केरळ स्टाईल व्हेजिटेबल स्ट्यू

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in अन्न हे पूर्णब्रह्म
27 Feb 2013 - 8:52 am

kerala style vegetable stew

सामग्री:

१ गाजर, फोडी
१ बटाटा, फोडी
१/२ वाटी हिरवे मटार
१ छोटा कांदा, बारीक चिरलेला
५-६ करी पत्ता
२ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ वेलची
२ लवंगा
१/२ इंच दालचिनी चा तुकडा
३-४ काळे मिरे
१ चमचा तेल
२०० मी लि नारळाचे दाट दूध
मीठ स्वादानुसार

कृती:

- एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला. कांदा मऊसर झाला कि मग बटाटा, गजर आणि मटार घालून झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्या.
- भाज्या शिजल्या कि त्यात नारळाचे दूध आणि मीठ घालून एक उकळी आणा. गरम गरम अप्पम किंवा भात बरोबर सर्व्ह करा.
- अश्याच पद्धतीने चिकन आणि मटण स्ट्यू पण करता येते.

प्रतिक्रिया

रश्मि दाते's picture

27 Feb 2013 - 8:59 am | रश्मि दाते

आवडली रेसेपी,सोपी आहे,ते आपम काय छान दीसत आहेत्,त्याची पण रेसेपी द्या ना पिल्ज

अक्षया's picture

27 Feb 2013 - 10:01 am | अक्षया

छान रेसेपी, सोपी आणि दिसायलाही छान आहे.
नक्की करुन बघणार.
धन्यवाद. :)

गवि's picture

27 Feb 2013 - 10:40 am | गवि

आहा... क्या बात है.

पण.. केरळ स्टाईल मटन स्ट्यू अशी पाककृती देऊन शेवटचं वाक्य "अश्याच पद्धतीने व्हेजिटेबल स्ट्यू पण करता येतो" असं लिहायला हवं होतं.. ;)

बाकी एका दुष्ट क्रूर डायेटिशियनने आम्हांस असले पदार्थ खायला बंदी केली आहे. त्यामुळे नुसते दर्शन घेतो..

रेवती's picture

27 Feb 2013 - 8:30 pm | रेवती

हा हा हा. त्या क्रूर डायेटिशियन बाई तुमची काळजी घेतायत. ;)

५० फक्त's picture

27 Feb 2013 - 10:44 pm | ५० फक्त

नक्की काय झुट बंदी का ....त्या डाएटिशियन दुष्ट आहेत वगैरे.

दिपक.कुवेत's picture

27 Feb 2013 - 1:10 pm | दिपक.कुवेत

मस्त फोटो आणि पाकॄ. पण स्ट्यूला पिवळा रंग कसा आलाय? हळद घातलीये का?

खादाड अमिता's picture

27 Feb 2013 - 8:43 pm | खादाड अमिता

गाजराचा रन्ग उतरलाय

गणपा's picture

27 Feb 2013 - 1:24 pm | गणपा

मस्तच.
स्टयु पेक्षा शेजारी ठेवलल्या आंबोळ्या जास्त भाव खाऊन गेल्यात. ;)

सध्या पथ्याच्या काळात मला हे चालण्यासारखे आहे. घरी गेल्यावर करुन पाहतो..

एकदम भारी! स्ट्यू तर आवडलाच पण अप्पमही लक्ष वेधून घेतायत.

शुचि's picture

27 Feb 2013 - 7:35 pm | शुचि

सोपी व पौष्टीक.

सानिकास्वप्निल's picture

27 Feb 2013 - 7:47 pm | सानिकास्वप्निल

सहज,सोपी व तितकीच देखणी पाककृती :)
आवडली :)

एकदम मस्त... पण सुप सोबत मला त्या अप्पमची सुद्धा पाकृ पाहिजे आहे... बरेच वेळा प्रयत्न केला, पण मला काही केल्या ते स्पॉन्जी अप्पम जमले नाहित.

nishant's picture

27 Feb 2013 - 8:04 pm | nishant

स्ट्यू मस्त दिसतोय... :)

अनन्न्या's picture

27 Feb 2013 - 8:14 pm | अनन्न्या

झकास!!

अधिराज's picture

27 Feb 2013 - 8:46 pm | अधिराज

वा! व्वा!! मस्त!

खादाड अमिता's picture

27 Feb 2013 - 8:47 pm | खादाड अमिता

अप्पम ची पाक्रु.... अम्म्म.. देते न !

पैसा's picture

27 Feb 2013 - 9:11 pm | पैसा

रंगीबेरंगी स्ट्यू आणि जाळीदार आप्पम लै आवडले!

ते अप्पमची जाळी लई म्हणजे लईच भारी आलीय...

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 7:30 am | स्पंदना

सुरेख!

कच्ची कैरी's picture

4 Mar 2013 - 12:04 pm | कच्ची कैरी

सहज आणि सोपी पाककृती ,आणि फोटो तर अगदीच सुरेख !
http://mejwani.in/

इशा१२३'s picture

5 Mar 2013 - 5:43 pm | इशा१२३

सुरेख फोटो!रेसेपीहि छानच...

निवेदिता-ताई's picture

5 Mar 2013 - 8:12 pm | निवेदिता-ताई

मस्त........अप्पम फार फार आवडले..:)

मनीषा's picture

6 Mar 2013 - 8:35 am | मनीषा

छान आहे पाककृती ..

मदनबाण's picture

6 Mar 2013 - 10:33 pm | मदनबाण

मस्त ! :)