बेसन पोळ्या -

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
6 Mar 2013 - 2:12 pm

अर्थात बेसन धिरडी. एक झकास तोंडीलावणे

साहित्य - एक वाटी बेसन पिठ,हळद चिमुटभर, हिंग एक टी.स्पुन, कोथिंबीर भरपुर बारीक चिरलेली, थोडासा ओवा, लाल तिखट ज्याचे त्याचे आवडीनुसार, मिठ चवीनुसार, तेल थोडे.

कृती -- तेल सोडुन वरील ईतर सर्व साहित्य एकत्र कालवावे, बेसनपिठाच्या गुठळ्या होवु देवु नये.
नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल पुसटसे लावावे, व त्यावर हे पिठ थोडे थोडे घालून पातळसर पसरावे....एक दोन मिनिटांनी पुन्हा धिरडे उलटवुन भाजावे...झाले आपले झकास तोंडीलावणे तय्यार.........

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

6 Mar 2013 - 2:34 pm | दिपक.कुवेत

पण फोटो कुठाय ताई! ह्यात बारिक चीरलेला टोमॅटो पण छान लागतो आणि तिखटाएवजी हिरवी मिरची...अर्थात ज्याची त्याची आवड!

ज्योति प्रकाश's picture

6 Mar 2013 - 3:18 pm | ज्योति प्रकाश

फोटू?????????????????

बाय डिफॉल्ट ताई,अहो फोटो कुठे आहे ?

मिहिर's picture

8 Mar 2013 - 6:37 pm | मिहिर

शीर्षकात पोळ्या का म्हटले आहे? बेसन पोळी वेगळी असते इतर गुळ, पुरण वगैरे पोळ्यांसारखी.

अनन्न्या's picture

8 Mar 2013 - 7:07 pm | अनन्न्या

तुम्ही तोंडीलावणं म्हणताय तर याला आमच्या भागात पोळा म्हणतात. पाहिले नाही कधी, पण मी जे वर्णन ऐकलेय त्यावरून असे वाट्ते.

निवेदिताताई म्हणजे खरंच एकेक हटके रेसिपी देत असतात. कौतुक करावं तितकं कमी. ही रेसिपी म्हणजे इतकी अनवट आहे की बेसनाचं असं काही करता येऊ शकतं असा विचारही आला नाही कधी.

अक्षया's picture

9 Mar 2013 - 3:09 pm | अक्षया

+ १

मस्त पाकृ ताई.... माझ्या बाबांची आवडती डिश... कुठली भाजी आवडली नाही कि आई पटकन हे धिरडे करुन द्यायची.

दीपा माने's picture

9 Mar 2013 - 12:00 am | दीपा माने

अगदी आवडीची आहे. ताई तुमच्या पाकृ खुपच आवडतात तरी वरचेवर देत जाणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2013 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो असता तर बेसनाच्या पोळ्या करुन पाहिल्या असत्या.

-दिलीप बिरुटे

कच्ची कैरी's picture

10 Mar 2013 - 1:35 pm | कच्ची कैरी

मला ह्याचाप्रकाराची मुगाची धिरडी खूप आवडतात . हेही छानच लागत असणार .
http://mejwani.in/