पाण्याची परवड ......बापुंची धुलवड

कच्चा पापड पक्का पापड's picture
कच्चा पापड पक्क... in काथ्याकूट
18 Mar 2013 - 10:25 pm
गाभा: 

लाखो लिटर पाणी वाया गेले आज. का तर धुळवड खेळायला …
जे स्वतःला संत म्हणून घेतात तेच जर असे वागले तर सामान्य आणि त्यांच्या शिष्यानी काय करायचे?
ह्या आधी कधीच असे ऐकले नाही. हा सगळा एक publicity stunt वाटतोय. अंधश्रद्धाला पण हे लोक खात पाणी घालत आहेत . का ह्या मागे पण काहि राजकीय षड्यन्त्र आहे? तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

19 Mar 2013 - 12:19 am | काळा पहाड

बापू ला पकडून रोजगार हमी च्या रस्ते बांधणीच्या कामावर जुंपा. जाल्ना मधे. आपोआप तेल निघून ताळ्यावर येइल. भारतीय पण येडचाप साले. असल्या लोकाना पकडून मेंटल हॉस्पिटल मधे बंद करायचं सोडून त्याच्या भजनी लागतात.

यशोधरा's picture

19 Mar 2013 - 8:13 am | यशोधरा

बापू कसला डोंबलाचा संत!

सव्यसाची's picture

19 Mar 2013 - 8:30 am | सव्यसाची

पाण्याची नासाडी पहिली.वाईट वाटले :(

बापुने आता आमच्या ऑफीसच्या बाहेर डेरा टाकला आहे मागच्या २ दिवसांपासुन...लोकांची गर्दी बघितली की असे वाटते की मेंढरे परवडली पण असे बिनडोक लोक नको...

शिवाय, प्रत्येक वाक्यानंतर स्वःताहुन बोलतो "जय राम जी कि बोलना पडेगा" तेव्हा जाम डोक्यात जातो.

विकास's picture

19 Mar 2013 - 8:53 am | विकास

नागपुरचा प्रकार लक्षात आल्यावर , नव्या मुंबईत त्यांना धुळवडीसाठी पाणी देण्याचे सरकारने नाकारले, जे नाकारणे योग्यच होते. पण त्यामुळे म्हणे भक्तसंप्रदाय चिडला आणि त्यांनी माध्यम प्रतिनिधींवरच हल्ला केला...

या संत महंतांनीच आणि त्यांच्या संप्रदायानी दिल्लीतल्या निर्भया दुर्दैवी घटनेनंतर गोंधळ घातला होता ना?

एकट्या बापू ला का दोषी मानता? तिथे जे हजारो लोक जमले होते ते तितकेच दोषी नाहीत का? बापू राजकारणी लोकांसारखा पैसे देउन गर्दी जमवत नाही. जो पर्यंत लोक जमत आहेत तो पर्यंत बापु सारखी लोक असणारच समाजात.
समाजाचेच मानसिक वय ८-१० वर्ष असेल तर बापू चा काय दोष?

पिशी अबोली's picture

19 Mar 2013 - 4:36 pm | पिशी अबोली

+१

स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर मुजोर बापु अती माजला आहे !

शिल्पा ब's picture

19 Mar 2013 - 9:43 am | शिल्पा ब

प्रसाद १९७१ शी सहमत आहे.
समाजात जोपर्यंत असे बिनडोक लोकं आहेत तोपर्यंत ह्या असल्या साधु, बुवा, माता वगैरे प्राण्यांना मरण नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2013 - 12:49 pm | पिलीयन रायडर

अशा परिस्थिती मध्ये जर कोणी बिनडोक माणुस अजुन हजारो अति बिनडोक माणसांना घेउन काहीही करेल तर सरकार काय बघत बसणार का?? तिकडे माणसे..जनावरं तडफडुन मरणार आणि इकडे हे रास लीला करणार???? सरळ कायदा का नाही करत?? की जर असं पाणी वाया घलवताना कुणी सापडला तर जेल मध्ये घालु म्हणुन??

मालोजीराव's picture

19 Mar 2013 - 2:01 pm | मालोजीराव

बापू ला धरून चोपायला पायजे…म्हणजे 'एकच फाईट वातावरण टाइट' होईल… आणि उरले सुरले संत पण त्या बाजूला जाणार नाहीत

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 2:15 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११११.

ते सुभाषित इथे पाहून लै हसू आलं मात्र. अर्थात मागणी यथार्थ आहे हेवेसांनल.

प्रसाद१९७१'s picture

19 Mar 2013 - 3:48 pm | प्रसाद१९७१

आज आंघोळ १० लिटर पाण्यात केलीत का?
घरात कीती कूंड्यांमधे फुलझाडे लावली आहेत?
washing machine वापरता का?

गालिब चा एक चांगला शेर आहे. मैने लडकपन में मजनूपे "असद", संग उठाया की सर याद आया.

पूनम शर्मा's picture

19 Mar 2013 - 2:29 pm | पूनम शर्मा

ओल्या बांबुचे फटके द्या त्याला ...................

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2013 - 2:36 pm | श्री गावसेना प्रमुख

आसाराम बापुने अपव्यय केलाय हे खर आहे पण ,आपण किती सजग आहोत हे ही एकदा बघायला हव,1
जलवाहिन्या फोडून त्यातील पाणी टँकरमध्ये भरून त्याची विक्री करतात हे कोणाच्या आर्शिवादाने होतय,दुष्काळ असतांना मुंबई आग्रा हायवे च्या मध्ये शोभेच्या झाडांना रोजच टँकरने पाणी देणे हे ही कितपत व्यवहार्य आहे,
इथे लोक पाण्यावाचुन आहेत, गुरे ढोरे तडफडतायेत , हुच्चभ्रु लोक त्यांच्या बंगल्याच्या आवारातल्या झाडांना नळाच पाणी मारीत नाही काय्,आपण पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरुन घेउन अर्धपाणी फेकुन देतो,
http://www.loksatta.com/vruthanta-news/lakh-litre-water-wastage-due-to-l...
मनमाड मध्ये शेतकर्यांनी पाट फोडुन पिण्याच्या पाण्याने विहीर,शेततळे भरुन घेतले.आता ह्यावर काय करणार.
आपण जी नासाडी करतोय त्यापुढे आसाराम बापु काहीच नाहीये,आपणच सजग व्हायला हव.

प्रसाद१९७१'s picture

19 Mar 2013 - 3:44 pm | प्रसाद१९७१

पूर्ण सहमत

जोशमनिष's picture

20 Mar 2013 - 3:41 pm | जोशमनिष

test
अधिक स्पष्टीकरणाची गरजच नाही.

जोशमनिष's picture

20 Mar 2013 - 3:49 pm | जोशमनिष

-

अधिक स्पष्टीकरणाची गरजच नाही.

जलवाहिन्या फोडून त्यातील पाणी टँकरमध्ये भरून त्याची विक्री करतात हे कोणाच्या आर्शिवादाने होतय

अजीत पवार

हे आसाराम बापु तेच ना ज्यांचे प्रवचन अगदी सकाळी सकाळी अस्थाछाप च्यानेलवर चालेलेले असताना अख्ख्या महाराष्ट्रभरातीलही अनेक जण थोंथबलेल्या भक्तीभावाने बघुन घरातील इतरांची झोपमोड व्हायची

भल्या विनाकरासे प्रवचन करणार्‍या (आणि ते टिव्हीवर बघणार्‍या) कोणाचेही पाणीच काय, वीज, अन्न सगळे बंद केले पाहिजे ;)

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2013 - 3:53 pm | नगरीनिरंजन

जेव्हा अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य आणखी वाढेल आणि वातावरणातले बदल अधिक तीव्र होत जातील तेव्हा भारतीय लोक किती जबाबदारीने वागतील याची झलक दिसते आहे ही.

नाना चेंगट's picture

19 Mar 2013 - 6:01 pm | नाना चेंगट

सहमत आहे. तसेही पाणी संपलं की जिथे पाणी असेल तिथे चंबु गबाळं आवरुन स्थलांतर करायचं ही अतिशय जुनी परंपरा आहे आपली.
स्वतःपुरतं पहायचं, जमलं तर आपलं कुटुंब मग आपली जात. बास त्यापुढे आपण नाही जात.

अनेक विद्वान म्हणतात की बापूने पाणी नाही वापरले तर ते काय दुष्काळग्रस्त भागात पोचणार आहे का ?

हे म्हणाणार्‍यांची मानसिकता विकृत म्हणावी की अडाणी ?

अशीच माणसं संवेदनाशून्य वागू शकतात... बापू त्यांच्यातला बाप.

तिमा's picture

19 Mar 2013 - 6:11 pm | तिमा

भारतात मानसिक रुग्णांची कमतरता नाही. त्यामुळे असले बापू धंदा चालवणारच.
बापू पाणी वाया घालवतोय, मुजोर आमदार पोलिसालाच बेदम मारताहेत, गॉगलवाला त्याच्या मर्जीप्रमाणे परराष्ट्र धोरण बदलायला सांगतोय आणि त्याची समजूत घालायला लुंगीवाले धांवतायत! वर तो चर्चिल हंसत असेल खो खो!!!

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2013 - 6:36 pm | प्रसाद गोडबोले

बापुंचा हा निव्वळ मुर्खपणा एकदा भोवणार आहे त्यांना ...

(अवांतर : हेच जर दुसर्‍या कुठल्या धर्माच्या सणात दुसर्‍या कॉनीतरी केले असते तरी मिपावर अशाच प्रतिक्रिया उमटल्या असत्या असा समज करुन घेत आहे. )

पुष्करिणी's picture

19 Mar 2013 - 6:51 pm | पुष्करिणी

बापूंची रंगपंचमी चुकीचीच आहे पण महाराष्ट्रातले किती एसी, कुलर्स, वॉशिंग मशिनं, कार वॉशिंग सेंटर्स बंद आहेत?
लागणारी वीज जर पाण्यापासून तयार होतेय तर किती शहरी लोकं आपापल्या घरांतले पंखे / रेफ्रिजरेटर बंद ठेवणार आहेत?
जे लोक बॉट्ल्ड वॉटर ( मराठीत बिसलेरी )पितात त्यांना माहित आहे का १ लि. बाटली तयार करायला ३ लि. पाणी लागतं ( सॉफ्ट ड्रिंक्स पण तसच ), ते सोडणार कापसं पाणी पिणं? जे सगळे मिडिया हाउसेस बापूंच्यावर तुटून पडलेत त्यांनी आधी या सगळ्या गोष्टी अंमलात आणाव्यात.

*मी आसाराम बापूंची भक्त / समर्थक नाही, त्यांच प्रवचन मी टिव्हीवरसुद्धा ऐकलेलं नाही. मी इतर वेळीसुद्धा (सुकाळ )असताना रंगपंचमी / धुळवड खेळत नाही.

विकास's picture

19 Mar 2013 - 8:59 pm | विकास

१००% सहमत.

एकीकडे जनता काय वागते हे आले तसेच दुसरीकडे जनतेचे प्रतिनिधी असलेले राज्यकर्ते आणि अर्थव्यवस्थेतील प्रतिनिधी उद्योजक काय करत असतात हे देखील बघण्यासारखे आहे. ते केवळ एका रंगपंचमीच्या दिवशीची पाण्याची उधळण नसते तर जनतेच्या तोंडचे पाणीच पळवायचा घाट असतो. इंडीयन बुल्स या कंपनीस विदर्भात प्यायचे+शेतीचे पाणी मिळणे सुकर होण्याआधी तेच पाणी वी़अनिर्मितीसाठी देण्याचा घाट घातला गेला. जेंव्हा राज्यपालांनी त्यांच्या हक्कांतर्गत त्याला आक्षेप घेतला तेंव्हा तो हक्क देखील सरकारने नाकारला (आता शब्द मागे घेतले आहत,) त्या संदर्भातील लोकसत्तेचा हा अग्रलेख वाचण्यासारखा आहे. त्यातील एक चांगला किस्सा, येथे जसाच्या तसा चिकटवत आहे:

याबाबत मोठे होण्याची घाई झालेल्या उद्योगगृहांना जमशेटजी टाटा यांची आठवण करून द्यायला हवी. मुंबई आणि परिसरात विजेची टंचाई आहे हे जाणवल्यावर जमशेटजींनी लोणावळा परिसरात एक नव्हे तर चार कृत्रित तलाव बांधले आणि स्वत:च्या खर्चाने धरण उभे करून त्या पाण्यावर वीजनिर्मिती सुरू केली. जनतेच्या पैशाने तयार झालेल्या धरणांत जनतेसाठी साठवलेले पाणी आपले राजकीय लागेबांधे वापरून आपल्या उद्योगांसाठी वापरावे ही आधुनिक इंडियन क्लृप्ती जमशेटजींनी वापरली नाही.

याचे कारण असे की ते उद्योगक्षेत्रातले जातिवंत गरुड होते. राजकारण्यांना हाताशी धरून शेपटय़ा उडवत नाचणारे बुलबुल नव्हेत. अलीकडच्या काळात अशा बुलबुलांचा खूपच सुळसुळाट आपल्याकडे झाला आहे. एकंदर व्यवस्थेचा सडलेपणा लक्षात घेता जनतेलाच या बुलबुलांचा बंदोबस्त करावा लागेल.

बॉटल बंद पाणी पिणे हे आज काल काय म्हणतात ते... हे तर आता स्टेटस सिंबॉल झाले आहे.हॉटलात गेलात तर साधे की बिसलेरी असे विचारले जाते.
पाणी पाण्याच्या उपसा करणार्‍या कोला कंपन्यां बद्धल बोंबाबोंब होताना दिसत नाही हे विशेष. या अमेरिकन कंपन्या आपल्याच देशातले पाणी उसपतात आणि आपल्याच देशातल्या लोकांना विकतात,नफा यांच्या मायदेशी रवाना.
बरं हे कोला पिउन पोषण मुल्य काय तर घंटा ! तरी आपले लोक बाटल्या बाटल्या कोला रिचवतात. बरं याच्या जाहिराती करणारे बरेचसे क्रिकेटर यात सुद्धा बर्‍याचदा असे दिसुन येते की बॅस्टमन मंडळी ठरावीक कंपनीची तर बॉलर मंडळी एका कंपनीसाठी जाहिरात करताना दिसुन येईल ! क्रिकेटच्या अनेक स्पर्धा याच कंपन्या प्रायोजित किंवा आयोजित करतात्,क्रिकेट हा खेळ मुळात देशासाठी खेळला जात नसुन पैश्यासाठी खेळला जात आहे हे हिंदुस्थानातल्या क्रिकेटवेड्या लोकांना समजुन येईल तो सुदिन म्हणावा लागेल.आता तर चंपिंग चपाक आणि झंपिग झपाक आयपीएल येणार याच्या मॅच मधे जाहिरात करणार्‍या कंपन्या महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त भागात पाणी वाटणार का ?हे जाहिरात करायला मात्र करोडो रुपये नक्की खर्च करतील. ७२ साला नंतरचा सर्वात महाराष्ट्रातील सर्वात भिषण दुष्काळ असे सध्याच्या दुष्काळ ग्रस्त परिस्थीचे वर्णन केले जात आहे,तिथे लोक मात्र क्रिकेट वेडात आकंठ बुडण्यास उत्सुक होताना दिसतात !
बरं आपल्याच देशातील पाण्याचा उपसा करणार्‍या कंपन्या कोला नावाचे द्रव्य जे या देशातील लोक आनंदाने पिताना दिसतात त्याचा परिणाम कारक वापर हल्लीच माझ्या पाहण्यात आला होता,तो आपणा सर्वांसाठी इथे देत आहे.
Indian farmers use Coke and Pepsi as cost-effective pesticides
तसेच अमेरिकन कोला बनावणारी कंपनी सध्या अमेरिकेतच वादग्रस्त ठरु पाहत आहे,कारण त्यांचा(PepsiCo)या(biotech company Senomyx) कंपनीशी करार झाला आहे.गर्भपात केलेल्या अर्भकाच्या टिश्युंन पासुन आर्टिफिशल टेस्ट इन्हासर्स बनवण्याचा उद्योग केला जातो,ज्याचा वापर Pepsi products containing Senonymx flavor enhancers मधे केला जाणार आहे. याच Senonymx कंपनीच्या पार्टनर लिस्ट मधे नेस्टले या कंपनीचे देखील नाव आहे.
अधिक माहिती इथे वाचा :-
Confused about the Pepsi/fetal cell issue? Here are the facts
Obama agency rules Pepsi's use of aborted fetal cells in soft drinks constitutes 'ordinary business operations'

जाता जाता :- बाकी आसाराम नावाच्या बापु बद्धल काय म्हणावे तेच कळतं नाही,दिल्लीत ज्या मुलीवर बलात्कार झाल्याने जगभरातील लोकांना हिंदुस्थानातल्या स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचारांचे घॄणास्पद दर्शन घडले,त्या घटने बद्धल आसाराम ने तोडलेले तारे ऐकुन या फुकणीच्याला चांगला ठोकुन काढला पाहिजे असे मला वाटले होते.

क्रिकेटच्या अनेक स्पर्धा याच कंपन्या प्रायोजित किंवा आयोजित करतात्,क्रिकेट हा खेळ मुळात देशासाठी खेळला जात नसुन पैश्यासाठी खेळला जात आहे हे हिंदुस्थानातल्या क्रिकेटवेड्या लोकांना समजुन येईल तो सुदिन म्हणावा लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्वच्छता मोहिमेत आता क्रिकेट आले याची माझ्या सारख्या सामन्य नागरिकाला आणि क्रिकेटच्या चाहत्याला आनंद देणारी घटना असुन या बाबतीच सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानावे तितके कमीच आहे.
दुवा :- बरखास्तच करा..

सगळ्याच गोष्टींत राजकारण, राजकारणी आणि त्यांचा चालणारा भ्रष्टाचार हे आपला देश रसातळाला गेल्याचे मुख्य कारण आहे असे मला वाटते,आता हेच सगळे राजकारणी मतांची भीक मागायला उतरले आहेत, एकदाच आम्हाला मत देउन पहा आणि मग पहा ! पहा म्हणजे पहातच रहा... देशाचे आणि तुमच्या आयुष्याचे वाटोळे कसे करतो.आता प्रचारासाठी दारो-दारी हिंडतील,गाठी-भेटी घेतील आणि एकदा का निवडणुक झाली की मग यांचे दर्शन सुद्धा "आम आदमीला" होणार नाही याची काळजी घेतील. १२ रुं / ५ रु. /१ रुपयात पोटभर जेवण मिळतं म्हणार्‍यांची संपत्त्ती इतकी का ?आणि कशी वाढली ?जेवण इतके स्वस्त असेल तर मग त्यांना इतका पगार सरकार तर्फे का दिला जातो? याची विचारणा मात्र आपण अजिबात करायची नाही बरं का ? कारण या माजलेल्या रेड्यांना आपणचं मतांची खुराक देतो ना ?

तसेच अमेरिकन कोला बनावणारी कंपनी सध्या अमेरिकेतच वादग्रस्त ठरु पाहत आहे,कारण त्यांचा(PepsiCo)या(biotech company Senomyx) कंपनीशी करार झाला आहे.गर्भपात केलेल्या अर्भकाच्या टिश्युंन पासुन आर्टिफिशल टेस्ट इन्हासर्स बनवण्याचा उद्योग केला जातो,ज्याचा वापर Pepsi products containing Senonymx flavor enhancers मधे केला जाणार आहे. याच Senonymx कंपनीच्या पार्टनर लिस्ट मधे नेस्टले या कंपनीचे देखील नाव आहे.
सध्या सगळ्यांची प्रिय मॅगी चर्चेत आहे आणि या मॅगीत MSG(monosodium glutamate) ची मात्रा अधिक आढळल्याने हे प्रकरण सध्या "गरम" दिसत आहे. नेस्टले आणि MSG वाचताच मला माझा ह्या धाग्यावरील प्रतिसाद आठवला !
ज्यांना यात अधिक रस आहे त्यांनी खालील दुवे उघडुन वाचावेत.
Obama agency rules Pepsi's use of aborted fetal cells in soft drinks constitutes 'ordinary business operations'
Biotech company needlessly uses aborted human fetal cells to test artificial food flavors
'Secretive' Chemicals Being Hidden in Food Under 'Artificial Flavors' Label
Avoid Any Products Containing Aborted Fetal Cells
MSG-Like 'Senomyx' Being Hidden In Food
Will review reports of higher MSG in Maggi noodles: Ram Vilas Paswan

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel

गणामास्तर's picture

20 Mar 2013 - 10:31 am | गणामास्तर

जे लोक बॉट्ल्ड वॉटर ( मराठीत बिसलेरी )पितात त्यांना माहित आहे का १ लि. बाटली तयार करायला ३ लि. पाणी लागतं

१ लि. मिनरल वॉटर तयार करायला ३ लि. पाणी लागत असावं. आज काल सगळीकडे 'पॅकेजड ड्रींकींग वॉटर '
मिळते, नळाला बाटली लावली अन सील करुन टाकली की झालं काम.

आशु जोग's picture

20 Mar 2013 - 1:10 pm | आशु जोग

इथे एक गोष्ट आपण दुलक्षित करीत आहोत

बापूंचे भक्तगण सगळे दुष्काळी प्रदेशातून आले आहेत
ते पाणी नसल्याने आंघोळीसाठी आसूसलेले आहेत.

बापूंनी हे ओळखले(बापूंना माहीत नाही असे या जगात काहीच नाही)
त्यांनी अर्जुनाप्रमाणे बाण मारला आणि जमिनीतून पाण्याची कारंजी उडू लागली.

त्यात भक्तगण नाहून निघाले आणि तॄप्त झाले.

आशु जोग's picture

20 Mar 2013 - 1:21 pm | आशु जोग

एक सूचना
मिडीयाने फेकलेले प्रत्येक हाडूक चघळलेच पाहीजे असे नाही

केबल टीव्ही टाळा
गप्पी मासे पाळा

याच्या च्यात थोडा बदल करून आसाराम डाकू ठेवूया का? सर्वसामान्यांच्या पैशांवर, पाण्यावर, इतकंच काय त्याच्या आश्रमात गेलेल्या लहान मुलांवरसुद्धा डल्ला मारणारा हलकट डाकू..

प्राध्यापक's picture

20 Mar 2013 - 4:10 pm | प्राध्यापक

अशा ढोंगी लोकांना ताळ्यावर आणण्याचा एकच रामबाण उपाय आहे जो नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात दाखवलाय आणि तो म्हणजे अशा बिनडोक माणसांना डोक्यावर न घेता एकत पाडनं,त्यांच्या भोवती जमा झालेला बिनडोक समुदाय पाहीला की त्यांच्या भोंगुगिरिला आणखी च चेव चढतो,त्या मुळे अशांना हीच शिक्षा योग्य होइल.

सूनिल's picture

20 Mar 2013 - 4:51 pm | सूनिल

bapuvar karvai keli tar bhaktgan naraj houn vote milnar nahit tyach kay