनिफित्स वरही पाणी सोडुन अक्शरश: पळून का जातात? (आमच्या बाबतित असे सुदैवाने घडले नाहि, कारण ३ महिन्याच्या नोटिस साठि आमचि ही सध्याची कम्पनी थाम्बायला तयार झालि, सगळ्यान्च्या बाबतित असे होत नाहि)

काका माझ्या कुठल्याही वाक्याने जर तुम्ही दूखावले गेले असाल तर खरच सॉरी. माझा तुम्हाला दुखविण्याचा उद्देश नव्हता आणि नाहि.

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2013 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर

मला राग येण्याचा प्रश्नच नाही. मी सुखात आहे.

तुमचा अनुभवही खोटा आहे असे मी म्हणत नाहिए. पण तुमच्या अनुभवाचे जे सार्वत्रीकरण तुम्ही करता आहात ते चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे आहे. माझ्या सानिध्यात कामगार वर्ग आलाच नसेल आणि माझा संबंध फक्त अकौन्ट्स, पर्चेस , निम्न आणि उच्च मेनेजमेन्ट अश्या लोकान्शीच जास्त असेल हे कसल्या बळावर गृहीत धरले?

ह्या तथाकथीत मोठ्या कम्पन्या मधुन काम करणारे बहुतेक कामगार आणि ईतर कर्मचारी वर्ग बहुतान्श त्यान्च्या कछ मधल्या मुळ गावातुनच आणलेला आहे. बहुतेक अशिक्शित आणि ऑफिस मधले बहुतेक अल्पशिक्शीत आहेत.

मान्य आहे. पण अशांना रजेवर जाताना कोणीतरी आजारी असल्याचे सांगावे लागते आणि नोकरी सोडताना एंड बेनिफिट्सवर पाणी सोडावे लागते हे विधान १०० ट्क्के अमान्य आहे. भारतिय व्यवस्थापन कंपनीतून युरोपिय व्यवस्थापन कंपनीत निवड झालेले आणि गेलेले अनेक कामगार मी पाहिले आहेत. तसेच इतर व्यवस्थापनातूनही भारतिय व्यवस्थापनात येणारे अनेक आहेत.

उच्च मॅनेजमेन्ट मधले लोक तुमच्यशी या विशयावर बोलणार नाहीत कारण त्यान्च्या आजुबाजुला पेरुन ठेवलेले प्रोप्रय्टर चे खासमखास लोक!!

हा:हा: हा: फारच करमणूक प्रधान वाक्य आहे. असो. तुम्हाला माहिती पुरवणारी व्यक्ती कोणी असमाधानी असू शकेल. त्यातून अशा रंजक कंड्या पिकविल्या जातात. विशेषतः भोळ्याभाबड्या श्रोत्यांपुढे.

इतकी वाईट परिस्थिती असेल तर कच्छ मधून कोणीही आपला जीव धोक्यात घालून मस्कतमध्ये येणार नाही. आलेला कोणीही वर्षोन्वर्षे टिकणार नाही. पगाराची तक्रार असते पण छळवणूक, पिळवणूक वगैरेची तक्रार ऐकली नाही. नोकरी सोडून जाता येत नाही असे तर अजिबात नाही. असो.

भारतिय व्यवस्थापन आणि युरोपिय व्यवस्थापन ह्यात फरक जरूर आहे पण आपण रंगविता एवढे चित्र भयानक नाही. सर्व भारतिय व्यवस्थापन कंपन्यांचे चित्र एवढे काळे नाही आणि सर्व युरोपिय कंपन्यांचे चित्र एवढे गोरे नाही.

तुमचे अनुभवविश्व वेगळे आहे माझे वेगळे आहे. आपले एकमत कधीच होणार नाही त्यामुळे ह्यापुढे वाद वाढवत न्यायची माझी इच्छा नाही.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2013 - 9:25 pm | स्वप्नांची राणी

काका तुम्हि या कम्पन्यानमधे कधिही काम केलेले नाहीये त्यामूळे ऐकिव माहिती हे तुमच्या बाबतित असु शकेल. माझी माहिती ऐकिव नाहिये. हा वाद चालू होता असही मला वाटल नाहि. पण तूमच्या प्रत्येक पोस्ट ला मी ऊत्तर दिले कारण "अनुभवाचे जे सार्वत्रीकरण तुम्ही करता आहात ते चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे आहे." असे तूमच्या पोस्ट्स बाबतीतही होऊ नये.

तुम्ही मिपा वरील जेश्ठ जाणकार आहात, आणि मि अगदी नविन. सहजिकच तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक जास्त असतिल. पण आता माझ्या पोस्ट्स वाचुन पण निर्णय घेताना, विशेशता भारतिय कम्पन्या बाबत लोक अधिक सावधतेने वागतील अस मला वाटत.

मी ही माझ्याकडून आता या विशयावर पडदा टाकते. तरिही गल्फ या विशयाबद्दल कोणालाही माहिती हवि अस्ल्यास प्रायवेट मेसेज करावा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Mar 2013 - 9:34 pm | निनाद मुक्काम प...

गल्फ मध्ये युरोपियन देशाच्या पासपोर्ट वर मी व माझी पत्नी काम करण्यास आल्याने आम्हाला कदाचित वेगळे अनुभव आले असतील , ते जमल्यास मांडेन कधीतरी
ह्यामुळे पेठकर काका व तुमच्या मध्ये चाललेल्या चर्चेत माझ्या तर्फे विशेष भर घालू शकत नाही ,
मात्र भारतीयांना येथे बोलावण्याची व त्यांना मदत करण्याची कळकळ मला खूपच आवडली.
सध्या दक्षिण आफ्रिकेतून दुबई व आबू धाबी येथे मोठ्या प्रमाणात टोळझाड येत आहे ,
त्यांना ग ची बाधा झालेली असते व वर्णाचा नाहक अभिमान
त्यांना त्यांच्या देशात कोणी आता विचारत नाही ,
मल्लू जर मल्लू ला तेथे नेतो मग आपणच का मागे राहावे.

स्वप्नांची राणी's picture

1 Apr 2013 - 1:18 am | स्वप्नांची राणी

मल्लू जर मल्लू ला तेथे नेतो मग आपणच का मागे राहावे.......प्रचण्ड अनुमोदन. खरच ईथे खूप सन्धि आहेत. सगळ्या मोठ्या ऑईल, गॅस आणि पेट्रोकेमिकल्स चे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत आणि त्याना प्रशिक्शित मनुष्यबळाचि कायमच गरज असते. गल्फ बद्दल पुर्वग्रह असल्यामुळे आपण खरच चान्गल्या सन्धि हातुन सोडतो. (ईथे महारश्ट्र मंडळ पण आहे हां!!)

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2013 - 2:27 am | प्रभाकर पेठकर

तुम्हि या कम्पन्यानमधे कधिही काम केलेले नाहीये त्यामूळे ऐकिव माहिती हे तुमच्या बाबतित असु शकेल.

कोणी सांगितले तुम्हाला. आता मला असा प्रश्न पडला आहे भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या म्हणजे तुम्हाला कुठल्या कंपन्या अभिप्रेत आहेत?
कारण इथे ९० टक्के कंपन्यांमध्ये भारतिय व्यवस्थापन आहे. जनरल मॅनेजर पासून चपराशा पर्यंत सर्व पदांवर भारतिय आहेत आणि पॉलीसी ठरविण्यातही भारतिय आहेत. बाहेरच्यांचा हात नाही, संबंध नाही. अशा कंपन्यांना मी भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या मानतो. त्या जवळ जवळ ८० टक्के आहेत. मी आलो ती कंपनी, आलो तेंव्हा ब्रिटिश व्यवस्थापनाची होती पुढे सर्व ब्रिटिश मॅनेजर्स, असिस्टंट मॅनेजर्स मायदेशी परतून सर्व कारभार भारतिय व्यवस्थापनाच्या हाती आला. अशा कंपनीत मी १० वर्षे काम केले आहे. तुम्ही स्वतः कुठल्या कंपनीत, किती वर्षे काम केले आहे? जाणून घ्यायला आवडेल.

माझी माहिती ऐकिव नाहिये.

तुम्ही कामगार म्हणून स्वतः काम केले आहे का? की उच्च पदावर काम केले आहे? की नवर्‍याने कामगार म्हणून कींवा उच्चपदावर काम केले आहे. दोन्ही पैकी कोणीही कामगार म्हणून काम केले नसेल तर तुमची माहितीही ऐकिवच झाली नं? त्या कंपनीत तुम्ही कामाला (उच्च पदावर) होता म्हणून तुमची माहीती 'फर्स्ट हँड' आणि इतरांची ऐकिव, असे का? जर तुम्ही उच्चपदावर होता आणि कामगार तुमच्या जवळ (आपल्याच कंपनीतील उच्च पद्स्था जवळ) मन मोकळे करून बोलतात आणि बाहेर बोलताना त्यांच्या अवती भवती खासंखास माणसं पाळत ठेऊन असतात ह्यात तुम्हाला विसंगती नाही वाटंत का?

"अनुभवाचे जे सार्वत्रीकरण तुम्ही करता आहात ते चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे आहे." असे तूमच्या पोस्ट्स बाबतीतही होऊ नये.

म्हणजे तुमच्या अनुभवातील निदान सत्यता मी मान्य करतो आहे. त्याच्या सार्वत्रीकरणाला आक्षेप घेतला आहे. तुम्ही तर तशी माझ्या अनुभवातील सत्यताही मान्य करताना दिसत नाही.

तुम्ही मिपा वरील जेश्ठ जाणकार आहात, आणि मि अगदी नविन.

त्याचा इथे चर्चेत काहीच संबंध नाही. भलते मुद्दे निर्माण करून तुम्हाला काय साध्य करायचे आहे? तसेही, 'जाणकार' म्हणता आणि माझ्या माहितीला चुकीची ठरविता आहात. ह्याला काय म्हणावे?

आता माझ्या पोस्ट्स वाचुन पण निर्णय घेताना, विशेशता भारतिय कम्पन्या बाबत लोक अधिक सावधतेने वागतील अस मला वाटत.

माझा तर सर्व इच्छुकांना सल्ला आहे माझ्या पोस्ट्स पाहून निर्णय घेऊ नका. इथे यायचे असेल तर ज्या कुठल्या कंपनीत येणार असाल तर ती कंपनी भारतिय व्यवस्थापनाची आहे की युरोपिय व्यवस्थापनाची असा विचार न करता ती कंपनी कशी आहे ह्याची माहिती काढून मगच निर्णय घ्या. वाईट व्यवस्थापन भारतिय कंपन्यातही आहे आणि युरोपिय तसेच अरब कंपन्यातही आहे. चांगले व्यवस्थापन भारतिय कंपन्यातही आहे, युरोपिय कंपन्यातही आहे आणि अरब कंपन्यातही आहे.

आखाती प्रदेशात प्रथम नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध झाल्या त्या, सत्तरच्या दशकात, बी. जी. शिर्के, खिमजी रामदास, शापुरजी पालनजी ह्या कंपन्यांनीच भारतियांना प्रथम संधी दिली. दुबईचे मुलभूत इन्फ्रास्ट्रक्चर शिर्क्यांनी उभारले आहे. खिमजी रामदास ह्यांनी मस्कत मध्ये धान्य पुरविण्यापासून हरतर्‍हेच्या सोयी सुविधा अरबांना पुरविल्या आहेत. शापुरजी पालनजी ह्यांनी इथल्या राजाचे राजमहाल बांधले आहेत. वाईट व्यवस्थापन असते तर अशी मोठी काँट्रॅक्ट्स मिळालीच नसती. कंपन्यांचा विस्तार झाला नसता. (खिमजी रामदास भारतिय व्यवस्थापनात नं.१ बिझिनेस हाऊस आहे)चार चार पिढ्यांपर्यंत व्यवसायाचे/व्यवस्थापनाचे हस्तांतरण होत कंपन्या एवढ्या नांवारुपाला आल्या नसत्या.

मला वाटतंय स्वप्नांची राणी हा ड्यु आयडी आहे काका!
जाऊ दे! जास्त नका विचार करु.
जवळपास आठ आकडी पगार जी एम लेव्हललाच मिळतो ९९%

स्वप्नांची राणी's picture

1 Apr 2013 - 4:19 pm | स्वप्नांची राणी

ड्यु आयडी म्हणजे ट्रोल का? तेच असेल तर मि ड्यु आयडी नाहिये पण हे सिद्ध करण्याचा पण काहिच मार्ग नाहिये. मी हा आय डी खुप आधि घेतला होता, पण ह्याच पोस्ट वर प्रतिसाद देता येईल अस वाटल म्हणुन प्रतिसाद दिला.

बाय द वे, मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, मीमराठी, ऐसीअक्शरे ई. सगळीकडे मि वाचक आहे. त्यात कायम 'कम्पुबाजी' हा शब्द असतो...ति 'कम्पुबाजी' म्हणजे हेच का हो? काही पटले नाहि कि ड्यु आयडी म्हणायचे म्हणजे नविन सदस्याची हवाच जाते....

स्वप्नांची राणी's picture

1 Apr 2013 - 4:08 pm | स्वप्नांची राणी

" वाईट व्यवस्थापन" हे फक्त स्वताच्या कामगार आणि कर्मचार्‍यान्बाबत काका, अरबांसाठी नाहि. आणि हाच मुद्दा मि वारंवार माण्ड्तेय. आणि भारतिय कम्पन्यान्चा तुम्हाला अनुभव नाही अस माझ तुमच्या पोस्ट्स वरुन मत झाल. विशेशता "मी जरी भारतिय व्यवस्थापन कंपनीत आलो नसलो तरी अशा कंपनीत मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आणि शोधून इंग्रजी व्यवस्थापनाच्या कंपनीत आलो असा अंदाज कसा बांधला? इथे यायच्या आधी पुण्याच्या बी.जी. शिर्के कंपनीच्या दुबई शाखेत अर्ज केला होता. भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांचे मला वावडे नाही." हे मला फारच विनोदी वाक्य वाटल.

वेल, आय रेस्ट माय केस...

प्रभाकर पेठकर's picture

2 Apr 2013 - 3:40 am | प्रभाकर पेठकर

"मी जरी भारतिय व्यवस्थापन कंपनीत आलो नसलो तरी अशा कंपनीत मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आणि शोधून इंग्रजी व्यवस्थापनाच्या कंपनीत आलो असा अंदाज कसा बांधला? इथे यायच्या आधी पुण्याच्या बी.जी. शिर्के कंपनीच्या दुबई शाखेत अर्ज केला होता. भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांचे मला वावडे नाही." हे मला फारच विनोदी वाक्य वाटल.

ह्यात विनोदी असे काय आहे? समजू शकेल का?

'मला भारतिय व्यवस्थापन कंपन्यांचा कांही अनुभव नाही' ह्या तुमच्या एकांगी विधानाला उत्तर म्हणून वरील माझी सर्व विधानं आहेत. ही भारतिय व्यवस्थापन कंपनी, ती युरोपिय व्यवस्थापन कंपनी असा विचार करून मी त्याकाळी अर्ज केले नव्हते हे तुम्हाला पटवून देण्यासाठीच दुबईच्या बी. जी. शिर्के कंपनीचा उल्लेख आला. त्यात विनोदी काय आहे? ज्या कंपनीत मी आलो ती ब्रिटिश व्यवस्थापनाची कंपनी होती आणि पुढे जाऊन ती १००% भारतिय व्यवस्थापन कंपनी झाली. अशा कंपनीत, म्हणजे भारतिय व्यवस्थापन कंपनीत, मी १० वर्षे काम केले आहे. ह्यात विनोदी काय आहे? भारतिय व्यवस्थापन कंपनीचा मला अनुभव नाही हे विधान तुमचेच होते नं? माझ्या बद्दल कुठलीही माहीती नसताना बिनबुडाची विधाने करून विनोद कोण निर्माण करत आहे? तुम्ही की मी?

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2013 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर

मोरवी इथे मोठ्ठा भूकंप होऊन वित्त आणि जिवित हानी झाली होती तेंव्हा ह्याच कंपनीने स्वखर्चाने आपल्या कामगारांना सामुदायिक सुट्टी आणि आर्थिक मदत केली होती. कदाचित हे तुमच्या कानावर नसेल म्हणून माहितीसाठी.

स्वप्नांची राणी's picture

30 Mar 2013 - 5:32 pm | स्वप्नांची राणी

"येथील प्रमुख वृत्तपत्रात रोज भारताच्या अर्थव्यवस्थेचे गुणगान गात असतात." निनाद, आमह्च्याक्डे येणार्या वृत्तपत्रात जवळपास ५०-६० पाने असतात. प्रत्येक देशाला एक पान वाहिलेले असते. आणि 'भारताच्या अर्थव्यवस्थेचे गुणगान' असलेल्या पानाआधि चीन च्या अर्थव्यवस्थेचे गुणगान गायिलेले असते. असे सगळ्याच देशान्च्या बाबतित असते. पण त्यावरुन त्या देशाची ईथली स्थिति मजबुत ई. आहे असे काहि नाहिये. मि वर म्हणल्या प्रमाणे मोठ्या भारतिय कम्पन्याचे (नाव घेत नाहि) प्रोजेक्ट एथे प्रचण्ड तोट्यात गेलेले आहेत. त्यान्च्या हातातुन चालू प्रोजेक्ट पण कढुन घेतल्या गेलेले आहेत. आणि यात नुकसान अर्थात त्यन्च्या कमचार्यान्चेच केले जाते. अचानक प्रचण्ड कपात आणि उरलेल्यान्वर कामाचा मरणप्राय ओझे. आमचे एक स्नेहि सकाळि ऑफिस मधे गेले कि कधि कधि रात्रि पण घरी येऊ शकत नाहित. थोडक्यात भारतातलेच वर्किन्ग कल्चर राबविले जाते.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2013 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

त्यान्च्या हातातुन चालू प्रोजेक्ट पण कढुन घेतल्या गेलेले आहेत.

तुमच्यात आम्हाला भावी संपादक दिसले.

स्वप्नांची राणी's picture

30 Mar 2013 - 6:13 pm | स्वप्नांची राणी

मिपा मी खुप महिन्यापासुन वाचतेय. जेव्हा सदस्यत्व घेतले तेव्हा मला आय डी काय घ्यावा हेच सुचत नव्हते. आणी अचानक तुमचा आय डी दिसला. त्यामुळे जर परिकथेतील राजकुमार आहे तर मग स्वप्नन्चि राणी का नको, म्हणुन हा आय डी घेतला. तुमचे लेख वाचलेत...आणि कधी कधी (च) आवडतात.... :)

कपिलमुनी's picture

1 Apr 2013 - 4:45 pm | कपिलमुनी

मिपावर सध्या राजकुमार , राणी आहेत ..तरी इच्छुकांनी राजा ,प्रधान , राजकुमारी यां नावांसाठी नोंदणी करावी

इरसाल's picture

1 Apr 2013 - 5:15 pm | इरसाल

मागे "परीकथेतला राजा" असा आयडी आला होता व त्या आयडीने मी "परा" ला दुखवायला किंवा खुन्नस वगैरे देण्यासाठी हा आयडी घेतला नसल्याचे वेगळा धागा काढुन का कायसे स्पष्ट केले होते.

इरसाल's picture

30 Mar 2013 - 8:38 pm | इरसाल

.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2013 - 1:37 am | स्वप्नांची राणी

मी नुकताच त्यान्चा 'मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे' हा लेख वाचला आणि एक टुकार प्रतिसाद देउन पहिला...;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2013 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब आणि स्वप्नांची रा. यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्स.

-दिलीप बिरुटे