दार का लावतात ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
18 Jan 2013 - 6:34 pm
गाभा: 

इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच.

खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?"

मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "मग दिवसा ढवळ्या सगळे सतत फ्लॅटचे दार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो.

पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की वास्तू शास्त्राच्या ( प्राचीन असे म्हणायचे आहे मला की मग त्याचा इफेक्ट वाढतो ) तत्वज्ञानानुसार, दार लावताना आपल्या हातातील उर्जाचक्र कार्यान्वित होते .
( बरोबर अगदी कुन्डलिनी जागृत झाल्याप्रमाणेच ! ) व त्यातल्या उर्जास्रोतामुळे हात बळकट होतात व चकाकतात देखील. काहीजणांना दार लावल्यावर जोरदार पेंग कोचावरच येते आणि वेगळ्या स्वप्नात ते वावरतात . विशेषतः विद्यार्थ्यांना दार लावल्यावर प्रायव्हसी मिळत असल्याने असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना दार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत दारस्पर्श जीवनक्रियेला मदत करतो. "दारा"ला "कवाड " हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा दरवाजा ( सीसमचा ) लागतो तर काही जणांचे पिवळ्या रंगाचे ( हळदू या लाकडाचे ) दारा शिवाय चालत नाही. दारा च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण दार लावतात.

आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
विसू - उत्तर माहीत असून न दिल्यास परिणाम - डोक्याची शम्भर छकले होऊन ........

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Jan 2013 - 6:37 pm | प्रचेतस

काका,
वेळ जात नाहीये का?
ओपींचा दुसरा भाग टाका की.

वाहत्या गंगेत हात धुण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. दुसरं काय? :)

काहीतरी गडबड झालेली दिसतेय.

मी वरिल प्रतिसादात "वाहत्या गंगेत हात धुण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही." असं लिहिलं होतं. :)

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 6:53 pm | शैलेन्द्र

मध्येच दार लागल.. त्यामुळे ते बाकीच बाहेरच राहिले

धन्या's picture

18 Jan 2013 - 7:18 pm | धन्या

क ह र !!!

सगळ्य्यात भारी प्रतिसाद =))

आनन्दिता's picture

18 Jan 2013 - 10:48 pm | आनन्दिता

+१

आशु जोग's picture

20 Jan 2013 - 9:57 pm | आशु जोग

धन्या
स्वाक्षरीबाबत पुनर्विचार करावा

स्वाक्षरीमधून एक नवीन धागा आणि वाद व्हायला नको

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Jan 2013 - 6:39 pm | श्री गावसेना प्रमुख

का लावतात?कोणीही मध्ये ढुंकुन बघु नये म्हणुन्,काहींना सवय असते ढुंकण्याची

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 6:39 pm | बॅटमॅन

दार लावल्यावर आतली कडी का घालतात? असा अजून एक धागा "मिपाचाक" वर टाकायला हर्कत नसावी =)) =))

मला आधी पुरुष गाऊन का घालतात याच उत्तर द्या, तरच मी तुमच्या प्रश्नच उत्तर देतो ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 6:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अरे काय???
सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत..
कंटाळा आला राव...
बाकी तुमच चालू द्या..

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 7:01 pm | शैलेन्द्र

अरे काय???
सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत..
कंटाळा आला राव...
बाकी तुमच चालू द्या..

नका हो नका.. उगाच मन नको तिकडे धाव घेत..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 7:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

उगाच मन नको तिकडे धाव घेत
नाही हो नाही, तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात... फक्त थांबू नका... ;)

धन्या's picture

18 Jan 2013 - 7:15 pm | धन्या

तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात... फक्त थांबू नका...

सहमत आहे. :)

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 7:14 pm | धमाल मुलगा

मेलो तिच्यायला!
झक मारली अन काफी पिताना हे वाचलं...ठसका लागून पार उर्ध्व लागायची वेळ आली ना!

धन्या's picture

18 Jan 2013 - 7:17 pm | धन्या

धम्या अँड हीज कॉफी आर ब्याक. :)

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 7:22 pm | शैलेन्द्र

कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर उर्ध्व तर लागलेच असते शिवाय, सर्दीही पळाली असती..

हा प्रतिसाद वाचून धमालरावांना जालावरुन संन्यास घ्यावासा वाटला तर त्यात नवल नाही. ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 7:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे म्हंजे, दाऊदला दंबूक चालवायला शिकवण्यापैकी आहे.

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 7:39 pm | शैलेन्द्र

अहो, धमाल्राव सांच्याला चक्क काफी पितायेत असे हिन दीन द्रुष्य पाहुन राहवले नाही..

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 7:47 pm | धमाल मुलगा

अरे बाबानो, आमचं शैलेंद्रराव हैत ते, त्यांना बरोबर ठौकहै, आज दिवस कोणताय, टैम काय झालाय ते पाहूनच मुद्दाम तसं लिहिंलंय ते. :-)

Dhananjay Borgaonkar's picture

18 Jan 2013 - 7:51 pm | Dhananjay Borgaonkar

चला तर मग!!!कुठे जायचं?

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 8:00 pm | धमाल मुलगा

होम मिनिष्टरांची फरमिशन काढलीय का? नयतर घरला जाशिला अन् तोंडावर दार लाऊन घतल मज. 'दार का लावतात?' ह्या प्रशरश्राचं उत्तर मिळेल. ;-)

सध्या होम मिनिष्टर माहेरचा पाहुण्चार घेत आहेत्..म्हटल आपण आपल्या पाहुण्यांबरोबर दोन चार घेउ..कसे..

स्मिता.'s picture

18 Jan 2013 - 7:36 pm | स्मिता.

धाग्यात काही दम असो वा नसो... त्या निमित्ताने अज्ञातवासात गेलेल्या धमालरावांचे दर्शन झाले आणि धागा सफल झाला!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 7:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

+११११११११

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 7:52 pm | धमाल मुलगा

तुमचं आपलं कैतरीच बाई!
विषय काय चाललाय अन् तुमचं आपलं कैतरीच हं. :-P

कलश's picture

18 Jan 2013 - 7:50 pm | कलश

आहे रे आधी __________. पुढचे काय म्हणायचेय ते लक्षात आलेच असेल ;)

चौकटराजा's picture

18 Jan 2013 - 7:52 pm | चौकटराजा

एकदा स्मिता पाटील म्हणाली होती " एकदा तरी मी अमिताभ बनू की नको ?, की सारखेच प्यारलल सिनेमात राहू ?" तसा आमचा हा धागा आहे.ओपीचा दुसरा भाग तयार आहे .नशीब व कर्म नावाचा गंभीर विषयही विचाराधीन आहे. या धाग्याला इत: पर कोणीही प्रतिसाद देऊन नये म्हणजे कुंकू का लावतात असा भंकस धागा निर्माण होणार नाही व हे पुढचे सगळे " मोहाचे" धागे टळतील महाराजा ! [

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 8:01 pm | शैलेन्द्र

काका, अस कुंकु जर अधूनमधून लागल नाही तर, ट्यार्पी कसा वाढणार? कुंकू, नाडी, अध्यात्म, स्त्रीमुक्ती, बाबाभक्ती याशिवाय मिसळ मजा कशी देइल?

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 8:08 pm | धमाल मुलगा

च्छ्या! ह्याला काय अर्थय राव! लोकांनी काय प्रश्न विचारुच नयेत काय?
वस्तुतः तो प्रश्न भंकस नव्हता. त्यावर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहता , नवी माहिती नक्कीच मिळाली. आता, 'नवी' हे कदाचित वयोगट, संदर्भ इत्यादीनुसार सापेक्ष असेल. पण टाकाऊ नक्कीच नाही.

विकास's picture

18 Jan 2013 - 8:18 pm | विकास

आज दरवाजा सताड उघडलेला दिसतोय! ;)

सोत्रि's picture

18 Jan 2013 - 11:02 pm | सोत्रि

हा हा हा, झक्कास, अगदी सहमत! :D

-(दरबान) सोकाजी

विकास's picture

18 Jan 2013 - 8:17 pm | विकास

आपल्या भावना समजल्यामुळे जरा माहितीपूर्ण प्रतिसाद देतो... ;)

सगळीच दारे (दरवाजे) लावता येतात असे नाही... १९७१ मध्ये तुर्कस्थानात एक ७१ साली नैसर्गिकवायूच्या उत्खननाच्या वेळेस खड्डा पडला. त्यातून विषारी वायू नुसताच बाहेर येऊ शकतो या काळजीने तो तसाच तेथे जाळत ठेवला गेला. अपेक्षा होती की काही दिवसात तो संपेल. तो आजतागायत संपलेला नाही. त्याला तिथले उणेपुरे ३५० स्थानिक "मौत का दरवाजा" असे म्हणतात. (देरवेझे)

Darwaza

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 8:39 pm | शैलेन्द्र

गॅस पायपात घालुन पुण्यात जाळायला आणावा म्हणतो..

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 11:16 pm | नर्मदेतला गोटा

काय थंडीये
शेकून घ्यावे म्हणतो

तिमा's picture

18 Jan 2013 - 7:56 pm | तिमा

प्रश्न झालाय हा! म्हणजे कुठलं दार ? याचा खुलासा हवा.
बाथरुमचे दार आंघोळ करताना लावतात कारण, आतील पाणी बाहेर उडू नये म्हणून.
संडासाचे दार लावतात कारण आतील कुवास बाहेर पसरु नये म्हणून.
अशी प्रत्येक दाराची उत्तरे वेगवेगळी असू शकतील.

मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं दार लावतात कारण आत काय गंमत चालू आहे ते बाहेरच्यांना कळू कये म्हणून! ;)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2013 - 12:42 am | टवाळ कार्टा

मोरीतली गंमत ठीक आहे पण.... संडासातसुद्धा गंमत???

आदूबाळ's picture

19 Jan 2013 - 12:59 am | आदूबाळ

दॅट डिपेंड्स, टवाळभाऊ!

बोलघेवडा's picture

18 Jan 2013 - 8:34 pm | बोलघेवडा

अति तेथे माती...

भल्या भल्यांना कुठं थांबावं कळत नाही.
सुरवातीला हसू येतं मग आवरा म्हणायची पाळी येते.
:)

प्रतिज्ञा's picture

18 Jan 2013 - 9:54 pm | प्रतिज्ञा

मला तर हा काय लेख तेच कळाल नाही

आमच्या गावातील काही लोक, घरात चांगलेचुंगले खायला बनवले की, जेवण करताना मुख्य दार लावून घेतात!

आदूबाळ's picture

18 Jan 2013 - 10:32 pm | आदूबाळ

आपण कुठल्या गावात रहाता? 'युज्वल ससपेक्ट' तर नाही?

उपास's picture

18 Jan 2013 - 11:20 pm | उपास

'दार लावलं तरी वास लपत नाही' (सगळ्याच वासांना लागू) :))

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 10:32 pm | नर्मदेतला गोटा

.

धाग्याला कुंकू लावले.

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 11:19 pm | नर्मदेतला गोटा

दार का लावतात हा प्रश्न तसा अर्धवट आहे
नुसते दार लावून उपयोग नाही

कडीही लावा आतली

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2013 - 1:05 pm | श्रीगुरुजी

'कडीही लावा आतली"

हे वाचल्यावर "मी नाही बाई त्यातली आणि कडी लावा आतली" हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

योगप्रभू's picture

18 Jan 2013 - 11:41 pm | योगप्रभू

मन सुद्धं तुजं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची
तू लाव रं गड्या दार तुला भीती कशाची
पर्वाबी कुनाची.... :)

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 11:52 pm | बॅटमॅन

कं हाणलंय कं हाणलंय!!!!! जबरा!!

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 11:42 pm | नर्मदेतला गोटा

'द्वारका' शब्दाचा अर्थ हवा आहे

१.तिथे द्वार लावण्याची गरज नव्हती, त्यामुळे कोणी द्वार लावू लागले, की लोक विचारायचे- द्वार का(हून)?

२. ना घर का ना घाट का अशी स्थिती झाल्यावर कृष्णाने स्थापन केलेली नगरी, त्यामुळे लोक म्हणायचे - मैं द्वार का.

सध्या इतकेच सुचते आहे, जाणकारांनी अजून अग्न्यस्त्रे टाकून अज्ञान जाळोन टाकावे हे विनंती.

मोदक's picture

19 Jan 2013 - 6:51 am | मोदक

वो दादा..

इडंबनाची आर्डर द्येयच्या आधी लेखकाचे नाव तपाशून पघा. चौराकाकां बरूबर स्कोर शेटल करायचा हाये का?
न्हा ऽ ऽ ऽ ई.

मग इडंबन न्हा ऽ ऽ ऽ ई. ;-)

बाकी तुम्ही चुकीच्या दुकानात आडर दिली. इडंबन करावे तर आम्च्या बुवांनीच! (- असे वल्लीदा म्हन्तो.)

(सर्व संबंधितांनी हलके घ्यावे - न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील :-D)

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?

किसन शिंदे's picture

19 Jan 2013 - 8:20 am | किसन शिंदे

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?

=))

आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या.

येणी पिराब्लेम..? ;-)

(रोखठोक) मोदक

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा

@आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या.

येणी पिराब्लेम..? smiley>>> =)) =)) =))

(रोखठोक) मोदक>>>
http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate016.gif

मोदक's picture

20 Jan 2013 - 7:07 pm | मोदक

बुवा...

गडबडून लोळण्याइतका काय ज्योक झाला ते आम्हाला पण कळूद्यात की.

प्रचेतस's picture

20 Jan 2013 - 7:14 pm | प्रचेतस

वडगाव बु. फाट्याचा उल्लेख नसल्याने हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा

@हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.>>> आं............दु...दु...हलकट :-p
अगोबा-बॉक्सिंग आत्मा
...http://www.sherv.net/cm/emoticons/boxing/punching-face-smiley-emoticon.gif

पियुशा's picture

22 Jan 2013 - 4:55 pm | पियुशा

अगोबा-बॉक्सिंग आत्मा
__/\___ क ह र

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2013 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार

दार का लावतात ?

'दार उघडे का ठेवतात' असले प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून बहूदा.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jan 2013 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार

माझा प्रतिसाद का संपादित झाला ब्वॉ ? नक्की 'तो' शब्द खटकला, का पराचा आहे म्हणून प्रतिसाद खटकला ?

मिपावर शोध घेता तो विशिष्ठ शब्द मलातरी २९४ ठिकाणी सध्यातरी दिसतो आहे.

असो..

शेवटी मिपाचे रुपांतर 'पुरुषांची मंगळागौर' ह्या सदरातच करायचे म्हणल्यावरती काय करणार.