नवा भगवा दहशतवाद??

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
12 Feb 2013 - 3:49 pm
गाभा: 

नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली.

म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली. त्याबाबत माहिती पत्रकार परिषदेत द्यावी म्हणून नवलकिशोर शर्मा अलाहाबादहून मुंबईला यायला निघाले पण येथे पोचलेच नाहीत.... शोध घेतला तेव्हा ते इंदौरच्या एम.वाय.रुग्णालयात अती दक्षता विभागात असल्याचे कळले... त्यांना पोलिसांनी इतके मारले आहे की ते जगतील की नाही ते सांगता येत नाही... त्यांच्या वकिलांना भेटूही दिले जात नाही... भर म्हणजे त्यांच्या जवळ पिस्तुल व काडतुसे मिळाल्याचा अजब दावा प्रशासन करीत आहे... लक्षात घ्या हे सर्व हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेल्या लोकांच्या राज्यात चालले आहे.... नवलकिशोर मृदू भाषी व अत्यंत विनयी आहेत.. त्यांना आता हिंदू आतंकवादी ठरविण्यात येणार काय...??
भोजशाळा प्रकरणाची माहिती येथे वाचण्यास मिळेल...शर्मांची मुलाखतही थोडा शोध घेतला तर सहज मिळेल ती पाहा आणि एका अतिरेक्याला(?) पाहिल्याचे समाधान मिळते का याचा शोध घ्या..

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

हे हिंदू साले फार माजलेत आजकाल.

नाना चेंगट's picture

12 Feb 2013 - 4:21 pm | नाना चेंगट

सहमत आहे. गोळ्या घालून ठार मारले पाहिजे अशा दहशतवाद्यांना

आशु जोग's picture

12 Feb 2013 - 9:29 pm | आशु जोग

नाना
हे कुणाही सामान्य माणसाचे मत आहे

पुढील संघर्ष टाळायचा असेल तर

सौदी संस्कृतीला आवर घालायला हवा

जय हिन्द !

NiluMP's picture

12 Feb 2013 - 4:06 pm | NiluMP

व्होटबॅकीची लाचारी दुसर काय. मतदान प्रक्रियेत बदल.

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2013 - 4:24 pm | प्रसाद गोडबोले

तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||

बांवरे's picture

13 Feb 2013 - 6:18 am | बांवरे

+१

चिरोटा's picture

12 Feb 2013 - 4:40 pm | चिरोटा

लंडनचे हिंदू काय म्हणतात?

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2013 - 4:50 pm | प्रसाद गोडबोले

राष्ट्रपितासमर्थक ह्या विषयावर काय म्हणतात ?

चिंतामणी's picture

13 Feb 2013 - 5:26 pm | चिंतामणी

सर्वांच्या डोळ्यावरचे कातडे आता ओढले गेले असेल.

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले

सर्वांच्या डोळ्यावरचे कातडे आता ओढले गेले असेल.
>>>

"आता " ह्या शब्दावर जोरदार ठेचकालले =))

मुळात वाद हिंदू उकरून काढतात असं जे या हिरव्या रंगाचा चष्मा घातलेल्या काँग्रेसवाल्यांना वाटतंय ते खोडून काढायला हवं. आता त्या अफझल गुरू ला फाशी दिल्यावर त्याचा किती कळवळा येतोय यांना.

सूड's picture

12 Feb 2013 - 6:00 pm | सूड

बरं, मग आता काय कराच्चं ?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार

हिंदूना फाशी द्यायचे. मग त्यांच्याविषयी पण कळकळ वाढेल.

सूड's picture

12 Feb 2013 - 6:20 pm | सूड

म्हणजे आता जीव वाचवायचा तर धर्म बदलणे आले.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

पण हिंदू हा धर्म नाही ना ?

आठवा.. मिपावरच्या मान्यवरांच्या चर्चा आठवा.

राजे
प्लीझ लिन्क द्या
मला हिन्दु धर्माच्य चर्च्या ऐकाला आवडतात

धन्या's picture

13 Feb 2013 - 9:28 pm | धन्या

त्यांना हिन्दु धर्माच्य चर्च्या ऐकाला आवडतात, वाचाला नाही.

जैभिम's picture

14 Feb 2013 - 1:46 am | जैभिम

वाचुन दाखवतौ, काय म्हण्णे आहे?

जैभिम's picture

14 Feb 2013 - 1:43 am | जैभिम

राजे आभारी आहोत!
वाचुन बघतो, कसे वाटते ते..

आशु जोग's picture

12 Feb 2013 - 8:20 pm | आशु जोग

इतक्यात हाती आलेल्या माहितीनुसार

शिन्दे सरकार
गुरु, कसाब यांच्यानंतर त्यांच्या आवडत्या रंगीत दहशतवाद्यांकडे मोहरा वळवणार आहेत

(हे दहशतवादी म्हणे सकाळी सकाळी कुणाच्या घरी जाऊन "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको"

असे डायलॉग मारतात)

संदर्भ

स्पंदना's picture

13 Feb 2013 - 4:50 am | स्पंदना

हिंदुंनी नमाज पढावी.

विकास's picture

13 Feb 2013 - 10:10 pm | विकास

कदाचीत अवांतर असेल पण माझे अज्ञान घालवण्यासाठी (अथवा तुमचे दूर करण्यासाठी) एक प्रश्नः

नमाज पढावा का पढावी?

नमाज पढावा का पढावी?

पढणे ह्या हिंदी क्रियपदासाठी मराठीत वाचणे असा पर्याय उपलब्ध असताना, (फक्त नमाजासाठीच) पढणे हा शब्द का वापरला जातो? हा शब्द अन्य केव्हाही मराठीत वापरला जात नाही (चु भु द्या घ्या).

दादा कोंडके's picture

14 Feb 2013 - 1:03 am | दादा कोंडके

हल्ली तर मराठीत सरळ 'नमाज अदा करणे' असच वाचतोय. म्हणजे नमाज इतर भाषेत करता/घालता/वाचता येतच नाही का?

जैभिम's picture

13 Feb 2013 - 1:01 pm | जैभिम

शुक्रवार
हिन्दुन्नि नमज पधुन वास्न्त पन्चमि साजरि केलि तर सर्व प्रोब्लेम सूटतिल

अस्वस्थामा's picture

13 Feb 2013 - 4:25 pm | अस्वस्थामा

जास्त गुगलले नाही तरीपण तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये थोडा गोंधळ दिसतोय.
काही प्रश्न,
१. जर मंदिर आहे तर तिथे नमाज पढण्याची परवानगी कशाबद्दल दिली गेली आहे ? (हे काही सगळ्याच मूर्ती नसलेल्या मंदिरांबाबत होत नसावे. ) मुस्लिम लोकदेखील मंदिरात कशाबद्दल नमाजासाठी जातायत ?
२. आपण लिहिलेत की भाजपा सरकारने हिंदुना बंदी केली. मग मध्यप्रदेशातील घटनेसाठी मुंबईला पत्रकार परिषद कशाबद्दल ? आणि पोलिसांनी प्रवक्त्याला मारण्याचा आणि भाजपा सरकारनेच घातलेल्या बंदीचा कसा संबंध लावायचा ?
३. "लक्षात घ्या हे सर्व हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेल्या लोकांच्या राज्यात चालले आहे." असे आपले म्हणणे आहे पण त्याच सरकार ने हिंदुना बंदी घातली आहे ना ?

एकतर आपण आड पडद्याने काही सुचवू पाहत आहात अथवा माहितीमध्ये काही गडबड आहे..

अधिक काही बोलत नाही, फक्त एव्हढेच, की येथे मंदीर असल्याचे पुरावे स्पष्ट आहेत.

अस्वस्थामा's picture

13 Feb 2013 - 9:08 pm | अस्वस्थामा

अधिक बोललात तर उत्तम..
मंदिर होते तर मुस्लिम नमाज का पढायला येतायत ?
पूजेला परवानगी का मिळत नाही ? (ते पण बीजेपी सरकार असताना? पण तो मुद्दा गौण मानू तूर्तास.. )
नवलकिशोर यांची मुंबई ला पत्रकार परिषद असण्याचा काय संबंध ? त्यांना बीजेपी सरकारने बंदी केली होती काय?

ओढून ताणून हिंदुंवर अन्याय असं इथे चित्रित करायचा प्रयत्न होतोय का एवढच जाणून घ्यायचा प्रयत्न..

आनन्दा's picture

14 Feb 2013 - 12:58 am | आनन्दा

ओके.
जसे रामजम्मभूमीचे रूपांतर मशीदीत झाले, तसाच प्रयत्न इथे पण झालेला दिसतो, येथेही सरस्वति मंदीराच्या बाजूला दर्गा आहे, जिथे नमाज अदा केला जातो. १९३० पासून हा संघर्ष चालू आहे.
मधल्या काळात ती वास्तू पुरातत्व खात्याने अधिग्रहीत केली.
आता दिग्विजय सरकारने मुस्लिमांना मंदीराचे पटांगण का बापरु दिले, ते ही ती वास्तू पुरातत्व खात्याच्या ताब्यात असताना, हा मुख्य प्रश्न आहे. आणि तसे असेल तर वर्षातून एकच दिवस (वसंतपंचमी), जेव्हा हिंदू तेथे सरस्वतीची पूजा करयला जातात, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज का?

नवलकिशोर यांची मुंबई ला पत्रकार परिषद का होती हे मलाही ठाऊक नाही.
ओढून ताणून अन्याय असे काही नाही. दर शुक्रवारी मुसलमान तिथे नमाज पढतात, तेही तिथे देवीचे मण्दीर असताना. तर मग त्यांना एक न्याय, आणि वर्शातून एकच दिवस पूजा करण्यार्या हिंदूंना दुसरा न्याय असे का?
जाता जाता... यावर्षी वसंतपंचमी शुक्रवारी आहे, त्यामुळे प्रशासनाने हिंदूंना परिसरात येण्यास बंदी घातली आहे म्हणे. यावरून काय ते समजून जा.

खटपट्या's picture

14 Feb 2013 - 2:43 am | खटपट्या

सुन्ता करुन घेईन म्ह्णतोय.

खुप त्रस होत नसेल तर कर्ण्यास माझिहि हरकत नहि..
एक तिर मे २ शिकड ;)

आशु जोग's picture

15 Feb 2013 - 9:04 pm | आशु जोग

खटपट्या

त्यामुळे काही फायदा होइल असे वाटत नाही
पाकीस्तानात सगळेच करतात म्हणून फार गुण्यागोविंदाने राहतात का

जैभिम's picture

17 Feb 2013 - 5:42 am | जैभिम

केल्याने होत आहे रे| आधी केलेची पाहिजे||

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 8:46 am | श्री गावसेना प्रमुख

फडणीस साहेब्,हे वाचाhttp://www.bhaskar.com/article/MP-IND-government-silence-on-bhojshala-ma...
त्यात नरेंद्र्नाथ महाराज जे की काशी सुमेरु पिठाचे शंकराचार्य आहेत त्यांनी नमाजाला विरोध केला आहे,वर म्हटले की जर प्रयत्न झाले तर...परीणाम देवच जाणो(देव करो असे नाही होवो)धार च्या पालकमंत्र्यांनी त्यांना सगळ काही शांततेत होइल असे आश्वासन दिलय म्हणे

कोणत्याही धर्माच्या लोकांनी किंवा नेत्यांनी बळाचा वापर करणं, अथवा अशी वक्तव्य करणं चुकीचंच आहे. मग ते हिंदु असोत, वा मुस्लिम.. काहीही झालं तरी भारतात या दोन धर्मांना एकत्र एकमेकांना सांभाळून घेणं क्रमप्राप्तच आहे. फक्त काही धर्माच्या याच चांगूलपणाचा फायदा दुसरे मूठभर लोक करून घेतात ते चुकीचं आहे.

देशातल्या सगळ्या मशिदी / देवळे / चर्चेस / गुरुद्वारे इत्यादी... इत्यादी... निव्वळ वास्तू शिल्पे म्हणुन घोषीत करावीत.
तिथे कुठल्याही धार्मीककार्यांना / प्रार्थनांना सर्वांना बंदी आणावी.
जो काही धुमाकूळ घालायचाय तो आपापल्या घरांत घालावा.

विकास's picture

15 Feb 2013 - 8:53 pm | विकास

=)) =)) =))

आम्ही गणपाशेटच्या बाजूने अथवा विरोधात नाही... फक्त पॉपकॉर्न घेऊन कुंपणावर बसून एक इमॅजिनरी प्रसंग बघतोयः

पंतप्रधान गणपाशेट हे सर्वधर्मीय सभेत सर्व प्रार्थनास्थळे (रिगार्डलेस कुठल्या धर्माची), निव्वळ वास्तू शिल्पे म्हणून जाहीर करत आहेत आणि पब्लीक टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत करत आहे आणि नंतर व्यासपिठावरून उतरून कुठल्याही सुरक्षाव्यवस्थेचे कवच न घेता हस्तांदोलन करत बाहेर जात आहेत! :-)

अहो भाऊ, जो पर्यंत लोकशाही आहे तो पर्यंत हे ओबामाला पण परवडणार नाही. आणि लोकशाही नसली तरी, जो पर्यंत भारत हा स्वयंपूर्ण (विशेषकरून खनीज तेलाकरता) नाही, तो पर्यंत अगदी कम्युनिस्ट झाला तरी परवडणार नाही.

गणपा's picture

15 Feb 2013 - 9:09 pm | गणपा

सोप्पय की हुकुमशाही लालू करा. ;)

मराठे's picture

15 Feb 2013 - 9:22 pm | मराठे

>> हुकुमशाही लालू
तूने तो हमरी मुंहकी बातही छीन ली रे बबुआ.

गणपा's picture

15 Feb 2013 - 9:27 pm | गणपा

:p
संपादकाच्या डुलक्या. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2013 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार

अहो लोकांना संस्थळावरती हुकूमशाही चालत नाही. देशात कधी चालायची? ;)

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:12 pm | पैसा

सगळ्या देवळे मशिदी आणि चर्चेस, गुरुद्वारे आणि जे काय असेल ते, त्यांची सगळी संपत्ती नॅशनलाईज करा.

विकास's picture

15 Feb 2013 - 10:20 pm | विकास

अहो पण आत्ताची नॅशनलाइज संपत्ती ही खाजगी होते (कुणाच्या तरी खिशात जाते) त्याचे आधी काय करायचे? :-)

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:32 pm | पैसा

ते खाणारच. त्यांनी खाऊन उरलं सुरलं तरी लोकांपर्यंत पोचेल!

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 9:39 pm | वेल्लाभट

नालायकांचा सुळसुळाट आहे हो ! काय आता!

त्या त्या धर्माच्या धार्मिक स्थळी त्या त्या धर्मांच्या शाळा, अनाथालयं, वृद्धाश्रम वगैरे उघडले जावेत...

>> त्या त्या धर्मांच्या शाळा, अनाथालयं, वृद्धाश्रम

जैभिम's picture

17 Feb 2013 - 6:01 am | जैभिम

त्या त्या धर्मांच्या शाळा, अनाथालयं, वृद्धाश्रम
हेच योग्य आहे

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2013 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले

बरं मग काय ठरलं ? काय करायचं ह्या भोजशालेचं ?

आणि वसंतपंचमीची पुजा झाली का नाही ते पण कळू द्या.
बाकी आधीची इतकी वर्ष कशी केली होती पुजा तिथे. का ह्या वर्षीच हि अडचण आली.

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2013 - 8:02 pm | प्रसाद गोडबोले

आशु जोग ह्यांनी वर दिलेल्या लिन्क नुसार वसंतपंचमीची पुजा झाली !

नेमके काय केले जाते?

विकास's picture

15 Mar 2013 - 7:01 pm | विकास

भगवा दहशतवाद ह्या शब्दप्रयोगामुळे अजून एक अनपेक्षित भानगड होऊ शकते असे खालील फोटो मध्यंतरी पाहील्यावर वाटले... ;)

Cardinals

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 11:16 pm | नाना चेंगट

भगव्यापेक्षा तो बराचसा लाल सलाम वाटला

आशु जोग's picture

21 Jan 2014 - 1:05 am | आशु जोग

अयोध्येइतका भोजशाळेचा बोभाटा झाला नाही...

बा द वे
पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले आहे...

आशु जोग's picture

21 Jan 2014 - 1:06 am | आशु जोग

आता काय करेल हे सरकार !

म्हैस's picture

21 Jan 2014 - 10:07 am | म्हैस

@परिकथेतील राजकुमार
तू मुसलमान आहेस का?