साहित्यः-१)दोन पेले नाचणे.
२)अर्ध्या नारळाचे दूध्.(घट्ट व पातळ.)
३)किसलेला गूळ.
४)चिमूटभर मीठ.
५)काजू किंवा भाजलेले शेंगदाणे.
६)दिड चमचा साजूक तूप.
कृती :-नाचणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे.सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे.चोथा येईल तो टाकून द्यावा.
गाळून उरलेल्या पाण्यात अजून पाणी घालून ६-७ तास ठेवावे म्हणजे नाचणीचे सत्व खाली बसेल व
पाणी वर राहिल.वरचे पाणी हळू काढून टाका.आता जे सत्व राहील त्यात नारळाचे दूध,किसलेला गूळ.
काजू व मीठ घालून ढवळून घ्या.गूळ विरघळला कि हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा.
जरावेळाने मिश्रण घट्ट होत येईल्.केकच्या बॅटरपेक्षा जरा घट्ट झाले की त्यात तूप घालून ढवळा. तूप
लावलेल्या भाड्यांत हे मिश्रण ओता.व थंड करत ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.
प्रतिक्रिया
21 Mar 2013 - 4:15 pm | सानिकास्वप्निल
छान पाककृती.
नाचणीच्या पीठाचे किंवा रेडीमेड साखर-विरहीत सत्वाचे (पॅकेट) होऊ शकेल का?? माझ्याकडे दोन्ही आहे, तसे करुन बघेन मग.
21 Mar 2013 - 4:28 pm | ज्योति प्रकाश
मी कधी तसे केले नाही.तू करून बघ व मला सांग.
21 Mar 2013 - 7:56 pm | Maharani
छान पाकृ
मला पण हाच प्रश्न विचारायचा होता....
21 Mar 2013 - 4:31 pm | पिशी अबोली
हे फ्रिजमधे ठेऊन थंड झालं की अप्रतिम लागतं ना?
तुम्ही हे असे फोटो टाकून उन्हाने त्रस्त झालेल्या आम्हाला अजून जळवता.. :(
21 Mar 2013 - 5:22 pm | पिंगू
छान आणि पौष्टिक प्रकार आहे हा..
21 Mar 2013 - 7:45 pm | अनन्न्या
सांदण, खांडवी या कुटुंबातील वाटली.
21 Mar 2013 - 7:49 pm | nishant
मस्त पौष्टिक पाक्रु आणि फोटोहि उत्तम.
21 Mar 2013 - 7:57 pm | दिपक.कुवेत
एकदम थंड पाकॄ....:)
22 Mar 2013 - 12:32 pm | वैशाली हसमनीस
अतिशय चांगला पदार्थ-चवीला व प्रक्रुतिला.
22 Mar 2013 - 12:38 pm | कच्ची कैरी
पौष्टिक लहान मुलांसाठी तर उत्तमच :)