साहित्य.
बटाट्यच्या काचर्या एकदम पातळ चिरलेल्या
आलं, मिरची , आणि जिरे एकत्र वाटुन
१ डबा
मीठ, साखर चवी प्रमाणे
नारळ, कोथिंबीर
लिंबु( आवडत असल्यास्..मला आवडते म्हणुन मी घालते ते आवश्यक आहे अस नाही)
पाव चमचा तुप.
क्रुती:-
१ घट्ट झाकणाचा डबा घ्या त्याला पाव चमचा तुप लावुन घ्या.
कोथिंबीर, लिंबु सोडुन सर्वा पदार्था एकत्र करावेत आणि डब्याला झाकण लावुन कुकर मध्ये ३ शिट्या काढा. बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबु पिळुन खा.
हा पदार्थ कमी उष्मांकाचे पदार्थ खाणर्यासाठी छान आहे.
आणि चटकन होणारा ही आहे.
प्रतिक्रिया
1 Sep 2008 - 11:03 am | मेघना भुस्कुटे
नक्की करून पाहते आजच. :)
1 Sep 2008 - 11:13 am | मनस्वी
एकदम चटपटीत प्रकार दिसतोय. नक्की करून बघीन.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
1 Sep 2008 - 11:23 am | विसोबा खेचर
अरे वा!
स्नेहश्री, तुझा डब्बा-बटाटा करून पाहिला पाहिजे एकदा! :)
आपला,
(लखनवी डब्बा-गोश्त प्रेमी) तात्या.
1 Sep 2008 - 11:30 am | सहज
करुन पाहीलेच पाहीजे अशी डिश आहे!
1 Sep 2008 - 11:34 am | गणा मास्तर
टप्परचा डबा घेउन ओवन्मध्ये ठेवला तर चालेल का?
1 Sep 2008 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी मायक्रोवेव्हमधे झाकण लावून डबा ठेवला होता, झाकण मधून आत गेलं. हवंतर प्रयोग करून पहा आणि मलाही सांगा झाकण वाकतं का ते!
बाकी चालेल असं वाचून तरी वाटतंय.
(अंदाजे) अदिती
1 Sep 2008 - 11:50 am | स्नेहश्री
हरकत नाही फक्त मग त्या बटाटयावर थोडा पाण्यच स्प्रे मारा.
आणि प्लास्टिक ची फोइल असते ना तिला ४/५ छिद्र पाडुन लावा.
पाणी स्प्रे न केल्यास बटाटा आक्रसतो.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
1 Sep 2008 - 11:58 am | स्नेहश्री
@ सहज, तात्या साहेब, मनस्वी आणि मेघना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नक्की करुन बघा आणि सांगा आवडलाका ते.
@ गणा साहेब,
झाकण फुटतं.
आम्ही मध्ये असले प्रकार करुन बघितले होते...पण मातोश्रीं च्या क्रोधामुळे ते आवरते घेतले.....!!!
आणि आत (टप्परचा डबा )मध्ये तयार होणार्या वाफेमुळे झाकण फारसे टिकत नाही ते सारखे उघड्ते.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
1 Sep 2008 - 12:26 pm | मेघना भुस्कुटे
डब्याचं झाकण थोडं उघडून ठेवायचा डबा. मग काही नाही होत.
1 Sep 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश
हा मस्त प्रकार दिसतोय.. करून पाहिनच स्नेहश्री..
मायक्रोवेव मध्ये करायचा झाला तर काचेचे झाकण वाफ थोडी जाईल असे ठेवता येईल नाहीतर मायक्रोवेवच्या भांड्यांवर ठेवण्यासाठी वेगळी भोकं असलेली प्लास्टीकची झाकणे असतात ते ठेवता येईल.
स्वाती