खर तर हा धागा काढावा की नाही याचा विचार बर्याच दिवसांपासुन करत होतो. मिपा दिवाळी अंकावरील प्रतिक्रिया मुख्य पानांवर दिसत नसल्याने बर्याच अप्रतिम लेखांवर कमी प्रतिक्रिया आल्या. याबद्दल संपादक मंड्ळाने काही प्रयत्न नक्की केले असतील पण ही सोय काही उपल्ब्ध झाली नाही. मग म्हणलं एक काथ्याकुट टाकुन मला आवडलेल्या काही लेखांची शिफारस करुन बघावी म्हणुन हा प्रपंच
मला आवडलेल्या काही लेखनाची ही यादी
वन फिश अॅट अ टाईम..
इतकी डिटेल आणि थरारक पोलीस इन्व्हेस्टिगेशन कथा बर्याच दिवसांनी वाचली. पहिल्यांदा कथेची लांबी पाहुन नंतर वाचेन असे ठरवले. ही कथा वेगवान आणि बारकाईने लिह्ली असल्याने अप्रतीम झाली आहे. (must read :-) )
मृत्यूछायेतले ६९ दिवस...
नेहमी प्रमाणे मोदकाचे थरारक आणि डिटेल वर्णन. या घटने बद्दल ऐकले होते पण थोडेसेच(नक्की वाचा)
बाप..
रामदास काकांच्या लेखाबद्दल लिहण्यासाठी आमचे शब्ददारिद्र्य आडवे येते. असो पण खास रामदास टच
फॉरबिडन
नगरीरंजन यांच्या लेखनाने नेहमीच भुरळ घातली आहे. ही लघुकथा मात्र तुफानच जमलेय.
अलख
क्रांती ताईंच्या कविता नेहमीच सुंदर असतात. अशिच शब्दसौंदर्याने नटलेली हि कविता
शिलाहार राजवंश आणि गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट
इंडियाना जोन्स वल्लीचा हा आणखी सुरेख माहितीपुर्ण लेख
एक न रुळलेली वाट...
एक वेगळिच नेटक्या शब्दात रंगवलेली वाट मला तरी नक्कीच आवडली.
काठमांडू ते कंदहार..
खर तर नको ती आठवण पण नक्कीच माहितीपुर्ण लेख (जरुर वाचा)
गवींचे संपादकीय आणि अजुन बरेच आहेत आणि तुम्हीही भर घालालच
जाता जाता
अल्बर्ट ब्रोकोली प्रेझेन्ट्स इयान फ्लेमींग.... हा लेख आवडला पण पिअर्स ब्रॉसननचे नाव नसल्याने यादित समाविष्ट नाही ;-)
चेतन
प्रतिक्रिया
13 Jan 2013 - 2:56 pm | पैसा
एक कायमची लिंक बाजूला असल्यामुळे दिवाळी अंक प्रमोट करायचे जास्त खास प्रयत्न केले नव्हते. पण तुम्ही हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! या यादीतले आणि इतर सगळेच धागे मी वाचले आहेत आणि सगळेच अतिशय आवडले आहेत. दिवाळी अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचेच पुन्हा एकदा कौतुक आणि इतर सर्वांनी त्यातल्या आवडलेल्या धाग्यांचे किंवा न आवडलेल्या सुद्धा रसग्रहण जरूर करावे.
13 Jan 2013 - 8:25 pm | प्रचेतस
मालोजीरावांचा औरंगजेबाचे वस्त्रहरण अर्थात सुरतेची पहिली लूट हा धागाही सुरतेच्या लुटीचे वर्णन आणि मुख्य म्हणजे तत्कालीन सुरतेच्या रेखाचित्रांमुळे अतिशय माहितीपूर्ण झाला आहे.
13 Jan 2013 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
दिवाळी अंकाच्या लिंक्स जरा एका बाजूला आणि रेग्युलर फाँट मध्ये आहेत. त्यामुळे त्या सहज ध्यानात येत नाहीत.
या लिंक्स "स्वगृह" पानावर दोनतीन महिने सतत अग्रस्थानी ठेवल्यास वाचकांच्या नजरेसमोर राहून वाचकांना फायदा तर होईलच पण लेखकांच्या एवढ्या उत्तम कलाकृतींचे चीजही होईल.
13 Jan 2013 - 11:00 pm | लॉरी टांगटूंगकर
खरे तर स्वगृह आणि नवे लेखन मध्ये एकाच कन्टेन्ट असताना वेगळ्या पाट्या (टॅब्स) का ठेवल्यात असा प्रश्न पडलाय, ते काढून एकच ठेवता येऊ शकते ,किंवा तिथे एक निवडक मिपा वगैरे पण ठेवता येऊ शकते..
16 Jan 2013 - 12:26 pm | चेतन
एक अफगाणी, त्याची कहाणी
निनाद यांचा हा वेगळाच अनुभवसमृद्ध लेख नक्कीच वाचनीय आहे आणि त्यावर ५० फक्त ची कमेंटही आवडली
हिकमत
हा नेहमीप्रमाणे चाफा यांचा खुसखुशीत रंगवलेला प्रसंगही जरुर वाचावा असा.
बाकी काही लेखांबद्दल नंतर
17 Jan 2013 - 7:49 pm | शुचि
ती चाफा यांची एकांकिका भलतीच विनोदी आहे. मजा आली ती वाचून.
बाकी इतर लेख वाचून झाले की प्रतिक्रिया देते.
17 Jan 2013 - 7:59 pm | शुचि
रामदास यांची "बाप" ही कथा वेगळ्याच विषयावरची आहे. वाचून कसंतरीच झालं. पण किती नाजूकपणे हाताळली आहे.