या विषयावर पूर्वी कोणी लिहिले आहे की याची मला कल्पना नाही. हा विषय थोड्या खेळकर अंगाने मांडण्याची इच्छा आहे.
एकूण राशी १२ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन
एकूण ग्रह १२ - चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो (राहू व केतू हे ग्रह नसून छेदबिंदू आहेत किंवा प्लूटोला ग्रह मानले जात नाही या वादात मला पडायचे नाही)
स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव.
प्रत्येक ग्रहाचे शत्रू व मित्र ठरलेले असतात. प्रत्येक ग्रहाच्या आवडत्या व नावडत्या राशी, उच्च व नीच राशी, मित्र राशी, स्वगृह राशी इ. ठरलेल्या असतात. त्यानुसार प्रत्येकाच्या स्वभावात त्या त्या ग्रहांची वैशिष्ट्ये दिसून येतात.
चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात.
रवि - रवि राशीस्वामी असलेली सिंह राशीची माणसे काहीशी रागीट, स्पष्टवक्ती, सत्याची चाड असलेली असतात.
मंगळ - हा ग्रह आक्रमक, बेधडक, काहीसा अविचारी समजला जातो. मेष व वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे. साहजिकच या राशी मंगळाप्रमाणेच असतात. पण वॄश्चिक रास ही आक्रमकतेपेक्षा डूख धरून सूड उगविणे, धारदार बोलणे यासाठी जास्त ओळखली जाते.
बुध - बुध राशीस्वामी असलेल्या राशी २, मिथुन व कन्या. माणसाची वाणीवर बुधाची सत्ता आहे. मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात. यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे. हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात. कन्या राशीची माणसे बोलण्यात शार्प असतात, पण मनातून भित्री असतात.
गुरू - गुरू म्हणजे विद्वत्ता, ज्ञान व अध्यात्म. धनू व मीन राशींचा राशीस्वामी गुरू असतो. गुरूची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळमार्गी पण घाबरट असतात. धनू राशीची माणसे सत्यप्रिय असतात, पण मीन राशीइतकी देवभोळी नसतात. त्यांच्यात काहीशी आक्रमकता असते.
शुक्र - हा रसिकतेचा ग्रह आहे. वृषभ व तूळ राशींचा हा स्वामी आहे. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अतिशय रसिक व जीवनाचा आस्वाद घेणार्या असतात. अनेक कलाकारांची तूळ रास आढळते. भगवान श्रीकृष्णाची वृषभ रास होती.
शनी - शनी म्हणजे कर्तव्यकठोरता, कष्ट, भावनांचा अभाव किंवा हृदयापेक्षा बुद्धीने निर्णय घेणे. मकर व कुंभ राशींच्या व्यक्ती शनीच्या अंमलाखाली येतात. कुंभ ही बुद्धीप्रामाण्यवादी, शास्त्रज्ञ, गणिती अशांची रास आहे. मकर ही अत्यंत कष्टाळू लोकांची रास आहे. या राशींची माणसे कधीही भावनेच्या भरात वाहवत जात नाहीत. मकर राशीची माणसे अतिशय ठाम निर्णय घेणारी असतात, पण कुंभ राशीच्या व्यक्ती काहीशा द्विधा मनस्थितीत असतात.
याची अजून एक वर्गवारी करता येईल.
मीन, कर्क, कन्या - निर्णयक्षमतेचा व नेतृत्वाचा अभाव
वृषभ, तूळ, कुंभ, सिंह, धनू - संतुलित निर्णय घेण्याची क्षमता
मेष, मिथुन, वृश्चिक, मकर - नेतृत्वगुण व बेधडक निर्णय घेण्याची क्षमता
या पार्श्वभूमीवर कोणत्या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावे किंवा करू नये याचा अंदाज घेता येतो.
आक्रमक किंवा बेधडक राशींच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये. नाहीतर त्या दोघात कायमच संघर्ष सुरू असतो. तसेच सौम्य राशींनी आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघेही गडबडून जातात. दोघातला एकजण बिनधास्त, धाडसी व दुसरा सौम्य असल्यास दोघांचे चांगले जमते.
मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्याचवेळा तलवारींचा खणखणाट व ठिणग्या उडताना दिसतील. मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन इ. सौम्य व आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते.
वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार इ. यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या आधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. यांनी मकर, सिंह या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा.
मिथुन - ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या अरे ला कारे ने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणे होतील. हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क, तूळ, मीन इ. राशींचा जोडीदार निवडावा.
कर्क - हे अतिशय भोळे, गलिबल, सरळमार्गी या प्रकारचे असतात. यांना मेष, धनू, सिंह, वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा. यांनी तूळ, मीन अशा सरळमार्गी व आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न करू नये. कारण दोघेही जोडीदार शांत व भोळे असल्याने संकटात डगमगून जातात.
सिंह - हे सरळमार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, छक्केपंजे, फसवणूक यांना जमत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी विवाह टाळावा.
कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य. यांनी कर्क, मीन, तूळ इ. राशींचा जोडीदार निवडू नये.
तूळ - ही रास बरीचशी वृषभेप्रमाणेच असते. पण वृषभ ही जास्त बेधडक व कमी आध्यात्मिक असते. यांचे कोणत्याही राशीशी उत्तम जमते.
वृश्चिक - आक्रमक व डूख धरून सूड उगविणारी रास. हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात. यांनी मेष, सिंह, मकर व मेष या आक्रमक राशींच्या व्यक्तींशी विवाह टाळावा.
धनू - सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात. यांनी कोणत्याही राशीही लग्न केले तरी चालेल, पण मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी यांचे खटके उडतील.
मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा.
कुंभ - बरीचशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास. हे भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. या राशीची माणसे अतिशय अहंकारी व तुसडी असतात. स्वतःला जरा जास्त शहाणे समजणार्या माणसांची ही रास आणि हा अहंकार बुद्धिमत्तेतून आलेला असतो. यांनी कोणाशीही लग्न केले तरी कायम स्वत:चाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात. यांनी सुद्धा यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. नाहीतर घरात रोज भांडणे होतील.
मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या व आध्यात्मिक लोकांची रास. यांच्यात अजिबात आक्रमतता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. यांनी मीन व कर्क राशींचा जोडीदार कधीही निवडू नये. इतर कोणत्याही राशीचा चालेल. हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वरचष्मा सहन करतात व स्वखुषीने आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात.
प्रतिक्रिया
28 Feb 2013 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही नियमाला अपवाद.
28 Feb 2013 - 3:15 pm | तुमचा अभिषेक
छान आणी योग्य लिहिले आहे मात्र विनोद, विरंगुळा या लेखनप्रकारात का टाकले आहे, तसे काही जाणवले नाही, म्हणजे वाचायच्या आधी तश्या अपेक्षा तयार झाल्याने त्या पातळीवर अपेक्षाभंग होतो.
असो, मी स्वता कर्क आहे, बायकोची रास आजच घरी गेल्यावर विचारतो आणि परत इथे येऊन चेक करतो.. :)
28 Feb 2013 - 3:15 pm | स्पा
अरेरे आम्ही
वाले
कसं होणार आमचं
28 Feb 2013 - 3:19 pm | पिंपातला उंदीर
भारत देशाची रास मकर आहे म्हणतात- (तूळ राशीचा अमोल) : )
28 Feb 2013 - 3:19 pm | श्रीगुरुजी
वरील लेखात खालील परिच्छेदात टंकलेखन चूक झाली आहे.
"स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली चंद्ररास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात चंद्रराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव."
हा परिच्छेद खालीलप्रमाणे वाचावा.
"स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव.
28 Feb 2013 - 3:44 pm | राही
आणि स्वभाव जास्तकरून जन्मराशीनुसार सांगता येतो. लग्नराशीवरून शरीराची ठेवण वगैरे सांगता येते. काही लोक स्वभाव आणि वृत्ती असा फरक करतात.स्वभाव जन्मराशीनुसार तर वृत्ती लग्नराशीनुसार असतो असे मानतात. कुंभ आणि वृश्चिक ह्या थोड्या कॉम्प्लेक्स राशी मानता येतील. वृश्चिकेमधे पाताळयंत्री, राजकारणी लोक सापडतील तसे हळवे आणि साधुपुरुषसुद्धा सापडतील. या दोन जन्मराशी पहाताना ग्रहयोग आणि महादशा तपशिलाने पहावे, कारण ते बराच प्रभाव पाडतात असे वैयक्तिक मत आहे. कुंभ ही शनीची रास खरी,पण शनीचे चांगले गुण दाखवणारी रास. दीर्घोद्योग,चिकाटी हे मकरेची मानले गेलेले गुणविशेष कुंभेत प्रकर्षाने आढळतात.कुंभ म्हणजे जलाने पूर्ण भरलेला घडा. अधजल गगरी छलकत जाय असे यांचे नसते. परिपक्वता आणि कृतीआधी बडबड न करणे हे यांचे स्थायीभाव.त्यामुळे हे कधीकधी आतल्या गाठीचे किंवा कारस्थानी भासू शकतात पण तो भासच.या व्यक्ती आपल्याविषयीचे गैरसमज दूर करायला जात नाहीत,तसेच इतरांना विश्वासात घ्यायलाही जात नाहीत. स्वतःच्या क्षमतेवर यांचा पूर्ण विश्वास असतो. म्हणून ते तुसडे, घमेंडी भासू शकतात.
28 Feb 2013 - 7:14 pm | शुचि
कुंभ राशीचा उत्तम अनुभव. निरपेक्ष वृत्ती, अभ्यासूपणा वगैरे.
28 Feb 2013 - 5:50 pm | पैसा
बदल केला आहे
28 Feb 2013 - 3:21 pm | स्पा
आता आम्ही काय करायचं
असली देवभोळी रास पदरात पडली आहे , न कुठली निर्णयक्षमता
28 Feb 2013 - 3:25 pm | Dhananjay Borgaonkar
कॉलिंग शुची मामी :)
ओ तो कर्ण धनु राशीचा होता हे खरय का हो?
28 Feb 2013 - 3:27 pm | स्पा
एकच वेळी गरीब आणि संशयी स्वभाव हे कसे काय ब्वा ??
28 Feb 2013 - 3:33 pm | Dhananjay Borgaonkar
आरे बाबा राशीच नाव बघ की..कन्या रास आहे ती ;)
28 Feb 2013 - 5:56 pm | ई-पूर्वाई
संशयी पेक्षा वैचारिक गोंधळ (कन्फ्युजन) झाल्यामुळे धरसोड वृत्ती (कशाबद्दलही - अगदी एखाद्याबद्दल चे मत निर्माण होतेवेळी सुद्धा) - हे वर्णन जास्त योग्य आहे असे मला वाटते :) (सोर्स - ह्या राशी च्या लोकांबद्दल चे स्वानुभव; आणि माझी स्वतः ची रास पण कन्याच आहे :) खी: खी: खी:
28 Feb 2013 - 3:37 pm | प्यारे१
ज्यांची 'टाळण्या'च्या कॅटॅगिरीतल्या राशींतल्या व्यक्तींशी लग्न झाली आहेत त्यांनी काय करावं? :)
कोई उपाव बताओ गुर्जी! ;)
28 Feb 2013 - 4:46 pm | शिद
माझी आणि बायको, दोघांची रास कुंभ :( काही उपाय?
त्यातल्यात्यात, वडील व मुलाची रास देखिल कुंभ.
28 Feb 2013 - 4:52 pm | श्री गावसेना प्रमुख
नारायण नागबली,कालसर्पयोग शांती,ग्रहदोष पिडानाश,सत्यनारायण महापुजा.
सर्व करुन घ्या,सर्व काही ठिक होइल(नाहीतर नाव बदलवुन घ्या)
3 Mar 2013 - 2:01 am | संजय क्षीरसागर
नाही तर डेट तीच ठेवून वेळ हवीतशी बदलून घ्या!
28 Feb 2013 - 10:37 pm | jaypal
तुम्च्या घरात कायम म्हणजे १२ महीने महाकुंभ मेळा असेल आहात कुठे?
3 Mar 2013 - 2:03 am | संजय क्षीरसागर
म्हंजे हे काय नागा साधू होणार का आता?
28 Feb 2013 - 7:16 pm | शुचि
=)) =))
बसा बोंबलत आता =)) म्हणून लग्नाआश्त्स्स्रीगुरुजींचा सल्ला घेतला असता तर!!
28 Feb 2013 - 3:44 pm | पियुशा
मी तुळ राशीची आहे गुर्जी माझ भविष्य सांगा ना ;)
28 Feb 2013 - 3:50 pm | इरसाल
मी वृश्चिक राशीचा व पत्नी सिंह राशीची आहे.
28 Feb 2013 - 3:50 pm | नि३सोलपुरकर
दिलेली राशी वैशिष्ट्ये ही पुन्हा एकदा नजरे खालुन घाला ना...
विशेष काही नाही हो माझी ही अवस्था प.रा.सारखी झाली आहे.
28 Feb 2013 - 3:51 pm | नानबा
आम्ही अपवाद... :)
28 Feb 2013 - 4:03 pm | कवितानागेश
सगळ्यांनीच मेष, सिंह आणि व्रुश्चिकेच्या लोकांशी विवाह टाळले तर कसं काय व्हायचं? ;)
-भांडखोर, बुद्धीमान आणि देवभोळी माउ :P
28 Feb 2013 - 5:01 pm | शैलेन्द्र
त्यांनी आपापसात करावेत ना :), बाकीच्या राशीवाल्यांना काही मनोरंजन नको?
2 Mar 2013 - 10:14 pm | श्रीगुरुजी
मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ, धनू व मीन राशींनीच लग्न करावे. या राशी सौम्य असल्याने मेषसारखा आक्रमक जोडीदार त्यांना हवा.
सिंह राशीवाल्यांनी मेष, मिथुन, वृश्चिक, मकर व कुंभ वाल्यांनी लग्न टाळावे.
वृश्चिकवाल्यांनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशीचा जोडीदार टाळावा.
3 Mar 2013 - 7:26 pm | सूड
>>सिंह राशीवाल्यांनी मेष, मिथुन, वृश्चिक, मकर व कुंभ वाल्यांनी लग्न टाळावे.
म्हणजे सिंह वाल्याला सिंहीण चालू शकते असं म्हणायचं का?
3 Mar 2013 - 8:14 pm | श्रीगुरुजी
>>> म्हणजे सिंह वाल्याला सिंहीण चालू शकते असं म्हणायचं का?
नक्कीच. आणि सिंहवालीला सिंह चालेल.
4 Mar 2013 - 8:25 am | ५० फक्त
अजुन एक वादाची ठिणगी, -
बायकांच्या राशींची नावं बायकी का नसतात - म्हणजे सिंहीण,वृषभिण वगैरे ?
4 Mar 2013 - 11:53 am | आदूबाळ
कारण "कन्यीण" असं म्हटलं की द्विरुक्ती होते. :)
28 Feb 2013 - 4:53 pm | प्रियाकूल
शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात कन्या रास म्हणजे संशय कल्लोळ असचं होतं. पण बाकीचे काही गुण त्यात स्पष्ट नव्हते केले. एखाद्या राशीचे गुण आणि दोष दोन्ही सांगायला हवेत ना.
3 Mar 2013 - 7:27 pm | सूड
'उपाध्ये' म्हणायचंय का तुम्हाला?
28 Feb 2013 - 4:55 pm | बॅटमॅन
का हो उगा राशीला लागताय लोकांच्या, मुळात ज्योतिष हे शास्त्र तर आहे की नै काय माहिती.
28 Feb 2013 - 7:24 pm | प्रकाश घाटपांडे
या ज्योतिषाच काय करायच हे ठरवले मग सोप आहे.
28 Feb 2013 - 5:02 pm | बाळ सप्रे
बरं ठीक आहे..
विषय थोड्या खेळकर अंगाने मांडलाय.. पण हे "काथ्याकूट"मध्ये का टाकलय?? चर्चा कशावर अपेक्षित आहे??
28 Feb 2013 - 5:07 pm | NiluMP
शाळा काॅलेजातील ग्रह-तारांचे शिक्षण
आता मला व्यर्थ वाटू लागले
जेव्हा कळले आकाशातील ग्रह-तारे
भुतलावरील मानवाचे भविष्य ठरवू लागले
28 Feb 2013 - 5:16 pm | Mrunalini
अरे वा... मस्तच...
आमच्या दोघांची ही रास मीन आहे... पण आमचे अगदी छान चालु आहे. touchwood.
कधीकधी ह्या मीनच्या स्वभावाचा खुप तोटा होतो.. पण आता त्याला काही उपाय नाही.
28 Feb 2013 - 5:51 pm | पैसा
मनोरंजक. या अंजाजाप्रमाणे काही जोड्यांची उदाहरणे दिलीत तर अजून मजा येईल.
28 Feb 2013 - 6:27 pm | मन१
मिपावरचे काही (कु?)प्रसिद्ध आयडी घेउन त्यांची रास ओळखता/ अंदाज करता येइल का?
28 Feb 2013 - 6:27 pm | नाना चेंगट
गंमतीशीर धागा.
28 Feb 2013 - 11:02 pm | भिकापाटील
आयला नानाला सिग्नेचर दिसली, मला एन्टीक्युटी कवा दिसायची
अवान्तरः धागा रोचक आहे
28 Feb 2013 - 6:57 pm | अनन्न्या
आता काय उपाय?
28 Feb 2013 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले
प्रभु रामचंद्रांची रास कर्क होती ...आता बोला ..
ह्यातलं काय लागु पडंत त्यांना ?
अवांतर : ब्यॅट्या , एकदा करुयाच मॉडेल हे ज्योतिषशास्त्र ....झालच तर ज्योतिषशास्त्रीं ही म्हणवुन घेता येईल ...कसें ;)
28 Feb 2013 - 7:07 pm | बॅटमॅन
लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल ते ;) अन तोंडघशी पडलेत. ५% ची "आत्मविश्वास मर्यादा" ठेवूनसुद्धा काही झाले नाही, बाकी कशाला मग बाता, हो की नै.
28 Feb 2013 - 7:14 pm | प्रसाद गोडबोले
:)
28 Feb 2013 - 7:07 pm | kanchanbari
मी मिथुन आणी भाग्याने लाभलेला स्पष्टवक्ता नवरा सिंह राशीचा. लेख छान आहे
28 Feb 2013 - 7:20 pm | शुचि
मी कर्क अन नवरा तूळ. पण चांगलं जमतं की.
हे तूळ वाले ना भयंकर म्हणजे अतिरेकी संतुलित असतात कसं जमतं ब्वा इतकं संतुलित रहायला? अगदी मत्सर वाटतो. ( आय एन्व्ही चे भाषांतर)
28 Feb 2013 - 7:24 pm | बॅटमॅन
मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य ठरेल इथे असे वाट्टे.
28 Feb 2013 - 7:26 pm | शुचि
अगदी अगदी!!!
28 Feb 2013 - 7:47 pm | शुचि
मेषयोनी, सर्पयोनी वगैरे "योनी" हा काय प्रकार आहे? तसेच देवगण, राक्षसगण वगैरे "गण" हा काय प्रकार आहे? नाडी काय असते?
यावर विस्तृतलेख वाचायला आवडेल.
28 Feb 2013 - 7:49 pm | प्रसाद गोडबोले
शिवाय कृष्णमुर्ति पध्दती विषयीही जाणुन घ्यायला आवडेल.
28 Feb 2013 - 10:42 pm | jaypal
ओ शुचि माय, ओ शुचि मावशी, ओ शुचि मामी, ओ शुचि काकु काय पण बोला पण त्या नाडीला हात घालु नका. ;-). नाही तर सुपरसॉनिक स्पीडने धागे येतील
28 Feb 2013 - 8:08 pm | रेवती
मनोरंजक धागा.
28 Feb 2013 - 8:38 pm | श्रीगुरुजी
क्रिकेट संघातले काही खेळाडू व त्यांची रास बघूया
राहुल द्रविड - मीन रास. सभ्यतेचा अर्क, मीन राशीला अनुसुरूनच द्रविडचा स्वभाव व खेळ आहे. मैदानावर वा बाहेर अत्यंत शांत, कोणत्याही वादात न पडणारा, सरळमार्गी, आक्रमक नेतृत्वाचा अभाव
सेहवाग व सौरभ गांगुली - वृषभ रास. बेधडक व बिनधास्त खेळ, मैदानावर आक्रमक वृत्ती, अरे ला कारे ने प्रत्त्युत्तर देणार. डोक्याला जास्त टेन्शन न देता बिनधास्त खेळ करणार.
सचिन - धनू रास. सरळमार्गी, सभ्य, शिस्तबद्ध, संतुलित, अत्यंत अभ्यासू वृत्ती. कर्णधार म्हणून फार यशस्वी झाला नाही. फारसा आक्रमक नाही. मैदानावर शिवीगाळ, अरे ला कारे म्हणणे टाळणारा.
28 Feb 2013 - 8:51 pm | दादा कोंडके
ज्यतिषविषयक (किंवा सह्यावरून स्वभाव ओळखणार्या) लेखांमध्ये असली असंख्य उदाहरणं वाचली आहेत. हे म्हणजे `(काहीच) मारलेल्या बाणाभोवती गोल काढण्यासारखं आहे. कोणत्याही एका रास माहीत नसलेल्या खेळाडूला घेउन त्याची अमुक-अमुक रास असलीच पाहिजे असं सांगता येइल का?
याच न्यायाने एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?' असं विचारेल.
3 Mar 2013 - 1:33 am | संजय क्षीरसागर
असं विचारेल !
शंभर टक्के! एकदा तुम्ही राशीचक्रात अडकलात की अमुक कोणत्या राशीचा आणि तमुक कोणत्या राशीची हाच नाद लागतो आणि त्या लोकांना आपण त्याच अॅंगलमधनं पाहायला लागतो.
लग्नाच्या बाबतीत तर राशीमधे आणल्या की `माझी रास ही आणि तिची ती' आमचं जन्मात जमणं शक्य नाही असा एकदा पक्का समज करून घेतला की सहजीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा.
हे लोक `एक मजा' या सदराखाली सुरूवात करतात आणि मग लोक या लफड्यावर उपाय सुचवा म्हणून मागे लागतात! त्या उपाध्यांचे कार्यक्रम बघून तर मी चाटच पडलो, काही लफडा झाला की `कर दत्ताची उपासना' (आणि निस्तर तुझं तू)! आरे,... पण दत्तू तू शिरलास कशाला या राशीचक्राच्या भानगडीत?
3 Mar 2013 - 1:49 am | दादा कोंडके
मी सोबत म्हणून फक्त दोनदा उपाध्यांचे कार्यक्रम बघितले. दोन्ही मध्ये अगदी बदल म्हणूनही एक्-दोन किस्से वेगळे नव्हते. मिथून राशीच्या अजोबांचा मोरीच्या दाराला बाहेरून कडी लावण्याचा किस्सा तर डोक्यात जातो.
3 Mar 2013 - 7:37 pm | बॅटमॅन
प्रचंड सहमत. ज्योतिषतिमिरान्वित लोकांचे काय करावे हेच कैकदा कळत नाही.
28 Feb 2013 - 9:19 pm | सूड
नक्षत्रानुसार स्वभावातही फरक पडतो म्हणे. जसं की कर्क - हे अतिशय भोळे, गलिबल, सरळमार्गी हे फक्त पुष्य वाल्यांना लागू होतं म्हणे. आश्लेषा हे बरंचसं नकारात्मक छटा दाखवतं. म्हणजे असं कुठेसं वाचलंय हो!! तुम्हाला आमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असणार.
28 Feb 2013 - 10:10 pm | शुचि
मी पुष्य आहे. हे खरं आहे माझ्याबाबतीत तरी. फार अभिमानाची गोष्ट नाही पण जे आहे ते आहे.
28 Feb 2013 - 9:53 pm | उपास
सगळे जण माझी अमुक अमुक रास सांगताहेत ती चंद्र रास की लग्न रास की इंग्लिश प्रमाणे सूर्य रास?
2 Mar 2013 - 10:07 pm | श्रीगुरुजी
हे स्वभावगुणधर्म चंद्र राशीप्रमाणे आहेत. स्वभावावर लग्न राशीचा देखील काही प्रमाणात प्रभाव असतो.
28 Feb 2013 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या व आध्यात्मिक लोकांची रास. यांच्यात अजिबात आक्रमतता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. यांनी मीन व कर्क राशींचा जोडीदार कधीही निवडू नये. इतर कोणत्याही राशीचा चालेल. हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वरचष्मा सहन करतात व स्वखुषीने आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात.>>> =))
च्यायला...मंजे अता आमाला बिन-कर्काची शोधावी लागणार :-p
4 Mar 2013 - 8:28 am | ५० फक्त
हे जगाला घाबरूनच असतात. -
म्हणुन गाडीवर मांडी घालुन बसतात वगैरे का हो मोदकभाउ.?
6 Mar 2013 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हणुन गाडीवर मांडी घालुन बसतात वगैरे का हो मोदकभाउ.?>>>
आमच्यात सर्व राशींचा समावेश झालेला असल्यानी,आमी कश्यावर बी बसू शकतो... :-p
6 Mar 2013 - 6:47 pm | बॅटमॅन
कुनावर बी बसू शकता तं मग अत्रुप्त कसे काय हो अजूनही =))
(पळा आता मरतंय)
6 Mar 2013 - 7:15 pm | गणामास्तर
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
6 Mar 2013 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
@बॅटवाक्य--कुनावर बी बसू शकता>>> आत्मावाक्य---कश्यावर बी बसू शकतो...
शब्दांची अफरा तफर करणार्या वाघूळशास्त्रींचा कचकावून णिषेध
बॅटमॅन बंदूक आत्मा
6 Mar 2013 - 7:25 pm | सूड
>>आमच्यात सर्व राशींचा समावेश झालेला असल्यानी,'आमी कश्यावर बी बसू शकतो'...
ह्म्म्म, येऊनजाऊन कवी तुम्ही !!
28 Feb 2013 - 11:16 pm | शुचि
हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, मीन) लोक कमालीचे भावनाप्रधान असतात बुवा. कंटाळा येतो त्यांच्या रुसव्याफुगव्याचा. ते वायु रासवाले (मिथुन, तूळ, कुंभ) मस्त ..... एका कानाने ऐकतात, दुसर्याने सोडून देतात, काय रुसणं नाय न फुगणं नाय. आपल्याला वायु रास फार आवडते.
28 Feb 2013 - 11:40 pm | अभ्या..
धन्यवाद धन्यवाद. माझ्या तूळ राशीचं लैच कौतीक चाललय बाबा. ते पण चक्क साडेसातीत सुध्दा. मज्जाय :)
1 Mar 2013 - 1:49 am | मोदक
अभ्या तू पण तूळ काय..?
1 Mar 2013 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा
आपल्याला वायु रास फार आवडते.>>> =)) आपल्यालापण!
1 Mar 2013 - 12:07 am | शुचि
शी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! वायुवास नव्हे वायुरास =))
4 Mar 2013 - 11:21 am | सूड
>>आपल्याला वायु रास फार आवडते.
यांची आणखी एक खासियत ऐकली होती. वायुतत्त्वाच्या राशीची माणसं बातम्या पण वार्यासारख्या पसरवतात. त्यामुळे एखादी बातमी आपल्याला पसरवायची तर आहे, पण ती आपल्या तोंडून सांगायची नाहीये अशी बातमी या तत्त्वाच्या राशीवाल्या मंडळींना सांगावी. वर 'कुणाला सांगू नकोस बरं का !!' असं ही सांगावं. काही दिवसात ती बातमी बर्यापैकी पसरलेली असते. या गोष्टीचा एक दोनदा अनुभवही घेतलेला आहे!! मजा येते. ;)
6 Mar 2013 - 7:39 pm | श्रीगुरुजी
कर्क व मीन राशीत बरेच साम्य आहे. पण काही फरक देखील आहेत. दोन्ही राशी सौम्य, धार्मिक, भिडस्त, दुसर्याला चाकोरीबाहेर जाऊन मदत करणार्या, फारसे नेतृत्वगुण़ नसलेल्या अशा असतात.
पण कर्क रास मीनेच्या तुलनेत खूप भोळी असते. या राशीचे लोक दुसर्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात व सहज फसविले जातात. याउलट मीन राशीचे लोक समजूनउमजून फसवून घेतात. समोरचा माणूस आपल्याशी खोटे बोलत आहे किंवा फसवित आहे हे मीनवाल्यांच्या यांच्या सहज लक्षात येते, पण तरीसुद्धा समोराच्या माणसाची कीव येऊन हे त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतात. एखादी व्यक्ती उधार दिलेले पैसे अजिबात मिळण्याची शक्यता नाही हे यांच्या लक्षात येउनसुद्धा हे त्या व्यक्तिला आर्थिक मदत करतात. हीच व्यक्ती कर्क राशीकडे उधार मागते तेव्हा ही व्यक्ती खरंच गरजू आहे व ती व्यक्ती नक्की आपले पैसे परत करेल या विश्वासावर कर्क व्यक्ती डोळे झाकून त्या व्यक्तीला मदत करतात.
28 Feb 2013 - 11:23 pm | ५० फक्त
आम्ही वृश्चिक, तेंव्हा जपुनच,इथंही काही जणांना अनुभव आला आहेच असो.
1 Mar 2013 - 6:40 am | भिकापाटील
कोणाला कषाचं न बोडकीला केसाचं
=))
2 Mar 2013 - 3:35 pm | श्री गावसेना प्रमुख
हे लोक वर्तमान पत्रात राशीभविष्य छापतात्,ते भविष्य त्याच राशीच्या लाखो करोडो लोकांना लागु कसे काय पडते,
उदा,कुंभ आज तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे,मग सगळ्या कुंभ राशीवाल्यांना लॉटरी लागेल काय्?उत्तर हवे आहे धाग्याकर्त्याकडुन
2 Mar 2013 - 9:06 pm | पिंपातला उंदीर
मी काही काळ वर्तमानपत्रात काम केले आहे. विश्वास ठेवा दैनिक आणि साप्ताहिक भविष्य हे बदलून बदलून च्ापले जातात. म्हणजे आज जे मेष ला आहे ते उद्या कुंभ मध्ये छापले जाते. दैनिकमधले भविष्या वाचून जो माणूस आपला दिवस सुरू करतो तो सगळ्यात महमूर्ख इसम
2 Mar 2013 - 9:56 pm | नन्दादीप
आपण ब्वॉ "ईथून तिथून मिथून"
3 Mar 2013 - 9:21 pm | शुचि
कोटी करुन राशीचा "कोटीबहाद्दर" हा गुण सार्थ केलात. :)