साहित्य मोरोक्कन ग्रील्ड चिकनसाठी:
४-५ चिकन ब्रेस्ट (मी chicken tenderloin वापरले आहे)
१/४ वाटीपेक्षा थोडे कमी ऑलिव्ह ऑईल
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट
१ टीस्पून पॅपरीका पावडर
३/४ टीस्पून कायान पेपर पावडर (cayenne)
१ टीस्पून जीरेपूड
३/४ टीस्पून धणेपूड
१/४ टीस्पून दालचिनी पावडर
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार
पाकृ:
जर तुम्ही चिकन ब्रेस्ट वापरत असाल तर तुम्ही ते लाटण्याने थोडे पाऊंड (चिकनवर क्लिंग फिल्म लावून त्यावर लाटणे हलके - हलके आपटा) करुन घ्या.
मी chicken tenderloin वापरत आहे म्हणून पाऊंड केले नाही.
एका बाऊलमध्ये चिकन पीसेस घ्या व त्यावर वरील सर्व साहित्य घाला.
सर्व साहित्य व्यवस्थित चिकनला चोळून घ्या व चिकनला झीप-लॉक / रि-क्लोझेबल बॅगेत ठेवून फ्रिजमध्ये ५-६ तास मॅरीनेट होण्यासाठी ठेवा.
ग्रील पॅन मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. (तेल घालायची गरज पडत नाही, आपण मॅरीनेशन मध्ये तेलाचा वापर केला आहे)
त्यावर मॅरीनेट केलेले चिकन लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित ग्रील करा.
साहित्य लेमन अँड कोरीएंडर कुसकूस (Couscous):
१ वाटी कुसकूस (Couscous)
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टीस्पून किसलेले लिंबाचे साल
२ टीस्पून लिंबाचा रस (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून काळीमिरीपूड (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१२-१५ काळे मनुके
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
एका बाऊलमध्ये कुसकूस घ्या व त्यात चवीप्रमाणे मीठ, कोथींबीर, काळिमिरीपूड, काळे मनुके, लिंबाचा रस व किसलेले लिंबाचे साल घालून एकत्र करा.
१ वाटी कुसकूस असेल तर साधारण सव्वा वाटी पाणी घ्यावे.
वरील मिश्रणात सव्वा वाटी उकळते पाणी घालावे व झाकण लावून १० मिनिटे तसेच ठेवावे.
१० मिनिटानंतर काट्याने कुसकूस फ्लफ करुन घ्यावे व त्यात १ टेस्पून ऑलिव्ह ऑईल घालून हलकेच एकत्र करावे.
गरमा-गरम मोरोक्कन ग्रील्ड चिकनबरोबर हेल्दी लेमन अँड कोरीएंडर कुसकूस सर्व्ह करावे.
नोटः
कुसकूस हल्ली भारतात मोठ्या सुपर मार्कटमध्ये सहज मिळतं.
मुंबईत डी-मार्ट मध्ये उपल्बध आहे.
जर नाही मिळाले तर तुम्ही जाड रवा (लापशी रवा) चा वापर करु शकता, फक्त रवा आधी थोडा परतून मग पाणी घालून कुकरला शिजवून घ्या.
प्रतिक्रिया
8 Feb 2013 - 2:10 am | Mrunalini
चिकन एकदम सही दिसतय... पण ते कुसकुस कसं लागत गं ??.. मला ते बघुनच अजिबात आवडत नाही.. त्यामुळे कधीच खाल्ल नाहिये.
8 Feb 2013 - 4:34 am | सानिकास्वप्निल
कुसकूस मला तरी खूप आवडतं . तो एक प्रकारचा पास्ताच आहे (वरी/भगर,जाड रव्यासारखा दिसणारा), त्याला चव अशी नसते. जसे आपण पास्ता बनवताना वेग-वेगळे ड्रेसींग वापरतो तसेच ह्यात ही वापरुन चविष्ट बनवता येतं. सॅलॅडमध्ये ही ह्याचा वापर करु शकता, लँब टजिन, चिकन टजिन सारख्या पाकृमध्ये ही वापर होतो. मी तर काही वेळेला आमटी/वरणाबरोबर ही खाते भाताला पर्याय म्हणून ;):P एकदा बनवून बघ, भगर आवडत असेल तर कदाचि हे ही आवडून जाईल :)
8 Feb 2013 - 3:04 am | आजानुकर्ण
कुसकुस हा भगर वगैरे प्रकार आहे काय?
8 Feb 2013 - 3:33 am | रेवती
वाह! छान फोटू आणि पाकृ.
एकदा एकीने खूसखूसचा उपमा केल्याचे आठवते आहे.
चव आठवत नाही.
पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्या खसखशीसारखे आहे की काय असे वाटले पण तसे नव्हते.
भगर्/वरईसारखे आहे.
(तुम्ही सगळे आज नाही तरी काही वर्षांनी मला मांसाहारी करून सोडणार, जागुतैनं तात्पुरतं मत्स्याहारी बनवलं होतच.)
8 Feb 2013 - 11:04 am | इरसाल
आज शुक्रवार असल्याने चिकनवरच उपवास सोडावा लागेल. कुठे ते ५/६ तास मेरीच्या नेटमधे ठेवणार ?
9 Feb 2013 - 5:35 pm | रश्मि दाते
म्स्त दिसत आहे करुन पाहायला पाहिजे ल॑वकरच.
9 Feb 2013 - 5:53 pm | जयवी
मस्त दिसतंय...... :)
10 Feb 2013 - 12:26 am | एस
तेवढी साखर सोडून बाकीची पाकृ आवडली
10 Feb 2013 - 3:23 am | सुहास झेले
सहीच... सादरीकरण नेहमीप्रमाणे अफाट... मला मोरोक्कन ग्रील्ड चिकन जास्त टेंम्पटिंग दिसतंय :) :)
10 Feb 2013 - 4:21 pm | दिपक.कुवेत
करुन बघायला पाहिजे. कुसकूस नाव मोठ मजेदार आहे :)
10 Feb 2013 - 4:53 pm | पैसा
आणि बरेच दिवसांनी ते चमचे बघून मस्त वाटलं! :D
10 Feb 2013 - 5:09 pm | प्रभाकर पेठकर
कुसकुस मीही कधी खाल्लेलं नाही पण इच्छा मात्र आहे. आता ह्या पाककृतीच्या निमित्ताने मुहूर्त लागेल असे वाटते आहे.
10 Feb 2013 - 9:46 pm | प्यारे१
सध्या मोरोक्कोच्या शेजारच्या अल्जिरियामध्ये कुसकुस बघतो जवळजवळ रोज. अजून खाल्लं नाही.
मांसाहार बंद केल्यानं पाकृ पाहिल्या गेली आहे एवढंच म्हणू शकतो. :)
11 Feb 2013 - 1:23 am | चिंतामणी
कूस कूस मला वरईसारखेच लागले चवीला.
असे करुन बघितले पाहीजे.
11 Feb 2013 - 1:26 am | चिंतामणी
कूस कूस मला वरईसारखेच लागले चवीला.
11 Feb 2013 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तोंडाला जबर पाणी सुटलयं फोटोज बघुन...!!!
(खंग्रीली हंग्री) अनिरुद्ध...
12 Feb 2013 - 9:06 am | कच्ची कैरी
मस्त !नक्क्कीच करुन बघेल .
http://mejwani.in/