राष्ट्रवादीची राजेशाही

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
17 Feb 2013 - 12:51 am
गाभा: 

आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे.
नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते. कारण जाणत्या राजाने नापसंती व संबंधित खरडपट्टीलेल्या माणसाने माफी मागितल्यावरही सोहळ्यांची मालिका अव्याहत चालू आहे.
भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे!
आता हा कंत्राटदार काय हरिश्चंद्र आहे का की उगाचच कोट्यावधी रुपये उधळेल? तो आता पुढच्या कंत्राटात सगळे दामदुपटीने वसूल करणार हे तुम्ही आम्हीही जाणतोच की.
पवार आता मोठ्या साधेपणाच्या गमजा करत आहेत पण त्यांच्या मुलीचा लग्नसोहळाही आलिशान होता असे अंधुकसे आठवते आहे. चुभूद्याघ्या.
इतका अमाप पैसा मिळवणार्‍या आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्र्यांना आपली श्रीमंती मिरवायची दुसरी संधी कुठे मिळणार? उगाच लोकसेवक वगैरे ढोंगे करण्यापेक्षा, होय आम्ही आहोतच पैसेवाले आणि म्हणूनच ते उधळतो आहे हे मान्य करावे झालं. साधेपणा, काटकसर वगैरे कालबाह्य मूल्ये आहेत असे वाटते.
तुमचे काय मत?

प्रतिक्रिया

राज्यकर्त्यांचं जाऊ द्या, हुप्प्याजी!
गरीब म्हणवणार्‍या समाजात तसेही खर्चीक समारंभ करण्याची चढाओढ आहे. पैसे असण्यानसण्याचा संबंध कमी आहे. कर्ज काढून डामडौल करण्याकडे कल आहे. असे असताना जे खरे श्रीमंत (कोणत्या मार्गाने श्रीमंत झालेत हा विषय वेगळा) आहेत त्यांनी खर्च का नाही करायचा? ;) बरय की! आपल्यालाही बातम्या वाचायला मिळतात! :)

अधिराज's picture

17 Feb 2013 - 11:57 am | अधिराज

कर्ज काढून डामडौल करण्याकडे कल आहे

खाने के वांदे और नाश्ते मे रसगुल्ले!

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 2:51 am | श्रीरंग_जोशी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18498811.cms

मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. दोन लाख लोक आले होते. मात्र, मी साधा मांडव देखिल घातलेला नव्हता. फक्त अक्षता आणि एक पेढाच ठेवला होता, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली.

पवार ह्यांची खरे बोलण्याबद्दल फार ख्याती नाही. माझ्या आठवणीप्रमाणे हे लग्नही मोठ्या थाटात झाले होते. कदाचित जाधवांच्या मानाने साधे असे म्हणायचे असेल त्यांना!
कदाचित मला चुकीचे आठवत असेल.

मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. दोन लाख लोक आले होते. मात्र, मी साधा मांडव देखिल घातलेला नव्हता. फक्त अक्षता आणि एक पेढाच ठेवला होता, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली. >>>>

हि हि हि !!

बाकी सुप्रिया चे लग्न साधेपणा ने ( कि लपुन छपुन ? ) का ? का लय वेगळा किस्सा आहे .

( बहुधा जोशी साहेबांना माहीत नसावे की कोणी एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेत ८०% पाटील आडनाव असलेलं ही एक सरकार होवुन गेले. )

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2013 - 11:28 am | llपुण्याचे पेशवेll

अहो पण लपून छपून का? सुळे म्हणजे कायस्थच ना! म्हणजे क्षत्रियच झाले की.

बाळकराम's picture

17 Feb 2013 - 3:17 pm | बाळकराम

माझी एक आते-बहीण आणि सुप्रिया सुळे एकत्र काम करत होत्या एका कंपनीत (बहुधा इन्फोसिस) साधारणपणे १९८९-९० च्या आसपास. माझी बहीण सुप्रियाच्या लग्नाला गेली होती आणि तीने लग्नावरुन आल्यानंतर जे त्याचे वर्णन केले होते त्यावरुन ते लग्न साधेपणाने नक्कीच झालेले नव्हते. शरद पवारांबद्दल कुणाचे काय मत असेल ते असो, पण सुप्रियाबद्दल माझ्या बहिणीचे आणि इतर सहकार्‍यांचे मत मात्र एकदम चांगले आहे- एकदम साधी, सिन्सियर मुलगी होती ती. तिच्या वडिलांबद्दल किंवा राजकारणाबद्दल कधी फारशी बोलायची नाही किंवा वडिलांच्या मोठेपणाचा बडेजाव सुद्धा कधी तिच्या वागण्या-बोलण्यात दिसायचा नाही. त्यामुळे ती पुढे कधी राजकारणात जाईल असे त्यांना वाटले नव्हते. हे अर्थात तिच्या लग्नाच्या आधीच्या वागणूक आणि अनुभवावरुन. पवार फॅमिलीशी आमचा जो काही वैयक्तिक स्तरावर संबंध आला आहे त्यावरुन ती माणसे (अजित पवार सोडून, अर्थात) निदान वागायला आणि बोलायला तरी सरळ आहेत. (विशेषत: तुम्ही निरुपद्रवी या सदरात मोडत असला तर). त्यावागण्या वरुन तरी हे लोक महाराष्ट्रातील सर्वात मोठी माफिया गँग चालवतात हे सकृद्दर्शनी खरे वाटत नाही. (अर्थात, ही वस्तुस्थिती आहे हा भाग अलहिदा). पण आधी म्हटलं तसं हे लोक वैयक्तिक आणि राजकीय संबंध पूर्णपणे वेगवेगळे ठेवतात.

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 7:16 am | श्रीरंग_जोशी

शरद पवारांचा विवाह ठरवून केलेल्या पद्धतीने झाला होता. पहिल्या भेटीच्यावेळी प्रतिभा यांना त्यांनी त्यांची एकमेव अट सांगितली.

'मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने समाजापुढे आदर्श निर्माण करणे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळेच मला एकाहून अधिक अपत्य नको. मग पहिले अपत्य मुलगा असो वा मुलगी'. प्रतिभाताईंनी हि अट मान्य केली व त्यांचा विवाह झाला. सुप्रियाच्या जन्मानंतर पवारांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली.

४५ वर्षांपूर्वीच्या काळात असे काही करणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

रामपुरी's picture

17 Feb 2013 - 8:33 am | रामपुरी

आणि त्या एका अपत्यासाठी येनंकेनं प्रकारेण एवढी माया गोळा करणं हेही तितकंच कौतुकास्पद आहे.
जाता जाता: कोल्हापूरच्या सध्याच्या महाराजांना (कोण मालोजी, शाहू जे असतील ते) राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यासाठी पुण्याच्या आसपासची कित्येक शे एकर जमीन "जाणत्या राजा" ने देणगीदाखल लाटल्याची बोलवा आहे. मगरपट्टा सिटी, लवासा उभारण्यासाठी पैसा येतो तो असा...

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

मगरपट्टा प्रकल्प हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा अत्यंत यशस्वी उपक्रम आहे. इतर राज्येसुद्धा त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवतात.

http://www.esakal.com/esakal/20121110/5281812421416421727.htm

चिंतामणी's picture

17 Feb 2013 - 9:21 am | चिंतामणी

तुम्ही फारच भोळे आहात बुवा.

रामपुरी's picture

17 Feb 2013 - 9:33 am | रामपुरी

पवारांच्या समर्थनासाठी 'सकाळ' ची साक्ष... याला काय म्हणावं? HEIGHT OF INNOCENCE की HEIGHT OF UNAWARENESS की आणखी काही?

खालिल दुव्यावर बरीच माहिती आहे...

http://www.rediff.com/money/2007/jan/11bspec.htm

काळा पहाड's picture

18 Feb 2013 - 1:20 am | काळा पहाड

खिक

सर्वाधिक घोटाळे (आणि त्यात गुंतलेले मंत्री) येन केन प्रकारेण पवार किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधितच कसे काय असतात बुवा?

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Feb 2013 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख

अहो त्यांचा ग्रुहपाठ झालाय्,ते परीक्षा देताय म्हणे(एक सातबारा सम्राट गेले आता ह्यांना रान मोकळे)

विलास अध्यापक's picture

17 Feb 2013 - 11:40 am | विलास अध्यापक

कोल्हापूरच्या राजेंना तिकीट मिळाले ते सातारच्या राजांच्या हट्टामुळे . त्या वेळची वर्तमानपत्रे पहा.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Feb 2013 - 12:16 pm | लॉरी टांगटूंगकर

मागच्या वेळेस उदयनराजेच इकडे तिकडे फिरत होते कि तिकीट द्या.. तिकीट द्या करत, कोल्हापूरचे मंडळी त्यांच्या तुलनेत बरेच चांगले आहेत ..
शिवेंद्रसिंह यांच्याकडे बोलत नसावात

नाना चेंगट's picture

17 Feb 2013 - 11:59 am | नाना चेंगट

जाउ द्या हो तेवढीच इकॉनॉमीला मदत...

अमोल खरे's picture

17 Feb 2013 - 12:04 pm | अमोल खरे

पैसा कोणत्या मार्गाने कमवला ते माहित नाही, पण आता इतका पैसा आहे आणि मुला मुलीचे लग्न आहे म्हणाल्यावर खर्च करणारच ना. माझ्याकडे इतका पैसा असता तर मीही खर्च केला असता. प्रॉब्लेम असा झाला की त्या मंत्र्याचा स्वत:चा बिझनेस वगैरे असता तर त्याला ते जस्टिफाय करता आलं असतं, तो नाही म्हणुन त्याला तो पैसा एका कंत्राटदारा करवी रुट करावा लागला. बाकी लोकं उपाशी आहेत म्हणुन मंत्री त्यांची घरची लग्ने साधेपणाने करतील हा कैच्याकै आशावाद आहे. ह्या लोकांना कसलेही एथिक्स नसतात. माझ्या माहितीत लालबहादुर शास्त्री त्यावेळी बाकी लोकांप्रमाणेच एकदा भात खायचे (भाताची टंचाई होती म्हणे तेव्हा) आणि आता नरेंद्र मोदी दरवर्षी काही खेड्यांमध्ये जाऊन मुलींना शिकवा असं म्हणत घरोघरी जातात. ही दोन उदाहरणे आणि काही कम्युनिस्ट नेते सोडले तर भाजपा / काँग्रेस / शिवसेना / मनसे / राष्ट्रवादी ह्या सर्व पक्षांकडुन इतकी उच्च अपेक्षा ठेवु नये, अपेक्षाभंग होऊ शकतो.

असाच हा प्रकार असावा.

हे वाचा.

चिंतामणी's picture

17 Feb 2013 - 12:06 pm | चिंतामणी

हे वाचा.

फार वर्षापूर्वी शिवसेनेची सत्ता असताना बाळ ठाकरे यांनीदेखील रस्त्यावरील गरीब लोकांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली होती. रीमोट कंट्रोल स्वतःच्या हातात असताना.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2013 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

इनो घ्या !

ज्याची ताकद असेल त्याने कमवावे पैसे आणि उधळावे.

ज्याची ताकद असेल त्याने असे कमवणार्‍यांना रोकावे आणि उधळपट्टी थांबवावी.

उगा वांझोट्या चर्चा....

मन१'s picture

17 Feb 2013 - 2:04 pm | मन१

+१

मन१'s picture

17 Feb 2013 - 2:04 pm | मन१

+१

चिंतामणी's picture

17 Feb 2013 - 2:55 pm | चिंतामणी

प्रश्ण पैशे उधळण्याचा नाही.

सगळ्या जनतेला मुर्ख समजुन मी कसा आहे हे दाखवण्याबद्दल आहे.

आणि हे उघळपट्टी करीत आहेत, त्यांनी पैसे सरळ मार्गाने मिळवले आहे का?

हुप्प्या's picture

17 Feb 2013 - 11:23 pm | हुप्प्या

आपण अशी पिंक टाकाल हे अपेक्षितच होते.
पण इतरांकरता, हे इतके वांझोटे वाटत नाही. सामान्य लोकांना विचार मांडायला शरद पवारांसारखे व्यासपीठ मिळत नाही. पण मिसळपाव हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अनेक क्षेत्रातले लोक इथे उपस्थित असतात.
समजा कुणी राजकीय नेता वा त्याचा सेक्रेटरी वा नातेवाईक अशी संस्थळे वाचत असला तर त्यातून बरेच काही घडू शकते. इंटरनेट हळूहळू एक प्रभावी माध्यम बनते आहे. अमेरिकेत त्याची झलक दिसली भारतातही दिसणे शक्य आहे. निवडणुका जवळ येत असताना असे मुद्दे प्रचारात महत्त्वाची कामगिरी करु शकतात. त्या जाधवाच्या विरोधकाने निवडणुकीच्या प्रचारात ह्या कंत्राटदार पुरस्कृत थाटमाटावर रान उठवले तर निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. किंबहुना ह्यामुळेच पवारांना ह्याबद्दल बोलावेसे वाटले. त्यामागे गरीबांचा कळवळा वगैरे आहे असे मला सुतराम वाटत नाही.

अमेरिका ज्याप्रमाणे एका हातात दंडुका दडवून शांततेच्या गप्पा मारते अगदी तसंच अलिबाबाच्या गुहेवर बसून दारिद्र्य निर्मूलन, दुष्काळ निवारण यावर बोलावे. दुष्काळाचे कारण आपणच आहोत असं जनतेला वाटू नये याची काळजी घ्या, हे आणि इतक्या साध्या साध्या गोष्टी सांगण्यासाठी इतक्या मोठ्या माणसाला आपला वेळ दवडावा लागत असेल तर ते राज्यास लांच्छनास्पद आहे.

आशु जोग's picture

17 Feb 2013 - 3:45 pm | आशु जोग

खटासि खट

अगदी बरोबर

आदूबाळ's picture

17 Feb 2013 - 2:30 pm | आदूबाळ

एक तर

भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे!

हे स्पष्टीकरण देणंच निर्लज्जपणाचा कळस आहे.

यसवायजी's picture

17 Feb 2013 - 3:38 pm | यसवायजी

त्या निमित्ताने तो पैसा मार्केटमधे तर येतो. नाहीतर असाच पडून कुजुन जायचा..
करा म्हणावं काय लग्नं करताय ती..

अवांतरः माझं अजुन लग्न नाही झालं.. अशी स्थळं असतील तर सुचवा.. ;)

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 11:53 pm | श्रीरंग_जोशी

http://pmindia.nic.in/assets2011/Shri%20Sharad%20Pawar%20Minister%20of%20Agriculture%20&%20Food%20Processing%20Industries.PDF

वरील दुव्यावर (भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ) शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे संपूर्ण तपशील आहेत. जवळजवळ पन्नास वर्षे पगार / व्यवसायातले उत्पन्न व गुंतवणुकींद्वारे मिळणारे उत्पन्न बघता एवढी संपत्ती असणे स्वाभाविक आहे.

निवडणूक लढवणार्‍या सर्व व्यक्ती निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील देत असतात. आंतरजालावर वावरणार्‍या अशा सर्व मंडळींना जे राजकारणात असणार्‍यांच्या संपत्तीबाबत पाहिजे तसे दावे करत असतात; नम्र सूचना आहे की आपल्याकडे असलेल्या माहितीचे पुरावे गोळा करून आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालयाकडे वगैरे तक्रार करावी.

तेथे कारवाई न झाल्यास खुशाल बॅ. नाथ पै चौकासारख्या सार्वजनिक स्थळी प्रशासनाची संमती घेऊन उपोषणास बसावे.

असले काही न करता कुणाच्याही संपत्तीबाबत अवाजवी दावे करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की भारतीय कायद्यांनुसार ते कायदेशीर कारवाईस पात्र असतात.

भाजपचे पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यावर माध्यमांत आरोप केल्यावर विलासरावांनी त्यांच्यावर अब्रुनूकसानीचा दावा केला होता. न्यायालयात भातखळकरांना एकही आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची वेळ आली होती. त्यावेळी त्यांनी विलासरावांची माफी मागितली व विलासरावांनी मोठ्या मनाने माफ केले व दावा मागे घेतला.

यसवायजी's picture

18 Feb 2013 - 12:02 am | यसवायजी

म्हंजे काय?

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2013 - 12:13 am | श्रीरंग_जोशी

स्वतःच्या मालकीची गाडी नाही...

यसवायजी's picture

18 Feb 2013 - 12:24 am | यसवायजी

मला पण असंच वाटलं.. पण म्हटलं, कन्फर्म करावं..
खरं खोटं साहेब जाणे.. ;)

काळा पहाड's picture

18 Feb 2013 - 1:17 am | काळा पहाड

वीस वर्षांपूर्वी साहेब 'स्वतःच्या नसलेल्या' पजेरोत फिरत होता. सध्या 'स्वतःच्या नसलेल्या' हेलिकॉप्टर मधून फिरतो. स्वतःचे पंचशील मधे नसलेले शेअर विकतो. स्वतःच्या नसलेल्या लवासाची वकिली करतो. स्वतःच्या नसलेल्या वाईन फॅक्टरीज ची वकिली करतो. पण बरोबर आहे. खरं खोटं साहेबच जाणे.

मैत्र's picture

18 Feb 2013 - 11:14 am | मैत्र

प्रतिसाद आवडल्या गेल्या आहे!!

काळा पहाड's picture

18 Feb 2013 - 1:12 am | काळा पहाड

वरील दुव्यावर (भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ) शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे संपूर्ण तपशील आहेत. जवळजवळ पन्नास वर्षे पगार / व्यवसायातले उत्पन्न व गुंतवणुकींद्वारे मिळणारे उत्पन्न बघता एवढी संपत्ती असणे स्वाभाविक आहे.

बाकी आम्ही काल जन्माला आलेलो नाही आणि तसे समजण्याची चूक कुणी करू ही नये. आम्ही जे काम करतो त्याला लागणारा आयक्यु हा राष्ट्रवादीच्या सरासरी आयक्यू पेक्षा नक्कीच जास्त आहे.

नम्र सूचना आहे की आपल्याकडे असलेल्या माहितीचे पुरावे गोळा करून आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालयाकडे वगैरे तक्रार करावी.
तेथे कारवाई न झाल्यास खुशाल बॅ. नाथ पै चौकासारख्या सार्वजनिक स्थळी प्रशासनाची संमती घेऊन उपोषणास बसावे.

नम्र सूचना राष्ट्र्वादी ष्टाइल ने लिहिलेली दिसतेय.

असले काही न करता कुणाच्याही संपत्तीबाबत अवाजवी दावे करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की भारतीय कायद्यांनुसार ते कायदेशीर कारवाईस पात्र असतात.

इथे दावे करणारे बहुतांशी बाहेरच्या देशात आहेत. तेव्हा ते लोक तुमची ही सुचना फाट्यावर मारतील हे ध्यानात घेतल्यास तुमचेच कल्याण होईल.

कुणाला एखाद्या पैसे खाणार्‍या भ्रष्टाचार्‍या ची वकीली करण्याची एवढी हौस असेल तर त्यांनी हे ही लक्षात घ्यावे की गाववाल्यांना फसवणे सोपे असते, मिसळपाव वर येणार्‍या उच्च शिक्षाविभूषित लोकांना फसवणे जरा अवघडच असते. तुमच्या वरचे आणि खालचे प्रतिसाद वाचा आणि जनतेचे मत काय आहे हे लक्षात घ्या. गाववाल्यांना गुंडांच्या धमक्या आणि ब्लॉगर्स ना (आपले शील आणि इमान विकणार्‍या) पगारी वकिलांच्या धमक्या हे राष्ट्रवादी ने सोडले तर त्यांना पुढच्या निवडणूकीत मते मागायला लाज वाटणार नाही. काय?

एकवेळ भारतात तरी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होणार नाही. पण बाहेरच्या अनेक देशांत या गोष्टी महागात पडू शकते. अमेरिकेत टॉरेंटवरून चित्रपट डाउनलोड करणार्‍या अनेकांना फटका बसलेला आहे.

अन वरील इशारा सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या प्रत्येकाबद्दलच आहे. आरोप करायला कुणाचे काय जाते. अपार्टमेंटमध्ये तन मन धनाने सार्वजनिक काम करणार्‍यांबद्दलही लोक पैसे खाल्ले असे बोलतात. बोललेले एकवेळ न्यायालयात सिद्ध होणार नाही पण आंतरजालावर लिहिलेले सहज सिद्ध होऊ शकते.

लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याबरोबर अनेक कर्तव्यांचे पालन करणेही अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्रामध्ये हेच शिकवले जाते.

बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

एकवेळ भारतात तरी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होणार नाही. पण बाहेरच्या अनेक देशांत या गोष्टी महागात पडू शकते. अमेरिकेत टॉरेंटवरून चित्रपट डाउनलोड करणार्‍या अनेकांना फटका बसलेला आहे.

अन वरील इशारा सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या प्रत्येकाबद्दलच आहे. आरोप करायला कुणाचे काय जाते. अपार्टमेंटमध्ये तन मन धनाने सार्वजनिक काम करणार्‍यांबद्दलही लोक पैसे खाल्ले असे बोलतात. बोललेले एकवेळ न्यायालयात सिद्ध होणार नाही पण आंतरजालावर लिहिलेले सहज सिद्ध होऊ शकते.

लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याबरोबर अनेक कर्तव्यांचे पालन करणेही अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्रामध्ये हेच शिकवले जाते.

बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

बाळकराम's picture

19 Feb 2013 - 3:40 am | बाळकराम

बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे!

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 5:12 am | श्रीरंग_जोशी

कृपया विस्ताराने सांगाल का?

काळा पहाड's picture

20 Feb 2013 - 12:53 am | काळा पहाड

एकच फक्त विचारतो. सध्या एका मताची (पिंपरी चिंचवड मध्ये) किंमत काय याची काही कल्पना? पाच हजार हा आकडा कसा वाटतो?

चिंतामणी's picture

18 Feb 2013 - 2:12 am | चिंतामणी

सहमत
सहमत

मधल्या पोस्ट्मुळे गैरसमज होउ शकतात म्ह्णून हा खुलासा.

त्या ठोकताळ्यात आकडे लाखात / कोटीत लिहायचे राहिले आहे काय हो .........
च्यायल साहेबांच्या कडे 24,69,022 चे दागिने आणि त्यांच्या बायको कडे फक्त 11,00,096 चे .........

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2013 - 6:45 am | श्रीरंग_जोशी

मी वर लिहिलेल्या माहितीमध्ये जे लिहिले आहे ते एक जबाबदार नागरिक या नात्याने लिहिलेले आहे. माझा कुठल्याही राजकीय पक्षाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. आंतरजालावर कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व ते वाचून ज्या व्यक्तिसंबंधी ते लिहिले गेले आहे त्या व्यक्तिस कायदेशीर मार्गाने लिहिणार्‍यावर कारवाईची मागणी करण्याचा पूर्ण हक्क आहे. कुठल्याही प्रकरणात ती बाब ज्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत येते त्याचा निर्णय दोन्ही बाजूस बाध्य असतो व ठराविक मुदतीत वरील न्यायालयात अपील न केल्यास अंतिम असतो.

बाकी सत्ताधारी पक्षांच्या कामगिरीवर असमाधानी असल्यास मी तरी त्यांच्या धोरणांवर व कामगिरीवर योजना वेळेत पूर्ण न करण्याच्या उदाहरणांवरून टिका करतो अन तसे करण्याचा एक नागरिक म्हणून मला पूर्ण हक्क आहे.

बडेजाव मिरवण्यासठी विवाहात खर्च करण्याची प्रवृत्ती राजकारण्यांपूरती मर्यादीत नाही रहिली आहे.
लग्न म्हणजे डामडौल, जेवणावळी,रोषणाई यावर केलेला वारेमाप खर्च असा खेडोपाडी सर्वसामान्य माणसाचाही समज होत आहे. कोणाच्या लग्नात जास्त खर्च झाला आणि सर्वाधिक पत्रिका वाटल्या याची चढाओढच असते.
हा बडेजाव मिरवण्यासाठी आता फक्त विवाह हेच निमित्त रहिले नसून, १ वर्षाच्या मुलांचा वाढदिवसही अगदी फ्लेक्स वगैरे लावून वारेमाप खर्च करून साजरा केला जातो.
हे कमीच म्हणून काही गावांमध्ये तर आजकाल पितृपंधरवडा ही फ्लेक्स लावून आणि मोठमोठ्या जेवणावळी घालून साजरा करायची पद्धत सुरू झाली आहे.

पितृपंधरवडा ही फ्लेक्स लावून
माझ्या माहितीत भर पडली आणि फिस्सकन् हसू आले.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2013 - 2:39 pm | श्री गावसेना प्रमुख

कुणी बडेजाव करो अथवा आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन करो,त्यामुळे गरीबाला एका वेळेच खायला भेटतय ना.

इरसाल's picture

18 Feb 2013 - 4:56 pm | इरसाल

उडवेनात का ते त्यांचा पैसा. आपण काय करारपत्रकरुन नाय दिला तेन्ला.
इचिभैना तो उरवो त्याची पोर उरवो नायतर त्यो बिल्डर उरवो आपन फकस्त म्हावरां खावाचा नी गुमान पराचा.

हुप्प्या's picture

19 Feb 2013 - 12:31 am | हुप्प्या

आमचा पैसा आहे आम्हाला हवा तसा वापरू, साठवू, उधळूही हे खरे असते तर पवारांना अशी कान उघडणी का कराविशी वाटली? ती केल्यावर त्या जगतापाने ठणकावून आमचा पैसा, आमची उधळपट्टी ष्टाईलचे टगेगिरीचे उत्तर का दिले नाही? त्याला कंत्राटदाराने सगळे केले, मला माहितच नव्हते अशी मखलाशी का करावी लागली? उत्तर सोपे आहे, अशी उधळपट्टी जनतेच्या डोळ्यात भरते आणि दुष्काळाने पिडत असलेल्या लोकांच्या डोळ्यात सलतेही.
राजेशाही असली तरी दर चार पाच वर्षाने मतांचा जोगवा मागायला त्याच दरिद्री लोकांच्या दाराशी जावे लागणार आहे ह्या भीतीने ह्या उधळपट्टीवर पांघरूण घालण्याचे निर्लज्ज प्रयत्न चालू आहेत.
एखाद्या उद्योगपतीने आपल्या घरच्या लग्नसोहळ्यात असे केले असते तर त्याला असे स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.

इरसाल's picture

19 Feb 2013 - 9:53 am | इरसाल

हुप्प्याजी त्या लोकांकडुन ही अपेक्षा करणं रास्त नाही.

संपत्तीचे प्रदर्शन हा गुन्हा आहे असा एक अडगळीत पडलेला कायदा झाडून झटकून साफसूफ करून त्याआधारे एखाद्या जबाबदार नागरिकाला आपले कर्तव्य बजावण्यास काही अडचण येईल का ?
( या कायद्यान्वये मुंबईत झालेल्या एका हिरे व्यापा-याच्या शाही विवाहावर कारवाई झाली होती. झाली असतील आता वीस पंचवीस वर्षे )

वेताळ's picture

19 Feb 2013 - 9:56 am | वेताळ

सांगली शहराचे राष्ट्रवादी चे महापौर मा. इलियास नायकवडी ह्याचे मुलाचे लग्न अगदी साधेपणाने करणेत आले. २७-३० हजार लोकांचे जेवण केले गेले होते. २७०० किलो मटणाचा वापर केला गेला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Feb 2013 - 2:01 am | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे दरडोई फक्त १०० ग्रॅम मटण ??? एवढे तर आमच्या कडची पोट्टी एकावेळेला वेष्ट करतात...
खरेच साधेपणाने केले आहे हो लग्न ...

तेच ना. लै साधेभोळे अन गरीब हो सांगलीचे लोक, पुण्यामुंबैगत कुठली ऐश करायला ;)

दादा कोंडके's picture

20 Feb 2013 - 5:56 pm | दादा कोंडके

बाकीची लोकं शिकरण आणि मटार-उसळ खाणारी असतील. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Feb 2013 - 1:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते "दामले वेड्स बापट" अशा प्रकारचे लग्न वाटले नाही म्हणून थेट भागाकार केला हो. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2013 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''जे लोक दुष्काळ असतानाही खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नसमारंभावर उधळपट्टी करतात त्यांना पक्षातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही कोणतेच स्थान नाही अशा कडक शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची खरडपट्टी काढली''

वरील बातमी वाचतांना बॉ आपल्याला खूप आनंद झाला. पवार साहेबांचा रोखठोकपणा आपल्याला बॉ नेहमीच भावतो. खरा जाणरा राजा आहे. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2013 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, आमच्या साहेबांचा राष्ट्रवादी नेत्यांवर वचक राहीला नै का काय ?

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

19 Feb 2013 - 10:44 am | चिंतामणी

तुमच्या लक्षात आली ही गोष्ट.

(अवांतर- हिच लिंक मी इथे डकवली होती)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2013 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी हं शेठ, लिंक पाहिली नव्हती. पण, साहेबांनी अशा प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
आता पुढच्या वर्षी निवडणूका आहेत, अशा लोकांना जनतेसमोर नेणे अवघड होईल. आणि त्याचा परिणाम
मतदानावर होईल. महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल हे असे कार्यकर्ते आणि नेत्यांना आवरलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Feb 2013 - 10:59 am | श्री गावसेना प्रमुख

महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल हे असे कार्यकर्ते आणि नेत्यांना आवरलं पाहिजे.

कोणत्या पार्टीच्या
आर आर्,जयंत्,जाधव्,क्षीरसागर्,की टगे.

अनिकेतदळवी's picture

19 Feb 2013 - 10:55 am | अनिकेतदळवी

जर ते असे पैसे खर्च करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे निदान त्यामुळे तरी त्यांचे पैसे बाहेर पडतील आणि परदेशी खर्च होण्यापेक्षा भारतातच खर्च होतील. त्यामूळे पैसा भारतातच rolling होइल.नाहीतरी दानधर्म करायला सांगितल्यावर ते इतका पैसा नक्कीच देणार नाहीत जितका ते उधळतील :D

काळा पहाड's picture

20 Feb 2013 - 12:50 am | काळा पहाड

"हा सोहळा पाहून माझी झोप उडाली" याचा खरा अर्थः "मूर्खांनो, निवडणुका येतायत. पार्टी फंडा साठी पैसे जमा करायचे सोडून लग्नावर कसले खर्च करतायत? पुन्हा या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे डबल वसूली करायला तुमचा बाप् जाणार का?"

समीरसूर's picture

20 Feb 2013 - 2:13 pm | समीरसूर

अजितदादांनी 'जाणत्या राजाचे' विधान अगदी खोडरबर वापरून खोडले आहे. त्यांनी जाधवांना पाठिंबा दिला आहे आणि जाधवांना दहा हत्तींचे बळ आले आहे. त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा असो की जाधवांच्या घरचे लग्न असो, अजितदादांनी 'जाणत्या राजाला' पार धुळीला मिळवायचे ठरवलेले दिसते आहे. :-) एका दृष्टीने बरेच आहे. आपसातल्या साठमारीत राष्ट्रवादी रसातळाला गेली तर चांगलेच आहे. तसेही पिंपरी-चिंचवडची महानगरपालिका आणि पुण्याची अर्धी सत्ता या पलिकडे राष्ट्रवादीने १३ वर्षात काय दिवे लावले आहेत? राज्यात सत्ता असून देखील मुख्यमंत्री मात्र काँग्रेसचा असतो हे दुर्लक्षून चालणार नाही. आणि राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे किती सख्य आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे. स्वबळावर निवडणूक कुणालाच जिंकता येणार नाही हे दोघांनाही माहिती आहे. म्हणून ही आघाडी! अन्यथा तिला काही अर्थ नाही. आणि हो एका मताला पाच-पाच हजार दिले की निवडणूक जिंकणे सोपे जाते हे मी देखील ऐकले आहे. आपली जनता मूर्ख!! बाकी दोष कुणाला आणि का द्यावा? पुढच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे काही तितकेसे खरे दिसत नाही असे वाटते. बाकी मताचा दर डबल केला तरच काही स्कोप आहे. म्हणूनच तर भुजबळ, तटकरे, पवार, आव्हाड ही मंडळी इतकी गबर होत जातात ना!! सिंपल!

अविनाशकुलकर्णी's picture

20 Feb 2013 - 4:53 pm | अविनाशकुलकर्णी

भास्कर जाधव यानी जो ;लग्न समारंभ केला व त्याच्या जेवणावळी उठल्या त्याचे खरकटे २० ट्रक इतके होते असे ऐकण्यात आले ..

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:08 pm | प्रसाद१९७१

त्यांच्यात धमक आहे मिळवायची आणि उधळायची. तुम्हाला जमत नाही म्हणुन मनगट चावत बसले आहात.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Feb 2013 - 5:10 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका?

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:14 pm | प्रसाद१९७१

हा प्रश्न लेखकाला का मला? मला काहीच प्रोब्लेम नाही कोणी २५००० च्या जेवणावळी घातल्या तर. माझ्याकडे पैसे असतील तर मी पण घालीन जेवणावळी. तुम्हाला सुद्धा बोलाविन.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Feb 2013 - 5:18 pm | श्री गावसेना प्रमुख

त्या जेवणावळीचा पैसा जनतेकडुन लुटलेला आहे,कळत नकळत.म्हणुन ओरड चाललेली आहे

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:23 pm | प्रसाद१९७१

तुमच्यात हिंम्मत नाही पैसा कमवायची ( लुटायची किंवा कसाही ) म्हणुन ही जळजळ.
जनते कडुन पैसा लुटणे हे काही सोपे काम नाही.

समीरसूर's picture

20 Feb 2013 - 5:28 pm | समीरसूर

धमक चांगले काम पूर्ण करण्यात लागते. लोकांना फसवून, लुबाडून, जनतेचा पैसा लाटून पैसा कमवण्यात धमक नाही; हरामखोरपणा लागतो. तो या राजकारण्यांमध्ये पुरेपूर असतो. दमदाटी करून जमिनी लाटायच्या; बंगले हस्तगत करायचे; लोकांचा घामाचा पैसा स्वतःच्या रक्तात, हाडामासांत जिरवायचा; येणार्‍या उद्योगांकडून लाच खायची आणि वरून नेहमीच लोकांच्या तोंडाला पाने पुसायची याला काय म्हणतात ते दुष्काळात होरपळणार्‍या आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून (म्हणजे तब्बल ६६ वर्षे) रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक सेवा, शिक्षण या प्राथमिक गरजांसाठी झिजणार्‍या गावोगावच्या सामान्य माणसाला विचारा. इतक्या वर्षांत राजकारण्याची पोटे मात्र तट्ट फुगतच गेली. कालचे दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले. शेकडो कोटींची माया काय यांच्या बापजाद्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे घाम गाळून कमावली आहे? नाही, ती त्यांनी देशाला आणि लोकांना विकून कमवली आहे. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शरद पवार धडाडीचे, मराठी मातीतले, मर्द मराठा म्हणून त्यांची तळी जनतेने उचलली पण ते ही कुचकामी निघाले. त्यांच्या पक्षाने गुंडगिरीचे आणि जातीपातीचे राजकारण महाराष्ट्रात रुजवले. भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे कशी काय जाऊन बरोब्बर शरद पवारांना जाऊन चिकटतात? बाकी छगन भुजबळ, तटकरे वगैरेंबाबत तर बोलायलाच नको. स्वतःची स्वतंत्र संस्थानेच तयार केली आहेत या लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत. काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो...सगळे सारखेच लबाड आणि स्वार्थी! एखादाच मोदी गुजरातसारख्या राज्यात खरा विकास घडवून आणू शकतो. बाकी सगळी चोर माकडे!

त्यांची संपत्ती त्यांना उधळू देत. आपल्याला मनगट चावत बसायची काही गरज नाही. त्यांच्या संपत्ती उधळण्याचे परिणाम काय होतात हे ही आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. सुरेश जैन तुरुंगात आहे, कलमाडी दिवसभर घरी बसून माशा मारतात असे ऐकले आहे. अजून काय काय...

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:39 pm | प्रसाद१९७१

भाबडेपणा आहे समीरसुर - धमक कुठलीही कृती करायला लागते.

दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले

जर हे दिड दमडीचे लोक जर कोट्याधीश झाले असतील तर तुम्ही तर बन्द्या रुपयाचे, तुम्ही तर अब्जाधीश होयला पाहिजे होते.

लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत

मग हेच लोक निवडुन कसे येतात? म्हणजे जनता मुर्ख आहे हे तुम्ही कबूल करताय. मुर्ख लोकांना काय अधिकार दुसर्‍या लोकांच्या कर्तबगारीला हिणवण्याचा

मग हेच लोक निवडुन कसे येतात?

१. कारण दुसरा पर्याय नाही.
२. राजकारणी लोक अश्या कमावलेल्या पैशात, त्यांच्या निवड्णुक क्षेत्रात बर्‍याचश्या दुय्यम दर्ज्याच्या बाबी पुरसक्रूत करतात. उ.दा. रुग्णवाहिनी, अंत्यविधी. निवड्णुकीच्या वेळी पैसे/दारु वाटणे.

मुळात प्रश्न तो नाही. पैसे सगळेच खातात, पण विधायक/रचनात्मक कामे आधी करा. पैसा कमावणे हे दुय्यम महत्वाचे असावे. आजच्या महाराष्ट्रात ९९% राजकरणी पैसे खाण्याला प्रथम महत्व देतात.
उगाच नाही यांच्या मलेशियात खाणी आणि न्युझिलंडात शेकडो एकर जागा आहेत.

भिकापाटील's picture

23 Feb 2013 - 10:41 pm | भिकापाटील

राष्ट्रवादी/काँगेस इतर सगळेच एका माळेचे मणी आहेत मग कशाला ठणाना चालू आहे? कोण योग्य आहे ते तरी सांगा आम्हाले.
शरद पवार हे नाव बिलं फाडायला सोपे आहे. कुणाही शेंबड्याने उठावे आणि काहीही बकावे......

हुप्प्या's picture

26 Feb 2013 - 12:21 am | हुप्प्या

जाणत्या राजाने जाणून बुजून ह्या विषयाला हात घातला आहे. थाटामाटात लग्ने होणे हे कायम चालूच असते. पण दुष्काळ असताना अशी लग्ने होऊ नयेत अशी अपेक्षा कुणी बरे केली? जाणत्या राजाने. हा एक भंपकपणा होता निवडणुका जवळ आल्यात म्हणून केलेला. आणि त्याविषयी टीकाटिप्पणी करणे योग्यच होते.. अगदी राजू शेट्टीनेही ह्या बाबतीत जाणत्या राजावर ताशेरे ओढले आहेतच.
जाणत्या राजाने जनताही हळुहळू जाणती होते आहे हे लक्षात घ्यावे.

-- एक शेंबड्या पोर

अनामिका's picture

26 Feb 2013 - 1:51 am | अनामिका

लक्षात येतय का ?शेवटी जाधव पुर्वाश्रमीचे शिवसैनिक . त्यांनी अशी अनावश्यक उधळपट्टी करणे थोरल्या पवारांना कसे रुचेल.. येऊनजाऊन जाधव राष्ट्रवादीच्या वळचणीला गेलेले एक क्षुल्लक आश्रित त्यांनी नव्या धन्याची बरोबरी करण्याचे धाडस करावे हे कसे जमायचे?बाकी दुष्काळाच्या नावे बोंबा मारणे हे फक्त दाखवायला. इतके वाईट वाटतेय दुष्काळी परिस्थितिचे तर स्वतःचे भरल्ेल्े खजिन्े स्वयंघोषित जाणत्या राजाने दुष्काळाने पोळलेल्यांसाठी खुले करावे कुणी अडवलय?

पिंपातला उंदीर's picture

26 Feb 2013 - 5:01 pm | पिंपातला उंदीर

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यानी आपल्या सुपुत्राच्या लग्नात काय दिवे लावले आणि पैशाचा कसा चुराडा कसा केला ते बघा. मायला असले नेते आमच्या मराठवाड्यतच का पैदा होतात

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...