सिंधी कोकी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
30 Jan 2013 - 5:35 am

नमस्कार मिपाकर्स :)

आपल्या मिपावर मी बर्‍याच पाककृती दिल्या, दरवेळेस तुम्ही माझ्या पाककृतींचे, त्यांच्या फोटोंचे कौतुक केले, उत्स्फुर्त प्रतिसाद दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद :)

मिपामुळे बर्‍याच मित्र-मैत्रीणींशी ओळख झाली,त्यांनी ही पदार्थ आणखीन चांगला कसा होईल असे वेळो-वेळी मार्गदर्शन केले.

मिपा खूप जवळचा असा मित्रपरीवार आहे आणी म्हणूनच ह्या नव्या वर्षात तुम्हा सर्वांसाठी जेव्हा-जेव्हा जमेल तेव्हा-तेव्हा पाकृची चित्रफीत देण्याचा माझा विचार आहे आणी आज त्याचा शुभारंभ मी करत आहे. तुम्ही मला सांभाळून घ्याल व माझ्या पाककृती गोड मानून घ्याल अशी आशा करते. (काही सुधारणा असतील नक्की कळवा बरं का )

चला तर मग पाकृकडे वळूया :)

साहित्यः

२-१/२ वाट्या कणीक
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
पाव वाटी बारीक चिरलेली कोथींबीर
पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात (ऐच्छिक)
१ टीस्पून जीरे
२ टेस्पून तेल
मीठ चवीनुसार
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून अनारदाना पावडर (नाही मिळाल्यास आमचूर पावडर वापरु शकता)

पाकृ:

एका भांड्यात कणीक घेऊन त्यात मीठ, अनारदाना पावडर, लाल तिखट, जीरे, हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथींबीर, चिरलेली कांद्याची पात व तेल घालून सगळे एकत्र करा.
लागेल तसे पाणी घालून कणीक भिजवून घ्या व ५-१० मिनिटे तिंबवून ठेवा.
कणकेचे सारखे ७-८ गोळे करुन घ्या.
सुक्या पिठात कणकेचा गोळा घोळवून हलक्या हाताने कोकी जाडसर लाटा.
नॉन-स्टीक तवा तापवून कोकी एक मिनिटासाठी दोन्ही बाजूने हलकी भाजून घ्या.
कोकी तव्यावरून उतरवून त्याचा पुन्हा गोळा करा. (हात सांभाळून)
गोळ्याला पुन्हा हलक्या हाताने लाटा व मंद आचेवर तव्यावर टाकून भाजा.
वरुन थोडे तेल लावून एक बाजू चांगली खरपुस भाजा.
उलटवून दुसरी बाजू ही तेल लावून भाजून घ्या.
गरमा-गरम कोकी तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस व पापडासोबत सर्व्ह करा.

.

नोटः

कोकी तुम्ही पराठ्याप्रमाणे लाटून तव्यावर शेकून घेऊ शकता पण वरील पद्धतीने बनविल्यास कोकी खुसखुशीत होते.
जर पराठ्याप्रमाणे बनवणार असाल तर तव्यावर कोकी घालताच काट्याने टोचे मारा, कोकी फुगु द्यायची नाही.
तेला ऐवजी तुम्ही तुपाचा वापर ही करु शकता.

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

30 Jan 2013 - 5:46 am | आनन्दिता

अरे व्वा !,! आमच्या सारख्या मठ्ठ लोकांना पाककला शिकण्यासाठी 'चित्रफिती 'हा नवा उपक्रम बराच फायदेशीर ठरेल!!

अन पाक्रु नेहमीसारखीच झकास!

सानिके, सुरेख झालाय व्हिडीओ. अगदी भारी. कृतीही तू छान सांगितलीस. कोकी ही जेमतेम भाजून त्याचा गोळा बनवून केली जाते ही कल्पनाही फारच वेगळी आहे. तुझे अभिनंदन.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2013 - 8:59 am | मुक्त विहारि

मस्त!!

पैसा's picture

30 Jan 2013 - 9:01 am | पैसा

नवा प्रयोग अतिशय आवडला! पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणे! ग्रेट!

मोदक's picture

30 Jan 2013 - 9:31 am | मोदक

आयड्या आवडेश..

सुनील's picture

30 Jan 2013 - 9:42 am | सुनील

पूर्वी मिपावर पाकृ येत त्या फक्त फायनल प्रॉडक्टच्या फोटोसहित (कधी तेही नाही!).

नंतर पांथस्थ यांनी पायरीगणिक फोटो टाकण्याची प्रथा रूढ केली, ती आजतागायत सुरू आहे.

आज सानिकास्वप्रिल यांनी अजून एक नवा पायंडा पाडला आहे - चित्रफितीचा!

उत्तम.

एक शंका - ही कोकी, दोन्ही बाजूने एक मिनिटाकरीता शेकून घेतल्यावर पुन्हा गोळा करून शेकण्याचा नक्की हेतू काय? पहिल्याच खेपेला २-३ मिनिटे शेकले असते तर, काय फरक पडला असता?

सहज's picture

30 Jan 2013 - 4:07 pm | सहज

नवा पायंडा आवडला.

धन्यवाद.

शुभेच्छा.

मदनबाण's picture

30 Jan 2013 - 9:46 am | मदनबाण

अरे वा... इडियोची कल्पना आवडली. :) इडियो अगदी प्रोफेशनली एडिट करुन बनवल्यासारखा वाटला. :)
कोकी हे पदार्थाचे नाव गमतिशीर वाटले... ;) फोटोतल्या २न्ही वाट्या मस्त वाटल्या,ते सत्यनारायण्याच्या पुजेचा प्रसाद ज्या छोट्या कागदी वाटीतुन देतात ना... तसेच या वाट्यांचे काठ वाटले. :)

जरासे अवांतरः- कोकी हे नाव वाचल्या नंतर मला पूर्वी श्रीमान-श्रीमती ही सिरीयल लागायची त्याची आठवण आली,त्यात रीमा आणि जतिन कनकिया यांच्या अभिनय जबरदस्त विनोदी अभिनय पहायला मिळायचा,त्यात रीमांचे नाव कोकी होते.(Kokila)

अमित's picture

30 Jan 2013 - 9:50 am | अमित

व्हिडीओची आयडीया मस्तच.

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2013 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

पाककृती आणि चित्रफितीची कल्पना स्तुत्य आहे. अभिनंदन.

अक्षया's picture

30 Jan 2013 - 10:12 am | अक्षया

चविष्ट आणि देखण्या पाककृतींचा मागे कोण आहे याची उत्सुकता होती. हे पहायला मिळाले. कल्पना फारच छान.:)
नेहमी प्रमाणेच ही पण पाककृती छानच.

नंदन's picture

30 Jan 2013 - 10:30 am | नंदन

पाकृ आणि व्हिडिओ दोन्ही मस्त. एका आत्याचे सासर सिंधी असल्यामुळे थालीपीठ-कम-पोळी-कम-पराठा असा हा प्रकार चाखला आहे, अतिशय चवदार! खासकरून आलू टुक सोबत. हादडताना कॅलर्‍या इ. विसरणे मस्ट :)

पाककृती छानच आहे. कोकी अशी भाजून घेउन पुन्हा गोळा करुन लाटतात, ते माहित नव्हतं..
बाकी व्हिडिओची आयडिया भारीच आहे.

- पिंगू

हासिनी's picture

30 Jan 2013 - 10:58 am | हासिनी

कौतुक हो कौतुक वाटत तुमचं सानिकाताई! व्हिडीओ मस्त!!
गोड आवाजात पाकृ. ऐकायला मस्त वाटलं...वाट पाहत आहे पुढच्या रेसिपीची!
:)

अनन्न्या's picture

30 Jan 2013 - 11:38 am | अनन्न्या

तुमच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद आहेच आणि तो आनंद आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणाय्रांचेही आभार!! पा.क्रु. मस्तच!!!

सुहास झेले's picture

30 Jan 2013 - 11:40 am | सुहास झेले

व्वा एकदम ग्रेट... :) :)

योगप्रभू's picture

30 Jan 2013 - 11:55 am | योगप्रभू

व्हिडिओ क्लिपद्वारे ती पाककृती करण्याची कृती दिल्याबद्दल आणि हा नवा उपक्रम सुरु केल्याबद्दल सानिकातै व मिपाला अनेकानेक धन्यवाद...

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2013 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

+१

नि३सोलपुरकर's picture

30 Jan 2013 - 12:00 pm | नि३सोलपुरकर

एकदम मस्त्,
सानिकाताई हा नवा उपक्रम बराच फायदेशीर ठरेल!!

दिपक.कुवेत's picture

30 Jan 2013 - 12:08 pm | दिपक.कुवेत

चित्रफीतीच्या नविन उपक्रमाबद्दल शुभेच्छा!. कोकीची पाकृ पण मस्तच...करण्याची पध्त जरा वेगळि पण छान आहे. व्हिडीओ बघायची प्रचंड उत्सुकता आहे पण ईथे हातिसात तु नळि दिसत नाहि (दु:खी स्मायली)

पाकृ सिंधी आहे म्ह्टल्यावर पापड हा हवाच! :)

धनुअमिता's picture

30 Jan 2013 - 12:45 pm | धनुअमिता

चित्रफितीची कल्पना एकदम आवडली. पाककृती तर नेहमीप्रमाणे छान आहे.

रामदास's picture

30 Jan 2013 - 1:10 pm | रामदास

आवडली पाककृती

विलासिनि's picture

30 Jan 2013 - 2:27 pm | विलासिनि

पाककृती मस्त.

मस्तच सानिका... व्हिडिओ आणि पाकृ दोन्हीहि आवडले... अगं तुला वेळ कसा मिळतो??? इथे मला पाकृ करायला पण वेळ मिळत नाही... व्हिडिओ तर दुरची गोष्ट झाली.

आवडले, खाखरा, पराठा, थालीपीठ या प्रत्येकातला चांगला गुण उचलून बनवलेला पदार्थ वाटतो. नवेनवे पदार्थ पहायला मिळतात, म्हणून "अन्न हे" च्या टीमचे आभार..

मस्त पाकृ... आणि चित्रफितिची आयडिया लै आवडली... ति बघुन पाकृ करताना चुक होणार नाही.

पियुशा's picture

30 Jan 2013 - 3:19 pm | पियुशा

य्यो बेबी ...सानिका रॉक्स ;)
मस्त मस्त मस्त एकदम प्रोफेशनल विडो :)

स्मिता.'s picture

30 Jan 2013 - 3:39 pm | स्मिता.

हे अगदी प्लिजंट सर्प्राईज आहे बरं का आमच्यासाठी! कोकी तर छानच लागत असेल पण आता यापुढे सगळ्या पाकृंचा व्हिडो मिळेल याचा आनंद जास्त आहे :)
आणखी येऊ दे.

स्पंदना's picture

30 Jan 2013 - 4:36 pm | स्पंदना

अरे वा! कौतुक करावं तेव्हढ कमीच.
हा पदार्थ आज पहिल्यांदाच ऐकला. तेव्ह्ढ गरम गरम पोळीचा परत गोळा करणे सोडलं तर बाकिचं सगळ जमेल अस वाटतय.

व्हिडोच्या आयडियेची कल्पना आवडली. पाकृ मस्तच हेवेसांनल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2013 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाककृती अगदी जब्रा झाली आहे. टीव्हीवर पाहतोय इतकं पद्धतशीर व्हिडियो झाला बघा.
मिपाचा उपक्रम आवडला. मिपाच्या उपक्रमागील मंडळीचं सालं आपल्याला लै कौतुक वाटतं. :)

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

30 Jan 2013 - 6:34 pm | चित्रा

हे मस्तच झाले.

विडिओ आवडला आणि कोकीबद्दल अनेकदा ऐकले होते. लहानपणी एक शेजारी कुटुंब सिंधी होते. त्यांचा मुलगा मित्र असल्याने त्याच्याकडे कधीतरी माझ्या भावाला नाश्त्याचे बोलावणे असे, पण मी कधी खाल्ली नव्हती. :(

करून बघणार.

सुप्रिया's picture

31 Jan 2013 - 11:04 am | सुप्रिया

व्हिडियो एकदम प्रोफेशनल वाटतोय.

हुप्प्या's picture

1 Feb 2013 - 10:15 am | हुप्प्या

अगदी सफाईदारपणे बनवलेला व्हिडियो. ध्वनी आणि चित्रिकरण दोन्ही अगदी उत्तम. अगदी मलाही पाकक्रिया सहज कळली. मानलं तुम्हाला!
आणि पदार्थही खावासा वाटेल असाच.
अशाच आणखी पाककृती भविष्यकाळात बघायला मिळतील अशी आशा.

नक्शत्त्रा's picture

31 Jan 2013 - 12:39 pm | नक्शत्त्रा

पाककृतीचे कौतुक ...आणि पाककृती चित्रफित करणार्यांचे ही कौतुक .... मी पा चे पाककृती चे दालन समृध समृद्ध होतेय आणी hitech ही .....

कच्ची कैरी's picture

31 Jan 2013 - 1:18 pm | कच्ची कैरी

अरे व्वाह सानिका मस्तच !!! ह्या निमित्ताने तुझ दर्शनही झाल :) आणि चित्रफीत बघताना तर आपण जणू काही मेजवानी किंवा आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम बघतोय कि काय असे वाटले किंवा त्यापेक्षाही सरस अस मी म्हणेल ,आता पुढच्या पाककृतीची उत्सुकता आहे :)

क्रान्ति's picture

31 Jan 2013 - 1:47 pm | क्रान्ति

पाकृ तर आवडलीच, आणि ही ध्वनि-चित्रफितीची कल्पना एकदम भन्नाट आहे! मेजवानी, सुगरण, खादाडी अशांसारख्या दिखाऊ मालिकांमधल्या पाकृ पहाण्यापेक्षा आणि शिकण्यापेक्षा 'आपल्या' सानिकानं शिकवलेल्या पाकृ इथे पहायला आणि करून पहायला नक्कीच आवडेल. :)

अभ्या..'s picture

1 Feb 2013 - 2:15 am | अभ्या..

उपक्रमातील प्रयोगशीलतेला आणि अर्थातच सानिकातैच्या सुगरणपणाला दाद.
नेहमीप्रमाणेच नं.१.

निवेदिता-ताई's picture

1 Feb 2013 - 7:29 pm | निवेदिता-ताई

सानिका -- तू खरच ग्रेट................ :)

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2013 - 9:11 pm | सानिकास्वप्निल

चित्रफितीची कल्पना तुम्हा सगळ्यांना आवडली म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार :)

खादाड अमिता's picture

2 Feb 2013 - 10:27 am | खादाड अमिता

अभिनन्दन :)

स्वाती दिनेश's picture

2 Feb 2013 - 8:37 pm | स्वाती दिनेश

चित्रफित, पाकृ सगळेच अभिनव!
स्वाती

शुचि's picture

15 Feb 2013 - 4:27 am | शुचि

कौतुक आहे.