“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !! इकडे तिकडे थोडं सर्च करुन, घरी असलेल्या वस्तू वापरुन मस्त रेसिपी तयार झाली.”मूर्ग हैदराबादी”.
साहित्य :
मॅरिनेशन :
चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून
ग्रेव्ही :
बारीक चिरलेला कांदा – २ कप
लसूण पेस्ट – १ टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा कप
पुदीना – अर्धा कप
हळ्द – १ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
गरम मसाला – २ टी स्पून
मीठ – चवीनुसार
तळलेले काजू १०-१२
तेल – ४ टेबल स्पून
कृती :
१. मॅरीनेशन चं साहित्य चिकनला चोळून चिकन साधारण दीड तास मॅरीनेट करा.
२. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या.
३. मग त्यात लसूण घालून थोडं परता.
४. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.
५. आता त्यात चिकन चे मॅरीनेट झालेले तुकडे घालून परता.
६. मग त्यात अर्धा कप पाणी घालून नरम शिजवून घ्या.
७. शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना आणि काजू घालून आणखी एक उकळी काढा.
८. मस्त चमचमीत तयार झालेलं चिकन कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून सर्व्ह करा. तबीयत खुश होणारच
पिल्लाने अगदी मनापासून दाद दिली होऽऽऽऽ
प्रतिक्रिया
28 Jan 2013 - 9:18 am | आनन्दिता
मार डाला!!
28 Jan 2013 - 10:02 am | मुक्त विहारि
छळवाद आहे..
एक तर इथे रोज सांबार-भाता शिवाय दुसरे काही मिळत नाही. आणि वरून आम्हाला जळवायला ह्या रेसिपीज..
असू दे..
वाचन खूण साठवली आहे..
आता भारतात गेलो की. नक्की करून बघणार..
28 Jan 2013 - 10:17 am | मनीषा
फोटो मस्त आहे...
पण हैद्राबादी का? काजु आहेत म्हणून का?
कारण मी देखिल चिकन साधारण असेच बनवते. (पुदीना नाही वापरून पाहिला अजून)
28 Jan 2013 - 11:34 am | जयवी
अगं पुदीना हाच तर मुख्य घटक आहे. कदाचित त्यामुळेच ते हैदराबादी म्हणत असावेत. नाव मी नाही गं ठेवलं ..ते नेटवर होतं :) मी फक्त मॅरीनेशन माझ्या पद्धतीने केलं बाकी रेसिपी तशीच आहे.
29 Jan 2013 - 7:09 am | मनीषा
असं आहे होय.. मला वाटलं, हैद्राबादी मसाला काही वेगळा असतो की काय..
पुढच्यावेळी चिकन करताना पुदीना नक्की ट्राय करीन ..
28 Jan 2013 - 11:36 am | सुहास झेले
तोंडाला झरे फुटलेत.....पार सोमवारची नीळ धुवून निघालीय. आज लंच में चिकन होना ;-)
28 Jan 2013 - 12:15 pm | दिपक.कुवेत
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा! चिकन पाहुन तोंडाला पुर आलाय! तळलेला सोनेरी कांदा वरुन घालायचा का ग्रेव्हि मधे? आता एकदा खरचं भेटायचं ठरवलं पाहिजे...तु नॉनव्हेज करुन आण; मी व्हेज आणतो :)
28 Jan 2013 - 4:50 pm | जयवी
नक्की दीपक :)
28 Jan 2013 - 3:11 pm | गणपा
लेकाला आमच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
चविष्ट पाकृ आणि फोटु.
28 Jan 2013 - 4:49 pm | जयवी
धन्यु लोक्स :)
29 Jan 2013 - 1:21 am | प्रभाकर पेठकर
अतिशय चविष्ट प्रकार दिसतो आहे. त्या 'अलीप्त' काजूंनी जरा विरस केला. त्या व्यतिरिक्तही चिकन मस्त लागेल ह्यात शंका नाही.
मी सुरुवातीला चुकून 'मूर्ख हैदराबादी' असे वाचले. असो.
29 Jan 2013 - 10:58 am | जयवी
पेठकर काका...... काजू अलिप्त नाहीयेत. पुदीना, कोथिंबीरीसोबतच तळलेले काजू रश्श्यात आहेत. वरचे तळलेले काजू फक्त मेकप साठी :)
29 Jan 2013 - 5:49 pm | विसुनाना
मीसुद्धा सुरुवातीला चुकून 'मूर्ख हैदराबादी' असे वाचले. ;) असो.
29 Jan 2013 - 8:45 pm | धमाल मुलगा
नानासाहेब एव्हढ्यातेव्हढ्यावरुन भावना दुखावल्या जाणार्यांपैकी नाहीत म्हणुन बरं! ;-)
29 Jan 2013 - 1:29 am | अग्निकोल्हा
अशी काही चित्रे समोर ठेउ नका राव... कलेजा खतम् होतो. काजु मस्त तळुन मसाला मारुन घातले तर अजुन टेस्टि होणार यात शंका नाही.
29 Jan 2013 - 4:30 am | सानिकास्वप्निल
चिकन कसलं चमचमीत दिसतयं :)
फोटो तर खासचं
29 Jan 2013 - 8:49 am | दीपा माने
जयवी, तुमच्या हातालाच चव असावी कारण सामुग्री तीच असुनही चव वेगळी लागु शकते. चिरंजीवाना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
29 Jan 2013 - 11:02 am | जयवी
मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)
नवरा आणि लेकाने घरचं चिकन हॉटेलच्या चिकनपेक्षा भारी होतं हे बोटं चाटत चाटत घोषित केलं :)
29 Jan 2013 - 3:24 pm | ज्योति प्रकाश
लेकाला वाढदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.फोटू पाहून तों.पा.सु. मस्त चमचमीत झालेलं दिसतय.
29 Jan 2013 - 8:43 pm | धमाल मुलगा
फोटो बघून नुसता पाणी पाणी झालो राव.
एक जरा पराठे (प्राठा प्राठा..चुकलं गणपाशेठ..मापी द्यावी.), हे असं लै भारी चिकन आणि जोडीला खीमा मसाला असला म्हणजे स्वर्ग दोन बोटांपेक्षा आणखी काय दूर असणार? :-)
असो, आज वांग्याच्या फोडीच चिकन समजुन खाईन म्हणतो.
7 Feb 2013 - 11:44 pm | शुचि
काय रे हसवतोस? =)) म्हणे वांग्याच्या फोडी चिकन समजून खाईन. =)) हसून हसून मेले.
7 Feb 2013 - 1:16 pm | गौरीबाई गोवेकर
छानच दिसतय!
7 Feb 2013 - 8:54 pm | मदनबाण
निरपराध आणि सजीव असणार्या तसेच क्वॉक क्वॉक असा आवाज करणार्या प्राण्याला ठार मारुन त्याची रोचक चव चाखण्याची एक हिंसक थेअरी मला यात दिसली ! ;)किती क्रूरपणा आहे हा ! हे वाचुन सर्व मांसाहारी मंडळींचे मनपरिवर्तन होईल अशी अपेक्षा करुन मी माझे शाकाहाराचे तत्वज्ञान इथेच समाप्त करतो. ;)
(शाकाहारवादी);)
7 Feb 2013 - 9:07 pm | जयवी
तुझ्या भावना समजू शकते मुला :)
7 Feb 2013 - 9:02 pm | बाबा पाटील
मार डाला.....
7 Feb 2013 - 11:48 pm | शुचि
काय जीवघेणा आहे तो फोटो. मेले.
8 Feb 2013 - 10:10 am | ऋषिकेश
"आज जुम्मे के दिन ये डिश देखा ऑर बालदीभर लाळ टपक्या! "
"हाय हाय, लेकीन घरमें चिकन बनानेकी परवानगी नै हे ना :("
"फिकर नॉट, मिपाकर आहेत ना, कोईतो तुझको बुलायेगा ऑर खाऊ घालेगा देख नक्कीच!"
;)