आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
प्रतिक्रिया
23 Jan 2013 - 10:50 pm | दादा कोंडके
नै पण रास्व संघाबद्दल ठिक आहे. पण डायरेक भाजपाचं नाव घेउन दहशतवादी तयार करतो म्हणाल्यावर जेव्हडा गदारोळ उठेल असं वाटलं होतं तेव्हडा झालाच नाही. इज इट टू ऑब्विअस की लोकं शिंदेंकडे दिग्गीराजासारखंच दुर्लक्ष करतात?
24 Jan 2013 - 1:21 am | नेत्रेश
रास्व संघाबद्दल नेमके काय ठिक आहे? ते दहशतवादी तयार करतात?
24 Jan 2013 - 2:42 am | दादा कोंडके
काही दंगली आणि बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं(तरीही ते दहशतवादी तयार करतात किंवा त्यांना लष्कर वगैरेंच्या रांगेत बसवणं निव्वळ मुर्खपणा आहे हे मान्य). याच्या आधारावर जरा खुट्ट झालं की रा.स्व. वर तोंडसूख घेतात. पण एका दुसर्या नंबरचा मुख्य राष्ट्रीय पक्ष दहशतवादी तयार करतो असं सो कॉल्ड सर्वात मोठ्ठी लोकशाही असणार्या देशाचा सरक्षण मंत्री म्हणतो म्हणजे गोचीच की.
24 Jan 2013 - 5:30 am | नेत्रेश
माझ्या माहीती प्रमाणे अजुन कोणत्याही न्यायालयात बाँबस्फोट वगैरे गोष्टी या संघाच्या दहशतवाही कारवाया आहेत हे सिद्ध झालेले नाही.
24 Jan 2013 - 10:56 am | रणजित चितळे
नेत्रेश ह्यांना समर्थन.
24 Jan 2013 - 12:46 pm | श्रीगुरुजी
"काही दंगली आणि बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं(तरीही ते दहशतवादी तयार करतात किंवा त्यांना लष्कर वगैरेंच्या रांगेत बसवणं निव्वळ मुर्खपणा आहे हे मान्य). "
हे कधी सिद्ध झालंय? जरा याचे संदर्भ देता का?
मालेगावची केस बघूया. ऑगस्ट २००८ मध्ये मालेगावमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी सप्टेंबर २००८ मध्ये ९ स्थानिक मुस्लिमांना अटक करून त्यांच्यावर मोक्का लावून चौकशी सुरू केली. नंतर कुठेतरी काहीतरी चक्रे फिरली आणि ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आणि इतर ९ जणांना या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक केली, मोक्का लावला आणि आजतगायत ते तुरूंगात आहेत. त्यांना पकडून तब्बल ५१ महिने लोटले तरी अजून जामिनावर सोडले नाही व न्यायालयात आरोपपत्रही दाखल केलेले नाही ज्यामुळे खटला सुरू होईल. त्यांना नुसतेच डांबून ठेवले आहे.
त्यांना पकडल्यावर सुरवातीला स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. नंतर हेमंत करकरेंच्या नेतृत्वाखाली एटीएसने चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग महाराष्ट्र सीआयडीने चौकशी केली. तरीही काही मिळाले नाही. मग एक एसआयटी नेमून त्यांनी चौकशी केली. तरीही पुरावे मिळाले नाहीत. मग एकदा नव्हे तर तब्बल ४ वेळा या सर्वांची नार्को चाचणी केली. तरीही पुरावे नाहीत. मग सीबीआयला चौकशीसाठी पाचारण केले. सीबाआयला पुरावे जमविण्यात अपयश आल्यावर पुन्हा एक दुसरी एसआयटी नेमून चौकशी केली. त्यांनाही काही मिळाले नाही. आता शेवटी एनआयए चौकशी करत आहे. त्यांनाही अजून कणभरही पुरावा मिळाल्याचे दिसत नाही. पुरावे असते तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला केव्हाच सुरू झाला असता. प्रत्येकवेळी आरोपींनी जामिन मागितला किंवा आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्याची मागणी केली की सरकारी वकील एक ठरलेले छापील उत्तर देतात. "आम्हाला अजून नवीन पुरावे सापडले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे जामिन देऊ नये.". मोक्काखाली अटक केली असल्याने न्यायालय सरकार पक्षाच्या संमतीशिवाय जामिन देऊ शकत नाही. दरम्यान एक वर्षांपूर्वी अगदी याच आरोपाखाली अटक केलेल्या ९ मुसलमानांना न्यायालयाने जामिन दिला (कारण सरकार पक्षाने त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही), पण साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. ना जामिन देण्यास सरकारचा विरोध आहे.
तुरूंगवासातल्या ५१ महिन्यांच्या काळात या आरोपींचा छळ करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंगला जेवणात मांसाहार देणे, अश्लील फिल्म्स दाखविणे इ. प्रकार केले. पण तरीही कोणीही आजतगायत कबुलीजबाब दिलेला नाही. महिला आयोग या अत्याचारांबद्दल मूग गिळून गप्प आहे. साध्वी प्रज्ञासिंगला तर आता छातीचा कर्करोग झाल्याची बातमी आहे. तरीही तिच्या जामिनाला सरकारचा विरोध आहे.
२००६ साली समझोता एक्सप्रेसमद्ये बॉम्बस्फोट झाल्यावर तत्कालीन फॉरेन्सिक प्रयोगशाळेने चाचणी करून न्यायालयात असे सांगितले होते की त्यात आरडीएक्स नव्हते. पण नंतर कर्नल पुरोहितला २००८ मध्ये पकडल्यावर चौकशी करणार्या समितीने न्यायालयात सांगितले की समझोता प्रकरणात आरडीक्स वापरले होते व ते पुरोहितने पुरविले होते. लष्कराने पुरोहितला ६ टन आरडीक्स तामिळनाडूहून काश्मिरला नेऊन तेथील लष्कराच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. पण त्याने ते तिथे न पोचविता बॉम्बसाठी वापरले. हा तद्दन खोटा आरोप वाचल्यावर दुसर्या दिवशी लष्करप्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की लष्कराने पुरोहितला असे काहीही सांगितले नव्हते. लष्करात प्रत्येक बुलेटचा हिशोब ठेवला जातो. जर पुरोहितने तब्बल ६ टन आरडीक्स गडप केले असते, तर ते केव्हाच लक्षात आले असते. हे ऐकल्यावर चौकशी समितीने न्यायालयात जाऊन आरडीक्सबद्दलचे आपले निवेदन मागे घेतले.
असीमानंदची वेगळीच कहाणी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार असीमानंदला पकडून तुरूंगात ठेवल्यावर, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटासाठी आरोप लावलेल्या एका मुस्लिम तरूणाला असीमानंदच्या सेवेसाठी ठेवले होते. त्याच्या सेवेमुळे असीमानंदला पश्चाताप झाला व उपरती होऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तुरूंगात असलेल्या एका आरोपीच्या सेवेसाठी दुसरा आरोपी अधिकृतरित्या नियुक्त केला जातो हे बहुधा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे. हा चौकशी समितीच्या खोटारडेपणाचा कळस होता. नंतर लगेचच असीमानंदने पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी छळ करून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतला.
या प्रकरणाची चौकशी करणार्या सर्व चौकशी समित्या कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रज्ञासिंग, असीमनंद, पुरोहित इ. ना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसत आहेत. अजूनतरी त्यांना कोणताही पुरावा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे आरोपपत्र दाखल न करता व जामिन न देता गेले ५१ महिने या सर्वाना विनाकारण तुरूंगात डांबून ठेवलेले आहे.
जोपर्यंत ते तुरूंगात आहेत व खटला सुरू होत नाही तोपर्यंत भाजपला व संघपरिवाराला झोडपण्यासाठी हत्यार म्हणून काँग्रेस व देशातले इतर निधर्मांध त्यांचा वापर करणार! खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटणार याची खात्री असल्याने आरोपपत्र दाखल न करता चौकशीचा निव्वळ फार्स केला जात आहे.
24 Jan 2013 - 12:52 pm | श्रीगुरुजी
या खटल्यातला गंमतीशीर भाग असा की या खटल्यासाठी ९-१० स्थानिक मुस्लिमांचा एक गट अजूनही आरोपी आहे व त्यांना १ वर्षापूर्वी जामिनावर सोडण्यात आले, पण त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले नाहीत. जामिनावर सोडल्यावर त्यांना नुकसानभरपाई दिल्याची देखील चर्चा होती.
दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित व इतर ७-८ जणांचा गटही याच गुन्ह्यासाठी आरोपी आहे व त्यांना जामीन न देता तुरूंगात डांबून ठेवले आहे.
एकाच गुन्ह्यासाठी २ पूर्णपणे वेगवेगळे गट आरोपी असण्याचा हा बहुधा जगातला पहिलाच खटला असावा.
24 Jan 2013 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
24 Jan 2013 - 7:52 pm | विकास
बापरे! इतकी माहिती नव्हती. लोकसत्तेच्या अग्र्लेखात बरेच काही लिहीले होते: "जवळपास ८०० पानांचे आरोपपत्र या प्रकरणी सरकारतर्फे न्यायालयात सादर करण्यात आले आहे, परंतु त्यात कोठेही हा भगवा दहशतवाद यामागे आहे असे सरकारतर्फे नमूद करण्यात आलेले नाही."
इतके सर्व आहे तर त्यावर कोणी आवाज का करत नाही?
बाकी मला निधर्मांध हा शब्द फारच आवडला. एकदम चपखल आहे. मुक्तस्त्रोतातील समजून तो वापरला जाईल. :-)
24 Jan 2013 - 8:36 pm | दादा कोंडके
अगदी असचं. मागच्या दोन-चार वर्षातल्या घडामोडी वाचून मी हे मत बनवलेलं होतं. आक्षेप घेतल्यानंतर बातम्यांची जमवाजमव करतच होतो तोवर हा प्रतिसाद वाचला. एखाद वर्ग मिडीयाला धरून हळूहळू कसं कंडीशनिंग करतं याचं चांगलच उदाहरण आहे.
24 Jan 2013 - 9:43 pm | क्लिंटन
सहमत आहे.
24 Jan 2013 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा
@मला निधर्मांध हा शब्द फारच आवडला. एकदम चपखल आहे. मुक्तस्त्रोतातील समजून तो वापरला जाईल.>>> नक्कीच! 11111111111
25 Jan 2013 - 12:00 am | आजानुकर्ण
सहमत. भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे.
25 Jan 2013 - 9:59 pm | श्रीगुरुजी
"भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे."
राम जेठमलानींसारखे वकील या डांबून ठेवलेल्यांच्या बाजूने का उभे रहात नसावेत याची माझ्या मते खालील कारणे असावीत.
(१) राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत. ते फुकट खटला लढणार नाहीत. त्यांची एका दिवसाची फी ४-५ लाख रूपये असावी. पुरोहित, प्रज्ञासिंग इ. मंडळी इतकी मोठी फी देणे शक्य वाटत नाही.
(२) राम जेठमलानी जरी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार झाले असले तरी त्यांचा व भाजपचा सुतराम संबंध नाही. गुजरात दंगलीसंदर्भात त्यांनी काही भाजप नेत्यांचे वकीलपत्र घेतल्याने त्याची परतफेड म्हणून मोदींच्या आग्रहाने भाजप त्यांना राज्यसभेत पाठविते.
(३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही.
25 Jan 2013 - 11:12 pm | आजानुकर्ण
१. राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत व ते फुकट खटला लढवणार नाही इतपत तुमचा प्रतिसाद खरा आहे.
२. राम जेठमलानी यांचा भाजपशी सुतराम संबंध नाही हे पूर्णपणे खोटे आहे. गेले किमान ४० वर्षे ते भारतीय जनता पक्ष-जनसंघ-शिवसेना व इतर हिंदुत्त्ववादी पक्षांशी संबंधित आहेत. या दुव्यावर त्यांची थोडी माहिती मिळेल. थोडक्यात सारांश म्हणजे १९७१ साली जनसंघ-शिवसेनेच्या पाठिंब्यावर उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. अटलबिहारी वाजपेयींच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद होते. आता भाजपातर्फे ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
३. पुरोहित आणि प्रज्ञासिंग हे संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत आणि ते निरपराध आहेत हा तुमचा दावा आहे. तुम्ही दिलेली माहिती तुम्हाला निश्चितच विश्वासार्ह स्रोतांकडून मिळाली असणार. त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावेही असणार. पुरोहित व प्रज्ञासिंग यांच्यावर असलेले आरोप हे त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी नसून ते ज्या स्वरुपाचा आदर्शवाद जोपासतात त्याच्या समर्थनासाठी केलेल्या कृत्याबाबत किंवा संघटनेच्या ध्येयासाठी केलेल्या गोष्टीबाबत आहेत. वृत्तपत्रातील बातम्यांवरुन माझा असा समज आहे की अशी राजकीय स्वरुपाची कृत्ये करणाऱ्यांची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ती संघटना घेते. राजकीय पक्षांकडे व संघटनांकडे अशा स्वरुपाच्या मदतीसाठी पैसे असतात व त्यांचे सेपरेट लीगल सेल्स असतात. उदा. मनसेने केलेल्या तोडफोडीत काही तरुणांना पकडल्यानंतर मनसेच्या वकीलांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे मी वाचले होते.
आता जर हे लोक 'हिंदू अतिरेकी नाहीत' इतकी स्पष्ट खात्री हिंदुत्त्ववादी संघटनांना आहे तर हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत या (बहुदा काँग्रेस व इतर हिरव्या दाढ्या कुरवाळणाऱ्य़ा पक्षांकडून) होणाऱ्या आरोपांची तमा बाळगण्याचे भाजपाला काय कारण आहे. भाजपाने स्वतःला सुरुवातीपासून लांब ठेवूनही देशाचा गृहमंत्री हिंदू अतिरेक्यांशी भाजपाचा संबंध लावतोच की. 'की येथे धूर येतो म्हणजे आग असणारच' स्वरुपाची सावधगिरी भाजपा बाळगत आहे?
26 Jan 2013 - 12:20 am | विकास
पुरोहित आणि प्रज्ञासिंग हे संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत आणि ते निरपराध आहेत हा तुमचा दावा आहे.
तुमचे वरील वाक्य वाचल्याने मी श्रीगुरूजींचा हा प्रतिसाद परत वाचला. त्यांना काय म्हणायचे आहे, ते, ते स्वतः सांगतील अशी आशा करूया. पण तुम्ही लावलेला अर्थ (...संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत...) मला कुठेच दिसला नाही. किंबहूना तसे कोणी आरोपदेखील करू नयेत म्हणून भाजपा लांब आहे असे त्यांनी म्हणल्याचे दिसते.
हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत या (बहुदा काँग्रेस व इतर हिरव्या दाढ्या कुरवाळणाऱ्य़ा पक्षांकडून) होणाऱ्या आरोपांची तमा बाळगण्याचे भाजपाला काय कारण आहे.
परत, भाजप काय आणि का करते हे त्यांचे मुद्दे झाले, मला त्याची कल्पना नाही. फक्त कॉमनसेन्सने इतकेच वाटते, जर त्यावर भाजपाने प्रतिक्रीया दिली नाही (पक्षी: तमा बाळगली नाही) तर त्याचा अर्थ काय लावला जाईल हे कोणत्याही शहाण्या व्यक्तीस/संघटनेस समजेल. शिवाय नंतरच्या काळात इंटरनेट-विचारवंत असल्या संशोधनातून अजून काय काय लोकांच्या डोक्यात भरवतील हा मुद्दा वेगळाच.
26 Jan 2013 - 12:40 am | आजानुकर्ण
साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे. त्यांनी बजरंग दल, अभाविप, दुर्गा वाहिनी, हिंदू जागरण मंच वगैरेंसाठी काम केले आहे. अधिक माहिती येथे पाहा. http://en.wikipedia.org/wiki/Pragya_Singh_Thakur#Political_career
या सर्व संघटना म्हणजे व्यापक अर्थाने संघच आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे पैत्ृकही संघच आहे. त्या अर्थाने साध्वींचा संबंध भाजपाशी येतो. आता एवढे करुनसवरुनही वेगळे राहण्याची संघ आणि भाजपाची इच्छा असेल तर ते अपेक्षितच आहे. आपल्या परिवारातील संघटनांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी घेण्याबाबत संघ कधीच प्रसिद्ध नव्हता.
असे आरोपदेखील करु नये म्हणून भाजपा लांब आहे म्हणजे काय? दंगली घडवण्याचे आरोप असलेले कटियार प्रभूती भाजपाचे खासदार आहेत.दंगली घडवण्याचे आरोप होऊन शिक्षा झालेले काही मंत्री मोदींच्या मंत्रीमंडळात होते. शिवाय असे अनेक साधू महंत भाजपाच्या व्यासपीठावर वावरतात त्यामुळे या स्वरुपाच्या हिंदुत्त्ववाद्याबाबत बाकी काय म्हणतील अशी काळजी करण्याची भाजपाची वृत्ती नाही. मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय? असा प्र्श्न मला पडला आहे.
26 Jan 2013 - 2:42 am | विकास
साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे.
काय बोंब आहे, अर्धे संघ विरोधक, संघ बायकांना का घेत नाही म्हणून टिकास्त्र सोडतात तर उरलेले साध्वी प्रज्ञासिंह सारख्या महीलांचा संघाशी कसा संबंध आहे हे ठासून सांगतात! शिंदे प्रकरणानंतर आयबीएन वर राम माधव म्हणले तेच खरे वाटते: The RSS is a whipping boy. :-) तरी बरं, आता (तुमच्या वरच्या प्रतिसादात) पुरोहीतांचे नाव आले नाही. बाकी तुम्ही म्हणता तो संबंध हा "गिल्ट बाय असोसिएशन" कॅटेगरीत येतो.
मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय?
त्याचे उत्तर वास्तवीक पोलीस आणि गृहखात्याकडे (आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गुप्तचर/कायदा सुव्यवस्था यंत्रणांकडे) असायला हवे. इतकी वर्षे सर्व शोध घेतला. अजून ना धड खटला भरला आहे ना त्या आरोपींना जामिन देऊ केला आहे. पण आधी म्हणल्याप्रमाणे तथाकथीत मानवी हक्कवाले , स्त्रीमुक्तीवाले आता गप्प आहेत. :(
26 Jan 2013 - 1:04 pm | आजानुकर्ण
मला वाटले इथे रंगीत दहशतवादापुरती चर्चा चालू आहे. संघ बायकांना पुरेसे प्रतिनिधित्त्व देत नाही हे जगजाहीर आहे. साध्वीबाई या परिवारातील संघटनांमध््ये होत्या. संघाच्या परंपरेनुसार त्यांना संघात स्थान नाही.
आता सरकारने खटला का भरला नाही हे मी सांगू शकत नाही. ज्यांना कोणाला साध्वी किंवा पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री आहे ते न्यायालयाकडे दाद मागू शकतात, की सरकारने तिथेही बंदी घातली आहे?
14 Feb 2013 - 3:50 pm | ऋषिकेश
बहुदा मोका लावल्यावर तसे अपील करता येत नसावे.
बाकी, या प्रकरणांबद्दल या अंगाने (श्रीगुरूजींच्या मुळ प्रतिसादत दिलेली) माहिती नव्हती या वर व्यक्त झालेल्या प्रतिक्रीयांशी सहमत
22 Feb 2013 - 3:56 pm | चिंतामणी
या व्यतीरीक्त इतर दबाव आहेतच. त्यामुळे ती प्रज्ञासींग कितीही आजारी असली तरी जामीन मिळणार नाही.
26 Jan 2013 - 12:37 pm | श्रीगुरुजी
"साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे. त्यांनी बजरंग दल, अभाविप, दुर्गा वाहिनी, हिंदू जागरण मंच वगैरेंसाठी काम केले आहे. अधिक माहिती येथे पाहा. http://en.wikipedia.org/wiki/Pragya_Singh_Thakur#Political_career"
वरील लिंक विकिपिडियातील आहे. या पानावर सुरवातीलाच "The neutrality of this article is disputed." असे लिहिले आहे. विकीपिडियावर कोणीही माहिती टाकू शकतो. त्यामुळे ती माहिती अधिकृत असेलच असे नाही. त्यामुळे विकीपिडियावरील माहिती हा विश्वासार्ह स्त्रोत मानला जात नाही.
याच लेखात पुढे "On 19 January 2009, Maharashtra Police filed a 4000 page charge sheet for the Malegaon Blast." व "ChargeSheet not filed, yet no bail" अशी दोन परिस्परविरोधी वाक्ये आहेत. माध्यमात छापून येत असलेल्या बातम्यानुसार या खटल्यात अजूनही आरोपपत्र दाखल केले गेले नाही व त्यामुळे खटला सुरूच झालेला नाही.
विकीपिडीयातील माहिती खरी मानायची का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
माझ्या प्रतिसादात मी साध्वी प्रज्ञासिंग ही रा. स्व. संघाशी संबंधित आहे का नाही यावर लिहिले नसून, तिला व इतरांना गेले ५१ महिने आरोपपत्र दाखल न करता व जामीन न देता डांबून ठेवले आहे व त्यांच्याविरूद्ध पुरावे तयार करण्यासाठी ४-४ वेला नार्को चाचणी करणे, पुरोहितने लष्कराचे ६ टन आरडीक्स लंपास करून बॉम्बस्फोटात वापरणे, असीमानंदला तुरूंगात त्याच्या सेवेसाठी दुसरा कैदी अधिकृतपणे सेवेकरी म्हणून नेमणे इ. हास्यास्पद गोष्टी करणे याबद्दल आहे. एवढे आकाशपाताळ एक करूनसुद्धा गेल्या ४-५ वर्षात आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा सरकारला तयार करता आलेला नाही असे दिसून येत आहे. त्याचबरोबर याच गुन्ह्याखाली आरोप ठेवलेल्या दुसर्या ९-१० स्थानिक मुस्लिमांविरूद्ध अजूनही आरोप काढून घेण्यात आलेले नाहीत. या सर्व गोष्टींवरून नक्की सत्य काय आहे हा निष्कर्ष नक्कीच काढता येतो.
माजी सनदी अधिकारी बी रामन यांनी मी लिंक दिलेल्या लेखात खालील वाक्यांतून तेच सुचित केले आहे. पुरोहित, प्रज्ञासिंग यांना अटक करून डांबून ठेवण्यामागे भाजपला झोडपणे हाच मुख्य हेतू आहे हे यातून दिसून येते.
Investigation into these cases has since been taken over by the National Investigation Agency (NIA) formed by the Union Ministry of Home Affairs in 2009 when Mr P. Chidambaram was the Home Minister. Despite all its resources, the NIA has not so far been able to come out with a comprehensive conclusion on the alleged involvement of some Hindu extremists in acts of reprisal against Muslims.
There has been no sense of urgency in the MHA in having the investigation completed and the suspects prosecuted. One has a strong suspicion that the NIA is sought to be used not for the investigation and prosecution, but for politically needling the BJP and the RSS by periodically levelling allegations against them. This partisan exploitation of the investigation for political purposes is likely to continue till the 2014 elections. Mr Shinde’s statement is part of this partisan exercise.
"दंगली घडवण्याचे आरोप असलेले कटियार प्रभूती भाजपाचे खासदार आहेत.दंगली घडवण्याचे आरोप होऊन शिक्षा झालेले काही मंत्री मोदींच्या मंत्रीमंडळात होते. शिवाय असे अनेक साधू महंत भाजपाच्या व्यासपीठावर वावरतात त्यामुळे या स्वरुपाच्या हिंदुत्त्ववाद्याबाबत बाकी काय म्हणतील अशी काळजी करण्याची भाजपाची वृत्ती नाही. मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय? असा प्र्श्न मला पडला आहे. "
विनय कटियारांवर बाबरी मशीद पाडण्याच्या कारस्थानात सहभागी असल्याचे आरोप आहेत. दंगलीचे नाहीत. अडवाणी, उमा भारती, बाळ ठाकरे, मुरली मनोहर जोशी इ. अनेक जणांवर याच कारस्थानात सहभागी असल्याचे आरोप आहेत. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप नाहीत.
दंगली घडविण्याचे आरोप असलेले अनेक मंत्री अनेक मंत्रीमंडळात आहेत्/होते. १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी हरकिशनलाल भगत, ललित माखन, सज्जनकुमार धरमदास शास्त्री हे राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात होते. कमलनाथ अजूनही केंद्रीय मंत्रीमंडळात आहे. जगदिश टायटलर २००५ पर्यंत मंत्रीमंडळात होता. अखिलेश यादवच्या मंत्रीमंडळात दंगलीचे आरोप असलेले मंत्री आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजप एकटा नाही.
26 Jan 2013 - 1:00 pm | आजानुकर्ण
वादापुरते साध्वीबाई संघात नाहीत हे मान्य केले तरी सरकारदरबारी तुमच्या मते जो अन्याय होतो आहे तो दूर करण्यासाठी मिपावर अकांडतांडव करण्यापेक्षा न्यायालयात पाठपुरावा करणे योग्य नाही का? जर साध्वी आणि पुरोहित संघाशी किंवा भाजपाशी संबंधित नसतील तर भाजपाला झोडण्यासाठी त्यांचा कसा काय वापर होऊ शकतो?
मी निदान विकीपीडियावरील दुवे दिले ते तुम्हाला विश्वासार्ह वाटत नाहीत. मात्र तुमचे अनेक मुद्दे उदा. मुसलमानांना लगेच सोडून दिले वगैरे हे सिरकध करणारे काही तरी पुरावे द्या
26 Jan 2013 - 1:09 pm | श्रीगुरुजी
"जर साध्वी आणि पुरोहित संघाशी किंवा भाजपाशी संबंधित नसतील तर भाजपाला झोडण्यासाठी त्यांचा कसा काय वापर होऊ शकतो? "
त्याचे कारण असे की अशा माध्यमे अशा कोणत्याही कृत्याचा लगेच संघाशी संबंध जोडतात. १-२ वर्षांपूर्वी मंगलोरमध्ये "श्रीराम सेने" या स्थानिक संघटनेने पबमध्ये महिलांना मारहाण केली होती. पण लगेच "श्रीराम" या नावावरून हे कृत्य संघपरिवाराचे आहे असा निष्कर्ष काढून माध्यमे मोकळी झाली. याही प्रकरणात अगदी तसेच होत आहे.
"मी निदान विकीपीडियावरील दुवे दिले ते तुम्हाला विश्वासार्ह वाटत नाहीत. मात्र तुमचे अनेक मुद्दे उदा. मुसलमानांना लगेच सोडून दिले वगैरे हे सिरकध करणारे काही तरी पुरावे द्या"
मुसलमानांना लगेच सोडले नव्हते. पुरोहित व इतरांना अटक करण्याआधी ९-१० स्थानिक मुस्लिमांना त्याच प्रकरणावरून पकडून मोक्काखाली अटकेत ठेवले होते. २०११ मध्ये त्यांच्यावरील मोक्का हटविण्यात आला व नंतर लगेचच म्हणजे अंदाजे दीड वर्षांपूर्वी त्यांना जामीन देण्यात आला. म्हणजे ते अंदाजे ३ वर्षे तुरूंगात होते. पण अजूनही त्यांच्यावरील आरोप हटविण्यात आले नाहीत. त्यांना जामिनावर सोडल्यावर आर आर पाटलांनी त्यांना ५ लाख रू. नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. म्हणजे या प्रकरणात पुरोहित व इतर ९ जण आरोपी आहेत आणि हे ९-१० मुस्लिम पण आरोपी आहेत. याबद्दलच्या लिन्क्स मी शोधून टाकतो.
26 Jan 2013 - 1:30 pm | आजानुकर्ण
श्रीराम सेनेचा संबंध संघपरिवाराशी लावण्याचे कारण श्रीराम हे निश्चितच नसावे. उद्या डॉ. लागूंचाही संबंध संघपरिवाराशी लागेल. :)
ंंंश्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक हे पूर्णवेळ संघाचे कार्यकर्ते व बजरंग दलाचे कर्नाटक प्रांताचे समन्वयक होते असे दिसते.
http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20090081485
26 Jan 2013 - 3:26 pm | नितिन थत्ते
असल्या अनेक संघटना काढून ठेवल्यामुळे "ते आम्ही नाही काही!!!" असं म्हणायची सोय होते.
26 Jan 2013 - 8:31 pm | श्रीगुरुजी
मुतालिक हा रा.स्व. संघाशी कधीही संबंधित नव्हता हे रा. स्व. संघाने या पूर्वीच सांगितले आहे. तो भाजपशीही संबंधित नव्हता हे भाजपने देखील सांगितले आहे. त्याची स्वतःची एक वेगळीच संघटना आहे जिचा भाजप/संघाशी अजिबात संबंध नाही.
30 Jan 2013 - 4:23 am | रामपुरी
काँग्रेसवाले म्हणतात ना "संबंध आहे"? मग असणारच संबंध. काँग्रेसवाले म्हणतात ते सगळं खरंच असतं. आता तो शिंदे नाही का बरळला "संघ दहशतवादी तयार करतो". आता करतो म्हणजे करतो विषय संपला. अहो शेवटी त्यांचं सरकार आहे.
31 Jan 2013 - 2:17 am | आजानुकर्ण
सोलापुरात सापडलेले गावठी बाँम्ब, पकडलेले व सोडून दिलेले ९ मुसलमान, असीमानंद, भारतीय लष्कराचे पुरोहितबाबत स्पष्टीकरण, आंध्रचे राज्यपाल असताना सुशीलकुमारांनी दिलेली शिक्षामाफी व न्यायालयाने ओढलेले ताशेरे वगैरे वगैरे च्या लिंक्स तुम्ही शोधत आहात. विसरुन जाल म्हणून आठवण करुन देत आहे.
31 Jan 2013 - 1:23 pm | श्रीगुरुजी
या काही लिंक वाचा. वेळ झाल्यावर अजून काही लिंक्स शोधेन.
http://www.outlookindia.com/article.aspx?232784
http://articles.timesofindia.indiatimes.com/2008-11-17/india/27907625_1_...
http://indianmilitarynews.wordpress.com/tag/terrorism/
http://www.caravanmagazine.in/perspectives/pacification-swami-aseemanand
http://www.vijayvaani.com/ArticleDisplay.aspx?aid=1598
26 Jan 2013 - 12:49 pm | श्रीगुरुजी
"२. राम जेठमलानी यांचा भाजपशी सुतराम संबंध नाही हे पूर्णपणे खोटे आहे. गेले किमान ४० वर्षे ते भारतीय जनता पक्ष-जनसंघ-शिवसेना व इतर हिंदुत्त्ववादी पक्षांशी संबंधित आहेत. या दुव्यावर त्यांची थोडी माहिती मिळेल. थोडक्यात सारांश म्हणजे १९७१ साली जनसंघ-शिवसेनेच्या पाठिंब्यावर उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. अटलबिहारी वाजपेयींच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद होते. आता भाजपातर्फे ते राज्यसभेचे सदस्य आहेत."
राम जेठमलानींचा भाजपशी संबंध नाही असे मी लिहिले तेव्हा त्यांचा भाजपच्या विचारसरणीशी संबंध नाही असे लिहायला हवे होते. जरी ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले असले तरी भाजपच्या/संघाच्या विचारसरणीशी त्यांचा संबंध दिसत नाही. अनेक उद्योगपती/पत्रकार जरी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसले तरी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात. मुकेश पटेल, राजकुमार धूत, राहुल बजाज, प्रितीश नंदी व आणि जेठमलानी सुद्धा पूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर राज्यसभेत गेले होते. म्हणजे ते शिवसेनेच्या विचारसरणीशी बांधील आहेत असा अर्थ होतो का? पूर्वी विजय मल्ल्यासुद्धा भाजप व काँग्रेसच्या एकत्रित पाठिंब्यावर खासदार झाला होता. म्हणजे तो दोन्ही पक्षांशी संबंधित होता का? जेठमलानी व भाजपचा संबंध केवळ राज्यसभेवर जाण्यापुरताच मर्यादित आहे.
"पुरोहित व प्रज्ञासिंग यांच्यावर असलेले आरोप हे त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी नसून ते ज्या स्वरुपाचा आदर्शवाद जोपासतात त्याच्या समर्थनासाठी केलेल्या कृत्याबाबत किंवा संघटनेच्या ध्येयासाठी केलेल्या गोष्टीबाबत आहेत. वृत्तपत्रातील बातम्यांवरुन माझा असा समज आहे की अशी राजकीय स्वरुपाची कृत्ये करणाऱ्यांची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ती संघटना घेते. राजकीय पक्षांकडे व संघटनांकडे अशा स्वरुपाच्या मदतीसाठी पैसे असतात व त्यांचे सेपरेट लीगल सेल्स असतात. उदा. मनसेने केलेल्या तोडफोडीत काही तरुणांना पकडल्यानंतर मनसेच्या वकीलांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे मी वाचले होते."
मनसेच्या आदेशानुसारच मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यामुळे त्यांना मनसेचे वकील मदत करणारच. पुरोहित व प्रज्ञासिंगला बॉम्बस्फोट करा असे कोणत्या संघटनेने सांगितले होते का? त्यांनी मुळात हे कृत्य केले होते का हीच शंका आहे. त्यांनी खरेच हे कृत्य केले होते हे जर भविष्यात सिद्ध झाले तर आपल्यावर दोषारोप येउ नये यासाठी भाजप यापासून दूर रहात असावा.
26 Jan 2013 - 1:08 pm | आजानुकर्ण
अहो जेठमलानी हे केवळ राज्यसभेपुरते भाजपाशी संबंधित नसून, भाजपाच्या दोन्ही - अगदी तेरा दिवसांच्या - सरकारमध्येही कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्याइतके महत्त्वाचे नेते आहेत. १९७१ पासून जनसंघाचा त्यांना पाठिंबा आहे. दोन सरकारात ते मंत्री आहेत. मात्र त्यांचा विचारसरणीशी संबंध नाही. असे असेल तर ही सर्व मेहेरबानी भाजपाने का केली हा एक प्रश्न पडतो.
अगदी मागील प्रतिसादापर्यंत तुम्हाला साध्वी आणि पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री होती. ती आता शंकेत परिवर्तित झाली आहे. शिवाय आरोप भविष्यात सिद्ध होण्याची शक्यताही येथे दिसते. चर्चेत आता थोडी प्रगती वाटते.
26 Jan 2013 - 1:13 pm | श्रीगुरुजी
"अगदी मागील प्रतिसादापर्यंत तुम्हाला साध्वी आणि पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री होती. ती आता शंकेत परिवर्तित झाली आहे. शिवाय आरोप भविष्यात सिद्ध होण्याची शक्यताही येथे दिसते. चर्चेत आता थोडी प्रगती वाटते. "
ते निरपराध असल्याची मला या क्षणापर्यंत खात्री आहे. त्यांच्याबद्दल मला शंका कधीच नव्हती. मी ३-४ प्रतिसादांपूर्वीच्या एका प्रतिसादात खालील वाक्ये लिहिली होती. ती पुन्हा एकदा वाचा. भाजप उघडपणे त्यांच्या बाजूने का जात नाही याविषयी मी माझे मत लिहिले होते.
"(३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही."
26 Jan 2013 - 1:19 pm | आजानुकर्ण
यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध होतील ? उलट असा खटला लढवला तर दाढ्या कुरवाळण्याचे आरोप सिद्धही होतील आणि पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये जाईल. खटला लढवताना वकील हा केवळ अशीलाचा प्रतिनिधी असतो. अगदी कसाबलाही प्रतिनिधित्व मिळाले होते. तसे करणाऱ्या वकीलावर कोणी अतिरेक्यांशी संबंधित असा आरोप केला नाही.
26 Jan 2013 - 8:26 pm | श्रीगुरुजी
"यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध होतील ? उलट असा खटला लढवला तर दाढ्या कुरवाळण्याचे आरोप सिद्धही होतील आणि पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये जाईल. खटला लढवताना वकील हा केवळ अशीलाचा प्रतिनिधी असतो. अगदी कसाबलाही प्रतिनिधित्व मिळाले होते. तसे करणाऱ्या वकीलावर कोणी अतिरेक्यांशी संबंधित असा आरोप केला नाही."
हे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे कोणी सांगितले तुम्हाला?
भाजप पुरोहित व इतरांना का उघड पाठिंबा देत नसावा याविषयी मी माझा अंदाज सांगितला. प्रत्यक्षात यामागे त्यांचे काय तर्कशास्र आहे हे फक्त भाजपाच सांगू शकतो.
26 Jan 2013 - 10:51 am | नितिन थत्ते
>>या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे.
मला एकदम इतिहासच आठवला. कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत कृत्ये करणार्यांना वाचवण्यापासून हात झटकून नामानिराळे होण्याची जेटली वगैरेंची धावपळ आणि कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.
26 Jan 2013 - 10:57 am | श्री गावसेना प्रमुख
काँग्रेसी आता करतील काय तसे.तेव्हा मतांची फिकीर नव्हती, आता आहे म्हणुन कुणीही चार हात काय दोन गाव सोडुन लांब राहील.
26 Jan 2013 - 10:59 am | नितिन थत्ते
http://en.wikipedia.org/wiki/INA_Defence_Committee
http://en.wikipedia.org/wiki/INA_trials
26 Jan 2013 - 12:54 pm | श्रीगुरुजी
"कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत कृत्ये करणार्यांना वाचवण्यापासून हात झटकून नामानिराळे होण्याची जेटली वगैरेंची धावपळ "
भाजपचे आदर्श बॉम्बस्फोट करावेत असे आहेत का?
"कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे."
अतिशय विनोदी वाक्य. कपिल सिब्बल ने १९९३ मध्ये भ्र्ष्टाचाराचे आरोप असलेल्या न्या. रंगास्वामीचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. सिब्बलनेच २००१-०२ मध्ये स्मगलिंग, बलात्कार व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चर्चिल आलेमावचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. अर्थात भ्रष्टाचार व गुन्हेगारी हे काँग्रेसच्या आदर्शांशी सुसंगत असल्याने सिब्बलने त्यांचे वकीलपत्र घेणे यात आश्चर्य काहीच नाही.
26 Jan 2013 - 1:10 pm | आजानुकर्ण
अहो भाजपाचे माजी मंत्री आणि राज्यसभा खासदार जेठमलानी जसे व्यावसायिक वकील आहेत तसेच कपिल सिब्बलही. उडदामाजी काळे गोरे.
29 Jan 2013 - 3:58 pm | मन१
संसद हल्ल्यातील आरोपीच न्व्हे तर गुन्हेगार म्हणून शाबित झालेल्या अफझल गुरु ह्याचे वकीलपत्र राम जेठमलानी ह्यांनी घेतल्याचे स्मरते.
बाकी चालु द्या.
29 Jan 2013 - 6:59 pm | आजानुकर्ण
शिवाय जेठमलानीच्या आणखी काही केसेस विकीपीडियावर मिळाल्या त्या खालीलप्रमाणे. असो हा प्रोफेशनल मामला आहे. मात्र श्रीगुरुजींना जेठमलानींचा संघ किंवा भाजपाशी काही संबंध नाही असे वाटते. कपिल सिब्बलने घेतलेल्या केसवरुन काँग्रेसच्या चारित्र्यावर आरोप करणे आणि जेठमलानींपासून नामानिराळे राहणे मात्र रोचक आहे. पुढच्या निवडणुकीत समजा मोदी पंतप्रधान झाले तर भाजपाशी संबंध नसूनही जेठमलानी अगदी २०० टक्के मंत्री होतील.
Defence of Rajiv Gandhi's killers in Madras High Court in year 2011.
Defence of Indira Gandhi's killers
Harshad Mehta's defence in stock market scam
Ketan Parekh's defence in stock market scam
Underworld don Haji Mastan
Defended death sentence of Afzal Guru
L K Advani's defence in Hawala Scam
Manu Sharma's defence in Jessica Lall murder case
Amit Shah's (Gujarat's former Minister of State for Home) defence in Sohrabuddin fake encounter case.
Amit Jogi's defence (son of Ajit Jogi) in the case of Ramavatar Jaggi murder case.
Kanimozhi's defence in Spectrum 2G case
Y. S. Jaganmohan Reddy's special leave petition on stay for CBI probe on money laundering in his companies.
Yeddyurappa's case on illegal mining scam[22]
A. G. Perarivalan, T Suthendraraja alias Santhan and Sriharan alias Murugan - convicted in the Rajiv Gandhi assassination case.
Ramdev's defence on use of force on the followers of Baba Ramdev at Ramlila gounds on June 4, 2011[23]
Shiv Sena's defense in CPI MLA Krishna Desai murder case.
29 Jan 2013 - 10:42 pm | श्रीगुरुजी
मी सुरवातीपासून हेच सांगायचा प्रयत्न करीत आहे, पण तुमच्या ते लक्षात आलेले दिसत नाही. जेठमलानी हे जरी भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत असले आणि २००१ पर्यंत जरी ते वाजपेयींच्या मंत्रीमंडळात असले तरी ते आचरणाने, विचारसरणीने किंवा रूढार्थाने भाजप/संघ विचारांचे नाहीत. ते अतिशय कुशल व्यावसायिक वकील आहेत व आपली फी देणार्या कोणाचेही वकीलपत्र ते घेतात. त्यांना आपला पक्षकार हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा तो गुन्हेगार्/अतिरेकी आहे याच्याशी देणेघेणे नाही. भाजप ते आपल्याला सोयिस्कर पडतात्/पडतील या विचाराने त्यांना खासदार करत असावा कारण गुजरात दंगलीतल्या काही जणांचे वकीलपत्र त्यांच्याकडे आहे. २००४ मध्ये त्यांनी वाजपेयींविरूद्ध लखनौतून अर्ज भरला होता पण तो आयत्यावेळी मागे घेतला. अधिकृत रित्या भाजपात असून सुद्धा त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे व भाजप्/संघ विचारांशी त्यांची कोणतीही बांधिलकी नाही. त्यांनी वकीलपत्र घेतलेला अजून एक म्हणजे चित्रपट अभिनेता संजय दत्त. ते जितक्या उघडपणे गुन्हेगारांची किंवा कोणाचीही वकीलपत्रे घेतात तितक्या उघडपणे भाजपातले इतर प्रसिद्ध वकील (रवि प्रसाद शंकर, अरूण जेटली इ.) अशी वकीलपत्रे पक्षशिस्तीमुळे घेऊ शकणार नाहीत. पण जेठमलानी घेतात कारण जरी अधिक्रुतरित्या ते भाजपचे असले तरी भाजप/संघाची विचारसरणी ते कधीही पाळत नाहीत.
29 Jan 2013 - 10:58 pm | आजानुकर्ण
ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे पक्षाने पाठिंबा दिलेली व्यक्ती, जी २ वेळा कॅबिनेट मिनिस्टरही झाली आहे तिचा पक्षविचारांशी काहीही संबंध नाही. असे असूनही त्या पक्षाला, त्या व्यक्तीला मंत्रीपद व संसदेचे सदस्यपद सतत द्यावेसे वाटते हे एकंदरच मला न समजणारे गौडबंगाल आहे. मात्र हा भाजपचा निर्णय असल्याने तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल.
मात्र,
कपिल सिब्बल हे देखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची वकीलपत्रे घेतली तर काँग्रेसच्या चारित्र्याचे विश्लेषण तुम्हाला करावेसे वाटते यामागचे कारण तुम्ही सांगू शकाल काय? की हा केवळ 'आपला तो बाब्या' प्रकारचा न्याय आहे?
29 Jan 2013 - 11:41 pm | चिंतामणी
त्यांचा आणि राष्ट्रवादीच्या धोरणांचा काही संबंध आहे असे वाटते का?
30 Jan 2013 - 3:09 am | आजानुकर्ण
उदयनराजे अर्थातच माहीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादीच्या धोरणांशी काही संबंध नसावा. काही वर्षापूर्वी ते भाजपामध्ये होते. भाजपाने त्यांना मंत्रीही केले होते. उदयनराजे एकाच पक्षात थांबलेले नाहीत. मात्र सिब्बल हे वर्षानुवर्षे भाजपाशी संबंधित आहेत मात्र तरीही त्यांचा भाजपाच्या विचारांशी किंवा धोरणांशी संबंध नाही.
30 Jan 2013 - 3:10 am | आजानुकर्ण
प्रतिसाद बदलता येत नसल्याने, वरील प्रतिसाद+त सिब्बल ऐवजी जेठमलानी वाचावे.
31 Jan 2013 - 12:22 pm | श्रीगुरुजी
उदयन भोसले अपक्ष म्हणून किंवा कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतो. उद्या तो जमाते-इस्लामी, अकाली दल, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस अशा पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला तरी प्रचंड बहुमताने निवडून येईल. त्याला कोणत्याही पक्षाची गरज नाही. उलट इतर पक्षांनाच त्याची गरज आहे. त्यामुळे तो भाजपात असताना भाजप नेतृत्वाला काडीचीही किंमत देत नव्हता आणि सध्या अधिकृतरित्या तो राष्ट्रवादीत असला तरी राष्ट्रवादीच्या कोणाचीही पत्रास ठेवत नाही. राष्ट्रवादी पक्षासंदर्भात विचारले गेल्यावर, "पक्ष गेला खड्ड्यात" असे त्याचे जाहीर उद्गार दूरदर्शनवर पाहिले असतीलच.
पण एकंदरीत त्याची आजवरची वाटचाल पाहता तो राष्ट्रवादी संस्कृतीतलाच वाटतो हे मात्र नक्की.
12 Feb 2013 - 5:40 pm | मालोजीराव
व्यावसाईकतेच्या नावाखाली राष्ट्राद्रोह्यांच्या केस लढवणार्या जेठमलानी यांचा उल्लेख आदरयुक्त करता आणि छत्रपति उदयनराजे भोसले यांचा उल्लेख उदयन असा एकेरी करता...!
एकेरी उल्लेख करण्याएवढी आपली पात्रता आहे का तपासा
12 Feb 2013 - 5:52 pm | श्रीगुरुजी
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थाने खालसा झाली आणि तेव्हाचे सर्व मांडलिक राजे-राजवाडे खालसा झाले आणि तेव्हाच महाराज, छत्रपति, युवराज, युवराज्ञी, श्रीमंत इ. स्वयंघोषित पदे खालसा झाली. २०१३ साली अजूनही स्वतःचा उल्लेख महाराज, छत्रपति, श्रीमंत असा एकाधिकारशाहीवाचक करवून घेणे अयोग्य आहे.
जेठमलानी गुन्हेगारांच्या केसेस लढवितात व त्यांच्याबद्दल (व त्यांच्यासारख्या मामाराव भिडे, कोळसे पाटिल, कपिल सिब्बल इ. वकीलांबद्दल) मला तिरस्कार वाटतो हे मी एका प्रतिक्रियेत लिहिले आहेच. पण ते अशा केसेल लढविताना उघड उघड लढवितात, अजिबात लपवाछपवी करत नाहीत. खूनप्रकरणात अटक झाल्यावर तिसर्या मिनिटाला हार्ट अॅटॅक आल्याचे नाटक करून २ वर्षे तुरुंगवास टाळून रूग्णालयात राहून २ वर्षांनी केस संपल्यावर तिसर्या मिनिटाला खडखडीत बरे झाल्याचे नाटक करणार्यांपेक्षा असे वकील अनेकपटींनी बरे (कै. शरद लेवे प्रकरण आठवत असेलच).
12 Feb 2013 - 6:11 pm | मालोजीराव
दोघांचा हि उल्लेख एकेरी केला असता तर खटकलं नसतं साहेब,
पण जेठ्मलानींचा उल्लेख आदराने आणि छत्रपति उदयन राजेंचा एकेरी असं का ?
राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय ते थोडं हास्यास्पद वाटत नाही का ?
आणि शरद लेवे केस बद्दल म्हणाल तर पूर्ण माहिती घेऊन त्याबद्दल लिहा.
12 Feb 2013 - 9:55 pm | श्रीगुरुजी
"राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती "
बापरे!
14 Feb 2013 - 1:40 pm | मालोजीराव
होय आम्हीही त्यांच्या पायावर डोकं ठेऊनच प्रणाम करतो !देशद्रोह्यांची आणि सगळ्यात महत्वाचे जेम्स लेन आणि त्याच्या प्रकाशन संस्थेची केस लढवणार्या राम जेठमलानी यांच्यापेक्षा "श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले" केव्हाही हजारपटीने आदरणीय आहेत.
14 Feb 2013 - 1:49 pm | श्रीगुरुजी
असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! आमेन!
14 Feb 2013 - 2:09 pm | मालोजीराव
कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा राष्ट्रद्रोही इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी!
22 Feb 2013 - 2:44 pm | अवतार
आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी!
+१
30 Jan 2013 - 2:45 pm | श्रीगुरुजी
"ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे पक्षाने पाठिंबा दिलेली व्यक्ती, जी २ वेळा कॅबिनेट मिनिस्टरही झाली आहे तिचा पक्षविचारांशी काहीही संबंध नाही. असे असूनही त्या पक्षाला, त्या व्यक्तीला मंत्रीपद व संसदेचे सदस्यपद सतत द्यावेसे वाटते हे एकंदरच मला न समजणारे गौडबंगाल आहे. मात्र हा भाजपचा निर्णय असल्याने तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल."
हा भाजपचा निर्णय असल्याने ते वारंवार जेठमलानींना का तिकीट देतात हे मला माहिती नाही. पण माझा व्यक्तिगत असा अंदाज आहे की, भाजपला जेठमलानींच्या वकीली कौशल्याची गरज आहे. गुजरात दंगलीतले आरोप असलेल्या भाजप संबंधित काही जणांची वकीलपत्रे जेठमलानींनी घेतलेली आहेत. हे एक कारण असावे. दुसरे कारण असे असावे, की गुजरात संबंधात मोदींना अडकविण्यासाठी काँग्रेस जंगजंग पछाडत आहे. अजूनतरी त्यात यश आलेले नाही. पण भविष्यात यदाकदाचित एखाद्या दंगल प्रकरणात मोदींचे नाव अधिकृतरित्या आरोपपत्रात आले तर त्यावेळी जेठमलानींनी मोदींचा बचाव करावा अशी भाजपची इच्छा असेल व कदाचित यासाठीच जेठमलानी गुजरातमधून राज्यसभेवर जातात.
हे माझे व्यक्तिगत अंदाज आहेत. कदाचित माझे अंदाज १०० टक्के चुकीचे असू शकतील.
मला स्वतःला जेठमलानी या व्यक्तिविषयी अजिबात आदर नाही. अनेक गुन्हेगारांची वकीलपत्रे ते घेतात. जरी ते काही काळ ते अधिकृतरित्या भाजपचे खासदार असले तरी त्यांची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. ते पूर्वी शिवसेनेचे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. त्यापूर्वी १९९० मध्ये ते जनता दलात होते व चंद्रशेखरांच्या पंतप्रधानपदाला विरोध केल्यामुळे त्यांना जाहीर मारहाणही झाली होती. भविष्यात जर भाजपने त्यांना खासदार केले नाही तर ते काँग्रेस, मुस्लीम लीग, राजद, समाजवादी, बसपा अशा कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन खासदारकी मिळवतील याची मला खात्री आहे. म्हणूनच मी मागे लिहिले होते की भाजपात असूनसुद्धा भाजप/संघ विचारसरणीचा व जेठमलानींचा अजिबात संबंध नाही.
30 Jan 2013 - 11:08 pm | आजानुकर्ण
पण, पण, पण मग व्यावसायिक वकीलाला सरळ फी द्यायची ना. की मंत्री केल्याने फीचे पैसे वाचतात? नाहीतरी जेठमलानीही कोणत्याही भ्रष्ट गुन्हेगाराची केस घेतातच. भाजपाच्या गुन्हेगारांच्या केसी घ्यायला काहीच हरकत नसावी. निदान अशा प्रवृत्तीला पक्षाबाहेर ठेवल्याने पक्षावर तरी शिंतोडे उडणार नाहीत.
31 Jan 2013 - 12:15 pm | श्रीगुरुजी
बरोबर आहे. पण कदाचित खासदारकी हीच जेठमलानींनी मागितलेली फी असेल.
30 Jan 2013 - 2:54 pm | श्रीगुरुजी
"कपिल सिब्बल हे देखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची वकीलपत्रे घेतली तर काँग्रेसच्या चारित्र्याचे विश्लेषण तुम्हाला करावेसे वाटते यामागचे कारण तुम्ही सांगू शकाल काय? की हा केवळ 'आपला तो बाब्या' प्रकारचा न्याय आहे?"
नाही. मी वर जेठमलानींचे उदाहरण दिलेच आहे. पुण्यात पूर्वी कट्टर संघ प्रचारक असलेले ब. ना. उपाख्य मामा भिडे या नावाचे प्रख्यात गुन्हेगारी वकील होते. जोशी-अभ्यंकर प्रकरणातील खुन्यांचे वकीलपत्रे त्यांच्याकडे होते. सासरी छळ करून मारलेल्या मंजुश्री सारडाच्या नवर्याला त्यांनी आपल्या वकीली कौशल्याने निर्दोष सोडविले. अशी इतर अनेक खुन्यांची किंवा हुंड्याकरता सुनेला मारलेल्यांची वकीलपत्रे ते घेत असत. सध्या कोळसे-पाटील नावाचे एक समाजवादी गप्पा मारणारे वकील असेच होते. त्यांनी देखील मानवत हत्याकांड प्रकरणातील (यात ११ बालकांचे बळी देण्यात आले होते) मुख्य सूत्रधार उत्तमराव पाटील याला आपल्या वकीली कौशल्याने वाचविले होते. अशा सर्व गुन्हेगारांच्या पाठिराख्यांचा मला तिरस्कार वाटतो.
मी कपिल सिब्बलचे उदाहरण तुमच्या पूर्वीच्या या वाक्यासंबधात दिले होते. ("कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.")
भ्रष्टाचार, गुन्हेगारी व जातीयवाद यात आकंठ बुडालेल्या २०१२ ल्या काँग्रेसची तुलना १९४५ मधल्या काँग्रेसशी करणे हे मला अतिशय विनोदी व भोळेपणाचे लक्षण वाटले. म्हणूनच २०१२ मधल्या काँग्रेसमधले वकील गुन्हेगारांना सोडवितात हे मला दाखवायचे होते व त्यासाठीच मी सिब्बलचे उदाहरण दिले.
15 Feb 2013 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
>> ब. ना. उपाख्य मामा भिडे
तुम्हाला बाबा भिडे म्हणायचे आहे का?
15 Feb 2013 - 12:16 pm | श्रीगुरुजी
बरोबर. ते मामा भिडे नसून बाबाराव भिडे होते.
26 Jan 2013 - 11:57 am | तर्री
भा.ज.पा. ने हया पासून दूरच राहायला हवे. अन्यथा भारतीय समाज भा.ज.प. ला "२ जागा दाखवेल.
गांधी हत्या , गुजरात दंगल आणि बाबरी ढाचा पाडणे ही तीन भुते उतरवणारा मांत्रिक भाजपला अजूनही सापडला नाही तर पुरोहिताचे भूत त्यांनी का वागवावे ?
राष्ट्रहित , राष्ट्रीय चारित्र्य हया ध्येये प्रेरित होऊन भारतीय सुशिक्षित माध्यम वर्ग कोंग्रेस च्या अपप्रचाराला आणि निधार्मंध वादाला बळी न पडता जेंव्हा संपूर्ण मतदान करेल तेंव्हा एन.डी.ए नाही तर भा.ज.प. सत्तेवर असेल. तो सोनियाचा दिवस असेल.
26 Jan 2013 - 1:19 pm | नितिन थत्ते
राष्ट्रहित , राष्ट्रीय चारित्र्य या अपप्रचाराला मतदार बळी पडत नाहीत हे चांगलेच आहे.
28 Jan 2013 - 1:09 pm | मैत्र
चाचा,
--/\--
या वाक्यासाठी दंडवत!
28 Jan 2013 - 3:54 pm | दादा कोंडके
हा हा...
चांगले चेंडूदेखिल निग्रहानी तटवणारे थत्तेचचा फुल्टॉस सोडतील काय? :)
22 Feb 2013 - 12:08 pm | तर्री
म्हणून स्वतंत्र मिळून ६० वर्षे झाली तरी आपली अवस्था अशी आहे.
24 Jan 2013 - 8:06 pm | धमाल मुलगा
काय बोललायत गुरुजी!
ह्या आणि अशा बाबी जनमानसापर्यंत पुर्णतः न पोचण्याची काटेकोर खबरदारी मिडिया आणि पर्यायानं सरकारनं घेण्याचा कावा पाहून मात्र कोणतीही संघटना का रान उठवत नाही हे मात्र कळत नाही. :-(
25 Jan 2013 - 9:48 pm | विकास
गुरूमुर्थींचा आज लेख बघितला... त्यात देखील बरीच माहीती आहे...
True lies of Sushil Kumar Shinde
24 Jan 2013 - 12:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रा.स्व. संघ हा गेली कित्येक दशकं भारतासाठी निष्ठावान कार्यकर्ते तयार करायचं चांगलं काम करत आहे. संघाच्या कुठल्याही शाखेमधे धर्म, रंग, जात-पोटजात ह्याच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मी जवळपास वयाच्या ८ व्या वर्षीपासुन १५ वर्ष नियमित शाखेत जातं होतो. आता २ वर्षांपासुन वेळेअभावी शाखेत नियमित जाता येतं नाही, पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा माझे शिक्षक, शाखा व्यवस्थापक आणि काही स्वंयंसेवकांच्या संपर्कात असतो.
शाखा नक्की काय करते हे समजण्यासाठी शाखेची प्रार्थना वाचा. सुधिर फडकेंच्या आवाजातील सुरेल प्रार्थनेचा दुवा देतोय तो नक्की पाहावा.
तोपर्यंत ही प्रार्थना वाचा, त्याचा अर्थ ज्याला समजेल त्यानीच सांगा अशी धेयं असणारा संघ परीवार दहशतवादी तयार करु शकेल का ते.
हा सुधिर फडकेंच्या आवाजातील प्रार्थनेचा तुनळीचा धागा.
http://www.youtube.com/watch?v=T7fOf8rUrdw
23 Jan 2013 - 10:55 pm | अभ्या..
ओ. आमच्या गाववाल्यांबद्दल काही बोलायचे नाही.
ते त्यांचे स्वतःचे मत नाहीये. ;)
23 Jan 2013 - 11:06 pm | मदनबाण
राजपुत्र राहुल गांधी यांच्या प्रेमाचे भरते आल्याने बहुतेक शिंदे साहेबांचे आपल्या बोलण्यावर नियंत्रण राहिले नसावे ! ;)
यांना पाकव्याप्त काश्मिरमधले टेररिस्ट कँप दिसत नाहीत पण हिंदुस्थानात नसलेले हिंदु टेररिस्ट कॅंप दिसतात या बद्धल त्यांच्या दिव्य दॄष्टीचे कौतुकच करायला हवे. ;)
या विषयावर लोकसत्ते मधे आलेला हा लेख वाचनिय आहे.
जाता जाता :--- अफजल्याची फाईल हे म्हणे ४८ तासात मार्गी लावणार होते, शिंदे साहेब या फाईलवर सखोल अभ्यास करणार होते म्हणे ! अजुन यांचा अभ्यास पूर्ण झालेला दिसत नाही. ;)
24 Jan 2013 - 1:26 am | बॅटमॅन
कै नै हो, सगळा साला फ्याशनचा खेळ आहे. विशिष्ट धर्माला शिव्या घातल्या की कूल पॉईंट्स मिळतात, अन्य कुणाबद्दल अवाक्षर उच्चारले तर मात्र ** मारतील. **** आहेत झालं.
24 Jan 2013 - 9:03 am | नानबा
मुळात या लोकांचा रा.स्व. वर का राग आहे देवच जाणे. याना संघाची विधायक कामं दिसत नाहीत, संघाच्या मुशीत घडलेल्या नरेंद्र मोदींनी घडवलेला विकसित गुजरात दिसत नाही, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपल्या आजरपणावर उपचार करून घ्यायला परदेशी गेले नव्हते, कारण जर पंतप्रधानच परदेशी गेला तर आमच्या देशात उत्तम प्रतिच्या आरोग्यसुविधा नाहीत असं इतर देशात वाटेल, ही विचारसरणी दिसत नाही, भारतापासून जवळपास तुटलेल्या ईशान्य भारताला पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी संघाने चालवलेला पूर्वांचल विकास प्रकल्प, आणि त्यासाठी तिकडे पूर्णवेळ कार्य करणारे आय.आय.टी., आय.आय.एम. सारख्या संस्थांमधून बाहेर पडलेले आणि उच्च पगारावर लाथ मारलेले तरूण प्रचारक दिसत नाहीत. या लोकांकडुन अजून कसल्या अपेक्षा करणार?
यांच्यासाठी प्रत्येक दिवस "अजि सोनियाचा दिनु" असतो ना.. आणि यांच्या सोनियाच्या ताटी ज्योती तर उजळलेल्या आहेतच...
********
संपादक मंडळः- येथील सर्वच सदस्यांना विनंती आहे की भडक भाषा न वापरताही हा काथ्याकूट होउ शकतो याचा विचार व्हावा.
24 Jan 2013 - 10:15 am | श्री गावसेना प्रमुख
?
जरुर व्हावा,नाहीतर आहेतच द्वेष्टे गरळ ओकायला.
आता काल परवाला मुंबई मध्ये पकडलेला दहशतवादी हा आर एस एस चा होता का?
24 Jan 2013 - 11:28 am | चिरोटा
खुळा आहे सुशील. खालील फोटोच्या तसवीरी त्याच्या घ्ररातल्या प्रत्येक भिंतीवर लावा.
28 Jan 2013 - 12:36 pm | चिंतामणी
हा बघा १९८३ सालचा. महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना.
(मला हा फोटो पोस्ट करायला न जमल्याने लिंक दिली आहे.)
14 Feb 2013 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार
22 Feb 2013 - 12:09 pm | इरसाल
कॉमॅ मोड : किती गरीब व सालस माणुस आहे नजरसुद्धा वर करुन पहात नाही.(बाकीचे वर बघताय म्हणुन)
मिपा मोडः खाली मुंडी पाताळधुंडी आहे लेकाचा झाल !
24 Jan 2013 - 12:44 pm | तर्री
१०० % असहमत.
सुशीलकुमारांची मानसिकता पहिली तर ते एक धूर्त राजकारणी आहेत हे समजून येते.
हया वादग्रस्त उद्गारांमागे त्यांचा "मोटिव्ह" काय असेल ? असा प्रश्न केल्यास उत्तर सहज मिळेल .
"२०१४ नंतर राहुल गांधींच्या च्या मंत्रिमंडळात परत महत्वाचे स्थान मिळवणे "
राहुलजी समोर प्रतिस्पर्ध्याच्या वर्मावर घाला घालणारे सुशील हे "दिग्गी राजा प्रमाणे " उथळ व बेताल नाहित. सुशील हे स्वार्थ , हुजरेगिरी अंगात पूर्ण भिनलेले मुरब्बी राजकारणी आहेत !
आपले गृहमंत्री असे बोलण्याचे दुसरे करण "असुरक्षित असल्याची भावना " हे होय.
ओवेसी , कसाब यांच्यावर कारवाई केल्याने - करावीच लागल्याने सोलापुरात "मायानोरीटी" ची मते
आपल्याला मिळणार नाहित ह्या भावनेने त्यांना ग्रासले असावे. सोलापुरात पराभव आणि राज्यसभेत वर्णी लागली नाही तर आपला "शिवराज पाटील " तर नाही ना होणार ? असे ही वाटत असेल.
त्यांच्या हया बोलघेवडेपणा मागे मला तरी ही दोन प्रमुख करणे दिसतात.
24 Jan 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
नसतील खुळे पण त्यासारखी विधाने करतातच ना? गृहमंत्री झाल्याबद्दल विशिष्ट समाजाला काँग्रेसने प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानणे हाही त्यापैकीच प्रकार. तद्दन मूर्खपणा आहे-राजकीय शहाणपणा असला तरी.
24 Jan 2013 - 12:58 pm | श्रीगुरुजी
२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४ मुस्लिम कुटुंबातील काही जणांना घरात जवळपास १५० गावठी बॉम्ब सापडले म्हणून मोक्काखाली अटक करून तुरूंगात ठेवले होते. जानेवारी २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात पहिल्यांदा त्यांनी या आरोपींवरील मोक्का रद्द करायला लावला व नंतर सर्वांना जामिनावर सोडले. तो खटला आजतगायत सुरू झालेला नाही.
२००४ - २००६ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना शिंद्यांनी खुनाच्या आरोपात जन्मठेप झालेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला आपल्या अधिकारात त्याची शिक्षा माफ करून मुक्त केले होते. यावर संबंधित फिर्यादी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढून त्या आरोपीची जन्मठेप कायम केली होती.
आदर्श घोटाळ्यातही शिंदे आहेतच.
24 Jan 2013 - 2:18 pm | मालोजीराव
या संदर्भात हाफिज सईद आणि शिंदे सायबांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्याचे बघण्यात आले ;)
भास होता कि खरे होते ? ...जाणकारांनी प्रकाश टाकावा
24 Jan 2013 - 8:18 pm | तिमा
या सगळ्याचे उत्तर २०१४ साली मतपेटीतून देणे एवढेच आपल्या हातात आहे. तरुण पिढीने जागृत होऊन मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची वेळ आली आहे.
24 Jan 2013 - 9:07 pm | श्रीगुरुजी
याच विषयावर एक चांगला लेख
http://www.outlookindia.com/article.aspx?283666
या लेखातील हे परिच्छेद काय सुचवितात?
The investigation so far, based largely on the interrogation of some arrested Hindu suspects, who professed the Hindutva ideology, showed that neither the BJP nor the RSS had any knowledge of the planned acts of reprisal by these suspects. There has been no evidence at all that these organisations had any role in these incidents. These were purely rogue acts of reprisal by these individual Hindus with past association with these organisations.
While evidence of the involvement of some Hindu rogue elements in the Malegaon blasts seems to be strong, evidence of their involvement in the Samjhauta Express explosion appears to be more circumstantial than direct. Moreover, immediately after it, US authorities had assessed that it was probably caused by the Lashkar-e-Toiba (LET).They have not come out with any subsequent assessment on it.
Investigation into these cases has since been taken over by the National Investigation Agency (NIA) formed by the Union Ministry of Home Affairs in 2009 when Mr P. Chidambaram was the Home Minister. Despite all its resources, the NIA has not so far been able to come out with a comprehensive conclusion on the alleged involvement of some Hindu extremists in acts of reprisal against Muslims.
There has been no sense of urgency in the MHA in having the investigation completed and the suspects prosecuted. One has a strong suspicion that the NIA is sought to be used not for the investigation and prosecution, but for politically needling the BJP and the RSS by periodically levelling allegations against them. This partisan exploitation of the investigation for political purposes is likely to continue till the 2014 elections. Mr Shinde’s statement is part of this partisan exercise.
Short-sighted leaders of the Congress do not seem to realize that they have been playing into the hands of Pakistan and weakening our campaign against Pakistan for early action against the masterminds of the 26/11 terrorist strikes in Mumbai. Pakistan has been trying to link up its early prosecution of the accused in the 26/11 strikes in Mumbai with our early prosecution of the accused in the Samjhauta Express explosion on the ground that many Pakistanis travelling back to Pakistan by this train were killed in this explosion.
12 Feb 2013 - 5:06 pm | अनामिका
`मालेगावचा मास्टरमाइंड' --- लेखक श्री. रवींद्र दाणी
मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्यात आले आणि राजकीय शक्तींना आयतेच कोलीत मिळाले. त्यानंतर या प्रकरणातील हिंदु आरोपींना अधिकाधिक अडकवण्यासाठी अतिरेकीविरोधी पथकावर दबाव आणून आरोपींच्या चौकशा सुरू झाल्या. हा दबाव नक्की कोणाच्या माध्यमातून होता, हे लेखक श्री. रवींद्र दाणी यांनी `साप्ताहिक विवेक'च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या `मालेगावचा मास्टरमाइंड' या लेखातून काही भाग येथे देत आहे.
लष्करप्रमुख जनरल कपूर यांची नाराजी
महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथकाने (एटीएसने) मालेगाव चौकशीसाठी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्याची परवानगी संरक्षणमंत्र्यांकडे मागितली. एका अतिरेकी कृत्यासाठी एका लेफ्ट. कर्नलला अटक करणे, ही काही साधीसुधी बाब नव्हती. अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे वा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने वा दबावाने लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी आपल्या एका अधिकार्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रश्नच नव्हता. लष्करप्रमुख या बाबतीत संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांचे ऐकतील, असेही वाटत नव्हते. ए.के. अँथनी यांचा कोणताही इरादा नाही, दबदबा नाही. मग `लष्करप्रमुखांवर कोणता दबाव आला असावा' या विचारातून मालेगावचा `मास्टरमाइंड' कोण असावा, याचा शोध मी सुरू केला. नंतरच्या घटनाक्रमाने त्या शोधाला जणू गती मिळाली.
हेमंत करकरे वारंवार आणखी काही विद्यमान लष्करी अधिकार्यांच्या चौकशीची मागणी करत होते. यावरून त्यांना विलासराव देशमुख, रा.रा. पाटील व लष्करप्रमुख जनरल कपूर यांच्यापेक्षाही मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा होता. म्हणूनच करकरे दिल्लीत येऊन आणखी काही लष्करी अधिकार्यांच्या चौकशीचा विषय लष्करी अधिकार्यांशी बोलत होते.
मालेगाव चौकशीवर नियंत्रण कुणाचे ?
मालेगाव चौकशीवर विलासराव देशमुख वा रा.रा. पाटील यांचे नियंत्रण राहिलेले नव्हते, तर दिल्लीतून या चौकशीवर देखरेख केली जात आहे, याचा स्पष्ट पुरावा म्हणजे शिवराज पाटील. दररोज या चौकशीवर ते लक्ष ठेवून होते. शिवराज पाटील मालेगाव चौकशीत आदल्या दिवशी काय झाले आहे, याची माहिती घेत होते आणि पुढे काय करावयाचे आहे, याचेही निर्देश देत होते. गृहमंत्रालयातील एका अधिकार्याने प्रस्तूत प्रतिनिधीस ही माहिती दिली. अर्थात शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिवराज यांच्या मागे कोण ?
करकरे यांची अस्वस्थता !
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी व निष्कर्ष काढण्यापूर्वी अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना या चौकशीबाबत काय वाटत होते, याचाही उल्लेख केला पाहिजे. हेमंत करकरे आज हयात नाहीत. ते हयात असते, तर काही बाबींचा उल्लेख करता आला नसता. मालेगाव चौकशी सुरू झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या अटकेचा मुद्दा वादग्रस्त झाल्यानंतर हेमंत करकरे मुंबईतील त्यांच्या एका मित्रामार्फत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी काही संदेश पाठवत होते. हे संदेश माझ्याकडे येत होते. संदेश पुढे पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तीन संदेशांचा येथे उल्लेख करता येईल.
दिवाळीच्या काळात : दिवाळीच्या काळात झालेल्या पहिल्या संदेशानुसार, मालेगाव बाँबस्फोटाची जबाबदारी हिंदु संघटनांपैकी कोणी तरी घेतल्यास चौकशी पूर्ण समजून संपवली जाईल.
दुसरा संदेश : दिवाळीनंतर ८-१० दिवसांनी दुसरा संदेश आला. त्यात करकरे सांगत होते, `३० वर्षांत कधीही नव्हता एवढा दबाव माझ्यावर आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या `नार्को टेस्ट'मध्ये काहीही सापडलेले नाही. दोन ठिकाणी काही मामुली विसंगती आढळून आल्या. दिवाळीनंतर मालेगाव चौकशीत फार प्रगती झालेली नाही.' करकरे वारंवार दबावाचा उल्लेख करत होते. ३० वर्षांच्या सरकारी सेवेत माझ्यावर कधी नव्हता एवढा दबाव काही लोकांना, संघटनांना अडकवण्यासाठी आहे, असे ते कळवत होते.
शेवटचा संदेश : २६ नोव्हेंबरची घटना होण्यापूर्वी करकरे यांचा तिसरा संदेश आला. काही बातम्या दिल्लीत `लिक' होत आहेत, तर काही मुंबईहून आणि यात माझी बदनामी होत आहे. मी त्या नाकारूही शकत नाही. मी काय करावे, हेच मला समजत नाही. करकरे यांचे हे संदेश पाहता वैयक्तिक आणि राजकीय दबावामुळे त्यांच्या मनाची झालेली घालमेल याची कल्पना येते. करकरे यांचे हे संदेश प्रसिद्ध झाल्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेले समज-गैरसमज दूर होण्यात मदतच होईल; कारण सर्व बातम्या करकरे स्वत:च `लिक' करत होते, असे चित्र तयार झाले होते; पण ती वस्तूस्थिती नव्हती. करकरे यांच्याकडून आलेल्या संदेशांमधून ते स्पष्ट होत होते. करकरे यांच्या संदेशातून स्पष्ट होणार्या दोन ठळक बाबी म्हणजे त्यांच्यावर सरकारमधून दबाव होता व चौकशीतील माहिती त्यांना न विचारता `लिक' केली जात होती.
पंतप्रधान कार्यालयाचे राजकारण
मालेगाव चौकशीबाबत पंतप्रधान स्वत: लक्ष देत होते काय ? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. पंतप्रधानांचा स्वभाव तसा नाही. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असले, तरी ते खरोखरीच नामधारी आहेत. शरद पवार वगळता अन्य कोणताही मंत्री त्यांना विचारत नाही. मग मालेगाव चौकशीची सूत्रे कोणत्या व्यक्तीकडे वा शक्तीकडे होती ? ही व्यक्ती वा शक्ती लष्करप्रमुखांना आदेश देऊ शकेल, अशी असण्यास हवी, `सीबीआय' व `आयबी' यांना निर्देश देऊ शकणारी असायलाच हवी. वृत्तपत्रांना बातम्या `लिक' करण्याचा निर्णय घेणारी असावयास हवी. या तिन्ही कसोट्या पूर्ण करणारी ती व्यक्ती होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम्.के. नारायणन ! मालेगाव चौकशीची संपूर्ण सूत्रे नारायणन हाताळीत होते. लष्करप्रमुखांना हाताळण्याचे प्रकरण असो, `आयबी' व `सीबीआय' यांची मदत घेण्याचा निर्णय असो, प्रत्येक निर्णय नारायणन घेत होते. मालेगाव चौकशीचे निमित्त करून हिंदूंना अतिरेकी ठरवणे, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा भयोत्पादनाचा (दहशतवादाचा) मुद्दा हिसकावून घेणे आणि संघ परिवारातील भाजप, रा.स्व. संघ व विश्व हिंदु परिषद यांना बदनाम करणे. या महायोजनेची अंमलबजावणी नारायणन करत होते. महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथक पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश घेत होते. हे अधिक स्पष्ट शद्बांत सांगावयाचे झाल्यास हेमंत करकरे नारायणन यांच्याकडून आदेश घेत होते.
नारायणन यांची दोरी कोणाच्या हाती ?
मालेगाव चौकशीची सूत्रे करकरे यांच्याकडे होती. सरकारी पद्धतीनुसार करकरे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून आदेश घेत होते; पण त्या आदेशामागे एम्.के. नारायणन होते. आता यात नारायणन कसे आले ? नारायणन हे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असले, तरी ते पंतप्रधानांना कमी `रिपोर्ट' करतात आणि सोनिया गांधींना जास्त `रिपोर्ट' करतात. नारायणन यांना राजकीय वर्तुळात `दस जनपथका आदमी' म्हणून ओळखले जाते. एम्.के. नारायणन हे फक्त त्यांना `१०-जनपथ'मधून मिळणार्या आदेशानुसार वागत होते. कारण त्यांची ख्यातीच `१०-जनपथ'चे निष्ठावंत अशी आहे. नारायणन `भारतीय लोक सेवे'तील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. `इंटेलिजन्स ब्युरो'चे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची निष्ठा राजीव गांधी यांच्याशी होती. तीच निष्ठा २००४ मध्ये त्यांच्या कामी आली आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे.एन. दीक्षित यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर नारायणन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. नारायणन यांनी मालेगाव चौकशी होण्यासाठी जे काही केले ते सोनिया गांधींच्या निर्देशनावरून केले; पण मालेगाव चौकशीतला `मास्टरमाइंड' येथेच थांबत नाही. सोनिया गांधी यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल असतात. मालेगावात हिंदु अतिरेक्यांनी बाँबस्फोट केले, अजमेर व हैद्राबाद या ठिकाणीही हिंदूच आहेत, हे अहमद पटेल यांचे सूत्र. हे सूत्र सोनिया गांधी यांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आले ते नारायणन यांच्या सरकारी माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत राबवण्यात आणि हेमंत करकरे यांच्यासारख्या कर्तबगार अधिकार्याच्या माध्यमातून राबवण्यात आले. शेवटी करकरे यांनाही याची कल्पना होती; पण ते काहीही करू शकत नव्हते आणि २६ नोव्हेंबरच्या घटनेने करकरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मालेगाव प्रकरणात हिंदु संघटनांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर आलेल्या दबावाची कथा सांगण्यासाठी ते हयात असते, तर मालेगावचा `मास्टरमाइंड' देशाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता आला असता !
--------------------------------------------------------------------------------
कोणताही लष्करप्रमुख सरकारचा प्रचंड दबाव असल्याशिवाय आपल्या विद्यमान लष्करी अधिकार्यास पोलिसांच्या स्वाधीन करत नाही. हा नोकरशाहीतील सर्वमान्य पण अलिखित नियम आहे. महाराष्ट्रातील मालेगाव बाँबफोटाची चौकशी सुरू झाल्यावर सर्वप्रथम साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक झाली. त्या वेळी फार प्रतिक्रिया उमटल्या नाहीत; पण नंतर काही दिवसांत भारतीय लष्कराच्या `मिलिटरी इंटेलिजन्स'मध्ये कार्यरत एका लेफ्ट. कर्नलला अटक झाल्यावर मात्र मालेगाव चौकशी प्रकरण साधे सरळ नाही, याचा पहिला संकेत मिळाला !
24 Jan 2013 - 9:27 pm | मदनबाण
गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल साईटवर प्रकाशित केलेल्या, तसेच सरकारने प्रतिबंधित केलेल्या अतिरेकी संघटनेच्या यादीत एकाही हिंदुत्ववादी अतिरेकी संघटनेचे नाव शोधुनही सापडले नाही.
१)इंग्रजी दुवा :- http://www.mha.gov.in/uniquepage.asp?Id_Pk=292 (यात ३५ नावे आहेत.)
२)हिंदी दुवा:- http://www.mha.gov.in/pdfs_hin/banned_org-H.pdf (यात ३४ नावे आहेत.)
जाता जाता :--- तुलना करण्यात कॉग्रेसी नेत्यांची मजल कुठवर जावी ? तर... राहुल गांधींची तुलना मणिशंकर अय्यर यांनी ओबामांशी केली ! :D
24 Jan 2013 - 9:43 pm | विकास
वर श्रीगुरूजींनी, तसेच लोकसत्तेच्या अग्रलेखातील आणि आउटलूक मधील लेखात अजून कोणालाच दोषी ठरवता आले नाही असे म्हणले आहेच. पण तरी देखील गिल्ट बाय असोसिएशन च्या नेहमीच्या पद्धतीने सरकार संघ-भाजपाला या आरोपींमुळे आरोपीच्या पिंजर्यात घालत आहे. वास्तवीक जर काही पुरावे असले तर खरेच जाहीर करून योग्य ती कारवाई करावी, कोणी काही म्हणणार नाही, म्हणू शकणार नाही... पण तसे कसे करता येणार? त्यात गंमत म्हणजे स्वतःची असोसिएशन कुणाबरोबर आहे आणि त्यावरून स्वतःस काय समजायचे ह्याचा देखील विचार करायला हवा:
१. हिंदू मधील बातमी: 1993 Surat blast: imprisonment for former Congress Minister
२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटासंदर्भात अवैध शस्त्रे बाळगल्यासंदर्भात संजय दत्तवर हायकोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे आणि लवकरच सुप्रिम कोर्ट अपिलावरील निकाल जाहीर करेल. अर्थात आत्ता तरी त्यावरील आरोप हे कोर्टाने मान्य करून दोषी ठरवले आहेच. तरी देखील त्याला विधानपरीषदेचे तिकीट दिले गेले आहे.
३. त्या आधी भगत वगैरेंवर अनेक खटले शिख दंगलीसंदर्भात भरले गेले, पण त्यामुळे त्यांच्या हयातीत पक्षकार्यास धक्क्क बसल्याचे किमान ऐकीवात तरी नाही. त्या उलट बंगारू लक्ष्मण आता कुठे आहे हे देखील कुणास माहीत नाही. याचा अर्थ भाजपा आदर्श आहे वगैरे मी म्हणत नाही, पण फरक नक्कीच दिसतो.
24 Jan 2013 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी
अभिनेता संजय दत्त समाजवादी पक्षाचा सदस्य झालाय.
अन विधानपरिषदेचे तिकिट मिळालेले संजय दत्त काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी बहुधा त्यांनीच वि.प. सदस्यत्वाच राजीनामा दिला होता. प्रदेश काँग्रेस समितीचे ते दिर्घकाळ पदाधिकारी होते. नक्की माहीत नाही पण ते कोकणातले असावेत असा अंदाज आहे.
24 Jan 2013 - 10:40 pm | आजानुकर्ण
अभिनेता संजय दत्त बहुदा समाजवादी पक्षात आता नाही.
विकास यांनी उल्लेख केलेले हे संजय दत्त म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय दत्त. हे दुसरे ज्यांनी पृथ्वीराज जव्हाण यांच्यासाठी विधानपरिषदेतील जागा मोकळी करुन दिली. मात्र विकास यांना अभिप्रेत असलेल्या संजय दत्त यांच्यासाठी एका पक्षाच्या दिवंगत प्रमुखांनी विशेष मदत करुन त्याला तुरुंगातून बाहेर कसे येता येईल हे पाहिले होते हे नक्की आठवते. ;)
24 Jan 2013 - 10:50 pm | विकास
हा संजय दत्त काँग्रेसमधेच आहे: Congress welcomes Sanjay Dutt as actor regrets joining SP मात्र तुम्ही (श्रीरंग_जोशी) म्हणत असल्याप्रमाणे आमदार संजय दत्त बहुदा वेगळी व्यक्ती असावी.
हा हा! अहो पण त्यांचे खुल्लमखुल्लाच होते. त्यांनी काही कुणाला गिल्ट बाय असोसिएशन ठरवले नाही आणि स्वत:ला सोवळे समजत चीप शॉट्स मारले नाहीत. तिथेच तर फरक आहे.
24 Jan 2013 - 11:19 pm | श्रीरंग_जोशी
कदाचित याबद्दलची बातमी मी वाचलिही असावी पण लक्षात राहिली नाही हे माझ्यासाठी एक सुचिन्हच. कारण काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधीत बातम्यांचे लहान सहान तपशील मी ध्यानात ठेवत असे. अजूनही लक्ष असतेच पण हळू हळू रस कमी होत चालला आहे.
24 Jan 2013 - 11:57 pm | आजानुकर्ण
गुपचूप कायदा तोडणे आणि खुल्लमखुल्ला कायदा तोडणे हे दोन्ही सारख्याच स्वरुपाचे गुन्हे आहेत. आम्ही कायद्याला किंवा लोकशाहीला जुमानत किंवा मानत नाही वगैरे म्हणत आमदार निवडून आणण्याची आणि सरकार बनवण्याची कसरत करायची हेही तितकेच केविलवाणे.
25 Jan 2013 - 1:14 am | विकास
तुमच्या भावनेशी सहमतच. ;)
माझा मुद्दा: एका बाबतीत किर्तन आतून तमाशा असे वर्तब दिसते तर दुसर्या बाबतीत आंतर्बाह्य तमाशाच. किमान जनतेची दिशाभूल दुसर्या बाबतीत नसते इतकेच काय ते म्हणायचे आहे. मात्र पहील्या बाबतीत स्वत:ला हवे ते करायचे आणि दुसर्याला बदनाम करत लोकांचे लक्ष इतरत्रच वेधायचे असला प्रकार असतो.
25 Jan 2013 - 3:14 am | आजानुकर्ण
मीदेखील तुमच्या भावनेशी सहमत आहे.
लोकशाही न मानताही लोकशाही निवडणुका लढवणे हा वरुन कीर्तन आतून तमाशा किंवा सतत काँग्रेस किंवा मुसलमानांना बदनाम करत लोकांचे लक्ष विकासाच्या मुद्द्यांवरुन धार्मिक मुद्द्यांवर नेण्याचा प्रकार करण्यापेक्षा काँग्रेससारखा अंतर्बाह्य तमाशा मलाही मान्य आहे. ;)
30 Jan 2013 - 4:39 am | रामपुरी
काँग्रेसला तमाशा म्हणून तमाशाची बदनामी केल्याबद्दल निषेध...
xxxxपेठ म्हणणार होतो पण तिथेही फक्त ठराविक धर्माच्या दाढ्या कुरवाळण्याचा प्रकार होत नसावा त्यामुळे त्यांचीही बदनामी होईल. त्यामुळे काँग्रेस = काँग्रेस. त्याला दुसरी उपमा नाही.
24 Jan 2013 - 10:42 pm | आजानुकर्ण
बहुदा सगळेच राजकीय पक्ष भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या नेत्यांबाबत निदान थोडीतरी लाज बाळगत असले तरी दंगलीबाबत आरोप सिद्ध झाल्यास तितकी पर्वा करत नाहीत असे दिसते. बंगारु लक्ष्मण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.भगत यांच्यावर दंगलीचे. दंगलीचे आरोप असूनही पक्षकार्यात धक्का न बसलेली इतर उदाहरणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार वगैरे.
24 Jan 2013 - 11:06 pm | विकास
आधी म्हणल्याप्रमाणे, बंगारूंना बाजूस केले गेले तर भगत शेवटपर्यंत पक्षात राहीले.
कटीयार बद्दल माहीत नाही, पण बाळासाहेबांबद्दल टाईम्स मधीले हे वाचनीय आहे. त्यातील पहीलाच परीच्छेद खाली उर्धृत करत आहे:
For all the "inflammatory" speeches and controversy through Shiv Sena chief Bal Thackeray's long political career, his brush with the law was always rather remote. He never faced a trial, spent time in jail only once, and was never convicted for any substantial criminal offence. The cases against him for hate speech were all either withdrawn or never took off for want of prior government sanction ; in others he was never charged. He did get convicted once for contempt of court but any glee among his detractors was short-lived . The Supreme Court set aside his conviction in 2004 for want of the necessary consent of the advocate-general.
24 Jan 2013 - 11:55 pm | आजानुकर्ण
बंगारु हे अगदी टीव्हीच्या पडद्यावर पैसे घेताना पकडले गेल्यावर भाजपाकडे दुसरा पर्याय होता का? भगत पक्षात राहिले कारण त्यांच्यावरचे आरोप हे भ्रष्टाचाराचे नसून दंगलींचे होते. दंगलींचे आरोप असलेले कटियार, साध्वी ऋतंभरा, ठाकरे वगैरे कोणीही पदावरुन बाजूला गेले नाही. याउलट भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राम नाईक, दिलीप सिंग जुदेव, येडियुरप्पा, स्वतः श्री गडकरी हे अगदी शेवटची वेळ येईपर्यंत पदाला चिकटूनच होते.
आता बंगारुंचे उदाहरण देऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपा काही ठोस पाऊल उचलत आहे असे तुम्हाला निर्देशित करायचे असेल तर त्याविरोधातील अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील
श्रीकृष्ण आयोग अहवालाने बाळासाहेबांना दंगलीबाबत जबाबदार धरले होते. मात्र तत्कालीन सेना-भाजपा सरकारने त्या अहवाला समाधी दिली. ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे धैर्य व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी याचा योगायोग अनेक सरकारांना साधता आला नाही.
24 Jan 2013 - 10:44 pm | आजानुकर्ण
सुशीलकुमारांना जर हे सगळे माहीत असेल तर आख्खे गृहमंत्रालय हाताशी असताना मीडियासमोर बडबडण्यापेक्षा सरळ कारवाई करुन मोकळे व्हावे. दहशतवादाला धर्माचा रंग देणे चुकीचे आहे. मी हिंदू आहे आणि हिंदू दहशतवादी हा शब्द मला खुपतो.
24 Jan 2013 - 11:07 pm | विकास
फॉर दी रेकॉर्ड इतके स्पष्ट लिहील्याबद्दल धन्यवाद! अगदी संघ-भाजपाच्या विरोधकांकडूनही इतकेच म्हणायची गरज आहे. असो. :)
2 Feb 2013 - 12:08 am | अनामिका
केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या रविवारी जयपूर येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात केलेल्या एका आरोपाने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या हाती आलेल्या अहवालानुसार संघ व भाजपा यांच्या शिबीरात भगवा दहशतवाद शिकवला जातो व हिंदू दहशतवादी घडवले जातात; अशा स्वरूपाचा तो आरोप आहे. मग त्यांनी हिंदू शब्द वापरला, की भगवा यावर वाद घालण्यात अर्थ नाही. त्यातला आशय स्पष्ट आहे. त्यांनी देशातला व संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या रा. स्व. संघावरच दहशतवाद फ़ैलावत असल्याचा आरोप केलेला आहे. आता त्या आरोपामुळे भाजपा वा संघवाले विचलित झाले, संतापले आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला तर योग्यच आहे. पण त्यावर गदारोळ उठल्यावर शिंदे वा अन्य कॉग्रेसजनांनी केलेला खुलासा कमालीचा हास्यास्पद आहे. तो खुलासा म्हणजे गृहमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला जातो. विपर्यास भाजपाने केला म्हणायचा तर नेमका त्यांनी घेतला; तोच अर्थ पाकिस्तानात बसलेल्या लष्करे तोयबाच्या प्रमुखानेही काढला आहे. म्हणजेच गृहमंत्री बोलल्याचा जो आशय इथल्या माध्यमांनी व भाजपाने काढला; तोच त्या विधानाचा सर्वसाधारण अर्थ असू शकतो. त्यावरूनच प्रतिक्रिया उमटणार ना? सवाल असा आहे, की देशाच्या गृहमंत्र्याने कुठलेही विधान करतांना जपुन बोलायचे असते. कारण त्याच्या विधानाचा संदर्भ अनेक गोष्टींसाठी लावला जाणार असतो. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एका जागी बोलताना असेच वादग्रस्त विधान केलेले होते व भारताने त्याचे भांडवल केले आहे, मग शिंदे वाटेल ते बोलून निसटू शकतील काय? ‘पाकिस्तानने काही काळ दहहतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून केला’, असे झरदारी बोलून गेले होते. तो वापर कश्मिर धोरणाच्याच बाबतीत झाला; असे भारताने कायम म्हटलेले आहे. म्हणजे तसे विधान करून झरदारी यांनी भारताला पाकविरुद्ध मुद्दाच पुरवला होता. शिंदे यांनी त्याची परतफ़ेड केली म्हणून त्यांचे जयपूरमधील विधान हा गंभीर मामला आहे.
भारतातल्या दहशतवाद व जिहादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात आहे; असे आरोप आपण गेली दोन दशके करीत आहोत. मग मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये जो असंतोषाचा भड्का उडाला, त्याला भारताच्या कारवाया कारणीभूत आहेत; असा आरोप पाकिस्तान करू लागला. त्याला कुठला पुरावा नाही. पण आरोप होतच असतो. आपणही तसे आरोप पाकिस्तानवर करता असतो. मुंबईतील हल्ल्याचा सुत्रधार म्हणून आपण लष्करे तोयबाचा प्रमुख हफ़ीज़ सईद याच्याकडे बोट दाखवत असतो. त्या्च्या विरोधातले सज्जड पुरावे मिळाल्याने व जगाला ते दाखवले असल्याने; अमेरिका व राष्ट्रसंघानेही त्यावर बंदी घातली आहे. पण पाकिस्तानने कधीच सईदला त्यातला गुन्हेगार मानलेले नाही वा तसा आरोप स्विकारलेला नाही. उलट त्याने लष्करचे नाव बदलून जमात उद दावा असे केले. ती सेवाभावी संघटना आहे असाच पाकिस्तान प्रत्येकवेळी प्रतिदावा करीत आलेले आहे. मात्र आपल्याकडे हिंदूत्ववादी संघटनांवर जे आरोप सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होत असतात, त्याचा आधार पाकिस्तान नित्यनेमाने घेत असते आणि त्याच आधारावर भारतातच हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा प्रतिआरोप केला जात असतो. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने त्याच आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. इथे शिंदे यांची चुक कुठे झाली, ती लक्षात घेतली पाहिजे. ते कॉग्रेस पक्षात आहेत व कॉग्रेसचे नेताही आहेत. पण त्याचवेळी ते भारत सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. मग ते बोलतील त्याकडे कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा आरोप म्हणून बघितले जाणार नाही. तर भारत सरकारचे मत वा निष्कर्ष म्हणूनही बघितले जाणार असते. शिंदे यांनी केलेला आरोप व दिग्विजय सिंग यांनी केलेला आरोप यात असा मूलभूत फ़रक असतो. म्हणूनच अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याचे कायम भान राहले पाहिजे. शिंदे यांना त्याचेच भान ठेवता आलेले नाही. पण पक्षिय अभिनिवेशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला किती नुकसान होईल; हा भागा अजिबात महत्वाचा नाही. शिंदे यांच्या त्याच विधानाने भारताचे किती नुकसान केले वा होणार; या गोष्टीला अत्यंत महत्व आहे.
शिंदे यांनी ते भाषण केल्यावर इथे भाजपाने कल्लोळ केला, ह्याला महत्व नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातून तात्काळ आलेली प्रतिक्रिया महत्वाची होती. लष्करे तोयबाचा मुखिया व २६/११ च्या मुंबई हल्यातला सुत्रधार, आरोपी हफ़ि़ज़ सईद याने भारतातच दहशतवाद पोसला जातो, याला भारताच्या गृहमंत्र्यांनीच दुजोरा दिल्याचे घोषित केले. तेवढ्यावर न थांबता त्यांने तात्काळ तीन भारतीय हिंदू दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन अवघ्या जगाला करून टाकले. त्यांनी नावे वाचली तर शिंदे किती हास्यास्पद ठरलेत; त्याचा अंदाज येऊ शकतो. हफ़िज़ने बंदीची मागणी केली त्यात संघ व हिंदू परिषदेचे नाव असायला हरकत नाही. पण त्याने बंदी घालायची मागणी केलेल्या तिसर्या संघटनेचे नाव ‘शिंदे’ असे दिले होते. म्हणजे त्या माकडाला शिंदे हे व्यक्तीचे नाव किंवा आडनाव असते हेसुद्धा माहीत नाही. अशा माकडाच्या हाती आपण कोलित देतो आहोत, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायचे असते. कारण गृहमंत्र्याचे विधान जाहिर असले; मग ते भारत सरकारचे धोरण वा मत मानले जात असते. जगभर पाकिस्तानी जिहादी धुमाकुळ घालत आहेत. मुंबई हल्ल्यातला हाती लागलेला एकमेव फ़िदायिन अजमल कसाब; यानेही हफ़िज़च आपल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याची कोर्टात कबुली दिलेली आहे. त्याचा फ़ोनवरचा आवाजही नोंदला गेलेला आहे. त्याच्या आवाजाचा नमूना द्यायचेही पाकिस्तानने नाकारले आहे. त्याच्यासह लष्कर विरोधातले पुरावेही पाकने नाकारले आहेत. फ़ार कशाला जगाकडे पुरावे असताना लष्कर नावाची संघटना पाकिस्तानात कार्यरत आहे; हे सुद्धा स्विकारण्यास नकार दिला आहे. आणि दुसरीकडे आमचे गृहमंत्रीच ज्या संघटनांबद्दल काही संदिग्ध पुरावे किरकोळ प्रकरणातले आहेत. त्याचा हिंदू दहशतवाद म्हणून जगभर डंका पिटणार असतील, तर पाकने त्याचा गैरवापर करू नये असे कोणी म्हणू शकेल का? आपण भाजपाला शह देण्याचे राजकारण करताना भारत सरकारच्या पायावर धोंडा मारतोय याचे तरी भान शिंदे यांनी ठेवायला नको का? त्याच्या परिणामांचा विचार नको करायला?
हफ़िज़ने त्याच्याही पुढे जाऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. भारताचे गृहमंत्रीच इथे दहशतवादी संघटना आहेत व त्या घातपात हिंसेचे प्रशिक्षण देतात. तेव्हा या निवेदनाच्या आधारे भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, अशीही मागणी हफ़िज़ने केली आहे. नशीब अजून पाकिस्तानने तशी मागणी केलेली नाही. पण उद्या नजिकच्या काळात पाकिस्तान तशी मागणी करणार नाही, याची कोणी हमी देउ शकते काय? कारण तशी मागणी करण्यासाठी पाकिस्तानला कुठले पुरावे देण्याची गरज नाही. कारण तसे पुरावे आहेत व तसा अहवालच आपल्या हाती आलेला आहे, असे भारताच्या गृहमंत्र्यानेच खुलेआम सांगून टाकलेले आहे. तेव्हा ती एकप्रकारे भारतात दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे असल्याची भारत सरकारचीच कबुली ठरते. त्याचे पुरावे राष्ट्रसंघाने पाकिस्त्तानकडे मागायची गरज उरत नाही. ते पुरावे आहेत म्हणणार्या भारत सरकार व गृहमंत्री शिंदे यांनाच द्यावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांनी जे काही नंतर वा आधी भाजपच्या तोंडावर खुलासे टाकले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्यांना तशी वेळ आली तर जगासमोर त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि ते पुरावे भाजपा किंवा संघाच्या विरोधातले देऊन चालणार नाही. तर त्यांनाच निर्दोष ठरवणारे पुरावे द्यावे लागतील. कारण भाजपा किंवा संघ दहशतवादी संघटना असतील तर त्यावर भारत सरकारला बंदी घालावी लागेल. कारण तशी माग्णी पाकिस्तानने लावून धरली तर त्यासाठी समोर भाजपा किंवा संघाचा कोणी प्रवक्ता नसेल. समोर असेल राष्ट्रसंघ व अवघे जग. त्यामुळेचे जे कोणी पोपटासारखे भाजपा व संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावून अकलेचे तारे तोडत आहेत, ते शिंदे यांचे समर्थन करीत नसून भारताला सापळ्यात अडकवत आहेत. मग ते माध्यमातले बावळट सेक्युलर असोत किंवा कॉग्रेसचे मुर्ख नेते असोत. कारण पाकिस्तानने त्याचा आधार घेतला तर जगासमोर नाचक्की भाजपाची होणार नाही ती नाचक्की भारत सरकारची होणार आहे. त्याचे उत्तर भारत सरकार म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसलाच द्यावे लागणार आहे. कारण या आरोप व भाषणाचा आधार पाकिस्तानने घेतला तर भाजपा व संघ बाजूला पडून देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.-भाऊ तोरसेकर
24 Jan 2013 - 10:52 pm | अभ्या..
साह्यबांच्या विधानाचा योग्य अर्थ फक्त सोलापूरसाठीच आहे. हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरचा जिल्हा आहे. सध्या येथील राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलच्या धडाकेबाज मोहिमेला दिलेले उत्तर आहे ते. देशपातळीवर जरी याचा परिणाम झाला तरी तो काँग्रेसला हवाच आहे. किंबहुना धर्मांध आणि निधर्मांध असे कथित ध्रुवीकरण इलेक्शनपर्यंत झाले तरी ते काँग्रेसला फायद्याचे आहे. त्याचाच हा एक बाण आहे. शिकार किती होतील कुणास ठाऊक?
29 Jan 2013 - 5:37 pm | चिंतामणी
शिंदे सायबांच्या या महान विचारांमुळे त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत आहेत.
हे वाचा.
24 Jan 2013 - 11:13 pm | पिंपातला उंदीर
दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला धर्माची लेबल लावण चुकच. पण मुस्लिमाणा सरसकट दहशतवादी ठरवणे पण चुक आणि सरसकट सगळे हिंदू दहशतवादी आहेत असे म्हणे पण चुकच.
25 Jan 2013 - 2:45 am | विकास
कुठल्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध न करता, त्या अरोपांना न्यायालयात तडीस न नेता, नुसते वर्षानुवर्षे डांबून ठेवून, त्याचा नुसताच राजकीय वापर त्या व्यक्तीपेक्षा गिल्ट बाय असोसिएशन ने इतर संघटना/संस्थांच्या विरोधात करणे हे महाचूकच, मानवाधिकारच्या विरोधात आहे. अर्थात अशा ठिकाणी ते बोलायला जात नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. असो.
12 Feb 2013 - 5:19 pm | अनामिका
फक्त माहिती साठी ...सध्या कॉंग्रेसचे तहहयात रोजंदारी कामगार असलेले सुशील कुमार .ज्याना सध्या कॉंग्रेसने दहशतवादाचे रंगारी म्हणुन कंत्राट दिलेय त्यांना हा तपशिल अंमळ माहित नसावा "प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो पण पकडला जाणारा प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो" हे गृहितक संघ अथवा भाजपाचे नसून "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims"-Abdel Rahman al-Rashed
25 Jan 2013 - 2:57 am | बॅटमॅन
सगळे मूर्खागमनी आहेत झालं बरळणारे.
25 Jan 2013 - 5:49 am | अग्निकोल्हा
'विश्वरूपम' या चिपत्रटाच्या प्रदर्शनाला घातलेल्या दोन आठवड्यांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी हा 'सांस्कृतिक दहशतवाद' असल्याचे म्हटले आहे. यावर उपाय काय ?
25 Jan 2013 - 7:35 am | नितिन थत्ते
इंटरनेट हिंदू म्हणजे कोण असा कुणाला प्रश्न पडला असेल तर हा धागा पहावा.
25 Jan 2013 - 9:03 am | विकास
मला माहीत नव्हते तुम्ही समोरच्याला धर्माच्या नजरेतून बघता ते. :-)
25 Jan 2013 - 11:05 pm | हुप्प्या
ते असो.
पण चिचाजी, आपले या विषयावर मत काय? (पूर्व)ग्रहमंत्री शिंदेसाहेब योग्य बोलले की नाही?
दहशतवादाला रंग देणे योग्य की अयोग्य?
25 Jan 2013 - 11:20 pm | आजानुकर्ण
इंटरनेट हिंदू हा वेगळा धर्म नाही. ते एक Behavioral Trait आहे. जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते तसे इंटरनेट हिंदूंचे खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाशी काही नाते नसते.
28 Jan 2013 - 1:33 pm | प्रसाद प्रसाद
जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते
शंकरपाळी हा शब्द हिंदीतील ‘शक्करपारे’ ह्या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे वाचल्याचे आठवते, खूप दिवसापूर्वी वाचले होते त्यामुळे देण्यासाठी संदर्भ सापडत नाहीये..........
29 Jan 2013 - 2:20 pm | चेतन
विचारजंत म्हणजे कोण असा कुणाला प्रश्न पडला असेल तर ह्या धाग्यावरिल प्रतिसाद पहावे
25 Jan 2013 - 9:05 am | श्री गावसेना प्रमुख
सगळ कस राजकारण(आपण फक्त चघळत बसायच)
25 Jan 2013 - 10:04 pm | श्रीगुरुजी
आजकाल काहीही झाले तरी संघपरिवारावर ठपका ठेवला जातो. माझ्या मते संघपरिवारात फक्त ४-५ संघटना येतात. त्या म्हणजे रा.स्व.संघ, भाजप, अभाविप, भारतीय मजदूर संघ व वनवासी संघ.
शिवसेना, भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना, पतितपावन संघटना, श्रीराम सेने, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अभिनव भारत, सनातन भारत, श्रीरामजन्मभूमी न्यास इ. संघटना/पक्ष संघाच्या नियंत्रणात नाहीत. परंतु या इतर संघटनांनी काहीही केले तरी संघपरिवारावर म्हणजे पर्यायाने रा.स्व.संघावर ठपका ठेवला जातो.
25 Jan 2013 - 11:19 pm | आजानुकर्ण
हम्म. हे रोचक आहे. संघ परिवारात फक्त ४-५ संघटना येतात हे केवळ तुमचे मत आहे की तथ्य आहे?
येथे थोडी माहिती पाहा.
http://www.sanghparivar.org/organization-profiles
http://en.wikipedia.org/wiki/Sangh_Parivar
26 Jan 2013 - 8:36 pm | श्रीगुरुजी
मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त विश्व हिंदू परिषद या एकाच संघटनेचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख आहे. बाकी इतर संघटनांचे नाव आपल्याशी संबंधित असल्याचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख नाही. म्हणजे विश्व हिंदू परिषद वगळता मी दिलेली उर्वरित यादी बरोबर आहे. या उर्वरित संघटना संघाशी संबंधित नाहीत म्हणजेच संघ त्यांचे व्यवस्थापन करित नाही किंवा संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही.
12 Feb 2013 - 4:59 pm | अनामिका
सदरचा लेख फक्त माहितीसाठी बाकी चालू द्या ..
Do u know who said this "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims"
A Wake-up Call : Almost all terrorists are Muslims..
Arab News ^ | Abdel Rahman al-Rashed
Posted on Sunday, October 3, 2004 6:58:34 AM by paltz
It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims.
The hostage-takers of children in Beslan, North Ossetia, were Muslims. The other hostage-takers and subsequent murderers of the Nepalese chefs and workers in Iraq were also Muslims. Those involved in rape and murder in Darfur, Sudan, are Muslims, with other Muslims chosen to be their victims.
Those responsible for the attacks on residential towers in Riyadh and Khobar were Muslims. The two women who crashed two airliners last week were also Muslims.
Osama bin Laden is a Muslim. The majority of those who manned the suicide bombings against buses, vehicles, schools, houses and buildings, all over the world, were Muslim.
What a pathetic record. What an abominable "achievement." Does all this tell us anything about ourselves, our societies and our culture?
These images, when put together or taken separately, are shameful and degrading. But let us start with putting an end to a history of denial. Let us acknowledge their reality, instead of denying them and seeking to justify them with sound and fury signifying nothing.
For it would be easy to cure ourselves if we realize the seriousness of our sickness. Self-cure starts with self-realization and confession. We should then run after our terrorist sons, in the full knowledge that they are the sour grapes of a deformed culture.
Let us listen to Yusuf al-Qaradawi, the sheikh – the Qatar-based radical Egyptian cleric – and hear him recite his fatwa about the religious permissibility of killing civilian Americans in Iraq. Let us contemplate the incident of this religious sheikh allowing, nay even calling for, the murder of civilians.
This ailing sheikh, in his last days, with two daughters studying in "infidel" Britain, soliciting children to kill innocent civilians.
How could this sheikh face the mother of the youthful Nick Berg, who was slaughtered in Iraq because he wanted to build communication towers in that ravished country? How can we believe him when he tells us that Islam is the religion of mercy and peace while he is turning it into a religion of blood and slaughter?
In a different era, we used to consider the extremists, with nationalist or leftist leanings, a menace and a source of corruption because of their adoption of violence as a means of discourse and their involvement in murder as an easy shortcut to their objectives.
At that time, the mosque used to be a haven, and the voice of religion used to be that of peace and reconciliation. Religious sermons were warm behests for a moral order and an ethical life.
Then came the neo-Muslims. An innocent and benevolent religion, whose verses prohibit the felling of trees in the absence of urgent necessity, that calls murder the most heinous of crimes, that says explicitly that if you kill one person you have killed humanity as a whole, has been turned into a global message of hate and a universal war cry.
We can't call those who take schoolchildren as hostages our own.
We cannot tolerate in our midst those who abduct journalists, murder civilians, explode buses; we cannot accept them as related to us, whatever the sufferings they claim to justify their criminal deeds. These are the people who have smeared Islam and stained its image.
We cannot clear our names unless we own up to the shameful fact that terrorism has become an Islamic enterprise; an almost exclusive monopoly, implemented by Muslim men and women.
We cannot redeem our extremist youths, who commit all these heinous crimes, without confronting the sheikhs who thought it ennobling to reinvent themselves as revolutionary ideologues, sending other people's sons and daughters to certain death, while sending their own children to European and American schools and colleges.
*Abdel Rahman al-Rashed is general manager of Al-Arabiya news channel. This article first appeared in the London-based pan-Arabic newspaper Al-Sharq Al-Awsat.
26 Jan 2013 - 1:11 am | श्रीरंग_जोशी
एक प्रश्न आहे, उत्तर कोण देऊ शकेल माहित नाही. १९८९ - ९० च्या दरम्यान विहिंपने अयोध्येतल्या प्रस्तावित राममंदीरासाठी वर्गणी गोळा केली होती. ते मंदीर अजूनही प्रस्तावितच आहे. एवढ्या सार्या पैशांचे पुढे काय झाले?
माझ्याही घरून काही वर्गणी गेली होती. दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू....
26 Jan 2013 - 1:43 am | विकास
मी (आम्ही/घरच्यांनी) काही वर्गणी दिली असे वाटत नाही. एकूणच त्यात गुंतलेले नव्हतो.
दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू....
हा हा! मस्तच उत्तर.
तरी देखील उत्सुकतेपोटी गुगलले तर Clouds of uncertainty looms over VHP workshop ही टाईम्स मधील बातमी वाचायला मिळाली. त्यात म्हणल्याप्रमाणे ७०% मंदीर तयार आहे. उर्वरीत ३०% "वही बनाएंगे" ;) असल्याने राहीले आहे. त्यातील मुद्द्याचा परीच्छेद खाली देत आहे:
There have been other hiccups too. In 1989, the VHP raised an amount of Rs 2.75 crore after accepting donations of Rs 1.25 each from Ramlala's followers. By the time the construction on the temple began, the interest capitalised on the funds gave the VHP a whopping Rs 7.5 crore with which to order material needed for construction. Spokesperson for VHP's Awadh region, Sharad Sharma confirmed all the money had been spent on acquiring material. "We exhausted the entire funds in acquiring materials for construction.
थोडक्यात पैसे वापरले गेले आहेत. तेंव्हा परत मागायला जाऊ नका...पण अजून देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ;)
26 Jan 2013 - 2:16 am | श्रीरंग_जोशी
२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही.
तुमच्या प्रतिसादानंतर आठवले की बातम्यांमध्ये एकदा उ.प्र. मधील एका मार्बल फॅक्टरीमध्ये राममंदिरासाठी तयार असलेले संगमरवर वगैरे दाखवले होते.
26 Jan 2013 - 2:30 am | विकास
२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही.
कल्पना नाही. पण आता इतकी(शी) रक्कम एखादा नगरसेवकही त्याच्या एका खिशातून काढून देऊ शकेल असे वाटते. :-)
26 Jan 2013 - 2:36 am | श्रीरंग_जोशी
तेव्हा तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विहिंपचा साधा कार्यकर्ता दिवसाला हजार दिड हजार रुपये सहज जमवत असे. देशभरातील मोठी शहरे व धनाढ्यांकडून मिळालेल्या देणग्या पाहता रक्कम किमान १ अब्ज तरी असायला हवी...
26 Jan 2013 - 11:35 am | राही
रा.स्व. संघाचे एक निष्ठावंत वृद्ध पदाधिकारीकार्यकर्ता आमच्या घरी येत असत.वनवासी कल्याणाशी संबंधित काम असे. नंतर जन्मभूमी चळवळ उफाळून आली तेव्हा मदतीचा प्रश्न आला.त्यातले हेतू व अंमलबजावणीची दिशा मान्य नसल्याने थोडा मैत्रीपूर्ण वाद झाला.त्या काळात मंदिरनिर्मितीसाठी गावागावांतून समारंभपूर्वक विटा गोळा करण्याचा कार्यक्रम चालत असे.सुंदर वस्त्रालंकारयुक्त स्त्रीपुरुषांनी या विटा माथ्यावरून वाजत गाजत वाहून आणायच्या,गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी समारंभपूर्वक पूजा वगैरे करायची आणि नंतर त्या राममंदिरासाठी अयोध्येकडे रवाना करीत आहोत असे सांगून तिथून हलवायच्या अशी साधारणतः कार्यपद्धती असे.याबद्दल आम्ही नापसंती व्यक्त करताच ते वृद्ध गृहस्थ म्हणाले होते, अहो,आम्ही घराघरांतून मदत मागतो ते संपर्क,प्रचार आणि वातावरणनिर्मितीसाठी. मंदिरासाठी अशा किरकोळ वैयक्तिक देणग्यांची गरज नाही. परदेशांतून इतका पैसा आला आहे की त्यात कितीतरी मंदिरे उभी राहू शकतील. काहींनी तर खर्याखुर्या सोन्याच्या विटा पाठवल्या आहेत.आहात कुठे!
26 Jan 2013 - 11:56 am | अमोल खरे
हे सहीच. :) असाच एक संघाचा माणुस मला म्हणाला होता की जेव्हा भाजपा ह्या राममंदिरा च्या इश्यु मधे घुसला, सर्व बट्ट्याबोळ झाला. नाहीतर मंदिर कधीच बांधुन झालं असतं.
26 Jan 2013 - 1:15 pm | आजानुकर्ण
मंदीर बांधून झालं तर पुढच्या निवडणुकीत काय विषय घेणार?
26 Jan 2013 - 5:10 pm | पिंपातला उंदीर
अयोध्या तो बस झानकी है ; मथुरा काशी अभी बाकी है ही घोषणा आठवली
28 Jan 2013 - 9:53 am | पिंपातला उंदीर
ज्या कामासाठी करोडो रुपये जमा केले तो मुद्दा च सोयीस्कर पण खुंतीवर टांगुन ठेवणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार च की. त्या जमा केलेल्या पैशाच पुढे काय झाल हा वेगळाच भाग. पण आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो.....
30 Jan 2013 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(संघद्वेष्टे किंवा संघाशी संबंध नसलेले सोडून देऊ.)
संघाबद्दल सहानुभूती, आपुलकी, इ. इ. आहे असं दिसणारे प्रतिसाद लिहीणार्या व्यक्तीलाही, संघाशी संबंधित किंवा संघाच्या नियंत्रणाबाहेर असणार्या संघटनांची यादी बनवताना समिती आठवतही नाही.
31 Jan 2013 - 12:27 pm | पिंपातला उंदीर
लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा तुम्ही. एका धाग्यावर संघ कसा बायकाणा समानतेने वागवतो यावर अहमहीकेने वाद घालणारे महाभाग आठवले ; )
28 Jan 2013 - 2:18 am | हुप्प्या
सव्वीस नोव्हेंबर, आझाद मैदान ह्या दहशतवाद, दंगेखोरीला हिरवा रंग दिला तर चालेल का?
28 Jan 2013 - 10:55 am | नितिन थत्ते
त्या दहशतवादाला नेहमीच* रंग दिला गेला आहे म्हणून तर दुसरा रंगही दाखवला जात आहे.
प्रत्येक ...... दहशतवाई नसतो पण..... वगैरे
28 Jan 2013 - 12:09 pm | श्रीगुरुजी
पण दहशतवादाचा हा दुसरा रंग अस्तित्वात आहे का? या रंगाच्या किती जणांवर आजतगायत दहशतवादाचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत?
28 Jan 2013 - 12:16 pm | पिंपातला उंदीर
http://www.hindustantimes.com/photos-news/Photos-India/ConvictedinNaroda...
http://www.mid-day.com/news/2012/aug/310812-Naroda-Patiya-case-Maya-Kodn...
http://ibnlive.in.com/news/graham-staines-killer-dara-singh-gets-another...
28 Jan 2013 - 2:20 pm | श्रीगुरुजी
दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि जातीय दंगली या वेगळ्या आहेत. जातीय दंगली भारतात स्वातंत्र्यापूर्वीपासूनच सुरू आहेत. त्या जशा दोन धर्मात होतात, तशाच दोन जातींमध्ये पण होतात आणि एकाच धर्माच्या दोन पंथांमध्ये पण होतात. या दंगली बर्याचदा उस्फूर्त किंवा काही तात्कालिक कारणामुळे होतात व बहुतेकवेळा त्या योजनाबद्ध नसतात. जातीय दंगलीत आजवर अनेकांना (सर्व जातीधर्माच्या) शिक्षा झालेली आहे.
अतिरेकी हल्ल्याला कोणतेही कारण लागत नाही. कुठेतरी जाऊन माणसे मारायची व दहशत निर्माण करायची हाच उद्देश दहशतवादामागे असतो. २६/११ पाकिस्तानमधून येऊन मुम्बईत निरपराध नागरिकांना मारणार्या अतिरेकी हल्ल्यामागे किंवा जुलै २००६ मध्ये मुम्बईत लोकलमध्ये प्रेशरकुकर मध्ये बॉम्ब ठेवून जवळपास २०० लोकांना मारणार्यांकडे पाकिस्तानकडे समर्थनीय कारण नव्हते. अतिरेकी हल्ले हे उस्फूर्त किंवा तात्कालिक कारणांमुळे होत नसून त्याची अतिशय थंड डोक्याने योजना बनविलेली असते. धर्माच्या नावावर भडकावून, धर्मग्रंथांचा हवाला देऊन, अनेक महिन्यांपासून ब्रेनवॉशिंग करून अतिरेकी घडविले जातात.
28 Jan 2013 - 3:34 pm | पिंपातला उंदीर
मुळात दुसर्या माणसाला तो निव्वळ दुसर्या धर्माचा आहे म्हणून लोकाना थंड डोक्याने मारणे हा बाबू बजरंगी आणि कसाब यांच्यामधला समान दुवा. कर्नल पुरोहित, साधवी प्रज्ञा आणि सनातन सारख्या संघटणावर खटले चालू आहेत. आणि जोपर्यंत न्यायालयात गुन्हा शाबित होत नाही तोपर्यत संबंधित इसम गुन्हेगार नाही हा युक्तिवाद अजित पवार, राजा, गडकरी पासून ते एदियुरप्पा पर्यंत सगळे जण वापरतात हा भाग अलाहिदा.
29 Jan 2013 - 12:35 am | चिंतामणी
__/\__
(घिसी पिटी वाक्य टाकल्याबद्दल.)
29 Jan 2013 - 9:04 am | हुप्प्या
नेहमीच म्हणजे काय? आजपर्यंतचे तमाम गृहमंत्री हिरव्या दहशतवादाबद्दल उच्चरवाने सांगत होते आणि आजचे व्यासंगी गृहमंत्री अद्ययावत संशोधनाच्या आधारावर भगव्या दहशतवादाबद्दल कंठशोष करत आहेत असे म्हणत आहात का चिचाजी?
तसे असेल तर अधिकृत पातळीवरून, गृहमंत्र्यासारख्या उच्च स्थानी बसलेल्या कोणी हे हिरवे विधान केले ते जरा उलगडून सांगा. आम्हा अज्ञानी लोकांना तसे असल्याचे माहित नाही.
28 Jan 2013 - 12:08 pm | श्रीगुरुजी
शिंद्यांचे अत्यंत निराधार व अत्यंत बेजबाबदार आरोप भारताला किती महागात पडणार आहेत याची ही एक झलक. असा बेजबाबदार माणूस भारताच्या गृहमंत्रीपदावर आहे हे आपलं दुर्दैव.
http://www.outlookindia.com/article.aspx?283697
भाजप/संघावर आरोप करताना आपल्याच काँग्रेस पक्षाचा गुजरातेतला एक मंत्री महंमद सुर्ती याला १९९३ च्या सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी २० वर्षाचा तुरूंगवास झाला आहे हे शिंदे सोयीस्कररित्या विसरले आहेत.
29 Jan 2013 - 3:26 pm | चिंतामणी
सडके राजकारण
लोकांचे लक्ष
"महागाई, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार" इत्यादी गोष्टींवरून उडवण्यासाठी जी
आघाडी केंद्रातील सत्ताधारी पक्ष्याच्या नेत्यांनी उघडली आहे ते बधून
अत्यंत वेदना होत आहेत.
असल्या सडक्या राजकारणाने आपण देशाची
प्रतिमा बिघडवत आहोत आणि सर्वात जास्त धोकादायक शत्रू म्हणजे अतिरेकी यांना
बळ देत आहोत याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांना नाही हे त्याहून वाईट.
काही
दिवसांपूर्वी आपल्या सैनिकांची शिरे कापून पळवणाऱ्या पाकिस्तानी लष्करला
हाफिज सईद हा चिथावणी देण्यासाठी सीमेवर हजर होता असे वक्तव्य करणारे
मंत्रीमहोद पक्ष्याच्या शिबिरात संघावर घसरले.
आधी चिदंबर गृहमंत्री होते त्यांनी जे वक्तव्य केले तसेच आताच्या गृहमंत्री आरोप करीत होते. "तुमच्या हातात पुरावे आहेत तर कारवाई का करीत नाहीत " याचे उत्तर ते देऊ शकणार नसल्याने फक्त फुत्कार टाकत आहेत.
या फुत्कारांनी बळ मिळालेल्या "हाफिज सईद साहेब" याने लगेचच दुगण्याझाडल्या आहेत. (हाफिज सईदचा उल्लेख "साहेब" असा करणाऱ्या नेत्याबद्दल बोलायची इच्छा नाही.)
शिंदेंमुळे दहशतवाद्यांच्या हाती आयते कोलीत
हि बातमी सविस्तर वाचा.
ही बघा हाफिज सईद याची मुलाखत.
शिंद्यांनी दिलेल्या टोनिकमुळे बळ मिळालेले त्याच्या वक्तव्यात दिसून येईल.
अमेरिकेलासुद्धा आवाज देत आहे तो.
BJP and RSS should be declared as 'terrorist outfits': Hafiz Saeed
हे सुद्धा बघा.
LeT chief Hafiz Saeed praises Shinde's terror remark
शिंद्यांनी दिलेल्या डोसमुळे हाफिज सईद साहेब सुटले आहेत.
त्यांची मुक्ताफळे वाचा.
शाहरुखनं पाकमध्ये स्थायिक व्हावं!- हाफिज सईद
आणि
भारताकडून काश्मीर काबीज करणारच!- हाफिज सईद
त्याच्या जोडीने ISI उतरली आहेच.
'भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्यास ५ लाख'...ISIची ऑफर
आम्ही फक्त चिंता व्यक्त करणार.
पाकनं आमची मैत्री गृहित धरू नये!- राष्ट्रपती
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रणव मुखर्जींचे भाषण
वृत्तसंस्था , नवी दिल्ली
शेजारी देशांमध्ये मतभेद असू शकतात ,
सीमेवर तणाव असू शकतो. मात्र काही गटांच्या माध्यमातून दहशतवादाला
प्रोत्साहन देणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे. भारत मैत्रीचा हात पुढे
करण्यास तयार आहे , परंतु आम्हाला गृहीत धरू नका ,
असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला दिला.
देशाच्या ६४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून
केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात मुखर्जी यांनी नियंत्रण रेषेवर
पाकिस्तानने भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा संदर्भ घेत पाकला
ठणकावले.
हे ठणकावणे आहे का?
केंद्रीय गृह मंत्र्यांमुळे सर्व अतिरेकी संघटनांना बळ मिळाल्याचा हा अजून एक नमुना.
मुसलमानांसाठी काश्मीरवर हल्ला करण्याची तालिबानची धमकी
निष्पाप काश्मीरी मुसलमानांना काश्मीरातून हकलवून लावण्यासाठी भाजपने छुप्या पद्धतीने हिंदू दशहशतवादी शिबिरे चालवली आहेत , असा सूर तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानने आळवला आहे . ती शिबिरे नष्ट केली नाहीत तर भारतावर हल्ला करू , असा इशारा या संघटनेने दिला आहे .
पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने ही माहिती आपल्या वृत्तपत्रातून देण्यात आले आहे . तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानचे प्रमुख एहसानुल्लाह एहसान याने डॉन या वृत्तपत्राकडे भारताचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत हा इशारा दिला आहे
29 Jan 2013 - 3:34 pm | चिंतामणी
हे सुद्धा बघा.
LeT chief Hafiz Saeed praises Shinde's terror remark
29 Jan 2013 - 11:44 pm | चिंतामणी
( अर्थात ती करण्याचे त्यांचे धैर्य काश्मुळे झाले हे सांगायला नको)
शाहरुखला सुरक्षा द्या! : पाकचा आगाऊपणा
(येथे सविस्तर बातमी वाचा)
लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफिज सईदने अभिनेता शाहरुख खानला पाकिस्तानात
स्थायिक होण्याची ऑफर दिल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनेही या प्रकरणात तोंड
खुपसले आहे. ‘शाहरुख खानला भारत सरकारने योग्य सुरक्षा द्यावी, असा
आगाऊपणाचा सल्ला पाकिस्तानचे वादग्रस्त गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिला
29 Jan 2013 - 11:45 pm | चिंतामणी
शाहरुखला सुरक्षा द्या! : पाकचा आगाऊपणा
28 Jan 2013 - 1:09 pm | गब्रिएल
जोपर्यंत (अगदी मेल्यानंतर मिळणार्या फायद्यांच्या) फुक्या गोड आश्वासनांवर भुलून जीव द्यायला / जीव घ्यायला तयार होणारे निर्बुद्ध लोक या जगात आहेत. अशा लोकांना उल्लू बनवून त्यांच्या चितेवर आपली पोळी भाजून घेताना शरम अथवा दु:ख न वाटणारे नराधम हजारो वर्षांपासून आस्तित्त्वात होते, आहेत आणि होत राहतील.... राजकारण्यांना (धर्माचा बुरखा घेतलेले राजकारणी यात समाविष्ट आहेत) कुठल्याही रंगाचे वावडे नसते.
येशु ख्रिस्ताला ज्याने सुळावर चढवले त्याच रोमन साम्राज्याने नंतर ख्रिचियानीटीचा साम्राज्यवाढीसाठी खूप चांगला उपयोग होईल हा विचार करून ख्रिश्चन धर्मप्रसार आणि त्याच्या बळावर राज्यप्रसार हे धोरण यशस्वीपणे अवलंबले आणि बहुतेक सगळा युरोप आपल्या साम्राज्यात सामील केला.
राजसत्तेच्या वाढीस फार उपयोगी आहे हे जाणून उथमान ने त्याकाळी आस्तिवात असणार्या ३६० पेक्षा जास्त कुराणाच्या प्रती जमा करून त्यांची एकत्रित एकच प्रत बनवली आणि इतर सर्व नष्ट केल्या. हे एकत्रित कुराण मुस्लिम जगतावर ऑटॉमान साम्राज्याचा एकछ्त्री अंमल आणण्यास कामाला आले. आता अफगाणिस्तानमध्ये चालेलेली तालिबानी दडपणूक आणि ड्र्गचा व्यापार हा पैसा व सत्तेचा खेळ नाही तर अजून काय आहे?
आजच्या राजकीय / धार्मीक नेत्यांची भाषणे अथवा वागणूक ही मुख्यतः अशाच स्वयंकेंद्रित फायद्याकरिता आहे. जोपर्यंत त्यांच्यामागे धावणार्या समाजाला अक्कल येत नाही तोपर्यंत अश्या जनतेचा उपयोग नेत्यांच्या (गैर)फायद्याकरता होणे अपरिहार्य आहे.
28 Jan 2013 - 5:52 pm | विकास
चिदंबरम, शिंदेंवर ४२० चा गुन्हा
तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे आश्वासन देऊन केंद्रीय अर्थ मंत्री पी. चिदंबरम आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकांची फसवणूक केली असून दोन्ही नेत्यांवर आयपीसीच्या कलम ४२० खाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश आंध्र प्रदेशमधील न्यायालयाने दिले आहेत.
अधिक वरील दुव्यात वाचायला मिळेलच.
30 Jan 2013 - 2:47 am | बाळकराम
सुशीलकुमार शिंदेना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही- असला मेंगळट माणूस भारताच्या गृहमंत्रीपदी जाऊन बसतो हेच आपलं दुर्दैव (आणि हफीज सईद सारख्यांची चंगळ) आहे. एक प्रश्न पडतो- ज्या ज्या मराठी नेत्यांना केंद्रात गृहमंत्र्यासारखी महत्त्वाची पदं मिळाली ते बहुतेक सगळे असले नगच कसे निघाले- उदा शिवराज पाटील, सुशीलकुमार किंवा राज्य पातळीवर आर्र आर्र पाटील इ. एकापेक्षा एक सगळे शेळपट आहेत.
31 Jan 2013 - 12:19 pm | वेताळ
त्यांनी हा धागा वाचावा, म्हणजे त्याना कसे वागावे ह्या बद्दल मौलिक सल्ले फुकटात मिळतील.
2 Feb 2013 - 12:15 am | अनामिका
सुशिलकुमार शिंदे खरे बोलले असतील तर पाकिस्तानने उगाच आरोप अंगावर घेतला म्हणायचा का? संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव पण खोटा आहे का? तो प्रस्ताव काय म्हणतो? ‘लष्करे तोयबाचा अन्य सघटनांशी संबंध ठेवणारा प्रमुख संपर्काधिकारी कस्मानी आरिफ़ याने फ़ेब्रुवारी २००७ मध्ये भारतातील पानिपत येथे झालेल्या समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फ़ोटात महत्वाची भूमिका बजावली. त्याला व अलकायदाला निधी उभारणीसाठी दाऊद इब्राहिमने मदत केली. अन्यत्र आपल्या कृत्याला सहाय्य देण्य़ाच्या बदल्यात अलकायदाने तोयबाला समझौता स्फ़ोटात मदत केली.’ (प्रस्ताव क्रमांक १२६७) हा प्रस्ताव राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने २९ जुन २००९ रोजी संमत केलेला आहे. दोनच दिवसांनी १ जुलै २००९ रोजी आरिफ़सह अन्य तीन पाकिस्तान्यांची नावे घेऊन अमेरिकेच्या अर्थखात्याने (आदेश क्रमांक १३२२४ अन्वये) त्या चौघांनाही दहशतवादी म्हणून घो्षित केले होते. तरी पाकिस्तानने त्याची कबुली द्यायचे नाकारले होते. पुढे सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी २४ जानेवारी २०१० रोजी कोड्यात टाकणारे विधान करत त्याची कबुली दिली. ज्यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले त्या पाकिस्तान्यांचा समझौता स्फ़ोटात हात असल्याचे मान्य केले. पण तसे कस्मानी वगैरेंनी स्वेच्छेने केले नाही. त्यांना कर्नल पुरोहीतने भाडोत्री हल्लेखोर म्हणून सुपारी दिली असा रेहमान यांचा दावा होता.
मग मालेगाव प्रकरणी पकडण्यात आलेल्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध कसा जोडण्यात आला? तर १४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र एटीएसने मालेगाव आरोपीच्या विरोधात कोर्टामध्ये नवेच निवेदन सादर केले आणि त्यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध जोडला. समझौता स्फ़ोटासाठी कर्नल पुरोहित यांनीच आरडीएक्स पुरवले, असे ते एटीएसचे निवेदन होते. पण हे निवेदन किती खरे मानायचे? कारण तोपर्यंत समझौता तपास पुर्ण झाला होता आणि त्यात पकडलेल्या आरोपींनी गुन्हा मान्यही केला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापरच झालेला नव्हता. मग महाराष्ट्र एटीएसने (ज्याचे प्रमुख तेव्हा हेमंत करकरे होते) त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरोहितने पुरवल्याचा शोध कुठून लावला? कारण ज्या दिवशी समझौता स्फ़ोट झाला, त्याच्या दुसर्याच दिवशी तेव्हाचे मराठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापर झालेला नाही, अशी ग्वाही दिलेली होती. पुढे हरयाणा पोलिसांनी केलेल्या तपासात त्या स्फ़ोटासाठी पोटॅशियम क्लोरेट वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले होते आणि तसा दावा कोणा मंत्र्याने नव्हे तर फ़ोरेन्सिक प्रयोगशाळेने केला होता, ज्यांना त्या विषयातले जाणकार मानले जाते. पुढे २० जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र एटीएसने अधिकृतरित्या समझौता स्फ़ोटासाठी पुरोहितने आरडीएक्स पुरवले नसल्याचे कोर्टात मान्य केले. म्हणजेच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला, तसतसा मुळात राईच नाही असे उघडकीस आले. पण नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मात्र आभासातल्या पर्वतावर स्वार झालेले आहेत आणि तिथून उतरायलाच तयार नाहीत. ते एकटेही नाहीत. त्यांच्यासह तमाम सेक्युलर अर्धवटरावही त्याच राईच्या पर्वतावर आरुढ होऊन भगव्या दहशतवादाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. जो पर्वत सोडा जिथे राईसुद्धा अस्तित्वात नाही.
जयपूरमध्ये शिंदे यांनी जे राणा भीमदेवी थाटातले भाषण केले; त्यातही त्यांनी पुन्हा समझौता स्फ़ोटाचा दाखला दिलेला आहे. तो कसा धडधडीत खोटा आहे, त्याचे हे पुरावे आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्यांना पुराव्याच्या आधारे गुन्हा किंवा निरपराधीत्व सिद्ध करायचे असते त्यांच्यासाठी पुरावे कामाचे असतात. ज्यांनी आपल्या संशयिताला आधीच दोषी मानलेले असते, त्यांच्यासाठी पुरावे समोर असून उपयोग कुठला? या बाबतीत आपल्या देशातील सेक्युलर नेते, माध्यमे व विचारवंतांमध्ये एक कमालीचे साम्य आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे शेकडो पुरावे भारताने आजवर पाकिस्तानला दिलेले आहेत. पण त्यांनी एकतरी पुरावा मानला आहे काय? उलट तोंडाने पाकिस्तान म्हणत असतो, पुरावा तर द्या; हफ़िज़ सईदच्या विरोधात. आता इथे वर दिलेली माहिती ही अमेरिका, राष्ट्रसंघ, भारत सरकार, महाराष्ट्र पोलिस, व तात्कालीन वृत्तपत्रात आलेली आहे, बघणार्यासाठी उपलब्ध आहे. पण घट्ट डोळे मिटुन बसलेल्यांना दाखवायचे कसे आणि कोणी?
नसलेले काल्पनिक पुरावे निर्माण करायचे आणि त्याचा गवगवा करायचा. त्याच्या अतिरंजित बातम्या रंगवायच्या. मग ते पुरावे कोर्टात वा प्रयोगशाळेत खोटे पडले; तरी जुन्या खोट्या बातम्यांचा आधार घेऊन तेच तेच खोटे आरोप करतच रहायचे; ह्याला हल्ली सेक्युलर बुद्धीवाद व युक्तीवाद समजले जाते आहे. आणि खोटे पुरावे कसे निर्माण करतात वा करावेत त्याचा पाठ शरद पवारांनी घालून दिलेलाच आहे. मुंबईत १९९३ सालात झालेल्या स्फ़ोटात पाकिस्तान व मुस्लिमांकडे संशयाचा रोख जाऊ नये म्हणून त्यांनी एअर इंडीयाच्या इमारतीमध्ये झालेल्या स्फ़ोटात दक्षिणेकडुन आलेली स्फ़ोटके असावीत असे खोटेच सांगुन टाकले होते. त्यातून मुजाहिदीन वा तोयबाऐवजी तामिळी वाघ मुंबई स्फ़ोटातले आरोपी असावेत; असा खोटाच संशय लोकांच्या मनात भरवण्याचा आपण प्रयत्न केला, अशी कबुली पवारांनी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता यांना कॅमेरासमोर दिलेली आहेच. त्यांच्या वृत्तपत्रात तशी बातमीही त्यांनी छापलेली होतीच. तेव्हा शिंदे आज जो अहवाल सांगत आहेत व मालेगावपासून अन्य कुठल्याही स्फ़ोटामध्ये पुरोहित वा साध्वी यांच्या विरोधातले किंवा अन्य कुणा हिंदू दहशतवाद्याच्या विरोधातले ‘सज्जड व भक्कम’ पुरावे; सापडतात कुठे व असतात कुठे त्याचा पत्ता मिळाला? हे सगळे पुरावे काल्पनिक असतात व सेक्युलर सुपीक डोक्यातून निघालेले असतात. त्यामुळेच ते खर्याखुर्या न्यायालयात आणता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत. म्हणूनच कर्नल पुरोहितने समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप व पुरावा न्यायालयात तोंडावर आदळला तेव्हा माघार घेण्यात आली होती. तसा पुरावा नसल्याची एटीएसने कबूली दिली होती. पवारांनीही आपल्या खोटेपणाची स्वत:च कबुली दिलेली आहे.
पण सुशिलकुमार किंवा कॉग्रेसवाल्यांची अवस्था ‘थोर’ विचारवंत कुमार केतकर म्हणतात तशी असते. ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’. जे लोक सत्तेसाठी लंपट व हपापलेले असतात. त्यांना कसलीच लाज नसते, की फ़िकीर नसते. त्यामुळे ते खोटे बोलू शकतात व सतत खोटे बोलत राहू शकतात. किंबहूना आता सेक्युलर म्हणवणार्यांचे तेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहेत. त्यांना खोटे बोलल्याची लाज उरलेली नाही, की खोटे पकडले गेल्याची शरम वाटेनाशी झाली आहे. उलट खोटे कुठे दिसले, की मिटक्या मारीत ते त्यावर ताव मारताना दिसतात. त्यामुळेच अशा वखवखलेल्यांसाठी शिंदे यांनी जयपुरात पंगत वाढली आणि तमाम सेक्युलर त्यावर तुटून पडले. सोकावलेल्या बिबट्याला गावात धुमाकळ घालू लागला, मग पकडायला सापळा लावावा आणि त्यात तो सापडावा, तशीच सेक्युलर शहाण्यांची आज अवस्था झाली आहे. त्या सापळ्य़ात एका बाजूला शेळी बांधतात व अर्ध्या भागात सापळा असतो. कुठूनही शेळीपर्यंत पोहोचण्याचा हव्यासात उतावळा झालेला बिबट्या शेवटी सापळ्याच्या बाजू्ने पिंजर्यात शिरतो आणि जेरबंद होतो. तशीच अवस्था आता भगव्या दहशतवादाच्या सापळ्यात अडकलेल्या सेक्युलरांची होऊन गेली आहे. कारण हे तमाम मुर्ख शिंदे नावाच्या शेळीच्या मागे धावले आणि खोट्या पिंजर्यात आयते येऊन अडकले आहेत, दिवसेदिवस त्यांचे हे नाटक लांडगा आलारे आला सारखे होत चालले असून त्यातून सामान्य नागरिकांचा जो भ्रमनिरास होत आहे; तो त्याला मतदार म्हणून नरेंद्र मोदींकडे घेऊन जाणार आहे. जातो आहे. गुरूवारी एबीई व हेड्लाईन्स टुडे नावाच्या वाहिन्यांनी मतदाराचा कल घेऊन प्रेक्षकांना सादर केला. त्यात कॉग्रेसची, पंतप्रधा्नांची लोकप्रियता रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. खरे तर ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा कॉग्रेस व सेक्युलर नाटकाला कंटाळलेल्या लोकांची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. निकामी, खोटारड्या व घातक सेक्युलर सत्तेपेक्षा खमक्या व धाडसी नेत्याच्या शोधात लोक आहेत. आणि जितका सेक्युलर खोटेपणा वाढत जाणार आहे; तितका अधिक लोकसमुदाय पक्ष वा विचार नव्हेतर धाडसी व खंबीर नेत्याकडे आकर्षित होणार आहे. मोदींना वाढता पाठींबा प्रत्यक्षात सेक्युलर थोतांडाला झिडकारण्याकडला वाढता कौल आहे. पण ते खोट्या भ्रामक जगात जगणार्यांना सांगायचे कोणी व दाखवायचे कोणी?-भाऊ तोरसेकर