अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला . मूळ तंत्र विद्या ही कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कार /सिद्धी-साधना या उद्दिष्टा साठी होती .परंतु काही स्वार्थी /लबाड आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी वामाचारी तंत्र-मंत्र विद्या चा प्रचार-प्रसार केला .
भगवद्गीतेत “दैवासुर-संपद्विभाग-योगात” श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे “देवांना भजणारे देवतांकडून आशीर्वाद मिळवून कामे पूर्ण करून घेतात ,भूत-पिशाच्च /असुरांना भजणारे भूतांकडून कामे करून घेतात ,आणि मला भजणारे भक्त अंतिम परम-सत्याची उपासना करून माझ्यातच समाविष्ट होतात”. विश्वात सप्त-पाताल आणि सप्त स्वर्ग आहेत ,अशी समजूत आहे .यापैकी सप्त-स्वर्गात देवता /ऋषी-मुनी /पुण्यात्मे राहतात .तर सप्त पाताळात भूत-पिशाच्चे /असुर आणि राक्षस असतात .
वामाचारी तंत्र विद्येत मुख्यता:विश्वातील आसुरी शक्ती चे सहाय्य घेवून आपली विविध कामे करून घेणे असं प्रकार आढळतो . विविध तांत्रिक-मांत्रिक आणि अघोरी बाबा हे स्मशानात साधना करून अश्या दुष्ट शक्तींना वश करून घेतात आणि मग त्या शक्तींना बळी देवून त्याबदल्यात आपली कामे करून घेतात .
तंत्र विद्येत इंद्रजाल नावाची विद्या आहे ,या विद्येद्वारा अनेक प्रकारे शत्रूला त्रास देणे किंवा सुंदर स्त्री ला मोहात पडून वश करणे / पुण्य चोरणे इत्यादी कामे केली जातात .
१ स्तंभन –
२ मारण –
३ आकर्षण-
४ विद्वेषण-
५ उच्चाटन –
६ मोहन [वशीकरण]-
आद्य शंकराचार्य ,चाणक्य आदी थोर समाज-सुधारक आणि संत मंडळीनीही या वामाचारी तांत्रिक परंपरेची वेळोवेळी निंदा केलेली असून वामाचारी तांत्रिक आणि त्यांच्या गिऱ्हाईका ना गुन्हा सिद्ध झाल्यास देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ही दिल्याचे उल्लेख आहेत.गुरुचरित्र या ग्रंथात जारण--मारण हे अति-निंद्य कृत्य असून ते करणारा नीच चांडाळ योनीत जन्म पावतो असं उल्लेख आहे .
या सर्व काळ्या तंत्र विद्येच्या मुलाशी "सायको-काय्नेसीस"नावाचे शास्त्र आहे . मानवी मन आणि त्याच्या शक्ती /मर्यादा या अनंत आहेत .शास्त्रज्ञांच्या मतानुसार मानवी मेंदूच्या एकूण शक्तींपैकी आपण फक्त १० % शक्ती वापरत असतो .इतर शक्तींचा वापर अज्ञान /विस्मृती आणि भ्रांती यामुळे करता येत नाही .जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते .परंतु या शक्तिशाली मनाचा वापर चांगल्या कारणासाठी करायचा कि वाईट? हे शेवटी आपल्या हातात असते .
तर सायको कायनेसीस या शास्त्रात अंतर्मनाच्या अद्भूत शक्तींचा वापर करून भौतिक जगतातील काही वस्तूंवर ताबा मिळवणे शक्य होते. तसेच दुसऱ्याच्या मनावर प्रभाव टाकणे , मृतात्म्याचा माध्यम म्हणून वापर करून काही गोष्टी घडवणे हे शक्य होते.
प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये सदर विषयांची चर्चा आहे .तसेच "मृत्यूनंतरचे जीवन "नामक एका पुस्तकात ही अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे .
मनुष्य स्वभाव क्लिष्ट आहे. बरेचदा बऱ्याच गोष्टी ज्याला सामाजिक मान्यता नसते, ते करण्याचा कल काही लोकांचा असतो. The silence of the lambs हा सिनेमा बघावा. Dr. Hannibal Lector ची व्यक्तिरेखा खूप उद्बोधक आहे. क्राईम कशाला म्हणावा आणि कशाला म्हणू नये हे वेगवेगळ्या काळात नियम आणि मान्यता वेगळ्या होत्या..
तंत्रात ५ मकारांना मान्यता आहे.
१. मांस
२. मुद्रा
३. मदिरा
४. मैथुन
५. मत्स्य
तसे पहिले तर या वासना किंवा इच्छा प्रत्येकालाच असतात. प्रत्येकाला चमचमीत मांसाहार करावासा वाटू शकतो, दारू प्यावीशी वाटते, मैथुन तर सगळ्यांना आवडतेच, तीच गोष्ट मुद्रा (पैसा) ची.
तंत्रात माणसाच्या या आदिम ओढीचा वापर योग साधण्यासाठी करण्याचा प्रघात आहे. जर जमले तर खूप छान प्रकार आहे. पण बहुतेकदा यातच गुंतून जाणे अधिक बघितले जाते. म्हणून हा मार्ग बहुतेक लोकांना रुचत नाही.. संभोग (मैथुन) हि क्रिया खूप एकाग्रतेने करावी लागते हे प्रत्येक अनुभवी माणसाला ठाऊक असेल. जर एकाग्रता ढळली तर त्रास होतो. जर हि एकाग्रता वापरून विषय बदलता आला (जोडीदाराऐवजी ईश्वर, किंवा इतर कुठला विषय) तर या क्रियेत देखील खूप उत्कृष्ट ध्यान साधता येते.
पतंजली सांगतात कि एकाच विषयावर चित्त एकाग्र करणे म्हणजे ध्यान आणि त्या विषयाशी एकरूप होणे म्हणजे समाधी. जर संभोग करताकरता हे करण्याची कला जमली तर हे शक्य आहे. पण संभोगात दोन जीव असतात आणि दोघेही एकाच मानसिक प्लेन वर राहतीलच याची ग्यारंटी देता येत नाही. जर ती क्रिया आवडू लागली तर मग हे ध्यान राहत नाही.
तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता. अर्थात सगळे गांजेकस योगी असतात असे नाही. पण अगदी विरला एखादा योगी असतो जो कधीकधी हे द्रव्य घेऊन ध्यान करतो. पंडित भीमसेन जोशी, असे म्हणतात, कि व्हिस्कीचा एक पेग मारून मैफिलीमध्ये गायला बसत. इथे तो पेग म्हणजे मनातले inhibitions घालवायला वापरण्यात येणारे टूल आहे. तीच गोष्ट गांजा, आणि संभोगाची.
येनकेनप्रकारेण मनाची संपूर्ण एकाग्रता साधायची असेल तर काही लोक काही सपोर्ट वापरतात. हे सपोर्ट योग्य प्रकारे कसे वापरायचे आणि इप्सित समाधी कशी साधायची, या कलेला तंत्र म्हणतात.
ऑड म्हणजे मारामारी, हिंसा, असे काही करणे ज्याने मती "सुन्न" होऊन जाईल (जसे मेलेले मनुष्य खाणे, हत्या करणे इत्यादी) या गोष्टीदेखील बऱ्याच लोकांना शांती देणाऱ्या असतात. कित्येक सैनिकांना "जीव घेणे" आवडू लागते. याचा अर्थ हा नाही कि सगळेच सैनिक असे असतात आणि याचा हा देखील अर्थ नाही कि ते सगळे सैनिक ज्यांना जीव घेण्याची प्रक्रिया आवडते आहे, ते दैनंदिन आयुष्यात लोकांना मारत सुटतात. पण कधीकधी काही लोकांचे मानसिक संतुलन ढळते आणि ते सिरीयल किलर वगैरे होतात. एका सिरीयल किलर ला तीच मानसिक शांती मिळते याचा अर्थ हां आहे कि पण त्याचे संतुलन बिघडले आहे आणि तो आता इतरांसाठी धोका झाला आहे. अघोरी तांत्रिकांचे तेच असते.
इथे किती जणांनी मारामारी केली आहे? किती जणांनी बकरे अथवा कोंबडी कापली आहे? किती जणांनी मेलेल्या कोंबडीचे अथवा बकऱ्याचे मांस कापले आहे आणि धुतले आहे, रक्तात हात माखवले आहेत? किती जणांनी हातात तडफडणारा मासा पकडला आहे? बहुतेक लोकांना जे हि कामे रोज करतात पहिल्या अनुभवानंतर संवेदना बोथट होते नि त्या बद्दल काहीही वाटत नाही. पण काही लोकांना पहिल्या अनुभवाची संवेदना तितकीच, किंबहुना अधिक प्रकर्षाने राहते. हि प्रोसेस ते आधी एन्जॉय करतात आणि नंतर एन्जॉय करणे बंद होऊन यानंतर शांती अनुभवू लागतात. हे लोक प्रमाणाने समाजात कमी असतात म्हणून समाज सुरळीत चालतो.
या लोकांना वाळीत न टाकता यांना त्यांची ओढ "त्यातल्यात्यात" कमी हानिकारक प्रकारे पूर्ण करून समाजाला धोका उत्पन्न होऊ नये हा विचार आपल्या प्राचीन ऋषींनी केला आणि अघोरी प्रकार सुरु झाला. यातले बरेच लोक "ठग" बनत, गुप्तहेर बनत, सुपारी घेऊन किलर बनत आणि हत्या करीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला देखील असली कामे करणारे लोक हवे असत (आणि आजही आहेत). अधिक यांचे मठ दुर्गम जंगलात स्थापन करून यांचा समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काही त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जाई.
अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात. एकदा कृष्ण दिसला तर कोण वेडा कामिनीकांचनच्या मागे लागेल? तेव्हा हि लोक हे मार्ग वापरणे सोडून द्यायचे. इतर संतुलन ढळलेले लोक राजाकडून अथवा समाजाकडून मारले जात. आणि ज्यांनी वेळेत सगळे धरले आणि वेळेत सास्गले सोडले आणि धरताना अगर सोडताना संतुलन ढळू दिले नाहीत, ते योगी म्हणवतात.
नवनाथांची यांची चरित्रे एकदा वाचावीत. जाग मच्छिंदर गोरख आया, या हाकेतली ओढ काय आहे ती लक्षात येईल.. तंत्रमार्गाबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायची असते कि हे एक "तंत्र" आहे. एक टेक्निक आहे. योग हे देखील एक तंत्र आहे. तंत्र मार्ग सांख्य आणि योग यांपासून खूप प्रभावित आहे.
ज्या विषयावर ध्यान करतोय त्याशी एकरूप होणे म्हणजे समाधी आणि त्या ओघात "मीपण" विसरून तो विषय होऊन जाणे म्हणजे योग. योग शब्दाचा अर्थ "मिलन" आहे, एकरूपता आहे.
जर ड्रायविंग करीत आहात, तर त्या क्रियेशी इतके एकरूप व्हायचे कि कालांतराने चालक आणि वाहन यांच्यातील द्वैत नाहीसे होऊन दोघेही एकरूप होणे, हा झाला "सारथ्ययोग".
तीच गोष्ट प्रेमाची, कर्माची, भक्तीची. हे एकरूप होता आले, स्वत्व विसरता आले कि विषयात कौशल्य प्राप्त होते, म्हणून गीतेत कृष्ण म्हणतो 'योगः कर्मसु कौशलं"..
हा योग साधणे हेच तंत्राचे देखील साध्य आहे. कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, टेंबेस्वामी, इतर नवनाथ, चांगदेव, इतर खूप असे योगी जे प्रसिद्ध नाहीत, त्यांनी हीच टेक्नीक मोक्षासाठी वापरली जाणतेपणी.
कित्येक संत देखील अजाणतेपणी हीच टेक्निक वापरत. माती मळणारा गोरा कुंभार इतका तल्लीन होऊन गेला कि पायाखाली मुलगा तुडवला गेला याकडे लक्ष नाही. तो राहिलाच नव्हता मुळे, माती, तो, आणि सर्व जग विठोबा झाले होते. हा क्षण म्हणजेच योग. आणि या क्षणापर्यंत गोराकुंभार ज्या टेक्निक ने पोहोचले, ती टेक्निक म्हणजेच योग आणि तंत्र. हे त्यांना माहिती होते कि नाही माहिती नाही. पण प्रोसेस हीच ती..
त्यामुळे उगाच शिव्या घालू नये. आधी अनुभव घ्यावा. आणि उचित साध्य मिळवायला जर स्वभाव अनुरूप असेल आणि रुची असेल तर तंत्र अंगीकारावे. ते सगळे लोक ज्यांनी उत्कटतेचा एक क्षण देखील जीवनात अनुभवला आहे ज्यात ते त्यांचे स्वत्व विसरले आहेत, त्या सगळ्या लोकांनी तो क्षण जाणते अगर अजाणतेपणी योगाचे तंत्र (योगाची टेक्निक) वापरून अनुभवला असतो. इतर बहुतेकांच्या सबंध आयुष्यात तो एक उत्कट क्षण कधीच येत नाही.
•
तर मंडळी आपण तंत्र विद्येचा आढावा घेत आहोत,बर्याच जिज्ञासू लोकांनी अधिक मोठे लेख लिहिण्या विषयी सांगितल आहे ,परंतु कार्य-बाहुल्या मुळे ते शक्य होत नाही...नंतर सर्व भाग एकत्र प्रकाशित करेन...
तर या तंत्रा मध्ये एकटोप्लाझ्म नावाच्या द्रव्याची विशेष महती आहे . एकटोप्लाझ्म नावाचे द्रव्य मानवी शरीरा सभोवती लपेटलेले असते .ज्याला ऑरा असे म्हणतात .हे द्रव्य अतिशय विरळ असून ते वायुरूप असते . या द्रव्यला जीव-द्रव्य असेही म्हणतात .
निरोगी व्यक्तीचा ऑरा चांगला सशक्त/ शुभ्र असतो ,तर एखादा किंवा अनेक शारीरिक/मानसिक रोग झालेल्या व्यक्तीचा ऑरा हा निर्बल व काळपट/पिंगट असतो
जगात अनेक ठिकाणी अनाकलनीय रोगांचे निदान करण्यासाठी / आध्यात्मिक रोगांचे निदान करण्यासाठी ऑरा रीडिंग चा आधार घेतला जातो .
तर पूर्वोल्लेखीत वामाचारी दुष्ट तान्त्रीकाना या एकटोप्लाझ्म मध्ये फार रस असतो . दुसऱ्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवणे /त्यासाठी ऑरा वर हल्ला करणे यासाठी ते नानाविध उपाय योजत असतात .
हे सर्व प्रकार जाणीवेच्या निराळ्या पातळीवर घडतात ज्याला astral world असे नाव आहे. भारतीय आध्यात्म-शास्त्रात त्याला भुवर्लोक असे म्हणतात .
अमेरिका-स्थित डॉक्टर ब्रूस गोल्डबर्ग या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या self-defense from psychic attacks या पुस्तकात या प्रकार बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे .
तर हे शाक्त तांत्रिक रात्रीच्या वेळी व विशेषत: पहाटे सूक्ष्म-देहाने संचार करून लोकांचे व मृतात्म्यांचे एकटोप्लाझ्म पळवतात .त्यासाठी आपले भूवर्लोकीय पातळी वरील गुंड-मवाली त्यांनी पाळलेले असतात .यालाच astral group किंवा underworld असे म्हणतात .व या गुंडाना energy vampires अशी संज्ञा आहे .
हे मवाली जिवंत व मृत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवतात , त्यासाठी ते स्मशानात जावून तेथील मृतात्म्यांना वश करून त्यांचे जीव-द्रव्य पळवतात
तंत्र आणि अध्यात्म यातील मोठा फरक म्हणजे नीतीमत्ता .खऱ्या आध्यात्मिक सद्गुरुंकडे नीतीमत्ता ,माणुसकी,,दया-क्षमा -शांती आढळते ,पण या दम्भाचारी तांत्रिक गुरूंच्या ठायी नीतीमत्ता आणि इतर सद्गुण औषधालाही सापडणार नाहीत .
खरे सद्गुरू शिष्याच्या अहंकाराचा विलय करून त्यास ईश्वर-चरणी स्थिर करतात ,तर हे दांभिक गुरु शिष्याच्या/गिऱ्हाईकाच्या अस्मितेवरच हल्ला करून त्याचे व्यक्तिमत्त्व नासवून टाकतात .त्याला एक बाहुला बनवतात ,जो कथित गुरूच्या लहरीवर अवलंबून राहील ,त्यासाठी वशीकरण आणि तत्सम साधनांचा वापर केला जातो.
साधक हा अहंकार आणि काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या विकारांपासून मुक्त असावा अशी आध्यात्माची पहिली गरज आणि पात्रता असते ,परंतु तंत्रात द्वेष,मत्सर,दंभ आणि अहंकार यांनी लडबडलेले गुरु आणि शिष्य ठायी-ठायी आढळतात .तंत्राचे सगळे विधी करण्या मागचे उद्देश दुसऱ्याचे वाईट करणे /लुबाडणे किंवा स्त्रीमोह असेच असतात .
खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे.
स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!!!!!!!!!!!!!!!
सदरहू लेख आमचे एक स्नेही जे छोटा भीम या टोपण-नावाने लेखन करतात ,त्यांनी गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्या रीतसर पूर्व-परवानगीने हा लेख इथे देत आहे. धन्यवाद.
-रमेश भिडे
प्रतिक्रिया
17 Feb 2013 - 7:13 pm | अग्निकोल्हा
नाव वाचुनच संभोगातुन समाधिकडे लेखमाला सुरु होतिय की काय या अपेक्षेने लेख उचकला... अन... लेखाची सुरुवात सोडली तर हासुन हासुन अक्षरशः पुरेवाट झालि!
17 Feb 2013 - 7:32 pm | दादा कोंडके
आधी अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचो. पण याच्या नादी लागून काय-काय होउ शकतं हे बघितल्यामुळे आता राग येतो.
17 Feb 2013 - 7:27 pm | शुचि
वाट्टेल ते.
17 Feb 2013 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा
नाबाद 200 ची सोय. ;-)
17 Feb 2013 - 7:35 pm | प्यारे१
अलख निरंजन...!
17 Feb 2013 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले
इथे यु-ट्युबवरच्या एका व्हिडिओची दिलेली लिंक संपादित केली आहे.
ह्यापुढे अशा लिंक टाकताना सारासार विचार करावा ही विनंती.
- संपादक मंडळ
17 Feb 2013 - 9:49 pm | हारुन शेख
ही व्हिडीओ लिंक इथून काढावी अशी संपादकांना विनंती. अशी लिंक डकविण्याचा निर्णय यापुढे विवेकाने घ्यावा ही गिरीजा यांना विनंती.
18 Feb 2013 - 10:21 am | प्रसाद गोडबोले
मान्य आहे हा व्हिडीयो थोडा जास्त आतातायी अन बीभत्स होता पण
तंत्रविद्येविषयी गुढ आकर्षण निर्माण करण्याची क्षमता असलेल्या लेखावर त्याच गोष्टीची दुसरी बाजु दाखवली की ते आकर्षण निर्माण होणार नाही असा अंदाज होता.
एका कापालिकाने जेव्हा श्रीमदाद्यशंकराचार्यांचा बली देण्याचा घाट घातला तेव्हा आचार्यांच्या शिष्याने नृसिंह रुप घेवुन त्या कापालिकाला यमसदनी धाडले. तसेच आचार्यांच्या सोअबत असलेल्या सुधन्वा राजानेही युध्दातूर शाक्त लोकांचा संहार केला.
आता आजच्या काळात ,लोकशाहीत, हे सारे पर्याय शक्य नाहीत , तेव्हा विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल ना ?
कृपया हे लक्षात घ्या की पुण्या मुंबैत हे अघोरी प्रकार होत नसले तरी इतरत्र महाराष्त्रात जरुर होत आहेत , आजही लोक सहा नखांचं कासव शोधत फिरत आहेत...(त्र्यंबकेश्वरला तर शाक्तौपासना जोरात फॉर्म मधे चाल्य आहेत असे ऐकुन आहे ) कालाजादु , करणी , आणि अशा बर्याच अनेक अम्धश्रध्दा ह्या तंत्र संप्रदायाचीच पिल्ले आहेत . तेव्हा त्यांचे खंडन येनकेनप्रकारेण करणे फार महत्वाचे आहे .
अशाप्रकारच्या लेखनाचे खंडण कसे करणार ? (माझ्या मते ज्या गोष्टी विषयी क्युरीयॉसिटी आहे त्यागोष्टीची दुसरी क्रुरबाजु दाखवली की आपोआप लोकांची क्युरीयॉसीटी सम्पेल खंडन झाले)
हारुन शेख , ह्याही पेक्षा क्रुर प्रथा आपल्याच देशात "इतरत्र" ही आहेत, केवळ चर्चेला वेगळे वळण नको म्हणुन त्यांचा उल्लेख टाळत आहे ...
फक्त एक नमुद करत आहे की - हे तंत्रसांप्रदायिक / अघोर / शाक्त कसेही असले तरी ही
"संकट समये प्राप्ते , वयं पंचाधिकं शतम् |"
असो.किमान ज्यांनी विडीयो पाहीला त्यांच्या मनातील तंत्र शाक्त अघोर संप्रदायाविशयीची क्युरीयॉसीटी संपली असेल तर कृतीचे सार्थक झाले असे वाटेल.
व्हिडीयो लिन्क काढुन टाकल्या बद्दल संपादकांचे आभार !
ज्यांना ह्या पंथाबद्द्दल उत्सुकता आहे , अजुन जाणुन घ्यायची इच्छा आहे त्यांनी लिन्क यु-ट्युब वर सर्च करावी !
|| शांति: शांति: शांति: ||
18 Feb 2013 - 11:11 am | चौकटराजा
हारुन शेख , ह्याही पेक्षा क्रुर प्रथा आपल्याच देशात "इतरत्र" ही आहेत, केवळ चर्चेला वेगळे वळण नको म्हणुन त्यांचा उल्लेख टाळत आहे ...
डॉ मीना प्रभू यानी रोमराज्य या पुस्तकात येशू ला खिळे मारण्याचा प्रसंग आजही इटली मधे जसा च्या तसा " घडविला" जातो असे वर्णिले आहे. तो प्रसंग त्यानी स्वत" पाहिला आहे. या " येशू" ला नंतर रूग्णालयात घेऊन जातात.
19 Feb 2013 - 11:40 pm | चित्रगुप्त
येशूच्या संदर्भात मेल गिब्सनचा चित्रपट 'पॅशन ऑफ ख्राइस्ट' बघण्याजोगा आहे.
17 Feb 2013 - 11:34 pm | दादा कोंडके
बालमिपाकरांच्या मनावर परिणाम होउ नये म्हणून लींक काढली काय?
17 Feb 2013 - 8:11 pm | यसवायजी
=)
च्यायला आमची जीवंतपणी सरळ जगायची बोंब, आणी 'मेल्यावरचं जीवन'??.. हा हा.. काय काय वाचायला सांगताय राव.
ह्या ओळीनंतरच वाचणं माझ्या आवाक्या बाहेरचं आहे.. आम्ही बाद.. :D
-----------
अवांतरः- इंटरनेट कनेक्शन कुठे मीळेल? स्वर्गात की नरकात?
17 Feb 2013 - 8:15 pm | नानबा
भयंकर व्हिडिओ.... :))
17 Feb 2013 - 8:24 pm | खटासि खट
लेखकाच्या प्रतिभेपुढे मती कुंठीत झाली. हे भगवन, शरण आलो आहे, पदरात घ्या
17 Feb 2013 - 8:57 pm | अधिराज
ओम भग भुगे..भग्नी भागोदरी..ओम फट स्वाः.
http://aajtak.intoday.in/story/Yeddyurappa-claims-black-magic-threat-to-his-life-1-49632.html
17 Feb 2013 - 9:23 pm | jaypal
गिरीजा तै जरा इस्क्टुन सांगा, त्यो साधु बाबा मास कच्च खातुय अन चाट मसाला आगित मारतुय ह्ये काय समजना. कवटी फुटायची येळ आल्या विचार करुन करुन
18 Feb 2013 - 12:55 am | कपिलमुनी
>> प्रत्येकाला चमचमीत मांसाहार करावासा वाटू शकतो, दारू प्यावीशी वाटते, मैथुन तर सगळ्यांना आवडतेच, तीच गोष्ट मुद्रा (पैसा) ची.
तुमच्याकडे या वाक्याबद्दलचा विदा आहे का ??
18 Feb 2013 - 1:03 am | बॅटमॅन
उच्च विनोदी लिखाण. उगा निषेध करू नगा बे मिपाकरान्नो =))
20 Feb 2013 - 12:10 am | आबा
नाडीवरचे लेख वाचल्यानंतर जगामध्ये विनोदी वाचण्यासारखं काही उरलेलंच नाही, असं मला वाटलं होतं. हा लेख वाचून मात्र माजहरण झालं...
18 Feb 2013 - 2:09 am | विजुभाऊ
एक्टोप्लाझम ......प वि वर्तक..........
हाय रे दैवा........
18 Feb 2013 - 10:38 am | मनीषा
अशाप्रकारच्या विषयांवर लिहिलेले लेख मिपावर वारंवार का येतात?
अशा लेखांना प्रतिबंध करण्यासाठी काही करता येणार नाही का?
(अवांतर : मला हे 'नाडी'चेच पुढचे टोक वाटते आहे. )
18 Feb 2013 - 11:16 am | सुहास..
खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे.
>>>
अजुन काय पारख करायची ??
अवांतर : च्यायला , हे अनिष्ट प्रथा निवारण विधेयक कधी मंजुर होणार
18 Feb 2013 - 4:34 pm | बाळ सप्रे
सनातन प्रभातवाल्यांना पाठवा. त्यांच्या साईटवर शोभुन दिसेल.
18 Feb 2013 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा
@सनातन प्रभातवाल्यांना पाठवा. त्यांच्या साईटवर शोभुन दिसेल.>>> =)) तीव्र आक्षेप...! ;-) तिथुनच आलं नसेल कशावरून??? ;-)
18 Feb 2013 - 9:47 pm | आशु जोग
या लेखाचा विषय जरा वेगळा असला तरी
माहीतीपूर्ण निश्चित आहे.
केवळ पहिला प्रतिसाद देणार्याने पिवळी रेघ काढली
म्हणून ती रेघ इतरांनी पुढे ओढण्याचे कारण नाही
बरं चार लोक टीका करताहेत म्हणून आपण पाचवे असाल
त्याला प्रवाहपतित यापलिकडे काय म्हणणार ?
19 Feb 2013 - 11:32 pm | अग्निकोल्हा
अंगाला हात लावायचा नाय (ते तंत्र सामर्थ्य न्हवे).
ड्रग अॅब्युज करायच नाही (ते केमिस्ट्री सायकिअॅट्री आहे तंत्र न्हवे)
माझ्या शरीराच्या कोणत्याही भागावरील केसापासुन ते अगदी वापरातल्या कपड्याच्या तुकड्यापर्यंत जे हवय ते माझ्यावर तंत्र प्रयोगासाठी म्हणुन देतो.
माझ्या वरील अटी मान्य असतिल तर या लेखामधील तंत्राची जी माहीती लिहली आहे त्याचा मला प्रभाव दाखवा अशी तुम्हाला विनंती.
चार लोक टिका का करतात ते समजुन न घेता आपण आपण पाचवे असाल त्याला प्रवाहपतित यापलिकडे काय म्हणणार असं म्हणायच होतं काय ?
19 Feb 2013 - 11:57 pm | धन्या
तुम्ही कोणाला च्यायलेंज देताय याची तुम्हाला कल्पना आहे का?
च्यायला छू मंतर जादू मंतर करुन तुम्हाला निजधामाला पाठवतील. मग बसाल एखाद्या पिंपळाच्या फांदीला लटकत. ;)
20 Feb 2013 - 10:49 am | अग्निकोल्हा
असलं काही खरच असतं तर टिचभर इंग्रज या देशाव्र १५० वर्षे टिकु शकले असते काय ? शेकडो वर्षांची मोगलाइ नांदली असती काय ?
20 Feb 2013 - 12:48 pm | बॅटमॅन
+१०००००००००००००.
नागपुरकर भोसल्यांचा एक प्रसंग आठवला. शेजवलकर लेखसंग्रहातून साभार.
"भोसले यांचे बंगल्यात च्यार बैका नग्न होऊन म्हणे पडले, आपले मंत्रसामर्थ्याचे योगे इंग्रजाचे काही न चाले ऐसे करितो म्हणून आल्या आहेती."
अशी नोंद आहे. इंग्रजांच्या दारुगोळ्यापुढे इलाज काय, तर चार नागड्या मांत्रिक बायका उभ्या करायच्या!! मग इंग्रजाचे काय चालते?
20 Feb 2013 - 3:30 pm | दादा कोंडके
सहमत. बंगळुरात विधानसौधातल्या लिंबुप्रकरणानंतर येडीउरप्पांनी करणी उलटून टाकण्यासाठी काय काय केलं म्हणे. त्यापेक्षा डायरेक सोनियाची वूडू ड्वाल करून इटलीला कुरीयर कारायचं की. :))
20 Feb 2013 - 4:13 pm | बॅटमॅन
हेहेहे अगदी अगदी :D
बायदवे शेजवलकर पुढे म्हणतातः "अशा लोकांच्या हातात राज्य असल्यावर ते का गेले याचा उहापोह कशाला"? =))
19 Feb 2013 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा
@केवळ पहिला प्रतिसाद देणार्याने पिवळी रेघ काढली
म्हणून ती रेघ इतरांनी पुढे ओढण्याचे कारण नाही>>> चोरांना त्यांच्या कलेला नावं ठेवलेली आवडत नाहितच,त्यात विशेष असे काहिही नाही... :-p
20 Feb 2013 - 12:12 am | आबा
Humility is an important quality. Especially if you're wrong a lot....
Of course, when you're right, self-doubt doesn't help anybody, does it? :)
- Dr. Gregory House
18 Feb 2013 - 10:16 pm | मराठे
तंत्रविद्येच्या ज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाची विद्या अधिक उपयोगी पडते. असो.
19 Feb 2013 - 11:09 pm | आशु जोग
ते कसे काय !
की टाकलं काहीतरीच !
20 Feb 2013 - 6:32 pm | शुचि
आशु जोग सर/साहेब आपण या विषयावरील आपले अनुभव मांडाच. आपला अभ्यास दांडगा आहे हे आपल्या प्रतिसादांवरुनच लक्षात येतय. तेव्हा या विषयावर एखादा लेख टाकून आम्हाला उपकृत कराच.
19 Feb 2013 - 9:43 am | रामपुरी
"प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये "
हा 'नाडी' वाल्याचा डु आयडी म्हणावा काय?
19 Feb 2013 - 9:57 am | खटासि खट
रमेश भिडे, मंदार कात्रे, छोटा भीम और उनके बहोतसे महिला साथी नाडी वालोंसे भिन्न हय.
21 Feb 2013 - 11:58 pm | मंदार कात्रे
मि.खटासि खट , उद्धटासि व्हावे उद्धट !
येथे माझे नाव येण्याचे प्रयोजन कळेल का?
आपण कोण ? ओळख द्याल का?
21 Feb 2013 - 11:59 pm | मंदार कात्रे
नाडी हा काय प्रकार आहे?
आणि त्याच्याशी माझा काय संबंध?
20 Feb 2013 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले
लोलल मधुन प्रवास करताना बर्याचदा जाहीराती दिसतात ह्यांच्या ...मस्ट रीड असे विनोदी साहित्य आसते हे
" जाओ चाहे जहा... काम होगा यहां " >>> ह्याच अॅडच्या साईड;ला दुसर्या बाबाची अॅड ..तोही सेम म्हणतोय =))
" मेरा किया हुवा काम काटने वाले को नगद इनाम ">>> "कितना ?" ;)
२४ घंटो मे रीजल्टस नही मिले तो पिसे वापस" >>> घंटा
अजमेर्वाले बाबा - गोल्ड मेडॅलिस्ट >>> हा कोर्स कुठल्या युन्हिवर्सिटीत शिकवतात हे पाहायचे आहे मला एकदा
प्यार मे धोका , नौकरी , सौतन से छुटकारा ...
वशीकरण स्पेशालिस्ट >> =)) =)) =))
20 Feb 2013 - 5:21 pm | प्रसाद१९७१
गिरिजा काका/ आजोबा - तुम्ही तर तंत्रविद्येतले गुरुच की हो. इतके दिवस मिपा करांवर करणी करुन ठेवली होती तुम्ही. कीती आयडी तुमच्या नादी लागले
21 Feb 2013 - 12:54 am | प्रसाद गोडबोले
कीती आयडी तुमच्या नादी लागले
>>> काय सांगता ;) =))
20 Feb 2013 - 6:43 pm | आनंदी गोपाळ
हं...
20 Feb 2013 - 7:05 pm | तिमा
मिपावरील वाचक हे सज्ञान वाचक आहेत. तसेच ते शिक्षितही आहेत. त्यामुळे अमुकच प्रकारच्या लेखांना आक्षेप घेणे योग्य नाही. अशा लेखांनी निदान, मिपावर तरी अंधश्रद्धा पसरणार नाही. ज्यांना वाचायचे आहे ते वाचतील.
बाकी एकटोप्लाझम हा शब्द म्हणजे ज्ञानात भरच की!
20 Feb 2013 - 8:39 pm | आशु जोग
तुम्ही सगळ्यांनी तलाश पाहीला ना
बडे चाव से ?
21 Feb 2013 - 10:14 am | साती
अहो आम्ही स्पायडरमॅन, सुपरमॅनचे सिनेमे पण चाव से बघतो. रामसे बंधूंचे पण बघायचो.
पण म्हणून ते खरे मानित नाही.
22 Feb 2013 - 1:11 am | आबा
मला सांताक्लॉज पण खरा वाटायचा, पण नंतर मी मोठा झालो !
21 Feb 2013 - 10:28 am | llपुण्याचे पेशवेll
माहीतीपूर्ण लेख. बर्याच गोष्टी माहीत नव्हत्या.
21 Feb 2013 - 10:34 am | llपुण्याचे पेशवेll
अत्यंत सुंदर लेख आहे.
पंच मकार साधना ही ब्रम्हदेवाने सनकादिकाना सांगितलेली होती. कारण मूळातच वैराग्यामुळे देहबुद्धीचा नाश झालेला असल्याने सृष्टी पुढे चालावी म्हणून ब्रम्हदेवाने केलेली ही योजनाच होय. आणि म्हणूनच ती आताच्या काळात त्याज्य आहे.
23 Feb 2013 - 1:46 am | धन्या
खुपच त्रोटक प्रतिसाद आहे तुमचा.त्यामुळे खुप प्रश्न पडलेत.
पंच मकार साधना ही ब्रम्हदेवाने सनकादीकाना सांगितल्यावर सनकादिकानी काय केले?
कुणाच्या देहबुद्धीचा नाश झाला होता? एकंदरीत तेव्हाच्या सार्या मानवजातीचा का? हे चार युगांपैकी कोणत्या युगात घडले? पाच मकार साधनेने नेमके काय झाले? "वाट चुकलेला माणूस" पुन्हा मार्गावर आला का?
ते कसे काय? जर वैराग्यामुळे नाश झालेल्या देहबुद्धीची जाणिव होण्यासाठी ब्रम्हदेवाने पाच मकार साधना सांगितली तर मग त्यात सातत्य राहण्यासाठी या साधनेची गरज उरली नाही का?
22 Feb 2013 - 1:23 am | कवितानागेश
फक्त शेवटचा पॅराग्राफ पुरेसा होता की.
खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे. स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!
23 Feb 2013 - 1:26 am | आशु जोग
http://en.wikipedia.org/wiki/Planchette
हे खरे आहे का
आणि
automatic writing, म्हणजे काय
23 Feb 2013 - 1:38 am | धन्या
तुम्ही करुन बघा की. झालं की इथे धागा टाका. :)
फारच उत्सुकता असेल तर द लॉज ऑफ स्पिरीट वर्ल्ड हे पुस्तक वाचा. हे पुस्तक मराठीत "जीवात्म जगताचे कायदे" या नावाने मिळते.
26 Jan 2014 - 7:11 pm | उडन खटोला
फारच माहितीप्रद लेख अन अतिशय उद्बोधक चर्चा !
28 Jan 2014 - 4:23 pm | म्हैस
आई शप्पत असल्या विषयावरचा लेख मी प वर मी प वर ? खरा तर मला पण खूप लेख लिहायचेत . पण मी प वर नाही टाकावेसे वाटत. :-(
28 Jan 2014 - 4:48 pm | म्हैस
लेखाची सुरुवात तंत्र विद्येच्या माहितीने झाली. मग पुढे वेगळ्याच दिशेला भरकटला.
6 Feb 2014 - 4:26 am | मदनबाण
ह्म्म्म..रोचक लेखन.
जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते .
brainwave चा वापर करुन चांगल्या प्रकारचे मेडिटेशन नक्कीच करता येते,यातल्या Binaural beats,Monaural beats आणि Isochronic tones चा मी स्वतः अनेकवेळा वापर केला आहे.याचे Alpha,Beta,Theta,Delta,आणि Gamma असे प्रकार मी ऐकले आहेत.तिबेटियन सिंगींग बाउल किंवा हिमालयन सिंगींग बाउल याने सुद्धा उत्तम मेडिटेशन करता येते.यात सुद्धा डीप टोन सिंगींग बाउल्सचा अनुभव अप्रतिम आहे.माझ्या माहितीनुसार याचे अमेरिकेत अगदी सर्टीफाइड कोर्सेस देखील आहेत्,आणि लोक पैसे देउन मन शांतीसाठी हे सेशन अटेंड करतात.
तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता.
दारु चे माहित नाही पण गांजाचा हा उपयोग माहित आहे,भांगेने देखील हाच परिणाम साधता येउ शकतो.मी याला एक प्रकारचा शॉर्टकट म्हणीन ज्याने तुम्हाला पटकन ध्यान एकाग्र करण्यास कमालीची मदत होते.अर्थात हे असे करणारे कमी आणि त्याचा व्यसन म्हणुन वापर करणारे अधिक. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी बरेच साधु कित्येक महिने आधी ज्या ठिकाणी कुंभ आहे त्या ठिकाणच्या आसपास या मादक पदार्थांची शेती करतात्,यात सुद्धा खरे योगी वेगळे,आणि नावाचे योगी वेगळे.
अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात.
सहमत आहे.
बाकी ऑरा विषयी ठावुक होते,अनेक चित्रांमधे {देवतांच्या}विशेषतः डो़क्याच्या भोवताली हा ऑरा दाखवला जातो.
उदा. खाली दिलेल्या बुद्धाच्या चित्रात त्यांच्या डोक्याभोवताली.
बाकी ही ऑरा {Aura} ची पळवा-पळवी मात्र पहिल्यांदाच वाचली !
2 Sep 2015 - 8:06 am | रमेश भिडे
http://sivasakti.net/
2 Sep 2015 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले
सर्वप्रथम जुन्या धागा वर काढल्या बद्दल आभार !
ह्गी लिन्क ऑफीसात ओपन होत नाही ,
इथेच त्या साईट वरील काही काही माहीती द्या ना गडे !
2 Sep 2015 - 9:08 am | कैलासवासी सोन्याबापु
विद्येद्वारा अनेक प्रकारे शत्रूला त्रास देणे किंवा सुंदर स्त्री ला मोहात पडून वश करणे / पुण्य चोरणे इत्यादी कामे केली जातात .
ब्लॅकहैट हैकिंग सारखा प्रकार दिसतोय हां!!!
3 Sep 2015 - 5:16 pm | तुडतुडी
तंत्र विद्येची ओळख कुठेय ओ ह्याच्यात . बाकीचाच फाफटपसारा लिहिलाय
चूक . सगळ्यांना एका तराजूत तोलल्यासारख लिहिलंय. अघोर तांत्रिक आणि स्वार्थी तांत्रिक ह्यांच्यात खूप फरक आहे . अघोर तांत्रिक शुद्ध , लखलखीत असतो . 'अघोर तंत्र' हि फार वेगळीच शाखा आहे तंत्राची . खराखुरा अघोरी तांत्रिक कधीही मांस खात नाही कि घाणेरड्या गोष्टी करत नाही . मुद्दामच तो त्या गोष्टी करतो असं जगाला दाखवत असतो . दुर्गम भागात किवा घाणेरड्या जागेत , घाणेरडा वेष घेवून राहतो . कारण त्याला ईश्वराशिवाय आसपास कोणाचही अस्तित्व नको असतं .
तंत्र शाक्त अघोर संप्रदायाचा अभ्यास नसताना त्या बद्दल गैरसमज पसरवू नयेत .
तुम्हाला वाचायची कोणी सक्ती केलीये का ? ह्या प्रकारचे लेख येत नाहीत म्हणूनच खूप गैरसमज आहेत
तुम्हाला लेख समजलाच नाहीये हे दाखवून दिलंत. तंत्र विद्या म्हणजे काहीतरी चुकीची , घाणेरडी विद्या असाच सूर दिसतोय सगळ्या प्रतिसादांचा . फार थोडे अपवाद सोडून .
आद्य शंकराचार्यांनी शाक्त तंत्राचा (दूरू )उपयोग करणाऱ्यांना यमसद्नाला धाडल्यानंतर ते आदिशक्ती च्या दर्शनाला गेले . पण त्यांना असं जाणवलं कि त्यांची सगळी शक्ती नष्ट होत आहे . ते अत्यंत क्षीण आणि अशक्त झाले . अगदी एक पाऊल सुधा पुढे टाकायची किवा डोळे उघडून बघण्याची सुधा शक्ती त्यांच्यात राहिली नाही . त्यांनी देवीची करुणा भाकली . आणि तिच्या दर्शनासाठी तिची आळवणी केली . तेव्हा देवी प्रकट होवून म्हणाली , "तू तंत्राचा दुरुपयोग करणाऱ्या दुष्टांचं हनन करताना खर्या सात्विक , तंत्रीकांचं सुधा हनन केलंस. का तर ते शाक्त पंथीय आहेत म्हणून ? त्यामुळे मी तुझ्यावर रागावले आहे आणि तुझ्यातला शक्तीचा अंश काढून घेतला आहे ". शंकराचार्यांना आपली चूक उमगली . त्यांनी तिची माफी मागून तिला प्रसन्न करण्यासाठी तिची स्तुती केली . मग त्यांना त्यांची शक्ती परत मिळाली .
3 Sep 2015 - 5:26 pm | द-बाहुबली
तुडतुडी-G तुम्ही मिपावर बर्याच लोकांचे गैर्समज फार सुरेख अन मुद्देसुद दुर करत आहात. किंबहुना मला तर आपल्यामधे काही दैवी शक्तीचा अंश असावा अशीही शंका येउ लागली आहे. आपण नक्किच महान साधक असणार. _/\_
लिहीत रहा.
3 Sep 2015 - 5:35 pm | बॅटमॅन
क्या बात है, मिपावर बाहुबलीही आला तर! कट्टप्पाही अगोदरपासून आहेच, आता भल्लाळदेवा, सिवगामी आणि कालकेय वगैरे आयड्यांची वाट पाहणे आले.
3 Sep 2015 - 5:37 pm | द-बाहुबली
अरे बॉमकेस बाबुंचे स्थित्यंतर झालयं...
4 Sep 2015 - 2:31 pm | तुडतुडी
ओ द-बाहुबली ,मी महान साधक वगेरे नाहीये . पण बनण्याचं स्वप्न नक्कीच आहे . साधना चालू अहे. गेल्या ६ वर्षांपासून साधना , देव , अध्यात्म , धर्म ह्या विषयांचा अभ्यास चालू आहे . भरपूर पुस्तकांचं वाचन झालं आहे . बर्याच लोकांना भेटणं झालं आहे . काही साधना मी स्वतः केल्या आहेत आणि अनुभव हि घेतले आहेत . पुढेही हा उद्योग चालू राहील. तंत्रविद्येचा theoratical अभ्यास आहे . practical साठी अजून कोणी समर्थ गुरु नाही मिळाला
4 Sep 2015 - 3:24 pm | द-बाहुबली
तुडतुडी, आपलं बर्याच लोकांना भेटणं झालं आहे . काही साधना आपण स्वतः केल्या आहेत आणि अनुभव हि घेतले आहेत . याबद्दल जरुर वाचायला आवडेल. अवश्य लिहा ( हे अनुभव प्रकट करायचे नसतात असे मात्र म्हणू नका प्लिज)
4 Sep 2015 - 9:56 pm | पैसा
ते अघोरी विद्येचे प्रयोग आमच्या मिपावर करू नका प्लीज!
2 Jun 2016 - 4:40 pm | प्रसाद गोडबोले
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
2 Jun 2016 - 5:07 pm | अनंत छंदी
अहो भिडेजी ते तुमचे मित्र छोटा भिम की कोण ते अगदी नावाप्रमाणेच बालबोध लिहितात हो. आद्य शंकराचार्यांनी म्हणे तांत्रिक विद्येची निंदा केली...... शंकराचार्य : तांत्रिक साधना भाग १ व २, प्रकाशक चौखंभा, वाराणसी वाचा म्हणजे शंकराचार्यांनी तांत्रिक साधनेची निंदा केली किंवा कसे हे कळेल. गौडपादाचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य तंत्रमार्गाचा अवलंब करायचे. तंत्र आजही आपल्या धर्मोपासनेत आहे.
2 Jun 2016 - 8:35 pm | सतिश गावडे
भिडेजी, या तंत्र विद्येचा प्रयोग मिपा संपादकांवर करुन आयडी उडवला जाणार नाही याची काही तजवीज करता येईल का?
काही लोक दरवेळी काहीतरी नविन आयडी घेऊन येतात आणि काड्या करतात. संमं असे आयडी उडवते. तुमच्या या तंत्र विद्येचा त्यांना उपयोग होईल असे वाटते.
2 Jun 2016 - 9:20 pm | अभ्या..
किंवा सामूहिक यज्ञ वगैरे असे काही.
एकदाच कंडका पाडून टाकू तिज्यायला.
3 Jun 2016 - 8:42 am | रमेश भिडे
तुमचं निरीक्षण चुकलं आहे.
अभ्यास वाढवा. तंत्र विद्येबाबत नंतर बोलू.
3 Jun 2016 - 9:10 am | सतिश गावडे
निरीक्षण बरोबर आहे. :)
1 Jul 2021 - 4:55 am | संन्यस्त खड्ग
अनेकांना मी लिहिलंय ते पटणार नाही पण जे माहीत आहे ते सांगतो आहे।
मुलींना पटवून दुरुपयोग करण्यासाठी अनेक जण Black magic चा सर्रास उपयोग करत आहेत।
आणि आपण तसलं काही नसतं हो म्हणून आधुनिक बनायला बघतोय।
समोर result दिसतअसताना।
हे शंभर टक्के खरे आहे पण आपल्या हिंदू समाजातील अति विद्वानांना हे मान्य नसते. नित्य उपासनेचे बळ नसणाऱ्या कुटुंबातील मुली या प्रकाराला बळी पडतात.
विश्वास बसत नसला तरी खरंय हे_!!! मी जेव्हा लव्हजिहाद सारख्या प्रकरणात समुपदेशक म्हणुन जाते, तेव्हा असे प्रकार पाहायला मिळतात_!! मुलींवर अंमल असतोचं असतो_!! आई वडिलांना, पुढारलेल्या लोकांना खोटं वाटतं, पण डोळ्यानी पाहिलं की, पोरीचं काय झालं असतं या विचाराने पायाखालची जमीन सरकते_!! अवघड परिस्थिती आहे_!!! लोकांना समजावुनही पटत नाही, अशावेळी शांत राहुन जे होईल ते बघणे, इतकंच आपण करु शकतो_!!
ह्या प्रकाराला दही वाटी प्रयोग म्हणतात, आणि हे शांती दूत आपली वासना विझवण्यासाठी करतात। जी चांगली मुलगी असते आणि दिसते आणि उच्च जातीची असेल तर बघायलाच नको.
हे सर्व प्रकार शाळा, कॉलेजेस, सर्व प्रकारचे कोचिंग आणि ट्युशन वलासेस येथे चालतात.
सुरवातीला ओळख नंतर घसीत वाढवायची आणि त्यानंतर मुद्दामून शाकाहारी सतत घरून डबा आणायचा आणि त्यात दही असतेच असते आणि तो डबा आपल्या सावजाला शेयर करायला लावायचा,फक्त एका आठवडयात मुलगी वश आणि मग ओयो रुम्स नंतर निकाह आणि धर्म बदल.
हे मी गेली 40 वर्षे बघत आहे आणि सगळयांना सांगत आहे , आपल्या मुलांची संगत कोणाशी आहे ते बघा, त्यांची वागणूक बदली आहे तर कानाडोळा करू नका, कोणाचे सारखे फोन येतात ते चेक करा नाहीतर एकदम चार पाच जावाई स्वीकारण्याची तयारी ठेवा.
मित्रानो मी हे अगदी जवळून पाहिले आहे आणि बरेच शांतिदूत माझे शाळेपासून मित्र आहेत, पण काय करणार?
सत्य कटू आह.
आपल्या मुलींना आणि मुलांना सुध्दा सांभाळा
सर्वात महत्वाचे ह्या लोकांचे देव लवकर वश होतात आणि आपल्या देवांचे ह्या प्रयोगा समोर काही चालत नाही हा अनुभव आहे आणि हे लोक पाप पुण्य असे काही मानत नाहीत।
बस मला फार काही माहीत नाही, मी एक साधारण आणि अति सामान्य गरीब हिंदू भारतीय आहे।
धन्यवाद।
1 Jul 2021 - 7:45 am | कॉमी
१. पावरबाज दही. च्यामारी कालेजात आमच्यावर प्रयोग झालेत का काय ? भरपूर दही वाट्या खाल्ल्या आहेत. आता आमच्यावर दही वाटी प्रयोग कोणी का करतील प्रश्न वेगळा.
२. चार पाच टोकन शांतिदूत मित्र सेफ्टी म्हणून असावेतच. नाहीतर द्वेष्टे म्हणतील लोकं. पण तुम्हाला चार पाच मित्र आहेत ना, मग माफ, काही पण बोलणे खपवले जाईल.
३. देव पण पावरबाज ? आता कसं व्हायचं मग ?!
४. हे लोक पाप पुण्य काही मानत नाहीत
- काय सांगता ! कोण आहेत "हे" शांतिदूत कन्फ्युज झालो या वाक्यामुळे. कोण आहेत शांतिदूत स्पष्टपणे सांगा जरा.
५.
असं ! दह्याची वाटी उडवली कि नाही मग, कि खाऊ दिलं तसेच ? जवळ होता म्हणून विचारलं.
1 Jul 2021 - 6:13 pm | गॉडजिला
आता आपले देवच फेल जात असतील तर विषयच मिटला...
पण हो परधर्मातील स्त्रीचा सां,दाम,दंड भेद करून भोगासाठी वापर ही अहिंदू मानसिकता राखणारे अनेक लोक प्रत्यक्षात पाहिले असल्याने ही मानसिक प्रवृत्ती सखोल अस्तित्वात आहे हे भीषण वास्तव आहे.
1 Jul 2021 - 9:58 pm | टवाळ कार्टा
हिरोईनवर चालेल का ते ब्लॅक मॅजिक??
1 Jul 2021 - 8:24 am | मदनबाण
हे शांती दूत आपली वासना विझवण्यासाठी करतात।
तंत्र विद्येचे माहित नाही, पण अजुन एका सोप्या पद्धतीने अशांती दूत हिंदू मुलींना सहज जाळ्यात अडकवतात. ज्या परिसरात हिंदू आणि मुस्लिम वस्ती जवळ जवळ असते तिथे अनेक मोबाइल चार्जिंगची दुकाने असतात. हिंदू मुली / स्त्रिया जेव्हा अश्या दुकानांमध्ये मोबाइल रिचार्ज करायला जातत तेव्हा त्यांचे मोबाइल नंबर तिथेच ठेवलेल्या वहीत नोंदवुन ठेवले जातात... मग हळुहळु हिंदू नावांनी त्यांच्याशी फोन वरुन संपर्क साधला जातो. आता तर व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप्लिकेशन्स आहेत. आधी मैत्री मग मैत्रीतुन सलगी वाढवली जाते, मग सेल्फी प्रकारातुन फोटोंची देवाण घेवाण...असे करत करत मग प्रत्यक्ष भेट [ पाठवलेल्या फोटोतुन ब्लॅकमेलिंग करुन देखील बोलवले जाते ] मग अश्या मुलींना खोलीत नेले जाते आणि सरळ बलात्कार केला जातो. जो ओळखीचा मुलगा [सावज टिपण्याची कामगिरी ज्याला दिली असते ] तो तर बलात्कार करतोच पण त्याच बरोबर इतर तरुणही लाईनीत खोलीच्या बाहेर वाट बघत थांबलेले असतात. एकाने बलात्कार केला की आळी-पाळीने बाकीचे देखील त्याच मुलीवर बलात्कार करुन त्यांची क्रूर वासना शमवतात. याचे मोबाइल किवा इतर कॅमेरा वापरुन चित्रिकरण करतात आणि ती मुलगी मग कायमची यांची भोगण्याची लोंढी होउन जाते, याच मुलीला भरास पाडुन मग तिच्या जवळच्या मैत्रिणी- इतर घरातील स्त्रिया देखील अश्याच आळी-पाळीने भोगल्या जातात. [ यात इतर प्रकार केला जातो तो मी इथे उघडपणे लिहु शकत नसलो तरी सांगतो की अश्या चित्रफिती ऑनलाईन वितरीत केल्या जातात ज्यात हिंदू मुलीचा चेहरा [ टिकली लावलेली, गळ्यात मंगळसुत्र असलेली दाखवतात आणि तिचा भोग घेणारा अशांतीदूत त्याची वेगळ्या पद्धतीने ओळख स्पष्ट करतो. हा मानसिक अत्याचाराचा उपयोग करण्यासाठी आहे, ज्यात अशांतीदूत पहा तुमच्या मुली कशा भोगुन काढतो हे बिंबवायचे असते ] स्पष्ट दाखवला जातो.
तेव्हा हिंदू स्त्रियांनो आणि मुलींनो सावधान ! आपला नंबर कुठेही देताना सतर्कता ठेवावी आणि अनोळखी अगदी हिंदू नावाच्या मुलाशीही अनोळखी नंबर वरुन येणार्या कॉल्सवर बोलणे टाळावेच आणि कुठलीही व्यक्तिगत गोष्ट अश्या नंबर्सवर शेअर करु नये.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman
1 Jul 2021 - 6:53 pm | गामा पैलवान
गॉडझिला,
म्हणूनंच आपण साधना करून देवांना बळ पुरवायचं असतं.
आ.न.,
-गा.पै.
1 Jul 2021 - 6:58 pm | गॉडजिला
हे जरा विस्तारून सांगता का ?
2 Jul 2021 - 1:56 am | गामा पैलवान
गॉडझिला,
एक उदाहरण देतो. साधना असली की पितर अतृप्त रहात नाहीत. पितर तृप्त असतील तर जातक काळ्या जादूच्या तडाख्यात सापडायची शक्यता उणावते.
आ.न.,
-गा.पै.
2 Jul 2021 - 3:59 pm | गॉडजिला
सांगता का जरा ?
2 Jul 2021 - 7:20 pm | गामा पैलवान
गॉडझिला,
पितरांना दिली. त्यांनी पुढे पाठवली असू शकते.
दरवर्षी गणपतीस देतो. गणपतीबाप्पा मोरया असा जयघोष करून.
आ.न.,
-गा.पै.
2 Jul 2021 - 8:47 pm | टवाळ कार्टा
गणपती स्वतःच्या पावरसाठी आपल्यावर अवलंबून आहे हे ऐकून मौज वाटली
2 Jul 2021 - 10:05 pm | गॉडजिला
बौध्दीक पावर गणपतिने काढुन घेतल्यामुळे वाटत असावे की ते गणपतिला पावर देतात ?
3 Jul 2021 - 2:22 am | गामा पैलवान
टवाळ कार्टा,
पावरसाठी गणपती माझ्यावर अवलंबून नाही. पावरसाठी मी गणपतीवर अवलंबून आहे.
नैवेद्यासाठी देव भक्तावर अवलंबून नसतो. उलट नैवेद्यासाठी भक्त देवावर अवलंबून असतो. तसंच पावरचं समजा.
आ.न.,
-गा.पै.
3 Jul 2021 - 6:11 pm | कॉमी
पण तुम्हीच म्हणाला की देवाला बळ पुरवायचं !
1 Jul 2021 - 10:08 pm | Rajesh188
सर्व प्रकारची मत,सर्व प्रकारच्या विषयावरील लेख ,सर्व. प्रतिक्रिया कोणाला आवडत नाहीत ,पटत नाहीत म्हणून चुकीच्या नाहीत.
जर कमेंट,लेख,ह्या मध्ये एकध्या समाज घटका विषयी,व्यक्ती विषयी तिरस्कार नसेल तर .फक्त काही लोकांना आवडत नाही ,पटत नाही .
म्हणून प्रशासन( मीपा ) नी हस्तक्षेप करू नये.
2 Jul 2021 - 4:07 pm | गॉडजिला
गामा फार नम्र होते म्हणुन आपण नेहमी आ. न. असे प्रतिसादात लिहता हे फार छान वाटते पण तुम्ही जे प्रतिसाद लिहता तसले विचार गामाजिंनी कधिच मिपावर लिहले नसते मांडले नसते त्याबाबत तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहात असे वाटत नाही का ?
2 Jul 2021 - 8:58 pm | नावातकायआहे
कुणितरी धर्म वेगळे असले तरी देव एकच आहे असे काहितरी चुकिचे विधान केल्याचे स्मरते.
आता देवा देवात पण पॉवर वाटली जाते. मग लोकसंख्यांच्या आधारे , येशू, मोहम्मद, तटस्थ, न मानणारे मग हिंदू!!
तटस्थ, न मानणारे यांचे काय होते?
2 Jul 2021 - 9:36 pm | शा वि कु
अद्वैत तत्वज्ञानानुसार सगळंच एक आहे अशी समजूत आहे अशी माझी समजूत आहे.
अशी पावर वाटली जात असेल तर ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू तिघांची पावर एका देवाला मिळणार आणि तो किती पावरफुल होणार.
(येशू आणि मोहम्मद देव नाहीत ना ?)
2 Jul 2021 - 10:18 pm | नावातकायआहे
तटस्थ, देव न मानणारे यांच्या पॉवरचे काय होते?
का ते " आमाला पावर नाय " मानतात?? :-)
2 Jul 2021 - 11:13 pm | शा वि कु
त्यांची पावर तेच स्वतः वापरत असावेत बहुतेक. गामांना माहीत.