शाही मशरुम मसाला

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in अन्न हे पूर्णब्रह्म
24 Oct 2012 - 10:33 am

.

साहित्य-
साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी,
६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल,
मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर
कृती-
बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या.
टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या.
१ कांदा उभा जरा जाडसर चिरा.
सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या.
पळीभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता. ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. मघाचची कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेले मशरुम्स घाला व शिजू द्या.खूप शिजवू नका, मशरुम्स मेण होता कामा नये.हेवी क्रिम घाला.मीठ व साखर घाला.
कोथिंबिरीने सजवा.
शाही मशरुम मसाला तयार आहे.
नान/पराठा/रोटी बरोबर सर्व्ह करा.

.

प्रतिक्रिया

सहज's picture

24 Oct 2012 - 10:49 am | सहज

आहाहा! शाही मश्रुम जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून एखादा केकचा तुकडा मिळणार अश्या दिवास्वप्नात गुंगलो!

वा स्वाती ताई मस्तच... आज संध्याकाळचा हाच मेनु ठरवला होता मी.... आता तुझी पाकृ ट्राय करते... ;)

गणपा's picture

24 Oct 2012 - 1:35 pm | गणपा

येक शेंका.
बटन मश्रूम टीनमधले वापरले तर चालतील काय? फ्रेश नेहमी मिळतातच असे नाही.
पराठा ही तेवढाच टेंप्टींग दिसतोय. त्याची पाकृ कुठाय?

सानिकास्वप्निल's picture

24 Oct 2012 - 2:26 pm | सानिकास्वप्निल

शाही मश्रुम मसाला छानच :)

पैसा's picture

24 Oct 2012 - 2:30 pm | पैसा

लै भारी रंग आलाय. काजू क्रीम घालून म्हणजे खराच शाही प्रकार आहे! मस्त! पराठ्याची पाकृ पण दिलीत तर छान होईल!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2012 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

प्यारे१'s picture

24 Oct 2012 - 4:55 pm | प्यारे१

यम्मी!

रेवती's picture

24 Oct 2012 - 6:52 pm | रेवती

पाकृ मस्तच!फोटू भारी!
तू मला लगेच आमंत्रण दिल्याचे स्वप्न पडले.;)

अनन्न्या's picture

24 Oct 2012 - 7:11 pm | अनन्न्या

छान दिसते आहे पण मशरुमला ऑप्शन काय? ते आवडत नाही म्हणून!

ज्योति प्रकाश's picture

25 Oct 2012 - 12:25 am | ज्योति प्रकाश

मस्तच.

एकदम पाणी सुटल तोंडाला पाहुनच.

मश्रुमची भाजी आपल्याला लयं म्हणजी लयं आवडते ! :) हापिसातल्या मित्रांबरोबर पार्टी-शार्टीला गेल्यावर मश्रुमची भाजी मागवतोच मागवतो.

( मश्रुम सूप प्रेमी) :)

इरसाल's picture

25 Oct 2012 - 10:12 am | इरसाल

माझी पोर मशरुमची भाजी मागवली म्हणजे नुसते मशरुम-मशरुम खावुन ग्रेव्ही राहु देते वर आणखी,औल चाहिए मछ्लुम. हे चालु असते.

कच्ची कैरी's picture

25 Oct 2012 - 1:18 pm | कच्ची कैरी

पाकृ.आणि फोटो दोघही छान आहेत पण घरात मश्रूम कुणाला फारसे आवडत नाही म्हणुन मश्रुमवर फार काही प्रयोग करत येत नाही :( पण ही रेसेपी नक्कि ट्राय करुन बघेल

स्मिता.'s picture

25 Oct 2012 - 1:47 pm | स्मिता.

मश्रूमची भाजी मला आवडते. ही पण भाजी नक्की करून बघेन. पराठासुद्धा मस्त दिसतोय. त्याची पाकृ आधी दिली होती का? नसेल तर तीसुद्धा द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Oct 2012 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान आहे....

प्रभाकर पेठकर's picture

26 Oct 2012 - 8:30 am | प्रभाकर पेठकर

मश्रूम मसाला मस्त दिसतो आहे. अशा प्रकारेही करून पाहिला पाहिजे.

मश्रूम म्हणजे प्रथिनांचे भांडार. आठवड्यातून एकदा तरी खावेतच.

पराठा रेडीमेड (फोजन) दिसतो आहे. (सबब, पाककृती नसावी).

प्रभाकर पेठकर's picture

26 Oct 2012 - 8:32 am | प्रभाकर पेठकर

पराठा रेडीमेड (फोजन) दिसतो आहे

मला फ्रोझन म्हणायचे आहे.

बॅटमॅन's picture

26 Oct 2012 - 12:12 pm | बॅटमॅन

हात्तेचायला कस्लं भारी दिस्तंय!!!

स्वाती, सानिका, मृणालिनी, रेवती, अनघा आपटे, अनन्न्या, नूतन, Pearl, स्नेहांकिता, पियुशा
वगैरे वगैरे अन्नपूर्णादेवींना,

दंडवत, दंडवत, दंडवत...

अगदी अस्साच सैपाक करू शकणारी एखादी कन्यका आहे का पाहण्यात? नाही म्हणजे तुमच्या इतके नाही तरी चविष्ट जेवण बनवता आले पाहिजे. नाहीतर एक काम करा. ऑनलाईन क्लासेस घ्या. मी माझ्या सर्व भूपू व सांप्रत मैत्रिणींची नावनोंदणी करवून देतो. मग एक रिअलिटी शो करू. तुम्ही सगळ्या परीक्षिका. जी जिंकेल ती मलाही जिंकेल. काय? हेहेहेहेहे!!!

जाऊ दे. स्वयंपाक करता आला पाहिजे ही अट ठेवली तर आजन्म ब्रह्मचारी राहायची पाळी येईल. लेकिन अपुन जब भी लग्न करेंगा तब हर झगडे के बाद मिपा खोलेंगा आउर आप मॅडम्स की पाकृ बायको को दिखायेंगा आउर बोलेंगा, "बघ, बघ जरा... याला म्हणतात स्वयंपाक! नाही तर तू!! तू केलेला हा पेरूचिक्कू वग्रै देशांचा नकाशा तू मला पोळी म्हणून खायला घालतेस?" आउर उसको गप्प करायेंगा. बस उसकू पेठकर काका आउर गणपा जैसे सर्स लोगोंकी पाकृ कभी नही दिखायेंगा. नाहीतर ती मला काकांच्या क्लासला पाठवायची... आणि आपल्या ह्या गंडाबंद शिष्याला शिकवता शिकवता काकांना वाटायचं कुठून झक मारली आणि मिपावर पाकृ टाकली... ;) ;)

सोप्पय, तुम्हीच शिका स्वयंपाक. अगदी तुमच्या मनाला येईल तशी चव जमेपर्यंत आम्ही हवी ती मदत करू. ;)

एस's picture

28 Oct 2012 - 11:43 pm | एस

दस्तुरखुद्द रेवतीताईंनी आम्हांला शिष्य करून घेतले आहे. बास्स्स्स...

सुरुवात पोळीपासून करू. एकदा पोळीची रेसिपी टाका ना. (नाहीतर मला व्यनि करा. मी माझी पहिली पाकृ म्हणून इथे टाकून देतो. ;) बादवे, आमच्यासारख्या हौशेगवशे आणि नवशिक्या बल्लवविद्यार्थ्यांसाठी मिपावर नवीन शिकाऊपाकृविभाग सुरू करावा अशी मालकांना जोरदार शिफारस करत आहे...)

नावातकायआहे's picture

28 Oct 2012 - 1:48 am | नावातकायआहे

क्लास!

श्या...
त्रास आहे नुसता!

शुचि's picture

27 Feb 2013 - 3:41 am | शुचि

सिंपली सुपर्ब!