आमसुलाचे सार

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in अन्न हे पूर्णब्रह्म
6 Mar 2013 - 1:35 am

आमसुलाचे सार नारळ घालून किवा नारळा शिवायही करतात.

साहित्य- ५/७ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, एका नारळाचे दूध किवा साधारण २ वाट्या नारळाचे दूध,
१/२ हिरव्या मिरच्या,अर्धा चमचा साजूक तूप, थोडे जिरे, मीठ व साखर चवीनुसार, थोडी कोथिंबिर, पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला, नंतर त्यातील पाणी काढून घ्या व उकळा.
कोकमाचा आगळ असेल तर त्यात २-३ वाट्या पाणी घालून उकळत ठेवा. उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात नारळाचे दूध घाला.(नारळाचे दूध घालून उकळले तर एखादेवेळी फाटते म्हणून कोकमाचे पाणी चांगले उकळून घ्या व नंतर त्यात नारळाचे दूध घाला.)
पळीत तूप जिर्‍याची फोडणी करुन तीत हिरव्या मिरच्या घाला व ही फोडणी सारावर घाला.
मीठ व साखर घाला. कोकमाचा आगळ आंबट असेल तर साखर जास्त लागेल.
वरुन चिरलेली कोथिंबिर घाला.

.

आमसुलाचे सार (प्रकार-२)
साहित्य- ५-६ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, १-२ हिरव्या मिरच्या, तूप,जिरे फोडणीसाठी, मीठ व साखर चवीनुसार,पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला.
तूप,जिर्‍याची फोडणी करुन त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
त्यात आमसुलाचे पाणी किवा कोकमाचे आगळ+पाणी घाला, चवीनुसार मीठ ,साखर घाला व चांगले उकळू द्या.
वरुन कोथिंबिर घाला.

प्रतिक्रिया

मस्त पाकृ स्वाती ताई... पण हे सार म्हणजे सोलकढी सारखेच लागेल ना?

निमिष ध.'s picture

6 Mar 2013 - 2:02 am | निमिष ध.

आमची आजी दुसर्या प्रकारचे सार करते त्याची आठवण झाली.

गरमागरम आमसुलाचं सार छान, शिवाय पित्तशामक!
प्रकार दुसरा हा नेहमीच्या करण्यातला आहे . नारळाचं दूध घालून फक्त सोलकढी माहित होती, त्यामुळे प्रकार पहिला हा माझ्यासाठी नवीन आहे.

चिंतामणी's picture

9 Mar 2013 - 2:15 pm | चिंतामणी

सार म्हणुन दुसरा प्रकारच नेहमी प्यायला आहे.

स्पंदना's picture

6 Mar 2013 - 4:57 am | स्पंदना

काय दिसतय. व्वा मस्त.

सानिकास्वप्निल's picture

6 Mar 2013 - 5:04 am | सानिकास्वप्निल

पहिला प्रकार साधारण सोलकढीसारखा आहे, मला प्रकार दुसरा वेगळा, नवीन वाटला.
दुसर्‍या प्रकारे करुन बघेन.
फोटोत सार छान दिसत आहे, नेत्रसुखद:)

तोंडाला चव नसेल अश्यावेळीसुद्धा छान लागते. आणि त्याचा रंगसुद्धा भारच भन्नाट दिसतो.

तु केलेस की त्याचा फोटो काढ आणि पोस्ट कर.

इष्टुर फाकडा's picture

12 Mar 2013 - 1:46 pm | इष्टुर फाकडा

एखाद्याच्या/दीच्या तोंडाला चव नाही हे कसे कळते ? ;)

बाकी पाक्रु आजच करणेत येईल !

पैसा's picture

6 Mar 2013 - 8:08 am | पैसा

पारंपारिक पाकृ. दुपारचे जेवण जड झाले असेल तर रात्रीच्या जेवणासाठी असे सार आणि भात हा उत्तम ऑप्शन.

कच्ची कैरी's picture

6 Mar 2013 - 8:41 am | कच्ची कैरी

सोलकढी मला फार आवडते ,त्यामुळे तो दुसरा प्रकारही आवडेल ,बाकी रंग छान आलाय साराचा :)
http://mejwani.in/

पिंगू's picture

6 Mar 2013 - 9:46 am | पिंगू

सही रे सही..

निवेदिता-ताई's picture

6 Mar 2013 - 12:17 pm | निवेदिता-ताई

मस्तच........:)

मोहन's picture

6 Mar 2013 - 12:51 pm | मोहन

तों पा सु

हासिनी's picture

6 Mar 2013 - 1:17 pm | हासिनी

सोलकढी हा आवडीचा प्रकार, पण दुसरा प्रकार आज पहिल्यांदाच पाहिला.
करून बघायला आवडेल!!
:)

गणपा's picture

6 Mar 2013 - 1:18 pm | गणपा

:)
मस्त.

इशा१२३'s picture

6 Mar 2013 - 2:31 pm | इशा१२३

दूसरा प्रकार आजी नेहेमी करायची त्यामुळे माहित आहे.पहिला प्रकार सोलकदी सारखा छान दिसतोय.

दिपक.कुवेत's picture

6 Mar 2013 - 2:39 pm | दिपक.कुवेत

दोन्हि प्रकार माहित आहेत पण आई दुसरा प्रकार पटकन व्हायचा म्हणुन तोच करायची. वाफाळत्या मुगाच्या डाळिची खिचडि, तुपाची धार, हे सार, पोह्याचा पापड आणि बाहेर कोसळणारा धो धो पाउस.....बास दुसरं बाकि काहि नको.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

सोल-कढी
:-)

ज्योति प्रकाश's picture

6 Mar 2013 - 3:28 pm | ज्योति प्रकाश

अश्याच प्रकारे कोकम सार आमच्याकडे कोकणात करतात त्याला तिवळ किंवा फुटीकढी म्हणतात.
साहित्यः-५-६ आमसुले,मिठ,चिरलेली हिरवी मिरची,हिंग अंदाजे अर्धा चमचा,बारीक चिरलेली कोठिंबीर.
कृती:-पेलाभर पाण्यात आमसुले भिजत घालून त्यात मिठ घाला.५-७ मिनिटांनी त्यात उरलेले साहित्य घालून ढवळून घ्या.
आमच्याकडे असे सार मटण,चिकन केले कि करतात.

लालन सारंगांच्या मासेमारी हाटलात हे तिवळ देतात-लै आवडतं, टकीला का काय ते प्याल्याच्या आविर्भावात शॉट मारतो एकदम.

मदनबाण's picture

6 Mar 2013 - 10:12 pm | मदनबाण

आहाहा... :)
तै मला कधी बोलावतेस असे सार प्यायला ?

(सार पाहुनच गार झालेला) :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2013 - 2:56 am | प्रभाकर पेठकर

पहिला प्रकार म्हणजे फोडणीची सोलकढी तर दूसरा प्रकार हा 'फुटीकढी'.

'फुटीकढी' नारळाचे दूध नसल्याकारणाने जास्त सात्विक आणि रोजच्या जेवणासाठी उत्तम.

तर सोलकढी फक्त रविवारी असा बेत असतो.

मी_देव's picture

9 Mar 2013 - 2:34 pm | मी_देव

वाह

वैशाली हसमनीस's picture

10 Mar 2013 - 2:29 pm | वैशाली हसमनीस

मी म्हणते 'उत्तम'पाकक्रुति.

प्रयोग म्हणुन फोडणी मधे कढीपत्ते आणि आल्याचे काप (ज्युलीअन्स) टाकले होते. चांगले झाले होते.
एका सोप्या रेसीपी बद्दल धन्यवाद.

सस्नेह's picture

15 Mar 2013 - 8:24 pm | सस्नेह

यात लसूण घातला की सोलकढी तयार होते ना ?