द्रमुकने केंद्राचा पाठिंबा काढला

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in काथ्याकूट
19 Mar 2013 - 6:16 pm
गाभा: 

राम राम मंडळी

अखेरीस द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे जाहिर केले आहे.

श्रीलंकेतील तामिळींवर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात भारताने काही ठोस भुमिका घ्यावी ह्या उद्देशाने करुणानीधींनी पाठिंबा काढला असल्याचे कळते.

अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19061506.cms

पण एकंदरीत पहाता
१) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे?
२) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे?
३) इतर काही यामागे घडामोडी आहेत?

तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2013 - 6:25 pm | प्रसाद गोडबोले

१) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे? >>> अगदी नि:संशय !
२) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे? >>> नक्की सांगता येणार नाही पण श्रीलंकेतल्या तमीळ लोकांना आपण आधार दिला पाहिजे
३) इतर काही यामागे घडामोडी आहेत? >>> कदाचित नाही .

मिड टर्म एलेक्श्न्न झाले तर कोण जिंकणार ?

पाठिंबा काढण्याबाबत पुन्हा विचार करण्यात येईल असे जाहिर केले आहे

तर्री's picture

19 Mar 2013 - 7:11 pm | तर्री

तृणमूल पाठोपाठ द्र.मु.क. ची दुसरी विकेट पडली आहे. मा.शरदराव उतरतील काय ?
आजच संभोग सहमती वयाचे विधेयक पास झाले आणि हा काडीमोड ?
बिसलेरी ! बिसलेरी !! बिसलेरी !!!

शैलेंद्रसिंह's picture

19 Mar 2013 - 7:45 pm | शैलेंद्रसिंह

द्रमुकने काढलेला पाठींबा आणि नितीश कुमारांनी दिल्लीत केलेले शक्तीप्रदर्शन ह्या गोष्टींमुळे नवी समीकरणे उदयास यायची शक्यता आहे. बिहार मधे नितीश कुमार, कर्नाटकचे देवेगौडा, ओरिसाचे नवीन पटनायक, बंगाल मधील कम्युनिस्ट एकत्र येतील. त्यांच्या बरोबर मुलायम (किंवा मायावती), द्रमुक (किंवा अण्णाद्रमुक) आणि चंद्राबाबु नायडु एकत्र यायची शक्यता आहे. ह्या आघाडीला १००-१५० जागा सहज मिळतील. निवडणुकीनंतर कॉंग्रेसेतर सरकारसाठी ही आघाडी आग्रही राहिल्यास अनेक छोटे पक्ष ह्यांना येऊन मिळतील आणि भाजपा किंवा कॉंग्रेसच्या बाहेरुन पाठींब्यावर तिसऱ्या आघाडीचे सरकार बनेल ज्याचे नेतृत्व नितीश कुमार करतील.

सव्यसाची's picture

19 Mar 2013 - 8:09 pm | सव्यसाची

सध्या तरी मला हे अतिशय farfetched (मराठी शब्द?) वाटते आहे.

शैलेंद्रसिंह's picture

19 Mar 2013 - 8:20 pm | शैलेंद्रसिंह

नितीश कुमार हे रॅलीइंग पॉईंट बनु शकतील. लालु, कॉंग्रेस, भाजपा वगळता इतर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2013 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

farfetched statement = ओढून ताणून केलेले विधान :)

विकास's picture

19 Mar 2013 - 9:10 pm | विकास

जर नितीश कुमार हे कर्नाटकचे देवेगौडा, ओरिसाचे नवीन पटनायक, बंगाल मधील कम्युनिस्ट आणि त्यांच्या बरोबर मुलायम (किंवा मायावती), द्रमुक (किंवा अण्णाद्रमुक) आणि चंद्राबाबु नायडु यांना घेऊन एकत्र आले तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा भाजपा अथवा काँग्रेसला होण्यापेक्षा नितीश कुमारांनाच होईल.

शैलेंद्रसिंह's picture

19 Mar 2013 - 9:55 pm | शैलेंद्रसिंह

तो कसा काय?

विकास's picture

19 Mar 2013 - 11:11 pm | विकास

ज्यांच्या पाठींब्यावर तुमच्या म्हणण्याप्रमाणे नितीश कुमार पंतप्रधान होऊ इच्छित आहेत त्यांचे स्वतःचे असे बळ कमी आणि महत्वाकांक्षाच जास्त अशी अवस्था आहे. केवळ मोदींना घाबरून ते नितीश कुमारांना पाठींबा देतीलही पण एकदा का राज्य आले की वेगळे घडू शकते.... आजच्या लोकसभेत या सगळ्यांची (ज्यांची किमान दोन आकडी खासदार संख्या आहे) ते कुठे कसे आहेत ते पाहूयातः

  1. Samajwadi Party(SP) 22
  2. Bahujan Samaj Party(BSP) 21
  3. Janata Dal (United) (JD(U)) 20
  4. All India Trinamool Congress(AITC) 19
  5. Dravida Munnetra Kazhagam(DMK) 18
  6. Communist Party of India (Marxist)(CPI(M)) 16
  7. Biju Janata Dal(BJD) 14

म्हणजे सगळे मिळून १३० आहेत. पुढच्या निवडणुकीत हे चित्र फार बदलेल अशातला भाग नाही. म्हणजे नितिशकुमारांपेक्षा मुलायम आणि मायावती किंवा तृणमुल काँग्रेसना देखील जास्त जागा मिळायची शक्यता आहे. नितीश कुमारांची प्रतिमा आणि रेकॉर्ड चांगले असले तरी हे वास्तव आहे. त्याहूनही महत्वाचे वास्तव असे आहे, की नितीश कुमारांची प्रतिमा बनवण्यात भाजपाने दिलेला महत्वाचा आणि किमान अजून तरी वरकरणी दिसणारा कटकटीवीना पाठींबा आहे. महाराष्ट्रात गेले अनेक वर्षे आघाडीचे सरकार आहे. त्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जसे उखाळ्यापाखाळ्या करतात तसे बिहारमधे दिसले तरी नाही. ते इतर कुणाशीही युती केल्यास नितीश कुमारांना जमणार नाही.

म्हणजे औटघटकेच्या पंतप्रधानाच्या पदासाठी त्यांना बिहारमधील सत्ता कमकुवत करण्याचा धोका घ्यावा लागेल. आणि ज्यांचा पॉलीटीकल बेसच लहान होतो ते केंद्रात प्रधानमंत्री होणार नाहीत, फार तर फार कृषीमंत्री होतील. ;)

चौकटराजा's picture

20 Mar 2013 - 4:57 am | चौकटराजा

प्रधानमंत्री होणार नाहीत, फार तर फार कृषीमंत्री होतील. smiley
विकास शेठ , अशी विधानं करता आमाच्या सायबाचा आपमान करून ? बिहार मधली बारामती आपल्या साठी बंद करू.
आपला कुठला तरा झा, यादव ई.

विकास's picture

20 Mar 2013 - 8:04 am | विकास

साहेबांचा अपमान करण्याचा अजिबात उद्देश नाही. असली तर खंतच आहे. :(

सव्यसाची's picture

20 Mar 2013 - 8:02 am | सव्यसाची

हेच टंकणार होतो पण तुम्ही माझे काम वाचवलेत.
मुलायमसिंग यांच्या जागा वाढतील का हा एक प्रश्नच आहे. तीच गोष्ट मायावती यांची पण.
शैलेन्द्रजी, तृणमूल कॉंग्रेस, जर कम्युनिस्ट असतील तर, या आघाडीत येणार नाही. सद्य परिस्थितीमध्ये द्रमुकला आहे त्यापेक्षा जास्ती जागा मिळणे कठीणच दिसते आहे. तीच गोष्ट कम्युनिस्ट लोकांची. मग जागा वाढणार कुणाच्या? एकतर अण्णा द्रमुक आणि जनता दल(यु) आणि त्या वाढून त्यांचे सरकार येईल ही तरी अशा कमीच वाटते आहे.

विकासजी म्हणतात त्याप्रमाणे बिहारमध्ये उखाळ्यापाखाळ्या नाहीत पण त्या बिहारच्या प्रश्नांवर नाहीत. ज्या दिवशी अधिकार मोर्चा झाला त्याच दिवशी नरेंद्र मोदींच्या प्रश्नावर सुशीलकुमार मोदींचे विधान असे होते ते असे:

“I have 35 years of association with Narendra Modi right from my ABVP days. It is the media that has been trying to create differences between me and Modi. We know that 2014 is going to be a battle between the BJP ideology and a Congress family. We are ready to go to the polls under the leadership of Narendra Modi if the party decides so.”

क्लिंटन's picture

20 Mar 2013 - 8:23 am | क्लिंटन

२००२ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या यशावर एका ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होती:

"The people of Gujarat were aggrieved with the kind of image painted outside the state and hence reacted in this way.There is no polarization in the state.People are secular and they do not like any fundamentalists"

आता हा नेता कोण? त्याचे नाव नितीश कुमार आहे. विश्वास बसत नसल्यास हे वाचा.

तेव्हा नितीश कुमारांचा मोदीविरोध हे एक "पोश्चरींग" आहे असे वाटते. तसेच पंतप्रधानपद मिळाले तरी औटघटकेचे पंतप्रधानपद स्विकारून स्वत:चा "देवेगौडा" होऊ द्यायला नितीश कुमार तयार असतील असे वाटत नाही. तसेच बिहारमध्ये आपण भाजपशिवाय स्वबळावर जिंकू शकणार नाही याचीही त्यांना जाणीव नसेल असे वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2013 - 8:48 pm | श्रीगुरुजी

माझ्या मते २०१४ मध्ये काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष १४०-१६० च्या दरम्यान जागा मिळवतील व इतर पक्षांना सगळ्या मिळून ३२५ च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळे काँग्रेस व भाजपचा पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. नितीशकुमार काँग्रेसच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यामुळे तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधान होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. तशीच पण थोडीशी कमी शक्यता जयललिताची आहे. तिसर्‍या आघाडीत अद्रमुक किंवा द्रमुक यापैकी एकच पक्ष असेल. तसेच तिसर्‍या आघाडीत तृणमूल किंवा डावे पक्ष यापैकी एकच पक्ष असेल. दोन्ही एकाचवेळी असणार नाहीत. जयललिता किंवा नितीशकुमार पंतप्रधान असलेले तिसर्‍या आघाडीचे सरकार १ वर्षाहून जास्त काळ टिकणार नाही व परत २०१५ मध्ये निवडणूक होईल.

काँग्रेस कदाचित धाडस करून मीराकुमारांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आणेल. एका दलित असलेल्या महिलेला विरोध करण्याचे धाडस फारसे पक्ष दाखवू शकणार नाहीत. फक्त मायावती व एनडीएमधील पक्ष विरोध करतील. बाकी सर्व पक्षांना त्यांना विरोध करता येणार नाही. मात्र डावे पक्ष कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व असलेले सरकार नको या कारणास्तव विरोध करून तिसर्‍या आघाडीचे सरकार आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे मीराकुमार पंतप्रधान होण्याची शक्यता थोडीफार आहे.

नितीशकुमार, जयललिता व मीराकुमार यांना याच क्रमाने व शक्यतेने पंतप्रधान बनायची संधी आहे.

चिंतामणी's picture

20 Mar 2013 - 9:40 am | चिंतामणी

म्हणजे सगळे मिळून १३० आहेत. पुढच्या निवडणुकीत हे चित्र फार बदलेल अशातला भाग नाही. म्हणजे नितिशकुमारांपेक्षा मुलायम आणि मायावती किंवा तृणमुल काँग्रेसना देखील जास्त जागा मिळायची शक्यता आहे. नितीश कुमारांची प्रतिमा आणि रेकॉर्ड चांगले असले तरी हे वास्तव आहे. त्याहूनही महत्वाचे वास्तव असे आहे, की नितीश कुमारांची प्रतिमा बनवण्यात भाजपाने दिलेला महत्वाचा आणि किमान अजून तरी वरकरणी दिसणारा कटकटीवीना पाठींबा आहे. महाराष्ट्रात गेले अनेक वर्षे आघाडीचे सरकार आहे. त्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जसे उखाळ्यापाखाळ्या करतात तसे बिहारमधे दिसले तरी नाही. ते इतर कुणाशीही युती केल्यास नितीश कुमारांना जमणार नाही.

बाकी बोलण्यासारखे खूप आहे. पण सवडीने लिहीन.

शैलेंद्रसिंह's picture

19 Mar 2013 - 9:58 pm | शैलेंद्रसिंह

मला ८९ च्या निवडणुकीशी तुलना करायचा मोह आवरत नाहीये. नितीश कुमार म्हणजे तत्कालीन व्हिपी सिंग आणि मोदी म्हणजे तत्कालीन अडवाणी.

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 10:06 pm | प्यारे१

मोदींची एवढी क्षमता आहे? शक्यता कमी वाटते.

२०१४ लाच लोकसभा निवडणुका होतील.
तत्पूर्वी काही तरी करुन राज्यातलं स्थान बळकट करणं असा डाव दिसतोय.
तामिळी लंबक तत्त्वानुसार ह्यावेळी नाहीतरी करुणानिधींचाच नंबर आहे. :)

विकास's picture

19 Mar 2013 - 11:14 pm | विकास

मोदी म्हणजे तत्कालीन अडवाणी.

मला अजून तरी फरक आहे असे वाटते...

नरेश_'s picture

19 Mar 2013 - 8:12 pm | नरेश_

पण सीबीआयची छडी बघितलीत ना?

विनोद१८'s picture

19 Mar 2013 - 11:07 pm | विनोद१८

आपल्या राज्यामध्ये कमी झालेली लोकप्रियता वाढ्विण्यासाठी केलेला एक खटाटोप दुसरे काय ?? यातून दुसरे काही निष्पन्न होइल असे वाटत नाही. आपल्या देशात हे असे राजकारण चालायचेच. म्हणजेच हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे असे मला वाटते. इतर काही यामागे घडामोडी आहेत असे सध्या तरी काही सान्गू शकत नाही परतु करुणानिधिने ही सन्धी साधली असे म्हणता येइल. जशी इथल्या आपल्या मराठी नेत्याना मराठी माणसाची काळजी आहे ???? तशीच त्या करुणानिधीला तामीळिची फिकीर असावी.??? लगे रहो...!!!

प्रगल्भ आणि सर्वात मोठ्या अशा 'भारतीय लोकशाहीचा नेहमीच विजय असो'

विनोद१८

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Mar 2013 - 9:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

या सगळ्या भानगडीत मार्केट घुसलं राव!! :-|

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Mar 2013 - 12:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

रडतोस काय?? चांगले फंडामेंटल्स असलेले शेअर्स उचल ना. उत्तम संधी आहे. :-)

चांगले फंडामेंटल्सवाले मेंटल व्हायची वेळ येते असल्या राजकारणी खेळ्या केल्या जातात इथं, मुळातच बाजारातुन पैसा काढुन घेतला जातोय निवडणुकासाठी, तो परत येणार निवडणुका झाल्यावर या खेळात फंडामेंटल चांगले वाईट असं काही नसतो, फक्त नोटा बाजारात चालल्या पाहिजेत.

विकास's picture

21 Mar 2013 - 4:42 pm | विकास

जस जशा निवडणुका जवळ येऊ लागतील तस तसे तथाकथीत सुधारक फंडामेंटल्स मधे पैसे गुंतवले तरी फंडामेंटालिस्ट म्हणतील असे वाटते. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Mar 2013 - 6:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे जे मार्केट पडते आहे त्यात किती मार्केट कॅपिटल कमी झाले. निवडणुकीला नक्की किती पैसा लागतो? हे नुकसान त्यापेक्षा कमी आहे की जास्त??

शिवाय आता निवडणुकीपर्यंत मार्केट सतत पडतच राहणार का? हे असे दर निवडणुकीला होते का? मग निवडणुकी पूर्वी दर महिन्याला Nifty चा पुट घेऊन रग्गड पैसे कमावता येतील की. मग हे इतके साधे सरळ गणित लोकांच्या का लक्षात येत नाही ???

ऋषिकेश's picture

20 Mar 2013 - 9:10 am | ऋषिकेश

द्रमुकने असे सरकारला परराष्ट्रधोरणाबद्दल वेठिला धरलेले अजिबात आवडले नाही. एका समुहाची "बार्गेनिंग पॉवर" अधिक आहे म्हणून भारताने आपले परराष्ट्र धोरण केवळ सरकार टिकवण्यासाठी बदलू नये असे वाटते. सरकारने आता लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस करावी असे माझे मत. त्यामुळे सिंग सरकारचा स्वाभिमान (असल्यास) थोडा तरी टिकेल, नाहितर अगदीच लाचारीने सरकार चालवावे लागेल. अर्थातच काँग्रेसचे तसे मत नसेलच, शक्य तितक्या उशीरा निवडूक होणे त्यांना फायद्याचे आहे, पण गंमत म्हणजे भाजपाही अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही कारण तसे झाल्यास सरकार नक्की तरेल :) (सगळे तेच ते सांप्रदायिक शक्तींचे वायफळ पालुपद गाऊ लागतील) तेव्हा एकेक पक्षांना कॉर्नर करून पाठिंबा काढायला भाग पाडण्याची भाजपाची रणनिती वेधक आहे!

(या प्रश्नावर भाजपाने, AIADMKने आवाज उचलल्यामुळे द्रमुकला त्यांहून जहाल भुमिका घेणे भाग पाडले. अतिशय चतूर आणि 'वेल एक्झिक्युटेड' राजकीय खेळी)

विकास's picture

20 Mar 2013 - 4:36 pm | विकास

द्रमुकने असे सरकारला परराष्ट्रधोरणाबद्दल वेठिला धरलेले अजिबात आवडले नाही. एका समुहाची "बार्गेनिंग पॉवर" अधिक आहे म्हणून भारताने आपले परराष्ट्र धोरण केवळ सरकार टिकवण्यासाठी बदलू नये असे वाटते.

सहमत.

तेव्हा एकेक पक्षांना कॉर्नर करून पाठिंबा काढायला भाग पाडण्याची भाजपाची रणनिती वेधक आहे!

तेच इतर सर्वच पक्ष कधी ना कधी कुठे ना कुठे करताना दिसतात. म्हणूनच काहीतरी घटना दुरूस्ती अथवा कायदा असायला हवा असे वाटते. जेणे करून असल्या खेळ्या/रणनिती करताना राजकारण, सत्ता आणि पर्यायाने देश-जनतेचा खेळखंडोबा होणार नाही.

तर्री's picture

20 Mar 2013 - 4:46 pm | तर्री

काही च्या काहीभाकिते : -
यु.पी.ए लवकरच फुटेल. पहिले मुलायम किंवा मायावती बाहेर पडतील. शरद राव नसतीलच असे नाही.

निवडणुका झाल्याच तर कोणी गण्या -गंप्या पी,एम, होईल - कोंग्रेस त्याला सपोर्ट करेल. मग काढून घेणार.
२ वर्षात मध्यावधी निवडणुका परत होतील > मग राहुल / प्रियांका / रोबर्ट किंवा त्यांची मुले प्रधान मंत्री होतील.

नितिन थत्ते's picture

20 Mar 2013 - 8:54 pm | नितिन थत्ते

काय ठरलं मग ? नक्की कोणाकोणाचा पाठिंबा आहे आणि नाहीये?

(अवांतर: इकडे चाललेली चर्चा पाहता ते मोदी का कोण आहेत ते अडवाणींसारखे कायमच भावी पंतप्रधान राहणार की काय अशी शंका आली) :)

विकास's picture

20 Mar 2013 - 9:19 pm | विकास

अजून शंकाच आहे?

नाना चेंगट's picture

20 Mar 2013 - 9:41 pm | नाना चेंगट

हा हा हा
तसंही युवराज कायम युवराज राहाणार याची पण शंका का नाही आली हो तुम्हाला ? ;)
असु द्या असु द्या ! तसंही युवराजांनी कामाला लागायचे आदेश दिले आहेत, तुम्ही अंग झटका बरं आता पटकन !! :)

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 9:01 am | नितिन थत्ते

शंका काय यायची त्यात? ते तर कायम ’कुमार’च राहणार असं त्यांनीच सांगितलं ना?

राजकुमार राहणार की कसे ते जन्तेवर अवलंबून की हो !!!

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 9:02 am | नाना चेंगट

कसं काय ब्वा ?

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 9:30 am | नितिन थत्ते

त्यांना मारूनमुटकून राजकुमार बनवणार्‍या पक्षाला जन्तेने झिडकारलं की मग ते ’राज’कुमार कसे राहतील?

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 9:32 am | नाना चेंगट

पण त्यांना मारुन मुटकून जनतेने बनवले की पक्षाने ?

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 9:54 am | नितिन थत्ते

पक्षाने बनवलं. म्हणून जन्तेला राजकुमार नको असेल तर जन्तेने पक्षाला झिडकारायला हवे.

(अवांतर: अलिकडेच भावी पंतप्रधानांनी चांगले काम केले तर जन्ता छोट्या चुका माफ़ करते असं वक्तव्य केलं. त्याच न्यायाने जन्ता काँग्रेस पक्षाची ही छोटी चूक माफ करत असेल का?)

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 10:43 am | नाना चेंगट

>>>जन्तेने पक्षाला झिडकारायला हवे.
सहमत आहे

>>>(अवांतर: अलिकडेच भावी पंतप्रधानांनी चांगले काम केले तर जन्ता छोट्या चुका माफ़ करते असं वक्तव्य केलं. त्याच न्यायाने जन्ता काँग्रेस पक्षाची ही छोटी चूक माफ करत असेल का?)

कोण भावी पंतप्रधान? तुम्हाला भविष्य सांगता येत?

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 11:23 am | नितिन थत्ते

>>कोण भावी पंतप्रधान?

हॅ हॅ हॅ. तुम्ही सूज्ञ आहात.

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 12:45 pm | नाना चेंगट

कस्चं कस्चं

द्रमुकवर सीबीआयचे छापे सुरु... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19102722.cms

हारुन शेख's picture

21 Mar 2013 - 12:50 pm | हारुन शेख

हमाममे सब नंगे !

विकास's picture

21 Mar 2013 - 4:45 pm | विकास

पण त्यांना मारुन मुटकून जनतेने बनवले की पक्षाने ?

त्यांना मारून मुटकून बसवलेले नाही. (गुजरातच, युपी, त्रिपुरा वगैरेत निवडणूका जिंकता आल्या नसल्या तरी) त्यांनी मने जिंकली आहेत. ;)

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2013 - 12:18 pm | श्रीगुरुजी

"ते तर कायम ’कुमार’च राहणार असं त्यांनीच सांगितलं ना"

ज्याप्रमाणे रवी शास्त्री हा कायम २३ वर्षांचा असतो व शाहीद आफ्रिदी हा कायम १९ चाच असतो, तद्वत युवराज हे कायम युवा व कुमारच राहणार.

मोदी प्रधानमंत्री पदी बसावेत इतकी जनतेची मेच्युरीटी (लायकी ) नाही. वेळ लागेल.

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 1:27 pm | नितिन थत्ते

बरं झालं बुवा, जनतेची म्याचुरिटी नाहीये ते.

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Mar 2013 - 4:25 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमची इच्छा नाहीये का?

नितिन थत्ते's picture

21 Mar 2013 - 4:37 pm | नितिन थत्ते

काय करणार, म्याचुरिटी नाहीये ना....

कापूसकोन्ड्या's picture

21 Mar 2013 - 9:32 am | कापूसकोन्ड्या

आता गुगल पण जातीय वादी झाले. हे पहा
Here
Here

सुनील's picture

21 Mar 2013 - 11:17 am | सुनील

आता गुगल पण जातीय वादी झाले

नाही हो!!!

गूगलने "फक्त" मोदींना बोलावले नसून, मोदींबरोबरच ओमर अब्दुलांनाही आमंत्रण दिले आहे. तेव्हा गूगल हे सर्वधर्मसमभावी आहेत, हेच सिद्ध होते!! ;)

सुनील's picture

21 Mar 2013 - 11:19 am | सुनील

दुवा द्यायचा राहिला !!!

तिमा's picture

22 Mar 2013 - 11:52 am | तिमा

काही म्हणा,
'काँग्रेसला पर्याय नाही'. त्यांच्या दोन्ही हातात, दिव्याला कसं सुरक्षि....त वाटतं!