स्टफ्ड मेथी टिक्कि

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
23 Jan 2013 - 1:17 pm

Tikki

साहित्यः
१. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम
२. हिरव्या मिरच्या - २
३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि
४. पेरभर आलं
५. मुठभर कोथिंबीर
६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार
७. चवीनुसार मीठ
८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि

स्टफिंगसाठि:
१. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे)
२. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय)
३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात)
४. हिरवी मिरची - १ बारिक चिरुन (तिखट हवं असल्यास)

कृती:
१. मिक्सर मधे आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट पाणि न घालता करुन घ्या
२. एका कढईत १ चमचा तेल टाकुन बारिक चीरलेली मेथि परतुन घ्या. मेथिला पाणि सुटेल म्हणुन कोरडि होईस्त परतत रहा. मेथि जर कडु असेल तर चिरायच्या आधि मेथिला थोडं मीठ लावुन बाजुला ठेवा. एक ५-१० मि. दोन्हि हातांनि घट्ट पिळुन घ्या. पाण्याबरोबर मेथिचा कडवटपणा निघुन जाईल.
३. आता एका बाउल मधे मॅश केलेले बटाटे, आलं-मिरची-कोथिंबिर पेस्ट, परतलेलि मेथि, चवीनुसार मीठ टाकुन एकजीव करुन घ्या
४. गरजेप्रमाणे कॉर्न फ्लोअर टाकुन घट्ट्सर मळा
५. स्टफिंगसाठिचं सर्व साहित्य एकत्र करा
६. आता बटाटयाच्या मीश्रणाची पारि करावी व कॉर्न/चीजचं मिश्रण भरुन पारि बंद करावी
७. टिक्कि सारखा गोल आकार देउन तव्यावर दोन्हि बाजुनी शॅलो फ्राय करावी. बाजु उलटताना काळजी घ्या नाहितर टिक्कि फुटुन मिश्रण बाहेर येईल
८. गरमागरम टिक्कि आवडत्या सॉस / पुदिना चटणिसोबत सर्व करावी

टिपा:
१. जर टिक्कि प्रकार नको असेल तर सर्व साहित्य एकत्र करावे व लिंबाएवढे गोळे करुन तेलात डिप फ्राय करावे.
२. तरिहि वरच्या प्रकारात जास्त तेलकट नको असेल तर थोडया तेलात आप्पेपात्रात फ्राय करावे पण मेथिचं कोटींग असल्यामुळे आतुन शिजल्याचा नक्कि अंदाज येत नाहि आणि सतत परतावे / उलटावे लागतात नाहितर मेथि लवकर जळते :)

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

23 Jan 2013 - 1:24 pm | धनुअमिता

खुपच छान.पाककृती आवडली.नक्की करुन बघणार.
बघुनच तों पा सु.

gaurikambli's picture

23 Jan 2013 - 2:45 pm | gaurikambli

मस्त....

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2013 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआअ

पैसा's picture

23 Jan 2013 - 2:16 pm | पैसा

फोटो बघूनच जीव गेला. नक्की करून बघणार!

अस्मी's picture

24 Jan 2013 - 11:29 am | अस्मी

एकदम भारी फोटो...नक्कीच करून बघणार!!

सानिकास्वप्निल's picture

23 Jan 2013 - 2:51 pm | सानिकास्वप्निल

पाकृ व फोटो दोन्ही आवडले
मस्तचं :)

चिंतामणी's picture

23 Jan 2013 - 2:55 pm | चिंतामणी

फटु किलर आहे.

ज्योति प्रकाश's picture

23 Jan 2013 - 4:33 pm | ज्योति प्रकाश

फोटू जबरा आलाय. नक्की करून पाहीन.

काय जीवघेणा फोटो तेच्यायला!!!! जियो दीपकभौ!

प्रभाकर पेठकर's picture

23 Jan 2013 - 4:49 pm | प्रभाकर पेठकर

आकर्षक छायाचित्र आणि साधी/सोपी पाककृती. अभिनंदन.
करून, नुसतीच बघितली जाणार नाही तर नक्कीच, खाल्लीही जाईल. तेही एकदा नाही तर अनेकदा.

टिक्क्यांचा आकार पाहता टोमॅटो सॉस फार कमी वाटतो आहे.

रुमानी's picture

23 Jan 2013 - 4:50 pm | रुमानी

मस्त..
पाकृ आणि फोटू दोन्ही झकास....!

दिपक.कुवेत's picture

23 Jan 2013 - 5:55 pm | दिपक.कुवेत

मनापासुन धन्यवाद. जरुर करुन पहा आणि सांगा...

पेठकर काका: अहो अनुभवावरुन टोमॅटो सॉस फार घेतला कि तो हमखास उरतो...तसा तो नुसताहि खायला आवडतो पण टाकुन देण्यापेक्शा थोडा थोडा घेतलेला बरा....काय करणार शेवटि कोब्रा ना!

अभ्या..'s picture

23 Jan 2013 - 6:02 pm | अभ्या..

घासफूस असल्याने प्रचंड आवडली आहे ही पा़कृ. फोटो पण ब्येस्ट.
धन्यवाद दिपक

अग्निकोल्हा's picture

23 Jan 2013 - 6:05 pm | अग्निकोल्हा

.

समंजस's picture

23 Jan 2013 - 6:17 pm | समंजस

झक्कास पाकृ.
नक्कीच खाउन बघावी लागेल :)

रेवती's picture

23 Jan 2013 - 6:53 pm | रेवती

सुरेख पाकृ आणि फोटोही.

यशोधरा's picture

23 Jan 2013 - 6:57 pm | यशोधरा

मस्तच आहे फोटो!

नेहरिन's picture

23 Jan 2013 - 7:04 pm | नेहरिन

पाकृ. आवडली . फोटोहि छान .
वरिल साहित्याचि अजुन एक पाकृ. सुचवते. दोन्हि प्रकारचे साहित्य एकत्र क्रुन मस्त पराठा तयार होईल. ( दिपकजी राग मानु नका

दिपक.कुवेत's picture

23 Jan 2013 - 7:46 pm | दिपक.कुवेत

धन्यवाद. राग अजीबात नाहि. पराठा नक्किच छान होईल पण माझ्या मते मक्याचे दाणे भरडसर वाटल्यामुळे पराठा लाटताना मिश्रण कदाचीत बाहेर येउ शकते...पण आपण प्रयत्न करा आणि पराठ्याची एक नविन रेसीपी लोडवा :)

बाकि सगळ्यांचेहि धन्यवाद :)

फार चविष्ट पाकृ. फोटो तर क्या केहेने!

फोटोसाठी सानिकातैंच्या नंतर तुमचाच नंबर !
मका आवडीचाच आहे, बटाट्याबरोबर कसा काय लागतो, पाहू..

स्वाती दिनेश's picture

23 Jan 2013 - 11:04 pm | स्वाती दिनेश

मेथी टिक्की छान दिसते आहे,
स्वाती

दीपा माने's picture

24 Jan 2013 - 1:21 am | दीपा माने

मला ही पाकृ आवडली पण मेथी पिळून पाणी काढल्याने त्यातील जीवनसत्वांचा नाश होतो म्हणून मी मेथी कधीच पिळून घेत नाही. तुमच्या पाकृ फारच छान असतात. सोप्प्या आणि चविष्ट.

शुचि's picture

24 Jan 2013 - 1:57 am | शुचि

माझ्याही मनात तेच आले. जीवनसत्त्वे जात असतील.

पियुशा's picture

24 Jan 2013 - 10:20 am | पियुशा

आह !!! लै भारी :)

खादाड's picture

24 Jan 2013 - 10:38 am | खादाड

पा.क्रु. झक्कास !! :)

सुहास झेले's picture

24 Jan 2013 - 11:06 am | सुहास झेले

व्वा व्वा... फोटो बघून खपलो. जबरदस्त पाककृती !!

अहाहा....कसला कातिल फोटू !!
रेसिपी पण एकदम झकास :)
नक्की करुन बघणार !!
दीपक...अरे तुझ्या घरी येऊन काय काय खायचंय ह्याची मोठी यादी तयार होतेय ;)

मुक्त विहारि's picture

25 Jan 2013 - 12:40 pm | मुक्त विहारि

नक्की करून बघणार..

Mrunalini's picture

25 Jan 2013 - 3:00 pm | Mrunalini

एकदम tempting दिसतय... मी अशीच आलु-पालक-मटार टिक्की करते

दिपकशेठ, टिक्क्या आवडल्या गेल्या आहेत..

- पिंगू

दिपक.कुवेत's picture

26 Jan 2013 - 4:01 pm | दिपक.कुवेत

रसिक खवय्यांचे मनापासुन आभार

इन्दुसुता's picture

28 Jan 2013 - 9:31 am | इन्दुसुता

टिक्कीची पाकॄ करून बघितली...
मी ३ मध्यम बटाटे घेतले, त्यात ८ बर्‍यापैकी मोठ्या टिक्क्या झाल्या. स्टफींग थोडे उरले, त्यात सावर डो ब्रेडचा एक स्लाईस टाकून आणखी २ मध्यम टिक्क्या झाल्या. चवीला उत्कॄष्ट असल्यामुळे कुठल्याही चट्णी / सॉस ची गरज भासली नाही.
एका चांगल्या पाकॄ साठी मनापासून धन्यवाद.

सविता००१'s picture

28 Jan 2013 - 2:01 pm | सविता००१

फोटो पाहूनच खल्लास. नक्की करणार....

फोटू भलताच टेंम्टिंग आहे. :p