रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच.
रस्त्यात खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "माणसं, व्यवहारात थुक्का का लावतात?"
मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "पद्धत" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "व्यवहारात विश्वासानंतर थुक्का लावयची" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "माणसं विश्वास का ठेवतात?" आणि मी निरुत्तरसा होतो.
पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगतो की अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, व्यापारात अनेक प्रकारचे व्यवहार असतात. , पैकी एक आहे खटास्खट व्यवहार ज्याला रोखठोक व्यवहार हेदेखील नाव आहे. या व्यवहारानुसार म्हणून अनेक जण थुक्का लावतात.
आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
प्रतिक्रिया
17 Jan 2013 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर
तर काहींना सांगते की............. आणि मी निरुत्तरसा होतो.
हा प्रकार कळला नाही.
17 Jan 2013 - 5:12 pm | नाना चेंगट
हॅ हॅ हॅ
कटपेस्टमधल्या डुलक्या ! शुचितैंचा धागा कट करुन बदल केले. काही तसेच राहिले :)
संपादक महोदय वा महोदया घ्या बरं संभाळून... नक्की संभाळा बर का ! नाही तर लावाल थुक्का ! ;)
19 Jan 2013 - 12:12 am | जेनी...
म्हणजे तुम्हीपण आम्हाला थुक्का लावायला निघाला होतात तर .
बरय .
17 Jan 2013 - 5:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
इथेही काही राधा-कृष्ण भानगड आहे काय? ;)
17 Jan 2013 - 5:14 pm | नाना चेंगट
एय.. मिसळलेला... सांगू का तुझं नाव संपादकांना ! ऑ !! मिसळलेला सोडून विरघळलेला होशील !! ;)
17 Jan 2013 - 5:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नको ओ नको, माझं नाव नका सांगू... उगा गरिबाला सुळावर कां देताय?
मी आपली छोटीसी चम्मतग केली.. मापी करा.
17 Jan 2013 - 5:11 pm | चिरोटा
लावल्यावर एकदम भारी....
खलनायक शंभू
17 Jan 2013 - 5:13 pm | गवि
माझ्या मर्यादित ज्ञानानुसार:
थुक्का लावणे म्हणजेच चुना लावणे. चुन्यात कॅल्शियम असते आणि त्यामुळे हाडांना बळकटी येते.. शिवाय दातही मजबूत होतात आणि घशात जात नाहीत..
बाकी पुराणतज्ञ प्रकाश टाकतीलच.
17 Jan 2013 - 5:27 pm | बाळ सप्रे
फारच मर्यादित ज्ञान बुवा तुमचं!!
स्पन्दनं, लहरी, चक्र असं काहीच माहीत नाही तुम्हाला??
17 Jan 2013 - 5:37 pm | ऋषिकेश
नाना.... तुला तर सगळंच माहित आहे रे!.. अर्थशास्त्राचं तत्वज्ञान, थुक्का लाऊन करायचे रोख्ठोख वेव्हार!,.... तरीही विचारतोस्स?
शेयर बाजारातली एनर्जी इन्डेक्सवर जाईपर्यन्त थापा, अफवा वगैरे प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना रिंगिंग बेलपासूनच बाजारात थुक्का लावण्याची परम्परा आहे.......ऑनलाईन ट्रेडिंग झाल्यापासून खेळाडू असणार्या स्त्रियांना देखील आजकाल थुक्का लावतात!!
===================
माझ्या मते थुक्का हा शब्द शुक्कीपासून आला असावा. थुकताना घशातीत तसेच जीभेवरील कुठलुआशा ग्लँड्सवर ताण येतो आणो अधिक लाळ गळते. (पैसे पाहुन कशी लाळ गळतेय हे तुम्ही ऐकले असेलच, तीलाळ पैसे पाहुन नव्हे तर शुक्का लावून पैसे लाटल्याने गळत असते). तर अधिक लाळेमुळे पचन उत्तम होते.
=========
तांबे म्हणतात त्यानुसार थुक्का लावणे हे एक आसनही आहे (मात्र ते तांबे यांच्याइतके उत्तम करण्यासाठी प्रचंड साधना लागते.)
==========
थुक्का हा अलंकार आहे. ते रोख्ठोक व्य्वहारचे प्रतिक आहे. हा वेव्हार सर्व वेव्हारातील बीन पुराव्याचा असून त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.
=========
बाकी थुक्का, चुना यासारखी प्रतीक व्यापरांनाच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी थुक्का लावण्याच्या आसनाचे औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा इतरांना का नको? अशा सामान्यजनद्वेष्टया धर्माचा जाहीर निषेध. : )
17 Jan 2013 - 8:40 pm | प्रीत-मोहर
___/\___
स्वी़कार करा. आणि तुमचे चरणकमल आमच्याकडे धाडुन द्या दर्शनास
17 Jan 2013 - 6:20 pm | चौकटराजा
माझ्या मर्यादित डोस्क्यानुसार ... आपल्याला जिथे बुक्क्का मारायला जमत नाही तिथे थुक्का कामाला येतो.
अमर्यादित डोस्क्यानुसार .. ते सगंळ तुम्ही चित्र विचित्र ताईला विचारा ,,,,,,,
17 Jan 2013 - 6:24 pm | पैसा
दिवाळखोर माणसांनी थुक्का लावावा की लावू नये?
17 Jan 2013 - 6:32 pm | कवितानागेश
मिपावर शेअर बाजार भरल्यासारखे वाटले. बाकी थुक्क्याच्या जोडीला टोपी का असते??
17 Jan 2013 - 6:44 pm | शुचि
शी थुक्का म्हणजे थुंकी वाटतं :( ...... नाना जम्या नही :(
19 Jan 2013 - 2:52 am | कुंदन
Did you mean to say Tatya?
17 Jan 2013 - 7:15 pm | स्पंदना
"ज्याचे त्याचे लेखा ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार" अस म्हणु का?
17 Jan 2013 - 7:18 pm | शुचि
नाही अपर्णा माझं लेखन असलच असतं पण नाना खूप सुरेख लिखाण करुन जातात. त्यांचे हे विडंबन फाऊल धरण्यात यावे.
17 Jan 2013 - 7:19 pm | स्पंदना
पण मी नानांचाच प्रतिसाद वापरला आहे???? होय ना हो नाना?
17 Jan 2013 - 7:26 pm | शुचि
Oops, ok!
17 Jan 2013 - 7:24 pm | गणपा
थुंकी कितीही घोळली तरी तिला कुंकवाची सर येणे नाही. ;)
17 Jan 2013 - 7:40 pm | आनन्दिता
म्हणून च तीला 'थुंकी ' म्हणतात 'थुंकु ' नाही!!!
17 Jan 2013 - 8:01 pm | दादा कोंडके
अश्लिल धागा! ;)
18 Jan 2013 - 6:15 pm | बॅटमॅन
आयडीप्रमाणे प्रतिसाद ;) =)) =))
23 Jan 2013 - 10:23 am | अविनाश पांढरकर
+१
18 Jan 2013 - 6:08 pm | विलासिनि
धाग्याचे विडंबन ठिक आहे पण प्रतिसादांचे पण विडंबन करतात!!!
18 Jan 2013 - 10:31 pm | श्रावण मोडक
स्वानुभवाचा अभाव असल्याने काही सांगणं शक्य नाही. क्षमस्व. ;-)
18 Jan 2013 - 10:38 pm | नर्मदेतला गोटा
.
धाग्याला कुंकू लावले.
18 Jan 2013 - 10:38 pm | नर्मदेतला गोटा
बुक्का का लावतात असा धागा विणण्याच्या विचारात आहे
18 Jan 2013 - 10:49 pm | नर्मदेतला गोटा
धक्का का लावतात
18 Jan 2013 - 10:49 pm | नर्मदेतला गोटा
शिक्का का लावतात
(कागदावर)
19 Jan 2013 - 12:10 am | आनन्दिता
परिक्षेत टुक्का का लावतात?
19 Jan 2013 - 2:30 pm | नर्मदेतला गोटा
या धाग्याची सुरुवात रामायण शब्दाने झालीये पाहून गलबलून आले
आन्ध्री माणसेही कपळाला कुकू लावतात
19 Jan 2013 - 2:53 pm | बिपिन कार्यकर्ते
अनमोल माहितीबद्दल थुंकू! ... आय मीन, थांकू!