विकिपीडिया आणी आपण..

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
10 Mar 2013 - 10:26 am
गाभा: 

I I आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे, I I

I I शहाणे करोनी सोडावे, सकलजन I I

                       विकिपीडिया म्हणजे विकिपीडियाच्या वाचकांनी घडवलेला मुक्त       ज्ञानकोश होय. विकिपीडिया आजच्या घडीला जवळपास सर्वच भाषांमध्ये उपलब्ध आहे. काही भाषांमध्ये अतिशय नगण्य स्वरुपात का होईना परंतु विकिपीडियाचे अस्तित्व आहे. विकिपीडिया तुम्हाला एखाद्या विषयाची इत्यंभुत माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते. यावरील माहिती ही काही इतर माहिती कोशांसारखी प्रत्यक्ष माहिती घेऊन ती अभ्यासपुर्ण पद्धतीने मांडण्यात येते असे नाही पण तरीही असे नसले तरी ती जगभरातल्या आपल्या वाचकांकडुन गोळा केलेली असते. माहितीच्या विश्वासार्हतेचा मुद्दा आला तर ब्रिटानिका एनसायक्लोपिडियाकडे किंचित झुकते माप द्यावे लागेल कारण ब्रिटानिका एनसायक्लोपिडिया सर्व माहिती जगभरातील त्या त्या विषयांच्या तज्ञांकडुन गोळा करून विस्तृतपणे मांडते. पण विकिपीडियाच नेहेमी सरस ठरत आली आहे कारण ब्रिटानिका एनसायक्लोपिडिया त्यांच्या माहितीकोशाचा वापर करण्यासाठी पैसे आकारते, याउलट विकिपीडियाच्या नावापासुनच त्यात मुक्तपणा आला आहे. आपण जर काही माहिती (उदा- आपल्याला माहित असलेल्या देवस्थानाची माहिती, थोर व्यक्तींबद्दल माहिती, इतर) माहित असेल तर आपण देखील विकिपीडियाच्या ज्ञानकोशात खारीचा वाटा उचलु शकतो.मराठी ज्ञानकोशाच्या बळकटीसाठी आपण पाऊले उचलुन ज्ञानाचा प्रसार करण्यास मदत करू शकतो. आपल्याला माहित असलेले एक अन एक वाक्य या ज्ञानरूपी तळ्यात थेंबाची भर घालुन जगासमोर अनंत काळासाठी मार्गदर्शक ठरू शकते. अधिक माहितीसाठी ह्या लेखावर भेट द्या..

 

:-) मराठी विकिपीडिया : वाचकांनी घडवलेला मुक्त ज्ञानकोश :-)

आमच्याबद्दल  प्रश्नोत्तरे गुप्तता धोरण

प्रतिक्रिया

यशोधनराव, एक फुकट सल्ला देऊ काय?

जे लोक मिपा वापरतात त्यांना विकीपीडिया माहीत असतं हो...

नानबा's picture

10 Mar 2013 - 11:06 pm | नानबा

:)) :)):)) :))

अन्या दातार's picture

10 Mar 2013 - 2:08 pm | अन्या दातार

विकिपीडिया म्हणजे विकिपीडियाच्या वाचकांनी घडवलेला मुक्त ज्ञानकोश होय.

मग सर्वात आधी विकिपिडीया कुणी लिहिला???

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2013 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

मग सर्वात आधी विकिपिडीया कुणी लिहिला???

त्यानेच, ज्याने इंटरनेटचा स्पीड ५०० पटीने वाढवायचे तंत्रज्ञान शोधले.

आदूबाळ's picture

10 Mar 2013 - 2:55 pm | आदूबाळ

विकीपीडियाच्या पहिल्या वाचकाने पहिलं कोरं पान वाचलं (ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचं कोरं पत्र वाचलं होतं तसं). मग त्याने विचार केला, हे पान कोरं का असावं बरं? मग त्याने लिहायला सुरुवात केली. ते दुसर्‍याने वाचलं, मग तिसर्‍याने. असं करत करत विकीपीडिया फोफावला...

कळलं का अन्याभौ?

टवाळ कार्टा's picture

10 Mar 2013 - 3:13 pm | टवाळ कार्टा

_/|\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2013 - 2:36 am | डॉ सुहास म्हात्रे

कृपया हायलाईट आणि रंगीत अक्षरं कशी काढली ते सांगू शकाल काय?

चौकटराजा's picture

10 Mar 2013 - 4:31 pm | चौकटराजा

भारतातील पहिला पायलट जे आर डी टाटा की लक्ष्मण पटवर्धन ????

कपिलमुनी's picture

10 Mar 2013 - 11:05 pm | कपिलमुनी

पुष्पक विमान उडवायचा

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2013 - 11:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रावण भारतातला नव्हता लंकेचा होता.
आत्ता बोला ;-)

मोदक's picture

11 Mar 2013 - 12:01 am | मोदक

रावण भारतातला नव्हता

मुदलात त्यावेळी भारत 'देश' होता का..?

(घोर अज्ञानी) मोदक

कपिलमुनी's picture

11 Mar 2013 - 12:44 am | कपिलमुनी

जे आर डी टाटाना १९२९ मधे पहिला वैमानिक म्हणून लायसन्स मिळाले

तेव्हा पण भारत नव्हताच ..त्या वेळी ब्रिटिश शासन होते ..

यसवायजी's picture

15 Mar 2013 - 7:59 pm | यसवायजी

http://en.wikipedia.org/wiki/Shivkar_Bapuji_Talpade
तळपदेंनी पहिलं विमान बनवलं खरं.., पण ते un-manned होतं म्हणे.
नंतर कुणी ड्रायवर मिळाला न्हाय काय तेन्ला?

चौकटराजा's picture

10 Mar 2013 - 4:35 pm | चौकटराजा

वरील प्रश्नच चुकीचा आहे ... दुर्लक्ष करावे.

चौकटराजा's picture

10 Mar 2013 - 4:43 pm | चौकटराजा

जे आर डी टाटाना १९२९ मधे पहिला वैमानिक म्हणून लायसन्स मिळाले . पण त्यापूर्वीच दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यानी ब्रिटीशांकडून जर्मनी विरूद्ध लढताना पहिल्या माहायुद्धात बॉम्बर विमान चालविले होते. सिव्हिल एवीयशन मधले पहिले वैमानिक जेआरडीच त्या अर्थाने.

वेताळ's picture

10 Mar 2013 - 5:11 pm | वेताळ

खुपच मौलिक व रोचक माहिती दिलीत. सहसा विकिपिडीया म्हणजे वात्रट पोरांचे इंटरनेट वरील एकादा अड्डा असावा असा माझा समज होता. परंतु आपण दिलेली माहितीमुळे माझे ज्ञान किती त्रोटक आहे ह्याची जाणिव झाली. माहितीचा नवीन खजिना उलगडुन दाखवल्या बद्दल धन्यवाद.

अधिराज's picture

10 Mar 2013 - 6:15 pm | अधिराज

खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद! आजकाल ते फेसबूक का काय , त्याला पण खूप डिमांड आहे म्हणे. खूप मुली विचारत असतात तु फेसबूक वर आहे का म्हणून, मी त्यांना खोटंच हो म्हणून सांगतो. पण त्याबद्दल खरच काही माहिती नाही. कृपा करुन फेसबूकवर सुद्धा एक असाच माहितीपूर्ण लेख पाडाना.

यशोधन वाळिंबे's picture

10 Mar 2013 - 11:01 pm | यशोधन वाळिंबे

खोचक असलेल्या पण तरीही बोचक नसलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभार..

@ अधिराज,

फेसबुक म्हणजे नेमके काय असते ?

मोदक's picture

10 Mar 2013 - 11:53 pm | मोदक

एक सुचवू का हो...?

तुम्हाला विकीपिडीयाची माहिती द्यायचीच असेल तर,

१) विकीवर नक्की कशाप्रकारे माहिती अपडेट होते
२) माहितीची सत्यता कशी पडताळतात, चुकून / मुद्दाम अपडेट झालेल्या चुकीच्या माहितीबद्दल कोणत्या मार्गाने कसे आक्षेप येतात व नंतर सत्य माहिती कशी अपडेट होते.
३) Citation needed म्हणजे काय..?
४) एखादे संदिग्ध वाक्य कसे फ्लॅग केले जाते व त्याचे पुढे काय होते..?
५) विकीच्या खास टर्मिनॉलॉजीज काय आहेत..?

अशी रोचक माहिती अभ्यासून डिटेल लिहा.. वाचकांना नक्की आवडेल.

जिमी वेल्स जे दरवर्षी फंड रेझर्स चे आवाहन करतो त्याला जगभरातून मिळणारा प्रतिसाद हाही एक रोचक विषय आहे.

(चोरलेले क्रेडीट कार्ड चालू शकेल की नाही हे एक डॉलर डोनेट करून पडताळून बघण्याचा चोरांचा प्रिफर्ड स्त्रोत "विकीमिडीया फाऊंडेशन" हाच होता असेही वाचलेले आठवत आहे!)

ज्या वाचकांना इंटरनेटवर जमा केलेली माहिती भाषांतरित करून इथे डकवलेली बोर वाटेल व निगेटीव्ह रिप्लाय येतील (आलेच तर! कारण असे वाचक(?) खूप थोडे आहेत!)त्यांना सरळ फाट्यावर मारा.
गावातल्या सगळ्या गल्ल्या सारख्या थोड्याच असतात..?

(इथे मात्र कोणते रिप्लाय फाट्यावर मारायचे ते "अभ्यास वाढवून" ठरवा, बरेच जण फणसासारखे काटेरी दिसतात मात्र अत्यंत काळजीपोटी योग्य सल्ला देतात!)

उपयुक्त माहितीसह लिहीत रहा..

धन्या's picture

11 Mar 2013 - 12:11 am | धन्या

काहीसं असंच मी यशोधन साहेबांच्या खवत डकवून आलो होतो. त्याचं उत्तर नाहीच आलं म्हणा. कदाचित या तंत्रज्ञान गुरुला मिपावर खरडवही नावाची सुविधा आहे हे माहिती नसेल.

यशोधना, तुझा विकीपीडीयावरचा लेख वाचला. आणि राहवलं नाही म्हणून तुझ्या खवत माझी चरणधूळ झाडली.

तू जे काही दहा पंधरा ओळीत विकीपीडीयाबद्दल लिहिलं आहेस ते शेंबडया पोरालासुद्धा माहिती असतं रे. तुझ्या वयाच्या मानाने तुझी "एक्स्प्रेस" होण्याची ईच्छा समजण्यासारखी आहे रे. आणि हे एक्स्प्रेस होणं तुझ्या वयाच्या तुझ्या मित्र मंडळींमध्ये इंप्रेसिव्हही असेल. मिपाचे तसे नाही रे. इथे आयटी उगाळून प्यायलेले रथी महारथी वावरतात. किंवा थोडा वेळ असं धरुन चालू या की तू असे लेख ज्यांना काही माहिती नाही अशांसाठी लिहितोस. पण मग हे लेख अभ्यास करुन, आंतरजालवरील संदर्भ वापरुन, पुस्तकं पालथी घालून लिहिलेले असायला हवेत रे.

तू लिहिलेले लेख तुझ्या वयाच्या दुप्पट तिप्पट वयाचे लोकही वाचतात रे. त्यांचा विचार करत जा.

तुला जर खरंच तुझं लेखन सुधारायचं असेल तर मोदक या आयडीचे लेख वाचत जा. तंत्रज्ञावरील माहितीसाठी त्याने लिहिलेला टायटन घडयाळ्यावरील लेख वाच. म्हणजे तुला कळेल की असे तंत्रज्ञान विषयावरचे लेख कसे लिहावेत. मुळात तुला स्वतःचा अभ्यास वाढवावा लागेल. खुप सारे संदर्भग्रंथ पालथे घालावे लागतील, त्यावर चिंतन, मनन करावे लागेल. आणि मगच तू गुणवत्तापुर्ण लेखन करु शकशील.

हे असे दहा बारा ओळींचे इकडून तिकडून कॉपी पेस्ट केलेले लेख काही कामाचे नाहीत.

बघ. कदाचित माझं म्हणणं तुला आवडणार नाही. हे सारं वाचल्यानंतर कदाचित तुला येणार्‍या सार्‍या शिव्या मला तू देशील. हरकत नाही. आय कॅन सी अ स्पार्क इन यू. पण त्या ठीणगीला आता अर्थ नाही. ठीणगीकडे कुणाचं लक्ष जात नाही. लोकांचं आपल्याकडे लक्ष जाण्यासाठी तुला वणवा व्हावं लागेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Mar 2013 - 9:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

धन्याभाऊ, केवळ या एका खरडीसाठी आपण तुमचे fan झालो :-)

मन१'s picture

11 Mar 2013 - 9:21 am | मन१

सुरुवातीच्या काही वाक्यांप्रमाणेच "रे" हा प्रत्यय शेवटच्या काही वाक्यांच्या शेवटी असणं आवश्यक आहे. त्याशिवाय सुरुवातीच्या काही वाक्यांप्रमाणं "असं करु नकोस रे", "तसं कर रे" वाली लय येणार नाही. तस्मात, शेवटची काही वाक्यांच्या पूर्णविरामापूर्वी "रे " हा शब्द जोडून मगच वाचावे ही णम्र विनंती.
.
उदा:-
हे असे दहा बारा ओळींचे इकडून तिकडून कॉपी पेस्ट केलेले लेख काही कामाचे नाहीत.

बघ. कदाचित माझं म्हणणं तुला आवडणार नाही रे. हे सारं वाचल्यानंतर कदाचित तुला येणार्‍या सार्‍या शिव्या मला तू देशील रे. हरकत नाही रे. आय कॅन सी अ स्पार्क इन यू रे. पण त्या ठीणगीला आता अर्थ नाही रे. ठीणगीकडे कुणाचं लक्ष जात नाही रे. लोकांचं आपल्याकडे लक्ष जाण्यासाठी तुला वणवा व्हावं लागेल रे.

त्याशिवाय सुरुवातीच्या काही वाक्यांप्रमाणं "असं करु नकोस रे", "तसं कर रे" वाली लय येणार नाही.

खरंच की.

रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये "रे" चा वापर सढळ हाताने का केला आहे हे तुमच्या या प्रतिसादामुळे कळलं. ;)

चौकटराजा's picture

11 Mar 2013 - 6:49 pm | चौकटराजा

सारं वाचल्यानंतर कदाचित तुला येणार्‍या सार्‍या शिव्या मला तू देशील.
असेच झाले पहिजे म्हणजे मी त्या कट पेस्ट करून मराठी विकी वर " मराठी" माझी आयबोली या सदरा खाली टाकतो.
यशो, हलकेच्या घ्या . चांगला मस्त धागा आणा राव . फोर मारा शिंगल शिंगल नको !महिना मधे गेला तरी अस्वस्थ होउन नका

चौकटराजा's picture

11 Mar 2013 - 7:10 am | चौकटराजा

धागा चुकीचा नाही पण त्रोटक असल्याने टिंगल आली थोडीफार. मोदकच्या धाग्याचा सिन्सिअरपणा ( काय हायब्रीड विंग्लीस) आणा यशीधनशेठ मग बघा आम्ही डोक्यावर घेउ धागा !

बॅगपायपर सोडा राहीला का? ;)

चौकटराजा's picture

11 Mar 2013 - 6:51 pm | चौकटराजा

हायला ? धाग पोटात रिचवू असं म्हणालो आम्ही ? आँ ?

बाळ यशोधना, कधी संपणार तुझा बाळपणा?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2013 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा

@बाळ यशोधना, कधी संपणार तुझा बाळपणा?>>> =)) जो पर्यंत सुटत नाही पाळणा,तो पर्यंत चालु असतो बाळं पणा :-b

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Mar 2013 - 10:06 am | घाशीराम कोतवाल १.२

जो पर्यंत सुटत नाही पाळणा,तो पर्यंत चालु असतो बाळं पणा
ह्या बालपणा वरुन मला आमच्या पर्या टार्या चा मित्र भयानक पाठलाग आठवला
बाकी अआ भाउ यमक पर्फेक्ट बसलय राव

ह्या बालपणा वरुन मला आमच्या पर्या टार्या चा मित्र भयानक पाठलाग आठवला.

त्याच्या नमस्कार या ई-मॅगझिनची लिंक मिपाच्या उजव्या कॉलममध्ये आहे. :)

बॅटमॅन's picture

11 Mar 2013 - 12:54 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी खरंय =))

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2013 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

बाळ यशोधना, कधी संपणार तुझा बाळपणा?

श्री. यशोधन हे थोडे बालीश आहेत, माजोरी आहेत, किंचीत अतिशहाणपणा दाखवणारे देखील आहेत, पण म्हणून श्री. बॅटमॅन ह्यांनी त्यांच्यावरती अशी वैयक्तिक टिका करणे योग्य आहे का ?

यशोधनांच्या लिखाणाचा फ्यान
परोधन

बॅटमॅन's picture

11 Mar 2013 - 6:58 pm | बॅटमॅन

आयचा घो. तीनवेळा प्रतिसाद लिहिला आणि तरी दिसेचना :(

वामन देशमुख's picture

11 Mar 2013 - 9:54 am | वामन देशमुख

काय लेख आहे!
यापेक्षा अनसाइक्लौपीडिअ चाळून पहा.
यातील काही निवडक वेचे:
हिंदू
इस्लाम
ख्रिश्चन
अमेरिका
भारत
प्रेम

धन्याची प्रतिक्रिया जास्ती आवडली
. .

@यशोधन . .

दादा . . काही न काही लिहिता हे चांगलं आहे. . पण आपली व्याप्ती वाढवा . .
आयटी शी इथले एक एक धागे वाचा . आणि खालच्या प्रतिक्रिया वाचा . .

मी गेली ३-४ वर्षे याच फील्ड आहे

पण इथल्या लोकांची माहिती पहिली . क़ि मी कुठेच नाही हे समजतं . .

एक तर पूर्ण अभ्यास करून मग लिही
किंवा मग काहीच नको लिहूस . . फक्त वाच :)

नीलकांत's picture

11 Mar 2013 - 1:01 pm | नीलकांत

काही वर्षांपुर्वी मी मराठी विकीपिडीयात काही पानांची भर घातली होती. मा़झं गाव, विदर्भातील काही माहिती असे सगळे होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांत कुठेही काही खास लिहीलेलं नाहीये.

- नीलकांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2013 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला मराठी विकिवर माहिती भरायला आवडते. अधून मधून लहर आल्यावर किडूम मिडूक माहिती भरतो.
नियमित लेखन करायची सवय लागली पाहिजे, असे वाटते. अशात मराठी भाषादिनाच्या निमित्ताने 'चित्र दौड -२०१३' मधे सहभागी होण्याचे आवाहन मराठी विकिने केले होते. चार पाच छायाचित्रे किरकोळ लेखन केले तेवढेच. पण, जमेल तसं लिहित राहतो.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

11 Mar 2013 - 7:02 pm | नाना चेंगट

तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून मराठी तगून राहिली आहे अन्यथा काही खरं नव्हतं बगा पारद्यापक डागतर साहिब.