नाचणीचे पौष्टीक लाडू

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
15 Feb 2013 - 4:44 pm

साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी(अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार.
क्रुती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजुला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही.
हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात.

ladu

प्रतिक्रिया

मन१'s picture

15 Feb 2013 - 4:57 pm | मन१

माझा प्रचंड आवडता प्रकार हा.
पण मी पुण्यात सदैव दुकानातून्,हलवायांकडून गृहौद्योगवाल्यांकडून आणलेले लाडूच खायचो हे.

श्रिया's picture

15 Feb 2013 - 9:56 pm | श्रिया

छान आहे रेसिपी.

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:00 pm | पैसा

पाकृ आवडली. सोपी आणि मस्त!

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 10:02 pm | अभ्या..

स्वादिष्ट आणि पौष्टीक पाकृ.
धन्यवाद अनन्यातै.
@मनराव: हे लाडू विकतपण मिळतात पुण्यात सर्वत्र? चांगले आहे खरच.

तर्री's picture

15 Feb 2013 - 10:54 pm | तर्री

पुण्यात मिळतात.. आणि बरे असतात पुण्याच्या मानाने ....

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2013 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2013 - 1:48 pm | सानिकास्वप्निल

पौष्टीक पाकृ
नाचणीचे लाडू आवडतात, अशा प्रकारे करुन बघेन :)
धन्यवाद

दिपक.कुवेत's picture

16 Feb 2013 - 1:51 pm | दिपक.कुवेत

आता ईथे उन्हाळा चालु होइल तेव्हा नक्कि करुन पाहिन....धन्यवाद अनन्न्या

करुन बघायला पाहिजे.. पण इथे नाचणीचे पिठ मिळणे मुश्कील.

५० फक्त's picture

16 Feb 2013 - 5:04 pm | ५० फक्त

फार फार धन्यवाद, ते दोन केक आणि अजुन ते दि.कु.चं पिस्त्याचं काहीतरी, बापरे, मिपा कसलं फॅटी झालं होतं मागच्या आठवडयात. अगदी प्रतिसाद लिहिताना पण धाप लागायची.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2013 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार

सुरेख पाकृ.

ह्या भारतवारीत ह्या लाडवांची खरेदी पक्की.

सुबोध खरे's picture

16 Feb 2013 - 7:03 pm | सुबोध खरे

नाचणी ला सहज सहजी कीड लागत नाही.आणि ती अशीच ठेवली तरी त्याल वास लागत नाही .त्यामुळे लाडू बरॆच दिवस टिकतात
नाचणी चे पीक अगदी कमी पावसात किंवा निकृष्ट जमिनीत हि येते त्यात चरबीचे प्रमाण फक्त १.५ टक्के आहे त्यामुळे स्थूल (जाड्या) माणसाना देण्यास योग्य. पिष्टमय पदार्थ ८८ % आणि प्रथिने ७.५% असतात
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात् ३७५ मिली ग्राम कल्शियम असते. म्हणजे मुलांना किंवा स्त्रियांना १ लाडू दिल्यास त्यांच्या दिवसभराच्या कल्शियमची गरज भागू शकते.ब जीवनसत्त्व सुद्धा भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे लाडू वाढत्या वयाच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत

अनन्न्या's picture

16 Feb 2013 - 7:17 pm | अनन्न्या

सर्वांचे आभार!!

विलासिनि's picture

18 Feb 2013 - 12:26 pm | विलासिनि

पोहे घातल्यामुळे टिकावूपणात काही फरक पडेल का?

अनन्न्या's picture

18 Feb 2013 - 5:02 pm | अनन्न्या

बेसनाच्या लाड्वासारखेच टिकतात!! माझ्याकडे अशी वेळच येत नाही कारण आमचे एकत्र कुटुंब आहे. दोन-तीन दिवसात संपतात सगळे लाडू!!

सस्नेह's picture

18 Feb 2013 - 3:24 pm | सस्नेह

लाडू पौष्टिक आहेत खरंच.
मला नाचणीची घट्ट आंबील जास्त आवडते...पचायलाही हलकी.

यात कोको पावडर देखिल छान लागते

जयवी's picture

19 Feb 2013 - 1:23 am | जयवी

अरे वा....... आवडली ही पाककृती.....करुन बघेन नक्की :)