राज ठाकरेंचं मौन?

अविकुमार's picture
अविकुमार in काथ्याकूट
10 Jan 2013 - 12:48 pm
गाभा: 

गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.

मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.

१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)
३. सत्ताधारीपक्ष कोणत्यातरी कारणास्तव त्यांना ब्लॅकमेल करत आहे का? (पूर्वीची कोणतीतरी खूनाची केस आहे ना?)
४. अनेक केसेसला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ तरी आले नाहीये ना?
५. पक्षांतर्गत घडी (पक्षी अंतर्गत बंडाळी) नीट बसवत आहेत का? (हर्षवर्धन जाधव राजीनामा प्रकरण)
६. विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात व्यस्त आहेत का?
७. .......

तुम्हाला आणखी काही कारणे असावीत असे वाटत आहे का? राजकीय विश्लेषकांनी यावर प्रकाश टाकल्यास गोष्टी चांगल्या समजतील. मला स्वत:ला अंदाज क्र. ३ बरोबर असावा असे फार वाटते आहे.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Jan 2013 - 12:55 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही बिहारी आहात काय्? तुमच मुळ बिहारी आहे काय
कुजकट वास येतोय,
तद्दन फालतु आहे हे,

अविकुमार's picture

10 Jan 2013 - 1:26 pm | अविकुमार

जळ.लि !!! लगेच वापरायलाच पाहीजे का? मी 'मनसे'चा कार्यकर्ता असून (नेट्वरुन सदस्यत्व घेतले होते मागच्या वर्षी ५० रु. भरुन), सध्या भ्रमनिरास होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही जर ईतके प्रशंसक आहात तर आपले मौलीक विचार मांडुन आम्हास 'भ्रमनिरास' होण्याच्या मार्गावरून परत आणा की.
ईथे मी पुन्हा एकदा स्प्ष्ट करतो की या काथ्याकूटामागे कोणताही कुजकट हेतू नसुन स्वतःचा भ्रमनिरास होऊ न देण्यासाठी केलेला अंतिम प्रयत्न आहे.

तुम्ही बिहारी आहात काय्? तुमच मुळ बिहारी आहे काय>> वैयक्तिक टिकाटिपण्णीबद्दल तीव्र णिषेध (हे मला पण जळ लि मध्ये लिहिता आलं असतं आणि ते वाचून तुमची नक्कीच 'जळली' असती!) मुद्द्याला धरुन लिहायचे असेल तर लिहा नाहीतर आपले प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतील हे नक्की समजा.

याउप्पर तुमच्या लेखाविषयीच्या मतांबद्दल संपूर्ण आदर आहेच.

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Jan 2013 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही बिहारी आहात काय्? तुमच मुळ बिहारी आहे काय>> वैयक्तिक टिकाटिपण्णीबद्दल तीव्र णिषेध (हे मला पण जळ लि मध्ये लिहिता आलं असतं आणि ते वाचून तुमची नक्कीच 'जळली' असती!) मुद्द्याला धरुन लिहायचे असेल तर लिहा नाहीतर आपले प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतील हे नक्की समजा

मी कुठे म्हटल माझ्याकडे लक्ष द्या म्हणुन,मी दोघ ठाकरे बंधुंचा प्रशंसकही नाहीये ,तुम्हाला मनसे सोडायची आहे तर एव्हढा ढोल का वाजवताय सोडाना ते, का राज ठाकरेंनी लक्ष द्याव अशी इच्छा आहे ,(लहान मुल कस आपण लक्ष द्याव म्हणुन आदळ आपट करत ते लक्षात आहे ना.)
नाहीतर महाराष्ट्रात आयाराम गयाराम ची संस्कृती नवी नाहीये,राणे ना किती दिल तरी पोट अपुरच राहील त्यांच्,तिथे तुम किस पेड की पत्ती हो(ह घ्या)
सुचना: तुम्ही कितीही जळ ली मध्ये लिहीले तरी झाक फरक नाय पडायचा आम्हा

हेच विचार कागदावर उतरवून 'कृष्णकुंजा'वर पाठवून देणे.
काये ना इथे १०० लोकां कडून १०० उत्तर येणार मग तुमचा गोंधळ अजूनच वाढणार. मग तुम्ही त्यावरून पुन्हा नवा धागा उसवाणार. त्या पेक्षा 'फ्रॉम हॉर्सेस माउथ' खरं कारण काय ते जाणून घ्या. :)

जाता जाता : लेखन अगदीच मिळली आहे.

अविकुमार's picture

10 Jan 2013 - 1:31 pm | अविकुमार

हॉर्स माऊथचा अक्सेस असता तर इथे 'क्ष्क्ष्क्ष्क्ष' मारायला आलोच नसतो ना गणपाभाव. असो.

मिळलि लिहिण्याचा प्रयत्न कसोशीने केला आहे. विषय जिवाभावाचा आहे आणि नसते वाद उकरुन काढून ट्यारपी वाढवण्याचा तर नक्कीच हेतू नाहीये.

स्पा's picture

10 Jan 2013 - 2:32 pm | स्पा

हॉर्स माऊथचा अक्सेस असता तर इथे 'क्ष्क्ष्क्ष्क्ष' मारायला आलोच नसतो ना गणपाभाव

म्हणजे तुम्ही मिपाचा वापर "'क्ष्क्ष्क्ष्क्ष'" मारायला करताय का ?

विकास's picture

11 Jan 2013 - 10:12 pm | विकास

येथे चोप्य पस्ते करा....

MaNaSe Contact

इनिगोय's picture

14 Jan 2013 - 2:09 pm | इनिगोय

मात्र उत्तर मिळेल याची अपेक्षा करू नका.

मिपाच्या सुरुवातीलाच एक गुंडी पाहिजे:
(.) जळ.लि.
(.) मिळ.लि.

जळ.लि. साठी अटः शारिरिक आणि मानसिक वय १८ पुढे हवं...

अविकुमार's picture

10 Jan 2013 - 2:04 pm | अविकुमार

सूचना रास्त असली तरी धागा चूकला का रे आदूबाळ? गविंच्या लेखावर द्यायची प्रतिक्रीया ईकडे टाकलीस ना 'चूक्कून'? लब्बाडा, आशं नाय च्यूकायचं सालखं बलं का?

आदूबाळ's picture

10 Jan 2013 - 3:06 pm | आदूबाळ

हा हा हा... बरोबर!

थोडा नेम चुकलाच!

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2013 - 2:23 pm | पिंपातला उंदीर

टोल नाका आंदोलनाचे 'हिशेब' करण्यात व्यस्त असल्याने

कपिलमुनी's picture

10 Jan 2013 - 2:43 pm | कपिलमुनी

हा राज ठाकरेंचा सर्वात मोठा विनोद आहे !!

ह्यन्च्या पेक्षा उद्द्धव बरे !! अतिशय आळशी नेता म्हणून राज ठाकरेंचे वर्णन करता येइल !!
निवडणूकीच्या वेळी अस्मितेचा मुद्दा आणि गुद्दा दाखवतात...बाकी भरीव असे काही काम नाही.. पक्ष संघटना बांधणी , दौरे , लोकांच्यात मिसळून प्रश्न समजून घेणे ....हे दूरच आहे.

उपास's picture

10 Jan 2013 - 7:25 pm | उपास

दिल्लीमधले बलात्कारी 'बिहारी' होते आणि मुंबईत होणारे गुन्हे हे बाहेरून येणार्‍या लोकांकडूनच जास्त होतात (उत्तर भारतिय, बांगला देशी वगैरे) असं राजने सांगितलेय की.. (कोण म्हणतय रे 'अभ्यास वाढवा?') ;)

पिवळा डांबिस's picture

10 Jan 2013 - 8:34 pm | पिवळा डांबिस

काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)

काका गेल्याचे दु:ख्ख असणे ही शक्यता फारच कमी आहे हे तुम्हाला कसं कळलं?
की आपलं उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?
उद्या तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुमच्याबद्दल कुणी असेच उद्गार काढले तर तुम्हाला कसं वाटेल?
त्यांचे अनुयायी म्हणवता तर त्यांच्याबद्दल किमान माणुसकी तरी बाळगा!!
ह्या वाक्याबद्दल तीव्र निषेध!!
बाकीचं तुमचं चालू द्या...

आशु जोग's picture

10 Jan 2013 - 11:35 pm | आशु जोग

मतं नाही पण सभा हाऊसफुल्ल
तसा हा धागाही

मृगनयनी's picture

11 Jan 2013 - 10:22 pm | मृगनयनी

राज ठाकरे... गेट वेल सून....

आशु जोग's picture

13 Jan 2013 - 12:01 am | आशु जोग

राज ठाकरेंच्या मौनाची भाषांतरे ... संदिप

हुप्प्या's picture

13 Jan 2013 - 4:49 am | हुप्प्या

१ आणि २ शक्यता नगण्य आहे. भावनेच्या आहारी जाणार्‍यांपैकी राजसाहेब वाटत नाहीत. पण तरी लोकरित म्हणून शिवसेनेविरुद्ध काही दिवस तरी बोलणार नाहीत असे वाटते.
३ शक्य आहे.
मागे राज ठाकर्‍यांनी टोलविरुद्ध आंदोलन सुरु केले होते ते गुपचूप गुंडाळले. कुणीतरी मुरब्बी राजकारण्याने साम दाम भेद दंड वापरून ते प्रकरण मिटवले असावे.
कारण त्या वाटमारीत अमाप पैसा आहे.

थोरले ठाकरे गेल्यामुळे मनसेचे शिवसेनेतून आलेले लोक थोडे अस्वस्थ असणे शक्य आहे त्यामुळे संघटना थोडी डळमळीत झाली असणे शक्य आहे.
निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा एकदा मनसेमधे जान येईल अशी आशा.

राज ठाकरे बोलले तरी प्रॉब्लेम आणि नाही बोलले तरी प्रॉब्लेम. करायचं काय त्यांनी नक्की ?