राष्ट्रपिता

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
30 Jan 2013 - 2:13 pm
गाभा: 

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली !

पण

आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत

http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml

कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो .
ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे .

आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

प्रतिक्रिया

लाक्षणिक अर्थाने पिता हो. प्रत्यक्ष नव्हे. शब्दाचा अगदी तस्साच्या तस्सा अर्थ घ्यायचा तसा तर भारत देश ही काही खरोखरची व्यक्ती नव्हे. त्यामुळे तिला तरी सर्वांची माता कशाला म्हणायचं?

शिवाय राष्ट्राचे पिता म्हणजे आपले सर्वांचे पिता (आपण सर्व मिळून राष्ट्र बनले आहे, तेव्हा त्या अर्थाने आपणच राष्ट्र).. "भारत देश" या संकल्पनेचे पिता असं नव्हे..

इत्यादि अनेक अर्थ लावता येतील.. म्हणून प्रचलित अर्थाने शब्द स्वीकारावेत आणि पुढे चालावे हे उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 2:29 pm | प्रसाद गोडबोले

पण हे असंविधानिक आहे !
ह्या उपर काय बोलु ?
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
(एकदा असल्या असंविधानिक गोष्टींना प्रोत्साहन मिळायला लागले की मग इतर असंविधानिक गोष्टी पॉप अप व्हायला वेळ लागणार नाही )इतकेच बोलते सध्या !!

-- राष्ट्रकाकु गिरीजा

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 2:41 pm | बॅटमॅन

राष्ट्रकाकु गिरीजा

हा जाड्या टायपातील शब्दही तितकाच असंवैधानिक आहे मग!!!

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 3:03 pm | प्रसाद गोडबोले

हे पहा असे होते हे आमचे विनोद करायला गेले की

आम्हाला म्हणायचे होते

राष्ट्रपिता( असंविधानिक ) + छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति = राष्ट्रकाकु , राष्ट्रमामा , राष्ट्रआजोबा , राष्ट्रपत्नी , राष्ट्र्राख .... वगैरे वगैरे असंविधानिक गोष्टी येतील

असो... माफी असावी ...राष्ट्ररक्षक बॅटम्यॅनराव

राष्ट्ररक्षक बॅटम्यॅनराव नै हो.. ते भाषाभक्षक बॅटम्यॅनराव हैत. कोणतीही भाषा आणि विशेषतः त्यातल्या चुका कच्च्याच खातात!!

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 5:16 pm | बॅटमॅन

भाषाभक्षक बॅटम्यॅनराव

=)) =)) =))

मालोजीराव's picture

31 Jan 2013 - 11:29 am | मालोजीराव

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली !

पण

आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत

असं म्हणताना तुम्हीच त्यांना महात्मा असे संबोधले....'महात्मा'शब्द तरी संवैधानिक आहे का हो ?

मला त्यांना राष्ट्रपिताच म्हणायचे आहे.गिरजाबाई, तुम्हाला काही अडचण....

हा धागा विनोदी आहे की गंभीर?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 2:30 pm | प्रसाद गोडबोले

आम्हाला विनोदी लेखन करता येत नाही ...:(

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 2:29 pm | बॅटमॅन

या भूमिकेला "संविधानांध" म्हणावे काय?

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:27 pm | आजानुकर्ण

या भूमिकेचा संविधानाशी काही संबंध नाही. मुळात संविधानात काय लिहिले आहे तेच या बाईंना(!) माहीत नाही. फारतर शब्दशिखंडी शब्दावरुन संविधानशिखंडी हा एक चपखल शब्द सुचत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:33 pm | प्रसाद गोडबोले

नीट वाचत चला ,
http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml
मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे अशी पदवी देण्याचा अधिकार ’सरकार’ला नाही... लोकांना असू शकतो की... आणि वस्तुस्थिती हीच आहे... हे संबोधन सरकारच्या एखाद्या नोटिफ़िकेशनने दिले गेले नाहीये... लोकांनी दिले असेल.. असू शकेल... लोकमान्य किंवा इतर अनेक हृदयसम्राटांप्रमाणे! घटनेमधे लोकांनीही असे म्हणू नये असे नमूद केले आहे का? बघून सांगा बरं... किंवा वकिलाला विचारून सांगा!

विजुभाऊ's picture

14 Feb 2013 - 5:14 pm | विजुभाऊ

लोकमान्य गं बा टिळक , लोकमान्य अणे याना लोकमान्य या उपाध्या कोणी दिल्या होत्या? त्या तत्कालीन रिवाजानुसार वैधनीक होत्या काय?
एक शंका " वाकड्या तोंडाचा गांधी , मैद्याचे पोते , बारामतीचा म्हमद्या " या उपाध्या वैधनीक आहेत का?

विकास's picture

14 Feb 2013 - 5:45 pm | विकास

लोकमान्य गं बा टिळक

हे कोण नवीनच?

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 7:13 pm | बॅटमॅन

+१.

लोकमान्य गं बा टिळक,

लोकमान्य अणे

ही नावे मीही पहिल्यांदाच ऐकतोय ;)

(किञ्चित अ‍ॅस्पर्जरग्रस्त) बॅटमॅन.

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 6:59 pm | बॅटमॅन

काय पण शब्द शोधलाय!!! सहीये =)) =)) =))

आसेतुहिमाचल एकजिनसी ,एकछत्री भारताची निर्मिती गांधींमुळे शक्य झाली
हे मुळीच नाकारता येत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 5:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि ह्याच गांधीमुळे भारताची फाळणी झाली..."हिंदु माता-भगिनींनी मुस्लिम अत्याचाकर्त्यांना विरोध करु नये, त्यांचे कालातरांनी विचारपरीवर्तन होईल" असल्या बिंडोक विचारांचा पिता अशी ओळख करुन देऊ शकतो फार फार तर.
मागुन कोणी स्वराज्य देत नसतं, ते शिवाजी महाराज म्हणा, सावरकर म्हणा, भगतसिंग, राजगुरु आणि असंख्य स्वातत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच मिळु शकतं.
असल्या षंढ प्रव्रुत्तीचा नाश करणार्या नथुराम गोडसेंचा विजय असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 5:40 pm | बिपिन कार्यकर्ते

खरं तर तुमचा प्रतिसाद अप्रकाशित करावा का याचा विचार करत होतो... पण नको म्हणलं... राहू दे... तुमचेही विचार लोकांना दिसावेत... मात्र, अनेकांनी नमूद केलंय तसं.... तुम्ही गांधीजींचे साहित्य वाचा, समजून घ्या मग हवी तेवढी टीका करा. सध्या तसे काही तुम्ही केले आहेत असे दिसत नाही. आणि न समजून घेता केलेल्या टीकेला फार किंमत द्यावी असे वाटत नाही. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 6:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खुशाल प्रतिसाद अप्रकाशित करु शकताय. बरचं वाचलयं मी गांधी विषयी सुद्धा. आणि तरी सुद्धा मला तिरस्कार वाटतो, आणि मी मरेपर्यंत वाटतं राहाणाराच.

गांधीजींचं साहित्य वाचलंय म्हणता? लिहा एखादा लेख, साधकबाधक चर्चा होऊ द्या त्याबद्दल. आहे तयारी? असा बिनबुडाचा तिरस्कार करायला विशेष काही लागत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ! अरे ब्याम्या, सोडून सोड रे... मी गांधीजींनी लिहिलेलं वाचायला सांगतोय आणि हे साहेब गांधींविषयी वाचलेलं आहे असं म्हणत आहेत. छोड दे यार... बच्चा है! ;)

तुम्ही म्हणता तर सोडतो बिकाजी ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 10:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गांधीजींचं साहित्य वाचलंय म्हणता? लिहा एखादा लेख, साधकबाधक चर्चा होऊ द्या त्याबद्दल. आहे तयारी? असा बिनबुडाचा तिरस्कार करायला विशेष काही लागत नाही.

१-२ आठवड्याचा वेळ द्या. नक्कीच लिहीन. साधक-बाधक चर्चा नक्की घडऊन आणु.

मी गांधीजींनी लिहिलेलं वाचायला सांगतोय आणि हे साहेब गांधींविषयी वाचलेलं आहे असं म्हणत आहेत. छोड दे यार... बच्चा है

आपण मि.पा. च्या सल्लागार मंडळावर आहात. आपल्याकडुन माझ्या मताचा विचार केला जावा अशी अपेक्षा नाही. मी माझं मत मांडलय, तुम्हाला आ़क्षेपार्ह वाटलं असेल तर तुम्ही अप्रकाशित करू शकता.

आणि छोड दे यार..बच्चा है

सल्लागार मंडळावर असलात म्हणुन शिंग फुटल्यासारखे वागु नये ही विनम्र विनंती...धन्यवाद. ही पोस्ट ही आपण "अप्रकाशित" करु शकता..

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 10:46 am | llपुण्याचे पेशवेll

वरील प्रतिसाद कर्त्याच्या चारही विधानांशी सहमती. पहील्या २ शी फुल्ल आणि २र्‍या २ शी अर्धवट. :)

बिका, अप्रकाशित न करण्याविषयी तुमचा विचार पटतो आहे. सर्वांचे विचार एकच नसणार हेही मान्य.

पण तरीही एका बर्‍याच मोठ्या लोकसमूहाच्या दृष्टीने सन्माननीय असणार्‍या व्यक्तीविषयी हा धागा आहे, तेव्हा अगदी विरोध असला तरी शिष्टाचाराच्या एका मर्यादेतच सर्वांनी प्रतिसाद द्यावेत अन्यथा अप्रकाशित करण्याशिवाय उपाय नाही हे या निमित्ताने एकदा सांगावं असं वाटलं.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:17 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच सांगायचा प्रयत्न आहे.

काळा पहाड's picture

2 Feb 2013 - 6:06 am | काळा पहाड

प्रतिसांद अप्रकाशित करणं ही पण एक प्रकारची हिंसाच होंत नाही कां? कांय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2013 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ कोटी.

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:18 pm | आजानुकर्ण

ऐंशी वर्षाच्या निःशस्त्र म्हाताऱ्यावर गोळी झाडणारा तरुण मर्द आणि, ती गोळी झेलणारा म्हातारा षंढ? हे काही पटत नाही बॉ.

षंढ म्हणजे स्त्रैण किंवा मर्दानगी न दाखवणारा वगैरे म्हणायचे असेल तर आणखी एक वैद्यकीय शंका मनात येते.
गांधींना दोन मुले झाली होती, रीतसर विवाह करुन त्यांनी संसारही केला, त्यामुळे ते षंढ किंवा स्त्रैण होते असे मानायला जागा नाही. मात्र नथुराम गोडसेच्या वैवाहिक किंवा लैंगिक जीवनाबद्दल अशी ठोस माहिती नाही. शिवाय नथुराम गोडसेला लहानपणी नथ वगैरे घालून मुलींप्रमाणे वागवले जात होते म्हणे. (http://articles.timesofindia.indiatimes.com/2008-03-02/india/27764227_1_...)

त्यामुळे कोणत्याच अर्थाने गांधी षंढ होते हे पटत नाही.

टीपः स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा येथे हेतू नाही. जसा प्रश्न तसेच उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. स्त्रीमुक्तीवाद्यांनी माफ करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2013 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गांधीजींना चार मुलं होती, हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. (कस्तुरबांच्या चौथ्या बाळंतपणात त्यांना झालेला त्रास, रक्तस्राव पाहून गांधीजींचे काम-आयुष्यासंदर्भातले विचार बदलले. चौघांपैकी हरीलालचा वडलांशी सर्वात जास्त संघर्ष झाला.)

बंदूका उचलणारा, सैन्याचं यशस्वी नेतृत्त्व करणारा, अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याचा सर्वात मोठा नायक, जॉर्ज वॉशिंग्टन (लैंगिक अर्थाने) षंढ होता. पारंपरिक अर्थाचं शौर्य दाखवण्याचा पुरुष असण्याशी किंवा लैंगिक कर्तबगारीशी फार संबंध नसावा हे सांगायला जॉर्ज वॉशिंग्टन किंवा झाशीच्या राणीचं उदाहरण पुरेसं असावं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 10:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मग हिंदु माता भगिनींना अत्याचाराला विरोध करु नका असं सांगणार्याला काय "पुरुषोत्तम" म्हणावं का काय?

वैद्यकीय मुद्दा काढलाच नाहीये मी. मला त्याच्याशी काही एक घेणं-देणं नाहीये. मी वैचारीक षंढ पणा बद्द्ल बोलतोय. कदाचीत त्यांना एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायची सवय असेल. पण हल्लीच्या काळात कोणी एका गालावर मारली तर त्याचे दोन्ही गाल तर रंगवायचेच वरुन ४ शिव्या हासडायच्या. असं वागलं तरच जगता येईल सुखानी.

खालची लिंक वाचा मग बोला..

http://www.quora.com/Mahatma-Gandhi/Could-Gandhi-really-have-saved-Bhaga...

Gandhi could have saved Bhagat Singh’s life if he had wished, but regrettably, he didn’t and wouldn’t, and his failure in saving Bhagat Singh’s life from the gallows leaves a black spot on his political career.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll

वैद्यकीय मुद्दा काढलाच नाहीये मी. मला त्याच्याशी काही एक घेणं-देणं नाहीये. मी वैचारीक षंढ पणा बद्द्ल बोलतोय. कदाचीत त्यांना एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायची सवय असेल. पण हल्लीच्या काळात कोणी एका गालावर मारली तर त्याचे दोन्ही गाल तर रंगवायचेच वरुन ४ शिव्या हासडायच्या. असं वागलं तरच जगता येईल सुखानी.

नाही नाही हो. यवढं प्रॅक्टीकल आणि रॅशनल बोलायचं नसतं. झालंच तर गुंठेपाटलाने, कोपर्‍यावरच्या गुंडाने, पोलिसाने कसा त्रास दिला यावर बुद्धीवादी लेख लिहावेत. गांधीबाबा तुमच्या देशात काय चालले आहे असा आक्रोश करावा.

दीपक साळुंके's picture

30 Jan 2013 - 2:55 pm | दीपक साळुंके

"राष्ट्रपती" या शब्दाबद्दल काय मत आहे?

या निमित्ताने मधु लिमयेंचा हा लेख जरुर वाचा - राष्ट्रपिता कोण?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले

एक तर राष्ट्रपती ही "पदवी" नाही ...पद आहे .
आणि जर ते पदवी सारखे वापरले जात असेल (तर ते असंविधानिक आहे) ताबडतोब काढुन टाकावे
( अर्थात मा. ही पंचाक्षरी शिवी जोडुन त्याची पदवी करता येईल , त्याला संविधानाची हरकत नसावी बहुधा =)) )

नीलकांत's picture

30 Jan 2013 - 3:01 pm | नीलकांत

भारतावर ब्रिटीशांचे राज्य आले आणि भारतात अनेक बदल झाले. भारतात इंग्रजी शिक्षणामुळे आणि भारतीय सिंधु पर्यटन परत एकदा करायला लागल्यावर समस्त जगभरात होत असलेले बदल भारतीयांना खुणाऊ लागले. स्वातंत्र्य, समता , बंधुता ह्या मुल्यांची ओळख सुध्दा इंग्रजी सत्ता आल्यावर भारताला नव्याने झाली.

१८५७ चा उठाव जो झाला होता तो स्वातंत्र्यलढा नक्कीच नव्हता. तो होता त्या त्या स्थानिक राजांनी दिलेला लढा. त्यावेळेस भावी भारताबद्दल कसलाही समान विचार लोकांमध्ये नव्हता. मात्र विसाव्या शतकाच्या सुरूवातीला हे जगातील बदलाचे वारे भारतात आले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लो़कांनी वेगवेगळ्या विचारांनी भाराऊन टाकले.

कुणी १४ व्या वर्षी देवीसमोर बसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरेपर्यंत लढा देईन असे म्हणून अभिनव भारताची स्थापना करत होते...
तर कुणी सरळ ताश्कंदला जाऊन कम्युनिस्ट पार्टीमधे सहभागी होत होतं.
कुणी साऊन्डर्सला गोळ्या मारत होते.. तर कुणी काकोरीला सरकारी खजीणा लुटत होते.
कुणी फ्रान्समध्ये राहून देशस्वतंत्र झाला पाहिजे म्हणून लढत होतं तर कुणी मुसोलीनी, हिटलर ते जनरल तोजोंच्या मदतीने भारत स्वतंत्र करू पाहत होतं.
तर कुणी तरी भारताच्या खेड्यापाड्यातील जनतेला, अबालवृध्दच नव्हे तर स्त्रीयांनासुध्दा रस्त्यावर येऊन स्वातंत्र्याच्या ओढीने अगदी कायदाही हातात घ्यायला लावत होता.

प्रत्येकाचे मार्ग जरी वेगवेगळे होते तरी सर्वांना समताधिष्ठीत लोकशाहीप्रणीत शासनव्यवस्था हवी होती. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना समान संधी - समान दर्जा याबाबत सर्वांचेच एकमत होते. याला कारण असे होते की सर्व जगात अश्याच चळवळी सर्वत्र सुरू होत्या.
या चळवळीच्या यशस्वीतेने त्याकडून प्रेरणा घेण्याची , त्या चळवळींची नक्कल करण्याची, त्यांची मळलेल्या वाटेवरून जायची इच्छा प्रत्येकाची होती. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभूमीची दास्यातून मुक्ती हवी होती.

याच काळात स्वतंत्र झालेल्या देशांचे झेंडे तीन किंवा अधिक रंगांचे होते म्हणून स्वातंत्र्य लढ्यात तिरंगा आला. त्याकाळात जी उपमा देण्याची व्यवस्था बाहेर होती ती सुध्दा आपल्याकडे प्रचलीत झाले. जसे भारताचे मार्टीन ल्युथर किंग, किंवा भारतचे मॅन्चेस्टर आदी.

याच काळात आणि याच पध्दतीने जगात चाललेली जी पध्दत होती की एखाद्या व्यक्तीचे कार्य जर एवढे मोठे असेल की त्याचे देशातील नागरिकांनी सतत स्मरण ठेवावे असे असेल तर त्यांना Father of the Nation म्हटल्या जात असे. त्याच पध्दतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे संबोधले. लोकांना ते आवडले तेव्हा पासून ते प्रचलीत झाले आहे.

भारत देशाला मातृभूमी म्हणने हा एक वेगळा भाग आहे तो बराचसा भावनीक व सांस्कृतीक आहे. मी तसं मानतोही. मात्र या संदर्भात महात्मा गांधीचा राष्ट्रपिता हा उल्लेख जोडणे सर्वथा अनाठायी आहे असं वाटतं. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पातळीवरच्या आहेत. त्याची सरमिसळ अनावधानेने होत असेल ते आपण थांबवलं पाहिजे, मात्र असं म्हटल्याने आपल्या विचारसरणीच्या विरूध्द असलेला पक्ष हा मुद्दा चलनी नाणे म्हणून वापरत असेल आणि त्यासाठी असा बुध्दीभ्रम तयार केला पाहिजे, असा विचार असेल तर मी त्याची निंदा करतो.

शेवटी अश्याच अनाठायी तुलनेचे उदाहरण देतो व थांबतो. गाईला आई म्हणून पुजणारे बैलाचे पुत्र होतात का? असा प्रश्न जसा अनाठाई आणि केवळ बौध्दीक कसरतीसाठी असेल तश्याच स्वरूपाची तुलना भारतमाता व राष्ट्रपिता ही आहे असे मला वाटते.

शेवटी एकदा पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधीना श्रध्दांजली देतो.

- नीलकांत

प्राध्यापक's picture

30 Jan 2013 - 4:14 pm | प्राध्यापक

अगदी,१००% सहमत, मोजक्या शब्दात अर्थपुर्ण विवेचन.

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 5:17 pm | बॅटमॅन

नेमका प्रतिसाद!!! आवडेश. :)

सत्याग्रहाचा मार्ग देशातील जनतेला दाखवणार्‍या गांधीजींना श्रद्धांजली.

सस्नेह's picture

30 Jan 2013 - 9:42 pm | सस्नेह

समर्पक प्रतिसाद !

मराठी कथालेखक's picture

10 Jul 2014 - 3:37 pm | मराठी कथालेखक

१८५७ चा उठाव जो झाला होता तो स्वातंत्र्यलढा नक्कीच नव्हता. तो होता त्या त्या स्थानिक राजांनी दिलेला लढा. त्यावेळेस भावी भारताबद्दल कसलाही समान विचार लोकांमध्ये नव्हता.

याबद्दल असहमत. माझ्या माहितीप्रमाणे हा उठाव सैन्याने केला होता, तसेच अनेक सरदार व राजे त्यात सामील होते. ब्रिटीश अंमल झुगारुन दिल्लीच्या बादशाहास राज्यावर बसवणे हा समान विचार त्यात होता.

बाकी कुणाला राष्ट्रपिता म्हणणे हे मलाही पटत नाही. कारण राष्ट्र हे सगळ्या जनतेचे आहे आणि सगळ्या जनतेने त्यांना राष्ट्रपिता म्हणायचे ठरविले आहे का ? तसा मतदारांचा कौल झालाय का ? महात्मा म्हणण्यापर्यंत ठीक आहे. (तो ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मला श्री मोहनदास गांधी असे म्हणायचे असेल तर महात्मा म्हणायची सक्ती नसावी किंवा मी तसे म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान असे पण समजले जावू नये).
माझे म्हणणे इतकेच की समजा मी एका समूहाचा भाग आहे. काही चांगले अनूभव आल्याने वगैरे समूहातील काही व्यक्तिंनी कुणा एका क्ष व्यक्तीचा गौरव करणे , उदो उदो करणे ठीक आहे पण सगळ्यांच्या वतीने जर कुणी असे म्हणू लागले की ती क्ष व्यक्ती आपल्या समुहास पित्यासमान वा मातेसमान आहे तर तो माझ्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. म्हणणार्‍याने स्वतःपुरते म्हणावे मला वा समस्त समूहालच गृहीत धरु नये. मी पित्याला वा मातेला द्यावा तसा आदर (इतर) कुणाला द्यावा/न द्यावा हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे.

राष्ट्रपिता = father figure for Indians = पितृतुल्य व्यक्तिमत्व.
.
असा अर्थ असावा का?
.
असा अर्थ असेल तर त्याला आक्षेप घ्यावा का?

बाळ सप्रे's picture

30 Jan 2013 - 3:47 pm | बाळ सप्रे

"राष्ट्रनायक" संविधानिक आहे की नाही ते तपासून बघितलत का??
संविधानात तशी तरतूद नसल्यास "राष्ट्र"ने सुरु होणार्‍या सगळ्या शब्दांची यादी करून कुठली उपाधी कोणाला द्यावी याबाबत तातडीने संविधान दुरुस्ती करून घेण्यासाठी देशव्यापी चळवळ उभी करायला हवी !!!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2013 - 3:59 pm | पुण्याचे वटवाघूळ

का हो लता मंगेशकरांना 'गानकोकिळा', सुनील गावसकर्/सचिन तेंडुलकरला 'लिटलस्मास्टर' किंवा 'मास्टर ब्लास्टर' अशा उपाध्या संवैधानिक आहेत का?तरीही लोकांनी त्या आपुलकीने त्यांना दिल्या आहेत.तुम्हाला गांधीजींना राष्ट्रपिता म्हणायचे नसेल तर म्हणू नका पण त्याला संवैधानिक असण्या/नसण्याच्या हास्यास्पद मुद्द्यावरून इतका विरोध करायचे कारण आहे?ज्यांना गांधीजींना राष्ट्रपिता म्हणायचे ते म्हणतील आणि ज्यांना म्हणायचे नाही ते म्हणणार नाहीत.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

त्याला संवैधानिक असण्या/नसण्याच्या हास्यास्पद मुद्द्यावरून इतका विरोध करायचे कारण आहे? >>> अहो , केन्द्रिय गृहमंत्रालयाने जे म्हणले तेच मी री-इटरेट केलेय ... गैरसमज नसावा ...मी भगवी दहशतवादी नाहीये हो :(

म्हणायचे ते म्हणतील आणि ज्यांना म्हणायचे नाही ते म्हणणार नाहीत.
>>>म्हणजे मॉब ने जिथं जसं जमेल तसं संविधान मोडलं तर ते मान्य आहे असा अर्थ लागतोय. जो आपल्याला पटतो .

धन्यवाद :)

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 5:46 pm | आजानुकर्ण

केंद्रीय गृहमंत्रालयाने तुम्हाला घरी पोष्टकार्ड पाठवून 'गांधींना राष्ट्रपिता म्हणा. न म्हटल्यास तुम्हाला अमुकतमुक वर्षे शिक्षा' वगैरे आदेश पाठवला आहे काय? मग तुमच्यावर गांधींना राष्ट्रपिता म्हटल्याचे कुणी लादले आहे ते सांगा.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्यावर गांधींना राष्ट्रपिता म्हटल्याचे कुणी लादले आहे ते सांगा.>>कोणी नाही .
पण
माझ्या माहिती नुसार कोणत्याही असंविधानिक पदव्या देणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे . वकिलाशी बोलुन कळवते ह्या विषयावर .

बाळ सप्रे's picture

30 Jan 2013 - 6:24 pm | बाळ सप्रे

म्हणजे सुभाषबाबूंवर खटला भरणार तर !!

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले

मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:36 pm | आजानुकर्ण

थोडक्यात सरकार ही पदवी देऊ शकत नाही एवढाच या वाक्याचा अर्थ आहे. इतर कोणी ही पदवी देऊ शकत नाही असे सरकारने सांगितलेले नाही.

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 6:43 pm | नितिन थत्ते

शक्य आहे. ते अजून आहेत असं अधूनमधून वाचायला मिळतं.

पण संविधान लागू होण्यापूर्वी (पक्षी २६ जानेवारी १९५० पूर्वी) हा गुन्हा घडल्यामुळे बहुधा खटला भरता येणार नाही.

आता रेट्रोस्पेक्टिव्ह कायदे लागू करणारे आता राष्ट्रपती झाले आहेत. त्यामुळे ते खटला भरण्याची सूचना करू शकतात. पण पुन्हा ते सुभाषबाबूंचे प्रांतबंधू असल्याने बहुधा असे करणार नाहीत.

मृत्युन्जय's picture

30 Jan 2013 - 9:46 pm | मृत्युन्जय

च्यामारी एका दगडात किती पक्षी माराल थत्ते चिच्चा.

तुमच्या म्हणण्याला बाकी १००% अनुमोदन

धमाल मुलगा's picture

30 Jan 2013 - 4:05 pm | धमाल मुलगा

गेल्या २-३ महिन्यांमध्ये दै.सकाळमध्ये एक बातमी वाचल्याचं आठवतंय -
उत्तर प्रदेशातील एका तरुणीने माहितीअधिकाराअंतर्गत 'म.गांधी ह्यांना राष्ट्रपिता संबोधले जातो तो ' ह्याबद्दल ते योग्या आहे? असा काहीसा प्रश्न विचारला होता. त्याचे सरकारी उत्तर 'हे संविधानाच्या विरोधी आहे' असं काहीसं आल्याचं बातमीमध्ये नमुद केलं होतं.

कोणाला सापडल्यास ह्या बाबीचा दुवा इथे देता येईल काय?

बाळ सप्रे's picture

30 Jan 2013 - 4:20 pm | बाळ सप्रे

धागाकर्तीने दिलेला दुवा याच बातमीचा आहे फक्त सकाळऐवजी बी.बी.सी.मधला आहे..

धमाल मुलगा's picture

30 Jan 2013 - 4:33 pm | धमाल मुलगा

तो दुवा नेमका प्रतिसादानंतर उघडला माझ्याकडे.:-)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jan 2013 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार

राष्ट्रनायीका, राष्ट्रखलनायक, राष्ट्रविनोदवीर,राष्ट्रनायकमित्र, राष्ट्रनायीकासखी इत्यादीं विषयी देखील अधिक वाचायला आवडेल.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2013 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा

मी पण...मी पण...!!!
===================================
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/large-knife.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 5:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

केवळ विरोधासाठी मिसळपावचा वापर होऊ नये. यासाठी हा प्रतिसाद संपादित करीत आहोत. सदस्यांना आपले मत मांडण्याचा अधि़कार आहे. त्याचा गैरवापर होऊ नये. ही अपेक्षा आहे.

अँड आय थॉट माय जोक्स वेअर बॅड!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2013 - 5:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आय सी नो जोक्स ईन माय स्टेटमेंट...!! आय सपोर्ट नथुराम गोडसे...!!

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 5:41 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) आमचा "गडद उमराव" पिच्चर पाहिला नाहीत वाट्टे...विदूषकाचा ड्वायलॉक आहे तो. बाकी तुमचा परतिसाद पाहून डोळे पाणावले, कीव आली. चालू द्या. एकेकाची जाण.

बाळा मना नथुराम तुझा आर्दश आहे ना ? पन तु कधी बंदुकीचा आवाज कानाजवळ एकला आहेस का ? जो नथुराम ८० वर्षाच्या निशस्त्र माणसावर गोळ्या झाडतो,तो तुझा आर्दश होय रे,थुत तुझ्या जिंदगीवर्,जी व्यक्ती वयोवृद्धांचा आदर करु शकत नाही ते राष्ट्राच्या भल्याचा विचार करणार होय......

बाबा पाटील's picture

1 Feb 2013 - 12:30 am | बाबा पाटील

मिपाच फेसबुक होतय,संपादक मंडळ माफ करा.पन काही प्रतिसाद सहनशक्तीच्या पलिकडचे आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2013 - 7:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाळा मना नथुराम तुझा आर्दश आहे ना ?

निर्विवाद सत्य.

पन तु कधी बंदुकीचा आवाज कानाजवळ एकला आहेस का ?

नाही. वेळ आली नाही कधी. त्याचा काय संबध इथे?

जो नथुराम ८० वर्षाच्या निशस्त्र माणसावर गोळ्या झाडतो,तो तुझा आर्दश होय रे,थुत तुझ्या जिंदगीवर्. जी व्यक्ती वयोवृद्धांचा आदर करु शकत नाही ते राष्ट्राच्या भल्याचा विचार करणार होय......

ये तो कुछ जादा ही हो गया. आदर कर्तुत्ववान व्यक्तींचा करावा. राष्ट्राचं भलं? माझी लायकी नाही हो राष्ट्राचं भलं-बिलं करायची. कुठे आपले थोर, प्रामाणिक, सत्यवादी, नम्र (आमच्याकडे देशंबधु-भगिनिंचे प्राण घेणार्‍याला पण आदरानी श्री. कसाब, हाफिज साहेब असं म्हणतात बरं का), निरपेक्ष, कार्यक्षम, गांधीवादी, "आदर्श"वादी", स्वच्च आणि देशाचं भलं करायला पहाणारे नेते आणि कुठे माझ्यासारखा नालायक, उद्धट आणि नीचं मनुष्य. ते माझं काम नाहीच.

थुत तुझ्या जिंदगीवर्

आवरा. सेम टु यु म्हणायचा मोह आवरतोय. धन्यवाद. आणि आपलीच कुठली तरी कानफटात वैगरे मारायची पोस्ट वाचली होती कुठेतरी. आता ते तुम्हीच का दुसरे कोणी ते आठवत नाहीये. जर मला ती सापडली तर आपण "आदर्श" गांधीवादावर चर्चा करु. :)

मराठी कथालेखक's picture

10 Jul 2014 - 3:46 pm | मराठी कथालेखक

नथुराम गोडसेला पाठिंबा देणे वा त्यांच्या विचारांशी सहमत असणे गुन्हा नक्कीच नाही.
नथुरामने जे केले त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ होता असे वाटत नाही. पण ते केल्याने विशेष काही साध्य झाले असेही नाही.
माझ्या मते नथुरामांनी श्री गांधी यांचा वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता. पण तसे न करता गोळी झाडल्याने नथुरामांच्या विचारांचा प्रचार न होता ते लहान ठरले आणि गांधी हुतात्मा झाले. राजकारणातला कच्चेपणा ...आणि काय म्हणणार !!

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 5:41 pm | आजानुकर्ण

गांधींनी कधीही मला 'राष्ट्रपिता' म्हणा असा आग्रह जनतेकडे धरला नाही. सुभाषबाबूंनी गांधींचे राष्ट्रातील स्थान ओळखून त्यांना ही उपाधी दिली. ही पदवी संविधान येण्यापूर्वीच गांधींना मिळाली होती. संविधानाचा आधार घेऊन असे रेट्रोस्पेक्टिवली काही बदलता येत नसावे. आणि हो राष्ट्रपिता जर असंवैधानिक असेल तर लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदूहृदयसम्राट(!), सेनापती वगैरे पदव्याही असंवैधानिकच आहेत. सगळ्याच पदव्यांचा एकदम निकाल लावू या ? कसे?

राष्ट्रप्रमुखाबाबत तुमचे हे मत वाचून एकंदर पातळी लक्षात आली. चालू द्या.

अर्थात मा. ही पंचाक्षरी शिवी जोडुन त्याची पदवी करता येईल , त्याला संविधानाची हरकत नसावी बहुधा

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 5:46 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी... पूर्ण सहमत आहे रे कर्णा!

बाकी पातळी लक्षात आलीच...

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले

आमदार , खासदार पासुन अगदी सरपंच नगर्सेवक लोक निव्वृत्त झाला नंतर / पद गेल्या नंतरही पदापुढे मा. लावुन त्याचा गैरफायदा घेतात ही सत्य परिस्थिती आहे .
वाटल्यास पुरावे देते . इथे प्रत्येक वळणावणळावर फ्लेक्ष बोर्ड लागलेत ...

उगाच डोळ्यावर कातडे ओढुन घेण्यात काय अर्थ ?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 5:55 pm | बिपिन कार्यकर्ते

तो मा पंचाक्षरी शिवीवाचक आहे असं तुमचं म्हणणं आहे का? उगाच सारवासारव करू नका. मा पासून सुरू होणारे पंचाक्षरी शब्द आणि त्यातले शिवी असणारे शब्द आम्हालाही माहित आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 5:58 pm | प्रसाद गोडबोले

उगाच सारवासारव करू नका >> अहो तो मा. माननीय ह्या अर्थाने असतो हे शेंबड्या पोरालाही माहीत आहे ...पण ते सारे लोक नक्कीच माननीय नसतात हे फार उशीरा कळते ...(रादर त्यातले बहुताशं मा. असतात असे म्हणायचे आहे मला ).

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:02 pm | बिपिन कार्यकर्ते

माननीय हा शब्द पंचाक्षरी आहे का?
माननीय हा शब्द मराठी भाषेतील मान्यताप्राप्त शिवी म्हणून मानला जातो का?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:05 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही फार गोधळ करताय राव समजुन घेताना .
मा. = माननीय
मा. = *****

हे दोन भिन्न शब्द आहेत

आणि निव्व्रुत्त राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या पदामागे मा. लावुन त्याची पदवी करतात ते नक्कीच माननीय नाहीत .( म्हणजेच दुसरा अथ लावावा )

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:19 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमच्या मूळ वाक्यात 'मा. ही पंचाक्षरी शिवी' असा शब्दप्रयोग आहे. तो अश्लाघ्य आहे. त्याबद्दल आधी माफी मागा. मग पुढचं बोलू.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले

स्वार्थासाठी स्वतःच्या पदवी मागे मा. लावणार्‍यांचा मा. ही शिवीच मानावी असे आमचे ठाम मत आहे .

तरीही

अश्लाघ्य भाषेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागते :(

श्रावण मोडक's picture

30 Jan 2013 - 8:46 pm | श्रावण मोडक

मित्रहो, का त्यांच्यावर असे सुटताहात? त्यांनी लिहिलंय ना, "हो तो मा. माननीय ह्या अर्थाने असतो हे शेंबड्या पोरालाही माहीत आहे". ते नीट वाचलंतर तर त्यांचे काही चुकत नाहीये, हे तुम्हाला कळेल. मग हे सारे वृथा प्रयत्न थांबवू शकाल. वाचा, परत.

श्रावण मोडक's picture

30 Jan 2013 - 7:27 pm | श्रावण मोडक

इथं बिका, कर्ण, ब्याटमन, नीलकांत, गवि यासारख्यांनी प्रतिसाद दिलेले पाहून हे लिहितोय.
निवृत्तीनंतरच्या 'मा.'चा अर्थ माननीय असा नाही. तो 'माजी' या अर्थानं असतो. जे कोणी त्याला माननीय मानत असतील त्यांच्यावर कायदेशीर पदाची खोटी प्रतिमा तयार केल्याची कारवाई होऊ शकते. तशी एक घटना घडल्याचे आठवते. त्यावेळी 'मा.'चा अर्थ माननीय असा नसून माजी असा आहे, असा युक्तिवाद केला गेला होता, हेही आठवते.
अर्थात, तुम्हाला ते माहिती नसणार. तुमच्यासमोर ज्याने कोणी त्या 'मा.' चा अर्थ माननीय असा सांगितला असेल त्याच्यावर अशी कारवाई करता येते. ती तुम्ही करावी. बाकी चर्चा चालू राहील. एक कृती केल्याचे पुण्य तुमच्या पदरी (इथे तुमचा आयडी स्त्री आहे याचा काही संबंध नाही) पडेल. कारवाई करणार असाल तर मला येथे जरूर कळवा. अशा कारवाईला अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते

दण्ण!

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 7:50 pm | बॅटमॅन

हैन!!!!

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 5:55 pm | प्रसाद गोडबोले

संविधान मोठ्ठं की गांधी ?

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 5:57 pm | बॅटमॅन

एका वाक्यात उत्तरे द्या:

लोकांची भावना महत्वाची की संविधानाचा फालतू कीस काढणे महत्वाचे? असंवैधानिकपणाच्या नावाने असे गळे काढून काय मिळणारे? मोरीला बोळा आणि दिल्लीदरवाजा मोकळा असे करणे किंवा साप, साप म्हणून भुई धोपटणे याला काय म्हणावे?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले

:)

अग्निकोल्हा's picture

30 Jan 2013 - 9:06 pm | अग्निकोल्हा

संविधान मोठ्ठं की गांधी

तुम्हाला काय वाटतं ?

कवितानागेश's picture

30 Jan 2013 - 9:12 pm | कवितानागेश

आधी कोण जन्माला आलं?

संविधान ब्रिटिशांचेही होतेच...
त्यावरून मोठेपणाचे मोजमाप करावे का ?

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 6:06 pm | नितिन थत्ते

गांधींना राष्ट्रपिता म्हणावेच असा आग्रह धरण्याइतका गांधीभक्त मी तरी नाही.

नाही म्हटले राष्ट्रपिता तरी काही हरकत नाही.
पंचाक्षरी शिवी सुद्धा द्या. कारण ती शिवी देणार्‍याच्या मतावर गांधींचे माहात्म्य अवलंबून नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी! पूर्ण सहमत! तरीही जाहिर चर्चांमधे एक पातळी पाळली जावी म्हणून त्या पंचाक्षरीला आक्षेप आहे. उद्या हीच शिवी जाहिर फोरमवर नथुरामाला जरी दिली तरी ते आक्षेपार्हच असेल.

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 6:17 pm | नितिन थत्ते

>>उद्या हीच शिवी जाहिर फोरमवर नथुरामाला जरी दिली तरी ते आक्षेपार्हच असेल

+१

पैसा's picture

30 Jan 2013 - 6:10 pm | पैसा

दंगा करण्यासाठी धागा काढला आहे का वाटावे असे प्रतिसाद येत आहेत. पण वाईटात चांगलं म्हणण्यासारख्या २ गोष्टी. एक म्हणजे नीलकांताचा समतोल. अप्रतिम प्रतिसाद आणि जुना बिका परत सापडला!!

वाईटात चांगलं म्हणण्यासारख्या २ गोष्टी.
>>>
अजुन एक गोष्ट : लोकांच्या लॉयल्टीज लक्षात येत आहेत :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:17 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी खरंय! माणासं कळतात हो या निमित्ताने! तुम्ही कळलातच की, बघा!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:19 pm | बिपिन कार्यकर्ते

अच्रत! =))

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:14 pm | प्रसाद गोडबोले

माझी लॉयल्टी संविधानाला आहे . कोणा एका व्यक्तीला नाही मग ती कोणीही का असेना .

इतके बोलुन मी थांबते

इतके न बोलता थांबला असता तर अजून बरं झालं असतं.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:26 pm | प्रसाद गोडबोले

भारी आहे तुमचं .

आधी संविधानाला विरोधी अशा पदव्या द्यायला समर्थन

आता

फ्रीडम ऑफ स्पीच ह्या मुलभुत संविधानिक अधिकाराच्या वापराला टोमणा !!

भारी प्रगती आहे =))

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:24 pm | आजानुकर्ण

संविधानाने अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अमुकतमुक व्यक्ती गांधींना राष्ट्रपती म्हणू शकते, किंवा इतरांनी ते म्हणावे असे आवाहन करु शकते. जर कोणाला पटले नाही तर त्याला ते म्हणण्याचे बंधन नाही. अर्थात संविधानाच्या आडून आपल्या अजेंड्यासाठी थोडासा धुरळा उडवणाऱ्या शब्दशिखंडींना काहीही स्पष्टीकरण दिले तरी कमीच.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:31 pm | प्रसाद गोडबोले

अर्थात संविधानाच्या आडून आपल्या अजेंड्यासाठी थोडासा धुरळा उडवणाऱ्या शब्दशिखंडींना काहीही स्पष्टीकरण दिले तरी कमीच. >>>
कसलाही अजेंडा नाहीये . जे केन्द्रीय गृहमंत्रालयाने म्हनले तेच मी परत म्हणले आहे .
"गांधीना संविधानानुसार राष्ट्रपिता म्हणता येणार नाही "

ह्या हिशेबाने केन्द्रीय गृहमंत्रालय शब्दशिखंडी आहे .

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:34 pm | आजानुकर्ण

केंद्रीय गृहमंत्रालयाने काय म्हटले आहे? तर, सरकारतर्फे अशी पदवी देण्याची परवानगी संविधान देत नाही. गांधींना ही पदवी यापूर्वीही सरकारने दिली नव्हती आणि आताही सरकार ती देऊ शकत नाही. इथे ही जनतेने किंवा जनतेतर्फे दुसऱ्या एका जननायकाने दिलेली पदवी हा गांधी आणि जनतेपुरता मामला आहे. संविधानाचा संबंध मध्ये येतो का? समजा अब्दुल ही व्यक्ती तिचे वडील कादीर यांना 'अब्बा' म्हणून पुकारतो. आता अब्बा ही पदवी त्यांना संविधानाने दिली आहे का? तर नाही. उद्या अब्दुलने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे गेला, आणि अशी पदवी देण्याची मागणी केली, तर तिथेही केंद्रीय गृहमंत्रालय अशी पदवी देता येत नाही हेच सांगणार. मग कादीर हे अब्दुलचे अब्बा असणे हे असंवैधानिक आहे का?

कळतंय का काही?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

हो !
बरंच काही कळातय .
एका शब्दात उत्तरे :
उद्या अजुन "काही" जणांना "राष्ट्रपिता" ही पदवी दिली जनतेने तर स्ट्यॅन्ड बदलणार नाहीना तुमचा ?

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:43 pm | आजानुकर्ण

अनेकांना राष्ट्रपिता पदवी देण्यास माझी तरी काहीच हरकत नाही. महात्मा ही पदवी अनेकांना मिळाली आहे. हिंदूहृदयसम्राटही दोन दोन आहेत. शिवाय या बाबतीत माझी हरकत किंवा माझा स्ट्यांड विचारायला कोणी येईल याचीही सुतराम शक्यता नाही.

हिंदूहृदयसम्राटही दोन दोन आहेत
बरोब्बर.
सावरकर, तोगडिया हे दोन आणि मोदी, सेनाप्रमुख हे अजून दोन ह्या अर्थाने आपण "दोन दोन" म्हणाला असावात.
तसे नसेल तर आधी अभ्यास वाढवा नि दोन दोन म्हणण्यापूर्वी हिंदु हृदयसम्राट कोण कोण हे जाणून घ्या.
शिवाय एक भावी हिंदुहृदयसम्राट अचानक मराठीहृदयसम्राट झालेत नायतर त्यांनाही मोजलच असतं.

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 6:48 pm | आजानुकर्ण

आणखी काही जणांना राष्ट्रपिता पदवी दिल्यावर असे अनेक 'पिते' असणे हे अंवैधानिक किंवा अवैद्यकीय आहे वगैरे धागा काढू नका इथे.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले

पण अभिनंदनाचे धागे मात्र जरुर काढीन .
( परवाच आमचे एक मित्र बोलण्याच्या ओघात महात्मा फुलेंना "राष्ट्रपिता" म्हणत होते हे पाहुन मी त्यांचे अभिनंदन केले ...उद्या कोणी तुम्हाला राष्टपिता म्हणाले तरीही मला आवडेल ....

जर तुमच्या लक्षात येत असेल तर हा माझा स्टॅन्ड परत एकदा पहा ..... माझा विरोध सिलेक्टीव्ह गव्हर्नन्स ला आहे.... "गांधीच फक्त राष्ट्रपिता , इतर कोणी नाही " असे म्हणणारे महाभाग पाहिलेत मी .
संविधान मोडायचे तर सगळ्यांनी अन पाळायचे तर सगळ्यांनी सो सिम्पल )

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमचा स्टँड (असलाच तर) तुमच्या कोणत्याही विधानातून स्पष्ट होत नाहीये... त्यामुळे तुमचा हा युक्तिवादही स्टँड होऊ शकत नाही!

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 7:53 pm | प्रसाद गोडबोले

संविधानापेक्षा कोणी मोठ्ठं नाही , अगदी राष्ट्रपती पदही पदवी म्हणुन वापरणे मला अयोग्य वाटते असे वर स्पष्ट म्हणले आहे मी .
आता तुम्हीच म्हणायला लागलात की "लोकांनी दिली तर पदवी चालेल , संविधान वाकवा "
म्हणुन मग मी म्हणलें की वाकवायचे तर सगळ्यांच्याच बाबतीत . एक तर शुन्य अफवाद नाहीतर सगळेच अफवाद .

--
राष्ट्रकाकु गिरीजा =))

वेताळ's picture

30 Jan 2013 - 6:16 pm | वेताळ

त्यांना श्रध्दांजली.

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 6:20 pm | नितिन थत्ते

बघा.... या धाग्यावर पन्नास झालेसुद्धा.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:22 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रद्धांजलीसाठी मात्र कोणी नाही फारसे! :)

मन१'s picture

30 Jan 2013 - 6:27 pm | मन१

त्याचे कारण इतकेच की श्रद्धांजलीमध्ये पुरेसे सवंग लिहिण्यात तुम्हाला घोर अपयश आलेले आहे.
इतकेच नव्हे, माझ्या तिथल्या प्रयत्नांनाही तुम्ही हाणून पाडले आहे.
मिपावर नवीन दिसताय बिका.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:30 pm | बिपिन कार्यकर्ते

व्हय जी! आत्ता आलो पौडास्नं! ;)

हंस's picture

31 Jan 2013 - 10:10 am | हंस

पौडास्नं!
कितीतरी दिवसांनी हा शब्द एकला, आणि पौडाच्या शेजारीच माझे गाव असल्यामुळे तो शब्द अधिक भावला.

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 6:45 pm | नितिन थत्ते

गिरिजा हा बिकाचा किंवा कर्णाचा डु आयडी आहे असा संशय येथे व्यक्त करतो. :P

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:51 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) याचीच वाट बघत होतो!

मन१'s picture

30 Jan 2013 - 6:58 pm | मन१

स्वतःचा संशय येउ नये म्हणून चिच्चा बिचार्‍या बिकांचे नाव घेत आहेत असा संशय व्यक्त करतो.

विकास's picture

30 Jan 2013 - 7:41 pm | विकास

नितिन रावांशी सहमत!

( वास्तवीक या धाग्याला जर (माझ्या ह्या प्रतिसादासकट) सर्वांनी दुर्लक्षित केले असते तर बरे झाले असते. आता मी त्याचे प्रायश्चित्त म्हणून बिकाच्या धाग्यावर उरलेला प्रतिसाद देतो.) ;)

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले

गिरिजा हा बिकाचा किंवा कर्णाचा डु आयडी आहे असा संशय येथे व्यक्त करतो. >>> कैच्याकै ...इतकं स्प्लिट परसन्यॅलिटी नसतं कोणी =))

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:52 pm | बिपिन कार्यकर्ते

डोन्ट बी सो शुअर! ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 11:08 am | llपुण्याचे पेशवेll

तुका म्हणे होय मनासी संवाद
अपुलाची वाद आपणासी

राष्ट्रपिता काय, सरदार काय, नेताजी काय किंवा स्वातंत्र्यवीर काय या सार्‍या घटनात्मक / संवैधानिक पदव्या आहेत/असाव्यात असे समजता तुम्ही????

या मानसिकतेचा निषेध!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2013 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

भारतीय राज्यघटनेच्या कलमाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. बाकी, म. गांधीना संविधानानुसार सरकार जरी अशी पदवी देत नसले तरी सामान्य जनतेला राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही, नाही का ?

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

30 Jan 2013 - 7:01 pm | मन१

सामान्य जनतेला राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही
आँ?
अहो पण मी समजा सामान्य जनतेस राष्ट्रपिता म्हणू इच्छित नाही.
आधीच गांधीजी राष्ट्रपिता आहे काय ह्यावर एक धागा निघालाय. आता पुन्हा "सामान्य जनता राष्ट्रपिता आहे काय" ह्यावर धागा निघायचा.

>>> अहो पण मी समजा सामान्य जनतेस राष्ट्रपिता म्हणू इच्छित नाही.

मनोबा, सामान्य जनतेला म.गांधींना राष्ट्रपिता म्हणायला संविधानाने अडवलेले नाही, असा त्या वाक्याचा अर्थ.

-दिलीप बिरुटे

काय काडी सारायला बे मनोबा उगी =)) =))

अग्निकोल्हा's picture

30 Jan 2013 - 7:09 pm | अग्निकोल्हा

आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत

ओखय! आय विल किप दॅट इन मा माइंड! डाँ बॉदर योर्सेल्फ अनिमोर प्लिज. थॅंक्यु.

तसेच

माझ्या कडुन ह्या राष्ट्रपिता महात्मा गांधिना मनःपुर्वक श्रध्दांजली ! तुमच्या इतका जनाधार आधुनिक भारताच्या इतिहासात उघडपणे कोणालाही जोडता आला नाही. तुम्ही दाखवलेला सत्याग्रहाचा मार्ग आज भलेही तथकथित मेणबत्ति संप्रदायाचे स्वरुप घेउ पहात असेल पण आजही तो सुधारणेची कास धरायचा, जनशक्ति दाखवायचा एक उत्तम शातंतापुर्ण तरीही अतिशय प्रभावी मार्ग आहे. ह्या मार्गावर चालायला आम्हा भारतियांना अक्कल व क्षमता दिलीत म्हणून तुमचा अभिमान आहे.

आज तुम्ही असतात तर मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेउन चालणारी स्वतंत्र भारतातील अंदोलने अतिशय प्रभावी उपयुक्त व जितकी आज आहेत तितकी दिशाहीन राहिली नसती. इंग्रजांविरुध्दचा जो व्याकप लढा सर्वात यशस्वी ठरला तो आपल्या प्रेरणेने सुरु झाला व फोफावला या बद्दल देश तुमचा अतिशय आभारी आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

30 Jan 2013 - 7:47 pm | चेतनकुलकर्णी_85

शाळेत व लहान पणी ऐकलेल्या "गांधी जोक्स " मुले गांधी हा राष्ट्र पिता नसून "राष्टीय विनोद" आहे असेत वाटत होते व वाटत्येय.......
संपादक मंडळीनी परवानगी दिल्यास त्यातले काही "गांधी" जोक्स शेअर करायला आवडतील. ह्या निमित्ताने...

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2013 - 8:21 pm | पिंपातला उंदीर

राष्ट्रपिता या शब्दात संस्कृत आणि पर्यायाने हिंदुत्वाचा वास येतो. राष्ट्रपिता शब्दाचा पर्यायाने हिंदुत्वाचा agenda पुरस्कृत करणार्‍या विचार जंतांचा तीव्र निषेध

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 8:27 pm | प्रसाद गोडबोले

=)) हे राम =))

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 10:41 pm | प्रसाद गोडबोले

धर्मनिरपेक्षता म्हणुन आजपासुन "वालिद-ए-मुल्क " अशी पदवी द्या =)) पण तीही असंविधानिकच असेल

अरुण मनोहर's picture

4 Feb 2013 - 9:47 am | अरुण मनोहर

धर्मनिरपेक्षता म्हणुन आजपासुन "वालिद-ए-मुल्क " अशी पदवी द्या

धर्मनिरपेक्षतेची ही संविधानिक व्याख्या आहे का? आवडली!

अवतार's picture

30 Jan 2013 - 8:58 pm | अवतार

गांधीजींविषयी म्हणाले होते "गांधीजींचे नेतृत्व हे शहरी सुशिक्षितांच्या बौद्धिक चर्चांवर अवलंबून नसून खेडोपाडी पसरलेल्या जनतेतील लोकप्रियतेवर अवलंबून आहे."
नेतृत्व हे लादले जाऊ शकत नाही तर ते जनतेने स्वीकारावे लागते. त्यासाठी शत्रूला उघडपणे आव्हान देण्याची हिम्मत दाखवावी लागते. ती हिम्मत ज्याच्याकडे असेल त्याच्या पाठी जनसमुदाय उभे राहतात. महत्व शस्त्रांना नसून लढण्याच्या धैर्याला असते. ब्रिटीशांच्या विरोधात देशव्यापी चळवळी कोणी उभ्या केल्या आणि वारंवार जनआंदोलने करून ब्रिटीश सरकारचा जनाधार कोणी कमकुवत केला याचे उत्तर हे ज्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात जाते त्यांनी गांधींचे महात्म्य नाकारावे ह्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
गांधी ही केवळ एक व्यक्ती नसून सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे प्रतीक आहे. त्यांना "राष्ट्रपिता" म्हटले नाही तरी त्यांचे हे स्थान हिरावून घेणे कोणाच्याही आवाक्यातले नाही. जनतेच्या निष्ठा शब्दांच्या नाही तर कृतीच्या आधारावर जिंकल्या जातात. ज्यांना सर्वसामान्य जनतेचे स्वातंत्र्यच खुपत असेल त्यांनी शब्दांचा कितीही कीस पाडला तरी जनतेच्या निष्ठा जिंकणे त्यांना कदापिही शक्य नाही.

श्रावण मोडक's picture

30 Jan 2013 - 9:05 pm | श्रावण मोडक

+१
आता इथे हा धागा वाचनमात्र व्हायला हरकत नाही. :-)

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 9:13 pm | आजानुकर्ण

सहमत.

विकास's picture

30 Jan 2013 - 9:28 pm | विकास

पण खरा प्रश्न वेगळाच आहे: "पंडीत" अथवा "चाचा" ह्या उपाधी संविधानाने मान्य केल्या आहेत का? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2013 - 9:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पंडित ही उपाधी नव्हती, प्रांतवाचक जात होती/आहे. काश्मिरी पंडित म्हणून पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय घटनेने जात कुठे लावावी, काय कसं याबद्दल काही विवेचन केलेलं आहे का नाही हे माहित नाही.

संविधान हा शब्द बहुदा संस्कृत आणि हिंदीत वापरतात. घटना हा मराठी शब्द असावा.

विकास's picture

30 Jan 2013 - 10:07 pm | विकास

हे काय मधेच? प्रसंगाचे काही गांभिर्य म्हणून नाही! ;)

बाकी चर्चा, त्यावरील एकातून एक निघणारे प्रतिसाद वाचताना मला कधीकाळी ऐकलेले (राजकारण, इतिहास कशाशीही कुठल्याही अर्थाने संबंधीत नसलेले, आणि disclaimer: अर्थात तसा काही असल्यास मला न समजलेले) स्फूट/बडबडकाव्य आठवले...

ए बी सी डी इ एफ जी, त्यातून निघाले गांधीजी
गांधीजींनी खाल्ला पेरू, त्यातून निघाले नेहरू
नेहरूंनी घेतली कात्री, त्यातून निघाले शास्त्री
शास्त्रींनी मारली फोर, त्यातून निघाला चोर
चोराने घेतला कॅच आणि संपली आमची मॅच.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2013 - 10:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्यासारखे उच्चभ्रू मराठीद्वेष्टे अशाप्रकारे विषयांतर करणार याची मला अपेक्षा होतीच. विषयाचं गांभीर्य एक आपल्यालाच काय ते समजलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या हस्तिदंती मनोर्‍यातून बाहेर या आणि जग कुठे चाललं आहे हे पहा असं सुचवते.

ए बी सी डी इ एफ जी, त्यातून निघाले गांधीजी
गांधीजींनी खाल्ला पेरू, त्यातून निघाले नेहरू
नेहरूंनी घेतली कात्री, त्यातून निघाले शास्त्री
शास्त्रींनी मारली फोर, त्यातून निघाला चोर
चोराने घेतला कॅच आणि संपली आमची मॅच.

याला बडबडगीत म्हणण्याची घोडचूक करू नका. या काव्यातून प्रचंड प्रतिभेचा प्रवाह निघालेला आहे; फक्त हा प्रवाह डोंगरदर्‍यांतून वहात असल्यामुळे तुम्हाला तो उथळ आणि खळखळ करणारा वाटत असेल. पण या प्रवाहाची शक्ती किती हे समजून घ्या.

या काव्यामधे भारतीय राजकारणाची आणि भारतीयांच्या भ्रष्टाचारी मानसिकतेची अतिशय योग्य शब्दांत दखल घेतलेली आहे. सुरूवातीला आलेल्या रोमन्/ल्याटीन अल्फाबेटांमधून भारतीयांवर असणारी ब्रिटीश सत्ता आणि सत्तेला अहिंसक मार्गाने विरोध करून मोठे झालेले गांधीजी यांच्याकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे. पेरू हे सामान्य लोकांचं फळ, तुमच्यासारख्या उच्चभ्रू, हापूस आंबे खाणार्‍यांना ते काय माहित असणार. तर ऐका, सामान्यांचं फळ पेरू खाणारे गांधीजी आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणावेत असे नेहेरू यांचा एकत्र संबंध लावून या काव्यात नेहेरूंचे पाय गांधीजींमुळे जमिनीवर असणं सुचवलेलं आहे.

नेहेरूंच्या लोकप्रियतेला उपासाची कात्री लावली की त्यातून शास्त्रीजी निघतात. आठवतं, भारतात खाद्यान्न आयात करण्याची वेळ आली आणि तुमच्या उच्चभ्रू अमेरिकेने नाही म्हटलं तेव्हा शास्त्रीजींनी अन्नसेवन कमी केलं? आणि शास्त्रीजींनी दिलेल्या अशा प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमाकडे काही नतद्रष्टांना बघवलं नाही, ही जी फोर त्यांनी मारली ती सहन न होऊन कोणी चोरून शास्त्रीजींना विष खिलवलं आणि ताश्कंतमधे ते गेले अशी बातमी अनेक वर्ष तरंगते आहे, अगदी तुकोबांच्या गाथेसारखी.

या चोरांची चोरी अशी तरंगून वर आली, आणि माझ्यासारख्या सामान्यांपर्यंत पोहोचली, आणि हा गेम संपला असं हे काव्य आहे. याला स्फुट म्हणू शकता, पण हे बडबडगीत नव्हे.

तुमच्यासारख्या बुद्धीवाद्यांनी थोडा विचार करून आशिष नंदींसारख्या अभ्यासकांच्या बोलण्याचा योग्य अर्थ लावला नाही तरी एकवेळ चालेल, पण लोकगीतांचा असा अपमान करू नये. शेवटी लोकांच्या हातात सत्ता आहे. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

लोकशाही जिंदाबाद.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2013 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी

हे गीत लहानपणी मी पण ऐकले व म्हंटले होते आज प्रथमच त्याचे रसग्रहण वाचले.
हे गीत इथे लिहिल्याबद्दल विकास यांचे व त्याचे रसग्रहण लिहिल्याबद्दल अदिती यांचे मनापासून आभार!!

विकास's picture

30 Jan 2013 - 10:44 pm | विकास

मूळ चर्चेस योग्य मार्गावर आणणारी चर्चा चालू केल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही सांगितलेला अर्थ ऑलमोस्ट बरोबर आहे. फक्त त्यातील पेरूचा अर्थ केवळ सामान्यांचे फळ असा नसावा. त्याचा संबंध हा पेरू देशाशी असावा असे वाटते. तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत. कदाचीत तुम्हाला ते माहीत नसेल. पण तो तुमचा दोष नाही.

बाकी, माझ्यासारख्या अतिसामान्यास (गंमतीत / उपरोधात असेल कदाचीत पण) बुद्धीवादी आणि उच्चभ्रू म्हणल्याने माझ्या अंगावरील रंग विटलेल्या शर्टाची कॉलर इस्त्री न करताच टाईट झाली. आता मी चार चौघात फेरूच्या फोडी देखील (त्यातील लहान लहान बी दातांमध्ये अडकण्यापासून टाळत) हापूस आंब्याच्या फोडींसारख्या मिटक्या मारत खाईन.

लोकशाही जिंदाबाद.

सहमत. आपल्या भारताच्या चिरायु प्रजासत्ताकात, लोकशाहीस जिंदाच बाद करून टाकले आहे. :(

सुनील's picture

30 Jan 2013 - 10:53 pm | सुनील

तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत

अगदी बरोबर. पेरूच्या संस्कृतीला माया संस्कृती असे म्हणतात (नक्की ना? हेमांगी यांचे लेख पुन्हा वाचायला हवेत). तर माया हा संस्कृत शब्द नाही का? यावरून, माया समाज इथूनच तिथे गेला, हे सिद्ध होते!

सुनील (पुना) ओक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2013 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

किती किती जाहिरात कराल आपल्या थिअर्‍यांची?

या वरच्या प्रजासत्ताक काव्यात पेरू देशाचा आणि माया संस्कृतीचा संबंध काय? माया समाज आणि पेरू देशाचे नागरिक मूळचे भारतीयच आहेत. अहो, अजून काही वर्ष तिथे टांगून रहा (hang in there); सगळे मानव आफ्रिका खंडातून नाही भारतीय उपखंडातून आले असं तुमच्या लक्षात येईल.

पण आपण इथे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतरच्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत. संदर्भ म्हणून रामचंद्र गुहांचं India after Gandhi वाचा, म्हणजे समजेल मी काय म्हणते आहे ते!

नंदन's picture

31 Jan 2013 - 2:02 am | नंदन

तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत

अगदी बरोबर. पेरूच्या संस्कृतीला माया संस्कृती असे म्हणतात (नक्की ना? हेमांगी यांचे लेख पुन्हा वाचायला हवेत). तर माया हा संस्कृत शब्द नाही का? यावरून, माया समाज इथूनच तिथे गेला, हे सिद्ध होते!

अर्थात. माया समाज इथूनच त्या गावाला गेला. म्हणूनच तर आंग्लभाषेत पेरूला 'गावा' म्हणतात!
पहा: आम्ही जातो अमुच्या 'गावा',अमुचा राम राम घ्यावा.

(पुन्हा ओक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2013 - 2:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय. आणि माया संस्कृतीतले पेद्रट लोकं पेरूमधून ब्राझिलमधे पाठवले गेले. त्यांची वस्ती आता 'पेद्रो द गावा'मधे आहे.

-- बेसुमार ओक.

विकास's picture

31 Jan 2013 - 2:37 am | विकास

तुम्ही दिलेल्या 'पेद्रो द गावा' च्या दुव्यामधला मिशेलचा पुल्लींगी उपयोग पाहून (मिशेल म्हणाला माझे ही तिथे जायचे बरेच वर्षे राहून गेले आहे.), ओबामाच्या राज्यात रहाणार्‍या माझ्या सारख्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या आहेत.

नंदन's picture

31 Jan 2013 - 2:49 am | नंदन

आतापर्यंत वाटत होतं की तुम्ही रॉमनीराज्यातले? की त्याच्या पक्षाप्रमाणे तुम्हीही त्यांना विसरलात? ;)

विकास's picture

31 Jan 2013 - 9:15 am | विकास

अहो ओबामाचे सर्व अमेरीकेवर राज्य आहे. त्यात मॅसॅच्युसेट्स पण येतेच की.

शिवाय रॉमनी आता नावापुरता शेजारी (शेजारच्या गावात) राहीला आहे. कारण जिस गली मे तेरा घर न हो बालमा... असे म्हणत त्याने मॅसॅच्युसेट्स सोडले आहे... तो आता तुमच्या कॅलीफोर्नियात रहातो. शेवटी रिपब्लीकन (पिडां) काका तिथे रहातात ना! ;)

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2013 - 2:52 am | श्रीरंग_जोशी

अरे वा, मॅसेच्युसेट्स मधून कधी निघालात?

ओबामांचे जन्मराज्य (हवाई) की कर्मराज्य (इलिनॉय)?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2013 - 3:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओबामांचे जन्मराज्य (हवाई)

पुरावा द्या की त्यांचा जन्म हवाईत झाला. :प

नंदन's picture

31 Jan 2013 - 3:01 am | नंदन

>>> पुरावा द्या की त्यांचा जन्म हवाईत झाला. :प
आंतरजालीय अंतू बर्वा म्हटले पाहिजे तुम्हांस [न्हेरु - टिळक - ट्यां - सुईण इ.]