मनोरमा

प्रतिज्ञा's picture
प्रतिज्ञा in पाककृती
9 Mar 2013 - 4:46 pm

मैत्रिनिनो, थोड पाककृतीच्या नावाबद्दल सांगावस वाटत. मनोरमा हा पदार्थ एकदम साधा पण चविष्ट पाककृती मध्ये मोडतो. मला माझ्या मामा मुळे महाराष्ट्रातील अधिवासी पट्ट्याचा (धडगाव, अक्कलकुवा, तोरणमाळ ई.) सहवास लाभला. त्या भागात मनोरमा न्याहारी/ नाश्त्यात बनतो. माझ्या आजीच्या एका मैत्रीणीने मोठ्या कौतुकाने (कौतुकाने ते या साठी कि मी पहिल्यांदाच त्यांच्या पाड्यावर जाणार होती व त्याच वर्षी मी दहावी बोर्डात वर्गात पहिला क्रमांक मिळवला होता:) ) मला मनोरमा व माझ्यासमोरच काढलेल्या बकरीच्या दुधाचा गुळ घालून बनवलेला पातळसा (खर सांगायचं म्हणजे बकरीच्या दुधाचा चहा पातळच बनतो. पण हे मला त्यावेळी माहित नव्हत. त्यामुळे तेव्हा तो मला जरा जास्तीच पातळ वाटला होता) चहा बनवून खायला/प्यायला घातला होता.
मनोरमा नाव वाचूनच खूप भूक लागते मला...... :)

साहित्य - ४ दोन वेळ शिळ्या चपाती, १ मोठा कांदा, ३ हिरवी मिरची, १ मध्यम बटाटा, १ मो.च. शेंगदाणे, १ मो.च. फ्रोजन मटार, १२ पाने करिपत्ता, ४ पाकळी लसुन, १ वाटी धुवून चिरलेली कोथांबीर, १ छो.च. मोहरी, १ छो.च.जीरा, १ छो.च.हळद, ५ मेथीदाणे, २ छो.च. लाल मिरची पावडर, १छो.च.गरम मसाला, १ चिमुट हिंग, २ मो.च.तेल, चवीप्रमाणे मीठ.
कृती - प्रथम चपाती हाताने कुस्करून घ्या व नंतर चपाती मिक्सरमध्ये पोह्या इतकी जाड दळून घ्या. कांदा, मिरची व लसुन बारीक चिरून घ्या. बटाटा साल काढून धुवून चिरून घ्या. कढ़ईत तेलावर बारीक आचेवर मेथीदाणे खमंग परता. त्यानंतर आच मोठी करून कांदा, लसुन, मिरची, बटाट्याच्या फोडी, करिपत्ता, शेंगदाणा व मटार टाकून जरा जास्तीच च परता. नंतर आच कमी करून त्यात हिंग, मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून थोड परतून मसाला जळू न देता दळलेली चपाती घाला. २ मिनिट परतून चवीप्रमाणे मीठ घाला व शेवटी कोथांबीर घालून व्यवस्थित मिक्स करून मंद ५ मिनिट आचेवर दम घ्या. गरम गरम मनोरमा तयार.... :)

प्रतिक्रिया

प्रतिज्ञा's picture

9 Mar 2013 - 4:48 pm | प्रतिज्ञा

आज आठवणीने फोटू काढलाय... पण तो इकडे लोड कसा करायचं ते माहित नाही.... :(

आपण शिळ्या चपांतीचा चिवडा करतो, तशीच वाटती आहे पाकृ. मला पण खुप आवडतो हा चिवडा. मस्त लागतो.

रमेश आठवले's picture

9 Mar 2013 - 5:31 pm | रमेश आठवले

आमच्या एका खानदेशातल्या आजींनी या पदार्थाचे नाव मनोहर असे सांगितले होते.
फ्रोजन मटार आणि मिक्सर हे अर्थातच त्यांच्या पाकक्रियेत न्हवते. आम्ही फोडणीची पोळी या नावाने खातो..

आम्ही याला फोडणीची फोळी म्हणतो तर काहीजण कुस्करा, चिवडा, उसळ म्हणतानाही ऐकले आहे.

प्रतिज्ञा's picture

9 Mar 2013 - 8:20 pm | प्रतिज्ञा

मनोहर....
वा..... मनोरमा च नाव ऐकल्यावर पण मला एकदम मनोहर वाटत बघा. मनोहर छान नाव....:)

शुचि's picture

10 Mar 2013 - 12:07 am | शुचि

आम्ही पातळ पोहे घालून केलेल्या पोळीच्या चिवड्याला मनहर म्हणतो.

प्रतिज्ञा's picture

10 Mar 2013 - 11:49 am | प्रतिज्ञा

मनोरमा चे परत एक नवीन नाव माहित पडल..... मनहर... प्रतिसादाबद्दल धन्यवाद शुचि....:)

आमच्या घरी याला "शाही टुकडा" म्हणतात!

रमेश आठवले's picture

10 Mar 2013 - 5:03 pm | रमेश आठवले

हा एक मोगलाई बावर्चीखान्यात बनविला जाणारा गोड पदार्थ आहे. याला हैदराबाद मध्ये लोक डबल का मिठा या नावानेही ओळखतात. गुगल वर शोध केला असता शाही टुकडा या पदार्थाबाबत बरेच धागे सापडतात. त्यापैकी एक दिला आहे. मिपाच्या सांकेतिक भाषेत बोलावयाचे झाले तर फोटू बघून तोपासु.
http://www.rakskitchen.net/2011/03/shahi-tukda-shahi-tukra-double-ka.html

कच्ची कैरी's picture

10 Mar 2013 - 1:28 pm | कच्ची कैरी

आमच्याकडे याला पोळ्यांचा काला म्हणतात ,मला आवडतो आजी तर कधी कधी बाजरीच्या भाकारींचाही काला बनवते .
http://mejwani.in/

प्रतिज्ञा's picture

10 Mar 2013 - 5:01 pm | प्रतिज्ञा

पोळ्यांचा काला, शाही तुकडा......:) परत नवीन नाव कळल

अविनाशकुलकर्णी's picture

10 Mar 2013 - 5:03 pm | अविनाशकुलकर्णी

याला फो.चि.पो असेही म्हणतात

फोडणीची पोळी अशी खायला जबराच लागते. बाकी फोटु हवा होता.

प्रतिज्ञा's picture

10 Mar 2013 - 5:27 pm | प्रतिज्ञा

अविनाश कु.... आता माझी शाळा घेतात हे वाटत... असो.

प्रतिज्ञा's picture

10 Mar 2013 - 5:29 pm | प्रतिज्ञा

फोटू तर यावेळी काढलाच होता. पण तो अजून चढवता नाय येत न.... हळू हळू आम्ही शिकू फोटू चढवायलापण.....:( तोपर्यंत समजून घ्या.

५० फक्त's picture

11 Mar 2013 - 11:45 pm | ५० फक्त

फोडंणीची पोळी आणि हिरव्या मुगाची उसळ ह्याबरोबर ताक हवं खायला, मरण्यापुर्वी हे चालेल खायला मला.

स्मिता.'s picture

15 Mar 2013 - 5:32 pm | स्मिता.

आमच्याकडेही या प्रकाराला मनोहरा (बोलताना मनोरा) असंच म्हणतात. पोळ्या कुस्करल्यावर त्यावर पोहे करताना करतो तसं थोडं पाणी शिंपडून घेतल्यास शिळ्या पोळ्यांचे तुकडे कडक/चिवट न होता मऊसर होतात आणि खायला सोपे जाते. अर्थात ही माझी आवड. बर्‍याच घरात पाणी न वापरताही करतांना पाहिला आहे.

बाकी शिळ्या पोळ्यांचा असला तरी मनोहरा नावाप्रमाणेच मनोहर असतो :)

अरे चा हे तर पोई चा कुच्करा दिस्तो अहे पन खय ला मस्त

इरसाल's picture

16 Mar 2013 - 8:43 pm | इरसाल

बाशी रोट्यास्ना काला करेल शे.

श्रिया's picture

16 Mar 2013 - 11:18 pm | श्रिया

फोडणीची पोळी व मेतकूट असे कॉम्बिनेशनहि छान लागते.

चिगो's picture

16 Mar 2013 - 11:21 pm | चिगो

आम्ही ह्याला 'कुटके' म्हणतो.. बाकी 'पाड्यावरच्या' पाकृत फ्रोजन मटार पाहुन गंमत वाटली.:-)