फोटो क्रं १ (सारण/स्टफिंग):
फोटो क्रं २ (तयार सॅन्डवीजेस):
साहित्यः
१. उकडलेली अंडि - २ ते ३
२. बारिक चीरलेली हिरवी, पिवळी, लाल, केशरी सीमला मिरची - १.५ वाटि किंवा ज्या कलरच्या मिळतील त्या :D
३. बारिक चीरलेली हिरवी मिरची - आवडिप्रमाणे कमी / जास्त
४. बारिक चीरलेली कोथिंबीर - २ चमचे
५. ब्लॅक ऑलीव्ज - २ चमचे
६. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम
७. बारिक चीरलेला पालक - १/२ वाटि
८. चवीनुसार मीठ
९. प्लेन मेयॉनीज / टोमॅटो केचप/सॉस - २ मोठे चमचे प्रत्येकि (चीली फ्लेवर्ड मेयॉनीज मिळाल तर उत्तम; मेयॉनीज नसेल तर हॉट अॅन्ड स्वीट टोमॅटो सॉस/केचप पण चालेल)
१०. तेल
११. पीटा ब्रेड-कुबुस / पोळि/चपाती / रुमाली रोटि / टॉर्टिला - ह्या पैकि जे उपलब्ध असेल ते; अगदिच काहि नसलं तर ब्रेड (खास बॅचलरांसाठि)
१२. आपापल्या आवडिचं किसलेल चीज
कॄती:
१. एका नॉनस्टिक पॅन मधे एक चमचा तेल तापलं कि बारिक चीरलेला पालक टाकुन कोरडा होइस्त परतुन घ्या
२. उकडलेली अंडि किसुन घ्या
३. आता एका भाडयांत / बाउल मधे किसलेली अंडि, परतलेला पालक, बारिक चीरलेल्या सीमला मिरच्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, ब्लॅक ऑलीव्ज, किसलेलं चीज आणि चवीनुसार मीठ घालुन एकजीव करा. हे झालं आपल सारण/स्टफिंग तयार (फोटो क्र. १)
४. एका वाटित मेयॉनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करा
५. आता जे जे उपलब्ध असेल ते ग्रुहित धरुन खालील पाय~या देतोय. माझ्या टोस्टर मधे ३ विकल्प/ऑप्शन्स आहेत. एक आडवा असुन त्याला उभ्या खाचा आहेत. दुसरा वॅफल मेकर आहे आणि तिसरा नॉर्मल सॅन्डवीच मेकर आहे (मधुन खाचा असलेला)
अ. पीटा ब्रेड/कुबुस: मधुन कापा; दोन अर्धे गोल होतील. आता प्रत्येक भागात मेयो-सॉसच मिश्रण लावा/स्प्रेड करा. सॉस लावल्यावर वरुन हलका दाब द्या म्हणजे दोन्हि बाजुला समान लागेल (फ्रि हॅन्ड ड्रॉईंन्ग असत तसं :D) तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा (उभ्या खाचा असलेलं).
ब. पोळि/चपाती/ रुमाली रोटि / टॉर्टिला: वरुन मेयो-सॉसच मिश्रण लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा किंवा त्याचा रोल करुन तव्यावर अलगद दोन्हि बाजुकडुन शेका
क. ब्रेडः मेयो-सॉसच मिश्रण दोन्हि ब्रेड स्लाइसना लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा
६. आवडत्या चटणी/सॉस सोबत गरमागरम सर्व करा :)
७. छोटयांसाठि हिरव्या मिरच्या वगळा
८. ह्यात बारिक चीरलेला / किसलेला ब्रोकोली, मशरुम, कोबी (जांभळ्या रंगाचा नाहितर आपला साधा) पण छान लागेल.
टिपः
१. हि सॅन्डवीजेस/रोल्स कच्चीपण छान लागतात फक्त तेवढा पालक, ब्रोकोली, मशरुम परतुन घ्या आणि पोळि/चपाती, रुमाली रोटि किंवा टॉर्टिलाला सॉस लावण्याआधि तव्यावर थोडं शेकवुन घ्या
अवांतर
१. हि पाककॄती अंडे न घालता करता येईल का?...तर हो :D. अंडि वगळुन बाकि सगळं साहित्य तेच ठेवा आणि तशीच कॄती करा :D
प्रतिक्रिया
25 Mar 2013 - 2:30 pm | यशोधरा
भारी दिसतं आहे! अजून जेवायला जायला मिळालं नाही आणि हे पाहिलं! निषेध!
25 Mar 2013 - 2:32 pm | अक्षया
दिसायला जेवढी छान आहे तेवढीच चवीला पण असणार.
अंडे न घालता नक्कीच करुन बघणार.
धन्यवाद. :)
25 Mar 2013 - 2:40 pm | नानबा
जब्राट... या विकेंडला करण्यात येईल, आणि या फोटु सारखीच झाली (न करपता वगैरे), तर आपल्याला सांगण्यात येईल. :)
25 Mar 2013 - 3:43 pm | ५० फक्त
आम्हाला बोलवा की साक्षीदार म्हणुन, तुम्हीच करपवणार अन तुम्हीच सांगणार करपलं नाही म्हणुन.
25 Mar 2013 - 3:58 pm | नानबा
ब्वॉरं.... या मग खायला करपलेले बॉईल्ड एग्ज सॅन्डवीच/रोल्स.. :))
25 Mar 2013 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा
25 Mar 2013 - 3:03 pm | गणपा
एकदम कलर फुल्ल पाकृ. :)
25 Mar 2013 - 3:08 pm | मृत्युन्जय
च्यायला दिपकराव मुरले इथे. अंडी न घालता करता येतील का चे उत्तर पण दिले. बाकी पाकृ नेहमीप्रमाणेच उत्तम.
25 Mar 2013 - 3:42 pm | ५० फक्त
आणि हो, एक प्रतिसाद आणि चार उपप्रतिसाद सुद्धा घालवले.
असो, छान दिसतं आहे, कधीतरी करेन आणि तुम्हाला कळवेन.
25 Mar 2013 - 7:30 pm | जेनी...
हे सँडविच करायला .. तुम्हाला का बरं अंडी घालावी लागतिल ??
:!
बाकि दीपू काका ओल टैम रॉक्स हं ! ;)
25 Mar 2013 - 3:38 pm | स्पंदना
मस्त. पिकनिकसाठी घेउन जाता येइल अस वाटतय.
हल्ली मी पोळीभाजी दिली की मुलं नाक मुरडतात. मग अस काही दिलं तर खातील पण अन पालक, अंड असल्याने माझं चांगल फुड दिल्याच समाधानपण होइल. चला आठवड्याच्या दोनदा जाणार्या पास्त्याला पर्याय.
ठँक्यु!!
25 Mar 2013 - 7:33 pm | जेनी...
अप्पू ... ए तो पास्ता नको हं कँसल करुस :-/
उलट एकावर एक फ्री ची ऑफर ठेव ;)
माझी आई मला अस्सच करायची :-/
26 Mar 2013 - 5:55 pm | दिपक.कुवेत
तुला काय ग बोलायला जातय. बिचा~या अपर्णाला मुलांना खायला घालताना नाकि नउ येत असतील :D
25 Mar 2013 - 3:45 pm | सविता००१
कसली छान रंगीबेरंगी पाक्रु आहे......... नक्की करेन
25 Mar 2013 - 4:13 pm | पिंगू
वाह ख्वाईश पूर्ण केली तर तुम्ही..
25 Mar 2013 - 4:38 pm | nishant
एकदम मस्त पण एक शंका - "यात पनीर घातले तर कसे लागेल?" :D :D
25 Mar 2013 - 4:48 pm | दिपक.कुवेत
प्रश्नाला पर्याय मिळाला......आता प्रत्येक पाकॄ...पनीर घालुन कशी लागेल हे विचाराव लागेल :D...एनिवे तुच कर आणि सांग :)...मला सद्धा "पनीर" शब्द लिहुन अंमळ कंटाळा आलाय
26 Mar 2013 - 4:24 pm | nishant
नक्कि करुन बघणार.. :)
25 Mar 2013 - 4:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त पाकृ... करायला सागून खाण्यात येईल :)
25 Mar 2013 - 5:05 pm | रेवती
छान, रंगीबेरंगी पाकृ!
25 Mar 2013 - 5:14 pm | सानिकास्वप्निल
फोटो ही सुंदर :)
पिटा वापरुन करुन बघेन.
मी तोरतीया वापरुन केलेले मेक्सिकनचिकन किसाडिया साधारण असेच होते.
25 Mar 2013 - 7:36 pm | जेनी...
ए सानिका तुला रीकोटा चीझ वापरुन आम्रखंड बनवता येत का ??
दीपू काका तुमाला येतं का ??
येत असल्यास संपर्क साधावा ...
25 Mar 2013 - 7:56 pm | दिपक.कुवेत
आग होतीस कुट ईतके दिस? डोले सुकलं कि ग! तुझ्या परतिसादाबिगर अन्न काय ग्वाड लागलं नाहि बग! आता आम्रखंड बनवलीस कि तोंड गोड कराया विसरु नकोस :D
25 Mar 2013 - 11:57 pm | जेनी...
असं हो काय दीपू काका :-/
मी एकदा प्रयत्न केला होता .. रीकोटा चीझ आणि मँगो पल्प एकत्र मिक्सरला लावलं
पण ते बहुत पातळ हूवा :( मग फीझ मे ठेवा ... पण मी एका पार्टीत खाल्लं होतं तेवढं
टेस्टी नवतं झालं :( ... काहितरी कमी होतं , नेमकं काय ते कळत नवतं :(
येत असेल तर सांगाना काका :( :-/
26 Mar 2013 - 6:03 pm | दिपक.कुवेत
आज्जे तुझा आत्मवीश्वासच कमी पडला असेल.....परत जोमाने प्रयत्न कर......बघ नक्कि जमेल
26 Mar 2013 - 6:50 pm | ५० फक्त
कै-या मिक्सरमधुन पुड करुन घालायच्या ना, झालं असतं घट्ट हाकानाका. असो.
26 Mar 2013 - 7:31 pm | जेनी...
:-/ :-/
25 Mar 2013 - 10:25 pm | Mrunalini
वा,, खुपच छान दिसते आहे रंगीबेरंगी सँडविच... नक्की करुन बघेल.
25 Mar 2013 - 11:26 pm | पैसा
एकदम रंगीबेरंगी आणि हेल्दी!
26 Mar 2013 - 4:54 pm | दिपक.कुवेत
मस्त खा आणि स्वस्थ रहा :)
26 Mar 2013 - 5:28 pm | अनन्न्या
अंड्याला पर्याय म्हणून पनीरच वापरणार!! त्यामुळे मी केलेली सँडविच परफेक्ट होणार!! तुमचा पनीर फ्रीचा पर्याय फसला आहे!! ही पाक्रु. पनीरसह झकास!!!
26 Mar 2013 - 5:52 pm | दिपक.कुवेत
पण नुसतं पनीर बेचव असतं/लागत म्हणुन तर ते आपण वेगवेगळ्या प्रकारात वापरतो...उदा. मटार पनीर, पनीर टिक्का मसाला ई. अगदि रसगुल्ले सुद्धा आपण साखरेच्या पाण्यातुन काढतो. तरि सुद्धा प्रयत्न करायचाच असेल तर आधी एकाच सँडविच/रोल मधे घालुन पहा... मग आवडल तर सगळ्यात घाल :)
28 Mar 2013 - 9:42 am | पियुशा
अर्धा जीव त्या सानिकेने घेतला अर्धा तुम्ही घ्या आता ;)
झक्कास !
28 Mar 2013 - 12:53 pm | कच्ची कैरी
ह्यात अंड्याएवजी पनीर हवे होते मजा आली असती :)
28 Mar 2013 - 1:48 pm | दिपक.कुवेत
किसुन घातली तरि मजा येईल आणि एक वेगळिच चव लागेल (कॄ.ह.घे :D)
28 Mar 2013 - 6:39 pm | आदूबाळ
करून पाहिले आणि खाल्ले. धन्यवाद दीपकशेठ!
सारणासाठी आमची चाराण्याची वर्गणी:
- बटाटा उकडून घातला
- मिठाऐवजी शेंदेलोण घातले.
- थोडे ऑलिव्ह ऑईल घातले
28 Mar 2013 - 7:51 pm | सूड
अंडं घालून ही पाकृ करायला किती वेळ लागला तुम्हाला ?
29 Mar 2013 - 1:28 pm | दिपक.कुवेत
किती अंडि घालतो त्यावर अवलंबुन आहे....तुला कमी वेळात हवी असतील तर अंडि नको घालुस :D
29 Mar 2013 - 4:34 pm | स्पंदना
मैने बन्व्या, खाया, मजा आया.
30 Mar 2013 - 1:43 pm | सस्नेह
कसले जीवघेणे फोटॉ आहेत हो कुवेतवाले !
पण आमी नाय बा बनवणार. खट्पट लै, इतका वेळ स्वैपाकघरात काढणं आपल्याला जमत नै बॉ !
तुमच्याकडेच टेस्ट घ्यायला आलं तर कसं ?
30 Mar 2013 - 1:51 pm | दिपक.कुवेत
ऑल मिपाकर्स आर ऑलवेज वेलकम......:) नाहितर जेव्हा मी भारतात येईन तेव्हा कट्टा करु कसं?
30 Mar 2013 - 1:59 pm | अभ्या..
ब्येस्ट ब्येस्ट. आणि कट्ट्याला ते गुलकंद अनार चे आईस्क्रीम. :)
कराच एकदा मिपाच्या बल्लवाचार्यांचा आणि सुगरणीचा कट्टा.
(भारतात) जिथं कराल तिथं येऊ. :)
30 Mar 2013 - 2:09 pm | दिपक.कुवेत
अरे तुम्हि (मिपाकरांनी) फर्माईश करावी (खाण्याची) आणि मी ती पुरवावी अशी फार ईच्छा आहे.....लाईव्ह प्रतीसाद आणि कव्तुकाचे चार शब्द ऐकले कि काहितरि चांगल केल्याच आणि खाउ घातल्याच समाधान तरी मिळेल :)
30 Mar 2013 - 8:51 pm | जेनी...
दीपू ़काका मीपण येणार हं :D
30 Mar 2013 - 9:05 pm | दिपक.कुवेत
अग तुला घातल्याबिगर मला अन्न कस ग्वाड लागेल?
30 Mar 2013 - 9:41 pm | कुहू
नक्किच ट्राय करेन!!
31 Mar 2013 - 6:40 pm | साऊ
आवडलं.