जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

आवशीचो घोव्'s picture
आवशीचो घोव् in काथ्याकूट
16 May 2010 - 10:37 am
गाभा: 

मिपाच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार!

मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,
"जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो."

मी विचारले कसं काय?

तर तो म्हणाला हिंदू सोडून सर्व धर्मियांवर जन्म झाल्याबरोबर धर्मांतराचे संस्कार होतात.
मुसलमान - सुंता
ख्रिश्चन - बाप्तिस्मा
शिख - अमृत
झोराष्ट्रियन - नवजोत
जैन - उपदेसम
इत्यादी

पण हिंदूंवर कोणताही "धर्मांतराचा" संस्कार केला जात नाही.

हे विधान कितपत सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे याबद्दल मज पामराला काही कल्पना नाही.

हिंदू धर्माला सनातन धर्म मानले जाते याचे कारण हेच असावे का?

मिपावर याविषयी चर्चा झाल्यास आवडेल.

(वर उल्लेखित केलेले विचार हे व्यक्तिगत विचार असून ते पूर्णत: चुकीचेही असू शकतात. मात्र कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना दुखावण्याचा माझा हेतू नाही.)

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

16 May 2010 - 11:46 am | अविनाशकुलकर्णी

हिंदु हिंदु म्हणुन नुसता जन्माला न येता तो, मराठा,ब्राह्मण, कोळी, शिंपी म्हणुनही जन्माला येत असतो

आवशीचो घोव्'s picture

16 May 2010 - 12:02 pm | आवशीचो घोव्

माझ्या मित्राचे विधान खरोखर विचार करण्यासारखे आहे की टाकाऊ? यावर मला प्रतिक्रीया अभिप्रेत आहे. जातीबद्दल मी कुठेही उल्लेख केला नाही.

खटासि खट's picture

14 Feb 2013 - 5:46 am | खटासि खट

कुठेतरी वाचलंय.
मुसलमान म्हटले कि आपण म्हणतो ठीक
ख्रिश्चन म्हटले कि आपण म्हणतो ठीक
शीख म्हटले कि आपण म्हणतो ठीक
पण हिंदू म्हटले कि आपण ठीक म्हणू शकत नाही. हिंदू ही ओळख पूर्ण नाही. कुठली जात हा पुढचा प्रश्न तयार असतो. म्हणूनच जन्माला येणारा हिंदू म्हणून नाही तर जात घेऊन जन्माला येत असतो. धर्मांतर होऊ शकतं पण जात्यांतर नाही. ती अभेद्य आहे. धर्म बदलला तरी जात जात नाही. तुमच्या मित्राचं विधान आता तुम्हीच तपासून पहा.

आजानुकर्ण's picture

16 Feb 2013 - 12:18 am | आजानुकर्ण

जात हीच पूर्वीची ओळख होती असे दिसते. कारण सगळेच हिंदू! धर्म बदलला तरी जात तशीच राहते. धर्मांतर करुनही भारतातल्या काही ख्रिश्चनांमध्ये ब्राम्हण आणि दलित अशी वर्गवारी आहेच.

मला पडलेला प्रश्न= हाजारो / करोडो वर्षांपुर्वी जेंव्हा धर्म ही संकल्प्ना अस्तित्वात आली नव्हती तेंव्हा काय होते ? (माझ्या पुरत मी शोधलेल उत्तर म्हणजे "नर आणि मादी")
आपल्याला अजुन माहीती हवी असल्यास कृपया वेदांचा अभ्यास करावा ही विनंती. (अपौरुशेय)वेद मला तरी कुठीही बायस्ड वाटले नाहीत.
bu

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

तिमा's picture

16 May 2010 - 12:50 pm | तिमा

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ति ही मनुष्यप्राणी म्हणूनच जन्माला येते. त्यानंतर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे त्याला धर्म, जात वगैरे चिकटते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

Manoj Katwe's picture

17 May 2010 - 8:44 am | Manoj Katwe

ह्या विश्वात फक्त दोनच धर्म आहेत
१) चांगला
२) वाईट

जो मनुष्य आयुष्यभर चांगले कर्म करून जनाला व स्वताला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो तो चांगला,
जो फक्त स्वताचेच पोट भरतो तो वाईट.

कसला हिंदू आणि कसला मुस्लीम,
हे सगळा खेळ माणसानेच तयार केला आहे.
सगळ्याचा रक्त एकच आहे, सगळ्यांच्या भावना एकच, पोट एक,
पण हे काही leader लोक जी असतात त्यांना राज्य करण्यासाठी काहीतरी हवे म्हणून हे धर्म.
सगळे एक झाले तर हे leader लोक राज्य कसे करणार ?

आशु जोग's picture

13 Feb 2013 - 8:11 pm | आशु जोग

छोटासा आक्षेप
जैन शीख हे हिंदू संस्कृतीचेच भाग आहेत

आनंदी गोपाळ's picture

15 Feb 2013 - 8:22 pm | आनंदी गोपाळ

तुमचे विधान चुकीचे आहे

इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर आहे. पुढे हे धर्म वेगळे झाले ही वस्तुस्थिती असली तरी यांची सांस्कृतिक ओळख ही हिंदुधर्मापेक्षा फार काही वेगळी नाही. किंबहुना आपल्या वेगळ्या सांस्कृतिक ओळखीसाठी मारामारी करणे हा या तीनही धर्मांचा विशेष नाही. असो.

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:44 pm | पैसा

बौद्ध आणि जैन मत तसेच शीख पंथ असेच पूर्वीपासून ऐकले आहे.

विकास's picture

15 Feb 2013 - 10:53 pm | विकास

खालील माझ्याच एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, हिंदू हा प्रथम भौगोलीक अर्थाने एका भागात रहाणार्‍या समाजासाठी वापरला गेलेला शब्द आहे. नंतर त्याला रिलीजन अर्थाने धर्म चिकटला गेलेला आहे. पण हिंदू संस्कृती ही विविध दर्शन, तत्वज्ञान वगैरेंनी भरलेली आहे. पण त्या सर्वाचे सांगणे "एकम् सत् विप्रा बहुदा वदंती" प्रमाणे एकच आहे.... खालील एकात्मता मंत्र त्याचे चांगले वर्णन करतो. (हिंदी विकीपिडीयामधून)(http://hi.wikipedia.org/wiki/एकात्मता_मंत्र)

यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः
इन्द्रं यमं मातरिश्वा नमाहुः |
वेदान्तिनो निर्वचनीयमेकम्
यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति ||

शैवायमीशं शिव इत्यवोचन्
यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति |
बुद्धस्तथार्हन इति बौद्ध जैनाः
सत् श्री अकालेति च सिख्ख सन्तः ||

शास्तेति केचित् कतिचित् कुमारः
स्वामीति मातेति पितेति भक्त्या |
यं प्रार्थयन्ते जगदीशितारम
स एक एव प्रभुरद्वितीयः ||

एकात्मता मंत्र का अर्थ
प्राचीन काल के मंत्र दृष्टा ऋषियों ने जिसे इन्द्र (देवताओं के राजा, वर्षा के देवता), यम (काल के देवता), मातरिश्वा (हर जगह विद्यमान) कहकर पुकारा और जिस एक अनिर्वचनीय (जिसका वर्णन नहीं किया जा सके) को वेदांती (वेद, शास्त्र के ज्ञाता) ब्रह्म शब्द से निर्देश करते हैं.
शैव जिसकी शिव और वैष्णव जिसकी विष्णु कहकर स्तुति करते हैं. बौद्ध और जैन जिसे बुद्ध और अरहंत (जिसका कोई अंत न हो ) कहते हैं. जिसे सिख संत सत श्री अकाल (कालातीत या समय से परे का सत्य) कहकर पुकारते हैं.
जिस विश्व के स्वामी को कोई शास्ता (शास्त्र निर्माता) तो कोई कुमार (अखंड ब्रह्मचारी), कोई जिसको स्वामी, माता - पिता कहकर भक्तिपूर्वक प्रार्थना करते हैं, वह प्रभु एक ही है और अद्वितीय है यानि उसका कोई दूसरा जोड़ या विकल्प नहीं

हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत भारती वाल्यांनी बनविलेला आहे. असो.

नाना चेंगट's picture

15 Feb 2013 - 11:02 pm | नाना चेंगट

बरोबर आहे तुमचे.

विकास's picture

15 Feb 2013 - 11:53 pm | विकास

उत्सुकतेपोटी गुगगले तर एक या संदर्भातला दुवा मिळाला. या दुव्यातील माहितीनुसार: तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संस्कृत विद्वान श्री. श्रीपाद भास्कर वर्णेकर यांना भारतीय भूमीत तयार झालेल्या सर्व श्रद्धा-तत्वज्ञानांचे प्रतिनिधित्व करणारा श्लोक/मंत्र लिहायला सांगितला होता.

मला वाटते संस्कृत भारती बर्‍यापैकी नंतरची असावी.

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 12:00 am | बॅटमॅन

रोचक आहे. धन्यवाद :) एनीवेज उत्तरकालीन आहे हे माहिती होते आणि पहिल्यांदा संस्कृतभारतीमध्ये ऐकल्याने मला वाटले की त्यांनीच रचला असेल. असो.

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 12:04 am | अभ्या..

काही आठवले बॅट्या?
वेर्णेकर....? संस्कृत मंडीत?
मला हिच लिंक लागली नव्हती. :(

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 12:08 am | बॅटमॅन

वेर्णेकर द नागपुरी!!!!

येस्स, आत्ता आठवले बघ अभ्या :)

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 12:14 am | अभ्या..

श्रीधर शास्त्री वेर्णेकरांनी कुमारवयातच स्वा. सावरकरांची भेट घेऊन त्यांच्याच 'याल तर तुमच्या सह......" या प्रसिध्द उद्गाराचे श्लोकबध्द संस्कृत रुपांतर करुन दिल्याचे स्मरते.

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 11:46 am | नाना चेंगट

अरेच्च्या ! मग संस्कृत भारतीचे लोक हा त्यांचा श्लोक असे का सांगतात? जातोच या रविवारी आमच्या इथल्या संस्कृत भारतीच्या बाईंकडे सकाळी सकाळी आणि विचारतो असे का करता म्हणून. वर चहापोहे पण हादडून येतो आणि त्यांच्या पोरांना लवकर ऊठत जा म्हणून डोस पाजून येतो.

पैसा's picture

16 Feb 2013 - 1:53 pm | पैसा

त्यांची मुलं मोठी झाल्यावर मिपावर येऊन तुम्हाला शिव्या घालतील झोपमोड केली म्हणून!

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 2:02 pm | अभ्या..

=)) =)) =))
राष्ट्रकाकू नं २

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 2:13 pm | नाना चेंगट

हॅ हॅ हॅ

आमची निम्मी लाकडं आताच मसणात गेली आहेत,ती पोट्टी मोठी होईसतोवर उरलेली जातील. तेव्हा टेन्शन नाय... :)

विकास's picture

16 Feb 2013 - 6:10 pm | विकास

घरातील स्वैपांकघरात काम करणारी व्यक्ती (स्त्री अथवा पुरूष) देखील म्हणणार, हे मिपाची लोकं घरी येऊन चहापोहे मागून खातात म्हणून. ;)

प्यारे१'s picture

16 Feb 2013 - 2:09 pm | प्यारे१

सगळे जण संस्कृत भारती का म्हणत आहेत?

'संस्कारभारती' म्हणा बरं १०० वेळा सगळे जण!

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 2:14 pm | नाना चेंगट

ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल..

तुम्ही म्हंता ते वायलं आमी म्हंतो ते वायलं

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 2:17 pm | अभ्या..

संस्कारभारती म्हणजे होलसेल रांगोळीवाले. :)

प्यारे१'s picture

16 Feb 2013 - 2:24 pm | प्यारे१

जल्ला हा नाव कंदी आईकला नाय तां?

संस्कार भारती कसा मुटी मुटीनं रांगोल्या काडून फेमस झालं तसा ह्यांनी काय केला नाय काय?

बाकी आमीबी मराटीच हाव नाना! आमाले आपलं म्हना. :)

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 2:31 pm | नाना चेंगट

जल्ला त्ये लोकं समदी सन् सन् सनस स्नस..संस.. संस्क्र..च्यामारी.. संस्क्रीत..संस्क्रूत.. संस्कृत जमलं संस्कृतमधे बोलतात म्हनून नसल आईकला कंदी...
ह्यांच्यावालं काम मुटी मुटीच नसतं बाबा...

तुमी आपलेच हाय वो... तवा निवांत रावा

ते मात्र तसे मानत नाहीत

मग बघुया जन्माला येणारा प्रत्येक जण त्या व्याखेत असतो की नसतो ते.

तरीही शतकी धाग्यासाठी शुभेच्छा.

आदूबाळ's picture

14 Feb 2013 - 12:31 am | आदूबाळ

धाग्यातल्या विचाराप्रमाणे मनातल्या मनात एक व्हेन (Venn diagram) डायग्रॅम काढून पाहिला आणि जास्तच हसू आलं...

बॅटमॅन's picture

13 Feb 2013 - 11:07 pm | बॅटमॅन

च्या आवशीचो घोव!!!!!!!! अगदी नाव आठवतं या काकूचं शीर्षक पाहून. चालूद्या, बिट टू ओल्ड फॉर धिस शिट!

काळा पहाड's picture

13 Feb 2013 - 11:12 pm | काळा पहाड

याच्यात शिवधर्माचं नाव नसल्याबद्दल निषेध.

खटपट्या's picture

14 Feb 2013 - 2:53 am | खटपट्या

माझा एक मित्र सनातन प्रभात बरोबर काम करतो. त्याच्या म्हणन्या प्रमाणे हिन्दू धर्म हा सनातन धर्म आहे. जो प्रुथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राला लागू होतो. हे खरे आहे काय?

जाणकारान्कडून अधिक माहीतीची अपेक्षा...

काही जण जन्माला आल्यावर काहीच नसतात, पण मरताना मात्र वाय झेड म्हणून मरतात
(जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्री) चावटमेला

जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्री

असले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला.

(रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅन) गॉथमदुष्टनिर्दालक वेनकुलावतंस मार्जारिभर्ता वाल्गुदेय. ;)

अद्द्या's picture

14 Feb 2013 - 2:55 pm | अद्द्या

अगागागागागा ..

जिभेला गाठ पडली वाचता वाचता

स्पा's picture

14 Feb 2013 - 3:18 pm | स्पा

वाघुळा

ठा -हा - र केलंस रे =))

सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद कच मूत

=)) म्हणजे काय रे

च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे तिथे शब्द तोडला की अनर्थ होतो रे =))

सकल शब्दकुंतलत्वग्विच्छेदक चमूत = सर्व शब्दांची "बाल की खाल" काढणार्‍या चमूत.

स्पा's picture

14 Feb 2013 - 4:08 pm | स्पा

=)) =))

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 12:24 am | अग्निकोल्हा

_/\_

चावटमेला's picture

14 Feb 2013 - 9:11 pm | चावटमेला

सदर प्रतिसाद वाचून अस्मादिकांच्या पिंडाला पुढच्या दहा मरणांचे कावळे शिवलेले आहेत :)

हे तुलाच जमू शकतं !! __/\__

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2013 - 3:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अगदी अगदी !!!

चित्रगुप्त's picture

29 Dec 2013 - 10:00 pm | चित्रगुप्त

रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅन

रघुनाथ पंडितांचे 'नलदमयंति स्वयंवर आख्यान इथे बघा:
http://www.scribd.com/doc/37254081

शार्दुलविक्रीडित, मालिनी, वसंततिलका, वगैरे वगैरे वृत्तांबद्दल (आणि ती चालीत कशी म्हणायची, याबद्दल) साहित्य कुठे मिळेल?) जालावर आहे का?

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 12:25 am | बॅटमॅन

अरविंद कोल्हटकर यांनी नेहमी येणारी काही वृत्ते कशी गायची याचे विवेचन करणारा एक अतिशय उत्तम व्हिडिओ यूट्यूबवर दिलेला आहे. जनरल वृत्तांबद्दल विवेचनही अतिशय उत्तम आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे:

http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA

सुमारे ३१ वृत्ते दिलेली आहेत. ऐका आणि एंजॉय करा. :)

चौकटराजा's picture

14 Feb 2013 - 2:19 pm | चौकटराजा

एकमेकात मारामार्‍या लावून जीवांचे निर्दालन करून उत्पती, स्थिती व लय यातील " लय" साधण्याचा निसर्गाचा एक प्रयत्न म्हणजे धर्माची निर्मिती ! बाकी अनेक मार्ग त्याने शोधलेले आहेतच !

आशु जोग's picture

14 Feb 2013 - 11:24 pm | आशु जोग

खरे आहे

हे अरबी लोक जगभरात आतंक माजवीत असतात

पण

त्यात सर्वात जास्त तेच स्वतः मरतात

आज पाकीस्तानातही तेच चालू आहे

या लोकांना आपला शेजारी आपला वाटत नाही पण

जगात दुसरीकडचा कुणी आपल्या पंथाचा म्हणून जवळ वाटतो
--
('हे अरबी लोक' म्हटल्याने कुणा भारतीयांच्या भावना दुखावल्या असतील तर आमचा नाइलाज आहे)

असले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला.

४-५ येळा पुन्ना पुन्ना वाचूनबी यकदाही बरोबर वाचता आलं न्हाई. लिवलत कसं वो??

सुनील's picture

14 Feb 2013 - 7:26 pm | सुनील

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

असेलही. काय म्हाईत नाय बॉ ;)

पण जन्माला येणारा प्रत्येक हिंदू हा मनुष्य असतो, हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही :)

मनोरा's picture

14 Feb 2013 - 8:14 pm | मनोरा

द ग्रेट विनायक दामोदर सावरकर यांची सगळी पुस्तकं जर विकत घेउन मन लावुन वाचली तर थोडासा "हिन्दू" म्हणजे कोण ह्या प्रश्ना च्या उत्तरा वर प्रकाश पडेल असा मला वाटते. सुदैवाने ती व्यक्ती मराठी होती महणुन त्यांचे लिखाण हे मराठीतच आहे. म्हणजे कमीत कमी मराठी माणसाला समजन्यात अडचण येणार नाही असे वाटते. त्या पाप बिचार्या एव्ह्ढ्या विद्वान महान मानसाने आपले पुर्न आयुष्य च वेचले हो फक्त ह्या कामासाठी. " सागरा प्राण तळमळला" फार छान कवीता आहे त्यांची. " माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी. मी वाचलेय त्यांचे माझी जन्मठेप व भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने. माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला.
मला पडलेले प्रश्न-
१) मुसलमानात सर्कमसीझन काच करतात? साधी गोष्ट आहे. जीथे गरज आहे तीथे निसर्गाने केस दिलेत, छिद्रं दिलीत. सगळं काही गरजेनुसार दिले आहे. जर जी त्वचा कापुन टाकन्यात येते आणी त्याची गरजच नसती तर ती निसर्गाने दिलिच नसती.मुसलमानातील फीमेल सर्कमसीझन तर फारच भयंकर. ज्यु मधे मुलगा जन्मल्याच्या सातव्या दिवसी त्याचे सर्कमसीझन करतात. फार वाईट. हो. जर मुलगा जन्माला आला. त्याला लघवी होत नसेल असे कळले. फोरस्कीन टाईट असल्यामुळे. तर नाईलाजाने त्याचा जीव वाचावा म्हनुन ती थोडीशी कापुन लघवीचा अमार्ग मोकळा करुन देने ही गोष्ट मला कळते.तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जर मुलाला असा त्रास आहे कळला की आजचे डॉक्टर्स ताबडतोब हे ऑपरेशन करतात.

आजानुकर्ण's picture

14 Feb 2013 - 10:52 pm | आजानुकर्ण

" माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी.

हे जे काही कुठे वाचले आहे ते चूक असावे. स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.

विकास's picture

15 Feb 2013 - 12:10 am | विकास

स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.

प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नाही हे आपणास माहीत नाही असे वाटत नाही. तरी देखील जसे सध्याच्या काळात इच्छामरण अथवा स्वेच्छामरण हा एक शब्द कायद्याने प्रस्थापित करायचा प्रयत्न होत आहे त्याच पठडीतले प्रायोपवेशन आहे. त्यात देखील सावरकरांनी "ही (त्यावेळेस नुसतेच planned असलेले प्रायोपवेशन म्हणजे) आत्महत्या का नाही" याबद्दल देखील आधी लेख लिहून प्रकाशीत केला होता. विनोबांनी जेंव्हा असेच प्रायोपवेशन केले तेंव्हा काहीजण कोर्टात ते आत्महत्या करत आहेत म्हणून तक्रार घेऊन गेले (आत्महत्या करणे बेकायदेशीर आहे), अर्थात कोर्टाने देखील ती आत्महत्या मानली नव्हती. इंदीराजी केवळ एकदा त्यांना विनंती करू शकल्या होत्या (की पुनर्विचार करा म्हणून).

असो.

विकास, आपण किंवा आजानुकर्ण कुणीतरी प्रायोपवेशन म्हणजे काय आणि ते आत्महत्येपेक्षा वेगळं कसं आहे यावर थोडा प्रकाश टाकू शकाल का?

विकास's picture

16 Feb 2013 - 1:23 am | विकास

प्रायोपवेशन म्हणजे जीवनात कृतार्थता आली आणि आता काही उरले नाही (अवघा रंग एक झाला) अशी भावना आली की जीवन संपवायची पद्धत आहे. त्याउलट आत्महत्या ही आयुष्यात आलेल्या निराशेतून केलेली तात्काळ घडणारी कृती आहे.

आत्महत्येत माणूस पाण्यात बुडेल, विष घेईल, गळफास लावेल, कड्यावरून उडी मारेल - थोडक्यात आत्महिंसा करेल. त्यात स्वतःस आणि इतरांना धक्का असतो. पण प्रायोपवेशन ही जीवन पायरी पायरीने संपवायची पद्धत आहे. त्यात त्यामुळे मनुष्यास (काही कारणाने) जमले नाही तर पुर्नविचारास वाव असतो. तसेच नातेवाईक-सहकारी-फॉलोअर्स ना मनाची आणि इतर कसली असेल तर ती तयारी करायला वाव असतो. सावरकरांनी १ फेब्रुवारीस प्रायोपवेशन करत आहे म्हणून जाहीर केले आणि २६ फेब्रुवारीस त्यांचे देहावसन झाले. विनोबांना पण मला वाटते साधारण आठवडाभर वेळ लागला. आत्महत्या इतक्या वेळ चालत नाही.

मला वाटते पार्श्वनाथ जैन या तिर्थंकराने देखील प्रायोपवेशन केले होते. ज्याचा प्रभाव धर्मानंद कोसंबींवर होता. एका (शेवटच्या) क्षणी त्यांना देखील प्रायोपवेशन करावेसे वाटले आणि त्यांनी तसे ते चालू केले. पण गांधीजींनी त्यांना तसे न करायची विनंती केली, जी धर्मानंदांनी ऐकली. पण नंतर काही दिवसांमधे/महीन्यांत त्यांना नैसर्गिक मृत्यू आला.

प्रायोपवेशनात हळू हळू अन्नपाणी वर्ज्य केले जाते आणि देहाच्या हालचाली कमी करत आणल्या जातात. मला वाटते, ते येरागबाळ्याचे काम नाही. कारण त्यातून जे साध्य करायचे आहे ते म्हणजे मृत्यू कधी येईल याची कुणालाच कल्पना असू शकत नाही. विनोबांच्या वेळेस वाचल्याचे अंधुकसे आठवते की जेंव्हा व्यक्ती प्रायोपवेशन करू लागते तेंव्हा त्या व्यक्तीस कमीत कमी त्रास होण्यासाठी बाहेरून काय उपचार केले जातात वगैरे. पण नीटसे आठवत नाही.

जन्मापासून कॅलिफोर्नियातील सद्गुरू सिवया सुब्रम्हण्यम स्वामी यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या जेंव्हा लक्षात आले की त्यावर काही उपाय नाही, तेंव्हा त्यांनी फक्त पेनमेडीकेशन चालू ठेवले आणि बाकी प्रायोपवेशन करून देहत्याग केला.

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2013 - 1:32 am | श्रीरंग_जोशी

फार पूर्वी एक उदाहरण ऐकले होते. कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी केवळ एका द्राक्षाच्या रसाचे ते सेवन करायचे अन अखेरच्या काही दिवसात केवळ पाणी.

विकास's picture

16 Feb 2013 - 2:08 am | विकास

कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला.

कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे हे मला देखील आठवत आहे, पण नाव आठवत नाही. त्या वेळेस वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे बहुतेक त्यांचे नाव देखील विनायक असावे. कारण तीन विनायकांनी (सावरकर, विनोबा आणि हे समाजसेवक) प्रायोपवेशन केले असे म्हणले गेल्याचे पुसटसे आठवत आहे...

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2013 - 1:59 pm | श्रीगुरुजी

जैन धर्मामध्ये असणारे "संथारा" व्रत हे प्रायोपवेशनच आहे. दरवर्षी अनेक जैन स्त्रीपुरूष हे व्रत करून जीवन संपवितात. या व्रताचा अंगिकार करणारे अन्नपाण्याचा त्याग करून प्राणत्याग करतात. "संथारा" व्रत घेणे हे जैनांमध्ये अत्यंत उच्च त्याग समजला जातो. हे व्रत सुरू केल्यावर या व्यक्तिला सर्व नातेवाईक, सगेसंबंधी भेटून जातात व प्राणत्यागानंतर मांडी घातलेल्या अवस्थेत अंत्ययात्रा काढली जाते.

प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नव्हे.

माणसा माणसा कधी होशील माणुस ही बहिणाबाईंची ओळ उगाच आठवली.
बाकी चालु द्या.

तिमा's picture

14 Feb 2013 - 8:26 pm | तिमा

धागा वर आणण्याची आयडिया असणार्‍यांनी तो खाली कसा न्यावा याचेही मार्गदर्शन करावे.

विकास's picture

14 Feb 2013 - 10:23 pm | विकास

चांगली कल्पना आहे! :-)

प्यारे१'s picture

14 Feb 2013 - 8:29 pm | प्यारे१

<<<जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो का?

शक्यता नाकारता येत नाही.
- थोर द्रष्टे नाना चेंगट

"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.

विकास's picture

15 Feb 2013 - 9:49 pm | विकास

"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.

सावरकरांच्या मते तो अरबांकडून आलेला नाही त्या आधी देखील वापरला गेलेला आहे, पण संस्कृतमधून आलेला आहे असे त्यांचे म्हणणे नसावे. त्यांच्या मते देशाला सप्तसिंधू असे म्हणले जायचे. बहुतांशी इतर विद्वान देखील सिंधू नदीच्या तिरावरील लोकांना संबोधताना सिंधू नदीच्या संदर्भानेच बोलायचे. पण पर्शिअन्स लोकांच्या भाषेत "स" चा उच्चार "ह" केला जात असल्याने आणि त्यांच्याशी जुना संबंध असल्याने, त्यांनी म्हणलेले "हिंदू" हे जगातील इतर म्हणू लागले. तेच नंतरच्या काळात सिंधूचे इंडस आणि त्यावरून इंडीया असे झाले...

श्रिया's picture

15 Feb 2013 - 10:02 pm | श्रिया

माहितीबद्दल धन्यवाद.

धर्माला अफूची गोळी मानले, तर मनुष्य जन्माला येतो तेंव्हा निर्व्यसनी असतो..
काही जण, मुल जन्मलं की लगेच त्याला 'हिंदु' असं लेबल लावतात..
काही जण थोड्या वर्षांनी काही दुसरे लेबल लावतात.. पण शेवटी ते फक्त 'लेबल'च असतं..

विकास's picture

15 Feb 2013 - 10:18 pm | विकास

काहीजणांसाठी धर्म ही अफूची गोळी आहे. तर काही जणांसाठी अफू हाच धर्म आहे. धर्माला अफूची गोळी म्हणणार्‍या कम्युनिस्टांसाठी कम्युनिझम पण अफूच ठरला - धर्मापेक्षाही वाईट, ज्यामुळे ७० वर्षात होत्याचे नव्हते झाले. कम्युनिस्ट सोव्हीएट केजीबीमधील ऑफिसर (नंतरच्या काळात प्रमुख) आणि रशियन अध्यक्ष व्लादीमिर पुतीन सकट सगळे परत धर्माच्या लेबल मागे लागले...

Putin

मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,

कंच्या इशयावर, काय आन का बोलत व्हता, ते कळू द्या, म्हंजे उत्तर द्यायाला सोपं जाइल.

परवा आमचा पण मित्र बोलता बोलता म्हणाला कि,
"जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्य हा आधी रडतो."

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Feb 2013 - 3:05 am | निनाद मुक्काम प...

हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.
ह्यावर ह्या निमित्ताने थोडा प्रकाश टाकला गेला तर बरे होईल.

चौकटराजा's picture

16 Feb 2013 - 4:17 pm | चौकटराजा

" हिंदू" ही जीवनशैली आहे हेच खरे आहे.त्यात "प्रमाणा"चा बलात्कार करणारा धर्मग्रंथ नाही नास्तिक माणसाला तेवढाच मान आहे जेवढा आस्तिकाला. परमतत्वाला व्यक्त वा अव्यक्त स्वरूपात व आपल्या स्वता: च्या पद्धतीने पूजावयाची सोय व स्वातंत्र्य आहे. परधर्माच्या देवालाही पूजायाला परवानगी आहे.त्यांच्या धार्मिक स्थळाप्रत जाण्यास मज्जाव नाही व जाउन आला
तर अपवित्र झाला असे मानण्याची मानसिकता नाही. गर्व से कहो हम हिंदू है याचा खरा गर्व या मुक्तपणापायी वाटला पाहिजे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Dec 2013 - 7:58 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मला वाटते की डॉ.रवी बापट यांच्या आईने पण प्रायोपवेशन केले होते ना.

बाळराजे's picture

30 Dec 2013 - 12:13 am | बाळराजे

"धर्मांतराचे संस्कार" हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो.
एखादा मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर जे संस्कार केले जातात ते त्याच्या माता-पित्याच्या भक्तिचा भाग असतात, त्याला धर्मांतर म्ह्णणे कितपत योग्य आहे? धर्मांतर हे जाणून बुजून वा मारून केले जाते - एकात स्वेच्छा असते तर दुसर्‍यात सक्ती - समज दोन्हींमध्ये असतो.
बादवे माझ्या मते, जन्माला येणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असतो आणि हिंदू ही एक जीवनशैली आहे - संस्कृती आहे.

होबासराव's picture

30 Dec 2013 - 3:24 pm | होबासराव

ह्याला धर्म म्हणुन न पाहाता एक जीवनशैलि म्हणुन बघावे. असे माझे व्यैयक्तीक मत आहे.
कुठेतरि वाचलेले आठवते कि "हिन्दु असायला माणुस हिन्दु म्हणुनच जन्मला यायला हवा"
कारण बाकि कुठल्याहि धर्मातुन धर्मांतर करुन हिन्दु होता येत नाहि, तशी कुठलीहि व्यवस्था / विधि / पुजा ह्या जिवनशैलित नाहि. कारण हि जिवनशैलि अस्तित्वात आलि तेव्हा असा कुठलाहि धर्म अस्तित्वात नव्ह्ता कि ज्याचा धर्मांतराच्या आधाराने अंगीकार करता यावा. नंतर नंतर जसे बाकि धर्म प्रस्थापित झालेत तसे तसे लोक धर्मांतर करुन नविन धर्म स्वीकारु लागले.

म्हैस's picture

30 Dec 2013 - 3:40 pm | म्हैस

हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.

सहमत आहे. पुढे जेव्हा ह्या बेसिक जीवन प्रणाली शी फारकत घेऊन वेगवेगळ्या जीवन प्रणाली स्वीकारल्या गेल्या तेव्हा त्यांना वेगवेगळी नावं दिली. इस्लाम, खिश्चन वगेरे .
आपल्याही जीवन प्रणालीला हिंदू नाव देण्यात आलं. त्यापूर्वी हिंदू नावाचा असा कुठला धर्म नवता. हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 3:58 pm | बॅटमॅन

हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.

आफ्रिकेतली माकडेही हिंदूच होती हा शोध या निमित्ताने प्रथमच वाचायला मिळाला आणि हिंदू धर्माच्या अभिमानाने डोळे पाण्याने अगदी डबडबून आले. गर्व से कहो हम हिंदू है!!!

होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ लाख वर्षांपूर्वीच अस्तित्वात आल्यामुळे दावा अगदीच फोल नसावा. आफ्रिकेतले होमो सेपिअन सेपिअन सुद्धा हिंदूच होते असं म्हणा हवंतर. ;)

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 4:22 pm | बॅटमॅन

अवश्य!

अतिअवांतरः तुमचे नावदेखील इंद्रावरूनच घेतले आहे ;)

बाबा पाटील's picture

30 Dec 2013 - 8:49 pm | बाबा पाटील

मी सध्या कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी व मामलेदार कचरीचे उंबरे झिजवतोय्,त्यात मला माझ्या खानदानाची नक्की जात कोणती हेच कळत नाहीये. १८७० ते १९०० मराठा देशमुख,१९०० ते १९३० कुणबी,१९३० ते १९५५ हिंदु आणी १९५५ पासुन मराठा. या सगळ्यामुळे कुनबी प्रमाणपत्र काही मिळत नाही.मला हेच कळत नाही माझी जात अथवा पोटजात नक्की कोन आणी कश्यासाठी बदलत होत.त्यामुळे मी नक्की कोन ?