नमस्कार ई मासिक

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
2 Feb 2012 - 5:20 pm
गाभा: 

नमस्कार !!! ..बर्‍याच दिवसानी आवतरतोय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे .."नमस्कार" ई -मासिक..

नमस्कार मागची माझी भुमिका

तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या नेट च्या विश्वात मी वावरत आहे ...पडलो ,धडपडलो ,पुढे गेलो ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्‍याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये मराठीतील नेट विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ? अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असायची ...

पण मला स्वतःला असे वाटते की जी लोक आता नेटवर लिहित नाहीत अशा विविध क्षेत्रातील मान्यवराना नेटवर लिहायला लावले तर बराच फरक पडेल ( अगदी पुस्तकी भाषेत बोलायचे तर गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होऊ शकेल) आणि त्यातुन अवतरले ते "नमस्कार" ई मासिक ...

नेटवरील वाचकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दर्जेदार विचार नेटवरच वाचायला मिळावेत हा याच्या मागचा मुळ उद्देश आहे .आणि ,अर्थातच कोणताही व्यावसायिक फायदा मिळवण्याचा उद्देश नाही .

दर महिन्याच्या २६ तारखेला हा अंक प्रकाशित होइल .

अंकातील लेखक -

अतिथी संपादक- मा. ज्ञानेश्वर मुळे ( प्रख्यात लेखक ,भारतीय उच्च्यायुक्त ,मालदिव)

लेखक -

१. अवधुत परळकर (ज्येष्ठ विचारवंत ,पत्रकार) ,

२. लीना मेहेंदळे ( लेखिका ,माजी आय ए एस अधिकारी) ,

३.राजीव तांबे ( प्रख्यात लेखक)

४.धर्मकिर्ती यशवंत सुमंत (युवा नाट्य लेखक) ,

५. संजय आवटे (पत्रकार ,संपादक ,विचारवंत)

६. लक्ष्मीकांत देशमुख ("पाणी पाणी ",इन्किलाब विरुध्ह जिहाद" आदी कादंबर्‍याचे लेखक ,उत्तम प्रशासक )

७.,विद्यासागर अध्यापक( नाट्य,सिनेमा आणि रेडिओ अशा विविध माध्यमात हातखंडा, "आधी बस ,मग बोलु" या सध्या गाजणार्‍या नाटकाचे लेखक)

८. श्रीनिवास नार्वेकर ( नाटक ,सिनेमा क्षेत्रात गेले २५ वर्ष कार्यरत )

याशिवाय थिंकबॉक्स आणि कवितेच्य गावा या सदरांमधुन विविध विचारवंत आणि कवी आपल्याला भेटतीलच ...

वाचकाला एक सर्वांगीण मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे ..आपल्याला तो आवडेल अशी आशा वाटते ...

मिपा आणि मिपाकर यांची साथ कायम सोबत होती आणि आहे ..ती तशीच कायम राहील या खात्रीसह हा अंक तुमच्यापुढे रुजु करत आहे :)

हा अंक आपणास इथे वाचता येइल :)
http://www.misalpav.com/sites/default/files/pictures/namaskar-network-Jan-2012.pdf

अंकाबाबत ,लेखांबाबत असणार्‍या सर्व मत मतांतरांचे स्वागत आहे :)

आपलाच,

विनायक

नोट- १. या अंकाचे प्रकाशन नुकतेच सलील कुलकर्णी ( मराठी संगीतकार) यांच्या हस्ते झाले .

२. पहिल्या अंकाची धावपळ ,समारंभाची प्रीपोन झालेली तारीख यामुळे काही त्रुटी राहिलेल्या असण्याची शक्यता आहे .त्याबद्दल दिलगीर आहे .यापुढील अंक अधीक अधीक दर्जेदार करण्याचा प्रयत्न राहील ..

आपलाच,

विनायक

प्रतिक्रिया

वेताळ's picture

2 Feb 2012 - 5:24 pm | वेताळ

मस्त रे भावा....
तुझ्या नव्या उपक्रमाला मनापासुन शुभेच्छा.........तुझे अभिनंदन...

अंक वरवर चाळला. अत्यंत सुबक मांडणी झाली आहे आणि सुमंत यांचा लेख आवडला.. पुन्हा पुन्हा वाचण्‍यासारखा आहे.. एकूण जबरदस्त मंडळींनी लिहीलं आहे ते जबरदस्त असणारच..
पहिल्याच अंकातून पुढेही दर्जेदार मजकूर वाचायला मिळेल ‍अशी आशा वाटते.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 5:43 pm | वपाडाव

स्तुत्य उपक्रम चालवलाय.... मासिक चाळुन बघतो...

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 6:16 pm | सुहास झेले

मस्त... मासिक डाऊनलोड केलंय, आता वाचतोय !!

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा :) :)

५० फक्त's picture

2 Feb 2012 - 6:15 pm | ५० फक्त

अभिनंदन रे , मनापासुन शुभेच्छा या उपक्रमाला.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Feb 2012 - 6:17 pm | पुण्याचे वटवाघूळ

मासिक वाचतोच. उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 6:23 pm | वपाडाव

मासिकाचे कंटेंट चांगले आहेत... मांडणीही छान आहे... अन बर्याच मोठया मंडळींचा हातभार लागलेला दिसतोय मासिकाला... चालु देत...
फारच चांगला उपक्रम... पुन्हा एकदा शुभेच्छा...

एक सुचना :: टायपो मिस्टेक खुप दिसुन आल्यात. पुढच्या अंकात त्यांची संख्या कमी करता येते का ते बघा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2012 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे......! चांगला उपक्रम.
अंकही छान.....!

मनःपूर्वक शुभेच्छा.....!

-दिलीप बिरुटे

मानस्'s picture

2 Feb 2012 - 7:30 pm | मानस्

मासिकातील लेख दर्जेदार आहेत्.मांडणी उत्तम.
उपक्रमासाठी खूप सार्‍या शुभेच्छा !

अभिनंदन.
आपल्या या नवीन उपक्रमास शुभेच्छा.
आणि
(आपण संपादक आहात ना, मग अंकात अशा स्पेलिंग मिस्टेक होउ नका देउ बर का ;-))
२. लीना मेहेंदळे ( लेखिका ,माझी आय ए एस अधिकारी) ,

अभिनंदन आणि लक्ष शुभेच्छा !

पैसा's picture

2 Feb 2012 - 8:06 pm | पैसा

तुझा हा लेख यायच्या आधीच उजव्या बाजूची लिंक उघडून अंक वरवर पाहिला होता. सुरुवातीचे एक दोन लेख वाचलेही. चांगले वाटले. आणखी असेच दर्जेदार साहित्य येऊ दे!

मस्त कलंदर's picture

2 Feb 2012 - 8:16 pm | मस्त कलंदर

स्तुत्य उपक्रम.

अर्थातच लेखातल्या (उच्च्यायुक्त, माझी अधिकारी) यांसह मासिकातल्या चुकाही खटकताहेत. फ्लॅट या शब्दाच्या जागी कसलासा विचित्र शब्द, शुद्धलेखनाच्या चुका बर्‍याच आहेत. हे टाळलं तर उत्तम. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

विनायक पाचलग's picture

2 Feb 2012 - 8:42 pm | विनायक पाचलग

अशा उणिवा राहिल्या आहेत हे १०० % मान्य ... याची जबाबदारी मी घेतो . अर्थात त्याला काही कारणे होती हा भाग अलहिदा ...

एनीवे ,पुढच्या वेळीपासुन काळजी घेईन ....

विनायक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2012 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपुर्णतः मान्य

रफारापूर्वीचा इकार* व उकार दीर्घ लिहावा.

संपूर्ण, तीर्थ, मूर्ख, कीर्तन, कीर्ती, तूर्त.

*इकार = वेलांटी

-दिलीप बिरुटे
शुद्धलेखनाची (कधीतरी) आवड असलेला :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2012 - 1:04 am | प्रभाकर पेठकर

शुद्ध सुचनेचे स्वागत. आमच्याही ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2012 - 11:36 pm | निनाद मुक्काम प...

सर एका विनंती आहे.
शुद्ध लेखनाचे नियम किंवा तोंड ओळख ह्या विषयावर एखादा लेख किंवा लेखमाला आपण मिपावर सुरु करावी.
माझ्यासारखे असंख्य मिपाकर हे अशुध्द मुद्दाहून लिहित नाहीत आणी आपले लेखन तांत्रिक द्रष्ट्या परिपूर्ण असावे असे प्रत्येकालाच वाटते.
ह्या उपक्रमात ह्या विषयावरील तज्ञ मिपाकर मंडळी हातभार लावतील. ह्यात शंकाच नाही.

अंक उत्तम झाला आहे.
आपले शिक्षण पूर्ण करतांना मायमराठी ची सेवा करण्याच्या वृत्तीला सलाम.

रेवती's picture

2 Feb 2012 - 8:38 pm | रेवती

अंक चाळला. छानच झालाय.
अभिनंदन!

विकास's picture

2 Feb 2012 - 9:47 pm | विकास

एकदम स्तुत्य प्रकल्प!

अंक आत्ता नुसताच चाळला आहे... एकच प्रश्न: पृ. २: "अंक फक्त खाजगी वितरणासाठी आहे" या वाक्याची गरज आहे का आणि त्यातून काही साध्य होते का? कायदेशीर कारणासाठी ठेवले असल्यास गोष्ट वेगळी.

विनायक पाचलग's picture

3 Feb 2012 - 4:55 pm | विनायक पाचलग

कायदेशीर कारणासाठी ठेवले असल्यास गोष्ट वेगळी.

हम्म्म्म .........................

पाषाणभेद's picture

2 Feb 2012 - 10:53 pm | पाषाणभेद

अभिनंदन अन शुभेच्छा. विनू तू नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतो. अभ्यास कधी करतो? तिकडेही लक्ष दे बाबा.

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2012 - 1:06 am | प्रभाकर पेठकर

अभिनंदन आणि शुभेच्छा. अंक वाचतो आहे.

नि३सोलपुरकर's picture

3 Feb 2012 - 2:31 pm | नि३सोलपुरकर

अभिनंदन आणी खुप खुप शुभेच्छा ...

निवेदिता-ताई's picture

3 Feb 2012 - 3:07 pm | निवेदिता-ताई

तुमच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा

अंक चाळला. छानच झालाय.

कापूसकोन्ड्या's picture

3 Feb 2012 - 4:02 pm | कापूसकोन्ड्या

अंक देखणा आहे. कंटेन्ट उत्तमच आहेत, उतरवून घेता क्षणी शेवटपर्यंत एका दमात वाचून काढला.
खूप दिवसांनी एक मासिक वाचण्याचा आनंद मिळाला. ज्ञानेश्वर मुळे यांचा संपादकीय लेख खुपच आवडला.
विनायक पाचलग यांचे परिश्र म दिसून येतात.पंकज झरेकरांचे छायाचित्र आणि लीना मेहेंदळे यांच लेख आवडला. .
लक्ष्मीकांत देशमुख यांची लघुकथा तर सर्वावर कडी करणारी होती.
पुढील उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!

स्वातीविशु's picture

3 Feb 2012 - 4:53 pm | स्वातीविशु

अतिशय स्तुत्य उपक्रमास खुप शुभेछा. वाचत आहे.

धनंजय's picture

4 Feb 2012 - 1:49 am | धनंजय

अभिनंदन आणि शुभेच्छा.

दिपक's picture

4 Feb 2012 - 9:08 am | दिपक

मासिक उतरुन घेतले आहे. उपक्रमास शुभेच्छा! :-)

तुझ्या कचरावाला प्रकल्पाबद्दल कालच्या लोकमत मधे लेख आलाय. अभिनंदन आगे बढो.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2012 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे

कमलेश देवरुखकर चा न पाहिलेला महाराष्ट्र आवडले. एकूण अंक निर्मिती आवडली. उपक्रमास शुभेच्छा

अमोल केळकर's picture

4 Feb 2012 - 11:07 am | अमोल केळकर

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

अमोल केळकर

विसोबा खेचर's picture

4 Feb 2012 - 11:42 am | विसोबा खेचर

उत्तम उपक्रम..

मलाही या अंकाकरता काही लेखन करून पाठवता येईल का, याचा विचार करत असतानाच खालील ओळ वाचनात आली,

नोट- १. या अंकाचे प्रकाशन नुकतेच सलील कुलकर्णी ( मराठी संगीतकार) यांच्या हस्ते झाले .

आणि सारा उत्साहच मावळला. इतक्या थोर (?) संगीतकाराच्या (?) हस्ते वगैरे जर अशा अंकांचे प्रकाशन झाले असेल तर आमच्यासारख्या पामरांनी तिथे न लिहिता मिपावर किंवा आपल्या ब्लॉगवरच लिहिण्यात समाधान मानावे, हे बरें..!

उपक्रमाला पुनश्च एकवार शुभेच्छा..

तात्या.

विनायक पाचलग's picture

4 Feb 2012 - 5:57 pm | विनायक पाचलग

तुमचे लिखाण घेण्यास उत्सुक ...

आणि थोर संगीत कार वगैरे काही नाही ..आधी मा . नवीन चावला ( माजी मुख्य निवडणुक आयुक्त, भारत) यांच्या हस्ते उद्घाटन ठरले होते . पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांनी फक्त वेब साईटचे उद्घाटन केले ..सो,अंकाचे सलील कुलकर्णीनी केले एवढेच ..........
असो...

प्रतिक्षेत ,
विनायक

जागु's picture

4 Feb 2012 - 11:46 am | जागु

इ मासिकाला व त्यासाठी कार्यकरत असणार्‍या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा.

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2012 - 2:09 pm | सानिकास्वप्निल

अभिनंदन आणी उपक्रमास खुप शुभेछा!!

खेडूत's picture

6 Feb 2012 - 3:02 am | खेडूत

आता वाचून संपला.. छान झाला आहे.
बरेच विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय.

शुभेच्छा!

मानस्'s picture

27 Feb 2012 - 5:54 pm | मानस्

दर महिन्याच्या २६ तारखेला हा अंक प्रकाशित होइल .
फेब्रुवारीचा अंक कुठाय? वाट पाहातोय.

विनायक पाचलग's picture

8 Mar 2012 - 5:14 pm | विनायक पाचलग

नमस्कारचा दुसरा अंक प्रकाशित झालेला आहे . तो
http://www.namaskarnetwork.com/
इथे उपलब्ध आहे ..काही तांत्रिक कारणांमुळे तो मिपावर उपलब्ध झालेला नाही ...लवकरच तो उपलब्ध होइल ..
तसदीबद्दल क्षमस्व
विनायक

सुनिल पाटकर's picture

9 Mar 2012 - 4:44 pm | सुनिल पाटकर

अभिनंदन...

प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com

भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मी स्वतः माझ्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर प्रोजेक्ट घेत असतो.कुंभ मेळा आज जगातील प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल आश्चर्य जनक भारतीय सांस्कृतीच पारंपारिक संम्मेलन आहे , आणि म्हणूनच भारताचा अक्षय गौरव आहे.खरतर अध्यात्मिकांक (Spiritual Quotient )जर स्वीकारला व विकसित केला तर व्यक्तिमत्व विकास व व्यवस्थापन उत्कृष्टपणे साधला जाऊ शकतो या ठाम मताचा मी आहे व त्यानुसार मी त्यावर एक पुस्तक पण लिहिले आहे जे अमेरिकेत प्रकाशित झले आहे MANAGEMENT BY SPIRITUAL QUOTIENT :THE POWER OF FAITH .PUBLISH AMERICA PUBLICATION )

हे अस जागतिक दृष्ट्या आश्चर्य असलेल मेळा , संमेलन भरण्याचे स्थळ ना कुण्या दिग्विजयी राजाची वा शासकीय राजधानी असते ना एखादे वाणिज्य प्रधान ऐश्वर्य नगर असते ते असते भारतातील प्रमुख,पवित्र तीर्थ क्षेत्र होत.तसेच हे संमेलन भरण्याचा समय राजकीय वा सामाजिक आधारावर निर्धारित नसतो तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार खगोलीय ग्रह,राशी, नक्षत्र,यांच्या विशिष्ट संयोगाधरीत असते.याचा उद्देश भौक्तीक,अध्यात्मिक प्रगती ,व शाश्वत जगत कल्याण साध्य करणे हे आहे. भारतवासी किती धार्मिक व भावूक आहेत याच सर्वोत्तम प्रमाण कुंभ मेळा आहे.जगात कुठेही अशा प्रकारचा व इतका भव्य दिव्य मेळा नाही. याच्या भव्यतेची कल्पनाही इतर राष्ट्र करू शकत नाही.एवढेच नव्हे तर हा मेळावा भरवण्यात ना कुणी उद्योजक,ना आव्हाहन कर्ता, ना संवाद दाता ,ना सभापती ना सभा,ना संचालक वा संचालन,कुठल्याही आमंत्रणवा निमंत्रणाशिवाय आज करोडो भाविक,भारतीय , अनिवासी भारतीय,व परदेशी कुंभ मेळ्याला अत्यंत श्रद्धापूर्वक हजर राहतात व धर्मामृताचा आस्वाद घेतात.या मुळे महाकुंभाला आता " जगत कुंभाचे" (GLOBAL VILLAGE चे) स्वरूप प्राप्त झाले आहे .:"जेथे कैक जण विविध भाषा, संस्कृती,धर्म ,विविध विचारधारा असलेले भाविक एकत्र येतात, कैक जण तर कल्पवास (मेळाव्याच्या ठिकाणी कमीत कमी चाळीस दिवस निवास,साधना, जप तप ,अनुष्ठान करणे).या शतकात तर अनेक परदेशी साधक अत्यंत भाऊक पणे व श्रद्धापूर्वक वर्दी लावतात याचा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहे.या सर्वामुळे एकजूटतेचा अभाव असलेली"dying race ""म्हणून भारतास हिंणवनाऱ्याना तोंडात बॉट घालण्यास भाग पाडतात.

कुंभ मेळ्याचा उल्लेख गरुड पुराण( I -२४०,)रामायण (III ३४-३७),महाभारत( I -२५)ई. मध्ये आढळतो . पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वास ऋषींनी इंद्राला अमरावतीत (स्वर्गाच्या राजधानीत)भेट देऊन त्याला वैजयंतीमाळ दिली पण त्यास महत्व न देत ती माळ इंद्राने ऐरावत या आपल्या हत्तीच्या गळ्यात घातली ती त्या ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली .हे समजल्यावर दुर्वास कोपित झाले व त्यांच्या शापामुळे इंद्राला लक्ष्मीची अवकृपा होऊन दारिद्र्य आले तेंवा इंद्राने महलक्षमी अष्टक रचून लक्ष्मीची कृपा प्राप्त केली व त्यामुळे पुनर्वैभव प्राप्तीसाठी हिमालयाच्या उत्तर क्षीरसागरात सागर मंथनाची तयारी झाली . त्यानुसार स्वयं विष्णूने कूर्मरूप धारण करून मंदार पर्वताला पाठीवर घेऊन, वासुकीरूपी दंडाने मंथन /चर्वण करून पुष्पक, पारिजात, कौस्तुभ, विष, व अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. त्या अमृतावर हक्क दाखवण्यासाठी सूर असुरांत द्वंद निर्माण झाले ते बारा दिवस ,देवांचे बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष,चालले. त्यादरम्यान इंद्रपुत्र जयंत तो अमृत कुंभ घेऊन पळाला त्या दरम्यान त्यातील अमृत काही प्रमाणात चार दिवसात चार ठिकाणी पृथ्वीवर सांडले त्या चार ठिकाणी तेंव्हापासून कुम्भ पर्व साजरे केले जाते. ती चार ठिकाणे म्हणजे १- हरिद्वार, २- प्रयागराज , ३-उज्जैन, व ४-नासिक.देवांचे बारा दिवस म्हणजे मानव्सामाजाचे बारा वर्ष , म्हणून दर बारा वर्षांनी त्या त्या ठिकाणी कुंभ भरतो सूर्य, चंद्र, व गुरु अमृतकुंभाचे रक्षण करण्याचे कार्य करीत होते म्हणून हे ग्रह जेंव्हा विशिष्ट राशींमध्ये संयोग करतात तेंव्हा ,बारा वर्षांनी, कुंभ मेळा भरतो.
असा संयोग यावर्षी तीर्थराज प्रयाग येथे होत आहे व येथील त्रिवेणी संगमात हा मेळा जानेवारी १४ ते मार्च १० २०१३ या ५५ दिवस भरत आहे. कुंभ पर्व पौराणिक काळापासून जरी साजरे केले जात असले तरी १० व्या शतकात आदि शंकराचार्य यांनी याचे संघटन केले व मेळ्यास संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले .त्यांनी साधूंचे संघटन केले व कुंभ मेळ्यास प्रतिष्ठा व संघटनात्मक रूप दिले व पुढे हे संमेलन परिपुष्ट होत जाऊन त्याला आजचे महत्व व कीर्ती प्राप्त होउन त्याने विश्वस्वरूप प्राप्त केले आहे .म्हणून या कुंभ पर्वत हजोरो साधू संत यांना दीक्षा दिली जाते, भ्रमाचारी साधू यांना नागा दीक्षा दिली जाते

प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच. त्यातूनही याखागोलीय संयोगात मकर सूर्य संक्रमण, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, व महाशिवरात्र या दिवसांत खगोलीय वातावरण अधिकच भरलेले असते असते त्यावेळी पूर्वापार राजे ,महाराजे स्नान करीत असत त्याला शाही स्नान म्हणतात आजच्या युगात राजेशाही जरी लुप्त झाली असली तर्री यादिवासातील स्नानास आजही शाही सणांच म्हणतात.आज या स्नानाचा मानं साधू संत ,सिद्ध महात्मे घेतात .मुहूर्ताच्या वेळी सर्वसाधूंचे त्यांच्या आखाड्यानुसार मिरवणूक काढून वाजत गाजत स्नान होते (आदि शंकराचार्य यांनी सर्व साधू संत
यांचे विविध आखाड्यान मध्ये विभाजन केले,असे आज जवळ जवळ १४ आखाडे आहेत)तसेच संत, महात्मे , यति, किन्नर,सिद्ध, महात्मे या पर्वत एकत्र येतात .जग पर्सिद्ध सिद्ध महावतार बाबाजी( जे परमहंस योगानंद यांच्या "Autobiography of yogi :(मराठीत योगी कथामृत) या जग प्रसिद्ध पुस्तक्द्वारे जगापुढे आले ,ज्यांनी पंतजल योगाचे,आजचे प्रचलित स्वरुप याचे,पुनर रोपण केले,(REF:"महावतार बाबाजी":डॉक संजय होनकळसे:गुरुतत्व प्रकाशन,कोल्हापूर.)यांनी युक्तेश्वर(परमहंस योगानंद यांचे गुरु ) यांना याच कुंभ मेळ्याच्या १८९१ च्या पर्वात दर्शन व उपदेश केला . "तीर्थे कुर्वन्ति साधक: " . आज कित्येक लोकांना येथे गलिच्छ पण जाणवते तसाच काहीसे मत युक्त्श्वारांचे होते त्या बद्दलचे संभाषण व बाबाजींचा उपदेश वाचण्यासारखा आहे जिज्ञासूंनी तो वरील पुस्तकात जरूर वाचवा .प्रस्तुत लेखकांस हरिद्वार,प्रयाग, नासिक व उज्जैन येथ असे शाही स्नान घेण्याचे भाग्य लाभले आहे
आज या पर्वामुळे व भारतातील संत महात्मे, सिध्द गुरु,अवतार या मुले भारत आज देवभूमी, पुण्यभूमी epitome of world म्हणून आधात्मिक जगतात मान मिळवून आहे. quantum physics मुळे आज अध्यात्म व शास्त्र यातील दरी कमी होऊ पाहत आहे , देव कण (god particles ) यांचे अस्तित्व आज जग मान्य करीत आहे.अश्या पर्वत, अग्निहोत्र पद्धतीने केलेल्या सोमयाग,वाजपेय यज्ञात असे देवकण निर्माण होत असतात. भारतातील महाराष्ट्रातील संत जयंत आठवले यांच्या शरीरातून देवकण प्रसूत झाले आहेत जग व शास्त्रज्ञ आज ते स्वीकारीत आहेत पहा http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch... या विषयावर डॉक. दुर्गेश सामंत व श्रीमती अंजली गाडगीळ यांनी पुणे येथील MIT येथ भरलेल्या ‘Indian Aerobiological Society’ १७ व्या अधिवेशनात संशोधन पत्रिका सादर केली आहे विशाज्ञानाद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनवीत आहे.विषयांतराचे धारिष्ट्य करण्याचे कारण हेच कि देवत्वाची संकल्पना आता SCIENCE हि मान्य करीत आहे. science हि देवत्वाचं अस्तिव आजही स्वीकारू शकत नसले तरी नाकारू शकत नाहित हे बुद्धिवादी पण बुद्धिमान व्यक्तींनी लक्षात घाव्ये.याचाही पाया भारतातील बोस यांनी गेली शतकाच्या सुरुवातीला घातला हेही महत्वाचे.
( Bose theory of God Particles )
या सर्वामुळे भारत आज मानव जातीच्या विविध समस्यांचे समाधान स्थान बनत आहे.व नित्य आत्मा व अनित्य शरीर या देव दानव रुपी संग्रामातून, आत्म मंथनातून विवेक जागृत करणार अस हे कुंभ पर्व आत्म ज्ञान उद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनत आहे
dr sanjay honkalse
९९८७७९४४८४

--
dr.sanjay honkalse.

दादा कोंडके's picture

4 Feb 2013 - 7:42 pm | दादा कोंडके

विनोदी प्रतिक्रिया.

देवकण ऊर्फ ढेकूण तर सीओईपी हाष्टेलात इतके तयार व्हायचे, कुणाला पत्त्याच नसायचा त्याचा. जागरण आणि गेमसत्र तसेच स्नानपराङ्मुखता या गुणांनी पावन झालेल्या शरीरात आणि सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांप्रमाणेच शयनस्थान, भित्तिकादि पवित्र ठिकाणच्या गुहांमध्ये हे देवकण ऊर्फ ढेकूण लपलेले असायचे. एकदा का गेमसत्र संपले आणि अभियंते महात्मे निद्राधीन झाले, की या देवकणांचे अस्तित्व प्रत्ययाला यायचे. त्यांच्या स्पर्शाने शरीरात जी आग पेटायची तिचे वर्णन तरी काय करू महाराजा!!

या विषयांतराचे प्रयोजन इतकेच की लोकांना कळावे, कितीही मूड असला तरी देवकणांच्या कृपेमुळे जी तल्लीनता येते ती अजून कशानेही येणे शक्य नाही. हे कपार्‍यांमध्ये राहणारे सूक्ष्म महात्मे नक्कीच निद्रोद्धारकाचे काम करतात, त्याची जाणीव लोकांमध्ये येणे गरजेचे आहे.

-इंजिणेर कळकटसे.

आजानुकर्ण's picture

4 Feb 2013 - 10:31 pm | आजानुकर्ण

हा हा.

अभियंते महात्मे निद्राधीन झाले, की या देवकणांचे अस्तित्व प्रत्ययाला यायचे.

हे थोडेसे दिशाभूलकारक आहे. सीओईपी हाष्टेलातील ढेकणे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी अभियंत्यांच्या झोपण्याची वाट पाहत नसून अभियंतेच आपल्या निद्रादेवीची आराधना थोडीशी पूर्ण व्हावी यासाठी ढेकणांच्या झोपण्याची वाट पाहत असत हे लख्ख आठवते. बेगॉन, टी-२०, जुन्या गाद्या जाळून त्यावर कॉटा लालबुंद तापवून घेणे, नवीन गादी आणणे हे सर्व उपाय करुन थकल्यावर ढेकणांसमोरच अक्षरशः पाठ टेकण्याची वेळ येते. थोडाफार 'चालणारा' उपाय म्हणजे गादी-उशी-सतरंजी वगैरे जामानिमा कॉटवर करुन झोपायची तयारी करणे आणि सरळ वर्तमानपत्र पसरुन खोलीच्या मध्यभागी फरशीवर झोपणे. या उपायाने काही मूर्ख ढेकूण फसतात आणि गादीवरच आपले भक्ष्य शोधत फिरतात. अर्थात खोलीतील सर्वच भिडू खाली झोपले तर सगळीकडचे ढेकूण खालीही येतातच. गादीशिवाय झोप न येणारा एखादा रुममेट असला तर बरे.

अभियंतेच आपल्या निद्रादेवीची आराधना थोडीशी पूर्ण व्हावी यासाठी ढेकणांच्या झोपण्याची वाट पाहत असत हे लख्ख आठवते.

सहमत. फक्त, प्रकर्षाने अस्तित्व हे अंधःकारातच जाणवायचे आणि तो अंधःकार झोपताना व्हायचा म्हणून म्हणालो, इतकेच. बाकी तो काड्यापेट्यांप्रमाणे बांधलेला आय-ब्लॉक हे त्या देवकणांचे मूलस्थान होते.

बेगॉन, टी-२०, जुन्या गाद्या जाळून त्यावर कॉटा लालबुंद तापवून घेणे, नवीन गादी आणणे हे सर्व उपाय करुन थकल्यावर ढेकणांसमोरच अक्षरशः पाठ टेकण्याची वेळ येते.

अगदी अगदी. हाष्टेल प्रशासनाकडून कधीतरी एक मत्कुणनाशक फवारणारा यायचा. प्रचंड वासमारू असे कुठलेतर औषध मारून वर सांगायचा की दिवसभर खोली बंद राहिली पाहिजे एकदम, तरच इफेक्ट येईल म्हणून. सुरुवातीला पाहिलं , मग नंतर कळालं की मत्कुण यालाही सरावलेत. मग ते बेगॉन वगैरे उपाय केले. सर्वांत भारी म्हंजे कर्कटकने कॉटांचे सर्व कोपरे, भोके, इ. खरवडून काढून मग तिजवर पेपर ठेवून ते जाळणे. किंवा गरम पाणी मारणे. जाळत असतानाही पेपरांची गुंडाळी करून अधेमधे मेण टाकल्यास ज्वलन मस्त होते असे एक निरीक्षण आहे-गरजूंनी उपाय करोन बघावा.

यांत भयंकर प्रकार म्हंजे खरवडा-खरवडी करत असताना ती समस मत्कुणप्रजा प्रकल्पग्रस्तांसारखी सैरावैरा धावत सुटत असे, त्यामुळेही लै तरास तेच्यायला. सेकंड ईयरला एका उत्तररात्री ढेकणांचा त्रास इतका झाला, की वर उल्लेखिलेले सर्व उपाय केले. त्यानंतर मात्र ढेकणांनी सपशेल शरणागती पत्करली-तुरळक उठाव सोडले तर. नंतरची दोन वर्षे तरी डी ब्लॉकमध्ये काढल्यामुळे तर हा त्रास ना के बराबर होता. तेव्हा तर

"बहिर्गृहेषु हाष्टेलं, तत्र डीनाम ब्लॉक सः| तत्रापि फ्लोअरो फर्ष्टस्तत्र रूमचतुष्टयः||"

अशी स्थिती असल्यामुळे तरास कस्ला तो झालाच नै.

असो. उरल्या त्या आठवणी!!

आजानुकर्ण's picture

5 Feb 2013 - 11:15 pm | आजानुकर्ण

सी आणि डी ब्लॉकमध्ये सीलिंग फॅन लावता येत नसल्याने उन्हाळ्यात त्रास व्हायचा. (आता काय स्थिती आहे याची कल्पना नाही). एफ आणि जी ब्लॉक बरे वाटले होते. सगळ्यात चांगला फर्स्ट इयरला दिलेला एच ब्लॉक होता. नवी इमारत, तिसऱ्या मजल्यावरच्या तुफान हवेशीर खोल्या आणि दरवाजे बंद होऊ शकणारे संडास-बाथरुम असल्याने अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. मात्र नंतर तो मुलींना दिला गेला. असो ढेकणांच्या निमित्ताने हॉष्टेलची आठवण आली. ढेकणांमुळे मेसमधली मसूरची आमटीही आठवली.

आता सीलिंग फ्यान आहेत. बाकी आमच्या वेळेस हेच्च ब्लॉक पोरींना दिलेला व्हता, अन आमी ए ब्लॉकमध्ये फर्ष्ट ईयर काढले. अन मेसबद्दल तर बोलावे तितके कमीच आहे. आता तर आत मोठ्ठा पडदा बसवलाय, आयपीएलच्या वेळेस शेकडो पोरे गिल्ला करतात आत बसून. हा बघा व्हिडिओ.

http://www.youtube.com/watch?v=_yxM6N47e8o

विकास's picture

4 Feb 2013 - 8:49 pm | विकास

इस प्रतिसाद का इस धागे से क्या ताल्लूक ?

असो. तुम्हाला लिहायचे असेल तर वेगळा लेख-चर्चा टाकावीत ही विनंती...

बाकी, कुंभमेळ्याच्या ऐतिहासीक अथवा पौराणिक संदर्भाबाबत मला खर्‍या अर्थाने काहीच म्हणायचे नाही, पण आज-काल यात नक्की काय घडते? तुम्ही स्वतः कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारता का? स्वतःचे अनुभव सांगितल्यास उत्तम (अर्थात वेगळ्या चर्चा/लेखात). तसेच या वेळेस असे देखील ऐकले की अनेक (स्वयं घोषित अथवा भक्तगण घोषित) संत महंत हे कुंभमेळ्यास महागड्या गाड्यातून आले होते...ते खरे आहे का? हे सगळे वेगळ्या चर्चेद्वारे अथवा लेखाद्वारे टाकावेत ही विनंती...

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2013 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

हा लेख बहूदा 'नमस्कार ई मासिकात' छापून आला असावा.

परा बाँड

विकास's picture

5 Feb 2013 - 7:05 pm | विकास

अच्छा! मेक सेन्स :-) धन्यवाद. अर्थात त्यांनी तो लेख आता चर्चा/लेख म्हणून पण वेगळा टाकला आहेच.