भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
20 Feb 2013 - 4:09 pm
गाभा: 

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते. तसेच ते ज़ीया ना भुट्टो यांच्याबद्दल पण होते.त्यानी भुट्टो यांच्यावर निरनिराळे आरोप लावून त्याना मृुत्यदंड मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले. जवळचे मित्र असल्याने त्याना भुट्टो ना तुरुंगात जाउन भेटण्याची परवानगी लगेच मिळाली. भुट्टो हे तसे प्रचंड भारत विरोधक. १९७१ च्या युध्ाच्या वेळेला युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. इंटरनेट वर त्या भाषणाच्या क्लिप्स पण उपलब्ध आहेत. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टो यानी मोदी याना सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय सांसदीय लोकशाहीची खिल्ली उडवायला आवडत. पण हे सांसदीय लोकशाहीच भारताच बलस्थान आहे. तुमच्या संसदेत नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. या लोकशाहिमुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय लोकशाहीला दिलेली ही एक सलामीच.

हा किस्सा पुन्हा आठवायचे कारण म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानी लोकांकडून हीच प्रतिक्रिया क्वेटा मध्ये झालेल्या भीषण बॉम्बबलास्ट नंतर ऐकायला मिळाली. मी http://www.defence.pk/ या पाकिस्तानी संस्थळाचा सदस्य आहे. हे एक डिस्कशन फोरम आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत असत. जरी हे पाकिस्तानी संस्थळ असल तरी इथे कुणीही चर्चा करू शकत असल्याने अनेक राष्ट्रियत्वाचे लोक मेंबर आहेत. भारतीय, चिनी, बांगलादेशी, अमेरिकन, युरोपियन, आणि अगदी विएतनाम चे पण नागरिक पण विविध विषयांवर इथे आपली मत देत असतात. पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता. पाकिस्तान च्या राष्ट्रीय धोरणांवर पण टीका करू शकता. (अवांतर- याच धर्तीवर एक भारतीय डिस्कशन फोरम पण आहेत. पण बहुतांशी संस्थळ ही अती उजव्या व आक्रमक भारतीय राष्ट्रवादचा पुरस्कार करणार्यांकडून कडून चालवली जातात. त्याना सोयीस्कर तेवढीच मत तिथ स्वीकारली जातात. वेगळी मत असणारी लोक तिथे स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे निष्पक्ष चर्चा होण्याला मर्यादा पद्तात.त्यामुले अनेक संतुलित विचार करणारे भारतीय पण या फोरम पेक्षा पाकिस्तान डिफेन्स फोरम ला पसंती देतात.) सार्वजनिक संस्थळ असल्याने अनेक भारतीय व पाकिस्तानी कट्टर पंथीय पण तिथे धुमाकूळ घालत असतात. पण त्याचबरोबर अनेक देशामधले विचारवंत, मुत्सद्दी, निवृत्त लष्करी अधिकारी पण आपली अभ्यासू मत देत असतात. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांचा पण समावेश आहे. सध्या पाकिस्तान मध्ये जे काही चालू आहे त्यामुळे या विचारवंतामध्ये अस्वस्थ विचारमंथन चालू आहे. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला भारत आज अनेक समस्या शी लढत इंच इंच पुढे जात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाचाच लढा लढत आहोत ही वस्तुस्थिती या 'Intellectuals' ना अस्वस्थ करत आहे. परवा क्वेटा इथे बॉम्बस्फोट होऊन ८४ शीया मारले गेल्यावर या अस्वस्थेचा स्फोट झाला. आणि या स्फोटा बद्दल भारताला जबाबदार धरणार्‍या काही पाकिस्तानी मेंबेर्स ला एका सीनियर पाकिस्तानी डिप्लोमॅट ने धारेवार धरले आणि भारतीय लोकशाही बद्दल झुल्फीकार अली भुट्टो च्या जवळ जाणारे हेच मत मांडले.

मात्र कट्टर राष्ट्रवादाचे चष्मे चढवून इथे येणार्‍या प्रत्येकाला सावधानतेचा इशारा. वर्षानुवर्ष आपण जपलेली काही ऐतिहासिक भ्रम इथे चकनाचुर होऊ शकतात. काय आहेत हे ऐतिहासिक भ्रम. १९६५ च युद्ध खरच आपल्याला सांगितल्या गेल तास आपण क्लीन स्वीप करून जिंकल होत का? का इतर आंतरराष्ट्रीय माध्यमानी या युध्ाला स्टेल मेट (म्हणजेच बरोबरीत सुटलेल युद्ध) ठरवल होत? कारगिल युद्ध खरच वाजपेयी सरकारने ढोल बडवाल्याप्रमाणे महान राष्ट्रीय विजय होता का सरकार आणि लष्कर यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा कारगिल युद्ध हा परिपाक होता? टाइगर हील जवळील पॉइण्ट ५३५३ हे शिखर अजुन पण पाकिस्तान च्या ताब्यात आहे. जर आपण हे युद्ध जिंकल असु तर हे शिखर अजुन पाकिस्तांन च्या ताब्यात का? कारगिल मध्ये नेमके किती जवान धारतीर्थी पडले? प्रश्न आणि नवीन प्रश्न. भारतासारख्या लोकशाही देशात जिथे मुक्त माध्यम आहेत त्या देशात पण राष्ट्रवादाचे ढोल बडवत सत्याचा कसा लोप केला जातो हे समजल्यावर मन खिन्न होत.

अजुन एक महत्वाच म्हणजे अनेक भारतीय मुस्लिम या संकेतस्थळावर भारत हा कसा सेक्युलर देश आहे हे हिरीरीने मांडत असतात. समाजातल्या एका 'brainwashed' हिश्श्याने या समाजाला कधीच 'पाकिस्तानी' असे घोषित करून वाळत टाकले आहे तरी पण ते हिरीरीने आपल्या देशाची बाजू मांडत असतात हे विशेष.

आपल्या जखमेवर मीठ शिंपडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे. पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. ही तथ्य कळली की भारताने संसदेवरील हल्ल्यानंतर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तान ला का प्रत्युत्तर दिले नाही हा प्रश्न पडेनासा होतो.

अस म्हटल जात की प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. तुमची, समोरच्याची आणि सत्याची. डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारायच का राष्ट्रवादाचा काळा चष्मा लावून त्याकडे बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

प्रतिक्रिया

प.पु.'s picture

20 Feb 2013 - 6:04 pm | प.पु.

पॉइंट ५३५३ विषयी एका निवृत्त लष्करी अधिकार्‍याने माहिती दिलेला हा लेख - दुवा

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 9:16 pm | पिंपातला उंदीर

लिंक बद्दल धन्यवाद

पैसा's picture

20 Feb 2013 - 6:18 pm | पैसा

http://www.ndtv.com/article/india/how-14-000-crore-budget-cuts-will-affe...

याचं काय? सैनिकांच्या पगारात पण कट?

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 9:04 pm | पिंपातला उंदीर

सहमत : )

आदूबाळ's picture

20 Feb 2013 - 7:00 pm | आदूबाळ

अमोलः

भारताची लोकशाही वंद्य आहे, मात्र लष्कर कमकुवत आहे असा काहीसा या लेखाचा सूर वाटला.

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 8:54 pm | पिंपातला उंदीर

मित्रा तसे नाही. आपली राजकीय इच्छाशक्ती कमकुवत आहे त्यामुळे लष्कर कमकुवत आहे असे म्हणुएात हवे तर. भारतीय लष्कर हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. आपण पाकिस्तान कडे बघितले तर कळेल आपल्या लष्कराने लोकशाही संवर्धनात किती मोठा वाटा उचलला आहे ते : )

आपली राजकीय इच्छाशक्ती कमकुवत आहे त्यामुळे लष्कर कमकुवत आहे

१००% सत्य ... अन्यथा युद्ध-खेरीज ब्रेन ड्रेन , भ्रष्ठाचार , गरिबी यासारख्या किती तरी गोष्टींवर सहज विजय मिळवता आला असता ..

केवळ मोबाइल वरुनच नेट अ‍ॅक्सेस असल्याने आधीच स्लो स्पीड असताना पुन्हा नुसताच दुवा कशाबद्दल आहे हे समजायला कठीण जातेय. असो, तुमचा दुवा मात्र अतिशय अभ्यासपुर्ण व वाचनीय आहे. धन्यवाद.

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 9:06 pm | पिंपातला उंदीर

आभारी आहे. http://www.defence.pk/ जॉइन करा नक्की : )

आपल्या जखमेवर मीठ शिंपडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे.
आणि
तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे
या बद्धल अधिक सांगाल का ?

जाता जाता :---
पाकड्यांच्या मिसाईल कार्यक्रमा बद्धल वाचायचे असेल तर इथे रोचक माहिती मिळेल.

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 9:08 pm | पिंपातला उंदीर

थोडा वेळ द्या. नक्की दुआ देतो : )

पिंपातला उंदीर's picture

21 Feb 2013 - 9:23 am | पिंपातला उंदीर

@मदन बाण

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/nimittamatra/entry/%E0%A4%B...

SUNDAY TIMES, London, September 19, 1965.

"Pakistan has been able to gain complete command of the air by literally knocking the Indian planes out of the skies if they had not already run away.
Indian pilots are inferior to Pakistan's pilots and Indian officer's leadership has been generally deplorable. India is being soundly beaten by a nation which is outnumbered by a four and half to one in population and three to one in size of armed forces".

Peter Preston, The Guardian, London.
September 24, 1965.

"One thing I am convinced of is that Pakistan morally and even physically won the air battle against immense odds.
Although the Air Force gladly gives most credit to the Army, this is perhaps over-generous. India with roughly five times greater air power, expected an easy air superiority. Her total failure to attain it may be seen retrospectively as a vital, possibly the most vital, factor of the whole conflict.
Nur Khan is an alert, incisive man of 41, who seems even less. For six years until July he was on secondment and responsible for running Pakistan civil airline, which in a country, where now means sometime and sometime means never, is a model of efficiency. He talks without the jargon of a press relations officer. He does not quibble about figures, immediately one has confidence in what he says. His estimates proffered diffidently, but with as much photographic evidence as possible, speak for themselves. Indian and Pakistani losses, he thinks are in something like the ratio of ten to one.
"The Indians had no sense of purpose, the Pakistanis were defending their country and willingly taking greater risks. The average bomber crew flew 15 to 20 sorties. My difficulty was restraining them, not pushing them on".
" This is more than nationalistic pride. Talk to the pilots themselves, and you get the same intense story".

Patrick Seale, The Observer, London.
September 12, 1965.

"Pakistan's success in the air means that she had been able to deploy her relatively small army___ professionally among the best in Asia___ with impunity, plugging gaps in the long front in the face of each Indian thrust.
By all accounts the courage displayed by the PAF pilots is reminiscent of the bravery of the few young and dedicated pilots who saved this country from Nazi invaders in the critical Battle of Britain during the last war".

Roy Meloni, Correspondent of ABC,
September 15, 1965.

"I have been a journalist now for 20 years and want to go on record that i have never seen a more confident and victorious groups of soldiers than those fighting for Pakistan right now.
"India is claiming all out victory, i have not been able to find any trace of it. All i can see are troops, tanks and other war material rolling in a steady stream towards the front.
If the Indian Air Force is so victorious, why has it not tried to halt this flow?
The answer is that it has been knocked from the skies by Pakistani planes. These Muslims of Pakistan are natural fighters and they ask for no quarter and they give none.
In any war, such as the one going on between India and Pakistan right now, the propaganda claims on either side are likely to be startling, but if i have to take bet today, my money would be on Pakistan side.
Pakistan claims to have destroyed something like one third of the Indian Air Force, and foreign observers, who are in a position to know say that the actual kills may be even higher, but the PAF authorities are being scrupulously honest in evaluating these claims. They are crediting PAF only those killing that can be checked and verified from other sources.

Everett G Martin, General Editor, Newsweek,
September 20 1965.

"One point particularly noted by military observers is that in their first advances the Indians did not use Air power effectively to support their troops. By contrast, Pakistan, with sophisticated timing swooped in on several Indian bases and destroyed dozens of planes without any resistance from the Indians.
By the end of the week, it was clear that the Pakistanis were more than holding their own".

INDONESIAN HERALD,
September 11 1965.

"The chief of Indian Air Force could no longer ensure the safety of Indian air space. A well known Indian journalist, Frank Moraes, in a talk from All-India Radio also admitted that Indian Air Force had suffered severe losses and it was no use hiding the fact and India should be prepared for more losses.........".

दादा कोंडके's picture

20 Feb 2013 - 7:47 pm | दादा कोंडके

सुधीर काळे यांना पण या फोरमचा पत्ता द्या. :)

पुढच्या भागाची वाट बघतोय.

बाकी धक्का वगैरे काही बसणार नाही. प्रचंड लोकसंख्येने युद्ध जिंकायचे दिवस गेले. उगाच किड्यामुंग्याच्या संख्येने असणारे सैनिक आहेत म्हणून जगात लंबर लाउन सैन्य बळ मोजूच नये. प्रगत आणि मुख्य म्हणजे कमितकमी परावलंबी तंत्रज्ञान, युद्धसामग्री, शिस्त, प्रामाणिक आणि मुत्सद्दी नेते यांच्यामुळे युद्धं जिंकली जातात. भारतात मिडीया पासून पोलिसखात्यापर्यंत बजबजपुरी असताना सैनिक काय मंगळावरून पडले आहेत का?

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 8:58 pm | पिंपातला उंदीर

दादा सहमत. अफगाणिस्तान मधल अमेरिका च अपयश डोळ्यात भरत आहे की

राही's picture

20 Feb 2013 - 8:20 pm | राही

युद्धतंत्र अथवा रणनीती याबद्दल फारसे माहीत नाही.पण १९६५ च्या युद्धात आपण कश्मीरमधील छम्ब हे सुंदर आणि हिंदुबहुल खेडे गमावले हे खरे.पाकिस्तानी फौजांनी रणगाड्यांच्या साहायाने ही लढाई जिंकली. अखनूर वाचवण्याच्या प्रयत्नात छम्बवर पाणी सोडावे लागले.आकाशातून वायुदलाची कुमक उशीरा आली आणि पाकिस्तानी सेबर जेट्स पुढे आपले काही चाललेही नाही. उलट आपल्या वायुहल्ल्यामुळे आपल्याच रसदीचे आणि पायदळी कुमकेचे नुकसान झाले.पुन्हा १९७१ मध्येही ह्याचीच पुनरावृत्ती झाली. मला वाटते पाकिस्तानला जिंकलेल्या छम्ब चा ताबासिमला करारान्वये सोडावा लागला होता.(या बाबत अधिकृत माहिती कुणी देईल काय?)१९७१ मध्येही याच रणनीतीने आपण छम्ब कायमचे गमावले. १९४८ मध्येही कश्मीरमध्ये आपली पीछेहाट होत होती असे वाचले आहे.

बाबा पाटील's picture

20 Feb 2013 - 8:44 pm | बाबा पाटील

कुठल्याही युध्दात निखळ विजय हा कधीच मिळत नसतो,थोडीफार हानी ही उभय बाजुंची होत असते,मागच्या तिन्ही लढायांच फलित म्हणजे,पाकिस्तानचे दोन तुकडे झालेत्,व १९७२ नंतर पाकिस्तानची उघड लढाईची हिंमत झाली नाही. इतिहासात मुघलांचे प्रचंड साम्राज्य होते,पण दख्खनच्या छाव्यांनी ते लयास मिळवले, त्यामुळे कुना कडे किती युध्द सामुग्री आहे पेक्षा कुनाच्या सैन्यात किती जिगर आहे हे युध्द नितीत महत्वाचे ठरते,दुसर म्हणजे प्रत्यक्ष लढाइत भारतीय अधिकारी स्वतः पुढे राहुन नेतृत्व करतात तर पाकिस्तानी मागुन आणी दोन्ही सैन्यातला मुख्य फरक हाच आहे

पिंपातला उंदीर's picture

20 Feb 2013 - 9:15 pm | पिंपातला उंदीर

पण तुम्ही असे सरसकटीकरण करू शकत नाही. कारगिल युद्धापूर्वी मुशराफ्फ स्वताहा LOC क्रॉस केली होती व भारतीय हद्दीत एक रात्र घालवली होती. भारतीय अधिकारी स्वाताहा नेतृत्व करतात ही गोष्ट खरी पण पाकिस्तानी अधिकारी पण तेवढेच प्रोफेशनल आहेत.
.
१९७१ च युद्ध आपण निर्विवाद जिंकल होत. पण १९६५ आणि कारगिल युद्धाबद्दल तस म्हणता येईल का ?

होय आपण ही ४ ही युध्दे जिंकली आहेत.कमी पडतात त्या युध्दोत्तर वाटाघाटी....

अग्निकोल्हा's picture

20 Feb 2013 - 8:49 pm | अग्निकोल्हा

पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता.

अवश्य मेंबर बनल्या जाइल.

अर्धवटराव's picture

20 Feb 2013 - 9:55 pm | अर्धवटराव

राष्ट्रवादाला काळा चश्मा म्हणणे म्हणजे राष्ट्रवाद अजीबात न कळणे.
कुठल्याही घटनेच्या ज्या तीन बाजु लेखात मांडल्या आहेत (तुमची, माझी, व सत्याची) त्यातली सत्याची बाजु हि राष्ट्रवादाचा आत्मा आहे.

राष्ट्रवाद म्हणजे आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारुन राष्ट्रकल्याणाचा एकमेव वन-वे मार्ग अवीरत चोखाळणे.

अर्धवटराव

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2013 - 10:33 pm | श्रीगुरुजी

या लेखाचा उद्देशच समजला नाही. तरी काही वाक्यांवर मी मतप्रदर्शन करू इच्छितो.

>>> १९६५ च युद्ध खरच आपल्याला सांगितल्या गेल तास आपण क्लीन स्वीप करून जिंकल होत का? का इतर आंतरराष्ट्रीय माध्यमानी या युध्ाला स्टेल मेट (म्हणजेच बरोबरीत सुटलेल युद्ध) ठरवल होत?

युद्ध जिंकणे याचा नक्की अर्थ काय होतो. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा संपूर्ण पराभव होऊन जर्मनीवर तहाच्या अटी लादल्या गेल्या होत्या. मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजी महाराजांविरूद्ध युद्ध जिंकून अनेक किल्ले मिळविले होते व महाराजांना काही शर्ती मान्य कराव्या लागल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर १९४७ ची युद्धे पाहिली तर, १९४८ चे युद्ध संपूर्ण काश्मिर खोरे मिळविण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने आपल्यावर लादले होते व शेवटी पाकिस्तानला तत्कालीन काश्मिर प्रदेशाचा अंदाजे ४५ टक्के भूभाग मिळविता आला. भारताने ५५ टक्के भाग वाचविला हा भारताचा विजय मानावा का पाकिस्तानने निदान ४५ टक्के भूभाग तरी घशात घातला हे पाकिस्तानचे यश मानावे हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. माझ्या यात पाकिस्तानचा निर्णायक विजय नसला तरी निदान आपले ४५ टक्के उद्दिष्ट तरी पूर्ण झाले.

१९६५ मध्ये पाकिस्तानने पुन्हा युद्ध सुरू केले व काही दिवसानंतर ते थांबवावे लागले. यात दोन्ही बाजूंना आपल्या ताब्यात असलेला कोणताही भाग गमवावा लागला नाही. दोन्ही बाजूंची मनुष्यहानी झाली. म्हणजे पाकिस्तानचा पराभव झाला, पण भारताचा विजय झाला असे म्हणता येणार नाही, कारण युद्ध भारताने सुरूच केले नव्हते.

१९७१ साली मात्र पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला व भारताचा निर्णायक विजय झाला होता.

>>> कारगिल युद्ध खरच वाजपेयी सरकारने ढोल बडवाल्याप्रमाणे महान राष्ट्रीय विजय होता का सरकार आणि लष्कर यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा कारगिल युद्ध हा परिपाक होता?

१९९९ मध्ये भारताच्या काही भागांवर पाकिस्तानने अतिक्रमण केल्यानंतर भारताने हल्ले करून त्यांना हाकलून लावून आपला भाग परत मिळविला. हा माझ्या दृष्टीने विजयच आहे.

>>> टाइगर हील जवळील पॉइण्ट ५३५३ हे शिखर अजुन पण पाकिस्तान च्या ताब्यात आहे. जर आपण हे युद्ध जिंकल असु तर हे शिखर अजुन पाकिस्तांन च्या ताब्यात का?

ही माहिती मला नवीन आहे.

>>> कारगिल मध्ये नेमके किती जवान धारतीर्थी पडले?

सरकारी आकड्यानुसार कारगिलमध्ये भारताचे अंदाजे ४०० व पाकिस्तानचे अंदाजे १००० जवान मृत्युमुखी पडले. भारताचे ४०० जवान हे भारतासाठी लढताना मृत्युमुखी पडले.

१९८७-१९८९ या काळात भारताचे अंदाजे १२०० जवान तिसर्‍याच देशासाठी (श्रीलंकेतील शांतिसेना) मृत्युमुखी पडले. हा प्रकार जास्त वाईट होता.

पिंपातला उंदीर's picture

21 Feb 2013 - 9:30 am | पिंपातला उंदीर

कृपया वरती मदन बाण याना उत्तर देताना काही लिंक दिल्या आहेत त्या बघावयात. पॉइण्ट ५३५३ बद्दल ही लिंक बघा.

http://www.infa.in/index.php?option=com_content&task=view&id=1631&Itemid=38

शैलेंद्रसिंह's picture

20 Feb 2013 - 10:37 pm | शैलेंद्रसिंह

अनेक हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत नाही, भारताची स्वतःची अशी उदारमतवादी संस्कृती गेल्या ६० वर्षात उदयास आलेली आहे. ह्या उदारमतवादी संस्कृतीचे आक्रमण मिडीया, सिनेमा, इंटरनेट द्वारा पाकिस्तानवर करणे हाच तिथल्या कट्टरतावादावर उपाय आहे. शीतयुद्धात जेव्हा कम्युनिस्टांच्या विळख्यात रशिया होता, तेव्हा त्याचा पाडाव लष्करी मार्गाने झाला नव्हाता. तो अशाच सांस्कृतिक आक्रमणाने झाला होता. उदारमतवादी लोकशाही हा आपल्या संस्कृतीचा भाग बनला आहे. पाकिस्तानी जनतेला तिथल्या इस्लामी कट्टरवाद्यांविरुद्ध लढायची इच्छा निर्माण झाली तर ते उपखंडाच्या राजकारणात मोठा बदल घडुन आणेल आणि ते भारताच्या हिताचा ठरेल. आपल्याला आपले सांस्कृतिक आक्रमण अधिक तीव्र करावे लागेल हे मात्र नक्की.

लष्करी युद्धं आता कारगिल सारखीच छोट्या स्केलचीच असतील, कोणालाही मोठे युद्ध परवडणारं नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता फ़ार काळ चालणारं मोठं युद्ध आपल्याला परवडणारं नाही. पण एक समोरच्यावर धाक निर्माण करण्याइतपत लष्करी शक्ती बाळगावीच लागेल. दुर्दैवाने भारताने ती शक्ती बाळगलेली नाही. खरंतर चीनशी बरोबरी करायला हवी, पण सध्या पाकिस्तानला मॅच करतांनाही आपली दमछाक होतेय. पाकिस्तानही त्यांच्या बजेटच्या १०-१५% डिफ़ेंसमधे खर्च करतोय निव्वळ भारताला मॅच करता यावं म्हणुन. त्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे. भारताने डिफ़ेंसवर किती खर्च करावा ह्याचं बरोबर उत्तर असं नाहीयेच, आपल्या थिंकटॅंकला तो निर्णय घ्यायचाय. सध्यातरी आपण आर्थिक प्रगतीला महत्व देतोय.

पिंपातला उंदीर's picture

21 Feb 2013 - 9:31 am | पिंपातला उंदीर

एकदम मान्य.

नाना चेंगट's picture

20 Feb 2013 - 10:45 pm | नाना चेंगट

या विचारवंतांचं काय करावं?
भारतावर गरळ ओकल्याशिवाय यांना चैनच पडत नाही का?
खाल्ल्या ताटात हागणारी येडझवी जमात

बाबा पाटील's picture

20 Feb 2013 - 10:52 pm | बाबा पाटील

असल्या रड्यांकडुन दुसरी अपेक्षा तरी काय ठेवाणार....

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2013 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी सगळं ठीक पण एकूणच ६५च्या युद्धाबद्दल म्हणायचं असेल तर ते युद्ध आपण जिंकलं असंच मी माझ्या पुढच्या पिढीला शिकवेन. प्रत्येक युद्धात पराक्रमी सैनिक दोन्ही बाजूनी लढत असतात कुठेतरी शत्रू सैनिकही अधिक पराक्रमी असतात, मान्य. पण माझ्या लोकांचे मनोबल टिकवण्यासाठी, उंचावण्यासाठी मी कायम आपल्या पराक्रमी सैनिकांचाच उल्लेख करेन. जर मी लष्करी अधिकारी असतो तर तथाकथित स्टेल मेटचा अभ्यास करून तो डाव परत अशी संधी आली तर तो डाव आपला म्हणून कसा पडेल हे बघितले असते. शेवटी जगातली कुठलीही गोष्ट बघताना मी भारतीय म्हणून प्रत्येक गोष्ट भारतीय चष्म्यातून बघणंच पसंत करेन. वेळेला भारतीयांनाच झुकतं माप देईन. अतिरेकी सहिष्ण्य्ता ही देखील घातकच असते या मताचा मी आहे.
इत्यलम.

अवांतरः फोरमवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला. हापिसातून बॅन दिसते आहे.

पिंपातला उंदीर's picture

22 Feb 2013 - 9:03 am | पिंपातला उंदीर

मागे एकदा असे वाचनात आले होते की पाकिस्तान वर वर्चस्व ठेवायच असेल तर दोन्हिकडच्या लष्कराच प्रमाण (लष्करी तैयारि, साधनासामुग्री, संख्याबळ या निकषांवर) २:१ असे हवे. मागे वि. पी. सिंग
पंतप्रधान असताना हे प्रमाण ढासालले होते आणि तेंव्हा सिंग यानी त्याबद्दल जाहीर चिंता व्यक्त केली होती. आता पण दारुगोल्याचा अभाव, रात्री लढू शकणार्‍या टॅंक्स चा अभाव आणि प्रलंबित शस्त्र डील्स यामुळे पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण zआलि होती. माजी लष्कर प्रमुखानि ते पदावर असताना मनमोहन सिंघ याना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. लष्कराची परिस्थिती हंकी डॉरी नक्कीच नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 9:08 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही एकच प्रतीसाद सगळीकडे देतात काय?

अवांतरः तुम्ही शस्त्रास्त्रांचे व्यापारी आहात काय्?किंवा त्याचे दलाल.

अजयिन्गले's picture

21 Apr 2013 - 8:42 pm | अजयिन्गले

https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=IjR-vpjGLSA

आनि प्रतिसाद द्या

ओसामा's picture

22 Apr 2013 - 7:43 pm | ओसामा

अमोल,
तु BHARAT-RAKHSAK.COM ह्या संकेत स्थळाबद्दल बोलत आहेस का?

उपास's picture

22 Apr 2013 - 9:10 pm | उपास

एक लक्षात आणून द्यावेसे वाटते की वरील प्रतिसाद आलेल्या नावांमुळे, फिल्टर होऊन मिसळपाव हे संस्थळ वेगळ्या यादीत येऊ शकते, त्यामुळे असे प्रतिसाद संपादकांना उडवता येतील का?
- (हितचिंतक) उपास