साहित्यः
हाळिव - १ वाटी
नारळ - १
गुळ - दिड वाटी
नारळाचे पाणी - १ वाटी
विलायची पावडर - १/२ छोटा चमचा
कृती:
१. हाळिव निट निवडुन घ्यावेत. त्या मधे अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. लाडु खाताना ते दाताखाली आल्यास कचकच लागते. त्यामुळे हे काम वेळखाउ असले तरी निट करावे.
२. ओला नारळ फोडुन, त्याचे पाणी वाटीत काढावे व खोबरे खवुन घ्यावे.
३. एका भांड्यामधे हाळिव, नारळाचे पाणी व खवलेले खोबरे टाकुन मिक्स करावे. नारळात जास्त पाणी नसल्यास, शहाळ्याचे पाणी वापरले तरी चालेल.
४. आता हे सर्व निट मिक्स करुन, २-३ तासांसाठी झाकुन ठेवावे. २-३ तासांनी हाळिव फुगलेले दिसतील.
५. आता कढईत, हे हाळिव, ओले खोबरे, विलायची पावडर व गुळ टाकुन परतावे. सर्व गुळ विरघळे पर्यंत हे परतत रहावे. ह्यात ओले खोबरे असल्यामुळे तुप टाकायची गरज भासत नाही. खोबर्याचेच तेल सुटते.
६. मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढावा व त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडु वळवावेत.
७. हे लाडु फ्रिज मधेच ठेवावेत कारण ओले खोबरे असल्यामुळे हे जास्त टिकत नाहीत. त्यामुळे लवकरच संपवावेत.
प्रतिक्रिया
9 Mar 2013 - 8:45 pm | प्रतिज्ञा
अहळीव गुणाने उष्ण असतात ना? मला आह्ळीव खायची इच्छा होती ते मी एकदा खीर बनवून खाल्लीच... पण लगेच एक दोन तासात माझा घसा खूप खराब झाला होता. तेव्हापासून मी घाबरते. आह्ळीव खाल्ल्याने घसा खवखवतो का ? मला खीर शिवाय काही येत पण नव्हत. पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद...
10 Mar 2013 - 2:11 am | Mrunalini
धन्स प्रतिज्ञा... :) हो.. हाळिव गरम असतात... त्यामुळेच हे लाडु जास्त करुन हिवाळ्यात करतात. मी ह्याची खीर कधी खाल्ली नाही... आता ती एकदा करुन पाहिल... आणि घसा खराब व्हायच.. तर ते बहुतेक दुसर्या कशामुळे तरी झाला असेल... कारण मला तरी कधी हाळिव मुळे घसा खवखवण्याचा अनुभव नाही आला.
10 Mar 2013 - 12:08 am | शुचि
हे लाडू व हळीवाची खीर अतिशय आवडते. पाकृ आवडली.
10 Mar 2013 - 4:37 am | सानिकास्वप्निल
मला ही अळीवाची खीर , लाडू दोन्ही खूप आवडतं :)
थंडीत खायला उत्तम
फोटो छानच आहे ,मस्तं :)
10 Mar 2013 - 8:19 am | मदनबाण
हळिवाचे की अळिवाचे ?
मला अळिवाचे हे लाडु लयं लयं आवडतात बघा ! :) ते अळिवाचे कण चावुन खायला लयं भारी वाट्ट ! :)
फोटु जबराट आला आहे ! :)
(लाडु प्रेमी):)
10 Mar 2013 - 3:18 pm | Mrunalini
हो.. प्रतिज्ञा म्हणतीये तसेच.. हे सर्व एकच आहे.. मला पण आळिव, हाळिव आणि हाळिम हि नावं माहिती आहेत.. त्यामुळे मलाच कळत नव्हतं.. ह्याचे नक्की नाव काय. ;)
10 Mar 2013 - 9:19 am | रोहिणी पानमंद
लाडू एकदम मस्तच !!!!!!!!!!!!
10 Mar 2013 - 11:11 am | तिमा
अळिवाचे लाडू बाळंतीणीला देतात. चवीला मस्तच लागतात. पण सावधान! अमेरिकेला नेण्याचा प्रयत्न करु नका. फेकून द्यायला लावतात.
10 Mar 2013 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा
फोटू का दिसत न्हाइत पाककृतींच्या धाग्यांचे
10 Mar 2013 - 11:35 am | प्रतिज्ञा
अग दीदी... बहुतेक अहळीव चा वास मला सहन होत नसेल. पण आता उन्हाळ्यात करून खाल्ले तर बाधणार नाहीत न ? कारण आता घरात २ प्याकेट आहेत. पण बनवून फक्त मलाच संपवावे लागतील. :(
10 Mar 2013 - 3:20 pm | Mrunalini
ह्म्म्म... तसे असेल कदाचित... पण आता हाळिव उन्हाळ्यात नको खाउ... ते गरम पडतील. पाकिट तसेच राहुदे... पुढच्या वर्षा हिवाळ्यात कर. ;)
16 Mar 2013 - 1:31 am | चिंतामणी
दूध घ्यायचे. म्हणजे बाधत नाहीत.
10 Mar 2013 - 11:40 am | प्रतिज्ञा
मदनबाण...... अहो... अळीव , हळीव, अहळीव व हलीम सगळ एकच....... :)
16 Mar 2013 - 10:33 am | मोदक
नाय हो.. हलीम वेगळे.
हलीम हा हैद्राबादी मांसाहारी पदार्थ आहे.
17 Mar 2013 - 2:03 am | Mrunalini
हो... बरोबर... हालिम हा प्रकार मुसलमानांमधे खुप प्रसिद्ध आहे... फक्त हे हालिम खाण्यासाठी एकदा हैद्राबादला जायचे आहे.
10 Mar 2013 - 1:31 pm | कच्ची कैरी
अळीव फक्त मेथीच्या लाडूतच खाल्ले आहे अजून तरी ! पण फोटो एकदमच सुरेख आला आहे .
http://mejwani.in/
10 Mar 2013 - 3:22 pm | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद.. हाळिवाचे लाडु नक्की करुन पहा.. मस्त लागतात.
10 Mar 2013 - 3:52 pm | दिपक.कुवेत
छानच दिसतायत लाडु. बाणा म्हणतो त्या प्रमाणेच 'अळिवाचे कण चावुन खायला लयं भारी!'
10 Mar 2013 - 4:17 pm | Mrunalini
हो.. खरय.. मला पण ते हाळिवाचे कण चावायला एकदम मस्त मजा येते. :D
10 Mar 2013 - 3:52 pm | पैसा
सोप्पी आणि चवदार पाकृ!
10 Mar 2013 - 5:12 pm | पिंगू
अळीवाच्या लाडवांमध्ये सुके खोबरे वापरल्यास ते बरेच दिवस टिकतात. हिवाळ्यात तर घरी बनतातच..
10 Mar 2013 - 8:06 pm | रेवती
बरी आठवण झाली. हिवाळा संपायच्या आत माझ्याकडे असलेले अळीव हे लाडू करून संपवते. मला वरील फोटो फार आवडलेत.
10 Mar 2013 - 10:16 pm | सस्नेह
लाडू पाहून ती अहळीवाची खास चव तोंडात उतरली !
तोंडाचा व्यायम खराच. पण मस्त चव !
15 Mar 2013 - 9:40 pm | टपरी
काला -खट्टा मध्ये टाकतात . छान लागते .
15 Mar 2013 - 11:51 pm | Mrunalini
नाही.. ते सब्जा म्हणजे काळे असतात. हे हाळिव ब्राउन रंगाचे असतात.
16 Mar 2013 - 1:47 am | जयवी
फोटोसुद्धा स्वादिष्ट दिसतोय ;)
माझे अतिशय आवडते लाडू. कुणा छोटं बाळ असणार्या घरी गेलं तर हमखास हा लाडू खायला मिळतो ;)
16 Mar 2013 - 9:31 am | अत्रुप्त आत्मा
हळिव का लाडू हम्कू बहुत अवडता है!!! :-)
16 Mar 2013 - 10:17 am | राही
लहानपणी जेव्हा दिवाळीत मातीचा किल्ला करायचो तेव्हा बहुधा हेच दाणे त्यावर टाकून ठेवायचो. काही दिवसांनी सगळा किल्ला छोट्याछोट्या हिरव्या कोंबांनी भरून जायचा. लाल रंगाचं बी असायचं. नाचणी की अळीव आठवत नाही.
16 Mar 2013 - 4:32 pm | Mrunalini
हो... आम्ही पण ते हाळिवच वापरायचो...
17 Mar 2013 - 12:05 am | निवेदिता-ताई
फोटो एकदमच सुरेख आला आहे .
17 Mar 2013 - 2:04 am | Mrunalini
लाडु आवडल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद... आणि फोटोचे सर्व श्रेय निशांतला जाते. :)
20 Sep 2013 - 11:41 am | ganeshan
अळीवाची खीर,लाडू दोन्ही
थंडीत खायला उत्तम
फोटो छानच आहे ,झकास!!!!!!!
21 Sep 2013 - 12:29 am | सूड
हाळीव फक्त मेथीच्या लाडवातच खाल्लेत !! रेशिपी हटके आहे.
22 Sep 2013 - 10:16 pm | भ ट क्या खे ड वा ला
अळीव = "हलीम" असा एक मजेशीर उच्चार कोकणातील मुस्लिम करतात.
आणि हैद्राबाद चे हालीम वेगळे ,
या वरून अजून एक किस्सा आठवला.
कोकणात नोकरी निमित्ताने आलेल्या जत तालुक्यातील एका स्त्रीने सर्व दुकाने पालथी घातली पण तिला "जवस" काही मिळाले नाही. सर्व किराणा दुकानात "अळशी" होती पण जवस आणि अळशी हे दोन्ही एकच हे दुकानदार आणि ग्राहक दोघांना माहित नव्हते
8 Jan 2014 - 5:39 pm | आयुर्हित
उत्तम रेसिपी आहे आणि करायची वेळही आता उत्तम आहे.
तर मग येऊ देत की असे अजून छान छान पदार्थ......
एक छान गाणे आठवले,
आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा..........
१००% सह्मत
आपली "खाण्यासाठी जगण्यासाठी" काय खावे याची जाणही तेवढीच उत्तम आहे, हे ही नसे थोडके.
कळावे, लोभ असावा.
आपला मिस्नेही, आयुर्हीत
ता.क. हळीवची खीर हाही एक छान उपयुक्त पदार्थ आहे. याची रेसिपी मिळेल?
8 Jan 2014 - 8:12 pm | Mrunalini
धन्स :)
हाळिवाची खिर मी अजुन कधी केली नाही. सध्या आता थंडीपण आहे तर एकदा करुन बघते. मग टाकते त्याची पकृ.
9 Jan 2014 - 12:26 am | बहुगुणी
पाककृतीबद्दल आभार.
परदेशात 'गार्डन क्रेस' या नावाने ही रोपं kitchen herbs म्हणून मिळतात, त्यांच्या झटपट वाढीचा हा एक टाईम लॅप्स व्हिडिओ पाहिला होता ते आठवलं:
9 Jan 2014 - 1:47 pm | वेल्लाभट
भनाट.... फोटोज भनाट! कायच्याकाय!
पाकृही छानच. या सीझन मधे होतात अनेकदा.