आईसक्रीम....लहानांनपासून म्हातार्या-कोतार्यापर्यतचा एक आवडता प्रकार. आईसक्रीम न आवडणारा बहूधा विराळाच. आता तर काय सगळ्याच गोष्टी सहज मिळतात पण लहानपणी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच अप्रुप असायच...त्यातलच एक आईसक्रीम. समुद्रावर मनसोक्त खेळल्यावर भेळ, शेवपुरी किंवा कधी कधी भाजलेलं मक्याचं कणीस हे तर असायचंच पण सांगता शेवटी आईसक्रीमनेच व्हायची. हि उत्सुकता / ओढ शेवटी घरी फ्रिज आल्यावर संपली. मला आठवतय आईने जेव्हा पहिल्यांदा घरी आईसक्रीम केलं तेव्हा दर पाच मिनटानी मी आणि बहीण फ्रिज उघडुन पहायचो....कितपत घट्ट झालय ते आणि खाताना तोंड जरी चालु असलं तरी कान टवकारलेले असायचे कि आई डबा कोणाला संपवायला सांगते. बाहेर खेळताना येता जाता एक एक चमचा खाण्याचा आनंद तर केवळ अवर्णनीय.....त्यावरुन आईचा मारहि खाल्लाय. असो लिहिता लिहिता फार भावनिक व्हायला झालं....काय करणार आईसक्रीम बद्द्लच्या आठवणी आहेतच ईतक्या गोड! चला तर मग परत एकदा घरी केलेल्या आईसक्रीमची चव चाखुया.
साहित्यः
१. किवी - ३
२. अवकादो - २ मध्यम
३. साखर - किवीच्या आंबटपणानुसार कमी/जास्त
४. नारळाचं घट्ट दूध - १ कप
५. काळ्या मनुका - मुठभर (एक ३-४ तास पाण्यात भिजवुन ठेवणे; थोडया सजावटिकरता बाजुला ठेवा)
६. दूध - १ कप
७. ताजं क्रीम - १/२ कप
कृती:
१. किवी / अवकादो सोलुन त्यावे मध्यम तुकडे करा
२. आता मिक्सर मधे तुकडे केलेले किवी/अवकादो/साखर आणि दुध एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईस्त ब्लेंड करा
३. अवकादो मुळे मिश्रण घट्ट होईल तेव्हा लागेल तसं दुध घालुन बेताचं घट्ट होईल अस पहा
४. आता एका बाउल मधे नारळाच घट्ट दूध आणि फ्रेश क्रिम एकत्र करा. मिश्रणात गुठळि न होण्यासाठि एक/दोनदा गाळण्यातुन गाळुन घ्या
५. आता त्याच बाउल मधे किवी/अवकादोचं मिश्रण घाला व भिजवलेल्या काळ्या मनुका घालुन हळुवार एकत्र करा
६. ज्या भांड्यात आईसक्रिम सेट करायचय त्या भांड्यात ओतुन डिप फ्रिजर मधे ठेवा
७. एक ५-६ तासात आईसक्रिम सेट झालं कि वरुन काळ्या मनुका/पुदिना पान लावुन सर्व करा.....:)
८. अवकादो आणि क्रिम मुळे आईसक्रिम मस्त स्मु.......थ होतं
९. आवडत असल्यास ह्यात काजु, बदाम / पिस्ते घालु शकता
प्रतिक्रिया
3 Feb 2013 - 2:07 pm | शुचि
फोटो पाहून वाईट्ट रीतीने निवर्तले.
3 Feb 2013 - 2:30 pm | यशोधरा
अग्गाग्गा!
3 Feb 2013 - 3:04 pm | पैसा
आणखी काय काय करणार आहेस?
3 Feb 2013 - 3:09 pm | अनन्न्या
फळे का? त्याचा पण फोटो द्या. पाहीली नाहीत कधी!!
3 Feb 2013 - 5:20 pm | जयवी
जबरा ...............ट !!
फोटू सॉलीड टाकतोस यार...... जियो :)
3 Feb 2013 - 5:21 pm | बॅटमॅन
अर्र्रे बापरे!!!!
काय हो हे???????
बल्लवेश्वर आहात खरे, साष्टांग नमस्कृती तुमच्यापुढे. _/\_
(पाककलानिरक्षर, काला ठिपका तीळ बराबर) बॅटमॅन.
3 Feb 2013 - 7:25 pm | सानिकास्वप्निल
किवीचे आईसक्रिम खाल्ले आहे पण त्यात अव्होकॅडो घालून कसे लागेल माहीत नाही... फोटोत तर छानच दिसत आहे चवीला कसे लागेल ट्राय करुन बघायची उस्तुकता वाढलिये :)
पाकृ +१
3 Feb 2013 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदम जब्राट. पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.
आता एक चमचा मिळेल का वाट्या रिकाम्या करायला. :)
-दिलीप बिरुटे
3 Feb 2013 - 7:45 pm | सस्नेह
'रिकामे' 'चमचे' भरपूर आहेत इकडे. शोधा म्हणजे सापडेल.
बाकी आईस्क्रीमचा फोटू भारी...
3 Feb 2013 - 8:04 pm | अग्निकोल्हा
पुण्यनगरीत कल्याणी नगरला हे आइसक्रिम इटालिअन म्हणुन विकत मिळते... खतरा चव.
4 Feb 2013 - 4:05 pm | सुखी
कन्च्या हाटेलात वो?
5 Feb 2013 - 8:09 am | गणामास्तर
कल्याणी नगरला एग्ग्झॅक्टली कुठे मिळते ओ?
5 Feb 2013 - 8:35 am | अग्निकोल्हा
तिथं इटालिअन आइस्क्रिमच्या स्टॉलवर हा फ्लेवर मिळतो. एगलेस आइस्क्रिम प्रकारात बहुदा फक्त हा आणी अजुन एक न आठवणारा फ्लेवर असे दोनच प्रकार उपलब्ध्द आहेत.
अवांतरः- कँपात "ज्युसवर्ल्ड" मधे किवीच एकदम खतरा खतरा चविच ज्युसही मिळतं ते सुध्दा चुकवु नये!
3 Feb 2013 - 8:14 pm | रेवती
छान. अव्होकॅडोचं आईस्क्रीम कसं लागेल काही अंदाज येत नाहीये. अव्होकॅडो गरदार फळ असल्याने आईस्क्रीम स्मूथ होणार.
3 Feb 2013 - 8:17 pm | वेताळ
असले फोटो उन्हाळ्यात पाहणे खुप वाईट असते.
3 Feb 2013 - 8:37 pm | निवेदिता-ताई
मस्त्, मस्त् ,मस्त.................
3 Feb 2013 - 9:14 pm | स्वाती२
लै भारी!
3 Feb 2013 - 11:27 pm | जेनी...
किवीत मध्यभागी ढीगाने असणार्या काळ्या चिमुकल्या बिया असतात त्याहि क्रश
करायच्या का ?? खुप आंबट लागतात ... पण मी खाते तश्याच .. कोण काढत बसणार :-/
किवी खुप आवडतं खायला ... त्वचेसाठी चांगलं असतं असं म्हणतात ...
हा प्रकार नक्कि करुन बघेन फक्त बियांंच काय ते कळवा ...
फोटो एकदम दिल्फेक आलाय आईस्क्रीम्चा :)
3 Feb 2013 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा
4 Feb 2013 - 11:10 am | सुहास झेले
अगदी अशीच अवस्था... :) :)
5 Feb 2013 - 12:21 pm | ऋषिकेश
+२
अगदी अस्सेच
4 Feb 2013 - 10:00 am | इरसाल
दो बाउल्से मेरा क्या होंगा ?
4 Feb 2013 - 11:21 am | ५० फक्त
लई भारी, पण करुन खाण्याएवढा उत्साह नाही, इकडं येताना हे सगळं घेउन या, आमच्याकडे यापेक्षा मोठे बाउल आहेत, त्यात भरुन खाउ आपण.
बाकी ते अवाकाडो वाचुन, अवाकडा चक्राची आठवण झाली.आमच्या काळी लग्न जुळवताना का काय वापरायचे असं आठवतंय, दाते पंचांगात एक आडव्या एक्सेल शिट सारखी डायग्रॅम असायची.
5 Feb 2013 - 12:02 am | अभ्या..
बरोबर ५० राव ते दातेंचं अवकडा चक्र च आठवलं एकदम. :)
बाकी आपण काय चाखलं नाही बाबा हे किवी न अवाकादो. :(
कुठं रेडीमेड मिळत असल तर बघू. फोटोत मात्र जबरा दिसतय.
4 Feb 2013 - 11:23 am | सविता००१
खलास झाले.
4 Feb 2013 - 12:43 pm | दिपक.कुवेत
पुजा...काळ्या चिमुकल्या बियांसकट क्रश कर....तुझ्यासारखाच मीही विचार केला....कोण काढत बसणार???
4 Feb 2013 - 6:01 pm | जेनी...
ओह्ह ओके ...
थॅन्क्स दीपक काका .. नक्किच करुन बघेन ...
4 Feb 2013 - 12:53 pm | स्वाती दिनेश
आइसक्रिम आवडले,
सध्या आमच्या येथे असलेल्या हवामानामुळे नुसतेच पहावे लागेल अजून काही आठवडे..
स्वाती
4 Feb 2013 - 4:22 pm | Mrunalini
अवाकाडो एवढे आवडत नाही.. पण किवीचे आईसक्रिम खाउन बघायला पाहिजे.
4 Feb 2013 - 5:57 pm | सूड
आईसक्रीम छान !! पण बदलापूरात चितळ्यांकडे आधी शहाळ्याचं आईस्क्रीम आणि नंतर रॉयल फालुदा खाऊन घसा बसलाय आता. त्यामुळे छान दिसत असलं तरी खायला मन धजावत नाहीये. ;)
4 Feb 2013 - 7:29 pm | दिपक.कुवेत
नक्कि करुन बघ :))
4 Feb 2013 - 7:31 pm | बॅटमॅन
+१.
आज्जी/काकूबै हे पर्फेक्ट संबोधन होईल =))
4 Feb 2013 - 7:34 pm | जेनी...
:-/
4 Feb 2013 - 9:44 pm | प्यारे१
ह्यो दीपक कोन हाय?
तेला आत्ताच्या आता किड्पॅन क्रुन हितं आना.... कस्लं कस्लं फटु टाकायलंय.
कृती वाचू शकलेलो नाही. तातडीनं आईसक्रीम खाण्याची वाईट्ट इच्छा झालेली आहे. अतिब्येक्कार. :(
4 Feb 2013 - 9:51 pm | श्रिया
जबरदस्त आणि मनमोहक!
4 Feb 2013 - 10:53 pm | दीपा माने
काल पडलेला बर्फ आणि चालु असलेली गात्र बधीर करणारी थंडी पाहता हे आयस्क्रिम लौकरच खाण्याचे दिवस येतील. कारण ओल्ड मॅन ऑफ विंटरच्या कथांच्या सोबतीने सुरु झालेली ही प्रथा की आमच्या शहरात स्टेटन आयलंडच्या चक ह्या ग्राउंड हॉगने स्वतःची सावली बिळाबाहेर येऊनही पाहीली नाही त्यामुळे स्प्रिंग मोसम लौकरच म्हणजे सहा आठवडयानी येणार ही आनंदवार्ता नुकतीच दिली आहे. दिपक तुमच्या पाकृतीची नोंद करुन ठेवली आहे.
5 Feb 2013 - 12:22 am | क्रान्ति
काय भारी फोटो! आइस्क्रीम झक्कास असणारच!
5 Feb 2013 - 7:42 am | इन्दुसुता
मी आईसक्रीम न आवडणारी.. अज्जिब्बात आवडत नाही.. पण कीवी + अॅव्होकाडो ही ट्रॉपिकल चव .. आवडेल बहुतेक्..एकदा करून पाहीन नक्कीच ( फोटो फार आवडला ) आणि आईसक्रीम आवडलं नाहीच तर मिल्क शेक आहेच.. :)
5 Feb 2013 - 11:28 am | दिपक.कुवेत
इन्दुसुता: मिल्क शेक पेक्षा वरील साहित्यतुन नारळचं दूध, साध दूध, क्रिम, वगळ आणि बर्फाचे तुकडे, दहि घालुन कीवी + अॅव्होकाडो स्मुदि बनवं...खात्रि आहे घरातल्या सगळ्यांना आवडेल.....काळ्या मनुका घातल्यास तर त्यात बीया नसतील असं बघ म्हणजे पिताना कचकच लागणार नाहि....कर आणि नक्कि कळवं :)
6 Feb 2013 - 5:37 pm | कच्ची कैरी
अरे वा किवी आणि आव्हाकाडो !!! मस्तच ,फोटो तर एकदम झक्कास !!
http://mejwani.in/
7 Feb 2013 - 1:39 pm | गौरीबाई गोवेकर
असल्या पा. कॄ. टाकू नका हो. खायच्या नाहीयेत आम्हाला. आणि पाहून त्रास होतो.